सुवार्ता गोलार्धव्याप्त प्रकटन
देवाच्या राज्याचा अधिकार सुरु झाला आहे! ही एक सर्वोत्तम वार्ता आहे. याच कारणास्तव, १९८९ मध्ये येशूने भाकित केलेली “सुवार्ता” आणि योहानाच्या दृष्टांतातील दिव्यदूताने घोषित केलेली “सुवार्ता” ३७,००,००० पेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार सबंध जगभर मोठ्या उत्साहाने घोषित करीत होते. (मत्तय २४:१४; प्रकटीकरण १४:६) जसे प्रेषित पौलाने म्हटले आहे तसा “त्यांचा नाद सर्व पृथ्वीभर व त्यांचे शब्द दिगंतरी पोंचले.” (रोमकर १०:१८) तसेच प्रत्यक्षात प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यांच्यातील बहुसंख्य वैयक्तीकांनी त्यांच्या या हाकेस प्रतिसाद दिला की, “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा.”—प्रकटीकरण १४:७.
यापुढे आयुर्विमा नको
अशांचेपैकी एक जो इंग्लंडमध्ये राहणारा होता व जीवनातील अनिश्चित गोष्टींचा फायदा उचलून त्यावर आपला चरितार्थ चालवीत होता. केन हा विमा एजंट होता आणि तो जेव्हा एका यहोवाच्या साक्षीदारांच्या घरी भेट देण्यास गेला, त्यावेळी त्यांनी त्याला विचारलेः “जेथे आयुष्याचा विमा उतरविण्याची गरजच भासणार नाही अशा जगात जीवन जगण्यास आपणास आवडणार नाही का?” असे म्हणण्यामागे त्यांचा अर्थ काय होता? हाच की, पवित्र शास्त्रानुसार, देवराज्य वर्चस्वाखाली, आज ज्या अनेक गोष्टी जीवनास अनिश्चित बनवीत आहेत, ज्यात आजार व मरण यांचाही समावेश आहे, त्या तेथे नसणार.
असे होण्याची शक्यता आहे? होय, कारण देवाने स्वतः तसे अभिवचन दिलेले आहे. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्र म्हणतेः “देव स्वतः त्यांजबरोबर [मानवजातीबरोबर] राहील; तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत; कारण पहिले होऊन गेले.” (प्रकटीकरण २१:३, ४) हा बदल कशाद्वारे घडवून आणण्यात येईल? देवराज्याकरवी. देववचनानुसार लवकरच ते “या सर्व [राजकीय] राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.
यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या गोलार्धव्याप्त उपदेश मोहिमेत अशा शास्त्रवचनांकडे लक्षावधी लोकांचे विचार केंद्रित केले. केनसारख्या अनेकांना हे स्पष्टपणे कळाले की, हा काही कपोलकल्पित विचारतरंग नसून वास्तववादी विचार आहेत. पुरावे निर्णायक आहेत. ही ईश्वरीय वचने विश्वसनीय आहेत व लवकरच त्यांची पूर्णता होईल.
मूल्यातील बदलता रोख
दिव्यदूताकरवीची ही आनंदविणारी घोषणा प्रतिध्वनित करीत असता जे कोणी यहोवाच्या साक्षीदारांचे ऐकून घेतात त्यांना ही समज होत जाते की, पवित्र शास्त्रीय शिकवणीनुसार, देवाचे भय बाळगा व त्याचे गौरव करा यात केवळ विश्वास ठेवून राहण्यापेक्षा अधिक समाविष्ट आहे. ते त्यांच्या जीवनावरील दृष्टीकोनात पूर्ण बदल करते आणि अनेक निराशजनक गोष्टीपासून बचावून ठेवते.
राफेल व त्याच्या बायकोला हे सत्य असल्याचे आढळले. ते अर्जेंटिनामध्ये राहात होते व ४० वर्षांपूर्वी जेव्हा त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्याच्यांसमोर मुख्य ध्येय हेच होते की, काबाडकष्ट करावयाचे आणि पुढील काळाकरिता बचत करावयाची. २१ वर्षांनंतर, त्यांच्या पूर्वश्रमिक परिश्रमाची बचत केवळ एक छोटेसे घर, ज्याची वेळोवेळी दुरुस्ती करावी लागे, एवढेच होते. त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांना जितके सुरक्षित वाटत होते तितके आता वाटेनासे झाले.
मग, त्यांना यहोवाच्या साक्षीदारांकडून सुवार्ता ऐकण्यास मिळाली व अधिक उत्तम धन व अधिक विश्वसनीय सुरक्षितता कशी प्राप्त होईल हे शिकण्यास मिळाले. येशूने त्याच्या डोंगरावरील प्रवचनात याबद्दलचा उल्लेख करताना म्हटले होतेः “पृथ्वीवर आपली संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा, जेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत.”—मत्तय ६:१९, २०.
पवित्र शास्त्र आम्हास, जेथपर्यंत जडवादीय संपत्तीचा प्रश्न आहे, अव्यवहार्य असण्याचा सल्ला देत नाही, तर ते हेच विनविते की, अशा गोष्टींवर भिस्त ठेवू नये. (उपदेशक ७:१२) काहीसे, आम्ही पवित्र शास्त्र अभ्यासाने आध्यात्मिकतेत भर टाकण्याचे परिश्रम घ्यावेत व देवाची इच्छा काय आहे याची जाणीव घेऊन, त्या इच्छेस आमच्या जीवनात प्रथम स्थान द्यावे. (मत्तय ६:३३) राफेल व त्याच्या बायकोने ह्या आध्यात्मिक धनसंचयाला सुरवात केली व आता त्यांना खरेच धनवान असल्याचे वाटू लागले आहे ते, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नव्हे तर देवासोबतच्या निकटवर्तीय संबंधामुळे. (प्रकटीकरण ३:१७, १८) देवराज्याचा संदेश त्यांचेकरिता सर्वोत्तम सुवार्ता होती.
सुधारीत विवाह
सुवार्तेमध्ये, जे चांगले ते साध्य करण्याची खरी ताकद भरलेली आहे. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये राहणारा जॉन, याला पवित्र शास्त्रात रस नव्हता; पण त्याची बायको व लेकरे बाळगून होती. यास्तव त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्यास सुरवात केली व तेच जॉन मित्रांच्या सोबतीत दारुबाजी, धुम्रपानसक्त आणि ओघाओघाने अनैतिक बनला. शेवटी तो आपल्या बायकोस सोडून परस्त्रीबरोबर राहू लागला.
घटस्फोटाच्या कायदेशीर कामकाजास सुरवात झाली. पण जॉनला हे पाहून आश्चर्य वाटे की, त्याची बायको, जी सुवार्ता शिक्षणाद्वारे ख्रिश्चन वागणूकीचे धडे शिकली होती, त्याजबरोबर केवढ्या सहानुभूतीने वागत होती. त्याला, ते तसे का असावे हेच उमगत नव्हते. घटस्फोटाचा निर्णायक निकाल लागण्याच्या तीन आठवडे आधी, जॉनच्या बायकोने जी आपली ख्रिश्चन वागणूक टिकविली होती तिचा परिणाम दिसला. त्याने त्याच्या वाईट वर्तणूकीविषयी खरा पश्चात्ताप व्यक्त केला व घटस्फोटाचे सर्व कामकाज स्थगित करण्यात आले. जॉन स्वतः आता सुवार्ता पडताळून, यहोवाच्या साक्षीदारासोबत शास्त्राभ्यास करू लागला. तोही आज ख्रिश्चन आहे व बायकोच्या सोबतीत इतरांना राज्याची ही सुवार्ता समजावून सांगत आहे.
कौटुंबिक मुल्यांचा अधःपात होत असलेल्या या काळात, मदत पुरवू शकणाऱ्या पवित्र शास्त्रीय सुवार्तेच्या मदतीची अनेकांना गरज आहे. पेरुमधील एक यहोवाचा साक्षीदार विमानप्रवासात एक लष्करी कर्नल शेजारी बसला होता. त्यांचे संभाषण सुरु झाले व कर्नल आपल्या कौटुंबिक समस्यांबाबत बोलू लागला, ज्यात त्याची बायको अमली औषधे घेणारी व लवकरच त्याला सोडून एका तरुणाबरोबर पळून जाणार होती. साक्षीदाराने अत्यंत कुशलतेने त्याला दाखविले की, सर्व प्रकारच्या कौटुंबिक समस्यांकरिता पवित्र शास्त्र उत्तम, भक्कम सल्ला देते व त्याने स्वतः त्याच्या वैयक्तीक कौटुंबिक समस्या सोडविण्यात साहाय्य पुरविले आहे.—इफिसकर ५:२१-६:४.
त्याच्या सांत्वनपर बोलण्याबद्दल कर्नलने त्या साक्षीदाराचे आभार मानले व द वॉचटावर आणि अवेक! पाक्षिकांची वर्गणी भरली; याकरिता की या मासिकातील साहित्याआधारे सुवार्तेबद्दलच्या ज्ञानात तो सतत भर टाकू शकेल. मग, ज्यावेळी साक्षीदार विमानातून उतरण्यास उठून पुढे जाऊ लागला तोच त्याच्या मागून एक तरुण जोडप्याने पुढे होऊन त्याला गाठले व त्यांच्याबरोबर बोलणी करण्यास विनवू लागले. ते म्हणालेः “आम्ही तुमच्या पुढच्याच रांगेत बसलो होतो व आम्ही, तुम्ही जे काही त्या गृहस्थासोबत बोलला ते सर्व ऐकले व त्या दोन मासिकांचे आम्हीही वर्गणीदार होऊ इच्छितो.” जी सुवार्ता जीवनास एवढे सुधारु शकते, ती तेही शिकू इच्छित होते.
बदललेले जीवन
याशिवाय, पवित्र शास्त्रावर आधारीत अशी ही सुवार्ता लोकांचे जीवनात बदल, परिवर्तनही करते. जसे प्रेषित पौलाने म्हटले आहेः “देवाचे वचन सजीव, आणि सतेज” आहे. (इब्री ४:१२) हेच, ग्रीसमधील मॅसेदोनियातील एका तरुणाचे बाबतीत खरे होते. पवित्र शास्त्रानुसार, देवाचे नाम यहोवा आहे, हे शिकून त्याला तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. यास्तव त्याने एका मित्रास, होईल तितक्या लवकर यहोवाच्या साक्षीदारांची भेट करवून देण्यास विनविले. साक्षीदारांसोबत दोनवेळा सुमारे चारचार तास चर्चा झाली. मग तो तरुण नियमितपणे शास्त्राभ्यास करण्यास तयार झाला, ज्यांचेपैकी पहिला अभ्यास पहाटे दोन वाजेपर्यंत चालला होता.
अगदी पहिल्याच अभ्यासापासून त्या तरुणाने आपल्या जीवनास शास्त्रीय दर्जानुसार वळण देण्यास सुरवात केली. तो, यहोवाच्या साक्षीदारांसोबत त्यांच्या भक्ती सभांना उपस्थित राहू लागला आणि सृष्टीकर्त्यावर त्याचे निस्सीम प्रेम जडले. यहोवानेही त्याजवर आशीर्वाद पाठविणे सुरु केले. शास्त्राभ्यासाच्या अगदी पहिल्याच आठवडी त्याने त्याचे लांब केस कापून टाकले. दुसऱ्या आठवडी त्याने भडक उपहारगृहात व डिस्को डान्सगृहात जाणे व चेतविणाऱ्या मित्रांची साथ जोडणे सोडून दिले. तिसऱ्या आठवडी त्याने त्याची शेवटली सिगारेट फेकून दिली. दोन महिने अभ्यास केल्यानंतर तोही साक्षीदारांच्या सोबतीत इतरांना राज्याची सुवार्ता सांगण्यात सहभागी होऊ लागला. होय, त्याला याचा केवढा आनंद झाला की, भूतलावरील त्याच्या भागातही यहोवाची साक्षीदारांनी सुवार्ता पोहंचविलेली आहे.
बंदीशाळेत सुवार्ता
एवढेच काय पण तुरुंगाचे गजही सुवार्तेस आड येऊ शकले नाहीत. स्पेनमध्ये, जोसे नामक तरुण शस्त्रास्त्रांची चोरी आणि गुन्हेगारीच्या इतर कृत्यांमुळे लांब मुदतीची शिक्षा भोगीत होता. तरीही, यहोवाचे साक्षीदार त्याला तेथेही सुवार्ता कळवू शकले, आणि शास्त्र संदेशाने जीवनावरील त्याच्या दृष्टीकोनात संपूर्ण बदल घडवून आणला व यहोवाने त्याला आपले “सामर्थ्य” पुरविले.—फिलिप्पैकर ४:१३.
जोसे म्हणतो या व्यवस्थीकरणातील उर्वरीत आयुष्य जरी पूर्वआचरणामुळे गजाआड घालवावे लागले तरी चालेल. पण आता तो बाप्तिस्मा घेतलेला ख्रिश्चन बनला आहे. त्याची बायको त्याला संपूर्ण पाठिंबा देत आहे. या काळात, जोसेने प्रतिपादित केलेली सुवार्ता सोबतीतील कैद्यांना सांगत आहे, त्यांची भेट तुरुंगाबाहेरील लोकांस अशक्य असते. आता त्याचा एक कोठडीतील मित्र बाप्तिस्मा घेतलेला व ख्रिश्चन बनलेला आहे.
ही काही अशी उदाहरणे आहेत जी, यहोवाच्या साक्षीदाराकरवी पृथ्वीव्याप्ततेत जे उपदेशप्रचार काम चालत आहे त्याच्या परिणामातील आहेत. खरेच, अदृश्य दिव्यदूताकरवी जी सुवार्ता घोषित केली जात आहे तिचा प्रतिध्वनी यहोवाच्या साक्षीदारांमार्फतः “पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यांस” सुवार्ता सांगण्याद्वारे उमटविला जात आहे.
ती एक सर्वोत्तम बातमी आहे, आणि मानवजातीकरिता ती एकमेव आशा आहे. इंग्लंडमधील केन आणि जॉनप्रमाणे, अर्जेंटिनामधील राफेल आणि त्याच्या पत्नीप्रमाणे, स्पेनमधील जोसेप्रमाणे, तसेच इतर लाखोंप्रमाणे या, आपणही दिव्यदूतासह हे आर्जविण्यात सहभागी होऊ या कीः “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे; ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले, त्याला नमन करा.”—प्रकटीकरण १४:७.