वडीलांनो, धार्मिकतेने न्यायनिवाडा करा
“तुम्ही आपल्या भाऊबंदाच्या फिर्यादी ऐक[ताना] . . . धर्माने न्याय करा.”—अनुवाद १:१६.
१. न्यायदानाच्या बाबतीत अधिकाराचे कोणते स्थलांतर घडले, आणि यामुळे मानवी न्यायाधीशांवर कोणते बंधन येते?
यहोवाने सर्वोच्च न्यायाधीश या नात्याने आपल्या पुत्राला न्यायनिवाडा करण्याचा हक्क दिला आहे. (योहान ५:२७) मग, ख्रिस्त देखील ख्रिस्ती मंडळीचा मस्तक या नात्याने विश्वासू व बुद्धिमान दास याचा तसेच नियुक्त वडिलांच्या नियमन मंडळाचा वापर करतो, यांनीही वेळोवेळी न्यायाधीश अशी हालचाल केली आहे. (मत्तय २४:४५-४७; १ करिंथकर ५:१२, १३; तीतास १:५, ९) न्यायाधीशांचे प्रतिनिधी या अर्थाने यांच्यावर यहोवा व ख्रिस्त येशू या स्वर्गीय न्यायाधीशांचे उदाहरण जवळून अनुसरण्याचे बंधन आहे.
ख्रिस्त—उदाहरणीय शास्ता
२, ३. (अ) ख्रिस्ताची शास्ता या नात्याने गुणवत्ता मशीहाचा कोणता भविष्यवाद प्रकट करतो? (ब) कोणते मुद्दे प्रामुख्याने लक्षात घेण्याजोगे आहेत?
२ ख्रिस्ताने शास्ता होण्याच्या बाबतीत भविष्यवादितपणे असे लिखाण करण्यात आले होतेः “परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल; तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरुनच न्याय करणार नाही; कानांनी ऐकले तेवढ्यावरुनच तो निर्णय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील.”—यशया ११:२-४.
३ ख्रिस्ताला “जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने” करण्यासाठी समर्थ करणारी गुणवत्ता या भविष्यवादात दिली असल्याचे लक्षात घ्या. (प्रे. कृत्ये १७:३१) तो यहोवाचा आत्मा, ईश्वरी सूज्ञान, समज, सूचना व बुद्धि याच्या अनुषंगाने न्याय करतो. तसेच तो यहोवाच्या भयानेही न्याय करतो हे लक्षात घ्या. अशाप्रकारे, “ख्रिस्ताचे न्यायासन” हे प्रातिनिधिकरित्या “देवाचे न्यायासन” आहे. (२ करिंथकर ५:१०; रोमकर १४:१०) देव ज्या पद्धतीने प्रकरणांचा न्यायनिवाडा करतो, त्याचप्रमाणे करण्याची हा देखील काळजी घेतो. (योहान ८:१६) तो कोणाचे स्वरुप पाहून किंवा नुसते ऐकून न्याय करीत नाही. तो दीन व नम्रजनांचा न्याय सात्विकपणे करतो. किती हा अद्भूत शास्ता! ज्यांना आज न्यायदानाच्या क्षमतेत हालचाल करण्याचे निमंत्रण असते अशांसाठी हे केवढे चांगले उदाहरण आहे!
पृथ्वीवरील शास्ते
४. (अ) ख्रिस्ताच्या हजार वर्षाच्या कारकिर्दीत १,४४,००० जणांचे एक काम कोणते असेल? (ब) काही अभिषिक्त ख्रिश्चनांना पृथ्वीवर असतानाच शास्ते या नात्याची नियुक्ती मिळेल हे कोणता भविष्यवाद दाखवतो?
४ ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीत येशूसोबत १२ प्रेषितांचा समावेश असणारा फारच लहान संख्येचा अभिषिक्त ख्रिश्चनांचा गट सहशास्ते असा असेल. (लूक २२:२८-३०; १ करिंथकर ६:२; प्रकटीकरण २०:४) पृथ्वीवरील आध्यात्मिक इस्राएलाच्या अभिषिक्त सदस्यांच्या शेषवर्गाचा न्याय होऊन त्यांना १९१८-१९ मध्ये पुनर्स्थापित करण्यात आले. (मलाखी ३:२-४) आध्यात्मिक इस्राएलांच्या पुनर्वसनाबद्दल असे भाकित करण्यात आले होतेः “मी पूर्वीप्रामणे तुला न्यायाधीश व आरंभीच्या प्रमाणे तुला पुनः मंत्री देईन.” (यशया १:२६) अशाप्रकारे, दैहिक इस्राएलाबाबतीत यहोवाने ‘आरंभाला’ जसे केले तसेच नीतीमान न्यायाधीश व सल्लागार यांची पुनर्स्थापित शेषांमध्ये प्रस्थापना केली.
५. (अ) आध्यात्मिक इस्राएलाचे पुनर्वसन झाल्यावर कोणाला ‘न्यायाधीश या नात्याची नेमणूक’ मिळाली, आणि यांचे चित्र प्रकटीकरणाच्या पुस्तकात कसे दाखवण्यात आले? (ब) न्यायदानाच्या कामात अभिषिक्त देखरेख्यांना कोण सहकार्य देत आहेत, आणि यांना चांगले न्यायाधीश बनण्यासाठी कशी तालीम दिली जात आहे?
५ आरंभाला “न्यायाधीश म्हणून नेमलेले” (न्यू.व.) सर्व ‘शहाणे मनुष्य’ अभिषिक्त वडील जन किंवा वडील होते. (१ करिंथकर ६:४, ५) प्रकटीकरणाच्या पुस्तकता विश्वासू व आदरणीय अशा अभिषिक्त देखरेख्यांना येशूच्या उजव्या हाती, त्याच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली असल्याचे दाखवण्यात आले आहे. (प्रकटीकरण १:१६, २०; २:१) मग, १९३५ पासून अभिषिक्तांना सतत वाढत जाणाऱ्या ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ निष्ठावंत पाठिंबा मिळाला. या लोकसमुदायाची “मोठ्या संकटातून” पार होऊन नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर सदासर्वकाळ जिवंत राहण्याची आशा आहे. (प्रकटीकरण ७:९, १०, १४-१७) “कोकऱ्याचे लग्न” जसजसे जवळ येत चालले आहे तसतसे यापैकीच्या लोकांना अभिषिक्त नियमन मंडळात वडील या नात्याने आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील ६६,००० पेक्षा अधिक मंडळ्यातून वडील म्हणून सेवा करण्याची नियुक्ती मिळत आहे.a (प्रकटीकरण १९:७-९) खास शाळांद्वारे यांना “नवीन पृथ्वी”च्या संस्थेतील जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. (२ पेत्र ३:१३) १९९१ च्या समाप्तीपर्यंत चालविण्यात आलेल्या शाळांनी न्यायदानाची प्रकरणे योग्यपणे हाताळण्यावर भर दिला. न्यायदान समितीवर काम करणाऱ्या वडीलांवर यहोवा व येशू ख्रिस्त यांचे अनुकरण करण्याचे व त्यांच्या खऱ्या व नीतीमान न्यायाला अनुसरण्याचे बंधन आहे. —योहान ५:३०; ८:१६; प्रकटीकरण १९:१, २.
‘सद्भयाने वागणारे’ न्यायाधीश
६. न्यायदानाच्या समितीवर काम करणाऱ्या वडीलांनी स्वतःला ‘सद्भयाने का वागवावे’?
६ ख्रिस्त स्वतः यहोवाचे भय राखून आणि त्याच्या आत्म्याच्या मदतीने न्याय करतो, तर मग अपूर्ण वडील तो त्या पद्धतीने किती विशेषेकरुन करावा बरे! त्यांची न्यायदान करण्याच्या समितीवर नेमणूक झाल्यावर त्यांनी ‘सद्भयाने वागणूक केली’ पाहिजे आणि धार्मिकतेने न्याय करावा यासाठी “जो तोंड न पाहता . . . न्याय करतो” त्याची मदत मागितली पाहिजे. आपण लोकांच्या जीवनाची, त्यांच्या “जिवां”ची हाताळणी करीत आहोत, व यासाठी “आपणास हिशेब द्यावयाचा आहे” हे त्यांनी लक्षा ठेवले पाहिजे.” (इब्रीयांस १३:१७) या कारणास्तव, त्यांच्या हातून अशा काही चुका घडल्यास, ज्या वस्तुतः टाळता आल्या असत्या, त्यांच्याबद्दल त्यांना यहोवापुढे जबाबदार धरले जाईल. इब्रीयांस १३:१७ वर आपले विचार मांडताना जे. एच. ए. आब्रॅर्ड यांनी लिहिलेः “आपल्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या जिवांची देखरेख ठेवणे हे मेंढपाळाचे कर्तव्य आहे, आणि . . . आणि त्याला सर्वांना याबद्दल हिशेब द्यावयाचा आहे, ज्यामध्ये त्यांच्या निष्काळजीपणामुळे ज्यांना गमावले असेल अशांचा देखील समावेश आहे. ही निश्चयी आज्ञा आहे. ही आज्ञा लाभलेल्या प्रत्येक देखरेख्याने याची आठवण राखावी की, त्याने ही कठीण जबाबदारी स्वेच्छेने पत्करली आहे.”—पडताळा योहान १७:१२; याकोब ३:१.
७. (अ) आधुनिक काळच्या शास्त्यांनी काय आठवणीत ठेवले पाहिजे, आणि त्यांचे ध्येय काय असावे? (ब) मत्तय १८:१८-२० पासून वडीलांनी कोणते धडे शिकून घ्यावेत?
७ न्यायदानाच्या पातळीवर काम करणाऱ्या वडीलांनी याचे स्मरण ठेवावे की, प्रत्येक प्रकरणाचे खरे न्यायाधीश यहोवा व ख्रिस्त येशू हे आहेत. इस्राएलातील न्यायाधिशांना जे सांगण्यात आले होते ते आठवाः “तुम्ही न्याय कराल तो मानवासाठी नाही तर परमेश्वरासाठी [यहोवा, न्यू.व.] करावयाचा आहे; न्याय करिताना तो तुमच्याबरोबर असणार. तर परमेश्वराची भीती तुमच्या ठायी असू द्या. . . . तुम्ही त्यांस असे बजावून सांगा की, तुम्ही परमेश्वराचा अपराध करू नका.” (२ इतिहास १९:६-१०) देवाबद्दलची पूज्यमय भीती राखून, न्यायाचे एखादे प्रकरण हाताळणाऱ्या वडीलांनी, यहोवा खरेच ‘न्याय करताना त्यांच्यासोबत आहे’ याची खात्री वाटण्यासाठी करता येण्याजोगे सर्व करावे. त्यांनी दिलेला निर्णय, यहोवा व ख्रिस्त यांना त्या प्रकरणाबद्दल जे वाटते ते प्रवर्तित करणारा असावा. ते पृथ्वीवर लाक्षणिकरित्या जे ‘बंद करतील’ (ज्यांना दोषी ठरवतील) किंवा ‘मोकळे करतील’ (निर्दोष ठरवतील) ते आधीच स्वर्गात बंद करण्यात आलेले किंवा मोकळे करण्यात आलेले असले पाहिजे; जे देवाच्या प्रेरित वचनाच्या लिखाणात आधीच प्रकट करण्यात आलेले आहे. त्यांनी यहोवाकडे येशूच्या नामाने प्रार्थना केल्यास येशू त्यांना मदत देण्यासाठी “त्यांच्यामध्ये” असणार. (मत्तय १८:१८-२०, तळटीप; द वॉचटावर, फेब्रुवारी १५, १९८८, पृ. ९) न्यायदानाच्या सुनावणीच्या वेळी ख्रिस्त खराच त्यांच्यामध्ये उपस्थित आहे हे दिसून आले पाहिजे.
पूर्ण वेळचे मेंढपाळ
८. यहोवा व येशू ख्रिस्त यांनी घालून दिलेल्या उदाहरणाप्रमाणे वडीलांची त्यांच्या कळपाबद्दल कोणती प्रमुख जबाबदारी आहे? (यशया ४०:१०, ११; योहान १०:११, २७-२९)
८ वडील सर्ववेळ न्यायदान करीत नाही; ते तर पूर्ण वेळचे मेंढपाळ आहेत. ते शिक्षा देणारे नव्हे तर बरे करणारे आहेत. (याकोब ५:१३-१६) देखरेखा यासाठी जो ग्रीक शब्द (ए․पिʹस्को․पोस) आहे त्यामागील मूलभूत कल्पना संरक्षणयुक्त काळजी ही आहे. द थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट सांगतेः “[१ पेत्र २:२५ मध्ये] मेंढपाळ याबरोबर अध्यक्ष [ए․पिʹस्को․पोस] ही घातलेली संज्ञा संरक्षण करणे किंवा देखरेख करण्याच्या पाळकाच्या कामाची सूचकता देते.” होय, यांची जबाबदारी मेंढरांची देखरेख करून त्यांना संरक्षण देणे व त्यांना कळपामध्ये ठेवणे ही आहे.
९, १०. (अ) वडीलांचे पहिले कर्तव्य कोणते असावे यावर पौलाने कसा भर दिला, या कारणास्तव कोणता प्रश्न विचारून पाहणे उचित आहे? (ब) प्रे. कृत्ये २०:२९ मधील पौलाच्या शब्दांचा कोणता मतितार्थ आहे; यास्तव, वडीलांना न्यायदानाची प्रकरणे कशी कमी करता येतील?
९ इफिसच्या मंडळीतील वडीलांसोबत बोलताना प्रेषित पौलाने जेथे जोर द्यावयाचा तेथे जोर देऊन म्हटलेः “तुम्ही आपणांकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांस अध्यक्ष करून ठेविले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या पुत्राच्या रक्ताने मिळविली तिचे पाळण तुम्ही करावे.” (प्रे. कृत्ये २०:२८) पौल येथे शिक्षा देण्याबद्दल नव्हे तर पाळण करण्याची ठळकपणे मांडतो. काही वडीलांनी या पुढील प्रश्नाकडे अगदी गांभिर्याने विचार करण्यास हवाः ‘आपण जर मेंढपाळकत्वाच्या कामास अधिक वेळ दिला व अधिक प्रयत्न केले असते तर न्यायदानाच्या प्रकरणाचे संशोधन व हाताळणी करण्यात जितका वेळ गेला तो वाचवला गेला असता का?’
१० पौलाने “क्रुर लांडगे” याबद्दल देखील इशारा दिला हे खरे आहे. पण त्यांनी ‘कळपाची दया केली नाही’ असा दोष त्यांजवर त्याने ठेवला नाही का? (प्रे. कृत्ये २०:२९) अशा “लांडग्यां”ना विश्वासू देखरेख्यांनी घालवून दिले पाहिजे हे पौलाने अभिप्रेतपणे म्हटले होते तरी, अशा वडीलांनी कळपाच्या इतर सदस्यांना “दयेने” वागविले पाहिजे हे त्याचे शब्द सूचित करीत नाही का? कोणी मेंढरु आध्यात्मिक रितीने क्षीण होते आणि देवाची सेवा करण्याचे बंद करते अशावेळी त्याला किंवा तिला कशाची गरज असते—मारण्याची की बरे करण्याची, शिक्षा करण्याची की पाळण करण्याची? (याकोब ५:१४, १५) या कारणास्तव, वडीलांनी मेंढपाळकत्वाच्या कामाचा नियमित आराखडा ठेवण्यास हवा. यामुळे, ज्यावर पापाने झडप घातली आहे अशा ख्रिश्चनाचे न्यायदान प्रकरण हाताळण्यात प्रदीर्घ वेळ वाया घालविण्यापेक्षा कमी वेळात आनंदी परिणामाचा प्रत्यय मिळण्यात दिसेल. वडीलांची पहिली काळजी ही सुटका व तजेला मिळण्याचा आधार ही असली पाहिजे, ज्यामुळे यहोवाच्या लोकांत शांती, स्थैर्यता आणि सुरक्षा वाढीस लागू शकेल.—यशया ३२:१, २.
लाभदायी मेंढपाळ व शास्ते अशी सेवा करणे
११. न्यायदान समित्यांवर काम करणाऱ्या वडिलांना निपक्षपातीपणा व ‘वरुन येणाऱ्या ज्ञाना’ची का आवश्यकता आहे?
११ कोणा ख्रिश्चनाने वाकड मार्ग धरण्याआधी त्याला अधिक पुष्टीदायक मेंढपाळकत्वाची भेट दिल्यामुळे यहोवाच्या लोकांतील कित्येक न्यायदानाची प्रकरणे कमी करता येतील. (पडताळा गलतीकर ६:१.) तथापि, मानवी पाप व अपूर्णता यामुळे ख्रिस्ती देखरेख्यांना अधूनमधून अपराधी प्रकरणांची हाताळणी करावी लागते. येथे त्यांना कोणती तत्त्वे मार्गदर्शक ठरावीत? ही तत्त्वे मोशेच्या आणि आरंभीच्या ख्रिश्चनांच्या काळापासून तीच आहेत; ती बदलली नाहीत. मोशेने इस्राएलातील शास्त्यांना जे शब्द उच्चारले होते ते आजही लागू आहेत की, “तुम्ही आपल्या भाऊबंदांच्या फिर्यादी ऐकी [व] त्यांच्यामध्ये धर्माने न्याय करा. न्याय करिताना पक्षपात करू नका.” (अनुवाद १:१६, १७) न्यायदान समित्यांवर सेवा करणाऱ्या वडिलांना जे ज्ञान आवश्यक आहे, त्या ‘वरुन येणाऱ्या ज्ञाना’चे निपक्षपातीपणा हे एक गुणलक्षण आहे. (याकोब ३:१७; नीतिसूत्रें २४:२३) असे हे सूज्ञान त्यांना अशक्तपणा व दुष्टपणा यातील फरक जाणण्यास मदत देईल.
१२. वडीलांनी कोणत्या अर्थाने केवळ धार्मिकच नव्हे तर चांगलेही असले पाहिजेत?
१२ वडीलांनी बरोबर व चूक याबद्दल असणाऱ्या यहोवाच्या दर्जांनुरुप “धर्माने न्याय” केला पाहिजे. (स्तोत्रसंहिता १९:९) आपण धार्मिक आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात असता, त्यांनी पौलाने रोमकर ५:७, ८ मध्ये दिलेल्या गुणवत्तेच्या अनुषंगाने चांगली मनुष्ये असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या वचनांबद्दल भाष्य करताना, इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स “धार्मिकता” या लेखात म्हणतेः “ग्रीक संज्ञेचा वापर हे दाखवतो की, ज्या माणसाठायी चांगुलपणा असण्याची ख्याति आहे तो मनुष्य परोपकारी (दुसऱ्यांचे चांगले करणारा वा त्यांना लाभ देणारा) आणि कनवाळू (हा चांगूलपणा क्रियाशीलपणे दाखवणारा) असतो. न्याय कशाची मागणी करतो एवढीच त्याची चिंता नसते, पण तो, इतरांचा हितकारी विचार आणि त्यांना लाभ व मदत देण्याची इच्छा यामुळे भारावून याच्याही पलिकडे जातो.” (खंड २, पृ. ८०९) जे वडील केवळ धार्मिक नसून चांगले देखील आहेत ते अपराध्याला दयावंत विचारांनी वागणूक देतील. (रोमकर २:४) त्यांनी दया व कनावाळूपणा दाखवण्याची इच्छा धरली पाहिजे. अपराध्याने जरी प्रथमतः त्यांच्या प्रयत्नांना योग्य तो प्रतिसाद दाखवला नाही तरी, त्यांनी त्याला पश्चाताप करण्याची गरज केवढी आहे हे दाखवून देण्यासाठी करता येण्याजोगे सर्व केले पाहिजे.
सुनावणीच्या वेळी योग्य वागणूक दाखवणे
१३. (अ) कोणी वडील न्यायधीश या नात्याने कृति करतो तेव्हा त्याने काय विसरु नये? (ब) पौलाने दिलेली कोणती सूचना न्यायदानाच्या वेळीही लागू होणारी आहे?
१३ न्यायदानाच्या सुनावणीची परिस्थिती समोर असली तरी, आपण अद्याप मेंढपाळ आहोत आणि “उत्तम मेंढपाळ” याच्या वर्चस्वाखाली यहोवाच्या मेंढराची हाताळणी करीत आहोत हे देखरेख्यांनी विसरु नये. (योहान १०:११) अडचणीत असलेल्या मेंढरांना नियमित रुपाची मदत देण्याबद्दल पौलाने जी सूचना केली ती येथे न्यायदानाच्या सुनावणीच्या वेळीही तितक्याच प्रमाणात लागू होते. त्याने लिहिलेः “बंधुजनहो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले [आध्यात्मिक गुणवत्ता असणारे] आहा ते तुम्ही अशाला सौम्य भावाने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नये याविषयी स्वतः संभाळ. एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.”—गलतीकर ६:१, २.b
१४. न्यायदानाच्या सुनावणीकडे देखरेख्यांनी कोणत्या दृष्टीने बघावे, आणि अपराध्याबद्दल त्यांची मनोवृत्ती कशी असावी?
१४ शिक्षेचा अवलंब करण्यासाठी एकत्रित झालेले श्रेष्ठ न्यायाधीश असा विचार स्वतःबद्दल बाळगण्याऐवजी न्यायदानाच्या समितीवर काम करणाऱ्या वडिलांनी, ती सुनावणी, मेंढपाळकत्वाच्या कामाचा आणखी एक प्रकार आहे असे समजण्यास हवे. यहोवाच्या मेंढरापैकी एक अडचणीत सापडलेला आहे. त्याला किंवा तिला वाचवण्यासाठी त्यांना काय करता येईल? तो कळपापासून दूर गेलेला आहे आणि त्याला मदत देण्यामध्ये आता खूपच उशीर झालेला आहे का? आम्ही तसे गृहीत धरु नये. जेथे योग्य आहे तेथे वडीलांनी दया दाखवण्याबद्दल विधायक दृष्टिकोण राखावा. एखादे गंभीर पातक घडले आहे तेव्हा त्यांनी यहोवाच्या दर्जांना वळवावे असे ते असता कामा नये. पण जेथे गुन्ह्याचा गंभीरपणा कमी आहे अशी जाणीव मिळते तेथे त्यांना दया दाखवण्यास आधार मिळू शकेल. (स्तोत्रसंहिता १०३:८-१०; १३०:३) पण हे दुःखाचे आहे की, काही अपराधी इतके दुराग्रही असतात की, वडिलांनी शेवटी दृढता दाखवावी लागते. ते निष्ठुरता कधीच दाखवणार नाहीत.—१ करिंथकर ५:१३.
न्यायदानाच्या सुनावणीचा उद्देश
१५. दोघांमध्ये गंभीर समस्या उद्भवल्यास प्रथम काय ठरविले जाण्यास हवे?
१५ जेव्हा गंभीर समस्या दोघामध्ये उद्भवतात तेव्हा संबंधितांनी ते प्रकरण खाजगीपणे मत्तय ५:२३, २४ किंवा मत्तय १८:१५ च्या अनुषंगाने मिटवण्याचा प्रयत्न केला आहे का हे प्रथम सूज्ञ वडील पाहतील. ते अपयशी ठरल्यास एका किंवा दोघा वडीलांद्वारे दिला जाणारा सल्ला पुरेसा ठरू शकेल. न्यायी हालचाल ही केवळ जेव्हा गंभीर पातक घडले आहे व ज्यामुळे बहिष्कृती होऊ शकते अशासाठीच जरुरीची आहे. (मत्तय १८:१७; १ करिंथकर ५:११) न्यायदान देणारी समिती तयार करण्यासाठी बळकट असा शास्त्रवचनीय आधार असला पाहिजे. (पहा, द वॉचटावर, सप्टेंबर १५, १९८९, पृ. १८.) जेव्हा असे एखादे प्रकरण असल्याचे कळते तेव्हा प्रत्येक प्रकरणासाठी सर्वांत उत्तम असे प्रशिक्षित वडील नेमण्यास हवेत.
१६. न्यायदानाच्या सुनावणीद्वारे वडील काय साध्य करण्याचा प्रयत्न करतात?
१६ न्यायदानाच्या सुनावणीद्वारे वडील काय साध्य करण्याचा प्रयत्न करतात? एक गोष्ट म्हणजे सत्य कळाल्याशिवाय धार्मिकतेने न्याय करणे शक्य नाही. इस्राएलात होते तसे गंभीर प्रकरणांचा ‘कसून शोध होण्यास हवा.’ (अनुवाद १३:१४; १७:४) यास्तव सुनावणीचे एक ध्येय, प्रकरणाची वस्तुस्थिती शोधून काढावी हे असते. पण हे प्रेमाने केले जाऊ शकते व केले जाण्यास हवे. (१ करिंथकर १३:४, ६, ७) एकदा वस्तुस्थिती कळाल्यावर मग, वडील मंडळीचे संरक्षण करण्यासाठी आणि तिजमध्ये यहोवाचे उच्च दर्जे राखून ठेवण्यासाठी आणि तिजमध्ये त्याच्या आत्म्याचा प्रवाह मुक्तपणे वाहू देण्यासाठी जे करता येणे शक्य आहे ते करतील. (१ करिंथकर ५:७, ८) तथापि, सुनावणीचा आणखी एक उद्देश म्हणजे शक्य आहे तर धोक्यात सापडलेल्या अपराध्याला वाचवणे.—पडताळा लूक १५:८-१०.
१७. (अ) सुनावणीच्या वेळी आरोपी व्यक्तिला कसे वागविले जाण्यास हवे, आणि कोणत्या उद्देशाने? (ब) यासाठी न्यायदान समितीच्या सदस्यांच्या बाबतीत कोणती अपेक्षा धरली जाते?
१७ आरोप असलेल्या अपराध्याला देवाचे मेंढरू यापेक्षा इतर पद्धतीने वागवू नये. त्याला किंवा तिला दयेने वागविले पाहिजे. एखादे पाप (किंवा पापे) घडले असल्यास धार्मिक न्यायाधिशांचे कर्तव्य, त्या अपराध्याची सुधारणा करावी, त्याच्या चुकीच्या मार्गाची समज घडावी, पश्चाताप करवावा, आणि अशाप्रकारे “सैतानाच्या पाशातून त्याला आढून काढावे” हे असावे. त्याला “सुशिक्षण,” व “सहनशीलतेने बोध करणे” जरुरीचे असेल. (२ तीमथ्य २:२४-२६; ४:२) आता जेव्हा अपराध्याला आपल्या पातकांची जाणीव झाली आहे, त्याच्या अंतःकरणाला खरेपणाने चिरा पडल्या आहेत आणि तो यहोवाची क्षमा मागत आहे तर काय? (पडताळा प्रे. कृत्ये २:३७.) याला प्रामाणिकपणे मदतीची गरज आहे अशी समितीची खात्री पटल्यास त्याला बहिष्कृत करण्याची गरज नसणार.—पहा द वॉचटावर, जानेवारी १, १९८३, पृ. ३१, परि. १.
१८. (अ) कोणा अपराध्याला बहिष्कृत करण्यामध्ये न्यायदान समितीने केव्हा दृढता दाखवावी? (ब) हृदयास भग्न करणाऱ्या कोणत्या परिस्थितीमुळे वडीलांनी मार्ग चुकणाऱ्या मेंढरांच्या बाबतीत पराकाष्ठेचा प्रयत्न दाखवावा?
१८ पण उलटपक्षी, न्यायदान समितीला निर्दयी धर्मत्याग, यहोवाच्या कायद्याचा इच्छापूर्वक भंग करणारा किंवा अत्यंत दुष्टतेचा आचार या गोष्टी स्पष्ट रुपात दिसत असल्यास अशा अपश्चातापी अपराध्याला बहिष्कृत करून मंडळीतील इतर सदस्यांचे रक्षण करण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. जर ईश्वरी दुःख या अपराध्यात दिसून येत नाही तर मग, अशा अपराध्याला वारंवार सुनावणीसाठी बोलावणे, त्याच्या मुखात शब्द घालणे, त्याला पश्चाताप करण्याची गळ घालणे हे न्यायदान करणाऱ्या समितीने करण्याची गरज नाही.c अलिकडील वर्षात जगभर बहिष्कृत होत असलेल्यांचे प्रमाण एकूण प्रचारकांच्या साधारण १ टक्का आहे. याचा अर्थ हा की, कळपात राहणाऱ्या शंभर मेंढरात एक हरवला जातो—तात्कालिकपणे. एका व्यक्तिला कळपात आणण्यासाठी जो वेळ जे प्रयत्न खर्ची होतात ते पाहू जाता, दर वर्षी हजारो जण ‘सैतानाच्या स्वाधीन केले जातात’ हे हृदयाला भग्न करणारे नाही का?—१ करिंथकर ५:५.
१९. न्यायदान समितीवर काम करणाऱ्या वडीलांनी काय कधीच विसरु नये, या कारणास्तव त्यांचे ध्येय काय राहावे?
१९ न्यायदानाची प्रकरणे हाताळणाऱ्या वडीलांनी हे लक्षात ठेवावे की, मंडळीत घडणारी बहुतेक अपराधी प्रकरणे अशक्तपणाची असतात, दुष्टपणाची नव्हे. येशूने हरवलेल्या मेंढराचा जो दाखला दिला तो त्यांनी कधीही विसरु नये; ज्याची समाप्ती येशूने या शब्दात केली होतीः “ज्यांस पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव धार्मिकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांस सांगतो.” (लूक १५:७) खरेच, “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची [यहोवाची] इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) यास्तव, जगभर असलेल्या न्यायदान करणाऱ्या समित्या यहोवाच्या मदतीने, अपराध्यांना पश्चात्तापाची गरज दाखवून देण्याची आणि आपली पावले सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या अरुंद मार्गाकडे परत वळविण्याची सुरवात करून देण्याची मदत देऊन स्वर्गात आनंद होऊ द्यावा.—मत्तय ७:१३, १४.
[तळटीपा]
a दुसरी मेंढरे यामधून वडीलांच्या पदावर तसेच ख्रिस्ताच्या उजव्या हाती असण्याबद्दल वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या रेवलेशन—इटस् ग्रँड क्लायमॅक्स ॲट हँड! पुस्तकातील पृष्ठ १३६ वरील तळटीप बघा.
b पहा, द वॉचटावर, सप्टेंबर १५, १९८९, पृ. १९.
c पहा द वॉचटावर, सप्टेंबर १, १९८१, पृ. २६, परि. २४.
उजळणी प्रश्न
▫ मोठा मेंढपाळ व उत्तम मेंढपाळ यांच्या उदाहरणाला अनुसरुन वडीलांची प्रमुख आस्था कशामध्ये असावी?
▫ न्यायदानाची प्रकरणे वडील कशी कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात?
▫ न्यायाधिशांनी कोणत्या अर्थी केवळ धार्मिक नव्हे तर चांगलेही असले पाहिजे?
▫ सुनावणीच्या वेळी अपराध्याला कसे वागवले पाहिजे, व कोणत्या उद्देशाने?
▫ बहिष्कृत करणे हा शेवटला पर्याय का ठरावा?
[१६ पानांवरील चित्रं]
जेव्हा योग्य मेंढपाळकत्वाच्या भेटी दिल्या जातात तेव्हा न्यायदानाची कित्येक प्रकरणे टळली जाऊ शकतात
[१८ पानांवरील चित्रं]
न्यायदानाची सुनावणी होत असताना देखील वडीलांनी अपराध्याला सौम्य भावाने ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करावा