वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ५/१ पृ. ३
  • खोटा धर्म वेश्‍येची भूमिका करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खोटा धर्म वेश्‍येची भूमिका करतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिक वेश्‍यागमन अतिवाईट
  • “मी तुझ्या अनैतिक कामांचा अंत करीन”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • ही समस्या का वाढत आहे?
    सावध राहा!—२००३
  • कुविख्यात कलावंतीणीचा न्याय करणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • “एक पाशवी गुन्हा”
    सावध राहा!—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ५/१ पृ. ३

खोटा धर्म वेश्‍येची भूमिका करतो

१. पुष्कळांना वेश्‍याव्यवसाय कसा वाटतो?

कळवंतीण, वेश्‍या किंवा धंदेवाली—याला काहीजण जुना व्यवसाय संबोधितात. हे सर्व शब्द, पुरुषासाठी स्वतःचे शरीर विकणाऱ्‍या अनैतिक स्त्रीला संदर्भित करणारे आहेत तरी त्यांचा एकच अर्थ आहे. तथापि, असाही एक काळ होता जेव्हा यास सन्माननीय गणले जात होते!

२, ३. पुरातन बाबेलात स्त्री-याजकांनी, यहोवाने इस्राएलांना पुरुष व स्त्रियांच्या वेश्‍येपणाबद्दल दिलेल्या कायद्याच्या भिन्‍नतेत कोणती भूमिका केली होती?

२ पुरातन बाबेलच्या याजकत्वाबाबत बोलताना प्राध्यापक एस. एच. हुक हे पवित्र शास्त्र पुराणवस्तु संशोधक म्हणतातः “याजकपण पुरुषांसाठी मर्यादित नव्हते. मोठ्या मंदिरातील कर्मचाऱ्‍यात स्त्रियांनीही आपला जम बसवला होता. स्त्री-याजकातील एक असणे हे प्रतिष्ठेचे मानले जात होते व यासाठीच पुष्कळ राजांनी आपल्या मुलींना याजकीय हाकेसाठी समर्पित केलेले आम्ही ऐकतो. . . . श्रेष्ठ हंगामाच्या सणात त्यांचे महत्वपूर्ण काम पवित्र वेश्‍या म्हणून होते. . . . इश्‍थर देवी [भरघोस पीक व युद्धाची देवता] हिचे मंदिर अशा स्त्रियांची सेना सामावून होते हे उघड आहे.”

३ इस्राएल राष्ट्र यहोवा देवास जी भक्‍ति देत ती यापेक्षा अगदी भिन्‍न अशी होती. नियमाने अगदी स्पष्टरित्या त्यांना सांगितले होतेः “कोणाही इस्राएल कन्येने मंदिरातील वेश्‍या होऊ नये, तसेच कोणीही इस्राएल पुत्रांनी मंदिरातील वेश्‍या बनू नये [समलिंगी समागम करुन घेणारे]. वेश्‍येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या कमाईचा पैसा नवस फेडण्यासाठी कोणीही आपला देव यहोवाच्या मंदिरात आणू नये; कारण या दोन्ही गोष्टींचा तुझा देव यहोवा याला वीट आहे.” (अनुवाद २३:१७, १८) अशाप्रकारे, देवाच्या पवित्रस्थानात दान म्हणून वेश्‍येची कमाई अमान्य होती. तसेच कोणताही धार्मिक अर्थ अभिप्रेत न करणारे वेश्‍यागमन देखील लाजिरवाणे होते. इस्राएलांना आज्ञापिले होतेः “आपल्या कन्येस भ्रष्ट करवून वेश्‍या होऊ देऊ नका, ज्यामुळे देश वेश्‍यागमन करणार नाही व अक्षरशः अनीतीने भरुन जाणार नाही.” वेश्‍या व्यवसाय व समलिंगी संभोग ज्यांस “वीट आणणारी गोष्ट” असे वर्णिले आहे, ते राष्ट्रासाठी आध्यात्मिक व शारिरीकदृष्ट्या संरक्षण असे होते.—लेवीय १९:२९; २०:१३.

आध्यात्मिक वेश्‍यागमन अतिवाईट

४. वेश्‍येपणाचा घृणित प्रकार कोणता आहे?

४ तथापि, देवाच्या दृष्टीकोणातून अजूनही घृणित प्रकारातील वेश्‍यागमन आहे. ते आहे, आध्यात्मिक वेश्‍यापण, किंवा खऱ्‍या देवाची भक्‍ति करीत असल्याचा दावा करीत असताना अक्षरशः इतर देवांना भक्‍ति व आपुलकी दाखविणे. पुरातन यरुशलेमाने अशा वेश्‍येगिरीत आणखी एक पाऊल उचलले होते. त्याजशी आध्यात्मिक व्यभिचार केलेल्या, खऱ्‍या भक्‍तिस भ्रष्टावणाऱ्‍या राष्ट्रांना त्याने नजराणेही दिले!—यहेज्केल १६:३४.

५, ६. या २० व्या शतकात कोण आध्यात्मिक वेश्‍यागिरी करीत आहे, व यामुळे कोणते प्रश्‍न सामोरे येतात?

५ या २० व्या शतकातही जगाच्या धार्मिक वातावरणात आध्यात्मिक वेश्‍यागमन सामान्य आहे. ख्रिस्ती राष्ट्रसमूह हा त्या जगतातील, पवित्र शास्त्र जिला “मोठी बाबेल, वेश्‍येची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई” असे म्हणते त्याचा सर्वप्रमुख भाग आहे.—प्रकटीकरण १७:५.

६ परंतु मोठ्या बाबेलची अंतिम कर्मगति काय आहे? त्या अंतिम परिणामाचा प्रभाव तुम्हावर व तुमच्या प्रियजनावर कसा होईल? प्राचीन इस्राएलात देवाने वेश्‍यांना प्रतिकूल न्याय दिला होता तर मग तो आधुनिक आध्यात्मिक वेश्‍येबद्दल काय करणार? या व इतर संबंधित प्रश्‍नांचे परिक्षण यानंतरचे लेख करतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा