वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ६/१ पृ. २९-३०
  • यहोवास शोधा व त्याची सेवा पूर्ण अंतःकरणाने करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवास शोधा व त्याची सेवा पूर्ण अंतःकरणाने करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचा दिवस समीप आहे
  • तारण शक्य आहे
  • पुनर्स्थापित लोक
  • शास्त्रवचनातील धडेः हाग्गय १:१-२:२३
  • यहोवाचे कार्य प्रथमस्थानी ठेवा
  • पूर्ण अंतःकरणाची सेवा आवश्‍यक आहे
  • “माझी वाट पाहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “तुझे हात गळू देऊ नको”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “मी तुम्हाबरोबर आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • सर्व जण यहोवाची स्तुती करोत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ६/१ पृ. २९-३०

शास्त्रवचनातील धडेः सफन्या १:१-३:२०

यहोवास शोधा व त्याची सेवा पूर्ण अंतःकरणाने करा

बाबेलने धर्मत्यागी यहुदास उध्वस्त करण्याच्या सुमारे ५० वर्षे आधी यहोवाने त्याचा संदेष्टा सफन्याद्वारे असे घोषित केलेः “मी भूपृष्ठावरुन सर्वकाही निखालस नाहीसे करीन.” (१:१, २) परंतु देवाने त्याच्या लोकांना सुरक्षिततेचा मार्गही दाखविला. (२:३; ३:९) तद्वत, जे सर्व सध्या “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाई”स तोंड देऊन आहेत त्यांच्यासाठी सफन्याचे पुस्तक मोलवान धडा सामावून आहे.—प्रकटीकरण १६:१४.

यहोवाचा दिवस समीप आहे

यहोवाचा दिवस अगदी समीप आहे म्हणून जे देवापासून दूर गेलेले आहेत अशांनी त्याच्यापाशी त्वरेने परत आले पाहिजे. देव ज्यांना “नष्ट करील” त्यामध्ये “यहोवापासून पराड्‌.मुख झाले” ते लोक आहेत. ते बहकले असून त्यांनी स्वतःला देवाच्या इच्छेप्रमाणे राखले नाही. केवढी ही भयानक स्थिती! ती तत्काळ सुधारली पाहिजे.—सफन्या १:३-११.

भौतिक संपदा यहोवाच्या दिवशी सुरक्षितता पुरवू शकणार नाही. यहोवाची सेवा करण्याचा दावा करणारे काही स्वतःला भौतिक ध्येयामागे लावतात आणि सुखकर मालमत्तेमध्ये धुंद राहतात. पण केवढी ही स्व-भ्रांति! त्यांची भौतिक संपदा त्यांना “त्या दिवशी” काहीच सुरक्षितता देणार नाही.—सफन्या १:१२-१८.

तारण शक्य आहे

यहोवाच्या दिवशी दृष्टीआड होण्यासाठी शास्त्रवचनांच्या वरकरणी ज्ञानापेक्षा अधिकाची गरज आहे. जे “नम्र जन” ‘त्याच्या न्यायानुसार चालतात’ त्यांनी ‘यहोवास शोधावे, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करावे.’ केवळ जे ‘शेवटपर्यंत टिकतील’ अशांचे तारण होईल.—सफन्या २:१-३; मत्तय २४:१३.

यहोवाच्या लोकांवर आज जुलुम करणारी राष्ट्रे नाश पावतील. त्यांना यहुदाच्या सभोवताली असणाऱ्‍या मवाब, अम्मोन, अश्‍शुर व इतर राष्ट्रांस आलेला अनुभव येईल. मोठ्या बाबेलसाठी देखील नाश थांबून आहे. (प्रकटीकरण १८:४-८) ही गोष्ट आम्हास देवाचे न्यायदंड बजावण्यात पुढे सरसावण्यासाठी कशी स्फुर्ती देते बरे!—सफन्या २:४-१५.

पुनर्स्थापित लोक

यहोवा आता त्याच्या लोकांना बचावासाठी सिद्ध करीत आहे. तुम्ही बाबेलच्या विचारधारा सोडून पवित्र शास्त्राची मोलवान सत्याची “शुद्ध वाणी” बोलण्यास सुरवात केली आहे का? यहोवाला स्वतःचे समर्पण करुन तुम्ही ‘त्याच्या नावाचा धावा करीत आहात’ का? तुम्ही ‘त्याच्या नामाची घोषणा करणाऱ्‍या ओठांचे फळ’ त्याला ‘अर्पण’ म्हणून आणीत आहात का? बचाव मिळवावयाचा आहे तर यहोवाच्या समर्पित लोकांसोबत मिळून ‘खांद्याला खांदा लावून’ त्याची सेवा केली पाहिजे.—सफन्या ३:१-१०; रोमकर १०:१३-१५; इब्रीयांस १३:१५.

तारणासाठी आम्ही यहोवाचा शोध करुन त्याचे नाव उंचावण्यास हवे. हट्टीपणा, अधार्मिकता व लबाडी यांना त्याच्या लोकात थारा नाही. (इफिसकर ४:२५-३२) देव त्याचे नाव पवित्र करील तेव्हा केवळ “नम्र व गरीब” यांचा बचाव होईल.—सफन्या ३:११-२०.

शास्त्रवचनातील धडेः हाग्गय १:१-२:२३

हाग्गयचे पुस्तक आम्हाला इ. स. पू ५२० कडे म्हणजे यरुशलेमास यहोवाच्या मंदिराची पुनः उभारणी करण्याकरता यहुदी शेष परतले त्याच्या १७ वर्षानंतरच्या घटनेकडे नेते. (हाग्गय १:१) तो काळ प्रत्येकाने देवाच्या कामावर आपले लक्ष एकचित्त करण्याचा होता. तरीही, यहोवाला आपल्या लोकांना त्यांच्या कर्तव्याचे स्मरण देण्यास हाग्गय संदेष्ट्याला पाठविण्याची गरज भासली. यात आम्हासाठी काही धडे आहेत का?

यहोवाचे कार्य प्रथमस्थानी ठेवा

भौतिक आस्था आध्यात्मिक जबाबदाऱ्‍यांपुढे कधीही नेऊ नका. आपल्या स्वगृही परतल्यावर यहुद्यांना आर्थिक अस्थिरता, शेजारच्या शत्रूंचा त्रास इत्यादि गोष्टींची चिंता करण्याचे कारण होते. परंतु त्यांच्या आरामशीर राहणीमानाच्या दृष्टीकोनातून पाहता त्यांच्या दुर्लक्षपणास ही कारणे योग्य नव्हती. हाग्गयने त्यांना उत्तेजन दिल्यानंतरच त्यांनी मंदिराच्या कामाला सुरवात केली. याचप्रमाणे आम्ही सध्या ‘आपल्या मार्गाकडे लक्ष’ लावण्याची गरज आहे आणि आम्ही देवाच्या कामात शक्य तेवढा हातभार लावीत आहोत याची खात्री बाळगली पाहिजे.—हाग्गय १:२-१५.

यहोवा पूर्ण जिवानिशी कार्य करणाऱ्‍यांच्या परिश्रमावर आशीर्वाद आणतो. देव जरुब्बाबेल व इतर यहुद्यांच्या मंदिर पूर्ण करण्याच्या कामावर आशीर्वाद आणील आणि त्याचे वैभव पूर्वीपेक्षा अधिक होईल. एक “मोठा लोकसमुदाय” आज राज्य संदेशास प्रतिसाद देत असल्यामुळे “सर्व राष्ट्रातील निवडक वस्तु” यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात येत आहेत व तो त्याचे ‘मंदिर वैभवाने भरीत’ आहे.—हाग्गय २:१-९; प्रकटीकरण ७:९.

पूर्ण अंतःकरणाची सेवा आवश्‍यक आहे

आम्ही शुद्ध असलो, आमचे हेतू पवित्र असले आणि आम्ही यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करतो तरच आमची भक्‍ती मोलाची ठरते. देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष केल्यामुळे यहुदी अशुद्ध झाले, पण जेव्हा मंदिराचे काम सुरु झाल्याबरोबर तो त्यांच्यावर आशीर्वाद पाठविणार होता. यास्तव आम्हास यहोवाच्या आशीर्वादांचा आनंद लुटणे आहे तर आम्ही ज्याकडे लक्ष दिले पाहिजे त्या गोष्टींची सुधारणा घडवून आणून आपले अंतःकरण यहोवाच्या कार्यात लावले पाहिजे. (पडताळा गणना १९:११-१३.) देवाने आकाश व पृथ्वी हालवून सोडण्याची, आणि राज्ये उलथून टाकण्याची आम्ही वाट पाहत असता जरुब्बाबेलाचा प्रतिनमुना असणाऱ्‍या येशू ख्रिस्ताचे अनुकरण करु या व यहोवाच्या कार्यात पूर्ण अंतःकरणाने सहभाग घेऊ या.—हाग्गय २:१०-२३.

[२९ पानावरील चौकट]

पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण

○ सफन्या १:५—मलकाम बहुतांशी मिलकोम, मोलेख किंवा मोलोख हा अम्मोनी लोकांच्या खोट्या देवातील मुख्य होता. (१ राजे ११:५, ७) मोलेखच्या भक्‍तीत नियमशास्त्राने धिक्कारली होती त्या लहान मुलांच्या बलिदानाची अमंगळ पद्धत सामावून होती.—लेवीय २०:२-५; प्रे. कृत्ये ७:४२, ४३.

○ सफन्या २:१४—भाकित केल्याप्रमाणे वैराण निनवेच्या खांबाचे शिरोभाग उरले व तिच्या खांबाच्या नक्षी पक्षी व श्‍वापदांच्या घरकुलासाठी झाल्या. पक्षी व त्याचप्रमाणे वारा ओसाड खिडक्यातून “गात” राहिला. उंबरठे व तसेच महालाचे आतील भाग ओसाड पडले होते.

○ सफन्या ३:९—सर्वसामान्य बोलीने ऐक्याची खात्री दिली नाही व हेच एका भाषिकात लढल्या गेलेल्या लढायांनी दाखविले. “शुद्ध वाणी” शास्त्रवचनीय सत्य, “हितकर शब्दांचा नमुना” आहे. (२ तीमथ्य १:१३) ती गर्वापेक्षा श्रेष्ठ असून देवाचे गौरव करते व जे ती बोलतात त्यांना एकबद्ध करते.

○ हाग्गय १:६—यहुदी यहोवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करीत होते हे पाहता त्यांना त्याचे आशीर्वाद नव्हते. यास्तव ते पुष्कळ पेरणी करीत पण हाती थोडके लागत असे व त्यांच्या गरजांची पूर्ति करण्यास पुरेसे अन्‍न व पेय यांची कमतरता होत होती. त्यांचे कपडे अपुरे किंवा त्यांना उबदार ठेवण्यास कनिष्ठ प्रतीचे होते. मजूर मजुरी मिळवून जणू काय भोके पडलेल्या पिशवीत टाकीत. त्या यहुदाप्रमाणे आम्ही इश्‍वरी आस्थेकडे केव्हाही दुर्लक्ष करु नये.—नीतीसूत्रे १०:२२; नेहम्या १०:३९.

○ हाग्गय २:९—शलमोनाने बांधलेले “पूर्वीचे” मंदीर ४२० वर्षे राहिले. “नंतरचे मंदीर” ५८४ वर्षे उपयोगात आणले गेले. (इ. स. पू. ५१५ ते इ. स. ७०) यास्तव दुसरे मंदीर दिर्घकाळ टिकले. अधिक भाविक त्यात जमले जसे की, इ. स. ३३ च्या पेन्टेकॉस्ट वेळी, जेव्हा यहुदी व विदेशी यहुदा प्रांतापेक्षा इतर ठिकाणाहून जमले होते. याहून अधिक म्हणजे, मशीहा येशू ख्रिस्ताने या “नंतरच्या मंदिरात” शिकवण दिली. या गोष्टींनी त्यास श्रेष्ठ धार्मिक वैभव प्रदान केले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा