सुवार्ता अवघ्या मानवजातीकरिता!
“मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्ये भागी उडताना पाहिला, त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जण म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.” (प्रकटीकरण १४:६) या शब्दात, वृद्ध प्रेषित योहानाने आपल्या प्रेरित भविष्यवादित दृष्टांताचे वर्णन केले; असा दृष्टांत ज्याची पूर्णता आज आमच्या दिवसात होत आहे. ज्या काळात गुन्हेगारी, प्रदूषण, अतिरेकता, युद्धे यात सतत वाढ होत आहे व अर्थव्यवस्था चोहोकडे अनिश्चित होत असताही हे जाणणे केवढा दिलासा देणारी गोष्ट आहे की, आम्हाकरिता सुवार्ता आहे. पण अशी ही एवढी उत्तम वार्ता कोणती आहे की जिच्या घोषणेकरिता देवदूताची गरज भासली? तीत अशा कोणत्या आनंदविणाऱ्या गोष्टी समाविष्ठ आहेत, जी सर्व राष्ट्रास, वंशास, भाषेत आणि लोकांस घोषित करण्याची लायकी राखून आहे?
या आधीच्या एका प्रसंगाची, ज्यात एका देवदूताने स्वतः सुवार्ता घोषित केली होती, त्याची आठवण केल्यास सहज उत्तर देऊ शकू. त्यावेळी, इ.स. पूर्वीचे पहिले शतक पूर्ण होण्याच्या लागास होते. म्हणजे योहानाने त्याचा दृष्टांत पाहण्याच्या शंभर वर्षे आधी. मेंढपाळ आपले कळप बेथलहेम नजीकच्या शेतात चारीत होते. तितक्यात येशूच्या जन्माची घोषणा करण्यास एक देवदूत अवतरला व म्हणाला: “पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो; ती ही की, तुम्हासाठी आज दावीदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभू आहे.”—लूक २:१०, ११.
येशूचा जन्म हा “जो मोठा आनंद . . . त्याची सुवार्ता” होती. तो वाढत जाऊन, वचन दिलेला ख्रिस्त आणि तारणारा बनला म्हणजेच त्याने त्याचे पूर्णत्वातील मानवी जीवन समर्पित केले ते याचसाठी की, त्याद्वारे त्याजवर विश्वास ठेविणाऱ्या प्रांजळ अंतःकरणाच्या व्यक्तीला जीवनप्राप्ती व्हावी. याशिवाय, त्याला देवाच्या राज्याच्या राजा बनणे होते; “शांतीचा अधिपती” ज्याच्या अधिपत्याखाली न्यायत्व आणि शांती ही अवघ्या मानवजातीस प्राप्त होती. (यशया ९:६; लूक १:३३) खरोखरी, त्याचा जन्मच, एका दिव्यदूताकरवी घोषित करण्याच्या पात्रतेचा होता.
येशू राजा आहे
गतकाळातील पहिल्या शतकात, येशूने देवाच्या अनेक उद्देशांची पूर्णता केली, पण त्यावेळी तो देवराज्याचा राजा म्हणून सिंहासनावर बसलेला नव्हता. या मासिकाने वेळोवेळी हे लक्षात आणून दिले की, ते १९१४ पर्यंत घडले नाही. जसजशी भविष्यवादांची पूर्णता होत गेली, हे स्पष्ट झाले की त्या वर्षी स्वर्गात देवराज्याची स्थापना झाली. (प्रकटीकरण १२:१०, १२) जरी १९१४ मध्ये पहिले जागतिक महायुद्ध सुरु झाल्याच्या फारच वाईट बातम्या होत्या तरी देवराज्याचा जन्म झाल्याची सर्वोत्तम बातमीही होती. ह्याच कारणास्तव येशूने आमच्या दिवसाकरिता भविष्यवाद केला होता: “सर्व राष्टांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील.”—मत्तय २४:१४.
येशूच्या भविष्यवादाची पूर्णता झाली का? उत्तर हेच आहे की, होय! तसेच योहानाच्या भविष्यवादित दृष्टांताचीही पूर्णता झालेली आहे. हे खरे की, योहानाने पाहिलेल्या त्या अदृश्य दिव्यदूतास आम्ही प्रत्यक्ष पाहू शकत नाही. तरी दिव्यदूताकरवीची सुवार्ता “प्रत्येक राष्ट्र, वंश भाषा व लोक यांस” जे घोषित करीत आहेत ते यहोवाचे साक्षीदार तर सर्वांस दृश्य आहेत. २१२ राष्ट्रात आणि बेटावर त्यांचा आवाज ऐकू येत आहे. आणि लक्षावधी लोक प्रतिसाद देत आहेत की देवराज्याबद्दलची ही सुवार्ता खरीच किती चांगली आहे.