विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका
“विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण . . . विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?”—२ करिंथकर ६:१४, १५.
१. एक भगिनी कशाप्रकारे विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर विवाहबद्ध झाली?
अमेरिकेतील मध्य-पश्चिम विभागात राहणाऱ्या एका यहोवाच्या साक्षीदार सेविकेने आपल्या पतीला मोटार अपघातात गमावले. “मला तर पहिल्यांदा सर्व काही हरपले गेले आहे असे वाटले,” असे ती म्हणते. “पण, या गोष्टी मुळे यहोवाच्या सेवेत व्यत्यय येऊ देणार नाही असा मी निश्चय केला. परंतु, दोन वर्षांनी मी पाहिले की, मंडळीतील जोडप्यांमध्ये मी एखाद्या तिऱ्हाइताप्रमाणे आहे. कुटुंबे सहलीस जात तेव्हा मी व माझी मुलगी त्यांच्या विचारात येत नसे. ख्रिस्ती दांपत्य एकमेकांबद्दल प्रेम प्रदर्शित करीत असल्याचे मी पाहिले तेव्हा मला, मी एकटी पडली आहे ते जाणवू लागले. दिवसेंदिवस मी आध्यात्मिकतेत मागे पडत आहे हे कोणाच्याही लक्षात आल्याचे दिसत नव्हते. अशा स्थितीत, मी जेथे नोकरी करीत होते तेथील एका माणसाने मला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण दिले. मी ते स्वीकारले. माझ्या लक्षात येण्यापूर्वीच मी त्याच्या प्रेमात पडले आहे हे दिसले. शेवटी शेवटी मी इतकी दुबळी झाले की मला एकटेपणाचा कंटाळा वाटून मी त्या माणसासोबत लग्न करण्याचा होकार दिला.”
२. विवाहाची इच्छा का स्वाभावीक आहे, आणि विवाहाची योजना करण्यामागील काय उद्देश होता?
२ होय, आपला कोणीतरी सहचर असावा व त्यच्यासोबत आपले जीवन व्यतित करावे ही प्रबळ इच्छा असू शकते व ती स्वाभाविक आहे. यहोवाने स्वतःच म्हटले होते: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. तर त्याच्यासाठी मी अनुरूप साहाय्यक [“सदृश्य,” त्याला योग्य होईल असा] मी करीन.” (उत्पत्ती २:१८, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप) पुरुष व स्त्रीमध्ये जवळचे, कायम असणारे ऐक्याचे बंधन तयार व्हावे यासाठी विवाहाची योजना करण्यात आली. “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” हे आदामाचे नव्हे तर यहोवाचे उद्गार होते. (उत्पत्ती २:२२-२४; पडताळा मत्तय १९:४-६.) आपला देखील कोणी साथीदार असावा असे तुम्हाला मनापासून वाटत असेल.
३, ४. (अ) विश्वास न राखणाऱ्यांसोबत सलगीचे नाते बांधण्याविरुद्ध पवित्र शास्त्र कसा इशारा देते? (ब) विजोड जू खाली येण्याविषयी पौलाने दिलेली सूचना विवाहास कशी लागू होते? (क) “विश्वास न ठेवणारा” या संज्ञेचा करिंथकरांनी कसा अर्थ घेतला असावा?
३ तथापि, कोणा विश्वास न राखणाऱ्यांसोबत सलगीचे संबंध जोडू नये असा पवित्र शास्त्र आपल्याला इशारा देते. प्रेषित पौल त्याविषयी म्हणतो: “तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड [“कोणा विजोड गटाचे खोगीर आपणावर घेऊ नका,” द जरुसलेम बायबल] होऊ नका.a कारण . . . विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?”b (२ करिंथकर ६:१४, १५) हे लिहिताना पौलाच्या मनात, बैल व गाढव यांची जोडी एका खोगीराखाली घालू नका हा जो मोशेच्या नियमशास्त्रातील मनाईहुकूम होता तो असावा. (अनुवाद २२:१०) गाढव हे आकाराने लहान असते व त्यात बैलासारखी शक्तीही नसते, तेव्हा अशा विजोडपणामुळे ते खचून जाणार होते. वस्तुतः विवाह हे असे जू आहे ज्यात नवरा व बायको हे एकत्र बांधले जात आसतात; त्यामुळेच कोणा ख्रिश्चनाने विश्वास न राखणाऱ्या व्यक्तीशी विवाह साधला तर ते जू विजोड होते. (मत्तय १९:६) अशा विजोड जू मुळे विवाहात अधिक दबाव व त्रास येत असतो.—पडताळा १ करिंथकर ७:२८.
४ तरीपण सुरवातीचा अनुभव दाखवितो त्याप्रमाणे काही ख्रिश्चनांनी विश्वास न ठेवणाऱ्यांसोबत विवाहबद्ध होण्याचे पसंत केले. पण काहींना “केवळ प्रभूमध्ये लग्न” करण्याचे कठीण का वाटते बरे?—१ करिंथकर ७:३९.
काही इतरत्र का शोध घेतात
५. काहीजण विश्वास न राखणाऱ्यांसोबत प्रणयसूत्रात कसे अडकले जातात ते सांगा.
५ देवाच्या सूचनेकडे ते हतूपूर्वक दुर्लक्ष करतात असे नाही. आता ही परिस्थिती विचारात घ्या की, एका ख्रिस्ती भगिनीला विवाह करण्याची इच्छा आहे तिला आपला पती ख्रिस्ती असावा अशीच इच्छा आहे पण ती जेथे आहे तेथे व इतरत्र कोठे लायक असणारे बांधव असल्याचे तिला आढळत नाही. तसेच तिला आपल्या वयाचीही जाणीव होत आहे. आपले कुटुंब असावे असे तिला वाटेल. पण आता वय वाढत आहे ही भीती आणि आपण कोणाचे तरी आवडते असावे ही गरज तिला क्षुब्ध बनवीत राहते. अशावेळी जर जगातील कोणा माणसाने तिच्याविषयी आस्था दाखविण्यास आरंभ केला तर त्याचा प्रतिकार करणे तिला जड जाते. तो दिसायला दयाळू, मायाळू असेल. तो धुम्रपानही करीत नसेल आणि वाईट भाषाही वापरीत नसेल. अशावेळी मनात हे वादळ उठते: ‘तसे पाहिले तर हा मला माहीत असणाऱ्या कित्येक बंधूंपेक्षा बरा वाटतो!’ ‘त्याची अभ्यास करण्याची तयारीही आहे.’ ‘मला ती भगिनी माहीत आहे, जिने विश्वासात नसणाऱ्या माणसाशी लग्न केले आणि तो कालांतराने सत्यात आला.’ ‘अशीही काही ख्रिस्ती कुटुंबे आहे ज्यांचे कधी जमतच नाही!’—यिर्मया १७:९ पहा.
६, ७. (अ) एका सड्या बहिणीने आपल्या विवंचनेचे वर्णन कसे केले आहे? (ब) कोणत्या प्रश्नाचा आम्ही लक्षपूर्वक विचार करण्यास हवा?
६ होय, एका एकाकी भगिनीला लग्न करायचे आहे तर या गोष्टी तिच्यासाठी खूपच त्रस्त करणाऱ्या असतील. काही तर एकदम हताश होतात. एका भगिनीने तिच्या परिसरातील परिस्थितीविषयी सांगताना म्हटले की, “विवाहयोग्य असणाऱ्या बांधवांची संख्या खूपच कमी आहे. पण एकट्या असणाऱ्या बहिणींची संख्या बरीच आहे. आपले यौवन सरत आहे असे जेव्हा एका भगिनीला दिसू लागते तेव्हा ती एकतर कधीच लग्न न करण्याचा निश्चय करते, किंवा जी पहिली संधी तिला मिळते, तिचा फायदा घेऊन ती विवाहबद्ध होते.”
७ तरीसुद्धा, पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट शब्दात सांगते: “विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका.” (२ करिंथकर ६:१४) हा ईश्वरी इशारा खूपच कटू व अव्यवहार्य आहे का?
देवाच्या प्रेमळ काळजीचे वक्तव्य
८. आम्हाविषयी यहोवाच्या अंतःकरणात सदिच्छा आहेत हे यहोवाने कसे दाखवून दिले आहे?
८ आमच्या दीर्घकालीन कल्याणाविषयी यहोवाला अतिशय काळजी आहे. त्याने स्वनुकसान सोसून आपला पुत्र “पुष्कळांच्या खंडणीसाठी” दिला नाही का? (मत्तय २०:२८) ‘जे हितकारक ते तो आपल्याला शिकवीत नाही का?’ (यशया ४८:१७) शिवाय, ‘आम्हाला सहन करता येत नाही अशी परिक्षा तो आम्हावर आणणार नाही,’ असे तो अभिवचन देत नाही का? (१ करिंथकर १०:१३) तर मग, हे व्यवहार्य आहे की, आम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नये असे जेव्हा तो सांगतो तेव्हा त्याला आपल्याविषयी नक्कीच काही तरी चांगले वाटत असले पाहिजे! त्याने दिलेला हा इशारा, तो आम्हासाठी दाखवीत असलेल्या प्रीतीचे कसे वक्तव्य आहे ते विचारात घ्या.
९. (अ) ख्रिश्चनाने विश्वास न राखणाऱ्या कोणासोबत जवळीक साधण्याच्या विरुद्ध पौल कोणता इशारा देतो? (ब) “एकवाक्यता” याला असणाऱ्या ग्रीक शब्दाचा अर्थ काय, व तो, एखादा ख्रिस्ती विश्वास न ठेवणाऱ्यासोबत संबंध जोडतो तेव्हा ज्या अडचणी येतात त्यांचे कसे स्पष्टीकरण करतो?
९ मानवामध्ये अगदी जवळचे नाते निर्माण व्हावे व पती आणि पत्नीने “एकदेह” व्हावे हा निर्माणकर्त्याचा विवाह घडविण्यामागील उद्देश होता. (उत्पत्ती २:२४) तर मग, असे जवळचे बंधन कोणा ख्रिश्चनाने विश्वासात नसलेल्या एखाद्याशी जोडावे हे सूज्ञतेचे आहे का? याचे उत्तर देण्यामध्ये पौल स्वतःच एकामागोमाग असे शोधक प्रश्न विचारतो की, ज्याचे अध्याहृत उत्तर नकारार्थी आहे. तो म्हणतो: “नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाला [सैतान] बरोबर कशी एकवाक्यता [ग्रीक, सि.म्फो‘ने.सिस] होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकारी कसे होणार?” (२ करिंथकर ६:१४, १५) सि.म्फो‘ने.सिस या ग्रीक शब्दाचा शब्दः “एकत्र आवाज” (सिन म्हणजे “बरोबर [सोबत]” आणि फो.ने‘ म्हणजे “आवाज”) असा अर्थ आहे. या शब्दाचा संदर्भ संगीताच्या वाद्यामार्फत जो मधूर आवाज निघतो त्याच्याशी आहे. ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये अर्थातच ऐक्य नाही. याचप्रमाणे विजोड स्थितीत पती व पत्नीला जणू ‘एकच तार छेडणे’ किंवा ‘एक सूर काढणे’ हे बरेच त्रासाचे जाते. या स्थितीत ते दोघेही दोन एकमेकांशी विसंगत असलेल्या संगीताच्या वाद्यांसारखे आहेत ज्यातून संगीताचा सुमधूर ध्वनि बाहेर पडण्याऐवजी बेसूर आवाज येतो.
१०. आनंदी विवाहात कोणते महत्त्वाचे घटक असतात, व जेथे एकाच प्रकारचे जू आहे तेथे कोणते फायदे मिळत असतात?
१० अशावेळी, कोणा आध्यात्मिक व्यक्तीला शारीरिक विचारसरणीच्या माणसासोबत कसा मेळ घालता येईल? (१ करिंथकर २:१४) विवाह आनंदी करायचा आहे तर त्यासाठी समान विश्वास, तत्त्वे व ध्येय हे घटक महत्त्वाचे आहेत. निर्माणकर्त्याची समविश्वासाने केलेल्या भक्तीशिवाय विवाहास अधिक बळ मिळत नाही. जेथे जू समान आहे तेथे पती व पत्नी हे दोघेही एकमेकांना उपासनेच्या बाबतीत प्रोत्साहन देऊ शकतात. त्यांच्यामध्ये जरी अडचणी उद्भवल्या तरी ते दोघे शास्त्रवचनांचा परामर्श घेऊन त्या सोडवू शकतात. तर मग, हे स्पष्ट नाही का की, आपल्या वैवाहिक साथीदारासोबत शक्य आहे तितक्या जवळचे बंधन अनुभवावे अशी यहोवाची इच्छा आहे म्हणूनच तो कोणा विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर स्वतःला जोडून घेऊन विजोड करू नका असे सांगतो?
११. सहउपासक नसणाऱ्याबरोबर सोयरीक जुळवण्यास इस्राएलात का मनाई करण्यात आली होती, याकरवी कोणता विचारप्रवर्तक प्रश्न उद्भवतो?
११ पवित्र शास्त्राचा सल्ला ऐकल्यामुळे आपण, जे वेदनादायक परिणाम कोणी ख्रिस्ती स्वतःला विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर जडून घेऊन विजोड करतो तेव्हा निष्पण्ण होत असतात त्यापासून वाचू शकतो. विश्वास न ठेवणारा, ख्रिश्चनाला यहोवाची सेवा करण्यापासून परावृत्त करण्याची शक्यता असते. यहोवाने प्राचीन इस्राएलांना जो इशारा दिला होता तो लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये सहउपासक नसलेल्यांसोबत सोयरीक जुळविण्याची मनाई करण्यात आली होती. ती का? “कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवितील आणि अन्य देवांची सेवा करावयाला लावितील,” असे यहोवाने म्हटले. (अनुवाद ७:३, ४) विश्वास न ठेवणाऱ्याकडून सतत विरोध झाल्यामुळे नेहमी नमते घेण्याकडे प्रवृत्ती झुकते. ‘असे काही माझ्याबाबतीत घडणार नाही,’ असा विचार सहजपणे येतो. पण हेच जर सूज्ञ माणूस शलमोन याच्याबाबतीतत घडले तर मग, तेच तुमच्याविषयीही घडू शकणार नाही का?—१ राजे ११:१-६; पडताळा १ राजे ४:२९, ३०.
१२. देवाने परदेशीयांसोबत विवाह करण्याची जी मनाई केली होती ती इस्राएली लोकांसाठी कशी संरक्षक होती? विवेचन करा.
१२ जरी समजा, विश्वासात असणारा खऱ्या उपासनेपासून दूर झाला नाही तरी धार्मिकदृष्ट्या विभाजित असणाऱ्या घरात सतत समस्या व दबाव वाढत राहतात. येथे परत, देवाने इस्राएलांना दिलेला कायदा विचारात घ्या. कोणा इस्राएली मुलीने एखाद्या कनानी पुरुषासोबत लग्न करण्याचे ठरविले असे गृहीत धरा, कनान्यांमध्ये होत असलेल्या विपरीत लैंगिक आचारास हा माणूस बद्ध असल्यामुळे या माणसाठायी तिच्या देवाच्या काद्याविषयी त्याला कितीसा आदर असणार? उदाहरणार्थ, तो स्वेच्छेने, मोशेच्या नियमशास्त्रात सांगितले होते त्याप्रमाणे त्याची ही इस्राएली बायको ऋतुमती असता संभोग करण्याचे टाळील असे आपल्याला वाटते का?c (लेवीय १८:१९; २०:१८; पडताळा लेवीय १८:२७.) आता कोणा इस्राएली पुरुषाने एखाद्या कनानी मुलीशी विवाह करण्याचे ठरवले आहे असे समजा. मग, जेव्हा हा पुरुष वर्षातून तीनदा यरुशलेमात सणासाठी जाईल त्यावेळी ती त्याला पाठबळ देईल असे आपण समजू शकू का? (अनुवाद १६:१६) याच कारणामुळे देवाने अशा प्रकारातील विवाह करण्याची जी मनाई केली होती ती इस्राएलांसाठी केवढी संरक्षक होती ते आता स्पष्ट दिसेल.
१३. (अ) जगातील माणसास पवित्र शास्त्राची तालीम लाभलेला ख्रिस्ती विवेक का नसतो? (ब) धार्मिकरित्या विभाजीत असणाऱ्या घरात काहींनी कोणते दबाव व समस्या अनुभवल्या आहेत?
१३ आजच्या काळाविषयी काय? आजच्या जगातील नैतिक पातळी पाहिल्यास ती पवित्र शास्त्रात दाखविण्यात आलेल्या पातळीपासून फारच दूरवर आहे. जगातील काही लोक अगदीच स्वच्छ व नीटनीटके दिसत असतील, पण त्यांच्यापाशी पवित्र शास्त्राची तालीम मिळालेला ख्रिस्ती विवेक नाही. त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यात थोडाही काळ खर्ची घातला नाही; आणि यामुळे त्यांनी ‘आपल्या मनाचे रुपांतर केले आहे’ तसेच ‘जुने व्यक्तीमत्व काढून टाकले आहे’ असे म्हणता येऊ शकत नाही. (रोमकर १२:२; कलस्सैकर ३:९) यास्तव, जो ख्रिस्ती, विश्वास न राखणाऱ्यासोबत संबंध जडवतो, तो किंवा ती स्वतःला हृदयाच्या यातना व दुःख यामध्ये लोटत असते. विपरीत लैंगिक आचार करावा तसेच जगीक सणाचे दिवस साजरे करावे यासाठी काहींना तर सारखा दबाव सहन करावा लागत आहे. काही एकटेपणाची तक्रार करतात. एका भगिनीने लिहिले: “ज्याची यहोवावर प्रीती नाही अशा कोणाशी विवाहबद्ध झाल्यावर जो एकटेपणा जाणवू लागतो, तो इतका वाईट आहे की त्याची कल्पना येणे अशक्यच आहे. कारण वस्तुस्थिती ही होते की, आता तुम्हाला, तुमच्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या सत्याची कोणाबरोबरही सहभागिता करता येत नाही.”
१४. (अ) विभाजित घरात मुलांना “यहोवाची शिस्त व बोध” यात वाढविणे का कठीण जाते? (ब) अशा या विभाजित घरातील मुलांवर कोणता परिणाम होतो?
१४ विभाजित घरात मुलांना “यहोवाचे शिक्षण व बोध” यात वाढविणे अत्यंत कठीण जाते. (इफिसकर ६:४) विश्वासात नसणारा सोबती मुलांना सभांना जाण्याची तसेच क्षेत्रकार्यात सहभागी होण्याची परवानगी देईल का? बहुतेकदा मुलांच्या प्रेमळ भावना उद्ध्वस्त होतात, कारण त्यांची आई व वडील या दोघांवर प्रीती असते पण या दोघात, वस्तुतः, एकचजण यहोवावर प्रीती करणारा असतो. विश्वासात नसणाऱ्या एका पुरुषाबरोबर विवाह केलेल्या एका भगिनीने म्हटले: “मी माझ्या २० वर्षांच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच हृदयास पीड देणाऱ्या यातना जाणवल्या. माझ्या मुलांची वाढ बऱ्याच गोंधळलेल्या स्थितीत आणि भावनिक उद्रेकात झाली व ते आता जगाचे भाग आहेत. माझ्या मुलीला तिच्या वडीलांच्या मित्रपरिवारांना गाठीभेटी देण्यासाठी त्यांच्यासोबत जावे लागल्यामुळे व मजपासून दूरावा निर्माण झाल्यामुळे ती हताश बनली आहे. या सगळ्या समस्यांना मी तोंड देत आहे, कारण मी जेव्हा १८ वर्षांची होते तेव्हा यहोवाच्या एका नियमाकडे दुर्लक्ष केले होते.” कोणता नियम? विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसोबत संबंध जडवून विजोड होऊ नका!
१५. विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडू नये अशी सूचना यहोवा आम्हाला का करतो?
१५ यास्तव, आम्ही जीवनात पुरेपुर आनंद उपभोगावा अशी यहोवाची इच्छा आहे हे स्पष्ट आहे. जेव्हा तो आम्हाला काही गोष्ट करण्यास सांगतो, विश्वास न ठेवणाऱ्यांसोबत जडून विजोड होऊ नका असे म्हणतो, तेव्हा ते आमच्या हितासाठी असते. (अनुवाद १०:१२, १३) कोणा विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर विवाहबद्ध होणे म्हणजे या शास्त्रवचनीय सूचनेकडे, व्यावहारिक सूज्ञानाकडे दुर्लक्ष करणे व पदरी शेवटी दुःख व यातनाकारक अनुभव घेणे होय.
साधारणपणे विचारले जाणारे प्रश्न
१६, १७. (अ) आम्ही दक्षता बाळगली नाही तर सबळ विचारावर भावना कशी पकड धरते? (ब) कोणा ख्रिश्चनाने अपवादात्मक स्थिती म्हणून विश्वास न राखणाऱ्या व्यक्तीशी विवाह संपादला आहे व ते दोघेही आता यहोवाची सेवा करीत आहेत म्हणून देवाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले जावे का? विवेचन करा.
१६ तथापि आपण दक्ष न राहिलो तर सरळ विचारांवर भावना वर्चस्व करू शकते. आम्हाला असे वटू लागेल की, आमचे प्रकरण कदाचित अपवाद ठरेल. यास्तव, सर्वसाधारणपणे विचारल्या जाणाऱ्या या काही प्रश्नांचा विचार करा.
१७ एका बंधूने किंवा भगिनीने विश्वास न राखणाऱ्या व्यक्तीशी विवाह संपादिला आहे व आता ती दोघेही यहोवाची सेवा करीत आहे, अशांबद्दल काय? तरीपण, यहोवाच्या नियमाचा भंग झालेल्या आहे. आता जी स्थिती दिसते ती समर्थन करणारी ठरू शकते का? देवाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्याबद्दल देवाचा दृष्टीकोन कसा असतो ते आपल्याला बाबेलच्या बंदिवासातून सुटलेल्या यहुद्यांच्या प्रकरणात दिसून येते. जेव्हा काहींनी विदेशी बायका केल्या तेव्हा एज्रा व नेहम्या या पवित्र शास्त्र लेखकांनी लोकांच्या कृतीचा धिक्कार करण्यात कसलीही कसूर केली नाही. त्या यहुद्यांनी “आज्ञेचे उल्लंघन” केले होते, “मोठा अपराध” केला होता व “अपराधात भर” घातली होती. (एज्रा १०:१०-१४; नेहम्या १३:२७) आणखी, हे देखील विचारात घ्या: आम्ही देवाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतो तेव्हा स्वतःला आध्यात्मिकरित्या इजा करून घेत असतो, आमच्या विवेकाला तडा जातो. एका भगिनीचा विश्वासात नसणारा पती ओघाओघाने सत्यामध्ये आला, तो असे म्हणतो: “मला अजूनही भावनांचे ओरखडे त्रास देत आहेत. लोक जेव्हा आमच्याकडे पाहून असे म्हणतात की, ‘यांचे बरे जमले,’ तेव्हा मला, माझी स्थीती कशी भयंकर होते ते मला तुम्हाला सांगता येणार नाही.”
१८. ज्याचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नाही अशा कोणाविषयी तुम्हाला आकर्षण वाटत आहे तर तुम्हासाठी सूज्ञतेचा मार्ग कोणता असेल, आणि याकरवी तुम्ही काय प्रदर्शित करू शकाल?
१८ कोणी पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत आहे व सभांनाही येत आहे, पण अशाचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नाही, त्याजविषयी तुम्हाला आकर्षण वाटते तर त्याबद्दल काय? पवित्र शास्त्रीय सत्याविषयी कोणी रस घेतो तेव्हा आम्हाला आनंद वाटत असतो. पण प्रश्न हा आहे की: तुम्ही आपली इच्छापूर्ति करावी का? स्पष्ट सांगायते तर हे की, ज्याविषयी तुम्हाला विवाहासाठी आकर्षण वाटत आहे त्याचा किंवा तिचा बाप्तिस्मा होऊन काही काळ जाईपर्यंत जेव्हा की त्याची किंवा तिची प्रगति दिसेल आणि देवाच्या आत्म्याच्या फलप्राप्तीचे प्रदर्शन होईल तेव्हापर्यंत थांबून राहणे हा सूज्ञतेचा मार्ग ठरेल. (गलतीकर ५:२२, २३) या सूचनेचा अवलंब करणे तितकेसे सोपे जाणार नाही. तरीपण ते करण्याद्वारे तुम्हाला पवित्र शास्त्रीय तत्त्वाविषयीची निष्ठा व्यक्त करता येईल; व यामुळे विवाहात खऱ्या आनंदाच्या प्राप्तीसाठी सुंदर पाया घालता येईल. तुमच्या मित्राला तुम्हाविषयी खरी काळजी आहे व त्याला वा तिला यहोवाविषयी खरे प्रेम वाटते आहे तर तो वा ती, जोपर्यंत तुम्ही दोघे “प्रभुमध्ये” होत नाही, म्हणजे समर्पण व बाप्तिस्मा घेतलेले होत नाही, तोपर्यंत थांबून राहाल. हे ध्यानात घ्या की, जे खरे प्रेम असते त्यावर वेळेच्या अंतराचा काही परिणाम होणार नाही.—१ करिंथकर ७:३९; उत्पत्ती २९:२०.
१९. समविश्वासू लोकातून अपेक्षित असा वैवाहिक सोबती मिळणे संभवनीय नसेल तर तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे?
१९ सम विश्वासू जनांमधून तुम्हाला विवाहासाठी योग्य असा साथीदार मिळत नसेल तर काय? “मी २६ वर्षांची, सडी व एकाकी आहे,” असे एका भगिनीने म्हटले. होय, एकटे राहणे हे कदाचित तुम्हासाठी जड वाटत असेल; पण कोणा विश्वास न राखणाऱ्या व्यक्तीसोबत विवाहबद्ध होऊन ज्या समस्या उद्भवतील त्या याहीपेक्षा अधिक जड वाटतील! देवाच्या सूचना पाळून चालण्यासाठी विश्वास, संयम व धीर लागतो पण यहोवाला ते ठाऊक आहे व तो तुमच्या सर्वोत्तम हिताचे जे आहे तेच इच्छित असतो याची हमी राहू द्या. (१ पैत्र ५:६, ७) यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा व त्याच्यावर विसंबून राहा. (स्तोत्रसंहिता ५५:२२) या सद्य व्यवस्थीकरणात कोणालाही पूर्ण समाधानी जीवन मिळत नाही. आपल्याला कोणी जीवनसाथी असावा असे तुम्हाला मनापासून वाटत असेल. पण तेच इतरांना आपल्या समस्या आहेत व त्यापैकीच्या काही या व्यवस्थेत सुटू शकणार नाहीत. तथापि येणाऱ्या नवीन जगात प्रत्येक “प्राणिमात्राची इच्छा” पूर्ण केली जाईल.—स्तोत्रसंहिता १४५:१६.
२०. एका सड्या भगिनीने आपला निर्धार कसा व्यक्त केला, आणि अशाच प्रकारचा निश्चय राखल्यामुळे तुम्हाला कोणते समाधान मिळू शकेल?
२० मध्यंतराच्या काळात, कोणा विश्वास न राखणाऱ्यासोबत संबंध जडवून विजोड होऊ न देण्याचा निर्धार राखा. एका ३६ वर्षे वयाच्या सड्या भगिनीने आपला हा निर्धार याप्रकारे व्यक्त केला: “मी दररोज यहोवाला एका विवाह साथीदाराविषयी प्रार्थना करते. यहोवाच्या संस्थेच्या बाहेर कोणा साथीदाराचा शोध घ्यावा अशी माझी इच्छा नाही, तरीपण तसे मोह अनेक आहेत. या दरम्यानच्या काळात चांगले गुण वाढविण्याच्या प्रयत्नात असण्याचा माझा बेत आहे व मग मी, आध्यात्मिक पुरुष ज्या आध्यात्मिक गुणवत्तेच्या स्त्रीचे अपेक्षा धरतो ते गुण माझ्यामध्ये दिसून येतील अशी व्यक्ती बनू शकेल.” हाच तुमचाही निर्धार आहे का? तसे आहे तर ईश्वरी न्यायाच्या देवाला आपली सचोटी दाखविण्यामुळे जे समाधान मिळत असते ते तुम्हाला मिळू शकेल.—स्तोत्रसंहिता ३७:२७, २८.
[तळटीपा]
a १ करिंथकर १४:२२ मध्ये पौलाने “विश्वास न ठेवणारा” ही संज्ञा “विश्वास ठेवणारा” किंवा बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीपेक्षा भिन्न व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी वापरली आहे. यामुळेच “विश्वास न ठेवणारा” ही संज्ञा बाप्तिस्मा न झालेल्या व्यक्तीला अनुलक्षून आहे हे करिंथकरांनी जाणले असावे.—पहा प्रे. कृत्ये ८:१३; १६:३१-३४; १८:८.
b “या तत्वाचे विस्तारित स्वरूप या पध्तीने सांगता येइल: विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर तात्कालिक किंवा कायम स्वरुपाचे कोणतेही नातेसंबध जोडू नका की, ज्यामुळे ख्रिस्ती दर्जाची हातमिळणी करण्याची पाळी येईल किंवा ख्रिस्ती साक्षीचा सुसंगतपणा धोक्यात येऊ शकेल. पण वेगळेपण का ठेवावे? कारण विश्वास न ठेवणारा याला ख्रिस्ती दर्जा याविषयी सहभागिता, सहानुभूति नसते वा ते त्याचे लक्ष्य नसते.”—द एक्सपोझिटर्स बायबल कॉमेंट्री, खंड १०, पृष्ठ ३५९.
c पहा द वॉचटावर सप्टेंबर १५, १९७२ चा अंक, पृष्ठे ५७५-६.
तुम्हाला विवेचीत करता येईल का?
◻ विश्वास न ठेवणाऱ्यांसोबत सामिप्य राखण्यासंबंधाने पवित्र शास्त्र कोणता इशारा देऊन आहे?
◻ विवाह सोबत्यासाठी काही समर्पित ख्रिस्ती मंडळीबाहेर का शोध घेतात?
◻ संबंध जडवून विजोड न होण्याविषयी यहोवाने जो इशारा दिला आहे तो त्याचे आम्हाविषयी असणारे प्रेम व काळजी कशी व्यक्त करतो?
◻ सोबती शोधण्याविषयी सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात, व तुम्ही त्यांची काय उत्तरे देणार?