वेश्या आणि “पृथ्वीवरील राजे”
ख्रिस्ती धर्मराज्याचा इतिहास हा सत्ता गाजविणाऱ्यांच्या वर्तुळात मध्ये पडणे आणि आपले प्रभुत्व स्थापू पाहणे याविषयी मुबलक उदाहरणांनी भरला आहे. यापैकीच्या काहींचा आपण विचार करु या. चार्लमॅग्ने या सत्ताधिशाला (इ. स. ७४२-८१४) धर्मासोबत भागीदारी करुन कॅथोलिक चर्चच्या पाळकवर्गाचा आशीर्वाद मिळविणे फायद्याचे आहे असे दिसून आले.
द न्यू एन्सायक्लोपिडीआ ब्रिटेनिका हे स्पष्ट करते की, पोपने चार्लमॅग्ने, त्याचे वडील व त्याचा भाऊ यांना पूर्वीच्या राजघराण्याला ‘पदभ्रष्ट केल्यावर’ नवी राजवंशीय मालिका सुरु करावी म्हणून अभिषेक केला. ते पुढे म्हणतेः “फ्रँक्स [चार्लमॅग्नेचे लोक] व पोप यांचे याचप्रसंगी लोम्बार्डस् विरुद्ध असणारे राजकीय संबंध बळावले गेले. . . . चार्लस [जो चार्लमॅग्ने झाला] ने चर्च आणि पोपची सांसारिक लोकांवरील सत्ता याला लगेच मान्यता प्रदान केली.”
इ. स. ८०० मध्ये पोप लिओ ३ यांनी पश्चिम रोमी साम्राज्यासाठी “चार्लस याला बादशहा यानात्याने नियुक्ती देण्याचे ठरविले” आणि रोममधील सेंट पीटर्स चर्चमध्ये नाताळाच्या विधीत त्याला शिरोभूषण लेवविले.
लोभिष्ट वेश्या
वेश्येला आपली कमाई ही मिळतेच. मग चार्लमॅग्ने बाबेलची प्रतिनिधी रोमला काय देणार? “चार्लसने . . . बॅसिलिका येथील सेंट पीटर्स चर्चमध्ये पोपच्या अधिकार सत्तेत इटलीचा मोठा हिस्सा समाविष्ट करावा या आपल्या बापाच्या अभिवचनाचा पुनरुच्चार केला.” तोच उगम पुढे म्हणतोः “अशा पद्धतीने राजकीय दृष्ट्या बद्ध झालेल्या रोमन कॅथोलिक धर्म वातावरणात साम्राज्य आणि चर्च हे अनुक्रमे संघटना आणि आध्यात्मिक केंद्र या अर्थी बहरु लागले.”
अधिपत्यावर गतकाळात धर्माने राखलेला प्रबळ जम याविषयीचे आणखी एक उदाहरण म्हणजे इंग्लंडचे कार्डिनल वुलसे (१४७५-१५३०). ब्रिटेनिका म्हणते की, ते “कार्डिनल आणि मुत्सद्दी होते व यांनी इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांच्या सरकारवर आपले वर्चस्व राखले. . . . १५१५ च्या डिसेंबरमध्ये वुलसे इंग्लंडचे संस्थानिक झाले. . . . आपला ऐहिक आणि चर्चअधिकाराचा वापर करुन वुलसे यांनी अमाप संपत्ती मिळविली आणि राजाखालोखाल आपला क्रमांक पटकावला.” प्रकटीकरणाच्या लाक्षणिक भाषेचा येथे वापर केला तर असे म्हणता येईल की, उच्च कोटीची वेश्या उच्चकोटीचीच कमाई मिळवणार.
राज्य कारभारात धार्मिक प्रभाव पाडण्याचे आणखी एक विख्यात उदाहरण म्हणजे कार्डिनल व ड्यूक रिशेल्यु यांचे. (१५८५-१६४२) यांनी फ्रान्समध्ये प्रबळ सत्ता गाजविली व सोबत इतकी संपत्ति मिळविली की, “ती त्या युगाच्या प्रमाणापेक्षा अमाप होती,” असे ब्रिटानिका म्हणते.
रिशेल्युनंतर आणखी एक कार्डिनल आले व ते होते ज्युलस माझारिन (१६०२-६१). ते चौदावे राजे लोईस यांच्या कारकीर्दीत फ्रान्समध्ये पहिले मंत्री बनले. त्यांची पाळक म्हणून नियुक्ती झाली नव्हती तरीही त्यांना पोप उर्बन ८ वे यांनी १६४१ मध्ये कार्डिनल बनवले. कार्डिनल माझारिन यांनाही संपत्तिबद्दल मोठी लालसा होती. एनसायक्लोपिडिआ म्हणतोः “माझारिनच्या विरोधकांनी त्यांच्या लोभाविषयी त्यांची निंदा केली. त्यांनी उच्च पदे व उच्च लाभ मिळविले होते आणि बादशाही अर्थप्राप्तीचा आपल्या मिळकतीसोबत घोटाळा केला.”
आज, आधुनिक काळात देखील खोटा धर्म अमाप संपत्ती साठवून आहे आणि शक्य आहे तेथे राजकारणी घटकांवर आपले प्रभुत्व राखण्याचा प्रयत्न करुन आहे. याचे एक लक्षणीय उदाहरण म्हणजे ओपस डी (लॅटीन, देवाचे काम) ही कॅथोलिक संस्था. हिला सध्या पोपची संमती आहे आणि लॉरेन्स लॅडर यांच्या मते ती “समाजवादाच्या विरुद्ध व डाव्या पक्षाच्या धोरणाच्या हालचाली करते.” माध्यमिक शाळा व विद्यालये यातून ती बुद्धिमान विद्यार्थ्यांची निवड करते आणि मग ती आपली माणसे सरकारी, आर्थिक व इतर क्षेत्रातील उच्च पदांवर नेमते. अशा यौवनांत बहरलेल्या १० ते १९ युवकांना स्पेनमध्ये कॅथोलिक फॅसिस्ट हुकुमशहा फ्रान्सो यांच्या काळी कॅबिनेट सदस्य म्हणून घेण्यात आले होते जे ओपस डी या संस्थेचे सभासद होते.a
अमेरिकेत दूरदर्शनवरील प्रचारक त्यांचा संपत्तीचा डामडौल आणि ख्यालीखुशालीच्या जीवनपद्धतीविषयी मशहुर आहेत. काही प्रॉटेस्टंट धर्मपुढारी मोठ्या घमेंडीने राजकारणी आखाड्यात शिरले आणि त्यांनी अध्यक्ष बनण्याची महत्वाकांक्षा देखील राखली. तद्वत, आता म्हातारी झालेली वेश्या पडली असली तरीही ती वेगवेगळी सोंगे घेऊन शृंगार आणि सुखविलासाचा आनंद घेत आहे आणि आपल्या आश्रितांवर प्राबल्य राखण्याचा प्रयत्न करते आहे.—प्रकटीकरण १७:४.
पण वेश्येच्या, “मोठी बाबेल” या नावाबद्दल काय? याकरवी, प्रकटीकरणात सूचित करण्यात आलेल्या स्त्रीची ओळख मिळण्यात कशी मदत मिळते?
[तळटीपा]
a ओपस डी आणि चर्चच्या राजकारणातील सहभागाविषयीच्या अधिक माहितीसाठी आर. टी. नेलर यांचे हॉट मनी ॲण्ड द पोलिटिक्स ऑफ डेटस् हे प्रकाशन तसेच एल. लाडर यांचे पोलिटिक्स, पॉवर ॲण्ड द चर्च हे प्रकाशन पहा.
[६ पानांवरील चित्रं]
राज्य कारभारावर असताना वुलसे, माझारिन आणि रिशल्यु यांनी अमाप संपत्ती मिळविली