राज्य घोषकांचा वृत्तांत
“आत्म्यात उत्सुक” असलेले मेक्सिको
“सबंध देश जूण कार्योत्सुक व आंदोलनाने कंपित झालेला आहे असे दिसते,” असे मेक्सिकोमधील वॉचटावर सोसायटीच्या शाखा दप्तराने लिहिले. ते केवढे खरे आहे! ही कंपायमान हालचाल याचा पुरावा होती की, जसे ऑगस्टमध्ये घडले तसे, तेथे दरमाहीतील हा ७०वा उच्चांक होता, ज्याने प्रचारकांची संख्या २,७७,४३६ पर्यंत पोहचविली. याशिवाय ४,००,००० पेक्षा अधिक पवित्र शास्त्राभ्यास हाती आहेत आणि गेल्या वर्षाच्या सांजभोजनाची उपस्थिती तर १०,४६,२९१ पर्यंत पोहंचली होती. भावी प्रगतिसाठी केवढा चांगला मुळाधार आहे बरे!
मेक्सिकोतील यहोवाच्या साक्षीदारांच्या परिस्थितीत चित्त आकर्षित बदल ही १९८९ या वर्षातील ठळक गोष्ट होय. याचे परिणामात, आता ते त्यांच्या घरोघरच्या सेवेत पवित्र शास्त्राचा प्रथमच उपयोग करू लागले तसेच सभांची सुरवात प्रार्थनेकरवी करू शकतात. याचा तत्काळ परिणाम असा झाला की, दोन महिन्यात प्रचारकांच्या संख्येने १७,००० पर्यंत झेप घेतली.
या प्रगतिचा जो आनंद बंधुवर्गास झाला तो त्यांच्या वक्तव्याद्वारा व्यक्त होत आहे. एकाने लिहिलेः “जेव्हा ते पत्र मंडळीसमोर वाचीत होते तेव्हा दोन वेळा टाळ्यांच्या गजराकरिता थांबावे लागले. ते शिरशिरी भरविणारे होते.” दुसरा म्हणतोः “आम्ही आमचे आनंदाश्रू लपवू शकलो नाही. याचा परिणाम हा दिसून आला की, उपस्थिती अधिक सुधारली. सर्वच सुरवातीच्या प्रार्थनेआधी येऊ लागले.”
“आमच्या क्षेत्रभागावर,” दुसऱ्या एका प्रचारकाने म्हटलेः “एक स्त्री, जी कॅथोलिक चर्चच्या बायबल स्टडी कार्यक्रमात इर्ष्येने भाग घेणारी आहे, ती म्हणतेः ‘पूवी, निदान बोलणे आणि मासिके यांच्याआधारे [साक्षीदार] आम्हाला निशब्द करीत, पण आता तर प्रत्येक दारी बायबल उघडले जाते आणि आम्ही तर पार लोपून जातो!”
मेक्सिकोमधील यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्राच्या मदतीने अनौपचारिक साक्षीकार्यावरही अधिक जोर देत आहेत. एका भगिनीची अशा एका स्त्रीशी भेट झाली, जिने विचारले, ‘गर्भपाताबद्दल आपले मत काय आहे?’ साक्षीदाराने उत्तर दिलेः “पवित्र शास्त्र त्याबद्दल जे काही म्हणते त्यापुढे मला जे काही वाटते ते, एवढे महत्त्वाचे नाही.” अनेक शास्त्रवचने वाचल्यावर आमच्या भगिनीने समर्थन केले की, “सृष्टीकर्त्याकरिता प्रत्येक जीव मोलाचा आहे, होय, ज्यांनी अद्याप जन्म घेतलेला नाही, त्यांचाही.”
मग, त्या स्त्रीने हे कबूल केले की, ती गरोदर आहे; पण वैद्यकीय तपासणी हे दाखविते की, तिचे हे प्रथम मूल अपवादात्मक असेल. तिचे डॉक्टर तिला गर्भपात करण्याचा सल्ला देतात व तिच्या पतीला हे मान्य आहे, तरी त्या स्त्रीला याची खात्री वाटत नाही. प्रचारकाने तिजबरोबर शास्त्रवचनाआधारे चर्चा केली व तिला आपले नाव दिले. यानंतर त्या दोघी आपापल्या वाटेने गेल्या.
पाच वर्षानंतर एका प्रांतिय अधिवेशनात एक जोडपे, त्यांच्या चार वर्षाच्या मुलीसह या भगिनीची व तिच्या पतीची भेट घेऊ इच्छित होते. ती तीच स्त्री होती. पण काय झाले होते? साक्षीदाराबरोबरच्या चर्चेनंतर तिने गर्भपात न करण्याचा निश्चय केला. तिच्या डॉक्टरने तिची परत तपासणी करण्यास स्पष्ट नकार दिला. याशिवाय, मूल अपवादात्मक जन्मले तर नवऱ्यानेही तिला सोडून देण्याची धमकी दिली. जेव्हा बाळंत होण्याची वेळ आली तेव्हा तिने तिच्या पहिल्या डॉक्टरचा मदतीसाठी शोध घेतला.
प्रसूती झाल्यावर लगेचच डॉक्टर तिच्याकडे येऊन म्हणालेः “अभिनंदन! तुम्हाला एक सुंदर मुलगी झाली आहे.” तिचा तिच्या कानावर विश्वास बसेना, तिने त्यांना आपल्या मुलीची परत नीट तपासणी करण्याची विनंती केली. मग तिने त्यांना सर्व हकीकत कळविली. डॉक्टर केवळ उद्गारलेः “हा चमत्कार आहे!” त्या स्त्रीला याचा एवढा आनंद वाटला की जिवाच्या पावित्र्याबद्दल यहोवाच्या दृष्टीकोनाचा तिने आदर केला व तिने आपल्या सुंदर व आरोग्यसंपन्न मुलीला आमच्या भगिनीचेच नाव ठेवले. मग, तिचे प्रकृतीस्वास्थ ठीक झाल्यावर तिने साक्षीदारांचा शोध घेतला व त्यांच्यासोबत पवित्र शास्त्र अभ्यासाला सुरवात केली. वर्षभरातच तिने व तिच्या पतीने स्वतःचा बाप्तिस्मा करवून घेतला.
प्रेषित पौलाने विनविलेः “आत्म्यात उत्सुक, यहोवाची सेवा करणारे व्हा.” (रोमकर १२:११) मेक्सिकोतील यहोवाचे साक्षीदार, चोहोकडील खऱ्या ख्रिश्चनांप्रमाणे या आग्रहपूर्वक विनवणीकडे आपल्या संपूर्ण हृदयाने होकार देत आहेत. याच कारणास्तव सबंध देश आज आत्मिक कार्यहालचालीच्या आत्म्याने उत्सुक व कंपायमान झालेला आहे. यामुळेच, यहोवा त्याच्या विश्वासू सेवकावर केवढ्या समृद्ध आशीर्वादांचा वर्षाव करीत आहे!