वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ६/१ पृ. १८-२३
  • “युद्ध यहोवाचे आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “युद्ध यहोवाचे आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सार्वभौमत्वाचा वादविषय
  • आधुनिक काळचा “शौल”
  • हातमिळवणी नाही!
  • इतिहासकारांच्या दृष्टीकोनातून
  • “हे युद्ध परमेश्‍वराचे आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • “हे युद्ध परमेश्‍वराचे आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • दावीद आणि गल्याथ
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • दावीद आणि गल्याथ
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ६/१ पृ. १८-२३

“युद्ध यहोवाचे आहे”

“इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहे, त्या सेनाधीश यहोवाच्या नामाने मी तुजकडे आलो आहे.”—१ शमुवेल १७:४५.

१, २. (अ) शौल राजाच्या अधिपत्याखालील इस्राएल सैन्यासमोर कोणते आव्हान उभे होते? (ब) गल्याथच्या आव्हानाबाबत इस्राएल सैन्याची काय प्रतिक्रिया होती, व आता कोणी त्या दृश्‍यात प्रवेश केला?

दोन बलाढ्य सेना यरुशलेमाच्या नैऋत्येकडील एला नामक खोऱ्‍यात, एकमेकांसमोर तळ ठोकून होत्या. एका बाजूस, भयभीत झालेल्या राजा शौलाच्या नेतृत्वाखालील इस्राएलांचे सैन्य होते. तर दुसऱ्‍या बाजूला, गल्याथ नामे महावीरासह पलिष्टी लोक होते. गल्याथ या नावाचा अर्थ बहुतेक “चटकन डोळ्यात भरणारा” असा असावा. तो नऊ फूट उंच होता व नखशिखात शस्त्रसिद्ध होता. गल्याथ मोठमोठ्याने ओरडून इस्राएलांची निंदा करीत होता.—१ शमुवेल १७:१-११.

२ गल्याथच्या आव्हानास कोण उत्तर देईल? “त्या पुरुषास पाहताच सर्व इस्राएल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले.” पण पहा, एक गोंडस मुलगा पुढे सरसावला. त्याचे नाव दावीद आहे, ज्याचा अर्थ “मला प्रिय” असा होतो. त्याच्याठायी नीतीमत्वतेकरता असलेल्या निर्भिड एकनिष्ठेमुळे तो यहोवाला देखील “प्रिय” होता. इस्राएलांचा भावी राजा म्हणून शमुवेलाने आधीच त्याचा अभिषेक केला होता व यहोवाचा आत्मा त्याजवर बलाढ्यतेत कार्यव्रत होता.—१ शमुवेल १६:१२, १३, १८-२१; १७:२४; स्तोत्रसंहिता ११:७; १०८:६.

३. सामना करण्यास दावीदाने स्वतः कशी तयारी केली, पण तेच गल्याथ कशाप्रकारे सज्ज होता?

३ “जिवंत देवाची सेना तुच्छ” लेखीत असलेल्या गल्याथाचे शब्द ऐकून, त्या राक्षसाविरुद्ध लढण्यास दावीदाने स्वतःस दिले. शौलाने संमती दिल्यावर दावीद शौलाने दिलेली परंपरागत शस्त्रे व चिलखत घेऊन नव्हे तर तसाच त्वरेने बाहेर आला. त्याने हातात फक्‍त काठी व गोफण व पाच गुळगुळीत गोटे घेतले, जे गल्याथाशी अगदीच विसंगतीत होते. त्याच्या भाल्याचे पाते तर १५ पौंड वजनाचे व तो १२६ पौंड वजनाचा पितळी चिलखत धारण करुन होता. जसजसा तो महावीर गल्याथ व त्याचा शस्त्रवाहक पुढे सरसावत होते, “त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दावीदास शिव्याशाप दिले.”—१ शमुवेल १७:१२-४४.

४. त्या राक्षसाच्या आव्हानास दावीदाने कसे प्रत्त्युत्तर दिले?

४ दावीदाने कसे प्रत्त्युत्तर दिले? त्याने मोठ्या स्वरात राक्षसाच्या आव्हानास प्रत्त्युत्तर देत म्हटलेः “तू तरवार, भाला व बरची घेऊन मजवर चालून आला आहेस, पण ज्या इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहे, त्या सेनाधीश यहोवाच्या नामाने मी तुजकडे आलो आहे. आज यहोवा तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शीर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांस व वनपशूंस देईन, तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदीत होईल. आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की, यहोवा तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध यहोवाचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती देईल.”—१ शमुवेल १७:४५-४७.

५. युद्धाचा निकाल काय लागला व त्याचे श्रेय कोणाकडे जाते?

५ दावीद मोठ्या हिम्मतीने युद्धास पुढे सरसावला. त्याच्या गोफणीतील गोटा त्याच्या निशाणाकडे गेला व गल्याथ जमिनीवर कोसळला. होय, यहोवाने दावीदाच्या विश्‍वासाचे प्रतिफळ त्याला दिले व त्याचे छोटेसे दूरक्षेपण अचूकतेत राक्षसाच्या कपाळात घुसले. दावीद पुढे धावला, गल्याथाचीच तरवार उपसून त्याने त्याचा शिरच्छेद केला. पलिष्ट्यांनी गोंधळून तेथून पळ काढला. खरोखरी हे खरे ठरले की, “युद्ध यहोवाचे आहे.”

६. (अ) या प्राचीन काळच्या युद्धाचा तपशील यहोवाने का सुरक्षित ठेवला? (ब) ज्यांची कदाचित गल्याथासोबत तुलना करता येईल अशांकडील छळास तोंड देत असता देवाच्या सेवकांना कसल्या आत्मविश्‍वासाची गरज असते?

६ हे युद्ध होऊन आज सुमारे ३,००० वर्षे लोटली आहेत तरी यहोवाने हा युद्ध तपशील आपल्या वचनात का जतन करुन ठेवलेला आहे? प्रेषित पौल आम्हाला सांगतोः “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणास शिक्षण मिळण्याकरता लिहिले, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्‍या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी.” (रोमकर १५:४) आज, ज्यांची तुलना गल्याथासोबत करता येईल असे अनेक शत्रू देवाच्या विश्‍वासू सेवकांचा उघड अपमान करतात व त्यांना अमानुष छळ देतात. हे सर्व सहन करीत असताना व दबाव वाढत असताना, आम्हा सर्वांना या सांत्वनपर शाश्‍वतीची गरज आहे कीः “युद्ध यहोवाचे आहे.”

सार्वभौमत्वाचा वादविषय

७. सर्व राष्ट्रातील देवाच्या सेवकांना कोणत्या वादविषयाची चिंता असते व का?

७ गल्याथ मोठ्या गर्वाने इस्राएलांच्या देवाविरुद्ध आगेकूच करीत होता. त्याचप्रमाणे या २० व्या शतकात एकपक्षी राजकीय पद्धतीची सरकारे पुढे सरसावून यहोवाच्या सार्वभौमत्वास आव्हान देतात व त्याच्या सेवकांना देशासोबत भक्‍तीभाव अधीनतेत राहण्यास भाग पाडण्याच्या प्रयत्नात असताना हा वादविषय देवाच्या लोकांना सर्व राष्ट्रात सतत भेडसावत असतो. का बरे? कारण भविष्यवादात कथीत विदेश्‍यांचे काळ, “परराष्ट्रीयांची सद्दी” १९१४ मध्ये संपली व “राष्ट्रे पृथ्वीवर घाबरी होऊन पेचात” पडण्याच्या सध्याच्या काळाची सुरवात झाली. (लूक २१:२४-२६; न्यू. व.; किंग जेम्स आवृत्ति) पृथ्वीवरील यरुशलेमास इ. स. पूर्वी ६०७ पासून पायाखाली तुडविण्यास सुरवात झाल्यापासून विदेश्‍यांच्या काळास सुरवात झाली आणि त्यापुढील २,५२० वर्षे म्हणजेच १९१४ पर्यंत ते चालू होते. या वर्षी यहोवाने त्याचा मशीहा राजा म्हणून येशूला स्वर्गीय यरुशलेमात सिंहासनाधिष्ठ केले.—इब्रीयांस १२:२२, २८; प्रकटीकरण ११:१५, १७.a

८. (अ) “भीड धरुन यहोवाची सेवा” करावी या भविष्यवादित आज्ञेस पृथ्वीवरील राजे प्रतिसाद देत नाहीत ते कसे? (ब) कोणते जगीक बलवान यहोवाची निंदा करतात व त्याच्या साक्षीदारांवर हुकुमशाही चालवितात?

८ एक मोठा बदल १९१४ मध्ये घडविण्यात आला. परराष्ट्रीय राष्ट्रे यापुढे इश्‍वरीय अडथळ्याविना राज्य करु शकणार नाहीत. पण त्यावेळी जे “राजे” राज्य करीत होते त्यांनी, देवाने सिंहासनाधिष्ठ केलेल्या राजास ओळखून भविष्यवादित आज्ञेनुसार “भीड धरुन यहोवाची सेवा” केली का? नाही. याउलट, ते “यहोवाविरुद्ध व त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध” येशूविरुद्ध उठले. आपलाच मनोदय पुरा करण्याच्या पाठीस लागून ते १९१४ ते १९१८ च्या “दंगल” मध्ये पडले. (स्तोत्रसंहिता २:१-६, १०-१२) आजतागायत, जागतिक स्वामित्व हाच एक ज्वलंत वादविषय मानवजातीसमोर आहे. सैतानाच्या जगाने सतत राजकीय मुत्सद्यांना सामोरे आणण्याचे चालू ठेविले; जे गल्याथच्या रेफाईम या नातलगासमान आहेत. ही हुकुमशाही यहोवाची निंदा करते व त्याच्या साक्षीदारांना आपणाधीन करण्यास पाहते. पण जसे सर्वदा घडत आले तसेच आहे की, युद्ध आणि विजय ही यहोवाची आहेत.—२ शमुवेल २१:१५-२२.

आधुनिक काळचा “शौल”

९. शौल राजासमान वागणारे आज कोण आहेत आणि कोणकोणत्या मार्गी?

९ या दृश्‍यात शौल राजा कोठे दिसतो? शौलाच्या बंडखोरीमुळे यहोवाने आधीच हा निर्णय घेतला होता की, ‘इस्राएलावरील त्याचे राज्यपद त्याजपासून काढून घ्यावे.’ (१ शमुवेल १५:२२, २८) आता गल्याथाच्या आव्हानास स्विकारुन यहोवाच्या सार्वभौमत्वास गौरविण्यात शौल मागे पडला. याशिवाय, गल्याथावर विजय मिळविणारा आणि शौलाच्या राजकर्त्या घराण्याऐवजी राज्य करण्यास यहोवाकडून अभिषेक झालेल्या दाविदाचा छळ करण्यास तो पुढे सरसावला. तर मग, या सर्व कृत्यात तो अगदी हुबेहुब आजच्या ख्रिस्ती धर्मराज्यातील पाद्रींची केवढी उत्तम प्रतिमा ठरतो बरे! यांनी आज पवित्र शास्त्रीय सत्याविरुद्ध बंड पुकारले आहे व ते त्या धर्मत्यागी महापुरुषाचे एक भाग आहेत, जो ‘आपल्या प्रभु येशू व त्याच्या येणाऱ्‍या राज्याची सुवार्ता’ मानीत नाही. यहोवाच्या सार्वभौम सत्तेला गौरविण्यात तर ते पूर्णपणे अपयशी ठरलेत पण सोबत त्यांनी यहोवाच्या अभिषिक्‍त साक्षीदारांचा व त्यांच्या साथीदारांचा अमानुष छळही चालविला. या कारणास्तव यहोवा ‘त्याच्या रागात’ या सर्व स्वधर्मत्याग्यांचा नायनाट करील.—२ थेस्सलनीकाकर १:६-९; २:३; होशेय १३:११.

१०. (अ) १९१८ मध्ये लंडन येथे एका प्रतिष्ठित पाद्रीगटामार्फत कोणता जाहीरनामा जाहीर केला गेला? (ब) जाहीरनामा पाळून चालण्याऐवजी पाद्रीगटाने कोणता मार्ग अनुसरला?

१० पहिल्या जागतिक युद्धकाळात ख्रिस्ती धर्मजगतातील पाद्रीगटाची हातमिळवणी अगदी उघड झाली. मग हे साहजिक की येशूचा मत्तय अध्याय २४ व २५ तसेच लूक अध्याय २१ मध्ये नमूद असणारा भविष्यवाद पूर्ण झाला. प्रत्यक्षात १९१८ मध्ये इंग्लंड, लंडनमधील एका प्रख्यात गटाने, जो बॅप्टिस्ट, काँग्रिगेशनल, प्रेसबिटेरियन, एपिस्कोपल, मेथोडिस्टसारख्या प्रमुख चर्चेसच्या प्रतिनिधित्वाचा होता, एक जाहीरनामा जाहीर केला, ज्यात म्हटले होतेः “सध्याची बिकट परिस्थिती विदेश्‍यांच्या काळाच्या समाप्तीकडे अंगूली दर्शवीत आहे.” पण या घोषणेचा त्यांनी पाठपुरावा केला नाही. आधीपासूनच, ख्रिस्ती धर्मराज्याचे पाद्रीगट पहिल्या जागतिक महायुद्धातील दोन्ही बाजूंना आपला संपूर्ण पाठिंबा देण्यात खोलवर गढले होते. येशू त्याच्या राज्यवैभवात अस्तित्वात असल्याचे ओळखण्याऐवजी त्यांनी जगातील राष्ट्रीय विचारप्रवाहात स्वतःस वाहू दिले ते एवढे की, लोकांना देवराज्य वर्चस्वाखाली संघटीत करण्याऐवजी त्यांच्यावर गल्याथासमान जुलमी सत्ताधिशांनी तसेच विभक्‍तीत सत्तांनी आपली दडपशाही चालत राहावी या मताचे बनविले.—मत्तय २५:३१-३३.

हातमिळवणी नाही!

११. सार्वभौमत्वाच्या वादविषयावर कोणी तडजोड केली नाही व त्यांनी कोणाचे उदाहरण अनुसरले?

११ देवाच्या समर्पित सेवकांनी सार्वभौमत्वाच्या या वादविषयात हातमिळवणी केली का? पवित्र शास्त्र अहवाल स्पष्ट दाखवितो तसे ते नेहमी यापासून दूर राहिले. (दानीएल ३:२८; ६:२५-२७; इब्रीयांस ११:३२-३८; प्रकटीकरण २:२, ३, १३, १९) जरी आधुनिक काळच्या गल्याथाने आजच्या निष्ठावंत ख्रिश्‍चनांवर निंदेची क्रुर चिखलफेक केली व छळांचा डोंगर रचला तरी ते यहोवाच्या सार्वभौमत्वास व राज्यास सतत उंचावून आहेत. याप्रकारे ते ज्याने यहोवाच्या सर्वाभौमत्वाच्या वतीने आध्यात्मिक युद्ध निकराने लढविले व सोबत जगीत झगडे व राजकारण यांचेमध्ये कडक तटस्थता बाळगली त्या “दावीदाचा पुत्र” येशू याच्या पावलास अनुसरत राहतात. आपल्या पित्याला केलेल्या प्रार्थनेत येशूने हा उल्लेख केला की खरे ख्रिश्‍चनही “या जगाचे नाहीत.”—मत्तय ४:८-१०, १७; २१:९; योहान ६:१५; १७:१४, १६; १८:३६, ३७; १ पेत्र २:२१.

१२. (अ) आधुनिक गल्याथाचा अधःपात कोणी व कसा केला? (ब) “गल्याथ” मेला असे त्यांनी पाहण्याच्या दृष्टीकोनाचा यहोवाच्या लोकांवर कसा परिणाम झाला?

१२ दाविदासमान आजच्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनातील शेषांनी आधुनिक गल्याथला अचूक निशाणा बनविले आहे. ते कसे? त्यात त्यांनी स्वतःबद्दल हे जाहीर केले की जागतिक वर्चस्वाच्या वादविषयात ते अगदी निसंशयीतपणे यहोवाच्या बाजूला आहेत. एक “ठराव (जो आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांच्या असोशिएशनने सीडर पॉईंट ओहायो येथील अधिवेशनात, रविवार, सप्टेंबर १०, १९२२ रोजी संमत केला)” याने नमूना प्रस्थापिला. त्यात पुढील कलमे समाविष्ट होतीः

“१०. आम्ही हे घोषित करतो व साक्ष देतो की, सैतानाच्या दृश्‍य व अदृश्‍य साम्राज्याविरुद्ध देवाकडील हा सूड घेण्याचा दिवस आहे;

“११. जुन्या जगाची किंवा व्यवस्थीकरणाची पुनर्स्थापना होईल ही अशक्य गोष्ट आहे. आता, देवाकडील ख्रिस्त येशूमार्फतच्या राज्याची स्थापना होण्याची ही वेळ आहे; आणि ज्या सर्व सत्ता व संघटना स्वखुशीने प्रभूच्या नीतीमान सत्तेच्या अधीन होऊ इच्छित नाहीत त्यांचा नाश केला जाईल.”

“दावीदाचा पुत्र” याने ख्रिस्ती मंडळीचा मस्तक यानात्याने राज्य सत्याचा तो “पाषाण” फिरकावला यात कोणताही संशय नाही. (मत्तय १२:२३; योहान १६:३३; कलस्सैकर १:१८) १९२२ ते १९२८ पर्यंत प्रतिवर्षी जे ठराव मंजूर करण्यात आले त्यांनी या भूमिकेखाली अधोरेखित केले आहे. यहोवाच्या लोकांच्या दृष्टीकोनातून “गल्याथ” गतप्राण झालेला, शिरच्छेद केलेला आहे. हुकुमशाहीस्वरुप मानवी सत्ताधीश प्रयत्न करुनही यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थकांना कोणाही प्रकारची हातमिळवणी करण्यास भाग पाडण्यात असमर्थ ठरले.—पडताळा प्रकटीकरण २०:४.

१३. (अ) ख्रिस्तीधर्मराज्यातील पाद्रीगटाने कशाप्रकारे जर्मनीच्या हिटलरशाहीतील दडपणकाळात तडजोडी केल्या? (ब) पण तेच कोणतीही तडजोड न करणाऱ्‍या साक्षीदारांबद्दल मदर्स इन फादरलँड या पुस्तकात काय म्हटले आहे?

१३ गल्याथसमान राजकीय सत्तांनी छळ करुन आपले हित साधण्याचा प्रयत्न केल्याचे अलिकडील लक्षवेधक उदाहरण हिटलरच्या जर्मनीत घडले. तेथील, दोन्ही प्रमुख धर्मगट, कॅथोलिक व प्रॉटेस्टंट पंथांनी नाझी तत्वांचा स्विकार करण्यात पुढाकार घेऊन त्यासाठी प्रार्थना केल्या, हिटलरला गौरविले, स्वास्तिकाला मानवंदना दिली व शेजारील राष्ट्रात जे त्यांचेच समविश्‍वासू होते त्यांची कत्तल करण्यास चाललेल्या लष्कराला पुढे सरसावून मोठमोठे आशीर्वाद दिले. स्वतःस ख्रिश्‍चन म्हणविणाऱ्‍या सर्वविश्‍वासाच्या पंथीयांनी—ज्यामध्ये यहोवाचे साक्षीदार नव्हते—देशभक्‍तीस होकार दिला. मदर्स इन फादरलँड नामे पुस्तकात म्हटलेः “[यहोवाच्या साक्षीदारांना] छळ छावण्यात टाकले, त्यांच्यापैकी हजारोंची कत्तल केली व आणखी हजार १९३३ ते १९४५ च्या दरम्यान ठार झाले. . . . कॅथोलिक व प्रॉटेस्टंट यांनी हिटलरला मिळण्याचा पाद्रींचा सल्ला ऐकला. यांनी प्रतिकार केला असता तर ते चर्च व राष्ट्र विरोधक ठरले असते.” तर मग, चर्च व राष्ट्र हे दोन्हीही किती रक्‍तदोषी आहेत बरे!—यिर्मया २:३४.b

१४. यहोवाच्या साक्षीदारांचा वेळोवेळी का छळ होत असतो?

१४ आजही, येशूने भाकित केल्यानुसार अनेक राष्ट्रात यहोवाच्या साक्षीदारांचा अमानुष छळ चालू आहे. तरीपण, सर्व प्रकारच्या परिस्थितीत हे ख्रिस्ती आवेशाने “राज्याची ही सुवार्ता” सतत गाजवीत आहेत. (मत्तय २४:९, १३, १४) उपरोधिक परिस्थिती अशी आहे की अनेक देशात साक्षीदार हे अत्यंत प्रामाणिक, शुद्धाचरणी नागरिक व कायदा आणि सुव्यवस्था पाळून चालणारे नमुनेदार लोक म्हणून ओळखले जातात. (रोमकर १३:१-७) तरीही त्यांचा वेळोवेळी छळ होतो ते का बरे? कारण भक्‍ती ही सर्वस्वी यहोवाच्याच मालकीची असल्यामुळे ते कोणाही राष्ट्रचिन्हासमोर मानवंदना करण्यात किंवा स्वागताची आरोळी देण्यात सहभागी होत नाहीत. (अनुवाद ४:२३, २४; ५:८-१०; ६:१३-१५) कसलीही हातमिळवणी न करता ते यहोवाची, “केवळ त्याचीच” भक्‍ती करुन त्यालाच ते आपल्या जीवनाचा सार्वभौम प्रभू असे मानतात. (मत्तय ४:८-१०; स्तोत्रसंहिता ७१:५; ७३:२८) “जगाचे [भाग] नाहीत” ही जाणीव राखून ते जगीक राजकारण व युद्धे यांच्याविषयी चोख ख्रिस्ती तटस्थता राखतात.—योहान १५:१८-२१; १६:३३.

१५, १६. (अ) जेव्हा आधुनिक गल्याथ कोणतेहि आव्हान साक्षीदारांना देत असतात तेव्हा त्यांच्यातील कोणाही वयोगटातील व्यक्‍तींनी कोणाचे उदाहरण अनुसरावे, व हे एका सहा वर्षांच्या ख्रिस्ती मुलीने कसे चित्रित केले? (ब) ख्रिस्ती पालक आपली मुले कोणासारखी बनावीत म्हणून त्यांना तालीम देऊ इच्छितील?

१५ मूर्तिपूजक प्रथांऐवजी यहोवाच्या भक्‍तीला प्रथमस्थानी ठेवणाऱ्‍या या सात्विक लोकांना आधुनिक “गल्याथ” वेळोवेळी दटावीत असतो. (प्रकटीकरण १३:१६, १७ पडताळा.) पण या आव्हानास निर्भिडपणे तोंड देण्यात साक्षीदारांतील सर्व लहानथोर दावीदाचे अनुकरण करु शकतात. लॅटिन अमेरिकन देशात एका सहा वर्षांच्या ख्रिस्ती मुलीस बालवयापासून उत्तम घरगुती शिकवण मिळाली होती. (पडताळा इफिस ६:४; २ तीमथ्य ३:१४, १५.) यामुळे तिच्या शाळेत तिच्या वर्गात ती एक हुशार विद्यार्थीनी म्हणून ती नावाजली. पण तिजठायीची पवित्र शास्त्रीय शिक्षण प्राप्त सद्‌विवेकबुद्धी तिला वर्गातील हरप्रकारच्या मूर्तिपूजक प्रसंगात सहभागी होण्यापासून दूर ठेवीत असे. तिने आपली भूमिका स्पष्ट केली तेव्हा तिची वर्गशिक्षिका म्हणाली की, तिच्या वयाच्या मुलीस विवेक कोठला! पण त्या सहा वर्षीय मुलीने शिक्षिकेला, अत्यंत परिणामकारक साक्ष देऊन चुकीचे ठरविले.

१६ यास्तव, ख्रिस्ती पालकांनी आपापल्या लहानांना सुरवातीपासूनच तालीम देत राहावे असे अपेक्षिले जाते ते यासाठी की, वेळप्रसंगी गल्याथसमान जगीक अधिकाऱ्‍यांनी जरी धमकी दिली तरी युवकवयीन दावीदाचे उदाहरण अनुसरु शकतील. ज्यांनी धीटपणे पवित्र शास्त्रीय तत्वांच्या एकमतात ‘चांगला विवेक राखून’ ठेविला त्या तीन विश्‍वासू मुलांसारखे किंवा दानीएलासारखे वा पवित्र शास्त्र इतिहासातील त्या अनेकासारखे या युवकांनी व्हावे अशीच आमची आशा आहे.—१ पेत्र २:१९; ३:१६; दानीएल ३:१६-१८.

इतिहासकारांच्या दृष्टीकोनातून

१७. (अ) इंग्लंडचे इतिहासकार टोयेन्बी यांनी कोणत्या पुढील प्रगतिबद्दल इशारा दिला? (ब) आधुनिक गल्याथ वर्ग कशाप्रकारे देवाच्या लोकांठायीच्या एकनिष्ठेचे परिक्षण करीत असतो?

१७ प्रसिद्ध इंग्लीश इतिहासकार अरनॉल्ड टोयन्बी यांनी म्हटले की, आमच्या काळात झपाट्याने उत्कर्षित होत असलेल्या “राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या भक्‍तीस भिन्‍नमतीय उपासनेचे उग्ररुप” जोडले जात आहे. यालाच ते ही पुष्टीही जोडतात की, हा एक “असा आम्ल क्षोभ आहे जो जणू लोकशाहीचा नवा द्राक्षारस प्राचीन जमातीच्या बुधल्यात भरत आहेत.” जे असा दावा करतात की त्यांचे राष्ट्र इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, राष्ट्रभक्‍तीच्या बाबतीत सुद्धा, त्यांना त्यांच्या सत्ताधिशांकरवी त्यांच्या धोरणांच्या—मग ती चांगली असो की वाईट—अमलबजावणीकरता कुशलपणे हाताळले जात आहे. याच्या परिणामात, हा गल्याथ वर्ग, आपापली जन्मभूमी आवडणाऱ्‍या पण राष्ट्र व त्याची प्रतिके यांची भक्‍ती करण्यास नकार देणाऱ्‍या देवाच्या लोकांच्या निष्ठेचे परिक्षण करण्यात नेहमीच उंच होत आहे.

१८. कोणत्या भेदक प्रश्‍नांची उत्तरे प्रामाणिक ख्रिश्‍चनांनी देणे जरुरीचे आहे?

१८ जसे नाझी जर्मनीच्या प्रकरणात होते तसेच आजही ख्रिस्ती सद्‌विवेकबुद्धीच्या जागृतीत चालणाऱ्‍यांना हे विचारशोधक प्रश्‍न विचारले जात आहेतः ज्या राष्ट्रात मी राहतो त्याजवर इतरांपेक्षा देवाची कृपा अधिक आहे असा विश्‍वास मी बाळगावा का? खासकरुन आता, मानवी इतिहासातील अत्यंत भयानक काळात पृथ्वीवरील कोणा एखाद्या छोट्याशा भागास इतर सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठ मानणे हे तर्कशुद्ध आणि समंजसपणाचे ठरेल का? किंवा कोणाएका मानवी कुटुंब घटकास इतर सर्व घटकांपासून उच्च मानणे बरे आहे का?

१९. एका राष्ट्राचे लोक दुसऱ्‍या राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहेत अशा विचारांबद्दल व वागणूकीबद्दल सर्वथोर इतिहासकार यहोवा देव आम्हास काय बजावून सांगतो?

१९ याविषयी, आपण, सर्वथोर इतिहासकार यहोवा देव, पवित्र शास्त्राचा जनक याच्या दृष्टीकोनाचा विचार करु. प्रेषित पेत्र आम्हास सांगतोः “देव पक्षपाती नाही हे मला पक्के समजते. तर सर्व राष्ट्रांपैकी जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये धर्मशील आहेत तो त्याला मान्य आहे.” शिवाय, आम्ही प्रेषित पौलाच्या प्रेरित विधानाच्या एकमतात वागू नये का कीः देवाने “एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रे उत्पन्‍न करुन त्यांनी सगळ्या भूपृष्ठावर राहावे असे” केले? मग कोणा एका राष्ट्राच्या लोकांनी असा विचार का करावा की, आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहोत? पौलाने सर्व लोकांविषयी भाष्य करताना असे म्हटले आहे की, “आपण दैवी वंश आहोत.”—प्रे. कृत्ये १०:३४, ३५; १७:२६, २९.

२०. देवाच्या लोकांस यहोवाकडील नवीन व्यवस्थीकरणात कोणत्या आव्हानास तोंड द्यावे लागणार नाही व आमच्या पुढील अभ्यासात कशाबद्दल चर्चा केली जाणार?

२० यहोवाच्या नव्या व्यवस्थिकरणात नीतीमत्तेसंबंधी प्रेम बाळगणाऱ्‍यांना पुढे गल्याथसमान हुकुमशाहीवृत्तीच्या राजकीय अधिष्ठानांना तोंड देण्याची जरुरी भासणार नाही, कारण ते अस्तित्वातच नसणार आणि तेव्हा विभाजन घडवून आणणारा गर्व व द्वेष हे गतकाळातील ठरतील. (स्तोत्रसंहिता ११:५-७) पृथ्वीवर देवाचे लोक कोठेही वस्तीस असले तरी त्यांनी ही राष्ट्रभक्‍ती, येशूने दिलेल्या आज्ञोनुरुप कीः “जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी” म्हणून आधीच सोडून दिलेली असणार. (योहान १३:३४, ३५; यशया २:४) अशा प्रकारचे प्रेम वा ती प्रीती कशी असावी याविषयी आमचा पुढील अभ्यास स्पष्ट करील.

[तळटीपा]

a  पवित्र शास्त्रीय कालगणनेविषयीच्या सविस्तर चर्चेसाठी “तुझे राज्य येवो” या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीकरवी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकातील पृष्ठे १२९-३९ पहा.

b  नाझी “गल्याथ”च्या आव्हानास प्रत्युत्तर देण्यात यहोवाच्या साक्षीदारांतील तरुण व वृद्धांनीही आपल्या सत्वपरिक्षणात शहारे आणविणारी जी उदाहरणे राखली ती यहोवाच्या साक्षीदारांचे १९७४ चे वार्षिक अहवाल पुस्तक यात ११७-२१ व १६४-९ पानांवर वाचा.

उजळणीचे प्रश्‍न

◻ राक्षसी नराधाम गल्याथ कोणाची प्रतिमा आहे?

◻ सार्वभौमत्वाच्या वादविषयावर देवाचे सेवक कोणकोणत्या मार्गी तडजोड करीत नाही?

◻ आधुनिक गल्याथ पाडलेला आहे असे देवाचे लोक का म्हणू शकतात?

◻ शौल राजासारखी कृत्ये कोण करीत आहेत व कशी?

◻ आधुनिक गल्याथाच्या जुलुमांना तोंड देण्यात देवाचे लोक दावीदासारखे कसे वागले?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा