येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या वेळी मुक्तता
“आनंद करा . . . म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल.”—१ पेत्र ४:१३.
१. यहोवाने त्याच्या सेवकांना कसे संपन्न केले आहे?
यहोवाने त्याच्या साक्षीदारांना अनेक देणग्यांनी संपन्न केले आहे. आमचा महान शिक्षक या नात्याने, त्याची इच्छा व उद्देशाच्या पूर्ण माहितीचे ज्ञान त्याने आम्हाला दिले आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे धैर्याने प्रकाश पाडण्याची क्षमता आमच्यामध्ये उत्पन्न केली आहे. प्रेरित प्रेषित पौल आम्हाला १ करिंथकर १:६, ७ मध्ये असे सांगतो: “ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हांमध्ये दृढमूल झाली, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रगट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानांत उणे पडला नाही.”
२. “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे प्रगट होणे” कोणते आनंदी भवितव्य राखून आहे?
२ “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे प्रगट होणे”—याचा काय अर्थ होतो? येशूला जेव्हा वैभवी राजा म्हणून प्रकट केले जाईल, त्याच्या विश्वासू शिष्यांना प्रतिफळ देण्याचे आणि अभक्त लोकांविरुद्ध सूड घेण्याच्या काळाला हे चित्रित करते. १ पेत्र ४:१३च्या स्पष्टतेनुसार, आत्म्याने अभिषिक्त ख्रिश्चनांना सत्वनिष्ठा राखण्याचा आणि मोठ्या लोकसमुदायाच्या त्यांच्या निष्ठावान सोबत्यांना “उल्लास आणि आनंद” करण्याचा तो काळ असेल कारण तो सैतानी व्यवस्थेच्या अंताला चित्रित करतो.
३. थेस्सलनीकाकरातील आमच्या बांधवांप्रमाणे आम्ही दृढ कसे उभे राहिले पाहिजे?
३ वेळ जसजसा जवळ येत आहे, तसे रागाच्या भरात सैतान आपल्यावर दबावाचा जोर वाढवत आहे. गर्जनाऱ्या सिंहाप्रमाणे, आम्हाला गिळण्यास तो पाहत आहे. आम्ही दृढ उभे राहिले पाहिजे! (१ पेत्र ५:८-१०) सत्यामध्ये नवे असताना, प्राचीन थेस्सलनीकाकराच्या मंडळीतील आमच्या बांधवांनी, आजच्या अनेक यहोवाच्या साक्षीदारांनी अनुभवलेल्या संकटासारखाच क्लेश सहन केला. यास्तव, त्यांच्यासाठी प्रेषित पौलाने लिहिलेले शब्द आम्हासाठी अगदी अर्थपूर्ण आहेत. त्याने असे लिहिले: “तुम्हांवर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांस आम्हांबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गांतून अग्निज्वालेसहित प्रगट होईल तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.” (२ थेस्सलनीकर १:६-८) होय, सुटका निश्चित येईल!
४. येशूच्या प्रकट होण्याच्या समयी पाळक वर्गावर दंड बजावण्यास ते लायक का आहेत?
४ पौलाच्या काळी बहुतेक छळ यहूदी धार्मिक नेत्यांकडून होता. त्याचप्रमाणे आज, देवाच्या प्रतिनिधीत्त्वाचा दावा करणारे विशेषत: ख्रिस्तीधर्म राज्याचा पाळक वर्ग यहोवाच्या शांतीप्रिय साक्षीदारांचा छळ करण्यासाठी प्रोत्साहन देतो. ते देवाला ओळखण्याचे ढोंग करतात, परंतु पवित्र शास्त्राच्या “अनन्य परमेश्वराला [यहोवा न्यू.व.]” नाकारतात व त्याच्या बदली गूढ त्रैक्य मानतात. (मार्क १२:२९) आमच्या प्रभू येशूच्या सुवार्तेचे पालन ते करत नाहीत तर मुक्तता मिळण्यासाठी मानव सरकाराकडे पाहतात, व ख्रिस्ताच्या येणाऱ्या धार्मिक राज्याच्या सुवार्तेचा धिक्कार करतात. ह्या सर्व धार्मिक विरोधकांचा “स्वर्गातून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी” नाश झालाच पाहिजे!
येशू ख्रिस्ताचे “येणे”
५. मत्तय २४:२९, ३० मध्ये येशूच्या प्रकट होण्याचे हुबेहूब वर्णन कसे केले आहे?
५ येशूने त्या प्रकटीकरणाचे मत्तय २४:२९, ३० मध्ये हुबेहूब वर्णन केले आहे. त्याच्या उपस्थितीचे आणि युगाच्या समाप्तीच्या चिन्हांच्या विविध गुणलक्षणांचे वर्णन देताना तो म्हणतो: “सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील.” त्यासमयी “मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल.” सर्व जातीचे लोक “शोक करतील, आणि ते मनुष्याच्या पुत्राला [देवाचा मशीही राजा] आकाशातल्या मेघांवर आरुढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘येताना’ पाहतील.” ग्रीक मध्ये एर․खोʹमे․नन, “येणे” यहोवाचा समर्थक या नात्याने येशूच्या प्रकटीकरणाला ते सूचित करते.
६, ७. “प्रत्येक डोळा त्याला पाहील” ते कसे, व ह्यात कोणाकोणाचा समावेश आहे?
६ प्रेषित योहानाने देखील प्रकटीकरण १:७ मध्ये “येणे” याचे वर्णन दिले आहे, जेथे तो म्हणतो: “पाहा, तो मेघासहीत येतो.” अहो, ते शत्रू येशूला त्यांच्या वास्तविक डोळ्यांनी पाहणार नाहीत, कारण “मेघ” चित्रित करतात की तो न्यायदंड बजावण्यासाठी अदृश्यरुपात येतो. सर्वसाधारण मानवांनी त्याची स्वर्गीय महिमा त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहिली तर, दिमिष्काच्या रस्त्यावर वैभवी येशू शौलासमोर प्रखर चकाकणाऱ्या प्रकाशात प्रकट झाला तेव्हा शौल जसा अंधळा झाला त्याप्रकारे त्यांना अंधत्व येईल.—प्रे. कृत्ये ९:३-८; २२:६-११.
७ प्रकटीकरणाचा अहवाल स्पष्ट करतो की “प्रत्येक डोळा त्याला पाहील ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील; आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे उर बडवून घेतील.” ह्याचाच अर्थ असा होतो की पृथ्वीवरील विरोधकांना नाशाच्या समयी कळून येईल की येशू यहोवाचा दंडाधिकारी म्हणून मोठ्या सामर्थ्याने आणि महिमेत येऊन त्यांच्यावर हा वर्षाव करत आहे. “ज्यांनी त्याला भोसकले” असे त्याच्या शत्रूंचे वर्णन का केले आहे? कारण यहोवाच्या सेवकांविषयी त्यांची कटु मनोवृत्ती येशूचा छळ करणाऱ्यांसारखी आहे. निश्चितच, ते ‘त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.’
८. अकस्मात येणाऱ्या नाशाबद्दल येशू आणि पौलाने कोणता इशारा बजावला आहे?
८ यहोवाचा तो सूडाचा दिवस कसा येईल? लूक २१ अध्यायातील भविष्यवाणीत, येशू अशा महासंकटाच्या घटनांचे वर्णन देतो जे १९१४ पासून त्याच्या उपस्थितीचे चिन्ह पुरवितात. आणि मग, ३४ आणि ३५ वचनात येशूने असा इशारा दिला: “तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित, अधाशीपणा, दारुबाजी व सांसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतकरणे भारावून जाऊन तो दिवसभर तुम्हांवर पाशाप्रमाणे आकस्मात येईल. कारण तो अवघ्या ‘पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल.’” होय, यहोवाचा तो सूडाचा दिवास अचानक, तत्काळ येतो! प्रेषित पौल याची पुष्टी १ थेस्सलनीकाकर ५:२, ३ मध्ये पुरवितो, तो म्हणतो: “जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा त्यांचा अकस्मात नाश होतो.” आजही राष्ट्रे शांती आणि सुरक्षिततेविषयी बोलणी करीत आहेत आणि लष्करी बळाद्वारे त्रासाच्या ठिकाणांची माहिती काढून संयुक्त राष्ट्रसंघाला बळकटी आणीत आहे.
९. कोणासाठी ‘प्रकाश चकाकत’ आहे, व का?
९ प्रेषित पौल आम्हाला ४ आणि ५ वचनांमध्ये, पुढे सांगतो: “बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधकारात नाही. कारण तुम्ही सर्व प्रकाशाची प्रजा [पुत्र न्यू.व.] व दिवसाची प्रजा [पुत्र न्यू.व.] आहा. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.” प्रकाशाचे पुत्र होण्यास व—देवाच्या नवीन जगात खरी शांती आणि सुरक्षिततेची उत्कंठा बाळगणाऱ्यांसाठी ज्योती वाहक असे होण्यास आम्हाला आनंद वाटतो. स्तोत्रसंहिता ९७:१०, ११ मध्ये आपण असे वाचतो: “अहो परमेश्वरावर [यहोवा न्यू.व] प्रीति करणाऱ्यांनो वाईटाचा द्वेष करा; तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करितो. तो त्यास दुर्जनांच्या हातातून सोडवितो, नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरिला आहे.”
घटनांचा क्रम
१०. देवाच्या बदला घेण्याच्या दिवसाच्या संबंधाने कोणत्या आगाऊ सूचनेकडे आम्ही लक्ष दिले पाहिजे? (प्रकटीकरण १६:१५)
१० मोठ्या संकटाचा तडाखा बसल्यावर घटनांच्या क्रमाची स्थिती काय होईल? चला आपण प्रकटीकरणाचा १६वा अध्याय पाहू या. तेरा ते सोळा वचनांमध्ये जे काही वर्णन दिले आहे याकडे जरा लक्ष द्या की, अशुद्ध आणि भूतांच्या आत्म्यांनी संपूर्ण जगातील राष्ट्रांस हर्मगिदोन, सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई यासाठी एकत्र केले. पुन्हा एकदा चोरासारखा येणाऱ्या बदला घेण्याच्या दिवसावर जोर दिला आहे, तारणाची ओळख दाखवणारे आध्यात्मिक वस्त्र नेहमी परिधान केले असावेत—यासाठी आम्हाला जागृत राहण्याचा इशारा दिला आहे. पृथ्वीवरच्या लोकांचा, राष्ट्रांचा आणखी—कोणाचातरी न्याय करण्याची वेळ आली आहे. कोण असेल ती?
११. प्रकटीकरण १७:५ मधील स्त्रीने तिची ओळख कशी दिली आहे?
११ ती एक लाक्षणिक स्त्री आहे जिने स्वत:ला “कोणीतरी महत्त्वाचे” बनवण्याचा प्रयत्न केला. प्रकटीकरण १७:५ मध्ये तिचे वर्णन “मोठी बाबेल, कलावंतिणीचा व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई, हे गूढ अर्थाचे नाव लिहिले” असे दिले आहे. परंतु ती यहोवाच्या साक्षीदारांकरीता गूढ राहिलेली नाही. तिने स्वत:ची ओळख खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य अशी दिली आहे, ज्यामध्ये ख्रिस्तीधर्म राज्याचे पंथ मुख्य भाग बनतात. यहोवाच्या नजरे समोर तिचे राजनैतिक बाबींमध्ये लुडबूडणे, खऱ्या ख्रिश्चनांचा छळ करुन “पवित्र जनांच्या रक्ताने मस्त” होणे आणि “पृथ्वीवर वधलेल्या सर्वांच्या” रक्ताबद्दल ज्यामध्ये २० व्या शतकातच झालेल्या युद्धांमध्ये दहा कोटीपेक्षा अधिक लोकांना ठार मारल्याबद्दल तिचे जबाबदार असणे या सर्व गोष्टी घृणित आहेत.—प्रकटीकरण १७:२, ६; १८:२४.
१२. ख्रिस्तीधर्म राज्याच्या पंथांना का धिक्कारण्यात आले?
१२ ह्याहूनही बिकट, ख्रिस्तीधर्म जगताच्या पंथांनी देवाच्या नामावर ज्याला ते ओळखतात असा ढोंगीपणाचा दावा करुन काळीमा आणला आहे. देवाच्या शुद्ध वचनाऐवजी त्यांनी बाबेली आणि ग्रीकांचे तत्त्वज्ञान शिकवले आहे आणि पवित्र शास्त्र ज्याला तुच्छ मानते अशा लैंगिक स्वातंत्र्याच्या जीवन शैलीला मान्यता देऊन सर्व राष्ट्रांच्या नैतिक अपराधाला साथ दिली आहे. त्यांच्यातील हावरे व्यापारी याकोब ५:१-५ मधील शब्दांनी धिक्कारलेले ठरले: “अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली.”
मोठ्या बाबेलसोबत नाश!
१३. मोठ्या संकटाची सुरवात कशी होते, आणि प्रकटीकरण १८:४, ५ मध्ये कोणत्या निकडीवर जोर दिला आहे?
१३ मोठ्या बाबेलवर यहोवाचा न्यायदंड बजावण्याने मोठ्या संकटाची सुरवात सुरु होते. प्रकटीकरण १७:१५-१८ वचने “दहा शिंगे,” म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ “श्वापदा”च्या आत असणाऱ्या बहुराष्ट्रीय प्रबळ सत्तांमध्ये तिचा नाश करण्यासाठी देव कसे आपले “विचार” घालील याचे चित्ररुप वर्णन देते. “जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कलावंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील. तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील. अशा इराद्याने कृति करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले.” प्रकटीकरण १८:४, ५ मध्ये एक स्वर्गीय वाणी निकडीचा इशारा करते यात काही आश्चर्य नाही: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोंहचली आहे आणि तिची अनीति देवाने लक्षात घेतली आहे.” हे बोलावणे पुढे म्हणते: उशीर होण्याआधी खोट्या धर्मापासून सर्व संपर्क तोडा!
१४. मोठ्या बाबेलच्या नाशाच्या वेळी कोण शोक करतील व का?
१४ मोठ्या बाबेलच्या नाशाकडे जग कोणत्या दृष्टीने पाहील? दूर उभे राहून, भ्रष्ट राजनैतिक पुढारी—“पृथ्वीवरील राजे”—तिच्यासाठी दु:ख करतील कारण त्यांनी अनेक शतके त्यांच्या आध्यात्मिक व्यभिचारात परस्पर आनंद मिळविला आहे. “तिच्या योगाने धनवान झालेले . . . व्यापारी” तिच्यासाठी रडतात ऊर बडवून घेणारे देखील लोभी व्यापारी आहेत. तेही स्वत:ला तिच्यापासून दूर करत म्हणतात: “अरेरे पाहा ही मोठी नगरी, तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोत्ये ह्यांनी शृंगारलेली नगरी! एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.” पाळकांचा तो भपकेदार पोषाख आणि जगातील भव्य चर्च सर्वकाळासाठी गेलेली असणार! (प्रकटीकरण १८:९-१७) परंतु काय सर्वचजण मोठ्या बाबेलकरता शोक करतील?
१५, १६. देवाच्या लोकांना हर्ष करण्याचे कोणते कारण असेल?
१५ प्रकटीकरण १८:२०, २१ याचे उत्तर देते: “हे स्वर्गा; अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी आनंद करा कारण देवाने तिला दंड करुन तुम्हाला न्याय दिला आहे.” मोठ्या तळीसारखा धोंडा उचलून समुद्रात फेकल्याप्रमाणे “ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व ह्यापुढे ती कधीही सापडणार नाही.”
१६ किती आनंदाचे हे कारण! प्रकटीकरण १९:१-८ ह्याची ग्वाही देते. स्वर्गातून चार वेळा “हालेलूया” हे बोल ऐकू येतात. यातील पहिले तीन “हालेलूया” यहोवाची स्तुती करतात कारण त्याने कुविख्यात वेश्या, मोठ्या बाबेलवर धार्मिक न्यायदंड बजावला आहे. खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य आत्ता राहिले नाही! देवाच्या सिंहासनातून एक वाणी येते, ती म्हणते: “सर्व लहान थोर दासांनो, आमच्या देवाचे स्तवन करा.” ते गाणे गाण्याचा आमचा किती सुहक्क असेल!
कोकऱ्याचे लग्न
१७. प्रकटीकरण ११:१७ आणि १९:६ची तुलना करताना, कोणत्या दोन संदर्भात यहोवा राजा म्हणून राज्य करू लागतो?
१७ चौथा हालेलूया दुसरा एक विषय सादर करतो: “हालेलूया, कारण सर्वसमर्थ आमचा प्रभू देव [यहोवा न्यू.व.] याने राज्य हाती घेतले आहे.” परंतु प्रकटीकरण ११:१७ मध्ये त्याच प्रकारचे वाक्य नाही काय? आपण तेथे वाचतो: “हे प्रभू देवा [यहोवा न्यू.व.] तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहे आणि राज्यारुढ झाला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.” होय. तथापि, प्रकटीकरण ११:१७ चा संदर्भ “सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य” करण्यासाठी १९१४ मध्ये यहोवाचे मशीही राज्याच्या आणण्याला ते सूचित करते. (प्रकटीकरण १२:५) प्रकटीकरण १९:६ मोठ्या बाबेलच्या नाशाच्या संदर्भात आहे. वेश्यासारख्या धर्माचे उच्चाटन केल्याने यहोवाचे देवत्वाचे समर्थन होते. अनंतकाळासाठी त्याची सर्वश्रेष्ठ सार्वभौम आणि राजा म्हणून भक्ती सदासर्वकाळासाठी राहील!
१८. मोठ्या बाबेलला दूर केल्यामुळे कोणत्या हर्षभरित घोषणेसाठी मार्ग तयार होतो?
१८ यास्तव, ही हर्षभरित घोषणा केली जाऊ शकते: “आपण आनंद व उल्लास करु व त्याचे गौरव करु; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वत:ला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे; ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.” (प्रकटीकरण १९:७, ८) पृथ्वीवर उरलेले अभिषिक्त त्यांचे स्वर्गीय पुनरुत्थान केव्हा प्राप्त करतील हे अजून स्पष्ट केलेले नाही. परंतु ह्या संदर्भात आम्हाला याची हमी मिळते की कोकऱ्याच्या, येशू ख्रिस्ताच्या लग्नात त्यांचा भाग हर्षाचा काळ असेल, ह्याहूनही अधिक म्हणजे त्यांनी कुविख्यात वेश्या, मोठ्या बाबेलचा नाश प्रथमत: पाहिलेला असेल.
सैतानाच्या जगाचा नाश झाला
१९. प्रकटीकरण १९:११-२१ मध्ये इतर कोणत्या घडामोडीचे वर्णन दिले आहे?
१९ प्रकटीकरण ६:२ मध्ये उल्लेखलेला श्वेत घोडा पुन्हा एकदा दृष्टीसमोर येतो. प्रकटीकरण १९:११ मध्ये आपण असे वाचतो: “एक पांढरा घोडा आणि विश्वासनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतिने न्यायनिवाडा करितो व लढतो.” यास्तव “राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू” राष्ट्रांना तडाखा देण्यासाठी आणि “सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तुडविण्यासाठी” स्वार होतो. “पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये” हर्मगिदोनाचे युद्ध करण्यासाठी एकत्र होतात ते व्यर्थ ठरते. पांढऱ्या घोड्याचा स्वार त्याचा विजय पूर्ण करतो. सैतानाच्या पार्थिव संघटनेचे काही एक राहात नाही.—प्रकटीकरण १९:१२-२१.
२०. स्वत: दियाबलावर काय गुदरते?
२० परंतु स्वत: दियाबलाविषयी काय? प्रकटीकरण २०:१-६ मध्ये ख्रिस्त येशूचे “एक देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्या जवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता” असे वर्णन केले आहे. तो अजगराला, जुनाट साप, जो दियाबल सैतान आहे त्याला धरतो, बांधतो, अथांग डोहात टाकतो, आणि वरून बंद करून त्यावर शिक्का मारतो. सैतानाला मार्गातून हटविल्याने तो राष्ट्रांना आणखी ठकवू शकत नसल्यामुळे, कोकऱ्याची हजार वर्षांची वैभवी राजवट आणि त्याची वधू सुरळीत जातात. ऐथून पुढे दु:खाचे अश्रू नसणार! आदामापासून आलेले मरण नसणार! शोक, विलाप, पीडा नसणार! “पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.
२१. येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची आपण अतुरतेने वाट पाहत असताना, आमचा काय निश्चय असला पाहिजे?
२१ आमच्या प्रभू येशूच्या प्रकट होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असताना, देवाच्या प्रेमळ राज्य अभिवचनांबद्दल इतरांना सांगण्यात आपण आवेश दाखवू या. मुक्तता नजिक आहे! सार्वभौम प्रभू यहोवाची प्रज्वलित मुले या नात्याने आपण सतत पुढे चालत राहू या!
उजळणी
▫ येशू ख्रिस्ताचे प्रकट होणे जवळ आहे हे काय सूचित करते?
▫ यहोवाचा सूडाचा दिवस कसा उगवेल?
▫ सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे ‘यहोवाच्या प्रेमिकांनी’ कोणत्या दृष्टीने पाहावे?
▫ महासंकटाचा तडाखा बसल्यानंतर घटनांचा क्रम काय असेल?
[चित्र]
न्यायदंड बजावण्यासाठी येशू अदृश्यरुपात ‘मेघांसहित येतो’
[चित्र]
लवकरच खोटा धर्म, सैतानाची दुष्ट व्यवस्था, आणि स्वत: सैतान नाहीसा केला जाईल