वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १०/१ पृ. ४-७
  • तुम्हाला आनंद देऊ शकेल असे काम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आनंद देऊ शकेल असे काम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • साधार हेतू?
  • मानवाची घडण काम करण्यासाठी झाली
  • देवाची इच्छा करण्यामध्ये ‘चांगले ते पहा’
  • श्रम करून आपल्या जिवास सुख द्या
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • त्यांनी आपला शब्द पाळला!
    सावध राहा!—२०००
  • सांत्वन मिळवा—सांत्वन द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • धनदौलतीने तुम्हाला सौख्य मिळेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १०/१ पृ. ४-७

तुम्हाला आनंद देऊ शकेल असे काम

“मुद्रक या नात्याने मला माझे काम खूप आवडे,” असे इटलीतील जिनोआ येथली ऑन्टानियो म्हणतो. “मला भरपूर पगार मिळे व यामुळेच मला अधिक काम करण्याची चालना मिळे. काही काळातच, मी युवक होतो तरी माझ्या मालकाचा उजवा हात बनलो.” ऑन्टानियोला देखील, इतर ज्या ध्येयासाठी काम करतात ते मिळाल्याचा आनंद वाटला असावा असे दिसते. ती ध्येये आहेतः संपत्ती, प्रतिष्ठा आणि आनंदविणारे काम.

पण, ऑन्टानियोला ‘आपल्या सर्व परिश्रमातून खरेच सुख मिळाले’ का? (उपदेशक ३:१३) त्या कामाने त्याला खऱ्‍या प्रकारचा आनंद मिळवून दिला का? तो पुढे म्हणतोः “आमच्या प्रक्षुब्ध जीवनाक्रमणामुळे तणाव निर्माण झाला. आमच्या कुटुंबात समस्या निर्माण होऊ लागल्या. यामुळे आम्ही दुःखी बनलो.” ऑन्टानियो व त्याच्या बायकोचे काम व्यवस्थित व चांगले होते तरी ते दोघे सुखी नव्हते. तुम्हा बाबतीत काय? तुम्हाला ‘आपल्या सर्व परिश्रमातून सुख मिळते’ का?

साधार हेतू?

उपजिविका करता यावी यासाठी काम करावे लागते. काही देशात आपल्याला कसा तरी गाडा रेटता येण्यासाठी पुरेसे मिळवता यावे म्हणून लोक जादा वेळ काम करतात. काही तर आपल्या मुलांच्या कल्याणासाठी रात्रंदिवस काम करतात. तर इतर काही केवळ धनसंचयासाठी जबरदस्तीने काम करतात.

फिलिपाईन्समध्ये राहणारी लिओनिडा हिला दोन नोकऱ्‍या होत्या. दिवसा ती बँकेत काम करे व सायंकाळी तीन वा चार तास ती विद्यालयात शिकवण्याचे काम करीत असे. अशाप्रकारे अधिक पैसा मिळविणे खरेच व्यवहार्य होते का? “मी तर नेहमी घड्याळाकडे बघे,” ती म्हणते. “मला कंटाळा येत असे, मी खऱ्‍या मनाने ते काम करीत नव्हते.”

केवळ पैशांसाठी काम करणे ही गोष्ट खरे समाधान व आनंद देऊ शकत नाही. “धनवान होण्यासाठी धडपड करू नको,” असा उपदेश बुद्धिमान शलमोन राजा देतो. “कारण ते गरुडासारखे पंख आपणास लावते व गगनात उडून नाहीसे होते.” (नीतीसूत्रे २३:४, ५) काही गरुड ताशी ८० मैल वेगाने उडतात. त्यामुळे हे दिसते की, कष्टाने कमविलेली धनसंपत्ती केवढ्या सहजपणे उडून जाऊ शकते. जरी एखाद्याने संपत्ती साठवून ठेवली तरी मरणोत्तर ती त्याला आपल्यासोबत घेऊन जाता येत नाही.—उपदेशक ५:१५; लूक १२:१३-२१.

उपजिविका प्राप्त करण्यात मग्न राहिल्यामुळे संभाव्य धोका येऊ शकतो. ते पैशावर प्रेम करण्याप्रत निरवू शकते. पहिल्या शतकात परुशी या नावाने ओळखला जाणारा असा एक धार्मिक गट होता जो पैशावरील प्रेमाविषयी प्रसिद्ध होता. (लूक १६:१४) प्रेषित पौल हा माजी परुशी होता, त्यामुळे परुश्‍यांचे राहणीमान त्याला चांगले ठाऊक होते. (फिलिप्पैकर ३:५) “जे धनवान होऊ पाहतात,” पौल इशारा देतो, “ते परिक्षेत, पाशात व माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येकांनी . . . पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:९, १०) होय, हा “द्रव्याचा लोभ” त्याच्यासाठी जे काही व सर्वकाही केले जाते ते माणसाच्या जीवनाचा नाश करते. असे हे मार्गाक्रमण आनंद मिळवून देऊ शकत नाही.

काही लोक प्रतिष्ठेखातर अतोनात परिश्रम करतात. तरीपण ते शेवटी वास्तविकतेला तोंड देतात. “आपल्या विशीच्या किंवा तिशीच्या काळी मोठा स्वार्थत्याग करून मध्यम व्यवस्थापनेचा वर्ग मिळविण्याचे धडपड करणारे युवक,” फॉरच्युन मासिक कळवते, “सरतेशेवटी, असमाधानी पण अपरिहार्य वास्तवतेला सामोरे जातात व म्हणतात की, कितीही काबाडकष्ट केले तरी प्रत्येकाला वरचा दर्जा गाठता येत नाही. पराकाष्ठेमुळे थकून जाऊन ते विचारतात की, हे सर्व काय आहे. इतके कष्ट तरी का उपसावे? कोणाला काळजी आहे?”

या प्रकारातील एक माणूस होता, ज्याचे नाव मिझुमोरी असे होते. त्याला वाटत होते की, आपण जगात फार पुढे जावे. जपानच्या एका मोठ्या बँकेत व्यवस्थापकीय दर्जावरील ध्येय जोपासत राहिल्यामुळे त्याला आपल्या कुटुंबासाठी वेळच राहिला नाही. साधारण ३० वर्षे परिश्रमाचे काम केल्यावर त्याची प्रकृती ढासळू लागली. आता तो निश्‍चये आनंदी नव्हता. “मला कळाले,” तो म्हणतो. “प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आणि चारचौघात उठून दिसावे यासाठी लोकांमध्ये जी स्पर्धा चालते ती सर्व ‘व्यर्थ व वायफळ उद्योग होय’”—उपदेशक ४:४.

पण त्या ऑन्टानियोसारख्या लोकांविषयी काय ज्यांना आपल्या कामाची आवड वाटते? आपल्या कामाची भुरळ पाडून ऑन्टानियोने कामाच्या वेदीवर आपल्या कौटुंबिक जीवनाचे बलिदान वाहिले. काहींना तर आपल्या आरोग्याची तर काहींना आपल्या जीवनाची देखील होळी करावी लागली. हे कित्येक नावाजलेल्या अतोनात काम करणाऱ्‍या जपानी अधिकाऱ्‍यांत जे एकाएकी मृत्यु घडले त्याकरवी सिद्ध झाले. निधनामुळे कुटुंबात मागे उरलेल्यांच्या सांत्वनाखातर जी प्रार्थना केली जाते तशाप्रकारच्या प्रार्थना करण्यासाठी एके दिवशी १३५ जणांचे बोलावणे आले.

काहीजण इतरांच्या मदतीखातर आपले जीवन देतात. येशूने अशा प्रकारच्या आत्म्यास उत्तेजन दिले होते. (मत्तय ७:१२; योहान १५:१३) इतरांना मदत मिळू शकेल अशा कामात मग्न राहणे हे खरेच सौख्यानंद देऊ शकते.—नीतीसूत्रे ११:२५.

तरीपण, अशा स्वरुपाच्या उदारशील उद्योगात काही अडथळेही आहेत. उदाहरणार्थ, एकदा यहुदी राजा उज्जीया अरण्यात पुष्कळ हौद बांधण्याच्या कामास लागला. उज्जीया तेव्हा ‘यहोवाचे भय बाळगून’ होता आणि राजांनी निस्वार्थी असावे हा ईश्‍वरी उपदेश त्याने मान्य केला होता; त्यामुळे त्याच्या मनात या कामासंबंधाने लोकांचे कल्याण व्हावे हा विचार निश्‍चये होता असे म्हणता येईल. (२ इतिहास २६:५, १०; अनुवाद १७:१४-२०) त्यामुळे त्याच्या लष्करी बळात वाढ झाली व “त्याची किर्ती दूरवर पसरली.” पण जेव्हा तो प्रबळ झाला तेव्हा उन्मत्त बनला व याचा परिणाम त्याचे पतन घडले. (२ इतिहास २६:१५-२०; नीतीसूत्रे १६:१८) याचप्रमाणे इतरांना मदत करावी अशा कामात ज्याने स्वतःला समर्पित केले आहे पण ज्याला स्व-समर्थनाची भुरळ पडते व गर्व जडतो त्याचा शेवट विनाशात होतो. असे आहे तर मग कितीही कष्ट उपसले तरी त्याचा काय फायदा होतो?

मानवाची घडण काम करण्यासाठी झाली

आम्हाला कामाविषयी, पृथ्वीवर होऊन गेलेल्या आणि इतर कोणाही माणसापेक्षा ज्याने अधिक चांगले करून दाखविले त्या मनुष्याकडून बरेच काही शिकता येण्याजोगे आहे. तो येशू ख्रिस्त आहे. (मत्तय २०:२८; योहान २१:२५) वधस्तंभावर मरण्याआधी तो म्हणालाः “सर्वकाही पूर्ण झाले आहे!” (योहान १९:३०) त्याचे ३३१/२ वर्षांचे जीवन समाधानकारक झाले होते.

येशूच्या जीवनक्रमणामुळे, “तुम्हाला कोणते काम आनंदी बनवू शकेल?” या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याची मदत मिळते. आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यात त्याला अप्रतिम आनंद लाभला. याचप्रमाणे, आपल्याला देखील आमच्या निर्माणकत्याच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यामुळे समाधान मिळेल व आमचे जीवन आनंदी होईल. ते का बरे? कारण आमची घडण तसेच आम्हापेक्षा आमच्या गरजा त्याला अधिकपणे कळतात.

देवाने पहिला मानव आदाम याला घडविले तेव्हा त्याने त्याला हाताने करावयाचे व मानसिक अशी दोन्ही कामे दिली. (उत्पत्ती २:१५, १९) ‘पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना आपल्या अधीन ठेवण्यात’ आदामाला व्यवस्थापनाचे काम बघावयाचे होते. (उत्पत्ती १:२८) जोपर्यंत आदाम या व्यवस्थेचे पालन करणार होता तोपर्यंत त्याचे काम अर्थभरीत व योग्यतेचे राहणार होते. प्रत्येक लहानसहान काम हे त्याला सर्वसमर्थ देवाला संतुष्ट करण्याची संधि देऊन होते.

पण, अशी ही गोष्ट आदामाच्या बाबतीत बराच वेळ राहिली नाही. त्याने देवाच्या व्यवस्थेपासून दूर जाण्याचे ठरवले. पुढे आदामाने देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात आनंद न मानता स्वतःला संतुष्ट करण्यासाठी तो धडपडू लागला. त्याने आपल्या निर्माणकर्त्याविरुद्ध पाप केले. त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे तो, त्याची बायको व त्यांची सर्व संतति “व्यर्थतेच्या स्वाधीन झाली.” (रोमकर ५:१२; ८:२०) आता, आनंद देण्याऐवजी काम त्याला कंटाळवाणे व त्रासदायक वाटू लागले. देवाने आदामास जी शिक्षा दिली, त्यात असे म्हटलेः “तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील; ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील.” (उत्पत्ती ३:१७-१९) जे काम मानवाच्या निर्मात्यास संतुष्ट करण्याचा हेतू राखून दिमाखाने करावयाचे होते ते शेवटी मोठ्या कष्टाचे व केवळ स्वतःची भाकरी मिळविण्याच्या उद्देशापर्यंतच मर्यादित राहिले.

या वस्तुस्थितीवरून आम्ही काय अनुमान काढावे? हेः आम्ही आमचे जीवन ईश्‍वरी इच्छेच्या अनुषंगाने केंद्रित ठेवतो तोपर्यंत आमचे परिश्रम आम्हाला दीर्घकालीन समाधान व सौख्यानंद देऊ शकतील.

देवाची इच्छा करण्यामध्ये ‘चांगले ते पहा’

ईश्‍वरी इच्छेप्रमाणे करणे हे येशू ख्रिस्ताला अन्‍नासारखे आनंद देणारे वाटत होते, व ते आध्यात्मिक जीवनाचे पोषण करीत होते. (योहान ४:३४) असा हा कामातून आनंद तुम्ही कसा मिळवू शकाल?

यासाठी, तुम्हासाठी “यहोवाची इच्छा काय आहे” ते समजून घेतले पाहिजे. (इफिसकर ५:१७) मानवजातीसाठी त्याची ही इच्छा आहे की, तिला “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी.” (रोमकर ८:२१; २ पेत्र ३:९) हे साध्य करण्यासाठी सबंध जगभरात एकत्रीकरणाचे काम केले जात आहे. या अत्यंत समाधानी कामात तुम्हीही सहभाग घेऊ शकता. असे हे काम तुम्हाला निश्‍चये आनंदी बनवील.

ऑन्टानियो, ज्याच्याविषयी आम्ही सुरवातीला पाहिले होते, त्याला नंतर समाधान व सौख्यानंद मिळाला. त्याने व त्याच्या पत्नीने आपल्या जीवनात “व्यर्थ” प्रापंचिक नोकरीला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले होते तेव्हा त्यांचे आध्यात्मिक जीवन त्रासात पडले होते. तेव्हाच त्यांच्या घरात समस्या सुरु झाल्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या बायकोने आपली नोकरी सोडण्याचा व देवाच्या राज्याचा पूर्ण वेळ प्रचार करण्याच्या कामामध्ये ‘झटण्याच्या’ निर्णय घेतला.—लूक १३:२४.

“ताबडतोब,” ऑन्टानियो म्हणतो, “आम्हाला फरक दिसून आला. नेहमी होणारे भांडण थांबले. आमच्या कुटुंबात शांती वावरू लागली.” “सार्वकालिक जीवन” प्राप्त होणाऱ्‍या ज्ञानाविषयीची मदत इतरांना देण्यात जो आनंद मिळतो तो त्याच्या पत्नीने अनुभवला. (योहान १७:३) तिचा आनंद पाहून ऑन्टानियोला देखील काय योग्य व लायकतेचे आहे त्याचे परिक्षण करण्याची चालना मिळाली. देवाची पूर्ण हृदयाने सेवा करण्याच्या इच्छेने सरशी मिळवली. बढतीकरता आलेली संधी नाकारून त्याने आपल्या प्रापंचिक नोकरीचा राजीनामा दिला. हा बदल केल्यामुळे त्याला कमी दर्जाची नोकरी करावी लागत असली तरी, तो व त्याची बायको हे दोघेही आपला बहुतेक वेळ ख्रिस्ती उपाध्यपणात, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देऊ शकत असल्यामुळे आनंदी आहेत.

हे खरे की, सर्वच अशा प्रकारचे मोठे बदल करू शकत नाही. मिझुमोरी, जो जपानी बँकेत होता, ज्याचा आधी उल्लेख आला आहे, तो आता ख्रिस्ती मंडळीत एक वडील या नात्याने सेवेचा आनंद मिळवीत आहे व आता देखील आपल्या कुटुंबाच्या पोषणार्थ त्याला एक ऐहिक नोकरी आहे. येथे तो व्यवस्थापक म्हणून काम करतो. तथापि, आता त्याच्या जीवनाचे केंद्र नोकरी नसून देवाची इच्छा पूर्ण करणे हे आहे. त्याचे हे ऐहिक काम त्याचे पोषण करण्यास व त्याचे हे ध्येय सिद्धीस नेण्यास मदत करते. त्याचे सध्याचे ऐहिक काम त्याला अर्थभरीत वाटते.

जेव्हा तुम्हीही आपल्या ऐहिक नोकरीविषयी असा दृष्टीकोण ग्रहण कराल तेव्हा तुम्हीही निसंशये, “माणसांना संतोषविणाऱ्‍या नोकरांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर सालस मनाने यहोवाची भीती बाळगून” आपले परिश्रम कराल. (कलस्सैकर ३:२२) अशा या प्रामाणिकपणाचे मूल्य या चढाओढीच्या समाजामध्ये अधिक काळ ओळखले जात नसले तरी मिझुमोरी म्हणतो त्याप्रमाणे अशा तत्त्वांच्या अवलंबनामुळे तुम्ही भरवसापात्र व बहुमानित होता येईल. त्याने बढतीसाठी काम करण्याचे थांबविले, तरी ती सहजपणे त्याला मिळाली.—नीतीसूत्रे २२:२९.

होय, देवाच्या इच्छेप्रमाणे करीत राहणे हा तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू असला तर कठीण परिश्रमात आनंद मिळविण्याची ती गुरुकिल्ली आहे. यासाठीच, बुद्धिमान राजा शलमोन शेवटी म्हणालाः “मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यास काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे.”—उपदेशक ३:१२, १३.

[७ पानांवरील चित्रं]

तुमचे कौटुंबिक जीवन पवित्र शास्त्राचा अभ्यास आणि देवाची इच्छा पूर्ण करणे याभोवती केंद्रित ठेवणे ही आपल्या परिश्रमाच्या फळाचा आनंद मिळवून घेण्याची गुरुकिल्ली आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा