वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ६/१ पृ. २६
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • रक्‍ताचे अंश आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • जिवंत देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ६/१ पृ. २६

तुम्हाला आठवते का?

तुम्ही अलिकडील टेहळणी बुरुज मासिकाचे अंक वाचलेत का? तर मग, तुम्हाला पुढील प्रश्‍नांची उत्तरे देता येतात का ते पहाः

◻ सैतानाच्या कुटील व धूर्त हालचालींना आम्ही कोणत्या मार्गी प्रतिकार करू शकतो?

सैतानाचा प्रतिकार करण्यास प्रथम आम्ही स्वतःचे परिक्षण करण्यास हवे. आम्हामध्ये असा एखादा कमकुवतपणा आहे का ज्याचा तो अयोग्य फायदा घेऊ शकेल किंवा घेत आहे? उदाहरणार्थ, आम्ही गर्विष्ठ असल्याची समस्या आहे का? आम्ही नेहमीच सर्वांच्या पुढे असावे असे वाटते का? आम्हास जर स्वतःची ओळख आहे, तर ही समस्या सुधारु शकतो, पण आम्ही तेवढे नम्र असलो तरच शक्य आहे. या मार्गी आम्ही स्वतःस सैतानाच्या पाशात पडू देणार नाही.—१२/१, पृष्ठ १०, ११.

◻ “एकमेकांवर अंतःकरणापासून निष्ठेने प्रीती करा,” असे म्हणण्यातील प्रेषित पेत्राचा अर्थ काय असावा? (१ पेत्र १:२२)

“निष्ठेने” या शब्दाचा शब्दशः अर्थ, “अतिभावनाप्रधान” असा आहे. अशी प्रीती ख्रिश्‍चन बांधवात व्यक्‍त करण्यास परिश्रम आणि आमच्या हृदयाच्या उदारतेची गरज असते, की ज्यायोगे, ज्या लोकांस सर्वसाधारणपणे आम्ही तितकेसे आवडत नसतो अशांचीही जवळीक साधण्याचा प्रयत्नात असू.—१२/१, पृष्ठ १६.

◻ आम्हा सर्वांच्या आशीर्वादाकरता केलेले ते सात प्रगतीपर करार कोणते आहेत?

एदेनचा करार, अब्राहामासोबतचा करार, नियमशास्त्र करार, मलकीसदेकाप्रमाणे याजक असण्याबद्दलचा करार, दावीदासोबतचा राज्य करार, नवा करार व राज्य करार.—२/१, पृष्ठ १९.

◻ देवाने नियमशास्त्र कराराची तत्कालीन जोड अब्राहामासोबतच्या कराराशी का केली होती?

नियमशास्त्र कराराने इस्राएल लोक पापी आहेत व त्यांना एका कायम याजकाची व पूर्णत्वातील अर्पणाची गरज असल्याचे शाबीत केले. त्याने संतानाच्या वंशावळीचे संरक्षण केले व ते संतान कोण असेल हे ओळखण्यात मदत पुरविली. त्याने हेही स्पष्ट केले की, एके दिवशी देवापाशी राजे-याजकांचे राष्ट्र असेल.—२/१, पृष्ठ १६.

◻ यशस्वी विवाहीत जीवनाचा मूळ आधार कोणता?

विवाह सोबत्यात एकमेकांबद्दल निस्सीम प्रेम, आदर आणि इमानीपणा असलाच पाहिजे. एकमेकांचे सद्‌गुण ओळखून असावे व कमकुवतपणा असल्यास त्याकडे दुर्लक्ष करुन क्षमाशील असावे.—४/१, पृष्ठ २१.

◻ कोडेक्स सायनाटीकस काय आहे व ते केवढ्या महत्त्वाचे आहे?

कोडेक्स सायनाटीकस हे सबंध ग्रीक शास्त्रवचने आणि इब्री शास्त्रवचनांचे काही भाग ग्रीकमध्ये भाषांतरीत असलेले मिळून बनले आहे. ते सुमारे १,६०० वर्षे जुने आहे आणि पवित्र शास्त्र साहित्याच्या आपसातील संबंधाचा महत्वाचा दुवा कसा आहे हे दाखविणारी आमच्या पवित्र शास्त्रीय लिखाणांची यादी त्यात सापडते.—४/१, पृष्ठे ३०, ३१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा