अन्यायाविषयी देव काही करील का?
“हे काही बरे नाही!” न्यायाच्या विडंबनेचा व्यक्तीशः अनुभव आल्यावर एक तरुण विद्यार्थीनी हताश होऊन चिडेने पेटली. “खरोखर देव आहे तर,” ती पुढे म्हणालीः “तो अशा अन्यायास मुभा तरी कशी देतो?” या तरुणीविषयी तुम्हाला सहानुभूति वाटते का? कदाचित वाटेल. पण तिच्या आक्षेपाला तुम्हाला उत्तर देता येईल का?
तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या पालकांनी काही वेळेस तुमच्या बाबतीत अन्याय घडून येऊ देण्याची मुभा दिली, असे तुम्हाला वाटले असावे. पण त्या वरपांगी अन्यायाने तुमचे पालक अस्तित्वातच नाही असे शाबीत केले नाही. हो ना? याचप्रमाणे देवाने अन्याय होण्याला दिलेली मुभा, तो अस्तित्वात नाही याचे समर्थन करू शकत नाही.
तथापि, त्या तरुण विद्यार्थीनीने उत्तर दिले की, ही वेगळीच गोष्ट होती. तिने दर्शविले की, अपूर्ण मानवी पिता स्वतः अन्यायी ठरू शकतो. कदाचित, त्याला एकंदरीत वस्तुस्थितीची जाणीव नसल्यामुळे तो अन्याय बघताना ते त्याला कळले नसावे. शिवाय काही मानवी मर्यादाही आहेतच, जसे की अन्याय झालेला दिसतो पण त्याविषयी काही करण्याचे सामर्थ्य त्याजठायी नसते. यापैकीची कोणतीही गोष्ट सर्वज्ञ व सर्वशक्तीमान देवास लागू होणारी नाही.
तुम्हालाही कदाचित वाटणे शक्य आहे की, अन्यायाला दिलेली मुभा ही ईश्वरी गुणांशी मिळतीजुळती नाही. तथापि, देवाने जर अन्यायाला इतक्या काळापर्यंत राहू देण्याची मुभा दिलेली आहे तर मग, त्यामागे त्याजठायीच्या सूज्ञानानुरुप काही कारण असू शकेल का?
पवित्र शास्त्र लेखक, देवास “नीती व न्याय ही प्रिय आहेत” असे म्हणतात. “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. तो विश्वसनीय देव असून त्याजजवळ अन्याय नाही,” असे मोशाने लिहिले.—स्तोत्रसंहिता ३३:५; अनुवाद ३२:४; ईयोब ३७:२३.
यहोवा हा न्यायी देव, अन्यायात आनंद पावत नाही हे दर्शविण्यासोबत पवित्र शास्त्र लेखकांनी हे सहमत दाखविले की, तो एके दिवशी या अन्यायाला समूळ काढून टाकील. उदाहरणार्थ, यशयाने या परिस्थितीचे भाकित केलेः “पाहा, राजा धर्माने राज्य करील व त्याचे राजपुत्र न्यायाने सत्ता चालवितील. तेव्हा अरण्यात न्यायत्व वास करील व बागेत नीतीमत्ता वसेल.” (यशया ३२:१, १६) पण केव्हा? जगातून अन्याय काढून टाकण्याचा देवाचा इरादा आहे तर मग तो अन्यायाला प्रथमस्थानी राहण्यास का अनुमति देऊन आहे?
अन्याय—का मुभा देण्यात आली?
एक काळ असा होता की या विश्वात अन्याय कोठेच नव्हता. केवळ आदाम व हव्वा यांनी दियाबल सैतानाच्या दबावाखाली बंडखोरी केली तेव्हापासून मानवाला अन्याय काय आहे ते कळून आले. त्या बंडखोरपणाच्या वेळी दियाबलाला लगेच नष्ट करण्यात आले नाही. देवाने उद्देशिलेल्या चांगल्या उद्देशानुरुप त्याने मानवाला अन्याय करू देण्याची एका काळापुरती मुभा दिली ती अशासाठी की, त्याची भक्ती करणाऱ्यांची परिक्षा व्हावी की ते त्याला विश्वासू असल्याचे शाबीत करतील का. यांनी त्याला सचोटी राखण्याची केलेली निवड, सैतानाने सर्व मानवी निर्मितीला देवाविरूद्ध वळविण्यात यश मिळवील या त्याच्या दाव्याला खोटे करणार होती. अशाप्रकारे देवाच्या सार्वभौमत्वाचे गौरव झाल्यामुळे सैतानाची कार्ये नष्ट केली जातील आणि मग सर्व अन्याय काढून टाकले जाणार.
मध्यंतरात, देवाने लोकांना अन्याय करू देण्याचे जबरदस्तीने थांबविले तर तो लोकांना त्यांचे निवड-स्वातंत्र्य देत नाही असा याचा अर्थ होईल. यासोबत, इतरांच्या चुकीच्या कृतीमुळे लोकांना अन्यायाचे दुष्परिणाम जाणवू देण्यामध्ये देव हे चित्रित करू इच्छितो की, आदाम व हव्वेने ईश्वरी निर्बंधाविरुद्ध जी अन्यायी हालचाल केली आणि त्या निर्बंधापेक्षा आपले स्वतःचे जे दोषपूर्ण दर्जे स्थापिले, ते केवढे चुकीचे व घातक होते. मानवाने जे पेरले त्याचीच त्याला कापणी करू देण्याद्वारे देव प्रामाणिक लोकांना, त्याने सर्व गोष्टी हाताळण्याची पद्धत किती श्रेष्ठ आहे हे पाहण्यात मदत देतो.—यिर्मया १०:२३; गलतीकर ६:७.
याखेरीज विशिष्ठांकरवी जी न्यायपूर्ण किंवा अन्याययुक्त कृत्ये केली जातात ती त्या व्यक्तींना उघड करतात. ती कृत्ये देवाला अचूक आधार पुरवितात की, जेव्हा पूर्ण न्याय सर्वत्र असेल त्या नव्या जगात पृथ्वीवर राहण्यास कोण पात्र आहे. याविषयीच आम्हाला हे वाचायला मिळतेः “दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळिले व तो नीतीने व न्यायाने वागला तर तो खात्रीने वाचेल.”—यहेज्केल १८:२१.
अन्यायाचा अंत कधी होईल?
यहोवा देवाचे मानवजातीसोबतचे व्यवहार नेहमीच न्यायी व प्रेमळपणाचे होत आलेले आहेत. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, अब्राहामाला जेव्हा एखादी गोष्टी अशी का घडते ते समजू शकले नाही तेव्हा तो देवाविषयी असे म्हणालाः “या प्रकारची कृती तुजपासून दूर राहो. धार्मिकाची व दुष्टाची सारखीच गति होईल असा दुर्जनांबरोबर सज्जनांचा वध करणे तुजपासून दूर राहो. सर्व जगाचा नियंता न्याय करणार नाही का?” (उत्पत्ती १८:२५) ख्रिस्ताच्या येण्यामुळे देवाचे न्याय व दयाळूपणा हे गुण अधिक प्रकाशात आणण्यात आले. ख्रिस्त येशूद्वारे देण्यात आलेल्या खंडणी यज्ञार्पणामुळे प्रत्येकासाठी, यहुदी व गैर यहुद्यांसाठी सार्वकालिक जीवनप्राप्तीचा मार्ग मोकळा झाला. यामुळेच प्रेषित पेत्र म्हणू शकलाः “देव पक्षपाती नाही हे मला पक्के समजते; तर सर्व राष्ट्रांपैकी जो कोणी त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये धर्मशील आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रे. कृत्ये १०:३५.
देवाच्या मशीही राजाने आपले शासन आरंभिले आहे आणि आमच्या पृथ्वीवर पूर्णत्वामध्ये न्यायाची पुनर्स्थापना करण्याची वेळ आली आहे या गोष्टींची घोषणा करण्यात यहोवाचे साक्षीदार कार्यरत आहेत.a तो राजा सध्याच्या अन्यायी जगाचा नाश करील आणि त्याचा अदृश्य देव, दियाबल सैतान याची शक्ती मोडून काढील. पवित्र शास्त्र दाखविते की, हे लवकरच “सर्वसमर्थ देवाची त्या मोठ्या दिवसाच्या लढाई”मध्ये, ज्याला सर्वसाधारणपणे हर्मगिदोन असे म्हणण्यात येते तेव्हा घडेल.—प्रकटीकरण १६:१४, १६.
“देव जो शासनकर्ता, तो अनीतीमान नाही,” त्यामुळेच हर्मगिदोन हे न्यायी युद्ध असणार. (रोमकर ३:५) यानंतर, ख्रिस्त येशू त्याच्या प्रेषित व इतर सहसत्ताधिशांसोबत मिळून स्वर्गातून एक हजार वर्षे राज्य करील. (प्रकटीकरण २०:४) अन्यायास बळी पडलेल्या लाखो लोकांना पृथ्वीवरील नीतीमान व्यवस्थीकरणात, मानवजातीच्या मूळ निवासस्थानामध्ये, त्यांच्या जीवनात परिपूर्ण न्यायत्वाचा पहिलाच अनुभव घेण्यासाठी पुनरुत्थित करण्यात येईल.
“देवाठायी अन्याय आहे का?”
देवाच्या एका व्यवहाराविषयी प्रेषित पौलाने वरील विचारणा केली. त्याचे उत्तर? “मुळीच नाही.” असे पौल लिहितो. कुंभाराने मातीच्या गोळ्यापासून बनविलेल्या आणि क्रोधाच्या किंवा दयेच्या पात्रासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यांसोबत मानवाची तुलना करून पौलाने पुढे म्हटलेः “आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असल्यामुळे नाशासाठी सिद्ध असलेल्या क्रोधाच्या पात्रांचे मोठ्या धीराने त्याने सहन केले, ते अशासाठी की, पूर्वी गौरव करण्यासाठी त्याने सिद्ध केलेल्या दयेच्या पात्राविषयी आपल्या गौरवाची विपुलता कळवावी.”—रोमकर ९:१४, २०-२४, द जरुसलेम बायबल.
अगोदर उल्लेखिलेल्या तरुण विद्यार्थिनीप्रमाणे, तुम्हालाही काही वेळेस देवाने अन्यायास सर्वसाधारणपणे किंवा विशिष्ट गोष्टीत का मुभा दिली आहे हे समजण्यास अवघड वाटत असेल. पण आपण, जे त्याच्या हाताची करणी, असे कोण आहोत की, त्यालाच त्याच्या धीराविषयी आणि सूज्ञानाची विचारणा करावी व म्हणावे की तू हे का केलेस? यहोवा देवाने ईयोबास म्हटले होतेः “तू माझे न्यायत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवितोस काय?”—ईयोब ४०:८.
असे करण्याचा दोष आम्हावर कधीही न येवो. उलटपक्षी, अन्याय जरी आज अस्तित्वात असला तरी न्यायाचा देव लवकरच त्याचे सबंध पृथ्वीवरून उच्चाटन करील हे जाणून आम्हाला आनंद वाटला पाहिजे.
[तळटीपा]
a देवाच्या राज्याने अदृश्य रितीने आपला अधिकार पृथ्वीवर १९१४ पासून आरंभिला आहे याचा पुरावा पडताळण्यासाठी वाचॅटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकातील १३४-४१ पृष्ठे पहा. या पुस्तकात, “देवाने दुष्टपणाला का परवानगी दिली?” या मथळ्याचा एक अध्यायही आहे.
[३१ पानांवरील चित्रं]
अन्यायास दिलेली मुभा ही देव अस्तित्वात नाही या गोष्टीची सिद्धता करू शकत नाही
मद्याने झिंगलेल्या वाहन चालकाने समज, संयम आणि विचारशीलपणा दाखविला नाही तर तो देवाचा दोष आहे का?
आमच्या पृथ्वीवर पूर्ण न्यायाची प्रस्थापना होण्याची वेळ जवळ आली आहे