वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ५/१ पृ. २१-२२
  • संगीताचा आनंद त्यामागील किल्ली कोणती आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संगीताचा आनंद त्यामागील किल्ली कोणती आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “आध्यात्मिक क्रांती” आवश्‍यक
  • चांगले संगीत—त्यामागील किल्ली कोणती?
  • ख्रिस्ती जीवनातील संगीताची भूमिका
  • देवाची महिमा करणारे संगीत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ५/१ पृ. २१-२२

संगीताचा आनंद त्यामागील किल्ली कोणती आहे?

मूढ स्वरुपाची अनैतिकता व मूर्तिपूजा ही प्राचीन जगतात आचरली जात होती. यासाठीच प्रेषित पौलाला ख्रिस्ती वागणुकीसंबंधाने कडक सल्ला देण्याची गरज भासली. इफिसच्या मंडळीला त्याने लिहिलेः “मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्‍यापुढे चालू नये; त्यांची बुद्धि अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यांत अज्ञान उत्पन्‍न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत.”—इफिसकर ४:१७, १८.

आज जे घडत आहे त्याविषयीचे हे हुबेहुब वर्णन नव्हे काय? यामध्ये संगीताचे क्षेत्रही समाविष्ट करता येईल. आज बहुतांशीचे संगीत ‘देवाच्या जीवनाला पारखे’ असल्याची शैली प्रदर्शित करीत आहेत. या संगीताची कवने दयावंतपणा किंवा सहानुभूति न दाखवता “अंतःकरणातील कठीणपणा” व्यक्‍त करीत आहेत.

पण, पौल आणखी पुढे जाऊन असे म्हणालाः “त्यांची बरे व वाईट समजण्याची बुद्धि मंद झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता आचरण्यासाठी स्वतःला लैंगिक कामातुरपणास वाहून घेतले.”—इफिसकर ४:१९, द जरुसलेम बायबल.

ही ‘हावरेपणाची सर्व प्रकारची अशुद्धता’ आजच्या बहुतेक संगीतामध्ये प्रवर्तित होते. संगीताची चाल व लय ही लैंगिक आचार, हिंसाचार, मादक द्रव्ये आणि सुखविलास यामध्ये डुबलेल्या पिढीचे चित्र दर्शवितात. ख्रिश्‍चनांनी अशा गोष्टीकडे कसे बघावे? पौलाचे शब्द लक्षात घ्याः “तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही; येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल.”—इफिसकर ४:२०, २१, जे.बी.

“आध्यात्मिक क्रांती” आवश्‍यक

जेथे जगाचा आत्मा प्रवर्तित होत असतो तेथे या सल्ल्याचा अवलंब आपल्याला कसा करता येईल? आपल्याला “ख्रिस्ताचे मन” म्हणजे त्याच्यासारखी मनोवृत्ती असेल तर जे “ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले” संगीत आहे ते ऐकण्याची आम्ही मुळीच इच्छा धरणार नाही.—१ करिंथकर २:१६; याकोब ३:१५.

पण तुम्ही विचाराल, ‘मी माझी संगीताची अभिरुची कशी बदलू शकेन?’ परत येथे पौलच मदत देतो. तो म्हणतोः “तुम्ही तुमची जुनी आचरण पद्धती त्यागावी; स्वतःचे जुनेपण सोडून द्यावे; कारण ते कपटाच्या वासनांनी भ्रष्टावलेले आहे. तुमची मने आध्यात्मिक क्रांतीने नवी होण्यास हवी.”—इफिसकर ४:२२, २३, जे.बी.

येथे उत्तर आहे व ते म्हणजे, आध्यात्मिक क्रांतीने मनाचे नवीनीकरण. यामध्ये आमची संगीताची अभिरुची यापेक्षा अधिक समाविष्ट आहे. यात पुनर्शिक्षण, दर्जे व मूल्ये जोपासणे यांची हाक आहे. याचा अर्थ आमच्या विचारपद्धतीत बदल, ठराविक प्रमाणातील बदल हा होतो. शिवाय यामध्ये देव व ख्रिस्त यांच्या दृष्टीकोणातून पाहणे यांचाही समावेश अहे. पौलाने हे इतक्या स्पष्टपणे म्हटलेः “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१.

आजचे बहुतेक संगीत देवाचे गौरव करीत नाही. उलटपक्षी, ख्रिस्तीजन जो दर्जा टिकवून आहेत व ज्यासाठी त्यांची तुरुंग तसेच बंदी छावणीत मरण्याची तयारी आहे त्या तत्त्वाविरुद्धच्या मूल्यांची त्यामध्ये जोपासना आहे. तद्वत, आम्ही ‘जग व जगातील गोष्टींवर प्रीती करणारे’ असे न होण्यासाठी आमची संगीताची अभिरुची बदलण्याची जरूरी आहे तर याला आपण त्याग तरी का मानावा?—१ योहान २:१५-१७.

चांगले संगीत—त्यामागील किल्ली कोणती?

आम्ही हिणकस संगीताचा शास्त्रवचनीय तत्त्वाच्या कारणामुळे त्याग करीत आहोत तर मग, याची जागा आम्ही कशाने भरून काढावी? खरे म्हणजे, संगीताची नवी दिशा का शोधून पाहू नये? हे, आम्ही गतकाळी ज्याविषयी पसंती दाखवली होती त्या संगीतापेक्षा अधिक आनंद देणारे व उभारणीकारक ठरू शकेल. उदाहरणार्थ, एका रॉक संगीतकाराने केलेल्या बदलाविषयी असे म्हटलेः

“मला साध्या रॉक ध्वनिपासून संगीताचा सन्मान्य प्रकार व अधिक सुगम संगीताकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागला. मला कळाले की, अशा संगीतात अधिक अर्थ आहे आणि मग, मला अत्याधुनिक संगीताच्या आत्म्याशी जडविले जाणार नाही, त्यामुळे हे मला अधिक सोपे व तृप्तीदायक ठरले. ते एकदमच हितकारक वाटले. मी पूर्वी पर्यायी संगीत प्रकाराविषयी संकुचित दृष्टीकोण राखल्यामुळे काय काय गमावले त्याची आता जाणीव होऊ लागली आहे.”

सुगम संगीत, लोकसंगीत आणि काही आधुनिक संगीत यामध्ये विविध प्रकार आहेत. त्यामध्ये उत्तम लय, शुद्ध भाषा आहे व ते पवित्र शास्त्रीय तत्त्वाच्या विरुद्ध असणाऱ्‍या तत्त्वज्ञानाचे वक्‍तव्य करीत नाहीत. अशाप्रकारे, संगीत कोणते असावे व कशाचा आनंद घ्यावा याची किल्ली ही आहे की, त्यामुळे आमच्या विचारांना चुकीचा प्रभाव जडला जाता कामा नये व ते संगीत ‘न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय, श्रवणीय, सद्‌गुण व स्तुतीस पात्र’ असे असण्यास हवे.—फिलिप्पैकर ४:८.

ख्रिस्ती जीवनातील संगीताची भूमिका

संगीताचा आस्वाद घेण्यासाठी काहींनी गायन गाणे किंवा एखादे वाद्य वाजविण्याचे शिकून घेणे पसंद केले आहे. आपले कुटुंब तसेच मित्र यांच्यासोबत गटाने गायन करण्यामुळे देखील मोठा आनंद मिळतो. परंतु, इतर सर्व गोष्टीप्रमाणे यातही समतोल हवा. कोणतीही करमणूक किंवा घालविलेला वेळ ख्रिस्ती जीवनात वरचढ होता कामा नये. तसे झाल्यास हितकारी संगीत, अतिरेक झाल्यामुळे अनिष्ट परिणाम निर्माण करू शकते. त्यामुळे, ख्रिस्तीजन ‘देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारे’ होण्याचा धोका संभवू शकतो.—२ तीमथ्य ३:४.

यहोवास केल्या जाणाऱ्‍या उपासनेत देखील संगीत अंतर्भूत आहे. प्राचीन काळी इस्राएलात आसाफ व त्याच्या भावांनी हे गीत गायिलेः “यहोवाचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या. राष्ट्रांस त्याची कृत्ये जाहीर करा. त्याला त्याची स्तोत्रे गा. त्याच्या सर्व अद्‌भूत कृत्यांचे वर्णन करा.” होय, संगीताद्वारे देवाची स्तुती होऊ शकते व ते त्याला संतुष्ट करते.—१ इतिहास १६:८, ९.

यहोवाचे साक्षीदार आपल्या राज्य सभागृहात जी राज्याची गाणी गातात ती पवित्र शास्त्र वचने, स्तोत्रे, प्रार्थना आणि शिक्षण यावर आधारलेली आहेत. या पवित्र संगीतात देखील आम्हाला सखोल आनंद मिळू शकणार नाही का? शिवाय या गीतांचे गायन करताना ती भावनोत्कटपणे व उत्साहाने म्हणून आम्हाला आमचा आनंद व्यक्‍त करता येणार नाही का? ख्रिस्ती सभांव्यतिरिक्‍त इतर वेळीही किंग्डम मेलडीज्‌ मध्ये असणाऱ्‍या सुंदर गायनाच्या श्रवणामुळे आम्हाला आमच्या जीवनातील भार हलका करता येऊ शकणार नाही का?

या संगीतात जो वाद्यवृंद आहे तो सबंध यहोवाच्या साक्षीदारातील संगीतकारांचा आहे. यातील काही व्यावसायिक आहेत जे स्वरमेळ करणाऱ्‍या वादकगणापैकी आहेत. शिवाय इतर, ज्यामध्ये वर नमूद करण्यात आलेला पूर्वीचा रॉक संगीतकारही आहे त्या, गुणसंपन्‍न युवकांचाही भरणा आहे, ज्यांना सत्‌शील संगीतातील वेगवेगळे प्रकार आवडतात. ऐहिक, सैतानी वृत्तीचे प्रदर्शन करणारे संगीत त्यागल्यामुळे आपले काही नुकसान झाले आहे असे यांना वाटत नाही. यांचे सुंदर उदाहरण दाखविते की, आपणही आपल्या निवडीवर पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा ताबा ठेवल्यास प्रापंचिक तसेच पवित्र गायनात आपल्याला अधिक हितकारक आनंद मिळवता येईल.—इफिसकर ५:१८-२०.

[२१ पानावरील चौकट]

“रॉक संगीतात केवळ एकाच प्रकारचे आकर्षण वाटू लागते व ते रानटी स्वरुपाचे, लैंगिक इच्छा प्रदिप्त करणारे आहे. त्यात प्रेम, प्रणय नव्हे तर लैंगिक इच्छा अविकसित आणि तयार न झालेल्या राहतात. . . . रॉकमध्ये लैंगिक समागमाचा ताल आहे हे युवकांना माहीत आहे.”—द क्लोसिंग ऑफ द अमेरिकन माइण्ड, लेखक ॲलन ब्लुम.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा