भावी हजार वर्षांसाठी आत्ताच संघटीत होणे
“ते . . . त्याजबरोबर हजार वर्षे राज्य करतील.”—प्रकटीकरण २०:६.
१. आजपासून हजार वर्षांनी या पृथ्वीवरील परिस्थिती कशी असेल?
काय? आम्हाला असे म्हणायचे आहे का की, आतापासून हजार वर्षांनंतर मानवजात या पृथ्वीवर जिवंत असेल? होय, आम्हाला तेच म्हणायचे आहे! शिवाय अधिक ते हे की, सबंध मानवजात ही त्यावेळी शरीर, अंतःकरण व मन यामध्ये, या ग्रहावर मानवाची सुरवात झाली तेव्हा आदाम व हव्वा ज्या स्थितीत होते त्यासारखीच परिपूर्ण असेल. होय, आतापासून हजार वर्षांनंतर मानव त्याचा देव व पुनर्स्थापक याचे प्रतिरुप व सदृश्यता यानुरुप असेल. (उत्पत्ती १:२६-३०) शुद्ध झालेल्या या पृथ्वीवर ते “एदेन बाग,” सुखलोकाचे नंदनवन यामध्ये जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगीत असतील. त्यावेळी ही पृथ्वी मानवी संततीने ओतप्रोत भरून वाहणार नाही. (उत्पत्ती २:१५) हे सर्व निर्मात्याचा पृथ्वी व तिजवर राहणाऱ्या लोकांविषयी जो मूळ उद्देश होता त्याच्या पूर्णतेस अनुसरुन असेल. या सुंदर अशा पूर्णता, तो निर्माता सबंध मानवजातीस आशीर्वादित करण्याच्या आपल्या प्रेमळ उद्देशाच्या बाबतीत विश्वासू राहिला आहे व सर्व अडचणी आल्या तरी ते त्याने पूर्ण करून दाखविले असे त्याचे गौरव करील.
२. परिपूर्ण मानवजात कशी असेल त्याचे चित्र सुमारे १९ शतकांआधी काही लोकांना कसे दिसले?
२ ही आशीर्वादित साध्यता देवाच्या वैभवी पुत्राकरवीच्या हजारवर्षीय राज्यकिर्दीचा कळस ठरणार. सुमारे १९ शतकांआधी हा देवाचा पुत्र या पृथ्वीवर परिपूर्ण मनुष्य असा ३३१/२ वर्षे होता. त्यावेळी त्याचे जे स्वरुप होते त्याविषयी आम्ही असे वाचतोः “शब्द देही झाला, आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते.” (योहान १:१४) अशाप्रकारे, इस्राएल लोकांनी येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्ण मानव कसा असतो ते पाहिले. (लूक ३:२३, ३८) होय, १९ शतकांआधी काही लोकांनी, पृथ्वीवरील भावी नंदनवनात परिपूर्ण मानवजात कशी असेल ते बघितले.
३, ४. (अ) येशू ख्रिस्त व १,४४,००० मार्फत चालविली जाणारी यहोवाची राज्यकीर्द प्रत्यक्षात किती काळाची असेल? (ब) त्या कालावधीसाठी कोणती संज्ञा वापरण्यात आली आहे, आणि हे वॉचटावर संस्थेच्या काही प्रकाशनात कसे प्रवर्तित झाले?
३ येशू ख्रिस्त व त्याचे १,४४,००० वैभवी शिष्यांकरवीच्या यहोवाच्या राज्याच्या कारकिर्दीचा काळ एक हजार वर्षांचा असेल असे भाकित करण्यात आले. या हजार वर्षीय राजवटीविषयी वृद्ध प्रेषित योहान याने लिहिलेः “मी आसने पाहिली, त्यावर कोणी बसले होते; त्यांस न्यायनिवाडा करावयाचा अधिकार दिला होता. आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनांमुळे ज्यांच्या शिरच्छेद झाला होता, ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमस्कार घातला नव्हता आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण घेतली नव्हती त्यांचे जीव पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर हजार वर्षे राज्य केले. (मृतांपैकी बाकीचे लोक ती हजार वर्षे पूर्ण होत तोपर्यंत जिवंत झाले नाहीत.) हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याजबरोबर हजार वर्षे राज्य करतील.”—प्रकटीकरण २०:४-६.
४ या हजार वर्षांना ख्रिस्ताची हजार वर्षांची राजवट असे म्हणण्यात आले आहे. या पवित्र शास्त्रीय तत्त्वाचा जे स्विकार करतात व शिक्षण देतात अशांना, ग्रीक भाषेत “हजार” यासाठी जो शब्द आहे त्यानुसार मिलेनरीयन्स किंवा चिलियास्ट असे म्हणण्यात येते. स्टडीज इन द स्क्रिपचर्स या (वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीतर्फे एकेकाळी प्रकाशित करण्यात आलेल्या) खंडास आरंभाला मिलेनियल डॉन असे संबोधण्यात येत होते. तसेच एकेकाळी जे गायनाचे पुस्तक आंतरराष्ट्रीय पवित्र शास्त्र विद्यार्थी वापरीत त्याला हिम्स ऑफ द मिलेनियल डॉन असे म्हणत.
५. ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राज्यकिर्दीत दियाबल सैतान व दुरात्मे यांची कशी स्थिती असेल?
५ प्रकटीकरण २०:४ मध्ये वापरण्यात आलेली “हजार वर्षे” ही संज्ञा लाक्षणिक नव्हे तर ती सौर हजार वर्षांना अनुलक्षून आहे. या हजार वर्षांमध्ये दियाबल सैतान व त्याचा दुरात्मा समूह अगाधकूपात असेल, कारण ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राज्यकिर्दीचे जे वर्णन आहे त्याच्या आधीच प्रेषित योहानाने म्हटलेः “मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अगाधकूपाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे अजगर त्यास धरिले. हजार वर्षे बांधलेले राहण्यासाठी त्याला बांधून अगाधकूपात टाकिले. आणि हजार वर्षे पूर्ण होत तोपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरुन बंद करून त्यावर शिक्का मारिला; त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडिले पाहिजे.”—प्रकटीकरण २०:१-३.
६. (अ) ख्रिस्ताच्या हजार वर्षीय कारकिर्दीच्या समाप्तीची कोणती तारीख काही रोमन कॅथोलिक लोकांनी दिली आहे? (ब) हा कॅथोलिकांचा दावा खरा आहे तर मग सैतानाला खाचेतून काढून आता किती काळ झालेला आहे?
६ काही रोमन कॅथोलिक लोकांचे असे म्हणणे आहे की, येशू ख्रिस्ताची हजार वर्षांची कारकीर्द १७९९ मध्ये संपली कारण यावेळी फ्रेंच सैन्याने रोम शहर जिंकले, पोपला राज्यपदावरून दूर केले आणि त्यांना कैदी म्हणून फ्रान्सला नेण्यात आले व येथेच त्यांचा मृत्यु घडला. कॅथोलिक पाळकांनी असे म्हटले की, यानंतर सैतान व त्याच्या दुरात्म्यांना “खाचेतून” किंवा “अगाधकूपातून” सोडण्यात आले ते अशासाठी की त्यांनी “थोडा वेळ” आपल्या फसव्या कृत्यांना पुनः उजाळा द्यावा. (प्रकटीकरण २०:१-३, कॅथोलिकांचे डुए व्हर्शन) जर हे खरे आहे तर याचा हा अर्थ होतो की, तो “थोडा काळ” होऊन आता १९१ वर्षे झाली आहेत व भविष्यात तो कधी संपेल ते दृष्टीपथात दिसत नाही.
७. येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यकिर्दीचा काळ व त्यातील परिस्थिती याविषयी पवित्र शास्त्र काय सूचित करते?
७ तथापि, शास्त्रवचनांच्या अनुषंगाने पाहिल्यास, येशू ख्रिस्ताची खरी हजारवर्षीय राजवट अद्याप भावी काळात आहे. पवित्र शास्त्राच्या भविष्यवादांची सध्याच्या काळातील पूर्णता दाखविते की तो काळ अगदी जवळ आला आहे. खऱ्या हजार वर्षांत सैतान व त्याच्या दुरात्म्यांना खरेपणाने अगाधकूपात डांबण्यात येईल आणि येशू ख्रिस्त व त्याच्या १,४४,००० सहवारीसांना दियाबलाच्या संस्थेचा कसलाही अडथळा न राहता मानवजातीवर राज्य करता येईल. यहोवा देवाने आपला “मित्र” अब्राहाम याजशी केलेल्या करारास अनुलक्षून मुक्तता पावलेल्या सबंध मानवजातीवरील सार्वकालिक आशीर्वादांची सुरवात “मोठा लोकसमुदाय” यांच्याकडून होईल. हे, सध्याचे दुष्ट व्यवस्थीकरण ज्यात नष्ट होईल त्या अतुलनीय “संकट” यातून बचावतील. राज्याचे आशीर्वाद “कोकऱ्याच्या [येशू ख्रिस्त] रक्ताद्वारे” खंडणी मिळणाऱ्या करोडो मृत लोकांपर्यंत पोहोचतील. (याकोब २:२१-२३; प्रकटीकरण ७:१-१७; उत्पत्ती १२:३; २२:१५-१८; मत्त २४:२१, २२) यासाठीच यांना त्यांच्या स्मृती कबरेतील मृत्युच्या झोपेतून पुनरुत्थित करण्यात येईल व ते पृथ्वीवर जीवन उपभोगतील.—योहान ५:२८, २९.
ख्रिस्ती संघटना
८. द न्यू क्रिएशन या पुस्तकाने कोणत्या संघटनेविषयीची माहिती दिली, पण कोणत्या संघटनात्मक कार्याविषयीचा पूर्वदृष्टांत त्याने सादर केला नाही?
८ ईश्वरी उद्देशांच्या पूर्णतेला अनुसरुन या आशीर्वादांच्या कित्येक शतके आधी एक नवी संघटना उदयास आली. या संघटनेविषयी आम्ही वाचतोः “जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे.” “सुंता ही काही नाही व बेसुंता हीही काही नाही तर नवी उत्पत्ती [नवा प्राणी, किंग जेम्स व्हर्शन] हिचीच कायती योग्यता आहे.” (२ करिंथकर ५:१७; गलतीकर ६:१५) मागे १९०४ मध्ये द न्यू क्रिएशन या पुस्तकात पहिल्या शतकात उदयास आलेल्या या नव्या संघटनेकडे लक्ष वेधवण्यात आले. (स्टडीज इन द स्क्रिपचर्स, भाग ६, अध्याय ५, शीर्षक “नव्या उत्पत्तीची संघटना”) विदेश्यांचा काळ १९१४ मध्ये संपणार याविषयी तेव्हा जी समज होती तिला अनुसरुन त्या पुस्तकात, मानवी इतिहासातील पहिल्या जागतिक युद्धानंतरच्या मोडकळलेल्या परिस्थितीत जे अप्रतिम संघटनेचे कार्य होणार होते त्याचा पूर्वदृष्टांत सांगितला गेला नाही.—लूक २१:२४, के.जे.
९. नव्या उत्पत्तीचे शेष कोणत्या प्रसंगाला सामोरे गेले?
९ पहिले जागतिक महायुद्ध १९१८ मध्ये संपेपर्यंत आध्यात्मिक नव्या उत्पत्तीतील शेषांचे संरक्षण आणि १९१९ मध्ये त्यांचे शरीरात जिवंतपणे बचावणे या गोष्टी मोठ्या आश्चर्यकारक रितीने घडल्या. पण तोपर्यंत हजार वर्षीय परिस्थिती आली नव्हती. या कारणास्तव नव्या उत्पत्तीच्या शेषांना, त्यांची येशू ख्रिस्तासमवेत हजार वर्षे राज्यकिर्दीत सहभाग घेण्याची स्वर्गीय आशा पूर्ण होण्याआधी या पृथ्वीवर अधिक काम उरकणे आहे हे स्पष्ट झाले. याकरताच, शेषांचे सचेतन राहणे व संघटन उभारण्याची मोठी गरज प्रस्तुत झाली. अशाप्रकारे, जे भव्य काम समोर उभे राहिले होते त्याच्या पूर्तिसाठी ते अचल विश्वासाने सामोरे गेले.
१०. नव्या व्यवस्थीकरणात लाखोंनी बचावून जाणाऱ्यांच्या बाबतीत कोणते प्रश्न सामोरे आले?
१० या अभिषिक्त शेषांनी सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या भयंकर नाशातून मानवजातीतील काहींचा बचाव व त्यांचे येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीत प्रवेश करणे हे अपेक्षिले होते. हे खासपणे, “सध्या जिवंत असणारे लाखो कधीच मरणार नाहीत,” या १९१८ च्या युद्धवर्षात कॅलिफोर्नियातील लॉस एंजल्स येथे दिलेल्या जाहीर भाषणानंतर अधिक सुव्यक्त झाले. हर्मगिद्दोनातून बचावणाऱ्यांना या भावी लाखो लोकांचे संघटन होणार होते का? (प्रकटीकरण १६:१४-१६) त्या हजार वर्षीय राज्यकिर्दीत प्रवेश मिळवून “नवी पृथ्वी” हिचे भाग बनण्याआधी यांना शेषांसोबत राज्य-प्रचारात सहभाग घ्यावा लागणार होता का? (२ पेत्र ३:१३) या सर्व प्रश्नांची उत्तरे युद्धानंतरच्या घडामोडीत मिळणार होती.
११. (अ) दुसरी मेंढरे यांना शेषांसमवेत एक कळप व्हावयाचे आहे तर मग काय केले जाण्यास हवे होते? (ब) आशा जरी वेगवेगळी असली तरीही शेष व दुसरी मेंढरे यात विभाजन होण्याचे काही कारण का नव्हते?
११ उत्तम मेंढपाळ, येशू ख्रिस्ताचे हे पुढील शब्द योग्य वेळी सामोरे आलेः “या मेंढवाड्यातील नव्हत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.” (योहान १०:१६) १९१९ मध्ये युद्धानंतर घडणाऱ्या कामासाठी अभिषिक्त शेषांचे संघटन व्हावयाचे होते आणि जर दुसरी मेंढरे यांना शेषांसोबत या कळपात नंतर एक कळप असे व्हावयाचे होते तर मग काय? त्या दुसऱ्या मेंढरांनाही शेषांच्या सोबतीत संघटीत केले जाणार होते! दुसरी मेंढरे यांना जरी वेगळी आशा आहे, म्हणजे पृथ्वीवरील सुखावह नंदनवनात जीवन जगण्याची आशा, तरीपण यामुळे यांच्यात व शेषात दुफळी होण्याचे काहीही कारण नव्हते. कारण सर्वजण एकाच मेंढपाळास अनुसरणार होते आणि देवाच्या राज्यात अभिषिक्त शेषांना वैभव मिळेपर्यंत या दोन गटात विभाजन होणार नव्हते.
१२. (अ) मानवजातीच्या तारणापेक्षा अधिक महत्त्वाचे ते काय आहे? (ब) राज्याची जाहिरात करण्याचे महत्त्व केव्हा व का कळाले?
१२ मानवाचे पाप व मृत्युपासून तारण घडावे, सैतानी जगतातील अधिपत्याचा नाश व्हावा आणि पृथ्वीवरील पुनर्स्थापित नंदनवनात आज्ञाधारक मानवांचे पुनर्वसन व्हावे या यहोवाच्या प्रेमळ उद्देशातील उल्लेखनीय गोष्टी होत. तथापि, आणखी एक गोष्ट अशी आहे की सर्व विश्वामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. ती कोणती? ती, यहोवा देवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाचा गौरव व त्याच्या पवित्र नामाचा गौरव ही आहे. राजा येशू ख्रिस्तामार्फत चालविल्या जाणाऱ्या या यहोवाच्या राज्याची समयोचित जाहीर घोषणा व्हावी याविषयी १९२२ मध्ये सीडर पॉईंट, ओहायो येथील आंतरराष्ट्रीय पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या अधिवेशनात भर देण्यात आला. वास्तविकपणे, विदेश्यांचे काळ १९१४ मध्येच संपले होते तेव्हा येशूने उद्गारलेल्या भविष्यवादित शब्दांची पूर्णता करण्याचा तो उचित काळ होताः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) जे राज्य यहोवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाचा तसेच त्याच्या पवित्र नामाचा गौरव करणार होते ते स्वर्गात १९१४ मध्ये स्थापण्यात आले होते आणि येशू ख्रिस्त आपल्या शत्रूंमध्ये राज्य करीत होता. यामुळेच उपलब्ध असणाऱ्या सर्व माध्यमांकरवी राजा व त्याचे राज्य याची घोषणा वदविण्यासाठी त्या भव्य सुवार्तेचा प्रचार होणे जरूरीचे होते.
१३. राज्याची घोषणा होण्याच्या कामासाठी देवाने काय पुरविले व का?
१३ यहोवा हा सर्वसमर्थ व सर्वोच्च असल्यामुळे तो सबंध विश्वात उत्तम संघटक आहे. त्याने आपल्या संघटनात्मक कार्याकरवी हे पाहिले की, येथे या पृथ्वीवर सध्याचे व्यवस्थीकरण संपुष्टात येण्याआधी त्याच्या राज्याची आंतरराष्ट्रीयपणे घोषणा केली गेली पाहिजे. यासाठी, अभिषिक्त जनांपैकी बचावलेल्या शेषांना त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेत एकवटण्यात आले. सैतानाने यहोवाच्या विश्वव्यापी सार्वभौमतेला आव्हान दिलेले असल्यामुळे यांनी सर्व जगाला या सार्वभौमतेचा खरेपणा व हक्क याविषयी घोषणा करून त्याचे गौरव व समर्थन सदासर्वकाळाकरता केले पाहिजे.
हजार वर्षीय कारकिर्दीच्या पूर्वीची संघटना
१४. (अ) आमच्या समान शकाच्या आधी कोणती संघटना यहोवाच्या सार्वत्रिक संघटनेचा पार्थिव भाग बनली? (ब) दावीद उत्तम संघटक असल्याचे कसे सिद्ध झाले?
१४ आमच्या समान शकाच्या १५ शतकांआधी या पृथ्वीवर यहोवा देवाची दृश्य संघटना होती. पवित्र शास्त्र इतिहासातील पहिले जागतिक साम्राज्य मिसर यामधून इस्राएल लोकांची सुटका केल्यावर त्याने मोशेच्या मध्यस्तीकरवी यांना एका राष्ट्रात संघटीत केले. मोशेकरवीच्या नियमशास्त्राखाली इस्राएल यहोवाच्या सार्वत्रिक संघटनेचा दृश्य भाग बनले. देवाच्या या निवडलेल्या लोकात उल्लेखनीय असा संघटक मेंढपाळ-राजा दावीद होता. त्याच्याविषयी आपण वाचतोः “लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी यांच्या कुळाप्रमाणे दाविदाने [यहोवाच्या निवासमंडपात सेवा करण्यासाठी लेव्यांचे] वर्ग संघटीत केले.” त्याने “त्यांची [याजकांची] चिठ्ठया टाकून वाटणी करून संघटीत केले, कारण पवित्र स्थानाचा अधिकार व देवाकडची सरदारी एलाजार व इथामार या दोन्ही वंशा. . .कडे होती.”—१ इतिहास २३:३, ६; २४:१, ५, द न्यू इंग्लिश बायबल.
१५. (अ) इस्राएली लोक मिसरातून कशा पद्धतीने बाहेर पडले? (ब) कोणीही मिसरातून निघण्याचे पसंद केले आणि ते इस्राएलांसोबत राहिले का?
१५ दावीदाच्या काळाच्या शेकडो वर्षे आधी जेव्हा इस्राएल मिसरातून बाहेर पडले तेव्हा ते वेड्यासारखे कसेही बाहेर पडले नाहीत; ते व्यवस्थित रितीने बाहेर निघाले. यामुळे त्यांचा मध्यस्त मोशे याच्याठायीही संघटन बनविण्याचे उत्तम ज्ञान होते हे दिसते. इस्राएलांसोबत, इस्राएल नसणाऱ्या मिसरी लोकांचा मोठा जमाव बाहेर पडला. यांनी हे ओळखले की, यहोवा सर्व मिसरी दैवतांपेक्षा श्रेष्ठ असून तो अद्भूत चमत्कार घडविणारा देव आहे व यामुळेच त्यांनी यहोवाच्या लोकांसोबत स्वतःला देऊ केले. कालांतराने पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागले तरीही या “मिश्र समुदाय” याने यहोवाच्या निवडलेल्या लोकांसोबत सख्य राखून सिनायच्या प्रचंड अरण्यातही साथ दिली. (निर्गम १२:३७-५१; गणना ११:४) मोशेचा वारस यहोशवा याच्या नेतृत्वाखाली इस्राएलांसोबत हा मिश्र समुदाय देखील वचनयुक्त देशात गेला हे स्पष्ट आहे, कारण अशा परदेशीयांची तरतूद व्हावी अशी देवाने आज्ञा केली होती.
१६. (अ) तो मिश्र समुदाय कोणाचे प्रतिरुप आहे? (ब) या व्यवस्थीकरणाच्या नाशातून पार होण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे?
१६ फारोचा अमल असणाऱ्या मिसरातील तो मिश्र समुदाय आजच्या २० व्या शतकातील मोठ्या लोकसमुदायाची प्रतिमा आहे. हे आध्यात्मिक इस्राएल नसून उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्ताची दुसरी मेंढरे आहेत. हे आध्यात्मिक शेषांसोबत मिळून प्रतिनमुनेदार मिसर म्हणजे या जगाचे व्यवस्थीकरण, जे थोर फारो दियाबल सैतानाच्या वर्चस्वाखाली आहे व ज्याचा तो देव आहे, त्यामधून पूर्णपणे मुक्त होण्याचे पहात आहेत. (योहान १०:१६; २ करिंथकर ४:४; प्रकटीकरण ७:९) पण सैतानाच्या जुन्या जगाच्या हिंसाचारी नाशातून वाचण्यासाठी आणि थोर यहोशवा येशू ख्रिस्त याच्या वर्चस्वाखालील वाग्दत्त अशा नव्या जगात जाण्यासाठी यांनी काय करण्यास हवे? (२ पेत्र ३:१३) त्यांनी यहोवाच्या दृश्य संस्थेचा केंद्रभाग असणाऱ्या अभिषिक्त शेषांसोबत संघटनात्मक व्यवस्थेमध्ये स्वतःला बद्ध ठेवण्यास हवे.
१७. या विस्कळीत जगात मोठ्या लोकसमुदायाचे भाग असणारे लोक कोणती हालचाल करीत आहेत आणि ते कशाकडे आपले लक्ष लावून आहेत?
१७ या २०व्या शतकाच्या चौथ्या दशकापासून खासपणे दुसरी मेंढरे याच्या मोठ्या लोकसमुदायाला राज्य करणारा राजा व एकच मेंढपाळ येशू ख्रिस्त याच्या संघटीत अशा एकाच कळपात आणण्यात आले. जगात संयुक्त राष्ट्र संघ असताना हे जग अधिकाधिक विस्कळीत बनत चालले आहे; तरीपण मोठ्या लोकसमुदायाचे लोक पूर्ण अंतःकरणाने अभिषिक्त शेषांना आपले पाठबळ देत आहेत व याकरवी ते यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या एकत्रीकरणाच्या सामर्थ्याचा पुरावा प्रस्तुत करीत आहेत. शेषांसोबत संघटीत राहण्याचा निर्धार राखून ते मोठ्या आशेने येशू ख्रिस्ताच्या हजारवर्षीय कारकिर्दीत या पृथ्वीवर त्याची खास सेवा करण्याकडे आपले लक्ष लावून आहेत.
तुमचे विचार काय आहेत?
◻ येशू ख्रिस्ताचा हजार वर्षीय राजवटीचा काळ व परिस्थितीविषयी शास्त्रवचने काय सूचित करतात?
◻ मानवजातीचे तारण होण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे ते काय आहे?
◻ आमच्या समान शकाच्या आधी कोणती संघटना यहोवाच्या सार्वत्रिक संघटनेचा पार्थिव भाग बनली?
◻ मिश्र समुदायाचे प्रतिरुप असणारे बचावून हजार वर्षीय राज्यकिर्दीत कसे जातील?