हजार वर्षीय राजवटीत बचावून जाण्यासाठी संघटीत राहणे
“मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.”—योहान १०:१६.
१. सदा जिवंत असणाऱ्या देवाला हजार वर्षे कशी वाटतात?
मानवजातीच्या वेळेचा यहोवा हा निर्माता आहे. या युगानुयुग राहणाऱ्या अमर देवाला हजार वर्षे ही जणू लगेच जाणारा दिवस किंवा आमच्या रात्रीच्या एका प्रहरासारखी वाटतात.—स्तोत्रसंहिता ९०:४; २ पेत्र ३:८.
२. मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी देवाने कोणता काळ ठेवलेला आहे?
२ देवाने हजार वर्षांचा असा लाक्षणिक दिवस ठेवला आहे, जेव्हा तो पृथ्वीवरील सर्व कुटुंबांना आशीर्वादित करणार. (उत्पत्ती १२:३; २२:१७, १८; प्रे. कृत्ये १७:३१) यामध्ये, जे आता जिवंत आहेत व जे आधीच मृत झालेले आहेत अशांचा समावेश होतो. हे तो कसे करील? आपली लाक्षणिक स्त्री हिचे “संतान,” येशू ख्रिस्त याच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या त्याच्या राज्याद्वारे!—उत्पत्ती ३:१५.
३. (अ) देवाच्या स्त्रीच्या संतानाची टाच कशी डसली गेली, पण तो घाव कसा बरा करण्यात आला? (ब) येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राज्यकिर्दीच्या समाप्तीला तो लाक्षणिक सर्पाचे काय करील?
३ देवाच्या स्त्री (किंवा स्वर्गीय संघटने) च्या संतानाच्या लाक्षणिक टाचेला, येशू ख्रिस्ताला आमच्या समान शकाच्या ३३ व्या वर्षी हुतात्मिक मरण आले व तो तीन दिवसासाठी मृत राहिला तेव्हा डंख बसला. पण तिसऱ्या दिवशी सर्वसमर्थ देव, जीवनदाता याने आपल्या निष्ठावंत पुत्राचे आत्मिक जगतात अमर जीवन देण्यासाठी पुनरुत्थान केले तेव्हा ती जखम भरून काढली. (१ पेत्र ३:१८) आता येशू पुन्हा मरणार नसल्यामुळे त्याला मानवजातीवर राजा या नात्याने हजार वर्षांसाठी राज्य करता येईल व तो लाक्षणिक सर्पाचे ‘डोके फोडून’ त्याला हजार वर्षाच्या राज्यकिर्दीच्या समाप्तीला कायमचे नष्ट करील. तेव्हा विश्वासू अशा पुनर्स्थापित मानवजातीला तो केवढा आशीर्वाद लाभेल बरे!
४. देव आपल्या लोकांसाठी कोणत्या प्रकारचा कार्यक्रम पूर्ण करीत आहे?
४ १९१४ मध्ये विदेश्यांचे काळ संपले तेव्हापासून “व्यवस्थीकरणाची समाप्ती” काळात पृथ्वीवरील यहोवाच्या लोकात बरीच संघटनात्मक प्रगति झाली. (मत्तय २४:३; लूक २१:२४, किंग जेम्स व्हर्शन) हजार वर्षीय कारकिर्दीच्या आधी करण्यात येत असलेला हा संघटनात्मक कार्यक्रम महान संघटक यहोवा देवाच्या इच्छेनुरुप व मार्गदर्शनाखाली पार पाडला जात आहे. त्याने आपल्या स्त्री करवी म्हणजे आपल्या स्वर्गीय संघटनेमार्फत येशू ख्रिस्ताच्या हाती असणाऱ्या वाग्दत्त राज्याचा जन्म १९१४ मध्ये घडवून आणला याविषयीचे प्रमाण पवित्र शास्त्र भविष्यवादाच्या पूर्णतेत दिसून येते.
५. प्रकटीकरण १२:५ मध्ये कोणत्या जन्माचे भाकित करण्यात आले आहे, आणि याविषयीचे पहिले विवेचन द वॉचटावरमध्ये केव्हा सादर करण्यात आले?
५ यालाच अनुसरुन प्रकटीकरण १२:५ मधील या शब्दांची वैभवी पूर्णता घडलीः “ती पुत्र प्रसवली; सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असे पुसंतान प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले.” देवाच्या स्त्रीच्या नवजात बालकाचे प्रतिरुप असणाऱ्या ख्रिस्ताकरवीच्या यहोवाच्या राज्याच्या जन्माचे स्पष्टीकरण पहिल्यांदा द वॉचटावर मासिकात मार्च १, १९२५ अंकात विवेचीत केले गेले. या मशीही राज्याचा १९१४ मध्ये स्वर्गात घडलेला जन्म हा सीयोनेच्या ‘मुलांचे’ “राष्ट्र” पृथ्वीवर १९१९ मध्ये उदयास आले त्यापेक्षा भिन्न आहे.—यशया ६६:७, ८.
६. (अ) राज्याच्या जन्माने, येशूने भाकित केलेले कोणते कार्य करण्याची हाक दिली? (ब) हे काम करताना यहोवाच्या साक्षीदारांना काय करावे लागले, आणि त्यांनी कोणता एकोपा दाखविला?
६ सबंध विश्वामध्ये असलेले आपले हक्काचे सार्वभौमत्व गौरविण्याच्या माध्यमाचा म्हणजे यहोवाच्या राज्याचा जन्म—ही अशी गोष्ट आहे की, ज्याविषयीची माहिती सबंध पृथ्वीभर जाहीर केली गेली पाहिजे! शिवाय याचवेळी येशूने आपल्या अदृश्य “उपस्थिती” विषयी दिलेल्या पुराव्याच्या या शब्दांची पूर्णता झाली पाहिजेः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:३, १४) तद्वत, जागतिक रुपात, आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐक्याने व सुसंगतपणे प्रचाराचे कार्य व्हावयाचे आहे तर यहोवाच्या विश्वव्याप्त संघटनेच्या दृश्य भागाचे संघटन होण्याची जरुरी आहे. त्या काळी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीला तसेच तिच्या अध्यक्षांना, जे. एफ. रदरफोर्ड यांना तेच वाटत होते. या कारणामुळे १९१९ या युद्धानंतरच्या वर्षापासून संस्थेच्या निष्ठावंत पाठीराख्यांचे पुनर्स्थापित राष्ट्र या नात्याने संघटन निश्चयाने पुढे होत गेले व त्यावर सर्वोच्च संघटक, यहोवा देव याचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळावे म्हणून त्याकडे प्रार्थना केल्या गेल्या. दुसरे जागतिक महायुद्ध भडकले तेव्हा फॅसिस्ट, हिटलरचे नाझी, कॅथोलिक चळवळ यांचा प्रखर विरोध झाला तरीही यहोवाच्या साक्षीदारांनी जगभरात शत्रुजगताला ऐक्याने तोंड दिले.
७. (अ) एकमेकांसोबतच्या कोणत्या नातेसंबंधात टिकून राहिल्यामुळे यहोवाच्या लोकांना मोठ्या संकटातून निभाव मिळू शकेल? (ब) जगव्याप्त जलप्रलयातून वाचणारे लोक त्यातून कसे वाचले, आणि ते कोणाचे चित्र आहेत?
७ अभिषिक्त शेष आणि “मोठा लोकसमुदाय” यांनी मिळून बनलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एकतेच्या संघटनेलाच सर्वोच्च संघटकाच्या संरक्षणाखाली दियाबल सैतानाचे प्रभुत्व असणाऱ्या या नाशपात्र व्यवस्थीकरणातून बचावण्याची शास्त्रवचनीय आशा आहे. (प्रकटीकरण ७:९-१७; २ करिंथकर ४:४) सबंध मानवी इतिहासात अत्यंत वाईट ठरणाऱ्या संकटातून ज्या ‘मनुष्या’चा निभाव लागेल असे येशू ख्रिस्ताने म्हटले होते ते तेच असतील. येशूने म्हटले की, नोहाच्या काळी होते तसेच तो प्रकट होण्याच्या वेळी असेल. जे तारु बांधण्यास संघटीत प्रयत्नांची बरीच वर्षे गेली त्यामध्ये केवळ आठ मानवी जीव गेले व त्यांचा जगव्याप्त जलप्रलयातून बचाव झाला. त्यांचा संघटीत कौटुंबिक गट असा बचाव झाला. (मत्तय २४:२२, ३७-३९; लूक १७:२६-३०) नोहाच्या बायकोची प्रतिमा ख्रिस्ताच्या वधूशी जुळते आणि त्याचे पुत्र व सुना यांची बरोबरी येशूच्या सध्याच्या “दुसरी मेंढरे” याजबरोबर होते. हे आता संख्येने वाढत आहेत आणि याचा शेवटचा आकडा किती असेल ते आता सांगता येत नाही. (योहान १०:१६) थोर नोहा येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली यांना हजार वर्षीय राजवटीत बचावून जाण्यासाठी त्यांनी अभिषिक्त शेष या “निवडलेल्यां”च्या सोबतीत संघटीत राहणे जरुरीचे आहे. त्या “निवडलेल्यां”खातर “मोठे संकट” याचे दिवस कमी केले जातील.—मत्तय २४:२१, २२.
हजार वर्षीय राजवटीत बचावून जाणे
८. उपस्थितीविषयीचा भविष्यवाद संपवताना येशूने कोणता दाखला दिला, आणि याची समज मिळण्याच्या बाबतीत जून १, १९३५ ही तारीख कशी महत्त्वाची ठरली?
८ मत्तयाच्या शुभवर्तमानानुसार येशूने आपल्या उपस्थितीच्या चिन्हाविषयी दिलेला भविष्यवाद एका दृष्टांताकरवी संपवला. शेरडे व मेंढरे यांचा दाखला असे ज्याला सर्वसाधारणपणे म्हटले जाते त्याचा अवलंब आज, या व्यवस्थीकरणाच्या समाप्ती काळात लागू होतो. हा काळ विदेश्यांच्या काळाची १९१४ मध्ये समाप्ती झाली तेव्हा सुरु झाला. (मत्तय २५:३१-४६) या दाखल्यातील मेंढरे म्हणजे मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य ही स्पष्ट ओळख मिळण्यात शनिवार, जून १, १९३५ ही तारीख महत्त्वाची ठरली. वॉशिंग्टन डी. सी. येथे त्या दिवशी भरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनात ८४० जणांचा, यहोवाला येशू ख्रिस्तामार्फत केलेल्या समर्पणाचे जाहीर द्योतक म्हणून बाप्तिस्मा झाला. यापैकीच्या बहुतेकांनी ही कृती, जे. एफ. रदरफोर्ड यांनी प्रकटीकरण ७:९-१७ चे जे स्पष्टीकरण आपल्या भाषणात दिले त्याला त्वरित प्रतिसाद म्हणून दाखविली. उत्तम मेंढपाळाच्या दुसऱ्या मेंढरातील सदस्य आपण असावे अशी त्यांची इच्छा झाली, तसेच येणाऱ्या मोठ्या संकटातून बचाव मिळावा व या व्यवस्थेच्या अंतातून पार होऊन मेंढपाळ राजा येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीत प्रवेश मिळावा अशीही त्यांची इच्छा होती. सरतेशेवटी यांना नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.—मत्तय २५:४६; लूक २३:४३.
९. “जे राज्य . . . [त्यांच्यासाठी] सिद्ध करुन” देण्यात आले आहे ते वतन करण्यासाठी मेंढरांना का निमंत्रण देण्यात आले आहे, आणि हे राजाच्या बंधूंना चांगले ते करण्याच्या उत्तम स्थितीत कसे आहेत?
९ “जे राज्य जगाच्या स्थापनेपासून [त्यांच्यासाठी] सिद्ध केले ते वतन करुन” घेण्यास या मेंढरासमान लोकांना का आमंत्रित करण्यात आले बरे? राजा म्हणतो की, त्यांनी त्याच्या “बंधूं”विषयी जी सत्कर्मे केली ती त्याच्यासाठीच केली. “बंधू” असे म्हणण्याकरवी राजाचा हा अर्थ होता की या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीकाळात या पृथ्वीवर त्याच्या आध्यात्मिक बांधवापैकीचे हयात असणारे शेष. मेंढपाळ-राजा येशू ख्रिस्त याच्या बांधवांसोबत एक कळप झाल्यामुळे यांना शेषांबरोबर शक्य तेवढा जवळचा सहवास ठेवता येऊन त्यांचे भले करता येते. शेवट येण्याआधी, येशूच्या बांधवांना प्रस्थापित राज्याची सुवार्ता जगभरात गाजवता यावी म्हणून ते आर्थिक साहाय्यही देऊ शकत होते. याखातर, शेषांसोबत एका मेंढपाळाचा एक कळप या नात्याने संघटीत राहण्याचा हक्क मेंढरे जतन करून ठेवू शकतील.
१०. “जगाच्या स्थापनेपासून जे राज्य [त्यांच्यासाठी] सिद्ध केले आहे ते वतन करून” घेणे याचा मेंढरांसाठी काय अर्थ होतो?
१० “जे राज्य . . . [त्यांच्यासाठी] सिद्ध करुन” दिले आहे ते वतन करून घेणे याचा अर्थ ही मेंढरे स्वर्गातील ख्रिस्त येशू व त्याचे बंधू यांजसोबत हजार वर्षांसाठी राज्य करतील असा नाही. उलटपक्षी, हजार वर्षांची कारकीर्द सुरु झाल्यापासून ही मेंढरे राज्याच्या पृथ्वीवरील आसमंताचे वतन मिळवतील. ते आदाम हव्वेचे वंशज आहेत त्यामुळेच हे पृथ्वीवरील वातावरण असेल जे ख्रिस्ताकरवीचे देवाचे राज्य आपल्या ताब्यात घेईल आणि हेच मुक्तता होणाऱ्या मानवजातीकरता “जगाच्या स्थापनेपासून” सिद्ध करण्यात आले होते. वस्तुतः मेंढरे ही राजाची पृथ्वीवरील मुले होणार आहेत व तो त्यांचा “सनातन पिता” बनणार आहे, त्यामुळे ते देवाच्या राज्यात हा पृथ्वीवरील आसमंत वतन करुन घेतील.—यशया ९:६, ७.
११. आपण राज्याच्या बाजूने उभे आहोत हे मेंढरे कसे दाखवितात, आणि यामुळे त्यांच्यावर कोणते आशीर्वाद येतात?
११ शेरडांचा स्वभाव न दाखविता मेंढरासमान लोक न चुकता, देवाच्या राज्यासाठी असणारी आपली भूमिका घेतात. ती कशी? शब्दांनी नव्हे तर कृतीने. राजा स्वर्गात अदृश्य असल्यामुळे ते त्याच्यासाठी थेटपणे चांगले ते करुन राज्यास आपला पाठिंबा व्यक्त करु शकत नाही. या कारणास्तव या पृथ्वीवर अद्याप हयात असलेल्या त्याच्या आध्यात्मिक बांधवांना ते चांगले ते करतात. यामुळे जरी यांना शेरडांचा द्वेष, विरोध व छळ याचा सामना करावा लागत आहे तरी राजाने ही हमी त्यांना दिलेली आहे की, ते ‘त्याच्या पित्याचे आशीर्वादित आहेत.’
१२. बचावणारे मेंढरासमान लोक कोणाचे स्वागत करतील, आणि याबाबतीत शेषातील काही सदस्यांना काय वाटते?
१२ राजाच्या आध्यात्मिक बांधवांना चांगले ते करणाऱ्या मेंढरासमान लोकांच्या मोठ्या लोकसमुदायाला हजार वर्षीय राजवटीत प्रवेश मिळण्याचा आनंदी आशीर्वाद मिळेल. काही काळातच हे, स्मृती कबरेतील मानवी मृतांचे परत स्वागत करण्यासाठी सिद्ध होतील. (योहान ५:२८, २९; ११:२३-२५) यांजमध्ये, यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या विजयाखातर ज्यांनी बराच त्रास सहन केला ते विश्वासू कुलपिता व संदेष्टे यांचा समावेश असेल. यांना “अधिक चांगले पुनरुत्थान,” बहुतेक आरंभाचे पुनरुत्थान मिळण्याची आशा आहे. (इब्रीयांस ११:३५) इब्रीयांस पत्राच्या ११ व्या अध्यायात पुनरुत्थान होणाऱ्या ज्या काही विश्वासू स्त्री-पुरुषांची यादी दिलेली आहे, त्यामध्ये बाप्तिस्मा करणारा योहानही असेल. (मत्तय ११:११) अभिषिक्त शेषांपैकीच्या काहींना वाटते की, इ. स. ३३ च्या पेंटेंकॉस्टपूर्वी वारलेल्या विश्वासू जनांचे पुनरुत्थान पहावयास व त्यांचे स्वागत करावयास तेथे असावे. हा हक्क अभिषिक्तांना मिळू शकेल का?
१३. पुनरुत्थितांचे स्वागत करण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी शेषांनी तेथे असणे का जरुरीचे नाही?
१३ हे जरुरीचे भासणार नाही. उद्भवणाऱ्या परिस्थितीची काळजी घेण्यास व पुनरुत्थितांना ‘नव्या आकाशा’खालील ‘नव्या पृथ्वी’ची ओळख करून देण्यात मोठ्या संकटातून वाचलेला मोठा लोकसमुदाय संख्येने अगणित असणार. (२ पेत्र ३:१३) आत्ताच मोठ्या लोकसमुदायास याकरता संघटीत करण्यात येत आहे. सध्या येशूच्या आध्यात्मिक बांधवांची संख्या ९,०००पेक्षाही कमी आहे, त्यामुळे यातून बचावणाऱ्याची संख्या, नवीन जगात पुनरुत्थान होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीच्या कामापर्यंत बरीच अपुरी असणार. (यहेज्केल ३९:८-१६) याकारणास्तव तेव्हा, मोठा लोकसमुदाय, जो आता लाखोंनी वाढत आहे तो, याविषयीची काळजी घेण्यास तयार असेल. हा हक्क निश्चये त्यांच्यासाठी राखलेला आहे.
१४. (अ) मोठ्या लोकसमुदायापैकीच्या अनेकांना आज कशाची तालीम मिळत आहे, आणि यापैकीच्या अनेकांनी आता जबाबदारी का उचलली पाहिजे? (ब) लवकरच कोणत्या घटना घडल्या पाहिजेत, आणि कोणते काम दुसऱ्या मेंढरांसाठी वाट पाहून आहे?
१४ मोठ्या लोकसमुदायाच्या पुष्कळांना आज मंडळीच्या जबाबदाऱ्यांसंबधी तसेच देवाची संस्था जगभरात जो इमारती उभारण्याचा प्रकल्प हाती घेऊन आहे त्याच्या कामासाठी तालीम देण्यात येत आहे. याचप्रमाणे आज यहोवा पृथ्वीवर जी संस्था चालवीत आहेत तिजमध्ये मोठ्या लोकसमुदायातील आध्यात्मिक प्रौढ पुरुष अधिक जबाबदाऱ्या पत्करीत आहेत हे पाहणे मोठे प्रोत्साहनदायक आहे. अभिषिक्त जनांपैकी उरलेले आता वयाने वृद्ध होत आहेत व त्यांना अधिक भार सहन होत नाही. यामुळे ख्रिस्ताचे हे बांधव, दुसरी मेंढरे वर्गातील आध्यात्मिकदृष्ट्या लायक वडील व उपाध्य सेवकांमार्फत जे प्रेमळ संघटनात्मक साहाय्य दिले जात आहे त्याचे स्वागत करतात. लवकरच, मोठ्या बाबेलला या पृथ्वीवरील दृश्यातून काढून टाकण्यात येईल. मग, प्रकटीकरण १९:१-८ म्हणते त्याप्रमाणे कोकऱ्याचा, सबंध १,४४,००० सदस्यांच्या वधूसोबत विवाह स्वर्गात पूर्णपणे संपन्न होईल, आणि नव्या आकाशाखाली नवीन पृथ्वीत वावरणारे दुसरी मेंढरे वर्गाचे लोक राजाचे प्रतिनिधित्व करून पुनर्स्थापनेचे काम हाती घेतील व ही सबंध पृथ्वी नंदनवन तसेच लोकांनी पूर्ण भरलेली होईपर्यंत ते भव्य काम करीत राहतील. याद्वारे यहोवाची स्तुती होईल.—यशया ६५:१७; पडताळा यशया ६१:४-६.
१५. हजार वर्षीय राजवटीत मोठ्या लोकसमुदायासाठी कोणते भवितव्य आहे?
१५ ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीत खंडणीचा लाभ मिळणाऱ्या मानवजातीच्या मृतांचे पुनरुत्थान घडेल तेव्हा बचावलेल्या मोठ्या लोकसमुदायाला प्रचंड व सन्माननीय हक्कांचा आनंद मिळेल. ते त्यावेळी राजाचे पुत्र व कन्या होतील. यापैकीच्या काही पुत्रांना, जसे दावीद राजाचे पुत्र राजपुत्र या नात्याने विविध जबाबदाऱ्या सांभाळून होते त्याप्रमाणे राजपुत्र बनण्याची संधि मिळेल.a हे आम्हाला ४५ व्या स्तोत्राचे स्मरण घडविते, ज्याचा संदर्भ यहोवाच्या अभिषिक्त ‘राजा’सोबत आहे.
१६. स्तोत्रसंहिता ४५ खरेपणाने कोणास अनुलक्षून आहे, व हे कसे सिद्ध करता येऊ शकते?
१६ हे ४५ वे स्तोत्र कोणत्या राजाला उल्लेखून आहे? येशू ख्रिस्ताला! स्तोत्रसंहिता ४५:७ चे अवतरण घेऊन इब्रीयांस १:९ ते त्याला लागू करते. तेथे वाचण्यात येतेः “तुला न्यायाची आवड व अधर्माचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरुपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.” या कारणामुळे वैभवी येशू ख्रिस्ताच्या बाबतीत स्तोत्रसंहिता ४५:१६ म्हणजेः “तुझ्या वडीलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील; तू सर्व पृथ्वीवर त्यांस अधिपति करशील.”
१७. राजा येशू ख्रिस्त आता खासपणे कशाविषयी व कोणासंबंधाने आस्था राखील?
१७ खरे पाहता, येशूला आता, त्याच्या पूर्वीच्या पृथ्वीवरील जीवनापेक्षा राज्य करणारा राजा या अर्थाने आस्था वाटते. अर्थात, तो भूतकाळ विसरलेला नाही. तसेच त्याचे सर्व वाडवडील, ज्यांचेविषयी यहोवाने हे भाकित केले होते की, अब्राहामाच्या संतानाद्वारे तो सर्व कुटुंबांना आशीर्वादित करणार हेही तो विसरला नाही. पण आता त्याचे मुख्य लक्ष्य, त्याला राजा म्हणून अधिष्ठित करणाऱ्या यहोवा देवाने जो उद्देश राखलेला आहे त्याकडे आहे. यामुळे येशूची पृथ्वीवरील मुले, खासपणे ज्यांना त्याच्या वर्चस्वाखाली सेवा करण्यासाठी राजपुत्राचे पद बहाल करण्यात आले आहे ते पुत्र आता त्याच्या पृथ्वीवरील वाडवडीलांपेक्षा त्याच्या आस्थेचे लक्ष्य राहतील.
१८. येशूची आस्था आपल्या पार्थिव वाडवडीलांपेक्षा आपल्या राजपुत्र मुलांत आहे हे स्तोत्रसंहिता ४५:१६ ची विविध भाषांतरे कसे दाखवितात?
१८ आपल्या वाडवडीलांपेक्षा आपल्या राजपुत्रांकडे येशूची असलेली आस्था वेगवेगळ्या भाषांतरामध्ये जोर देऊन सांगण्यात आली आहे. काही भाषांतरे स्तोत्रसंहिता ४५:१६ कसे सादर करतात ते पहाः “तुझी मुले तुझ्या वडीलांच्या जागी पाऊल टाकतील व ती सर्व देशभर राजपुत्र बनतील.” (मोफॅट) “तुझ्या वडीलांच्या जागा तुझ्या मुलांना मिळतील; तू या सर्वांना देशात राजपुत्र करशील.” (वचन १७, द न्यू अमेरिकन बायबल) “तुझ्या वडीलांच्या ठिकाणी तुला मुले जन्मतीलः तू यांना सर्व पृथ्वीवर राजपुत्र बनवशील.”—द सेप्ट्युजंट व्हर्शन, सॅम्युअल बॅगस्टर ॲण्ड सन्सकरवी प्रकाशित करण्यात आलेले.
१९. मोठ्या लोकसमुदायाच्या काही पुरुषांना आज मंडळीत कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, आणि राजा येशू ख्रिस्त यांना आपल्या हजार वर्षांच्या राजवटीत कोणत्या पदी नियुक्त करील?
१९ हे भावी राजपुत्र आज आपल्यामध्ये आहेत याचा आम्हाला मोठा आनंद वाटतो. ते उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्ताची वाणी ऐकणाऱ्या दुसरी मेंढरे वर्गातील आहेत. जेव्हा प्रकटीकरण ७:९-१७ वचनाचे स्पष्टीकरण यहोवाच्या साक्षीदारांच्या वॉशिंग्टन डी. सी. येथील अधिवेशनात प्रगट करण्यात आले त्या १९३५ वर्षापासून ते त्याची वाणी ऐकत आले आहेत. आज, या मोठ्या लोकसमुदायातील हजारो, जगभरात २१२ देशात यहोवाच्या साक्षीदारांच्या ५७,६७० मंडळ्यातून वडील किंवा देखरेख या नात्याने सेवा करीत आहेत. येशूचे अद्याप पृथ्वीवर असणारे आध्यात्मिक बांधव यांजसोबत संघटीत राहिल्यामुळे या पुरुषांना वाग्दत्त अशा नव्या पृथ्वीत येशू ख्रिस्त या राजाचे पृथ्वीवरील पुत्र या अर्थाने बहुमानित होण्याची संधि मिळेल. (२ पेत्र ३:१३) यामुळे ते नवीन पृथ्वीत राजपुत्र या नात्याने नियुक्त करण्यात येतील.
२०. (अ) राजाला आपल्या पृथ्वीवरील नियुक्त लोकांसंबंधाने काय वाटेल? (ब) मोठा लोकसमुदाय कोणाचे स्वागत करील, जे परतणार त्यांच्यासमोर कोणती संधि असेल?
२० या नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या राजपुत्रांविषयी राजा येशू ख्रिस्त संतुष्ट राहील. आजही तो यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यातून देखरेखीचे काम विश्वासूपणे करणाऱ्या दुसरी मेंढरे वर्गाच्या लोकांना आपली मान्यता दर्शवून आहे. दुसरी मेंढरे वर्गाच्या मोठ्या लोकसमुदायातील सर्व स्त्री व पुरुष सदस्यांपुढे मृतातून पुनरुत्थान पावणाऱ्यांचे स्वागत करण्याची संधि उभी आहे. हे मृत येशूची वाणी ऐकतील व शुद्ध करण्यात आलेल्या आणि जगव्याप्तपणे नंदनवनात परिवर्तित झालेल्या या पृथ्वीवर परिपूर्ण मानवी जीवन सर्वकालपणे उपभोगण्याची संधि मिळवतील. (योहान ५:२८, २९) ज्यांना पुनरुत्थान होण्याची ही उच्च कृपा लाभलेली आहे त्यामध्ये, ज्यांनी आपल्याला “अधिक चांगले पुनरुत्थान” मिळेल या आशेने यहोवा देवास आपली निष्ठा मरणापावेतो दाखवून विश्वासू असल्याचे सिद्ध केले ते येशू ख्रिस्ताचे उद्धारित वाडवडील असतील. (इब्रीयांस ११:३५) तथापि, उद्धारक राजा येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत परिपूर्ण मानवी जीवनापर्यंत उंचावण्यात आलेली ही स्थिती नुसती सुरवात असेल. या हजार वर्षांच्या शेवटी पुनर्स्थापित मानवजातीवर जी शेवटली परिक्षा गुदरेल त्यामध्ये यहोवा देवाच्या वर्चस्वाखाली अतूटपणे संघटीत आहोत हे शाबीत झाल्यावर त्यांना, यहोवाच्या सार्वत्रिक संघटनेच्या पार्थिव भागातील नंदनवनात अनंतकालिक जीवनास पात्र आहे असा बहुमान प्रदान केला जाईल.—मत्तय २५:३१-४६; प्रकटीकरण २०:१–२१:१.
[तळटीपा]
a पडताळा २ शमुवेल ८:१८, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ यहोवाने सर्व मानवजातीस आशीर्वादित करण्यासाठी कोणता कालावधी ठेवला आहे?
◻ एकमेकांसोबतच्या कोणत्या नातेसंबंधात टिकून राहिल्यामुळे आम्हाला मोठे संकट पार करता येईल?
◻ ‘जगाच्या स्थापनेपासून जे राज्य सिद्ध करुन ठेवण्यात आले आहे ते वतन करून घ्या,’ या आमंत्रणाचा मेंढरासाठी काय अर्थ होतो?
◻ हजार वर्षीय राजवटीत मोठ्या लोकसमुदायाला कोणकोणत्या हक्कात सहभागी होण्याची संधि मिळेल?