वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ८/१ पृ. ७-११
  • यहोवाने प्रदान केलेली सूक्ष्मदृष्टी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने प्रदान केलेली सूक्ष्मदृष्टी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देव त्रैक्य आहे का?
  • देवाच्या नामाचे योग्य स्थळ
  • मानवी जीव अमर आहे का?
  • दंगेखोर जगातील ख्रिस्ती वागणूक
  • पवित्र शास्त्र भविष्यवादांची पूर्णता
  • सूक्ष्मदृष्टी प्राप्त करण्यासाठी यहोवाकडे बघा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • “सखोल समज दाखवणाऱ्‍याला यश मिळेल”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • यहोवाचे साक्षीदार जागृत का राहतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग एक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ८/१ पृ. ७-११

यहोवाने प्रदान केलेली सूक्ष्मदृष्टी

“लोक़ात जे सूक्ष्मदृष्टी राखणारे आहेत ते पुष्कळांना समज पुरवितील.”—दानीएल ११:३३.

१, २. (अ) इस्राएलांनी देवाच्या दयाळूपणाचा अनुभव घेतला होता तरी ते बंडखोरपणे का वागले? (ब) आम्ही काय करणे लाभदायक ठरेल? (यिर्मया ५१:१०)

प्राचीन काळच्या इस्राएलांना हे ठाऊक होते की, यहोवा हाच केवळ खरा देव आहे. त्यांच्या पूर्वजांशी देवाने केलेल्या दळणवळणाविषयी त्यांना माहिती देण्यात आली होती. याखेरीज, त्यांनीही प्रत्यक्षात देवाच्या दयाळूपणाचा अनुभव घेतला होता. पण एकापेक्षा अधिक वेळा त्यांनी आपणाठायी सूक्ष्मदृष्टीची कमतरता असल्याचे प्रदर्शित केले. ते यहोवा व त्याच्या प्रतिनिधींच्या बाबतीत ‘बंडखोरीने वागले.’ ते का? कारण जे काही त्याने त्यांच्यासाठी केले होते ती “त्याची कृत्ये ते लवकरच विसरले.” (स्तोत्रसंहिता १०६:७, १३) त्या गोष्टी त्यांना ठाऊक नव्हत्या असे ते प्रकरण नव्हते. तर त्याविषयी ते रसपूर्ण मनन करण्यात मागे पडले होते. यामुळे ते ‘वाईट गोष्टींचा लोभ धरणारे’ असल्याचे दिसले.—१ करिंथकर १०:६.

२ आमच्या काळात यहोवाने आपल्या दृश्‍य संस्थेकरवी सूक्ष्मदृष्टी प्रदान करून त्याच्या लोकांना लक्षणीय रितीने वेगळे केले आहे. अशा या सूक्ष्मदृष्टीच्या उदाहरणांची उजळणी करण्याद्वारे, यहोवा आपल्या लोकांना ज्या पद्धतीने निरवीत आहे त्याविषयीची आमची रसिकता अधिक दृढ केली जाईल. यापैकीचे एक उदाहरण आमच्या जीवनाच्या मूळ गाभ्याशी संबंधित आहे, ते म्हणजे देवाची स्वतःची ओळख.

देव त्रैक्य आहे का?

३. देवाच्या ओळखीविषयीचे सत्य समजण्यात यहोवाच्या सेवकांना गेल्या शंभर वर्षापासून कशाने मदत दिली? (१ करिंथकर ८:५, ६)

३ जे त्रैक्यावर आपला पूर्ण विश्‍वास प्रदर्शित करीत नाही ते वेडे आहेत असे प्रतिपादन ख्रिस्ती धर्मराज्याने मोठ्या अट्टाहासाने केले आहे. तरीपण माणसांच्या भयाने ग्रस्त न होता यहोवाच्या साक्षीदारांनी हे ओळखले की, अप्रेरित अशा मानवी संप्रदाय व तत्त्वांनी नव्हे तर पवित्र शास्त्रवचनांकरवी सत्य काय आहे ते समजण्याचा दर्जा मिळतो. या पायावर आपली मजबूती करून मागे १८८२ मध्येच या समर्पित अशा पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी द वॉचटावर मासिकात स्पष्टपणे म्हटले होतेः “आम्ही यहोवा देव, येशू व पवित्र आत्म्याला मानतो हे आमच्या वाचकांना चांगले माहीत आहे. पण आम्ही हे तिघे एका व्यक्‍तीमध्ये तीन देव असल्याचे किंवा जसे काहीजण म्हणतात त्याप्रमाणे तीन व्यक्‍ती एका देवात आहेत हे मानीत नाही. ते अशास्त्रीय तत्त्व आहे.”—योहान ५:१९; १४:२८; २०:१७.

४. (अ) मूळाशी गेल्यामुळे यहोवाच्या लोकांना त्रैक्य तत्त्वाविषयी व त्या शिक्षणाच्या परिणामाविषयी काय समजले? (ब) यहोवाने आपल्या सेवकांना अशी ही सूक्ष्मदृष्टी का प्रदान केली?

४ पवित्र शास्त्रीय सत्याविषयी प्रेम बाळगणाऱ्‍या या लोकांनी मूळाशी जाऊन शोध घेतला व त्यांना हे दिसले की, त्रैक्य विश्‍वासाविषयीची मूळे ख्रिस्तेत्तर धर्मात आहेत. शास्त्रवचनांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यामुळे त्यांना याचीही समज मिळाली की, काही विशिष्ट शास्त्रवचने त्रैक्य कल्पनेला आधार देत आहेत असे भासत असले तरी ते अनुवादकांनी गृहीत धरलेल्या दूषित ग्रहामुळे आहे, पण वस्तुतः ते अतिप्राचीन मूळ भाषेतील हस्तलिखित प्रतीत तसे दिसत नाही. येशूला दिखाऊपणे सन्मान देणारे हे त्रैक्याचे शिक्षण खरे पाहता त्याच्या शिक्षणाचा विपर्यास करते आणि यहोवाचा अपमान करते हे ते ओळखून आहेत. यामुळेच ज्या वॉचटावरचा आधी उल्लेख करण्यात आलेला आहे ते पुढे म्हणतेः “सत्य शोधक या नात्याने आम्हावर ही जबाबदारी आहे की, आम्ही स्वतःशी प्रामाणिक असावे व आमच्या पित्याच्या वचनाला देखील प्रामाणिक राहावे कारण तेच आम्हास खरेपणाने सूज्ञ करू शकते. याकरताच अप्रेरित माणसे व भ्रष्ट व्यवस्था यांचे संप्रदाय व तत्त्वप्रणाली याजकडे दुर्लक्ष करून आमचा प्रभु व त्याचे प्रेषित यांजकडून जी सबळ वचने आपणाला मिळाली आहेत त्या नमुन्याला आपण दृढ धरु या.” त्यांची खरीच सत्यावर प्रीती होती आणि त्यांनी पवित्र शास्त्रातील केवळ काही निवडक वचनांवर नव्हे तर सबंध देववचनाकडे आपले लक्ष दिल्यामुळे यहोवाने त्यांना अशी सूक्ष्मदृष्टी प्रदान केली की जिच्यामुळे ते ख्रिस्ती धर्मराज्यापेक्षा किती भिन्‍न आहेत याची ओळख मिळाली.—२ तीमथ्य ३:१६, १७; पहा न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, पृष्ठ १५८०, विभाग ६ब.

देवाच्या नामाचे योग्य स्थळ

५. पवित्र शास्त्र भाषांतरातून देवाचे व्यक्‍तीगत नाव काढून टाकण्याच्या प्रथेमागे कोण आहे? (प्रकटीकरण २२:१८, १९)

५ आता दुसरे उदाहरण विचारात घ्याः जेव्हा विविध पवित्र शास्त्र भाषांतरांनी देवाच्या व्यक्‍तीगत नावाला लपविण्याचा वा ते पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा वॉचटावर संस्थेने या नावाच्या महत्त्वपूर्णतेवर अधिकाधिक भर दिला. ख्रिस्ती धर्मराज्याने प्रतिपादिले की, यहोवा हे नाव काढल्यामुळे शुभवर्तमानाच्या पुस्तकांना सार्वत्रिक अपील मिळते. पण हे सर्वात महत्त्वाचे नाव पवित्र शास्त्रवचनांतून काढून टाकण्याचा कोणाचा प्रधान हेतू आहे हे यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांनी ओळखले. (पडताळा यिर्मया २३:२७.) देवाच्या लोकांना कळून चुकले की, खऱ्‍या देवाच्या नावाचे लोकांच्या बुद्धीतून विस्मरण व्हावे यासाठी सैतानाने ती फूस लावली आहे.

६. ख्रिस्ती धर्मराज्याने चोखाळलेल्या मार्गाच्या विरुद्ध देवाच्या खऱ्‍या सेवकांनी त्याचे नाम उंचावण्याच्या दृष्टीने काय काय केले? (प्रे. कृत्ये १५:१४)

६ ख्रिस्ती धर्मराज्याने जो मार्ग अवलंबिला आहे त्याच्या विरुद्ध द वॉचटावर या मासिकाने आपल्या प्रकाशनाच्या पहिल्या वर्षापासूनच (१८७९) ईश्‍वरी नाम यहोवा याला प्राधान्य दिले. १९२६ मध्ये या मासिकाने “कोण यहोवाचा सन्मान करील?” हा लेख प्रकाशित केला. (स्तोत्रसंहिता १३५:२१) वॉचटावर संस्थेसोबत संबंध ठेवून असणाऱ्‍या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी १९३१ मध्ये यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले. (यशया ४३:१०-१२) तसेच यहोवाच्या नामाचे पवित्रीकरण होणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांना अधिकपणे जाणवले. (यशया १२:४, ५) १९४४ मध्ये त्यांनी पवित्र शास्त्राच्या अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शन या आवृत्तीचे प्रकाशन सुरु केले; या आवृत्तीत यहोवा हे नाम ६,८०० पेक्षा अधिक वेळा आढळते. तथापि, पवित्र शास्त्राच्या छपाईच्या अनुषंगाने १९५० पासून न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन याचे उत्पादन उल्लेखनीयरित्या होत आहे. या आवृत्तीत ईश्‍वरी नाम इब्री व ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात जेथे दिसते तेथे दिसते.

७. देवाचे नाव व त्याचा ज्यासोबत संबंध आहे त्यावर देण्यात आलेला भर यामुळे कित्येक लोकांना कसा लाभ मिळू शकला?

७ देवाच्या व्यक्‍तीगत नावाविषयी आतापर्यंत जो भर देण्यात आला त्यामुळे जगभरातील धार्मिकतेवर प्रेम प्रदर्शित करणाऱ्‍या लाखो लोकांच्या आनंदाला कारणीभूत ठरला आहे. त्याने खरा देव ही एक व्यक्‍ती आहे ही जाणीव निर्माण करण्याची मदत दिली. तसेच या लोकांना जेव्हा देवाचे मार्ग कळून आले तेव्हा ते स्वतः समजबुद्धीने किंवा सूक्ष्मदृष्टीने वागूवर्तू लागले.—मीखा ४:२, ५.

मानवी जीव अमर आहे का?

८. आधुनिक काळच्या इतिहासाच्या आरंभालाच यहोवाच्या साक्षीदारांनी जीव व मृतांची स्थिती याविषयी काय शिकून घेतले?

८ आता तिसरे उदाहरण पहा. यहोवाच्या सेवकांच्या अद्ययावत इतिहासामघ्ये आरंभाला देवाच्या वचनावरील प्रेमामुळे त्यांची आणखी एका महत्त्वाच्या सत्याच्या बाबतीत दृष्टी उघडली गेली. “विश्‍वासू व बुद्धीमान दास” याला गेल्या शतकभर या गोष्टीची अचूक समज मिळाली होती की जीव हा काही कोणी मानवाच्या अंतर्यामी वसणारा बुद्धीमान व नंतर वेगळा होणारा आत्मा नसून प्रत्यक्षात तो ती व्यक्‍ती आहे. (मत्तय २४:४५-४७) पवित्र शास्त्रात ज्याचे शब्दशः शिओल व हेडीज असे भाषांतर करण्यात आले त्या मूळ भाषेचे पृथ्थकरण द वॉचटावर मासिकाने १८८० मध्ये केले व त्याविषयी म्हटले की त्या संज्ञा कबरेस अनुलक्षून आहेत. त्याने हेही स्पष्ट केले की ज्या लोकांना गेहेन्‍नामध्ये पाठविण्यात येते ते लोक नष्ट होतात; त्यांना यातना दिल्या जात नाहीत.—पहा न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन रेफरन्स बायबल पृष्ठे १५७३-५.

९. मानवी जीव हा उपजतपणेच अमर असतो या शिक्षणाच्या मूळारंभाविषयी वॉचटावरने १८९४ मध्ये काय म्हटले?

९ १८९४ मध्ये वॉचटावरने हा प्रश्‍न उंचावलाः “तर मग, सर्व मानवात अमरत्व हे अंतस्थपणे वास करून आहे ही शिकवण केव्हा सामोरी आली?” सूक्ष्मदृष्टीने तेव्हा हे उत्तर दिले गेलेः “इतिहासाच्या पानांचे विश्‍लेषण करून बघता आम्हाला आढळले की, देवाच्या प्रेरित साक्षीदारांनी मानवी अमरत्वाची शिकवण शिकवली नाही तर ती सर्व मूर्तिपूजक धर्मांचा गाभा आहे. . . . तेव्हा सॉक्रेटीस व प्लॅटो यांनी ती प्रथम शिकविली हे खरे नाही. या शिकवणीचा शिक्षक या दोघांच्या आधीचा आहे व तो प्रबळ आहे. या दोघांनी मात्र या शिकवणीला उजाळा दिला . . . व त्यातून तत्त्वज्ञान निर्मिले व हे तत्त्व त्यांच्या काळच्या व नंतरच्या काळातील सांप्रदायी लोकांना स्वीकारण्याजोगे करण्यासाठी मोठ्या धूर्तपणे समोर मांडले. या खोट्या शिक्षणाचा पहिला अहवाल मानवास ज्ञात असणाऱ्‍या सर्वात प्राचीन इतिहासात म्हणजे पवित्र शास्त्रात आढळतो. हा खोटा शिक्षक सैतान होता.”a

१०. जीव व मृतांची स्थिती याविषयीच्या लबाड शिकवणींमुळे कोणते वाईट परिणाम घडले, पण विचारवंत माणसांसाठी मदत मिळावी म्हणून काय केले गेले?

१० मानवाला अमर असा आत्मा असून दुष्टांना अग्निनरकात सदासर्वदा यातना मिळते या शिक्षणाचा प्रसार घडवून आणल्यामुळे सैतानाने देवाच्या नावाचा विपर्यास करून त्याची निंदा केली. हे वॉचटावरच्या पहिल्या अध्यक्षांनी, सी. टी. रसेल यांनी ओळखले होते. त्यांना दिसले की, विचारवंत लोक सार्वकालिक यातना या कल्पनेचा धिक्कार करीत आहेत पण सोबत पवित्र शास्त्राचाही धिक्कार करीत आहेत, कारण या अव्यवहार्य तत्त्वाचा उगम पवित्र शास्त्र आहे असे त्यांनी वाटून घेतले होते. अशा या विचारवंत लोकांच्या मनातून काळ्‌या युगाचा धूर काढून टाकण्यासाठी ब्रदर रसेल यांनी “टू हेल ॲण्ड बॅक! हू आर देअर?” हे थरारक जाहीर भाषण दिले.

११. (अ) भूतविद्या सामोरी येत असता ‘विश्‍वासू दासा’द्वारे कोणता इशारा देण्यात आला? (ब) या इशाऱ्‍यामुळे कोणाचा फायदा झाला व कसा?

११ याच युगात भूतविद्या सामोरी येत होती. पण यहोवा देवाने आपल्या वचनाद्वारे जी सूक्ष्मदृष्टी मिळणे शक्य केले त्याद्वारे ‘विश्‍वासू दास’ याला समजले की, ज्यांच्या माध्यमाने लोक दळणवळण ठेवतात ते निघून गेलेले आत्मे आहेत असे जे समजले जाते ते तसे नसून प्रत्यक्षात दुरात्मे आहेत. याविषयी जाहीर भाषणाकरवी तसेच लिखाण शैलीकरवी जोरदार शास्त्रवचनीय चर्चा प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांचे डोळे उघडले जावे व दुरात्मिक प्रथांमध्ये समाविष्ट झाल्यामुळे किती धोका संभवतो ते त्यांना कळावे म्हणून सादर केली गेली. (अनुवाद १८:१०-१२; यशया ८:१९) अशाप्रकारे यहोवाने आपल्या सेवकांना जी सूक्ष्मदृष्टी दिली तिचा परिणाम जगव्याप्तपणे हजारो लोकांना मृतांचे भय, भूतविद्येच्या प्रथा आणि भूतविद्येशी संलग्न असणाऱ्‍या हिणकस प्रथा यांजपासून सुटका मिळण्यात दिसून आला.

दंगेखोर जगातील ख्रिस्ती वागणूक

१२, १३. (अ) दानीएल ११:३२, ३३ चे स्पष्टीकरण द्या. (ब) जे “सूक्ष्मदर्शी” आहेत त्यांच्याद्वारे समजण्यास आधार ठरु शकणारी काही मूलभूत पवित्र शास्त्रीय सत्ये कोणती आहेत?

१२ देवाचे सेवक आणखी एका चौथ्या प्रकरणाच्या बाबतीत, तटस्थता या महत्त्वपूर्ण गोष्टीसंबंधाने सूक्ष्मदृष्टी दाखवतील असे दानीएलने सूचित केले. जगाच्या प्रमुख राजकीय गटातील झगड्याचे सविस्तर वर्णन दिल्यावर दानीएल ११:३२, ३३ म्हणतेः “जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांस तो फुसलावून धर्मत्यागी करील.” याचा अर्थ हा की, जे ख्रिस्ती म्हणवतात पण ज्यांचे जगावर प्रेम आहे व त्याची मर्जी मिळवावी असे ज्यांना वाटत असते आणि ज्यामुळे ते, येशू ख्रिस्त ज्याच्या आधाराने या पृथ्वीवर राज्य करणार आहे त्या यहोवाने केलेल्या राज्याच्या कराराविषयी तिरस्कार दाखवीत आहेत अशांना उत्तरेचा सत्ताधीश राजा धर्मत्यागी बनण्याप्रत निरवीत आहे असा होतो. “पण,” दानीएल पुढे म्हणतोः “जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करतील. लोकातले सूक्ष्मदर्शी पुरुष पुष्कळांस बोध करतील.”

१३ आम्हा सभोवार असणाऱ्‍या दंगेखोर परिस्थितीचा सामना सूज्ञपणे करण्यासाठी ज्या सूक्ष्मदृष्टीची गरज आहे ती मूलभूत पवित्र शास्त्रीय सत्याच्या रसिकतेवर आधारलेली असते. यहोवाने दिलेल्या मार्गदर्शनाआधारे ‘विश्‍वासू दास’ याने ही सत्ये जाणली. यापैकीचे एक म्हणजे येशूने दर्शविलेले सत्य आहे व ते म्हणजे दियाबल सैतान हा या जगाचा अदृश्‍य अधिकारी आहे. (लूक ४:५-८; योहान १२:३१) या सत्याच्या अनुषंगानेच १ योहान ५:१९ म्हणते की, जगाचा एखादा किंवा दुसरा भाग नव्हे तर “सगळे जग [खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीबाहेर असणारी मानवजात] त्या दुष्टाच्या अधीन आहे.” (प्रकटीकरण १२:९) येशूने म्हटलेच होते की, त्याचे अनुयायी या “जगाचे भाग नाहीत” त्यामुळे त्यांनी ख्रिस्ती तटस्थता दाखविण्याची येथे हाक आहे.—योहान १७:१६.

१४. (अ) यहोवाच्या सेवकांचे लक्ष १९३९ व १९४१ मध्ये कोणत्या समयोचित विषयांकडे वेधण्यात आले? (ब) यहोवाच्या साक्षीदारांना सूज्ञपणे कृति करण्यासाठी अशा प्रकारची सूक्ष्मदृष्टी कशी लाभदायक ठरली?

१४ या कारणास्तव दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाचे काळे ढग युरोपावर आले तेव्हा ख्रिस्ती तटस्थतेचा विषय ठळकपणे मांडणे हे समयोचित होते. तेच द वॉचटावर मासिकाच्या नोव्हेंबर १, १९३९ च्या अंकाने केले. या प्रकरणाशी संबंधित असणारे आणखी एक मूलभूत सत्य हे की, विश्‍वाच्या सार्वभौमत्वाच्या वादविषयाचे महत्त्व आणि हा वादविषय मिटविण्यातील मशीही राज्याची भूमिका. तद्वत, १९४१ मध्ये हाच विषय अमेरिकेतील सेंट लोईस, मिसुरी येथे झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनात व त्यानंतर पुढच्या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या द न्यू वर्ल्ड या पुस्तकात मांडण्यात आला. या ईश्‍वरी सूक्ष्मदृष्टीने यहोवाच्या सेवकांना या विभाजित व झगडणाऱ्‍या जगात केवढे संरक्षण दिले! ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक व्यवस्थेने आपणाला आंतरराष्ट्रीय झगडे व सरकार उलटविण्यासाठी बंडखोर हालचालीत समाविष्ट करून स्वतःला तुकडेतुकडे केले होते तरी यहोवाच्या साक्षीदारांनी सर्व देशात ऐक्याने देवाचे राज्य हीच मानवजातीची एकमात्र आशा अशी घोषणा करण्यात निष्ठावंत सहभाग घेतला. त्यांनी स्वतःला जीवन वाचविणाऱ्‍या कामात मग्न ठेवले. या कामाविषयी येशू ख्रिस्ताने हा भविष्यवाद वदविला होताः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

पवित्र शास्त्र भविष्यवादांची पूर्णता

१५. यहोवाच्या सेवकांना सूक्ष्मदृष्टी का आहे?

१५ यहोवाच्या सेवकांना अशा प्रकारची सूक्ष्मदृष्टी का आहे? कारण त्यांचा देवाच्या लिखित वचनावर पूर्ण आत्मविश्‍वास आहे, त्याचे ते पालन करतात आणि यहोवाचा आत्मा त्यांच्यावर आहे. या कारणामुळे त्यांना महत्त्वपूर्ण पवित्र शास्त्र भविष्यवादांची समज मिळाली. हाच तो पाचवा मुद्दा आहे ज्याचा आता आपण विचार करणार आहोत.

१६, १७. (अ) यहोवाचे साक्षीदार ज्या तारखांचा वापर करतात त्या कधी कधी प्रापंचिक इतिहासकारांनी दिलेल्या तारखांपेक्षा का भिन्‍न ठरतात? (ब) अर्तहशस्त राजाच्या कारकिर्दीचे २०वे वर्ष याची तारीख आणि बाबेलोन्यांकरवी यरुशलेमाचा करण्यात आलेला नाश याबाबतीत यहोवाच्या साक्षीदारांचा पवित्र शास्त्रावरील विश्‍वासामुळे कसा फायदा झाला?

१६ भूगर्भ संशोधकांनी उत्खनन केलेल्या काही पाट्यांच्या तुकड्यावर आधारीत जे मतप्रतिपादन काही प्रापंचिक इतिहासकारांनी केले आहे त्यानुसार त्यांचे म्हणणे आहे की, अर्तहशस्त लाँगिमानसच्या राज्यपदाचे पहिले वर्ष इ.स.पू. ४६४ हे होते आणि नबुखद्‌नेस्सर दुसरा याच्या राज्यपदाचे पहिले वर्ष इ.स.पू. ६०४ हे आहे. हे खरे आहे तर मग, अर्तहशस्त राजाच्या कारकिर्दीचे २० वे वर्ष इ.स.पू. ४४५ असेल आणि बाबेलोन्यांकरवी (नबुखद्‌नेस्सराच्या १८ व्या वर्षीच्या कारकिर्दीत) यरुशलेमाचा झालेला नाश इ.स.पू ५८७ मध्ये झालेला दिसेल. अशा या तारखांचा वापर कोणा पवित्र शास्त्र विद्यार्थ्याने भविष्यवादांची पूर्णता मोजण्यासाठी केला तर तो गोंधळात पडेल.

१७ भूगर्भ संशोधक जे उत्खनन करतात त्याविषयी यहोवाच्या साक्षीदारांना रस वाटतो, कारण या उत्खननाचा पवित्र शास्त्राशी संबंध असतो. तथापि, जेथे कोठे या उत्खननाविषयीचे मतप्रतिपादन पवित्र शास्त्रातील स्पष्ट विधानांशी विसंगत दिसते अशा वेळी आम्ही पवित्र शास्त्र जे म्हणते, मग ते वंशावळीविषयी असो की इतर कोणत्याही गोष्टीविषयी असो, तेच आत्मविश्‍वासाने स्वीकारतो. यामुळेच यहोवाच्या साक्षीदारांनी बऱ्‍याच पूर्वीपासून हे ओळखले होते की, अर्तहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या २० व्या वर्षापासून जो भविष्यवादित कालावधी सुरु झाला त्याची मोजणी इ.स.पू. ४५५ पासून करावयाची आहे; तसेच दानीएल ९:२४-२७ ने येशूचा मशीहा या अर्थाने अभिषेक होण्याचे वर्ष इ.स. २९ याचा शरदऋतु असल्याचे दर्शविले आहे.b याचप्रमाणे दानीएलच्या ४थ्या अध्यायातील भविष्यवादात जे “सात काळ” आहेत त्यांची मोजणी इ.स.पू. ६०७-६०६ पासून होते व ते १९१४ या वर्षीच्या शरद ॠतुकडे निर्देश करते जेव्हा ख्रिस्ताला स्वर्गात राज्यपद देण्यात आले व याचवेळी हे जग आपल्या अंतसमयात शिरले.c पण तेच जर यांनी पवित्र शास्त्रवचनांच्या प्रेरणेसंबंधाने आपला आत्मविश्‍वास डळमळू दिला असता तर भविष्यवादांच्या या थरारक पूर्णता त्यांना अनुभवण्यास मिळाल्या नसत्या. अशाप्रकारे त्यांनी जी सूक्ष्मदृष्टी प्रदर्शित केली ती त्यांच्या देवाच्या वचनावरील भरवशासोबत थेटपणे निगडीत होती.

१८. यहोवाच्या निष्ठावंत सेवकांच्या आध्यात्मिक परिस्थितीच्या बाबतीत यशया ६५:१३, १४ कोणते अभिवचन देते?

१८ आपल्या निष्ठावंत सेवकांची आध्यात्मिक स्थिती आणि जे शास्त्रवचनांना दूर सारुन जगात सध्या जे प्रसिद्ध आहे त्याला पसंद करतात अशांची आध्यात्मिक स्थिती याजमधला फरक स्पष्ट करताना यहोवा म्हणतोः “पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील, पण तुम्ही फजीत व्हाल; माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील, पण तुम्ही खिन्‍न चित्ताने ओरडाल, भग्नहृदय होऊन आकांत कराल.”—यशया ६५:१३, १४.

१९. (अ) “विश्‍वासू व बुद्धीमान दास” शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण प्रामुख्यत्वे कोणत्या मार्गाने देतो? (ब) या आध्यात्मिक अन्‍नाचा पूर्णपणे लाभ मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारचा अभ्यासाचा कार्यक्रम फायदेशीर पडेल?

१९ या त्रोटक ऐतिहासिक उजळणीने दाखविले की, द वॉचटावर किंवा टेहळणी बुरुज याच्या माध्यमाने यहोवाचा “विश्‍वासू व बुद्धीमान दास” याने महत्त्वपूर्ण अशा शास्त्रवचनीय सत्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आध्यात्मिक अन्‍नाच्या वितरणासाठी द वॉचटावर हे “दास” वर्गाचे प्रमुख साधन राहिलेले आहे. तुम्ही त्याकडून पूर्ण लाभ मिळवीत आहात का? तुम्ही प्रत्येक अंकाचे वचन करता का, आणि तुमच्या अभ्यासाच्या कार्यक्रमात तुम्ही संदर्भित करण्यात आलेली शास्त्रवचने काढून वाचता का? जे शिकला त्याचे मनन करण्याची, त्याविषयीची रसिकता वाढविण्याची तसेच याचा तुमची वर्तणूक, तुमच्या इच्छा आकांक्षा, तुमची दैनंदिन कार्ये व जीवनातील तुमची ध्येये यावर कसा परिणाम झाला पाहिजे याचा विचार करता का? असे केल्यामुळे तुमचा निर्णय घेताना तो यहोवा केवळ जी सूक्ष्मदृष्टी प्रदान करतो त्यावर आधारीत असेल.

[तळटीपा]

a  सैतानाने हव्वेस असे मानण्यास भाग पाडले की, तिला शरीरात मरण येणारच नाही. (उत्पत्ती ३:१-५) तेव्हा यावेळेपासून त्याने, मानवाला एक अमर जीव आहे व तो शरीराच्या मृत्यूनंतर जिवंत राहतो या खोट्या शिक्षणाचा आरंभ केला.—पहा द वॉचटावर सप्टेंबर १५, १९५७ पृष्ठ ५७५.

b  इनसाईट ऑन द स्क्रिपचर्स, खंड २, पृष्ठे ६१४-१६, ८९९-९०१.

c  “तुझे राज्य येवो,” पृष्ठे १८६-९.

तुम्ही काय लक्षात ठेवले आहे?

◻ देव त्रैक्य आहे का, आणि तुम्ही असे उत्तर का देता?

◻ देवाचे नाव कोठे उचितपणे असावयास हवे?

◻ मानवी जीव अमर आहे का?

◻ बंडखोर जगात ख्रिस्ती वागणूक कशी असावी याविषयी कोणती सूक्ष्मदृष्टी यहोवाने दिली आहे?

◻ पवित्र शास्त्र भविष्यवादांच्या पूर्णतेच्या अनुषंगाने यहोवाच्या साक्षीदारांना कोणती सूक्ष्मदृष्टी लाभली आहे?

[८ पानांवरील चित्रं]

“विश्‍वासू व बुद्धीमान दास” द वॉचटावर या मासिकाच्या माध्यमाने शास्त्रवचनांचा अर्थ व त्यांचा आमच्या दिवसासाठी कोणता अवलंब होतो हे स्पष्ट करण्याची सूक्ष्मदृष्टी देतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा