“सुवार्तेची लाज वाटत नाही”
“मला सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला . . . तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.”—रोमकर १:१६.
१. आनंदी बातमीचा सहसा कसा स्विकार होतो, पण तेच जगातील विश्वासहीन लोक देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा कसा दृष्टीकोन धरतील?
एखादी गोष्ट एका माणसाला आनंदाची बातमी वाटते तर तीच गोष्ट दुसऱ्याला तशी वाटणार नाही. साधारणपणे जो आनंदाची बातमी घेऊन येत असतो त्याचे हार्दिक स्वागत केले जाते आणि त्याच्याकडून कोणती आनंदी बातमी ऐकायला मिळेल त्यासाठी कान आतुर होतात. तथापि, या जगाचे विश्वासहीन लोक देवराज्याविषयी व त्याकरवीच्या तारणाच्या संदेशाच्या आनंदी बातमीला—सुवार्तेला—आनंदी म्हणून समजणार नाहीत असे पवित्र शास्त्राने भाकित केले आहे.—पडताळा २ करिंथकर २:१५, १६.
२. प्रेषित पौलाने, घोषित करणाऱ्या सुवार्तेविषयी काय म्हटले, आणि त्याने घोषित केलेला संदशे आजही सुवार्ता का आहे?
२ प्रेषित पौलाला लोकांमध्ये जाहीरपणे सुवार्ता सांगण्यासाठी पाठविण्यात आले. त्याला आपल्या नेमणूकीविषयी कसे वाटले? तो म्हणालाः “रोम शहरात राहणाऱ्या तुम्हाला सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही.” (रोमकर १:१५, १६) रोममधील ख्रिश्चनांना पौलाने जे लिहिले ती वार्ता आज, साधारण २,००० वर्षानंतरही चांगली म्हणून असावयाची झाल्यास ती दीर्घकालीन सुवार्ता असली पाहिजे. आणि ती तशीच आहे! कारण ती “सार्वकालिक सुवार्ता” आहे.—प्रकटीकरण १४:६.
३, ४. प्रेषित पौलाला सुवार्तेची लाज वाटत नव्हती असे तो का म्हणाला?
३ सुवार्तेविषयी आपल्याला लाज वाटत नाही, असे प्रेषित पौल का म्हणाला बरे? त्याला तिची लाज तरी का वाटावी? कारण तिचा संदेश प्रसिद्ध नव्हता. त्याचा संबंध अशा माणसाशी होता ज्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वधस्तंभी खिळण्यात आले होते व यामुळे एकंदरीतपणे तो अगदीच कुविख्यात व्यक्ती आहे असे भासविण्यात आले होते. साधारण साडेतीन वर्षे हा माणूस पॅलेस्टाईनमध्ये वरखाली सुवार्ता घेऊन जात होता, पण त्याला यहुदी व खासपणे धार्मिक पुढाऱ्यांचा कडवा विरोध सहन करावा लागला. आता या माणसाचे नाव घेऊन कार्य करणारा पौल देखील अशाच छळाचे लक्ष्य बनला होता.—मत्तय ९:३५; योहान ११:४६-४८, ५३; प्रे. कृत्ये ९:१५, २०, २३.
४ अशा या छळामुळेच पौल व त्याच्या इतर ख्रिस्ती सहकाऱ्यांना लाज वाटणारे लोक असा दृष्टीकोन धरला जाणे शक्य आहे. खरे म्हणजे, पौल मुळात आता अशा गोष्टींचा पुरस्कर्ता बनला होता, ज्याचा तो पूर्वी कट्टर द्वेष्टा होता! त्याने प्रत्यक्षा येशू ख्रिस्ताच्या अनुयायांचा छळ करण्यात सहभाग घेतला होता. (प्रे. कृत्ये २६:९-११) पण त्याने आपला मार्ग बदलला. याचा हा परिणाम झाला की तो आणि जे इतर ख्रिस्ती बनले त्या सर्वांना हिंसाचारी छळाला तोंड द्यावे लागले.—प्रे. कृत्ये ११:२६.
५. आपल्याला सुवार्तेविषयी लाज वाटत नाही या विधानाचे पौलाने कसे स्पष्टीकरण दिले?
५ येशू ख्रिस्ताचा शिष्य म्हणून कोणाला लाज वाटत असली तर त्याचा हा दृष्टीकोन मानवी विचारसरणीवर आधारलेला आहे. प्रेषित पौल तसा नव्हता. उलटपक्षी, आपण केलेल्या सुवार्तेच्या प्रसाराविषयी का लाज वाटत नाही याबद्दलच्या स्पष्टीकरणार्थ तो म्हणालाः “कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला . . . तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.” (रोमकर १:१६) वैभवी देवाच्या स्तुतीपात्र उद्देशाची पूर्तता व्हावी यासाठी येशू ख्रिस्ताच्या कोणा शिष्याकरवी देवाचे सामर्थ्य कार्यवाहित होत आहे तर ती लाजेची गोष्ट नव्हे. येशू हा देखील स्वतः त्या वैभवी देवाचा उपासक व स्तुतीपाठक होता.—पडताळा १ करिंथकर १:१८; ९:२२, २३.
जगजाहीरपणे घोषित करण्यात येणारी सुवार्ता
६, ७. (अ) सुवार्तेच्या अनुषंगाने असणाऱ्या कोणत्या जबाबदारीविषयी यहोवाचे साक्षीदार जगत आहेत, आणि याचा काय परिणाम दिसत आहे? (ब) साक्ष देण्यामध्ये आम्हाला भयाने माघार घेण्यास लावू नये अशी आमची इच्छा असली तरी कधी कधी काय जरुरीचे असते? (तळटीप पहा.)
६ प्रेषित पौलाप्रमाणे, आज यहोवाचे साक्षीदार देवाच्या वैभवप्राप्त पुत्र, येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत. यहोवाने त्याच्या या साक्षीदारांना “गौरवाची सुवार्ता” हिचा ठेवा सोपविला आहे. (१ तीमथ्य १:११) या गहन जबाबदारीत यहोवाचे साक्षीदार मागे पडले नाहीत व शिवाय त्यांना याची लाज वाटत नाही. (२ तीमथ्य १:८) तेव्हा यहोवाचे साक्षीदार या नात्याने आमची ओळख देण्यात कसलेही भय वा भेकडपणा आम्हाला वाटू देऊ नये.a
७ अशा या धडाडी व निर्भयी साक्षीमुळेच सर्वसमर्थ देवाचे नाव सबंध पृथ्वीभरात गाजविले जात आहे आणि त्याच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार जगजाहीरपणे व्याप्त रुपात होत आहे. देवाच्या पुत्राने म्हटले की, “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील तेव्हा शेवट होईल,” या त्याच्या भविष्यवादाला केव्हाही अपयशी होऊ देऊ नये. (मत्तय २४:१४) ही सुवार्ता आता २१० पेक्षा अधिक राष्ट्रांत गाजविली जात आहे, तरी या प्रचार कार्याचा शेवट अजून आलेला नाही. सुवार्तेविषयीची कसलीही लाज न वाटू देता आणि धैर्याने भविष्याचा सामना करता आमची प्रार्थना, येशू ख्रिस्ताच्या आरंभीच्या शिष्यांप्रमाणेच आहे कीः “हे यहोवा, . . . आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.”—प्रे. कृत्ये ४:२९.
८. पृथ्वीवरील राष्ट्रांकरवी होणाऱ्या विरोधामुळे यहोवाच्या साक्षीदारांनी निराश का होऊ नये?
८ यहोवाच्या साक्षीदारांचा पृथ्वीवरील राष्ट्रात द्वेष व विरोध होत आहे हे खरे असले तरी हे, एकच जिवंत व खऱ्या देवाच्या खऱ्या सेवकांच्या ओळखीविषयीचे भाकित केलेल्या चिन्हाची पूर्णता आहे. (योहान १५:२०, २१; २ तीमथ्य ३:१२) तेव्हा यामुळे नैराश्य किंवा खंत वाटू न देता सुवार्तेच्या घोषकांना याची ही हमी आहे की, त्यांच्यावर ईश्वरी इतराजी आहे व ते विश्वाचा सार्वभौम प्रभु यहोवा याच्या संमतीकारक संस्थेचे सदस्य आहेत.
९. सबंध जग जरी आमच्या विरुद्ध आहे तरी आम्हाला चिंता का नाही?
९ हे विसरु नकाः आपल्याला विश्वाच्या सर्वसमर्थ देवाचे पाठबळ आहे. मग, जरी जगाने आपल्या धार्मिक पंथांकरवी आणि राजकारणी पक्षांकरवी विरोध दर्शविला तरी यात चिंता कसली? देवाच्या एकुलत्या एका पुत्राचा या जगाने विरोध केला आणि आपणही आज याच स्थितीत आहोत म्हणून आपल्याला लाज वाटत नाही. त्याने त्याच्या प्रेषितांना म्हटलेच होतेः “जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते. परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते.”—योहान १५:१८, १९.
१०. साक्षीदारांना अधिक विरोध कोणाकडून मिळाला, आणि याची त्यांना का लाज वाटत नाही?
१० यहोवाच्या साक्षीदारांना जगभरात त्रास आहे तरी तो नामधारी ख्रिस्ती जगताकडून अधिक प्रमाणात आहे. ख्रिस्तीधर्मराज्याद्वारे होणारा हा विरोध, साक्षीदार विधर्मी आहेत असे सिद्ध करीत नाही. उलटपक्षी, हे देव व येशू ख्रिस्ताचा पिता यहोवा याचे साक्षीदार असून ते खरे ख्रिस्ती आहेत हा दावा खरा असल्याचे स्पष्ट करते. ते देवाचे साक्षीदार असल्यामुळे धार्मिक कारणांमुळे छळ सहन करण्यात त्यांना लाज वाटत नाही. या कारणास्तव, सुवार्तेची लाज वाटू देऊ नये असे प्रेषित पौलाने आरंभीच्या ख्रिस्ती जनांना जे म्हटले होते ते आता यहोवाच्या साक्षीदारांना अगदी योग्यपणे लागू करता येते.—पहा फिलिप्पैकर १:२७-२९.
घोषित करण्याजोगी सर्वोत्तम वार्ता
११. यहोवाचे साक्षीदार हे नाव लावून घेतल्यामुळे आम्ही येशू ख्रिस्ताचे अनुयायी नाही असा का अर्थ होत नाही?
११ यहोवाने आपल्या करारबद्ध लोकांसोबत यशया ४३:१० मध्ये जे अभिवचन दिले होते त्याच्या पूर्णतेस अनुसरुन यहोवाचे साक्षीदार यांनी ते नाव आपल्याला मोठ्या धैर्याने लावून घेतले आहे. तथापि, याचा असा अर्थ नाही की, ते येशू ख्रिस्तास अनुसरीत नाही. येशू तर त्यांचा नेता आहे व त्याने घालून दिलेल्या नमुन्याप्रमाणेच ते अनुकरण करीत आहेत. तो स्वतः एक यहोवाचा साक्षीदार होता. खरे म्हणजे, तो यहोवाचा अग्रगामी साक्षीदार आहे.—१ तीमथ्य ६:१३; प्रकटीकरण १:५.
१२. यहोवाचे साक्षीदार जगभरात कोणत्या प्रकारच्या संदेशाचा प्रचार करतात, व का?
१२ हे यहोवाचे साक्षीदार जगभरात ज्या संदेशाचा प्रचार करीत आहेत ती सर्वात उत्तम सुवार्ता आहे. मानवजातीकरता मशीही राज्यापेक्षा दुसरे चांगले सरकार कोणतेही असू शकणार नाही. हे राज्य देवाने मानवजातीच्या जगावर अधिपत्य गाजविण्यासाठी स्थापन केले आहे; आणि मानवजातीची मुक्तता करावी यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठविले. (यशया ९:६, ७) पृथ्वीवर वास करणाऱ्यांना या राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारामुळे तिचा स्विकार करण्याची संधि दिली जात आहे की, ज्यामुळे त्यांना नंदनवन बनलेल्या पृथ्वीवरील परिपूर्ण मानवी जीवन सार्वकालिक जगण्याच्या पात्रतेचे आहोत हे सिद्ध करता येऊ शकेल.
१३. मशीही राज्य सरकार हे सर्वोत्तम असणार याची खात्री आम्हाला का आहे, आणि साक्षीदार कसलीही लाज न धरता त्याची शिफारस का करतात?
१३ जे आपली प्रजा होणार त्यासाठी येशूने आपला जीवही स्वेच्छेने देऊ केला तर तो त्यांच्यासाठी सर्वोत्तम असेच सरकार देणार. यास्तव, आम्ही पृथ्वीवरील प्रत्येक माणसास ही शिफारस करतोः या सरकारची विश्वासू व आज्ञाधारक प्रजा बना. ज्याविषयी ही तळमळीची शिफारस आम्ही लोकांना करतो त्या सरकारविषयी आम्हाला लज्जास्पद असे काहीही वाटत नाही. यामुळेच या राज्याचा प्रचार करण्यामध्ये, जरी आम्हावर छळ आला तरीही आम्ही माघार घेत नाही. प्रेषित पौलाप्रमाणेच आम्हातील प्रत्येक जण म्हणतोः “मला सुवार्तेची लाज वाटत नाही.”
१४. येशूच्या मते आमच्या काळात राज्याचा प्रचार केवढा व्याप्त रुपात होणार होता?
१४ येशूने भाकित केले की, राज्याच्या या सुवार्तेचा जगव्याप्तपणे प्रचार होणार आणि तो भविष्यवाद या विस्तारित संदेशासाठी उपयुक्त असाच आहे. (मार्क १३:१०) यहोवाच्या राज्याचे प्रचारकार्य अगदी दूरवर—होय, पृथ्वीच्या शेवटापर्यंत होणार असा भविष्यवाद सांगायला त्याने हेळसांड केली नाही. (प्रे. कृत्ये १:८) येशूला ठाऊक होते की जेथे जेथे लोक आढळतील तेथे तेथे त्याचे विश्वासू अनुयायी त्यांना भेटण्याचा प्रांजळ प्रयत्न करतील व ते त्यांना राज्याची सुवार्ता सांगतील.
१५, १६. (अ) सुवार्ता कोणापर्यंत नेली पाहिजे? (ब) दियाबलाच्या संस्थेमार्फत छळ आला तरीही प्रचाराचे काम का पूर्ण होणार?
१५ पृथ्वीची लोकसंख्या आज लाखोंच्या घरात गेली आहे व ते सर्व खंड तसेच प्रमुख बेटांवर वसाहत करून आहेत. तरीही, पृथ्वीच्या वसाहतीचे असे एकही ठिकाण नाही की, जेथे यहोवाच्या साक्षीदारांना सुवार्ता घेऊन जाता येत नाही. सबंध पृथ्वी ही यहोवा देवाचे लाक्षणिक पदासन आहे. (यशया ६६:१) या पदासनाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या लोकांकडे तारणाचा संदेश नेणे अगत्याचे आहे.
१६ आजची सुवार्ता ही आनंदप्रदायक वार्ता आहे ते या अर्थी की, ते बादशाही सरकार मशीहाच्या वर्चस्वाखाली आधीच प्रस्थापित करण्यात आले आहे. येशूला हे ठाऊक होते की, सैतानाच्या संस्थेने याविरुद्ध कितीही प्रयत्न केले, कितीही घोर छळ आणला तरी देवाचा आत्मा मशीहाच्या खऱ्या अनुयायांना चालना देऊन होता होईल तितक्या मर्यादेपर्यंत ते काम पूर्ण करील की ज्याद्वारे “राज्याची ही सुवार्ता” एक वस्तुस्थिती या नात्याने “सर्व जगात गाजविली जाईल.”—मत्तय २४:१४.
येशू ख्रिस्त व यहोवा याजविषयी कसलीही लाज वाटू न देणे
१७. (अ) खऱ्या उपासकांना कशाची लाज वाटत नाही? (ब) येशूने मार्क ८:३८ मध्ये कोणता नियम दिला व यामगील अभूतपूर्वता काय आहे?
१७ सर्वसमर्थ देवाने स्वतःला यहोवा हे नाम देण्यात कसलीही कुचराई केली नाही; त्याचप्रमाणे त्याच्या विश्वासू उपासकांनीही त्याच्या नावाविषयी कसलीही लाज वाटू देऊ नये. खऱ्या उपासकांना तर त्याचे नाव धारण करणारे लोक अशी ओळख देण्यात व त्याला अविभाज्य अशी भक्ती व आज्ञाधारकपणा दाखवण्यात आनंद वाटतो. याविषयी येशूने स्वतःच एक नियम वा तत्त्व मार्क ८:३८ मध्ये दिले आहे, जेथे तो म्हणतोः “ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.” याचप्रमाणे प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता व देव यहोवा याविषयी ज्याला लाज वाटेल त्याच्याविषयी यहोवालाही लाज वाटेल हे निश्चित. यहोवाला ज्याची लाज, त्याच्या अविश्वासू मार्गाक्रमणामुळे वाटेल, त्याला देवाच्या अधिपत्याखाली स्वर्ग किंवा पृथ्वी येथे कोठेही जागा मिळणार नाही.—लूक ९:२६.
१८. (अ) येशूचे मत्तय १०:३२, ३३ मधील शब्द आमच्या मनात व अंतःकरणात का रूजवले गेले पाहिजेत? (ब) जे यहोवा व येशूला माणसांच्या भीतीमुळे नाकारतात अशांचे काय होते? (तळटीपेचा आधार घेऊन उदाहरणे द्या.)
१८ येशू ख्रिस्ताचे पुढील शब्द आमचे मन व अंतःकरण यात बिंबवलेले असू द्याः “जो काणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. पण जो काणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.” (मत्तय १०:३२, ३३; लूक १२:८, ९) याच आधारावर, जो कोणी प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता व देव याला नाकारील त्याला तोही नाकारील. अशा व्यक्तीला, येशू ख्रिस्त जेथे प्रमुख पुत्र म्हणून आहे त्या देवाच्या घरात सदस्य म्हणून राहण्यास कसलाही थारा नसणार. या कारणास्तव, देवाच्या नियुक्त वेळी अशाचा नाश केला जाईल.b
१९, २०. (अ) यहोवाचे नाम पवित्र व्हावे म्हणून ज्यांनी प्रार्थना केली त्यांना लाज वाटेल असे काही का नसणार? (ब) निर्भिड राज्य घोषकांनी काय तडीस नेले, व कोणाच्या मदतीकरवी?
१९ येशूने आपल्या शिष्यांना जी नमुनेदार प्रार्थना शिकविली तिचे लवकरच उत्तर मिळेल की, “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जावो; तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) हे घडून येईल तेव्हा येशूच्या प्रेमळ शिष्यांना लाज वाटू शकेल असे काहीही नसणार. यहोवाच्या नामाला केवळ जे जिवंत आहेत व कधीही मरणार नाहीत त्यांच्याकडूनच नव्हे तर त्याच्या हजार वर्षीय राजवटीत ज्या करोडोंचे पुनरुत्थान होणार आहे त्यांच्याकडून देखील सन्मान व गौरव प्राप्त होईल. अशांना नंदनवनात परावर्तित झालेल्या पृथ्वीवर सदासर्वदा राहण्याची संधि मिळेल.
२० देवराज्याच्या सुवार्तेच्या निर्भिड घोषकांनी कसलीही लाज न राखता गोलार्धव्याप्त साक्ष, जगव्याप्त रुपात छळ होता तरीही उरकली आहे. याचे कारण त्यांच्या पाठीमागे स्वर्गीय दिव्यदूतांची अतिमानवी ताकद आहे. या कारणास्तव, यहोवाचे साक्षीदार ‘देवाची भीती बाळगतात व त्याचे गौरव करतात.’—प्रकटीकरण १४:६, ७.
देवाचे भय बाळगण्यास व त्याचे गौरव करण्यास लाज वाटत नाही
२१. यहोवाच्या साक्षीदारांनी काय करण्याविषयीची लाज वाटू दिली नाही, आणि याचा काय परिणाम मिळाला?
२१ देवाचे भय बाळगण्यात व त्याचे गौरव करण्यामध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी कसलीही लाज वाटत नाही हे प्रदर्शित केले. ते त्याचे व्यक्तीगत नाम यहोवा हे देखील मुक्तपणे उपयोगात आणतात. यामुळे त्यांच्यावर अगणित आशीर्वाद आले. हे आशीर्वाद सर्वसमर्थ देवाने जी अभिवचने भाकित केली त्याच्या पूर्णतेस अनुलक्षून साकार झाली. यामुळे तोच खरा व जिवंत असा विश्वाचा सार्वभौम देव असल्याचे किती गौरवयुक्तपणे दिसले बरे!
२२. यहोवाच्या साक्षीदारांना भारी छळ का सहन करावा लागेल, पण त्यांना कोणता आनंद मिळणार?
२२ येणाऱ्या भविष्यात प्रापंचिक सरकारे धार्मिक अधिपत्याविरुद्ध उठतील व त्या सर्वांचा नायनाट करतील, ज्यात ख्रिस्ती धर्मराज्यही असेल. (प्रकटीकरण १७:१६, १७) यामुळे जागतिक घटकांकडून यहोवाच्या साक्षीदारांच्या त्रासाच्या मोठ्या काळास तोंड द्यावे लागेल. जर सार्वकालिक देव यांच्या बरोबरीला नसता तर यांना त्या त्रासातून निभाव लागणे अशक्य होणार होते. पण तो त्यांच्यासोबत आहे व यामुळेच यांना ख्रिस्तीविरोधी व यहोवाविरुद्ध असणाऱ्या सर्व घटकांना, साक्षीदार ज्या देवाची निष्ठावंतपणे भक्ती करतात त्याच्याकरवी अस्तित्त्वविरहीत केले जात आहे हे पाहण्याचा आनंद मिळेल. खऱ्या ईश्वरशासित सरकारचे शत्रू म्हणून उघड होणे व नष्ट होणे अशी मानहानी त्यांना मिळणार नाही, उलटपक्षी त्यांना यहोवाला हे गीत गाण्याचा अवर्णनीय आनंद मिळेल की, “तू अनादिकालापासून अनंतकालापर्यंत . . . देव आहेस.”—स्तोत्रसंहिता ९०:२.
२३. लाज वाटू लागेल असे काहीही यहोवाच्या साक्षीदारांकडे का नाही, आणि याचा काय परिणाम दिसून येणार?
२३ नंदनवनमय पृथ्वीवरील सौख्यानंदाचे परिपूर्ण मानवी जीवन जगण्यासाठी मानवी कुटुंबाची मुक्तता ज्याकरवी घडवून आणण्यात आली त्या येशू खिस्ताकरवी त्याचा पिता, देव याचे गौरव ते करतील. यहोवा देवाने स्वतःला येशू ख्रिस्ताकरवी केवढा प्रबळ देव असल्याचे सिद्ध केले आहे! याचप्रकारे, आपल्या महासामर्थ्याचा दुरुपयोग नव्हे तर प्रेमळ वापर करीत असल्याचे त्याने केवढ्या सुंदरपणे प्रदर्शित केले आहे! याच कारणास्तव आम्हाला त्याच्याविषयी किंवा त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याविषयी कसलीही लाज वाटू देता कामा नये. वैभवी सुवार्तेचे घोषक असण्यामध्ये आम्हाला लाज वाटत नाही; याच सुवार्तेद्वारे यहोवा देवाचे सर्व सामर्थ्य येशू ख्रिस्ताकरवी प्रकट होते. येशूने आपल्या पृथ्वीवरील जीवनाच्या समारोपाला म्हटले होतेः “धीर धरा! मी जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३) हे मार्गाक्रमण आचरताना आपण प्रेषित पौलाचे उदाहरण सातत्याने आचरु या, कारण त्याला सुवार्तेची कधीही लाज वाटली नाही. आम्ही हे आचरले तर सर्वसमर्थ देवालाही आमची लाज वाटणार नाही.
[तळटीपा]
a आम्ही स्वतःला साक्षीदार आहोत असे म्हणविण्यात जरी आम्हाला लाज वाटत नाही तरी असाही काळ असतो की जेथे आम्हाला “सापासारखे चतुर” रहावे लागते. (मत्तय १०:१६) नाझी जर्मनीतील साक्षीदारांना हे ठाऊक होते की, स्वतःची ओळख देण्याचा व ती न देण्याचा काळ होता.—पडताळा प्रे. कृत्ये ९:२३-२५.
b ज्यांनी येशू व यहोवाचा धिक्कार केला अशांना जगाकडूनही मान्यता मिळाली नाही असे वेळोवेळी दिसले. उदाहरणादाखल द वॉचटावर मे १, १९८९, पृष्ठ १२; १९८२ चे वार्षिक पुस्तक, पृष्ठ १६८; १९७७ चे वार्षिक पुस्तक, पृष्ठे १७४-६; १९७४ चे वार्षिक पुस्तक, पृष्ठे १४९-५०, १७७-८ पहा. उलटपक्षी, सुवार्तेच्या काही कट्टर विरोधकांना हे ठामपणे माहीत होते की, साक्षीदार येशू व यहोवाचा धिक्कार करणार नाहीत. (१९८९ चे वार्षिक पुस्तक, पृष्ठे ११६-१८) तसेच मत्तय १०:३९ व लूक १२:४ पहा.
सारांशरुपाचे प्रश्न
◻ सुवार्ता घोषित करण्याच्या बाबतीत आमची मनोवृत्ती प्रेषित पौलाप्रमाणे कशी असावी व का?
◻ यहोवाचे साक्षीदार ज्या संदेशाची घोषणा करीत आहेत तो सर्वात उत्तम अशी वार्ता का आहे?
◻ येशू स्वर्गीय वैभवात परतल्यावर ज्या कोणाला त्याच्याविषयी लाज वाटू लागेल त्यासंबंधाने त्याने कोणता इशारा दिला आहे?
◻ जे येशू व यहोवाला नाकारतात अशांचे काय होणार?
◻ सुवार्तेच्या घोषकांना कोणती गोष्ट कसलीही लाज न राखता पूर्ण करता आली व का?