वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ६/१ पृ. ३
  • सौंदर्य केवळ वरपांगी असू शकते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सौंदर्य केवळ वरपांगी असू शकते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सौंदर्यापेक्षा अधिकसे काही
  • शारीरिक सौंदर्याचा पाश
  • पौरुषीय सौंदर्य
  • खरे सौंदर्य तुम्हाला ते खुलविता येईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • एक असा गुलाम ज्याने देवाचं ऐकलं
    बायबलमधून शिकू या!
  • नैतिक शुद्धतेविषयी देवाचा दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • योसेफाला तुरुंगात टाकलं जातं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ६/१ पृ. ३

सौंदर्य केवळ वरपांगी असू शकते

देवाने निर्माण केलेली एकमात्र स्त्री हव्वा ही आजपर्यंतच्या सर्व स्त्रियांमध्ये सर्वात रूपमती असावी. तथापी तिने व तिचा पती आदाम या दोघांनी यहोवाविरुद्ध बंड केले. यामुळे हव्वेने देवासोबत निकट संबंध गमावला व मानवजातीवर भयंकर आपत्ती आणविली. त्यानंतरही ती रूपवती राहिली असावी पण तिचे ते सौंदर्य केवळ वरपांगी होते.

सौंदर्य हे देवाकडील पूर्णार्थाने देणगी आहे आणि एकाला ते दुसऱ्‍यापेक्षा अधिकपणे वंशंपरत्वे मिळते. आपण आहोत त्यापेक्षा अधिक रूपवान असावे असे पुष्कळांना वाटत असते व या कारणामुळे ते आपला अधिक वेळ व पैसा खर्च करून अधिक रूपवान होण्याची धडपड करतात. पण हव्वेचे उदाहरण दाखविते त्याप्रमाणे सौंदर्याला इतर गुणांची साथ नसली तर ते दीर्घकाळासाठी कुचकामी ठरते. ते इतर कोणते गुण आहेत? शलमोन राजाच्या काळी घडलेला अनुभव आम्हाला या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकेल.

सौंदर्यापेक्षा अधिकसे काही

पवित्र शास्त्रातील गीतरत्न पुस्तकात एका सुंदर ग्रामयुवतीची माहिती आहे. तिचे नाव शुलेमकरीण होते व तिचे गावातील एका मेंढपाळ मुलावर प्रेम होते. तिचे लावण्या शलमोन राजाला मोहीत करते व तो तिला आपली बायको बनविण्याच्या मिषाने यरुशलेमास आणतो. या युवतीपुढे राजाची बायको होण्याची ती किती चांगली संधी आहे! ती येथे आपले सौंदर्य अधिक मोहक बनवून संपत्ती, अधिकार व बहुमान देखील मिळवू शकत होती. परंतु युवतीने राजाच्या चालीस निश्‍चयाने धुडकाविले, यरुशलेमातील संपत्ती व झगमगाट याकडे तिने पाठ फिरवली व ती आपल्या मेंढपाळ युवकासाठी विश्‍वासू राहिली. तिच्या बाबतीत म्हणता येईल की तिचे सौंदर्य वरपांगी नव्हते. ती ढोंगी, संधीचा गैरफायदा घेणारी व लोभी नव्हती. उलटपक्षी तिला आंतरिक सौंदर्य होते जे, तिची पूर्वज हव्वा हिजठायी दिसून आले नाही.—गीतरत्न १:१५; ४:१; ८:४, ६, १०.

शारीरिक सौंदर्याचा पाश

शारीरिक सौंदर्य हवेहवेसे वाटत असले तरी ते समस्येकडे निरवू शकते. हे आंतरिक सौंदर्य कधीच करीत नाही. साधारण ४,००० वर्षांआधी कुलपिता याकोबाला एका दीना नावाची कन्या होती, जी निःसंशये फारच देखणी असावी. पण तिने मूर्खपणाने आपला सहवास “देशातील मुलींसोबत” राखला व यामुळे शखेम नावाचा युवक तिजवर एवढा भाळला की त्याने तिला भ्रष्ट केले.—उत्पत्ती ३४:१, २.

याचप्रमाणे, बाह्‍यरुपास आंतरिक सौंदर्याची साथ नसेल तर ते रूपवानास टेंभा मिरविणारे बनवू शकते. राजा दाविदास अबशालोम नावाचा मुलगा होता. त्याच्यविषयी आपल्याला असे वाचावयास मिळते: “सर्व इस्राएलात सौंदर्याविषयी प्रशंसनीय असा अबशालोमासारखा कोणी नव्हता.” (२ शमुवेल १४:२५) पण अबशालोमाचे सौंदर्य नुसत्या मुखवट्यासारखे होते; त्याचे अंतरंग तर कुरुपतेने माखले होते: तो ढोंगी, महत्त्वाकांक्षी व क्रुर होता. या युवकाने आपल्या व्यक्‍तीगत सौंदर्याचा चतुर उपयोग करून इस्राएलात आपल्या बाजूचे लोक मिळवून आपल्या बादशाहा-बापाविरुद्ध बंड केले. ओघाओघाने तो ठार झाला, पण आधीच त्या युवकाने राज्याला मुलकी युद्धाने ग्रासून टाकले होते.

पौरुषीय सौंदर्य

अबशालोमाच्या प्रकरणाप्रमाणे पवित्र शास्त्र, पुरुष तसेच स्त्रियांच्या सौंदर्याविषयी भाष्य करते. आपल्या पौरुषीय देखणेपणाने मोहीत न होणाऱ्‍या एका युवकाबद्दल ते सांगते. तो दीनाचा लहान सावत्र भाऊ योसेफ हा होता. (उत्पत्ती ३०:२०-२४) भावांच्या हेव्यामुळे, योसेफ तरुण असतानाच मिसराला दास म्हणून विकला गेला. तेथे त्याला लष्करी अधिकारी पोटीफर याने विकत घेतले. प्रामाणिक व कष्टाळू असल्यामुळे हा योसेफ पोटीफरच्या घरावर देखरेखा झाला. या दरम्यान “योसेफ बांधेसूद व देखणा” होत गेला.—उत्पत्ती ३९:६.

पोटीफरची बायको योसेफाच्या सौंदर्यावर भाळली व तिने निर्लज्जपणे त्याला फसविण्याचा प्रयत्न केला. पण या युवकाने दाखविले की शारीरिक आकर्षणासोबत त्याच्याठायी आंतरिक सौंदर्यही आहे. त्याने आपला धनी पोटीफर याच्याविरुद्ध पाप करण्याचे नाकारले व तो त्याच्या बायकोकडून पळून गेला. यामुळे त्याला तुरुंगात डांबले गेले. पण का? उद्विग्न झालेल्या पोटीफरच्या बोयकोने योसेफावर बलात्काराच आरोप केला! तरीही, या कटु अनुभवाने योसेफ विचलीत झाला नाही. अत्यंत खडतर परिस्थितीतील त्याच्या उत्तम उदाहरणामुळे तेव्हापासून सुहृदयी लोकांना नेहमीच उत्तेजन मिळाले आहे.

ही सर्व उदाहरणे दाखवितात त्याप्रमाणे आंतरिक सौंदर्य म्हणजे व्यक्‍तीमत्वाचे सौंदर्य हे जेव्हा देवावरील विश्‍वासावर आधारीत असते तेव्हा ते शारीरिक देखणेपणापेक्षा अधिकच सुंदर व महत्त्वपूर्ण ठरते. लग्नाचा विचार करणाऱ्‍या युवकांनी याविषयी जाणीव राखली पाहिजे. कामावर कर्मचारी म्हणून घेताना मालकांनी सुद्धा याविषयीची जाण ठेवली पाहिजे. याशिवाय आम्ही सर्वांनी हे ध्यानात ठेवावे की, आम्हास सौंदर्याचे दान असो वा नसो, आम्ही हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे आंतरिक सौंदर्य खुलवू शकतो. पण यात कशाचा समावेश आहे? ते आम्हाला कसे खुलविता येईल? हेच आम्ही यापुढील लेखात चर्चेला घेणार आहोत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा