वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ८/१ पृ. १७-२२
  • वडीलांनो देवाच्या कळपाची ममतेने काळजी घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वडीलांनो देवाच्या कळपाची ममतेने काळजी घ्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कळपावर धनीपणा न करणारे
  • सुटका व तजेला यांचा उगम
  • न्यायाने व धर्माने
  • ममतेने काळजी करण्याचे चालू ठेवा
  • तुमच्या देखरेखीखाली असलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • वडीलांनो, धार्मिकतेने न्यायनिवाडा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • नेतृत्व करणाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ८/१ पृ. १७-२२

वडीलांनो देवाच्या कळपाची ममतेने काळजी घ्या

“आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्‍या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्यवृत्तीने होतो.”—१ थेस्सलनीकाकर २:७.

१. यहोवाच्या प्रत्येक निष्ठावंत साक्षीदाराला सुरक्षित वाटण्याचे कारण का आहे?

यहोवा थोर मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरासमान सेवकांसाठी मुबलक तरतूद करतो व त्यांना आपल्या पवित्र नामास्तव “नीतीमार्गांनी” नेतो. यामुळेच, त्याच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्‍यांना कशाचीही भीती वाटू नये; ते आपल्या दयाळू देवाकडे सांत्वनासाठी बघू शकतात. खरे म्हणजे, यहोवाच्या प्रत्येक निष्ठावंत साक्षीदाराला देवाच्या प्रेमळ काळजीत सुरक्षित वाटू देण्याचे सबळ कारण आहे.—स्तोत्रसंहिता २३:१-४.

२. देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब या अर्थी येशूही कोणते गुण प्रदर्शित करतो?

२ येशू ख्रिस्त हा “[देवाच्या] गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरुप आहे.” (इब्रीयांस १:१-४) यामुळे येशू हा उत्तम मेंढपाळ देखील प्रीती व कनवाळूपणा दाखवतो. (योहान १०:१४, १५) उदाहरणार्थ, एके प्रसंगी त्याने “लोकांचा समुदाय पाहिला. ज्या मेंढरांस मेंढपाळ नाही त्यांच्यासारखे ते होते म्हणून त्यांचा त्याला कळवळा आला, आणि तो त्यांस बहुत गोष्टी शिकवू लागला.”—मार्क ६:३४.

३. (अ) यहोवा देव व येशू ख्रिस्ताप्रमाणे सहमेंढपाळांनीही कोणत्या गुणांचे प्रदर्शन करावे? (ब) प्रेषित पौलाने देखरेख्यांना कोणती सूचना केली व इशारा दिला?

३ सर्व ख्रिश्‍चनांनी ‘देवाचे अनुकरण करावे व ख्रिस्ताने त्यांच्यावर प्रीती केली, तसे चालावे.’ (इफिसकर ५:१, २) यामुळेच त्यांनी देखील प्रेमळ व कनवाळू असावयास हवे. हे देवाच्या कळपाची राखण करणाऱ्‍या सहमेंढपाळांविषयी तर प्रामुख्यत्वे खरे असले पाहिजे. प्रेषित पौलाने म्हटलेः “तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला देखरेखे करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या पुत्राच्या रक्‍ताने मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे असे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे; तुम्हापैकीही काही मनुष्ये उठून शिष्यांस आपल्यामागे ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.”—प्रे. कृत्ये २०:२८-३०.

४. (अ) पौलाने प्रे. कृत्ये २०:२९, ३० मध्ये दाखविल्यानुसार काही काळात काय घडले? (ब) आता कोणत्या प्रश्‍नांचा विचार होणे जरुरीचे आहे?

४ काही काळातच “क्रूर लांडगे” सामोरे आले व त्यांनी “कळपाची दया” केली नाही. पण आज, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये वडील असा जाचजुलूम करीत नाही हे किती आनंदाचे आहे! तर मग, आत्म्याने नियुक्‍त करण्यात आलेल्या या देखरेख्यांपासून सह विश्‍वासी बांधव कोणत्या प्रकारची वागणूक अपेक्षू शकतात? आणि हे नियुक्‍त झालेले देखरेखे यहोवाच्या मेंढरांविषयी ममता कशी दाखवू शकतात?

कळपावर धनीपणा न करणारे

५. (अ) जागतिक शासनकर्ते बहुधा आपल्या प्रजेला कसे वागवतात? (ब) येशूने, आपल्या अनुयायांमध्ये जाचजुलूम यांना जागा नाही हे कसे दाखवले?

५ ख्रिस्ती वडीलांनी दयाळूपणाने आम्हाला वागणूक द्यावी हे आम्ही उचितपणे अपेक्षू शकतो. ते जगातील शासनकर्त्यांसारखे नाहीत, जे आपल्या प्रजेवर धनीपणा गाजवतात. जसे की, चार्लमॅग्ने या फ्रँकिश राजाविषयी (इ. स. ७६८-८१४ पर्यंत अधिकार गाजविलेला) असे कळविण्यात आले की, त्याने “सॅक्सन लोकांना, मृत्युदंडाची शिक्षा मिळेल या दहशतीने बाप्तिस्मा घेण्याची सक्‍ती केली, लेन्त सण मोडणाऱ्‍यास कडक शासन सांगितले आणि सक्‍ती अमलात आणण्यासाठी ठिकठिकाणी सैन्यबळ राखले.” (द हिस्ट्री ऑफ द ख्रिश्‍चन चर्च, लेखक, विल्यम जोन्स) येशूच्या अनुयायांमध्ये जाचजुलूमाला अजिबात जागा नाही, कारण येशूने म्हटले होतेः “विदेश्‍यांवर त्यांचे अधिकारी प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्हामध्ये तसे नसावे; तर तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे आणि तुम्हामध्ये जो कोणी पहिला होण्यास इच्छितो त्याने तुमचा दास व्हावे. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला.”—मत्तय २०:२५-२८.

६. (अ) वडीलांच्या बाबतीत कोणत्या मूलभूत गोष्टी सामोऱ्‍या दिसतात? (ब) मंडळीला वडीलांविषयी कोणती रास्त अपेक्षा बाळगता येईल, व या लोकांनी स्वतःविषयी कोणता दृष्टीकोण धरला पाहिजे?

६ ‘देखरेख्याच्या पदासाठी पोहंचण्याची इच्छा धरणारा’ ख्रिस्ती माणूस ‘चांगल्या कामाची इच्छा धरतो.’ (१ तीमथ्य ३:१) तसेच आत्ताच आपण वाचलेली येशूची सूचना लक्षात घेता या मूलभूत गोष्टी सामोऱ्‍या येतात: (१) ख्रिस्ती वडीलांनी इतरांवर हुकूमशहा म्हणून असू नये; (२) येशूच्या अनुयायांमध्ये जबाबदाऱ्‍या घेणाऱ्‍यांनी त्यांचे सेवक असावयास हवे, धनी नव्हे; आणि (३) देखरेख्याच्या पदास पोहोचणाऱ्‍या पुरुषाने ते पद “चांगल्या कामा”चे आहे असे गृहीत धरले पाहिजे, उच्चपद म्हणून नव्हे. (नीतीसूत्रे २५:२७; १ करिंथकर १:३१) “वडील” ही संज्ञा कोणाला यहोवाच्या इतर उपासकांपासून थोर बनवीत नाही. उलटपक्षी, सर्व वडीलांनी आध्यात्मिक रितीने प्रौढ, अनुभवी, व पवित्र सेवेत पुढाकार घेणारी नम्र माणसे या अर्थी मंडळीने उचितपणे अपेक्षा धरण्याचे कारण आहे. खरेच, वडीलांनी स्वतःला यहोवा देव, येशू ख्रिस्त व सह ख्रिश्‍चनांचे नम्र दास असे मानले पाहिजे.—रोमकर १२:११; गलतीकर ५:१३; कलस्सैकर ३:२४.

७. (अ) इतरांशी व्यवहार करताना वडीलांनी २ करिंथकर १:२४चा कसा अवलंब करावा? (ब) नियमन मंडळाकडून प्राप्त होणाऱ्‍या सूचनेविषयी वडीलांनी काय करावे?

७ इतरांची नम्रपणे सेवा करणे ही गोष्ट कोणा वडीलाला त्यांच्यावर ‘धनीपणा करू न देण्यात’ बांध घालते. आमचे देखरेखे हे पौलाप्रमाणेच आपली वृत्ती दाखवून आहेत हे किती चांगले आहे! त्याने करिंथ येथील ख्रिश्‍चनांना म्हटले होतेः “आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता करतो असे नाही, तर तुमच्या आनंदाचे सहकारी आहो.” (२ करिंथकर १:२४) तसेच प्रेमळपणे देखरेख करणारे समविश्‍वासूंना अनावश्‍यक मानवी नियमाचे ओझे लावीत नाहीत. उलटपक्षी, यहोवाच्या साक्षीदारांतील देखरेख्यांवर शास्त्रवचनीय तत्त्वांचा ताबा आहे व ते दयाळू व साहाय्यक सेवा पुरवितात. ते यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाकडून प्राप्त होणाऱ्‍या सूचना ताबडतोब अमलात आणून देवाच्या कळपाविषयी वाटणारी गाढ कळकळ व्यक्‍त करतात.—प्रे. कृत्ये अध्याय १५.

८. पौलाने समविश्‍वासू बांधवांविषयी कोणती वृत्ती राखली होती, आणि याचा २० व्या शतकातील वडीलांवर कसा प्रभाव होण्यास हवा?

८ पौलाला देवाच्या कळपाविषयी उत्कट काळजी होती म्हणूनच तो थेस्सलनीका येथील ख्रिश्‍चनांना म्हणालाः “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्‍या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्यवृत्तीचे होतो. आम्हास तुमचा कळवळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देवाच्या सुवार्तेचे केवळ दान देण्यास नव्हे तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रेमामुळे तुमच्याकरता आपला जीवही देण्यास राजी होतो.” (१ थेस्सलनीकाकर २:७, ८) आपल्या मुलांवर गाढ प्रीती करणाऱ्‍या आणि आपल्यापेक्षा त्यांच्या आस्थांची अधिक काळजी घेणाऱ्‍या व त्यांच्याविषयी कळवळा दाखविणाऱ्‍या दाईप्रमाणे पौलाने आपली वृत्ती ठेवली. आजच्या २० व्या शतकाच्या वडीलांना देवाच्या कळपाची ममतेने काळजी घेण्यासाठी हे किती प्रेरणादायक उदाहरण आहे!

सुटका व तजेला यांचा उगम

९. यशया ३२:१, २ मध्ये यहोवाच्या आजच्या लोकांविषयीची कोणती स्थिती भाकित करण्यात आली होती?

९ येशू ख्रिस्ताच्या आजच्या काळाच्या राजवटीविषयी दर्शविताना यशया संदेष्ट्याने असे भाकित केले की, राजा “धर्माने राज्य करील” आणि “सरदार” “न्यायाने सत्ता चालवितील.” यास्तव, आजच्या ईश्‍वरशासित संस्थेमध्ये वडील प्रस्थापित अशा स्वर्गीय राज्याची आस्था हाताळीत आहेत—जी खरीच बादशाही सेवा आहे! या जबाबदार पुरुषांना यशयाचे पुढील भविष्यवादित शब्द लागू होतातः “वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा . . . रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया असा तो होईल.”—यशया ३२:१, २.

१०. यहोवाच्या साक्षीदारातील प्रत्येक वडील कशाचा उगम ठरला पाहिजे?

१० ख्रिस्ती धर्मराज्यातील जाचक धर्मनेत्यांसारखे न होता यहोवाच्या साक्षीदारांमधील वडील सुटका व तजेला यांचा स्रोत बनत आहेत. वडीलांचे वर्ग या नात्याने ते यहोवाच्या लोकांत शांती, स्थैर्यता व निर्भयता उभारीत आहेत. देवाच्या कळपास ममतेने वागविण्यामुळे प्रत्येक वडील व्यक्‍तीगतपणे या सुंदर परिस्थितीला अधिक हातभार लावू शकतो.

न्यायाने व धर्माने

११. (अ) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांमध्ये कोणती परिस्थिती होती जी आजच्या बहुतेक यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यात दिसते? (ब) देखरेख्यांना मंडळीविषयक कोणती जबाबदारी आहे व का?

११ पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्यात समस्या उद्‌भवल्या होत्या तरी त्यांची सर्वसाधारण स्थिती शांतीची, ऐक्यतेची व आनंदाची होती. (१ करिंथकर १:१०-१२; ३:५-९; इफिसकर १:२; याकोब २:१-९; ३:२-१२; ४:११, १२; १ योहान १:३, ४) आजही देवाचा आशीर्वाद, ख्रिस्ताचे नेतृत्व आणि नेमलेल्या देखरेख्यांद्वारे केले जाणारे विश्‍वासू काम यामुळे यहोवाच्या साक्षीदारांच्या बहुतेक मंडळ्यातून सुंदर अशी आध्यात्मिक स्थिती दिसत आहे. मंडळीची शांती, ऐक्यता व आनंदासाठी हे लोक ईश्‍वरी मदतीचा शोध घेतात आणि देवाची संस्था नैतिक व आध्यात्मिक रितीने शुद्ध ठेवण्याचा कसोशीने यत्न करतात. (यशया ५२:११) अशुद्ध संस्थेमध्ये शांतीदायक व आनंदाचे वातावरण कधीच असू शकणार नाही व तिला देवाची मर्जी व आशीर्वाद नक्कीच मिळणार नाहीत. त्याचे “डोळे इतके पवित्र आहेत की, दुष्टता [त्याच्याने] पाहवत नाही,” व ती सहन होत नाही. (हबक्कुक १:१३) इतर गोष्टींसमवेत वडीलांना कधी कधी न्यायाविषयीची प्रकरणे योग्य व शास्त्रवचनीय पद्धतीने हाताळावी लागतात. अशी ही प्रकरणे हाताळताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवण्यास हव्या?

१२. वडीलांनी शास्त्रीय कायद्यांचा किंवा तत्त्वांचा भंग केला जात नाही अशा व्यक्‍तीगत घडामोडीत लक्ष देण्याची गरज नाही तरी, गलतीकर ६:१ च्या अनुषंगाने काय केले जावे?

१२ प्रथमतः जी प्रकरणे व्यक्‍तीगत मतभेदास अनुलक्षून आहेत ती त्या संबंधितांनी खाजगीपणे हाताळणे शक्य आहे. (मत्तय १८:१५-१७) वस्तुतः वडील ‘आमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवीत नसल्यामुळे’ जी प्रकरणे अत्यंत खाजगी बाबीची आहेत व ज्यात पवित्र शास्त्राचे कायदे व तत्त्वे यांचे गंभीर स्वरुपाचे उल्लंघन नाही त्यामध्ये त्यांनी डोकावण्याची अपेक्षा करता येणार नाही. अर्थातच, जेव्हा ‘कोणी माणूस लक्षात येण्याआधी एखाद्या अपराधात सापडला” आहे असे दिसले तर मग आध्यात्मिक गुणवत्ता असणाऱ्‍यांनी “अशाला सौम्य भावाने ताळ्यावर आणा”वे.—गलतीकर ६:१.

१३. वडीलांनी नुसते ऐकण्यावरच नव्हे तर गुन्ह्‌याचा पुरावा बघून त्यानुरुप हालचाल करावी हे शास्त्रवचने कसे दाखवतात?

१३ वडीलांनी “न्यायाने” हाताळणी करावी व त्यांनी नेहमी निःपक्षपाती असावे. या कारणास्तव त्यांनी नुसते कोणाचे ऐकून नव्हे तर अपराधाचा पुरावा बघून त्यानुसार कृती आचरावी. पौलाने सूचना केली: “दोन किंवा तीन साक्षीदार असल्यावाचून वडीलावरील आरोपाचा खटला घेऊ नको.” (१ तीमथ्य ५:१९) प्राचीन इस्राएलामध्ये यहोवाचा असा नियम होता की, मृत्युदंडास पात्र होईल असा गुन्हा केलेल्या इसमाला “एकाच्या नव्हे तर दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीवरुन” ठार मारीत असत. याचप्रमाणे, गुन्हेगाराला आरोप करणाऱ्‍यांच्या सामोरे जावे लागत होते, आणि पुरावा पुरेसा मिळाला तर “ज्याचा वध करावयाचा त्याच्यावर प्रथम साक्षीदारांना आपले हात उचलावे” लागत होते.—अनुवाद १७:६, ७.

१४. (अ) दियत्रफेसने कोणती गोष्ट करण्यात चूक केली? (ब) न्यायदानाची प्रकरणे हाताळताना वडीलांनी कसे असावे अशी देव अपेक्षा धरतो?

१४ न्याय्य हालचाल करण्यासाठी सबळ शास्त्रवचनीय आधार असला पाहिजे. आपले मंडळीतील देखरेखे हे पहिल्या शतकातील अहंकारी दियत्रफेस सारखे नाहीत याचा आम्हाला किती आनंद वाटतो! हा दियत्रफेस मंडळीस भेट देणाऱ्‍या प्रवासी बांधवांचा पाहुणचार करणाऱ्‍या बांधवांना ‘मंडळीबाहेर घालविण्याचा’ प्रयत्न करीत होता. त्याचे हे आणि इतर कृत्ये प्रेषित योहानाने हलके मानले नाही; म्हणून त्याने ताकीद दिली की, “मी आलो तर तो जी कर्मे करतो त्यांची आठवण देईन.” (३ योहान ९, १०) या कारणास्तव कोणतीही बहिष्कृत हालचाल आचरताना त्याला शास्त्रवचनीय आधार आहे का हे आजच्या न्यायदान करणाऱ्‍या समितीने खात्रीपूर्वक पाहिले पाहिजे.a ख्रिस्ती वडीलांनी इतरांशी व्यवहार ठेवताना अर्थातच न्यायी असावयास हवे हे देव अपेक्षितो. जे यहोवाच्या पृथ्वीवरील संघटनेतील घडामोडी हाताळीत असतात त्यांनी खरे पाहता “गुणवान, देवाचे भय धरणारे, विश्‍वस्त” असलेच पाहिजे.—निर्गम १८:२१.

१५. न्यायालयीन सुनावणीत प्रार्थनेने कोणता कार्यभाग पूरा करावा?

१५ न्यायदान करणारी प्रत्येक ख्रिस्ती समिती अंतःकरणपूर्वक प्रार्थनेद्वारे यहोवाकडील मदतीचा शोध घेते. गंभीर पातक केलेल्या बंधू किंवा भगिनीबरोबर केल्या जाणाऱ्‍या सभेची सुरवात प्रार्थनेद्वारे व्हावी. खरे म्हणजे, चर्चेच्या दरम्यान देवाच्या मदतीची खास गरज आहे असे दिसत असले तर तेव्हाही प्रार्थना करणे उचित आहे.—याकोब ५:१३-१८.

१६. वडीलांनी न्यायदानाच्या प्रकरणाची कशी हाताळणी करावी व का?

१६ ज्यावर अपराध केल्याचा दोष आहे ती व्यक्‍ती देवाच्या कळपातील एक “मेंढरु” आहे हे वडीलांनी जाणावे व म्हणून त्याला ममतेने वागविण्यास हवे. (पडताळा यहेज्केल ३४:७-१४.) खऱ्‍या मेंढराची कनवाळूपणे काळजी घ्यावी लागते, कारण ते बुजरे प्राणी आहेत व संरक्षणासाठी ते आपल्या मेंढपाळावर विसंबून असतात. तर मग, स्थानिक मंडळीतील लाक्षणिक मेंढराविषयी काय? यांना थोर मेंढपाळ यहोवा देव व उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त यांच्या काळजीत सुरक्षित वाटते. यामुळेच सहमेंढपाळांनी यहोवाच्या मेंढरासमान सेवकांची अंतर्यामीची शांती व सुरक्षिततेची भावना याविषयी कदर राखून त्याप्रमाणे हालचाल ठेवली पाहिजे. तुम्ही स्वतः एक ख्रिस्ती सहमेंढपाळ आहात तर तुमच्या बंधूभगिनींना तुम्ही घेत असलेल्या काळजीत सुरक्षित व निर्भय वाटते का? हे खरे की, वडीलांनी पवित्र शास्त्राचे कायदे व तत्त्वे यांना उंचावून धरले पाहिजे. तथापि, मेंढरासोबत प्रेमळपणाने दळणवळण ठेवावे हे शास्त्रवचनीय बंधन त्यांच्यावर आहे, त्यामुळे न्यायालयीन सुनावणी शांतपणे, व्यवस्थितपणे, दयाळूपणे व विचारशीलपणे हाताळली जाण्यास हवी.

१७. न्यायदानाची प्रकरणे हाताळताना वडीलांनी खासपणे कोणते शास्त्रवचनीय मुद्दे लक्षात ठेवावेत?

१७ अपूर्ण असल्यामुळे आपण बोलण्यात ‘पुष्कळदा चुकत असतो.’ (याकोब ३:२) आम्हाला प्रत्येकाला देवाच्या दयेची आणि ख्रिस्ताच्या ‘प्रायश्‍चिताच्या अर्पणाची’ गरज आहे. (१ योहान १:८–२:२; स्तोत्रसंहिता १३०:३) यामुळे ख्रिस्ती सहमेंढपाळाने स्वतःविषयी लीन दृष्टीकोण धरण्यास हवा. त्याने येशूचे हे शब्दही ध्यानात ठेवावेः “लोकांनी तुम्हाशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्हीही त्यांजशी वर्तन करा.” (लूक ६:३१) हा सल्ला खासपणे न्यायदान प्रकरणाची हाताळणी करताना अनुसरण्यास हवा. आध्यात्मिक गुणवत्ता असणाऱ्‍या लोकांनी चुकलेल्या ख्रिश्‍चनाला “सौम्यभावाने” ताळ्यावर आणावे आणि ‘आपणही परिक्षेत पडू नये म्हणून स्वतःला संभाळावे.’—गलतीकर ६:१; १ करिंथकर १०:१२.

१८. (अ) न्यायदानाच्या प्रकरणात वडीलांनी कोणाला निष्ठुरपणे वागविले तर काय होऊ शकते? (ब) मार्क ९:४२ च्या अनुषंगाने काय घडू नये याविषयी वडीलांनी व इतर ख्रिश्‍चनांनीही दक्षता बाळगावी?

१८ न्यायदानाच्या प्रकरणी वडीलांनी कोणाला निष्ठुरतेने वागविले तर ते त्या विशिष्ठाला घातक ठरेल. जरी भावनिक किंवा शारीरिक इजा दिसली नाही तरी आध्यात्मिक इजा दिसून येऊ शकते व त्यामुळे देखरेख्यांची पात्रता प्रश्‍नार्थक बनू शकते. (पडताळा याकोब २:१३.) यास्तव, न्यायदानाची प्रकरणे हाताळताना तसेच इतर प्रसंगी देखील वडीलांनी दयावंत असावे व कोणालाही अडखळण होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. खरे पाहता, सर्व ख्रिश्‍चनांनी ही काळजी करण्याची गरज आहे कारण येशूने म्हटले होतेः “विश्‍वास ठेवणाऱ्‍या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे हे बरे.” (मार्क ९:४२) जात्याची तळी ही इतकी वजनदार होती की तिला हलविण्यासाठी एका जनावराची शक्‍ती लागे. त्यामुळे कोणाच्या गळ्याला ही तळी बांधून त्याला समुद्रात टाकले असता तो कशाही स्थितीत वाचू शकत नव्हता. या कारणामुळे अडखळण बनू नये याविषयी वडीलाने दक्ष राहिले पाहिजे; कारण यामुळे त्याला स्वतःला आणि जो अडखळला गेला आहे त्यालाही दीर्घकालीन आध्यात्मिक इजा होईल.—फिलिप्पैकर १:९-११.

ममतेने काळजी करण्याचे चालू ठेवा

१९. पेत्राने सहवडीलांना कोणती सूचना दिली, आणि याला योग्यपणे प्रतिसाद दाखवल्यामुळे त्यांच्या भवितव्यावर कसला परिणाम होणार?

१९ सहदेखरेख्यांनी कळपाची राखण कशी करावी याविषयी पेत्राने मार्गदर्शन दिले. तो म्हणतोः “तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा. भाग पडते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभानेही नव्हे तर उत्सुकतेने करा. तुमच्या दिम्मतीच्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हाल असे करा. मग, मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.” (१ पेत्र ५:२-४) या सूचनेचा अवलंब करून तसेच देवाच्या कळपाची ममतेने काळजी करून अभिषिक्‍त देखरेख्यांना अमर आत्मिक प्राणी या अर्थी स्वर्गीय वतनदारी तर पृथ्वीवरील आशा असणाऱ्‍या वडीलांना भावी जगव्याप्त नंदनवनातील चिरकालिक जीवनाचा लाभ मिळू शकेल.

२०. (अ) ख्रिस्ती सहमेंढपाळांनी आपल्या समविश्‍वासूंना कसे वागविले पाहिजे? (ब) प्रेमळ वडीलांच्या उदाहरणशील सेवेविषयी तसेच ममतायुक्‍त काळजीविषयी तुम्हाला कसे वाटते?

२० यहोवा देव व येशू ख्रिस्त हे दोघेही प्रेमळ व मायाळू मेंढपाळ आहेत. यास्तव ख्रिस्ती सहमेंढपाळांनी ईश्‍वरी दर्जांना उंचावून धरायचे असले तरी त्यांनी आपल्या मेंढरासमान समविश्‍वासूंविषयी प्रेम व ममता प्रदर्शित केली पाहिजे. आपला विश्‍वस्तपणा सांभाळणाऱ्‍या आणि देवाच्या कळपाची ममतेने काळजी करणाऱ्‍या अशा या स्वार्थत्यागी वडीलांच्या उदाहरणशील सेवेची कदर सर्वच निष्ठावंत यहोवाचे साक्षीदार निश्‍चये करतील. ही कदर व योग्य आदर आम्हामध्ये नेतृत्व करणाऱ्‍यांच्या बाबतीत आज्ञाधारक राहून प्रदर्शित केला जाऊ शकतो. (w89 9/15)

[तळटीपा]

a न्यायदानात गंभीर चूक झाली आहे असे खात्रीने वाटत असल्यास त्या व्यक्‍तीला बहिष्कृतीच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येते.

तुमचे विचार काय आहेत?

◻ आपल्या अनुयायांमध्ये जाचजुलूम यांना थारा नाही हे येशू ख्रिस्ताने कसे दाखवले?

◻ नियमन मंडळाकडून सूचना मिळाल्यावर वडीलांनी काय करण्यास हवे?

◻ यशया ३२:१, २ नुसार वडीलांनी कशाचा स्रोत ठरले पाहिजे?

◻ वडीलांनी नुसते ऐकण्यावरच हालचाल करू नये हे शास्त्रवचने कसे दाखवितात?

◻ ख्रिस्ती सहमेंढपाळांनी कळपाला कशी वागणूक द्यावी?

[२० पानांवरील चित्रं]

समविश्‍वासू बरोबर न्यायदान करणारी समिती भेटते तेव्हा अंतःकरणपूर्वक प्रार्थना जरुरीची आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा