वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ६/१ पृ. २३-२८
  • प्रीतीच्या पताक्याखाली एकवटलेले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रीतीच्या पताक्याखाली एकवटलेले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एकनिष्ठ प्रीती व्यक्‍त करणे
  • आधुनिक समांतरता
  • एकवटलेला “कळप”
  • “उत्कट प्रीती” दाखविणे
  • धाडसी आणि विश्‍वासू योनाथान
    बायबलमधून शिकू या!
  • एकनिष्ठ राहण्यासाठी त्याला धैर्य दाखवावं लागलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवून द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • दाविदाला का निसटलं पाहिजे
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ६/१ पृ. २३-२८

प्रीतीच्या पताक्याखाली एकवटलेले

“मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा.”—१ पेत्र ४:८.

१. देवाच्या लोकांमध्ये आज कोणत्या प्रकारची प्रीती नांदत असल्याचे आढळून येते आणि १९२२ पासून अभिषिक्‍त ख्रिस्ती काय घोषित करत आहेत?

आज, देवाच्या लोकात अशाप्रकारची प्रीती आम्हास दिसते का? निश्‍चितच ती आम्हास दिसते. ही एक अशी प्रीती आहे जी यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या मान्यतेची व आधाराची मध्यबिंदू आहे, जिला दाविदानेही मान्यता दिली होती. लक्षवेधकपणे १९२२ पासून येशू ख्रिस्ताचे, “दावीद पुत्र” याचे अभिषिक्‍त बंधू सबंध भूतलावर देवाचे राज्य जवळ आल्याची ग्वाही देत आहेत व हेही बजावीत आहेत की सैतानी जुलुमशाहीचे समर्थक देवाकडील अधिकृत न्यायाधीश येशू ख्रिस्ताकरवीच्या नाशास तोंड देऊन आहेत.—मत्तय २१:१५, ४२-४४; प्रकटीकरण १९:११, १९-२१.

२. दाविदाला ‘यहोवाच्या मनासारखा मनुष्य’ असे का संबोधिले आहे?

२ दावीद हा ‘यहोवाच्या मनासारखा मनुष्य’ होता. हे यहोवावरील त्याच्या प्रीतीत आणि धार्मिकतेत दिसले. हे असे गुण दाविदाठायी असल्याचे भेकड शौलानेहि कबुल केले होते. निर्भिडपणा, संपूर्ण हृदयाने यहोवाचीच भक्‍ती करणे, नेतृत्व आणि ईश्‍वरी सत्तेच्या नियमावलीच्या अधीन राहण्यात ते गुण दिसले.—१ शमुवेल १३:१४; १६:७, ११-१३; १७:३३-३६; २४:९, १०, १७.

३. दाविदाबद्दल योनाथानाच्या मनाचा कल कसा होता व का?

३ गल्याथावर विजय प्राप्त केल्यावर दाविदाने परत जाऊन शौलास हजेरी दिली. त्याचवेळी एक नीतीमत्तेचा भोक्‍ता सामोरा आला. तो शौल राजाचा थोरला मुलगा योनाथान होता. “दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला.” (१ शमुवेल १८:१) शारीरिक गोंडसपणा, गोफणीने केलेली अचूक नेमबाजी यांनी नव्हे तर देवाच्या नामावरील कलंक दूर व्हावा ही दाविदाला वाटणारी उत्कट इच्छा, तसेच त्याचा निस्वार्थीपणा व यहोवावरील त्याचा संपूर्ण भरवसा या गुणांनी योनाथानाचे मन जिंकले.—पडताळा स्तोत्रसंहिता ८:१, ९; ९:१, २.

४. दावीद हा राजा बनावा म्हणून अभिषेक झालेला आहे हे ओळखून असता योनाथानाने काय केले?

४ योनाथान जरी दाविदापेक्षा ३० वर्षे वयाने मोठा होता तरी तो या तरुण योध्यासोबत दीर्घ मैत्रीत जडला. “मग योनाथानाने दाविदाशी आणभाक केली; कारण तो त्यास प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. योनाथानाने अंगावरचा झगा उतरुन दाविदास दिला; त्याप्रमाणे आपला पेहराव, तरवार, धनुष्य व आपला कमरबंद हीही दिली.” (१ शमुवेल १८:३, ४) योनाथानाकरवीचे हे केवढे लक्षणीय प्रमाणपत्र होते. सर्वसाधारणपणे, योनाथान शौलाचा वारस होता तरीहि त्याने दाविदावर आपले उबदार व तत्वनिष्ठ प्रेम व्यक्‍त केले, आणि यहोवाचे नाम व सार्वभौमत्व उंचावण्यात पुढाकार घेणारा भावी अभिषिक्‍त राजा यानात्याने त्याला आपली अधीनता दाखवली.—२ शमुवेल ७:१८-२४; १ इतिहास २९:१०-१३.

५. ईश्‍वरीय सत्तेखालील युद्धाचा प्रसंग उद्‌भवला तेव्हा योनाथानाने कोणत्या गोष्टीची ओळख दिली?

५ योनाथान स्वतः नीतीमत्वतेकरता लढा देणारा होता. त्याने असे घोषित केले कीः “यहोवाला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही.” कारण योनाथान हे ओळखून होता की, ईश्‍वरी वर्चस्वांचे युद्धात विजयाकरता नेहमी ईश्‍वरी मार्गदर्शनाचा मागोवा घेण्याची गरज असते. जेव्हा योनाथानाने जाणीव नसता एक गुन्हा केला व ज्याच्याबद्दल शौलाने त्यास मरणदंडाचीही शिक्षा दिली, ती त्याने विनयशीलतेत स्विकारली. पण हा आनंद की, प्रजेने त्याचा बचाव केला.—१ शमुवेल १४:६, ९, १०, २४, २७, ४३-४५.

एकनिष्ठ प्रीती व्यक्‍त करणे

६. योनाथानाठायीची एकनिष्ठ प्रीती दाविदावरील प्राणसंकटात मदतीकरता कशी धावून आली?

६ एक कुशल योद्धा म्हणून दाविदाची किर्ती वाढू लागली तसतशी शौलाची नाराजी वाढू लागली. पण योनाथानाची एकनिष्ठ प्रीती येथे आड आली. अहवाल म्हणतोः “पण शौलाचा पुत्र योनाथान याचे दाविदावर फारच मन बसले होते, म्हणून योनाथानाने दाविदास सांगितले की माझा बाप शौल तुला मारुन टाकावयास पाहत आहे तर तू सकाळपर्यंत सावध ऐस आणि एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा.” त्याप्रसंगी योनाथानाने शौलाला शांत केले व यामुळेच दावीद वाचला. पण नंतर “दाविदाने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले व त्यांचा मोठा संहार केला” त्यावेळी त्याला जे यश मिळाले ते पाहून शौलाठायी परत वैरभाव उद्‌भवला. तेव्हा दावीद पळून गेला.—१ शमुवेल १९:२-१०.

७. योनाथान भटकत्या दाविदास भेटला तेव्हा त्या दोघांनीही परत करारबद्ध होण्यात एकमेकांना काय म्हटले?

७ काही दिवसांनी परांगदा दावीद परत जाऊन योनाथानास भेटला. योनाथानाने त्याला म्हटलेः “तुझ्या जिवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन.” दोघांनी यहोवासमोर परत एकमेकांसोबत आणभाक केली व दाविदाने योनाथानाच्या घराण्यावरील आपली कृपादृष्टी कदापि काढून घेणार नाही असे अभिवचन दिले व ते त्याने पाळले. “योनाथानाची दाविदावर प्रीती होती म्हणून त्याने त्याला पुनः आणभाक करावयास लाविले, कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता.”—१ शमुवेल २०:४-१७; २ शमुवेल २१:७.

८. योनाथान व दावीद हे एका शेतात एकांतात का भेटले, आणि त्या प्रसंगी काय घडले?

८ आता दाविदास ठार करण्याच्या आपल्या निश्‍चयात शौल राजा अधिकच निग्रही बनला. एवढेच काय पण दाविदाच्या वतीने बोलला म्हणून त्याने स्वतःचा पुत्र योनाथानावर देखील भाला उगारला. या कारणास्तव योनाथान दाविदास एका शेतात एकांतात भेटला. दावीदाने “भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले. मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले; दावीद तर मनस्वी रडला. तेव्हा योनाथान दाविदास म्हणालाः ‘सुखरुप जा. यहोवा तुझ्यामाझ्यामध्ये आणि तुझ्यामाझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो.” मग ते दोघे एकमेकांपासून मार्गस्थ झाले. दावीद जीफच्या अरण्यात फरारी झाला.—१ शमुवेल २०:४१, ४२.

९, १०. (अ) जिला त्या दोघामधील शेवटली भेट म्हणता येईल त्या प्रसंगी योनाथानने दाविदाला अधिक उत्तेजन कसे दिले? (ब) पलिष्ट्यांनी योनाथान व शौल यांना वधिले त्यावेळी दाविदाने कसले विलापगीत रचले व त्याचा शेवट त्याने कसा केला?

९ योनाथान प्रीतीने नेहमी दाविदास उत्तेजन देत असे. अहवाल म्हणतोः “तेव्हा शौलाचा पुत्र योनाथान हा निघून दाविदाकडे त्या [होरेश येथे] उंचवट्यावरील झाडीत गेला. देवाच्या ठायी त्याचा भरवसा दृढ करुन त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली. त्याने त्यास म्हटलेः ‘भिऊ नकोस, माझा बाप शौल याच्या हाती तू लागावयाचा नाहीस; तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार. माझा बाप शौल यालाही हे ठाऊक आहे.’ मग त्या दोघांनी यहोवापुढे करार केला.”—१ शमुवेल २३:१५-१८.

१० असे दिसते की दावीद व त्याचा निष्ठावंत मित्र योनाथान यांजमधील ही शेवटली भेट असावी. काही दिवसांनी पलिष्ट्यांबरोबरील युद्धात शौल व योनाथान दोघेही मारले गेल्यावर दाविदाने “धनुष्य” हे विलापगीत रचले. त्यात त्याने यहोवाचा अभिषिक्‍त म्हणून शौलास बहुमान दिला पण या गीताचा शेवट अशा शब्दात केलाः “योनाथाना, तू उच्चस्थली वधिला गेला आहेस. माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरता विव्हळ होत आहे. तू मजवर फार माया करीत असस; तुझे मजवर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहून ते अधिक होते.” (२ शमुवेल १:१८, २१, २५-२७) मग दाविदाचा यहुद्यांचा राजा म्हणून दुसऱ्‍यांदा अभिषेक झाला.

आधुनिक समांतरता

११, १२. (अ) दावीद व योनाथान यांनी कोणत्या प्रकारच्या प्रीतीचे प्रदर्शन केले? (ब) दावीद व योनाथान यांच्यामधील एकनिष्ठ प्रीती कोणत्या गोष्टींची पूर्वप्रतिछाया होती?

११ “प्रत्येक ईश्‍वरप्रेरित शास्त्रलेख . . . नीतीशिक्षण याकरता उपयोगी आहे,” तर मग दावीद आणि योनाथान यांच्या अहवालावरुन आम्ही काय शिकू शकतो बरे? (२ तीमथ्य ३:१६) आमच्या हे लक्षात येते की त्यांच्यातील प्रेम “स्त्रियांच्या प्रेमाहून अधिक (उत्तम) होते.” हे खरे की, “स्त्रियांचे प्रेम” हे, यहोवाकडील लग्नबंधनाविषयीच्या कायद्यांना योग्य तो आदर प्रदर्शित केला जातो तेव्हाच खरे मनोरम आणि पूर्णतादायक वाटते. (मत्तय १९:६, ९; इब्रीयांस १३:४) पण दावीद व योनाथान या दोघांनीही याहीपेक्षा अधिक गुणकारी प्रेम या आज्ञेच्या एकमतात दाखविले की, “हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव यहोवा हा अनन्य यहोवा आहे. तू आपला देव यहोवा याजवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीती कर.”—अनुवाद ६:४, ५.

१२ यहोवाच्या नामास त्याच्या शत्रूंनी जो सर्व कलंक फासला होता तो पुसून टाकण्यात दावीद व योनाथान यांनी जी युद्धे केली त्यात त्यांनी संयुक्‍तपणे ही प्रीती व्यक्‍त केली. हे करीत असता त्यांनी ‘एकमेकांबद्दल एकनिष्ठेची प्रीतीही’ संपादित केली. (१ पेत्र ४:८) हे साध्य करण्यात त्यांनी आपसात अनुभवलेली मैत्री ही, लेवीय १९:१४ मध्ये उल्लेखित असलेल्या आज्ञेच्या की, “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःप्रमाणे प्रेम ठेव”, याचीही हद्द ओलांडणारी ठरली. ही प्रीती खचितपणे त्या प्रीतीची पडछाया होती जिच्याविषयी येशूने म्हटले होतेः “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.” येशूची प्रीती, यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात पूर्णपणे गढलेली होती एवढेच त्यात नव्हते तर आपल्या स्वखुषीने त्याने ‘आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा’ हेही त्यामध्ये समाविष्ट होते.—योहान १३:३४; १५:१३.

एकवटलेला “कळप”

१३. खासकरुन १९३५ पासून कोणत्या राज्य घोषकाच्या गटाने या दृश्‍यात प्रवेश केला आणि कोणती एकी अभिषिक्‍त ख्रिस्ती यांच्या संगतीत अनुभवीत आहेत?

१३ “लहान कळप” यातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आधुनिक गल्याथाकरवीच्या युद्धहल्ल्याचा मुख्य रोष सहन करावा लागला आहे. तथापि, १९३५ पासून त्यांना राज्य घोषकांचा एक दुसरा व मोठा “कळप” येऊन मिळाला आहे. ही “दुसरी मेंढरे” शेष अभिषिक्‍त “मेंढरे” यांच्याबरोबर “एक मेंढपाळ”, “दावीद पुत्र” याच्या वर्चस्वाखाली प्रीतीच्या सर्वोच्च बंधनाच्या एकीत “एक कळप” असे एकवटले गेले आहेत, जसे दावीद व योनाथानही होते.—लूक १२:३२; योहान १०:१६; यहेज्केल ३७:२४.

१४. शौलाने दाविदास ठार करण्याचे जे प्रयत्न केले आणि योनाथानाने प्रेमळपणे आपण दाविदाच्या बाजूस असल्याची जी ओळख दिली त्यांची समानता कशात होती?

१४ योनाथान गट संख्येने वाढत जाऊन एक मोठा समुदाय बनत असता दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला व त्यामुळे अभिषिक्‍त व त्यांचे हे सोबती या दोघांनाही अमानुष छळाच्या सत्वपरिक्षणाला तोंड द्यावे लागले. ती, पाद्रीगटाकरवीच्या चिथावणीने घडलेल्या अत्यंत घृणित छळांची वर्षे होती. ती कृत्ये, अभिषिक्‍त दावीद व नंतर दावीदाचा कड घेतला म्हणून योनाथानावरही शौलाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या समानतेतील होती. त्या काळात दावीद आणि योनाथान यांनी एकमेकांबद्दल केवढी उत्कट प्रीती प्रदर्शित केली. येशूने मत्तय २५:३५-४० मध्ये दिलेल्या दाखल्याची ती प्रत्यक्ष परिपूर्तता होती.a

१५. (अ) साक्षीदारांनी असा कोणता मार्ग अनुसरला जो आधुनिक शौलवर्गाने अनुसरलेल्या मार्गाच्या तफावतेतील आहे? (ब) “यहोवाकडील दुरात्मा” जो शौलाठायी संचारला होता तो आजच्या दिवसातील कशाबरोबर मिळता आहे?

१५ आपल्या सत्वपरिक्षणात टिकून राहणारे यहोवाचे साक्षीदार आधुनिक शौलवर्गाच्या वागणूकीच्या मोठ्या तफावतीत कसे दिसून येतात? ‘या जगाचा भाग नसणाऱ्‍या’ साक्षीदारांनी, “तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी” या येशूच्या आज्ञेचे पालन गोर्लाधव्याप्त रितीने केले. (योहान १५:१७-१९) याउलट, दोन्ही जागतिक महायुद्धात ख्रिस्ती धर्मराज्यातील पाद्रीगटाने दोन्ही बाजूस, आपल्या “देवा”ला विजयासाठी प्रार्थना म्हटल्या आणि त्याचवेळी एकाच धर्माच्या पण वेगवेगळ्या राष्ट्रातील सैनिकांनी एकमेकांची लाखोच्या संख्येत कत्तल केली. शौलाठायी जोराने संचारलेला “यहोवाचा दुरात्मा”, प्रकटीकरणाच्या ८ व्या अध्यायात दाखवलेल्या देवदूताने ओतलेल्या पीडेबरोबर चांगल्यारितीने जुळतो. तद्वत, हे स्पष्ट आहे की, ख्रिस्ती धर्मराज्यातील पाद्रीगटाठायी यहोवाचा आत्मा नाही.—१ शमुवेल १६:१४; १८:१०-१२; १९:१०; २०:३२-३४.

१६. (अ) पाद्रीगटाने यहोवाच्या लोकांवर दबाव आणण्याकरता दोन्ही जागतिक महायुद्धांचा कसा उपयोग केला? (ब) अलिकडील काही वर्षांत असे का म्हणता येऊ शकते की आधुनिक शौलाने देवाच्या लोकांना सतत आपली शिकार बनविले आहे?

१६ इ. स. १९१८ मध्ये या पाद्रीवर्गाने अमेरिकेतील राजकीय शक्‍तींचा वॉचटावर संस्थेच्या जबाबदार अधिकाऱ्‍यांच्या विरुद्ध कृति करण्यासाठी पाठपुरावा केला व सरतेशेवटी त्यांना कैदेत टाकले. (हे पवित्र शास्त्र विद्यार्थी नंतर पूर्णपणे दोषमुक्‍त ठरले) दुसऱ्‍या जागतिक महायुद्ध काळात यहोवाच्या साक्षीदारांवर मित्र राष्ट्रांच्या हुकमतीखालील राष्ट्रांत तसेच ब्रिटीश कॉमनवेल्थमधील बहुतेक राष्ट्रात बंदी होती; जी धार्मिक अधिपतींच्या दबावामुळे लादली गेली होती. उदाहरणार्थ सोबत छापलेल्या पत्राची नक्कल पडताळून पहा. हे पत्र ऑस्ट्रेलियात यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी घालण्याच्या काही दिवस आधी सिडनेच्या आर्चबिशप (जे नंतर कार्डिनल झाले) यांनी लिहिलेले आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या उच्च न्यायालयात या बंदीबद्दल आव्हान दिले गेले त्यावेळी खटला चालविणाऱ्‍या न्यायाधिशांनी, न्यायमूर्ती स्टार्क यांनी तिचे वर्णन जुलमी, लहरी, अन्यायी अशा शब्दात केले. ती बंदी जून १४, १९४३ रोजी उठविण्यात आली आणि सरकारला नुकसान भरपाई करण्याचा आदेश देण्यात आला. अलिकडील वर्षांत, आफ्रिका आणि आशियातील अनेक सत्तावरील वाढलेल्या धार्मिक दबावामुळे त्याचा परिणाम यहोवाच्या साक्षीदारांवर निर्दय दडपशाही लादण्यात दिसतो. अशाप्रकारे आधुनिक शौल—ख्रिस्ती धर्मराज्यातील पाद्रीगट—याने देवाच्या लोकांस सतत आपली शिकार बनविले आहे.

१७. या सततच्या राजकीय-धार्मिक दबावांना यहोवाचे साक्षीर कसे तोंड देत आहेत? (ब) सबंध जगातील साक्षीदारांतील ऐक्याने कशाचे प्रदर्शन होत आहे?

१७ सध्याच्या १९८० च्या काळात या राजकीय तसेच धार्मिक दबावांना यहोवाचे साक्षीदार कसे तोंड देत आहेत? जसे दावीदाने गल्याथाला आणि दावीद व योनाथानाने जसे शौल राजाला तोंड दिले तसेच हे देखील करतात. सार्वभौमत्वाच्या वादविषयात ते निर्भिडपणे व निश्‍चयाने, तटस्थपणे ते आपल्या सत्वपरिक्षणात टिकून आहेत कारण ते हे जाणतात की, केवळ देवराज्याचाच विजय होणार. (दानीएल २:४४) छळास तोंड देत असता ते एकीने सामना करतात व जिचे जगाला पूर्वी कधीही दर्शन झाले नाही अशा आंतरराष्ट्रीय प्रीतीच्या बंधनाने एकमेकांना प्रोत्साहन देत असतात. ते युद्धकाळात तटस्थ राहून दुसऱ्‍या देशातील आपल्या समविश्‍वासू बंधूंचे रक्‍त सांडत नाहीत. (मीखा ४:३, ५) याकरवी ते हे प्रदर्शित करतात की, “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा,” असे ज्याविषयी येशूने म्हटले होते तो गट ते स्वतः आहेत. (योहान १३:३५) विश्‍वबंधुत्वात, यहोवाच्या साक्षीदारांनी, “पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती” सर्व गोष्टीत अंगी ल्यालेली आहे. हेच ते बंधन आहे जे सर्व वंश, जाती आणि राष्ट्रभेदावर मात करते.—कलस्सै ३:१४.

“उत्कट प्रीती” दाखविणे

१८. (अ) योनाथानाठायी दाविदाबद्दल जे प्रेम होते त्याची साम्यता आज कशात दिसून येते आणि त्याचा पुरावा काय आहे? (ब) दाविद वर्गाने जी बिनातडजोड भूमिका राखली तिचा सबंध जगात काय परिणाम दिसून आला?

१८ हे आठवा की, “योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी एवढे जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला” होता. या “शेवटल्या काळी” याविषयी केवढी अप्रतिम साम्यता आढळते बरे! (२ तीमथ्य ३:१, १४) या हिंसक युगातील मूर्खपणाच्या गोंधळात यहोवाच्या साक्षीदारांचा असा एकमेव गट आहे की ज्यांनी आपसात प्रीतीयुक्‍त विश्‍वएकता टिकवून ठेवली आहे. ख्रिस्ती तटस्थ या नात्याने ते सबंध मानवजातीचा सर्वथोर प्रभु म्हणून त्यांच्या सृष्टीकर्त्यास बहुमान देतात. (स्तोत्रसंहिता १००:३) पण तेच, आधुनिक “रेफाईम”—“गल्याथ”चे राजकीय मित्रपरिवार—आध्यात्मिक इस्राएलांची सतत अवहेलना करीत आहेत. (२ शमुवेल २१:२१, २२) तसेच आधुनिक शौल—ख्रिस्ती धर्मराज्यातील पाद्रीगट—कदाचित असाच दावीद व योनाथान वर्गास सतावीत राहील. (१ शमुवेल २०:३२, ३३) पण “युद्ध यहोवाचे आहे.” तोच सार्वभौम प्रभू असल्यामुळे आपल्या निष्ठावंत सेवकासाठी या युद्धात निर्णायक विजय प्राप्त करणार. दावीदवर्गाची बिनातडजोड भूमिका न्याहाळून सर्व राष्ट्रातून योनाथान गटाचे लाखोजन सामोरे येऊन त्यांना मिळाले आहेत. यात पूर्वीचे छळकर्तेहि आहेत. हे सर्व ख्रिस्ताच्या ‘प्रीतीच्या पताक्याखाली’ एकवटलेले आहेत.b—१ शमुवेल १७:४७; गीतरत्न २:४.

१९, २०. (अ) इ. स. १९७९-८८ च्या दशकात साक्षीदारातील वाढीचा पल्ला केवढा होता? (ब) मग असे का म्हणता येऊ शकते की साक्षीदार हेच असे लोक आहेत जे सबंध जगात खऱ्‍या ऐक्यातील लोक आहेत, आणि ह्‍या कारणास्तव कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

१९ या लाखो साक्षीदारांच्या विस्तारीत कार्याविषयीचा पडताळा तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांचे १९८९ चे वार्षिक अहवाल पुस्तक यात करता येईल. १९७९-८८ या दशकात देवाच्या प्रस्थापित राज्याची सुवार्ता गाजविणाऱ्‍या प्रचारकांची संख्या २१,८६,०७५ पासून ३५,९२,६५४ पर्यंत ६४.३ टक्क्यांनी वाढली आहे. सबंध जगात, एका विश्‍वासाचे, देवाकरता सामाईक सेवा करणारे आणि पवित्र शास्त्रातील नैतिक मूलतत्त्वांना एकविचाराने वाहून घेतलेले हेच लोक आहेत. अशा या एकजुटीच्या आंतरराष्ट्रीय गटालाच येशूचे ते शब्द आज लागू पडतातः “जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.”—योहान १५:१०; पडताळा १ करिंथकर १:१०.

२० ते जरी २०० पेक्षा अधिक भाषेत प्रचारकार्य करीत असले तरी हे यहोवाचे साक्षीदार देवाची सेवा “खांद्याला खांदा लावून” करीत असताना सत्याची “शुद्ध वाणी” बोलतात. यामध्ये ते दावीद आणि योनाथान यांच्या प्रीतीयुक्‍त उदाहरणाचे अनुकरण करतात. (सफन्या ३:९; १ शमुवेल २०:१७; नीतीसूत्रे १८:२४) आपले जर अद्याप देवाच्या लोकांसोबत संघटन झाले नसेल तर आधुनिक योनाथान वर्गात स्थान मिळवावेसे आपणाला वाटणार नाही का? हे ध्येय तुम्ही आपल्यासाठी ठेवू शकता आणि ते गाठण्यात यहोवाचे साक्षीदार आपणाला मदत देत असताना आपणावर उत्कट प्रीती दाखवतील.

[तळटीपा]

a  याविषयीचे सुंदर उदाहरण यहोवाच्या साक्षीदारांचे १९७२ चे वार्षिक अहवाल पुस्तक यात पृष्ठ २१६ परिच्छेद ३ ते पृष्ठ २१७ परिच्छेद ३ पर्यंत कथित करण्यात आले आहे.

b  यहोवाच्या साक्षीदारांचे १९८८ चे वार्षिक अहवाल पुस्तक पृष्ठे १५०-४ पहा.

उजळणीसाठी प्रश्‍न

◻ योनाथानाने दाविदावरील निष्ठावंत प्रीती कशी व्यक्‍त केली?

◻ दावीद आणि योनाथान यांच्यामधील प्रीती कोणत्या प्रकारच्या प्रीतीचे प्रतिबिंब पाडीत होती?

◻ शौल राजाने दाविदाचा पिच्छा पुरवला तसा प्रकार ख्रिस्ती धर्मराज्याच्या पाळकांनी कसा आचरला?

◻ योनाथान दाविदावर जशी प्रीती करी तिची उपमा आज कोणास देता येईल?

◻ जगात साक्षीदारांतील एकता कशाचे प्रदर्शन करते?

[२७ पानांवरील चौकट]

पत्राचे भाषांतर

तुम्ही, मि. जेनिंग्स या पार्लमेंट सदस्यांनी तुम्हाला लिहिलेल्या विषयाबाबत जे ९ तारखेचे पत्र मला पाठवलेत त्याविषयी मी तुमचे आभार मानतो.

ज्याविषयी तुम्हाला लिहिण्यात आले आहे त्या नाजूक प्रकरणाच्या बाबतीत आवश्‍यक ती काळजी घेणे हे अत्यावशक आहे.

तरीपण तुम्हाला, हे लोक ख्रिस्ती धर्माच्या तत्वप्रणालींचा प्रसार करीत आहेत याविषयी शंका वाटत आहे तर त्याविषयीचा जो निर्वाळा तुम्ही द्याल तो यांच्या कामावर न देता वस्तुस्थितीवर द्यावा असे मी अगदी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो. वस्तुस्थिती पाहता यावी याकरता मी या लोकांची प्रकाशने व त्यांची उक्‍ती आणि कृती याविषयी न्यू साउथ वेल्स येथील पोलिसांनी जो ऐवज दिला आहे तो यासोबत जोडत आहे. ख्रिस्ती धर्माच्या विरुद्ध यापेक्षा आणखी काही असू शकेल याचा विचारच येत नाही.

न्यू साउथ वेल्सच्या पोलिस आयुक्‍तांनी ही आशा व्यक्‍त केली आहे की, कॉमनवेल्थचे पदाधिकारी या विशिष्ट संस्थेला बेकायदेशीर असल्याचे घोषित करतील म्हणजे पोलिसांना या संस्थेविरुद्ध अधिक प्रभावी शासन लागू करता येईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा