वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ४/१ पृ. ७-९
  • बाबेलोन—खोट्या उपासनेचे केंद्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बाबेलोन—खोट्या उपासनेचे केंद्र
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बाबेलोन—खऱ्‍या भक्‍तीचा कट्टर शत्रू
  • बाबेलला धिक्कारले गेले व लज्जा मिळाली
  • मोठी बाबेल पडली, तिचा न्याय करण्यात आला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मोठी नगरी उजाड झाली
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • कुप्रसिद्ध “वेश्‍या” तिचे पतन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • सामर्थ्यशाली बाबेल—तिसरी बलाढ्य जागतिक सत्ता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ४/१ पृ. ७-९

बाबेलोन—खोट्या उपासनेचे केंद्र

“बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ति जमिनीवर आपटून फोडिल्या!” हे बाबेल असे कोणत्या प्रकारचे शहर होते ज्याविषयीचे भाकित यशयाने केले होते? आधुनिक मोठी बाबेल कोण आहे ते ओळखण्याचा हा एक महत्वपूर्ण दुवा आहे.—यशया २१:९.

प्राचीन बाबेल हे विदेशी देवदेवता यांच्या उपासनेविषयी प्रसिद्ध होते. बाबेलोनियन ॲण्ड अस्सेरियन रिलिजन या पुस्तकात प्राध्यापक एस. एच. हूक म्हणतातः “बाबेलोनात ज्या दैवतांची भक्‍ती होत असे त्यात मार्दुकला प्रमुख स्थान असे. . . . नबुखद्‌नेस्सर दुसरा याच्या काळी बाबेलात विशिष्ठ देवांची अठ्ठावन मंदिरे होती. अशाप्रकारची विशिष्ठ देवळे इतर कोणाचीही नव्हती. यामुळे या शहरातील जीवनात पुजाऱ्‍यांना किती महत्व मिळाले होते ते दिसते.” बाबेलोनमध्ये मार्दुक देवाच्या मंदिरात ५५ देवड्या होत्या असे म्हटले जाते. तर आज कितीतरी देवळे, चर्चेस आणि कॅथड्रेलमध्ये दैवत, संत आणि मॅडोनाच्या देवड्या दिसतात त्या किती जुळत्या आहेत बरे!

बाबेलोन हे देवदैवतांविषयी निष्ठा व्यक्‍त करणारे मूर्तिपूजक केंद्र होते. एक अहवाल म्हणतो की, याजक व भक्‍तगण “आपल्या पवित्र मूर्ति सुशोभित करण्यासाठी खूप ध्यान देत. मूर्त्या ह्‍या देवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या आहेत असे ते मानीत. या मूर्त्यांना भारी गोष्टी लेववीत, माळा, उरस्त्राणे आणि आंगठ्या घालीत; त्यांना झोपण्यासाठी मुलायम बिछाना करीत, त्यांची शोभायात्रा ते काढीत, याकरता ते पायी नेत, गाड्या आणि खाजगी बोटींचा वापर करीत.”a आजही हिंदू, बुद्ध आणि कॅथोलिक लोकांत दैवते, संत आणि मॅडोना यांची जी भक्‍ती केली जाते व यांची रस्त्यावर, नदी आणि समुद्रात जी यात्रा निघते ती या गोष्टीशी किती सदृश्‍य आहे बरे!

प्राचीन बाबेल व आधुनिक धर्म यात जी साम्यता दिसते याचे आणखी एक उदाहरण म्हणून त्याच एन्सायक्लोपिडिआतून हे जे वर्णन घेण्यात आले आहे त्याकडे लक्ष द्याः “देवीचे विश्‍वासू भक्‍त तिला गोड नावांनी संबोधितातः ती देवी व स्त्री नाही तर दयाळू माता देखील आहे. ती प्रार्थना ऐकते, मध्यस्ती करते . . . याशिवाय विश्‍वाला आणि मानवास जीवन देते.” ही गोष्ट एल सँटो रोझारियो (पवित्र जपमाळ) याच्या पुढील प्रार्थनेसोबत पडताळाः “हे सार्वभौम राजकुमारी, तुझ्या समृद्ध हातून दर दिवशी आम्हाला जे आशीर्वाद मिळतात त्याकरता आम्ही तुझे उपकार मानतो. माते, आम्हावर दया दाखीव आणि तुझे संरक्षण व तुझा आश्रय आम्हाला सदोदित लाभो.”

हे वर्णन व ही प्रार्थना लक्षात घेता ती कोणाविषयी असावी असे वाटते बरे? बहुतेक लगेच ती, “कुमारी मरीया” असल्याचे निदान करतील. तथापि, लास ग्रांडेस रिलिजन इलट्रेडास आम्हाला कळविते की ते अवतरण समृद्धता, प्रेम व युद्धाचे प्रतीक असणारी बाबेलोन देवता इश्‍थर या “प्रेममय स्त्री” विषयीचे आहे. कधी कधी तिची मूर्ति “बाळास स्तनपान देत असलेल्या मातेच्या” रुपात चितारण्यात येते.b तरीपण हे उदाहरण दाखविते की, आधुनिक धर्म हा प्राचीन बाबेलपासून केवढा वेगळा नाही!

प्राचीन बाबेलात आढळणारी जीवविषयीची विचारधारा, त्याचे देवांचे त्र्येक आणि आजच्या धर्मांत आढळणारे अमर जीव आणि त्र्येक याविषयीचे समांतर विचार याद्वारे देखील आपल्याला आणखी तुलना शोधून काढता येतील. हा सर्व पुरावा आमच्या बुद्धीला हे पटवतो की “मोठी बाबेल” ही सैतानी धर्मसाम्राज्याच्या जगाचे उचित चिन्ह आहे.

बाबेलोन—खऱ्‍या भक्‍तीचा कट्टर शत्रू

बाबेल हे यहोवाचे प्राचीन इस्राएल लोक यांचा व त्यांच्या खऱ्‍या भक्‍तिचा कट्टर शत्रू होते. बाबेलोनने इ. स. पू. ६०७ मध्ये यरुशलेम मंदिराचा नाश केला आणि यहोवाच्या उपासनेसाठी वापरण्यात येणारी सर्व पवित्र भांडी नेली आणि ही भांडी बेलशस्सरच्या मेजवानीत वापरण्यात आली.—दानीएल ५:३, ४.

याचप्रमाणे मोठी बाबेल ही आजच्या काळी खऱ्‍या भक्‍तीची कट्टर विरोधी राहिली आहे. बहुतेक ज्या ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांना छळ अनुभवावा लागला तेथे धर्मपुढाऱ्‍यांचा हात होता. या धर्मपुढाऱ्‍यांनी राजकीय सत्ताधिशांसोबत राखलेल्या मैत्री संबंधातून हा छळ घडवून आणला.

धर्मपुढाऱ्‍यांकरवी प्रेरित असणाऱ्‍या या छळाविषयीचे जुने उदाहरण म्हणून १९१७ ची घटना लक्षात घेता येईल आणि यानंतर असे कित्येक वेळा घडले. त्या वर्षी आंतरराष्ट्रीय पवित्र शास्त्र विद्यार्थी असे ओळखले जाणाऱ्‍या साक्षीदारांनी द फिनिश्‍ड मिस्ट्री नावाचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकातील काही पानाच्या मजकुराचा, त्यावेळी पहिल्या महायुद्धात ग्रस्त असणाऱ्‍या कॅनडाच्या आणि अमेरिकेच्या धर्मपुढाऱ्‍यांनी, हानिकारक असा अर्थ लावला. या प्रकाशनाविषयी त्यांनी आपल्या राजकीय मित्रांना त्वरेने माहिती कळविली. मग परिणाम? प्राध्यापक मार्टीन मार्टी आपल्या मॉडर्न अमेरिकन रिलिजन—द आयरनी ऑफ इट ऑल या पुस्तकात सांगतातः “धर्मपुढारी रसेलाईट [साक्षीदांरां] विरुद्ध उभे राहिले आणि जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांच्या नेत्यांवर [राजद्रोह केल्याच्या आरोपाखातर] वीस वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्याचे समजले तेव्हा त्यांनी आनंदाचा जल्लोष केला.”

पण जेव्हा काहीच महिन्यांनी साक्षीदारांवरील तो आरोप फेटाळून लावण्यात आला व त्यांना दोषमुक्‍त करून सोडून देण्यात आले तेव्हा धर्मपुढाऱ्‍यांची कशी प्रतिक्रिया दिसली? “कर्मठ चर्च सदस्यांकडून कसलाहि आनंद दिसला नाही.” साक्षीदार “धर्माच्या कारणामुळे स्वायत्त सरकारचा विरोध झाला तरी शेवटपर्यंत” पवित्र शास्त्र तत्वांना निष्ठावंतपणे चिकटून राहिले. राजकीय अधिपतींची खुशामत करुन सहवास राखण्याचे धोरण साक्षीदारांनी कधीही स्विकारले नव्हते, जर्मनीतील नाझी राजवटीत तसेच इटली, स्पेन आणि पोर्तुगाल येथील फॅसिस्ट राजवटीतसुध्दा.

बाबेलला धिक्कारले गेले व लज्जा मिळाली

मोठी बाबेल ही, “पवित्र जनांच्या रक्‍ताने व येशूच्या साक्षींच्या रक्‍ताने मस्त झालेली” आहे आणि “तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधिलेल्या सर्वांचे रक्‍त सापडले” असे प्रकटीकरण जेव्हा म्हणते ते अगदी उचितच आहे. जागतिक धर्माने युद्धात घेतलेला सक्रिय भाग व त्याने खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा छळ होण्यात दिलेला हातभार याचा मागमूस आपल्याला बऱ्‍याच शतकांपासून काढता येतो.—प्रकटीकरण १७:६; १८:२४.

खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलने इतिहासभर मोठी चैन आणि सत्ता अनुभविली आहे. पण एका देवदूताने योहानास कळवले की तिचा दिवस मावळणार. अहवाल आम्हास सांगतोः “पडली, मोठी बाबेल पडली! ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.”—प्रकटीकरण १८:२.

पण बाबेल केव्हा पडणार? का ती आधीच पडली आहे? तिचे पतन कोणत्या मार्गाने घडणार? आणि हे तुमच्यावर काय परिणाम करील? हे आणि यासारखे इतर प्रश्‍न टेहळणी बुरुज याच्या पुढील अंकात चर्चिण्यात येतील.

[तळटीपा]

a  लास ग्रांडेस रिलिजन इलट्रेडास (मोठा धर्माचा चित्रमय दृष्टांत) असिरियो-बाबेलोनिका, खंड २०, माटेओ-रिझोली, बार्सेलोना, स्पेन, १९६३, पृष्ठ ५३.

b  खंड १९, पृष्ठे १९, २०.

[८ पानांवरील चित्रं]

मोठ्या बाबेलची मुळे प्राचीन बाबेलोन धर्मात आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा