वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ९/१ पृ. २७-३०
  • सामर्थ्यशाली बाबेल—तिसरी बलाढ्य जागतिक सत्ता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सामर्थ्यशाली बाबेल—तिसरी बलाढ्य जागतिक सत्ता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • नबुखद्‌नेस्सराच्या काळातील बाबेल
  • बाबेली लोकांचा धर्म
  • बाबेल यरुशलेम काबीज करते
  • नबुखद्‌नेस्सराच्या स्वप्नातील पुतळा
  • बाबेलची उध्वस्तता पूर्वभाकित
  • बाबेल पडते!
  • यहोवाचे भविष्यवाद पूर्ण झाले
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ९/१ पृ. २७-३०

सामर्थ्यशाली बाबेल—तिसरी बलाढ्य जागतिक सत्ता

प्राचीन बाबेल नबुखद्‌नेस्सरच्या अधिपत्याखाली कळसास पोहंचले, तिने आपले धर्म सबंध जगात पसरविले, पण एका रात्रीत तिला काबीज करण्यात आले. या नगरीबद्दलची अधिक माहिती मिळविण्यामुळे पवित्र शास्त्राच्या अचूकतेबद्दलच्या खात्रीत तसेच त्यातील भविष्यवादांच्या बिनचूक पूर्णतेच्या विश्‍वासातही अधिक भर पडेल.

सामर्थ्यशाली बाबेल आपल्या बादशाही थाटात दक्षिण मेसोपोटेमियातील इफ्रात नदीवर विराजमान होती. ती “राष्ट्रांचा (राज्यांचा) मुकुटमणी” होती. एक धार्मिक, व्यापारी व लष्करी केंद्र होती. (यशया १३:१९) तिच्याजवळ ऐश्‍वर्य, भव्य इमारती, तसेच जगप्रसिद्ध उद्याने होती. तिच्या काळातील ती जागतिक सत्ता होती!

एवढे असताही, यहोवाचा संदेष्टा यिर्मया याला असे लिहिण्यास प्रेरित केले गेले कीः “बाबेल, नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय व उपहास यांचा विषय आणि निर्जन स्थळ असे होईल.”—यिर्मया ५१:३७.

एवढे बलाढ्य शहर पूर्णपणे धुळीस मिळेल? असे कधी घडेल अशी कोणी कधी कल्पना तरी करेल का? तरी, एकेकाळी अभिमानी असणारे बाबेल आज केवळ नासाडीच्या मातीचे ढीग, बगदाद शहराच्या दक्षिणेस ५० मैलावर इराकच्या दक्षिणेस पडून आहे. तिचा अधःपात का झाला?

जगातील अति प्राचीन काळीतील शहरांपैकी हे बाबेल नोहाचा पणतू निम्रोद, जो यहोवाच्या विरुद्धतेतील बलवान पारधी होता, त्याने वसविले होते. (उत्पत्ती १०:८-१०) तरी आम्ही विचारात घेणार आहोत तो काळ निम्रोदच्या दिवसानंतर बऱ्‍याच काळाने आला. तो, मिसर व अश्‍शुर या दोन्ही जागतिक सत्तांच्या काळानंतर आला.

नबुखद्‌नेस्सराच्या काळातील बाबेल

सुमारे २,६०० वर्षे आधी, इ.स.पूर्वी ६३२ मध्ये बाबेलच्या खास्द्यांनी व त्याच्या मित्रराष्ट्रांनी अश्‍शुरचा पाडाव केला.a अश्‍शुरच्या जागी बाबेल आले व ते पवित्र शास्त्र इतिहासातील तिसरे बलाढ्य जागतिक साम्राज्य बनले.

नबुखद्‌नेस्सर, ज्याने या नवीन-बाबेली किंवा नवनीत बाबेली साम्राज्याचे सिंहासन आपणाकडे घेतले तो केवळ विजेताच नव्हता तर शहराची उभारणी करणारा होता. बाबेलच्या भक्कम वेशी व नामांकित इमारती उभारण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता असे म्हणता येऊ शकते. अशा असंख्य विटा सापडल्या ज्यांच्यावर “नबुखद्‌नेस्सर” हे नाव कोरलेले होते, शिवाय पवित्र शास्त्रातील यिर्मया व दानीएल या दोन पुस्तकात कितीतरी वेळा या नावाचा उल्लेख आहे. पवित्र शास्त्र याच नबुखद्‌नेस्सराविषयी सांगताना म्हणते की, यानेच असे गर्वाने म्हटले होते की, “हे थोर बाबेल नगर . . . मी बांधले आहे ना?”—दानीएल ४:३०.

दोन भक्कम अवाढव्य भिंती व या भिंतीमध्ये पक्की सडक अशा स्थितीत बाबेल शहर वेढले होते. दोन्हींची मिळून ८० फुटांची जाडी होती. या वेशीबाहेर ६५ ते २६० फूट रुंदीचे खंदक होते, ज्यात भरलेल्या पाण्यात सर्व प्रकारच्या नावा चालविल्या जात.

उत्तरेकडून आलेला राजमार्ग, ४० फूट उंचीवर उभारलेल्या इश्‍तारवेशीतून सरळ शहरातील शस्त्र आगाराकडे, संचलनाच्या विस्तीर्ण मार्गावरुन पुढे जाई. इश्‍तार वेशीच्या आतल्या बाजूस उजव्या हातावर नबुखद्‌नेस्सराचा महाल होता. त्यातील भव्य सिंहासनसज्जा ५५ फूट रुंद व १७० फूट लांबीचा होता. त्याजप्रत जाणाऱ्‍या मार्गावरील वेस आणि भिंती, रंगीबेरंगी व चकाकणाऱ्‍या विटांनी बांधलेल्या होत्या व त्यावर सिंह, बैल व अग्निवर्ण सर्प यांच्या चित्रांनी व कलाकुसरीच्या कामांनी भूषविलेल्या होत्या. त्यांच्यापैकी एक सिंह पॅरीसमधील लॉव्हरी पुराणवस्तु संग्रहालयात पाहण्यास मिळू शकेल.

बाबेली लोकांचा धर्म

बाबेल, हे जे त्या नगराचे नाव, त्याचा अर्थ “गोंधळ” असा होतो, तरी सुमेरीयन आणि अक्काडी भाषेतील या नावाचा अर्थ “देवाचा दरवाजा” असा होतो. दोन्ही अर्थ बाबेलास त्याच्या धर्मासोबत जोडतो. काही प्रामाण्य असा विश्‍वास बाळगून होते की, बाबेलचा मार्दूक (पवित्र शास्त्रातील मेरोदाख) तो कदाचित देवासमानचा निम्रोद असावा. बाबेली धर्म अनेक प्रकारातील त्रैक्य देवतांनाही मान्यता देऊन होते. त्यांच्यापैकी एक, पापाचा (चंद्रदेव), शमास (सूर्यदेव) आणि इश्‍तार (प्रेमाची व सुपीकतेची देवता) यांचा संच होता.

खगोलशास्त्राचे येथे फार स्तोम माजलेले होते. बाबेलच्या लोकांनी त्यांच्या पाच प्रसिद्ध दैवतांना ज्ञात ग्रहांची नावे दिली होती. एका आधुनिक ऐतिहासिक लिखाणात म्हटले आहेः “आम्ही जरी या ग्रहांना रोमी नावांनी संबोधीत असलो तरी रोमी लोकांनी काही बाबेली संज्ञा जोपासल्या व रोमी भाषेत केवळ त्यांच्या अर्थास जुळेल अशा शब्दात भाषांतरीत करुन ते वापरले. याच अर्थी इश्‍तार नामे ग्रहदेवता, प्रेमदेवता व्हिनस बनली आणि मार्दूक नामे दैवत बदलून ज्यूपिटर बनले.b “कॅलडीयन” (किंवा खास्दी) हे नाव बाबेलचे लोक वापरीत असता “खगोल शास्त्रज्ञ” या नावाशी निगडीत होऊन ते समांतरीतपणे वापरात आले.

पवित्र शास्त्र सांगते की, बाबेल हा “कोरीव मूर्तीं” व “पुतळे” यांनी भरलेला देश होता. (यिर्मया ५०:२, ३८) होय, त्याच्या धार्मिक कल्पना, सबंध जगातील इतर धर्मांच्या प्रमुख आधारस्तंभ बनल्या. प्राध्यापक मॉरीस जेस्ट्रो हे द रिलिजन ऑफ बाबेलोनिया ॲण्ड अस्सेरिया नामे पुस्तकात म्हणतातः “प्राचीन जगतात, ख्रिश्‍चन धर्म उदयास येण्याआधी मिसर, पर्शिया आणि ग्रीसमधील धर्मावर बाबेली धर्म पगडा बसवून होता.” कालांतराने, ख्रिश्‍चन धर्मराज्यातील चर्चेसनेही त्याच्या अनेक कल्पनांचा स्विकार करुन त्यांच्या शिकवणूकीस सुरवात केली. यामुळेच पवित्र शास्त्र या खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यास “मोठी बाबेल” संबोधिते.—प्रकटीकरण १७:३-५.

बाबेल यरुशलेम काबीज करते

संदेष्टा यशया, प्राचीन काळातील जगावर स्वामित्व गाजविलेली, अश्‍शुर ही दुसरी जागतिक सत्ता अस्तित्वात असताना हयात होता. तरीही, देवाकडून त्याला हा भविष्यवाद कथन करण्यास प्रेरित करण्यात आले की, यरुशलेमाचा, त्या काळच्या अश्‍शुराकडून नव्हे तर बाबेलच्या लोकांकरवी नाश करण्यात येणार आहे. (यशया ३९:६, ७) हा भविष्यवाद खरा ठरला का? आपण पाहू.

यशयानंतरच्या शतकानंतर बाबेल व तिच्या सहकाऱ्‍यांनी अश्‍शुरचा विमोड केला. मग इ.स.पूर्वी ६१७ मध्ये बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सराने, यरुशलेमाचा राजा यहोयाखीन याला पकडले व त्याला “व देशातील मोठमोठे लोक” यांना कैद करुन बाबेलास नेले. नबुखद्‌नेस्सराने मत्तन्याला यरुशलेमाचा राजा बनविले आणि त्याने “त्याचे नाव बदलून सिदकिया असे ठेविले.”—२ राजे २४:११-१७.

भूगर्भशास्त्रज्ञांना सापडलेला बाबेली लोकांचा स्वइतिहास या घटनेचा पुरावा देतो. प्राचीन काळातील चिकणमातीच्या पाट्या, ज्यावर महत्वाच्या घटनांचे वृत्तांत कोरलेले असतात, त्यात म्हटले आहे की, बाबेलच्या राजाने “यहुदाचे (यरुशलेम) नगर काबीज केले व राजास बंदिवान केले. त्याने आपल्या मर्जीचा राजा नेमिला व मोठी लूट मिळविली व त्या सर्वांस बाबेलास पाठविले.”

याशिवाय, बाबेलमध्ये कैदेत असताना यहोयाखीनला उदरनिर्वाहाची जी सूट देण्यात आली होती तिचा उल्लेखही पवित्र शास्त्रात आहे. (२ राजे २५:२७-३०) भूगर्भशास्त्रज्ञांना अधिक अशी काही सरकारी कागदपत्रे मिळाली आहेत, ज्यात म्हटले आहे की, ही उदरनिर्वाहाची सूट केवळ “यहोयाखीन राजा”सच नव्हे तर “यहुदाच्या राजपुत्रांनाही” दिली होती.

यरुशलेम रहिवासी जरी यहोवा देवाशी करारबद्ध होते तरी त्यांनी जाणूनबुजून देवाच्या मार्गांना अनुसरण्याचे व त्याच्या संदेष्ट्यांचे वचन ऐकण्यास नकार दिला. यहोवाने म्हटलेः “माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.” यिर्मयाद्वारे त्याने इशारा दिला होता कीः “बाबेलच्या राजाच्या हाती मी सर्व यहुदा देईन; तो त्यांस बंदिवान करुन बाबेलास नेईल व तरवारीने वधील.”—यिर्मया १९:१५; २०:४.

यास्तव, जेव्हा सिदकियाने नबुखद्‌नेस्सराविरुद्‌ बंड केले, लगेच बाबेलच्या लोकांनी परत येऊन यरुशलेमास वेढा दिला. त्यांनी इ.स.पूर्वी ६०७ मध्ये तामुज ९ रोजी शहराची वेस भेदली. मंदिर जाळून बेचिराख केले. शहराभोवतालची वेस पाडली, आणि सिदकिया व त्याच्या बरोबरीच्या असंख्य लोकांना कैद करुन बाबेलास नेले. यहोवाचे शब्द अक्षरशः खरे ठरलेः “हा सगळा देश वैराण व विस्मयाला कारण होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील.”—यिर्मया २५:११.

नबुखद्‌नेस्सराच्या स्वप्नातील पुतळा

काही काळानंतर, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर, जो त्या काळच्या जागतिक सत्तेचा प्रमुख होता, त्याला काही अलौकिक माहिती पुरविण्यात आली. देवाने त्याला एका प्रचंड पुतळ्याचे स्वप्न पाडविले. या स्वप्नाने नबुखद्‌नेस्सराच्या काळापासून पुढल्या काळातील ज्या क्रमानुसारच्या जागतिक सत्ता, जसे मेद-पारस, ग्रीस, मग रोम यांच्या कारकिर्दींचा जागतिक आढावा प्रकट केला; एवढेच काय पण आमच्याही काळापलिकडे जाऊन मानवी सत्तांचे जागी कायम स्थापित होणाऱ्‍या देवराज्याचे प्रकटीकरण पुरविले. देवाकडील संदेष्टा दानीएलाने नबुखद्‌नेस्सरास म्हटले की, पुढे काय होणार हे त्या “थोर देवाने, महाराजांच्या हुजुरास कळविले आहे; हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निःसंशये हाच आहे.”—दानीएल २:२८-४५.

नबुखद्‌नेस्सरास वैयक्‍तीकपणे आणि अत्यंत जोरदारमार्गी हे शिकावे लागले की जागतिक घडामोडीत देव हस्तक्षेप करु शकतो, याचाच अर्थ, “मानवी राज्यांवर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो.”—दानीएल ४:२५.

बाबेलची उध्वस्तता पूर्वभाकित

तरीही, बाबेलने यहोवाच्या लोकांचा जो अमानुष छळ केला तो दंडाविना जाणार नव्हता. यिर्मयाद्वारे देवाने म्हटलेः “बाबेल व खास्दी देशाचे सर्व रहिवासी यांनी तुमच्या देखत जो सर्व अनर्थ सियोनात केला आहे त्याचे मी उसने फेडीन, असे यहोवा म्हणतो.” यशयाद्वारे देखील त्याने असे भाकित केलेः “मी त्यांजवर मेदी लोक उठवीन.”—यिर्मया ५१:२४; यशया १३:१७.

सुमारे दोनशे वर्षे आधीच यहोवाने बाबेलचा अधःपात करणाऱ्‍या व त्याच्या लोकांची सुटका करविणाऱ्‍या अधिपतीचे नाव जाहीर केले. तो आहे कोरेश. याला थोर कोरेश असेही म्हणतात. कोरेशबद्दलच्या भविष्यवादात त्याने म्हटलेः “त्याच्यापुढे दरवाजे उघडतील; वेशी बंद राहणार नाहीत.” (यशया ४४:२६-४५:१) असे खरोखरीच घडले का? इतिहास याचे स्पष्ट उत्तर देतो.

बाबेल पडते!

आधीच भाकित केल्यानुसार यहुदाची ७० वर्षांची गुलामगिरी संपुष्टात येत होती आणि मेद-पारस आगेकूच करीत होते. बाबेलचा राजा नबोनायडस याने आधीच युद्धक्षेत्रावर कोरेशापुढून पळ काढला होता. ग्रीक इतिहासकार हेरोडॉट्‌स म्हणतो की, बाबेल ही लांब मुदतीच्या वेढ्यासही थोपवून ठेविण्याच्या तयारीत होते; व हे सुव्यक्‍त होते की ते सर्वस्वी बाबेलच्या भक्कम वेशीवर अवलंबून होते.

पवित्र शास्त्राचा अहवाल जसे म्हणतो तसे इ.स.पूर्वी ५३९ मध्ये ऑक्टोबर ५/६ च्या रात्री बेलशस्सरने, बहुमानीत हजार पाहुण्यांकरिता बाबेल नगरीत एक मोठी अलिशान मेजवानी दिली. (दानीएल ५:१-४) हेरोडट्‌स हे खात्रीने कळवितो की त्या रात्री बाबेलमध्ये मोठा उत्सव पाळण्यात आला. तो म्हणतो की, लोक त्यासमयी “नाचत, गात होते व मौजमजा करीत होते.” त्याचवेळी, बाहेर कोरेशने इफ्रात नदीचा प्रवाह शहरास वेढा घालून होता त्या प्रवाहाची दिशा बदलली. पाण्याची उंची कमी कमी होत गेली व त्याचे सैन्य नदी प्रवाहाच्या कोरड्या पात्रावरुन पुढे कूच करीत उंच वेशी पार करुन, जसे हेरोडेट्‌स म्हणतोः “नदीस बांध घालणाऱ्‍या छोट्या दरवाजातून आत घुसले, जे दरवाजे बाबेलच्या लोकांकरवी उघडे राहिले असावेत.”

संदेष्टा यिर्मयाने पुष्कळ वर्षांआधीच बाबेलच्या पतनाचे हुबेहुब वर्णन केले होते. तो म्हणालाः “बाबेलचे वीर लढाई करावयाचे थांबले आहेत. . . . बाबेलच्या राजाचे नगर सर्वस्वी हस्तगत झाले आहे हे त्यास कळविण्यास एकामागे एक हलकारे, एकामागे एक निरोप्ये धावत आहेत. नदीचे उतार हस्तगत झाले आहेत, लढवय्ये फजीत झाले आहेत असे ते सांगत आहेत.”—यिर्मया ५१:३०-३२.

नबोनायडस कालवृत्तांतात, जो आज ब्रिटीश संग्रहालयात आहे, या वर्णनास संमती देतो. तो म्हणतोः “कोरेशच्या सैन्याने लढाई न करता बाबेलमध्ये प्रवेश केला.”

यहोवाचे भविष्यवाद पूर्ण झाले

एका रात्रीत बाबेल पडले. पवित्र शास्त्र इतिहासातील तिसरी जागतिक सत्ता एकाएकी विराम पावली. कोरेश, मोठ्या गर्वाने, त्याच्या कोरेश वृत्तचिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या लिखाणात उल्लेखित आहे त्याप्रमाणे म्हणू शकलाः “मी कोरेश, जगाचा राजा आहे, कायदेशीर राजा आहे, बाबेलचा राजा, सुमेरचा राजा आहे.” यानंतर लवकरच कोरेशने आपला प्रसिद्ध जाहीरनामा जाहीर केला आणि सुमारे ५०,००० यहुदी गुलाम, बरोबर पूर्वभाकित ७० वर्षांच्या शेवटास स्वगृही यरुशलेमाची आणि यहोवाच्या मंदिराची परत उभारणी करण्यासाठी परतले.—एज्रा १:१-११

अनेक शतकानंतर, यहुदी प्रेषित पेत्र, तेथेच भरभराटीस आलेल्या यहुदी पंथीयांना शिकविण्यास गेला होता; आणि या बाबेलहूनच पेत्राने, पवित्र शास्त्रातील त्याच्या दोन पत्रांपैकी एकाचे लिखाण केलेले आहे. (१ पेत्र ५:१३) तथापि, काळाच्या ओघात भविष्यवादाची पूर्णता झाली की, “तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खास्दी लोकांच्या ऐश्‍वर्याचे भूषण असा जो बाबेल त्याची, सदोम व गमोरा यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी स्थिती होईल. त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही.”—यशया १३:१९, २०.

आज, सामर्थ्यशाली बाबेल हे भग्नावस्थेत असून तेथे मातीने माखलेल्या दगडांचे ढीग, ओसाड प्रदेशातील निरुपयोगी वस्तु बनली आहे; ती यहोवाच्या अक्षयी भविष्यवादित शब्दांच्या अचूक पूर्णतेची स्तब्ध तसेच परिणामकारी साक्ष देत आहे.—यिर्मया ५१:३६, ३७.

[तळटीपा]

a  तारखाबद्दल म्हटल्यास आम्ही पवित्र शास्त्रामधील कालगणनेस स्विकारतो. या कधीकधी कमी विश्‍वस्त प्रापंचिक पंचागावर आधारीत असणाऱ्‍या प्राचीन तारखांपासून भिन्‍न दिसतात. पवित्र शास्त्र कालगणनेविषयीच्या सविस्तर चर्चेसाठी एड टू बायबल अंडरस्टँडिंग या पुस्तकात पृष्ठ ३२२-४८ वर देण्यात आलेली माहिती पहा.

b  द डॉन ऑफ सिव्हीलायझेशन ॲण्ड लाईफ इन द एन्शियंट इस्ट (१९४० आवृत्ती), लेखक आर. एम. एन्बर्ग व एफ. सी. कोल, पृष्ठ २३०-२.

[६ पानावरील नकाशा]

[For fully formetted text, see publication]

बाबेलच्या साम्राज्याचा विस्तार

भूमध्य समुद्र

इफ्रात नदी

मेदय

यरुशलेम

बाबेल

[३० पानांवरील चित्रं]

बाबेलच्या इश्‍तार वेशीच्या दरवाजाची पुनः बांधणी (उजवीकडे)

बाबेलची आजची भग्नावस्था (खाली)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा