वचनयुक्त देशाचे देखावे
राष्ट्रे मगिद्दोस एकत्र जमतात
आपणास मगिद्दोचा अधिक विस्तृत देखावा यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८९ च्या दिनदर्शिकेवर पाहण्यास मिळेल. त्यात असणाऱ्या सहा चित्रांचा या वर्षांतील टेहळणी बुरुज लेखात वादविवाद केला जाईल. यांचा तपशील कदाचित तुम्हाला दिनदर्शिकेसोबत भावी काळाच्या वापरासाठी जतन करता येईल.
“जागतिक हर्मगिदोन यावर संशोधकांच्या तर्कवितर्कांची अतिशयोक्ती होते,” असे एका विज्ञानशास्त्रीय लेखात म्हटले आहे. याच लेखात पुढे म्हटले आहे की अणुशस्त्र युद्ध झाल्यास ते “अणुशक्ती हिवाळा” आणून गोठवील की शुष्क करणारा “अणुशक्ती उन्हाळा.”
आपण कदाचित असे हे विवेचन “हर्मगिदोन” आणि आमच्या कठीण काळाच्या अनुषंगाने ऐकले असेल. तर मग, हे हर्मगिदोन काय आहे? हे आपणास जाणावेसे वाटेल, कारण याच्यासोबत आमचे जीवन जडलेले आहे.
मगिद्दोचे अवकाशातून घेण्यात आलेले वरील चित्र पहा. प्राचीन इस्राएलात हे एक लष्करी व्यूहरचनेचे स्थळ होते. प्रेषित योहानाने त्या नामाचा त्यावेळी उपयोग केला जेव्हा त्याने असे लिहिलेः “त्यांस इब्री भाषेत ‘हर्मगिदोन’ [मगिद्दोचा डोंगर] म्हटलेल्या ठिकाणी” किंवा आर्मगिदोन येथे एकत्र केले. (प्रकटीकरण १६:१६) मगिद्दो या डोंगरसपाटीची पार्श्वभूमि त्या शब्दांना उजळविते.
सोबत दिलेल्या नकाशात तुम्ही त्याचे मूळ स्थान पाहू शकाल. वास्तविकतेत, तेथून दोन महामार्ग वरुन दिसतात. कर्मेल पर्वताने दक्षिणेकडील मिसर ते उत्तरेकडे इफ्रातकडील दिमिष्क आणि इतर शहराकडे जाणाऱ्या मार्गावर नाकेबंदी केली आहे. यास्तव लष्करांना व व्यापारी काफल्यांना मगिद्दोशेजारच्या एका चिंचोळ्या दरीतून जाणे भाग पडत असे, जी या छबीत उजव्या हाताला दाखविली आहे. उत्तर-दक्षिण मार्ग इज्रेल दरीला छेदून पुढे सोर व यार्देन दरीला किंवा शोमरोन आणि यरुशलेममधील महत्त्वाच्या मार्गास मिळतो. या मार्गाच्या सुळक्यावर बसल्यास मगिद्दो हे खालून जाणाऱ्यावर सहज वर्चस्व बसवू शकते व मगिद्दोसमोरील दरी ही निर्णायक युद्धक्षेत्र ठरते.
उदाहरणार्थ, याच स्थळी संदेष्टा बाराकने, जो नऊशे लोखंडी रथासह मोठे लष्कर घेऊन चालून आला होता त्या कनानी सेनापती सिसरा याचा पराभव केला. (शास्ते ४:१-३, १२-१६; ५:१९) कालांतराने, मिसरचा फारो नखो हा बलाढ्य लष्कर आणि रथासह समुद्रकिनाऱ्याने (अर्थात, मारीसमार्गे) इफ्रातजवळील अश्शुरी लोकांच्या शहरावर चालून गेला. काही कारणास्तव यहुदाचा राजा योशियाने नखोशी युद्ध पुकारले. पण कोठे? जरी ते यरुशलेमाच्या उत्तरेस ५५ मैलावर होते तरी मगिद्दोजवळच्या सपाटीवर करावे असे योशियाने निवडीले.—२ इतिहास ३५:२०-२२; यिर्मया ४६:२.
त्याला माहीत होते की मिसऱ्यांना तेथूनच जावे लागेल व कदाचित मला संधी सापडेल, कारण तो इस्राएलांच्या मजबूत किल्ल्यानजीक होता. जसे आपण पाहता, तैल (पठार) मगिद्दो हे बरेच मोठे होते. प्राचीन शहर सर करण्यास कठीण होते. शलमोनाने मगिद्दोची तटबंदी उभारली, त्याजभोवताली भक्कम वेस व संरक्षक दरवाजा उभारला.a (१ राजे ९:१५) तैलच्या डाव्या बाजूस आपणास एक मोठा, अंडाकृती खड्डा दिसेल जो एका अंतर्गत पाण्याच्या पुरवठ्याकडे जाणारा प्रवेशमार्ग होता. एका उभ्या जिन्याने खालच्या लांब बोगद्यात उतरुन खडक खणून काढलेल्या खिंडारमार्गे इस्राएल लोक शत्रूंचा हल्ला चुकवीत बाहेरच्या तळ्याकडे नेऊन पोहंचत. भूगर्भसंशोधकांना त्यातच एक मोठी ४५० घोड्यांची पागा आढळली जी सुमारे अहाब राजाच्या कारकिर्दीतील असावी.—१ राजे ९:१९ पहा.
मगिद्दोनजीकच्या निर्णायक युद्धात योशीया मरणप्राय जखमी झाला व यरुशलेमात परतीच्या मार्गावर वारला. (२ राजे २३:२८-३०) कदाचित हेच ते कारण असावे की ज्यामुळे, जखऱ्या १२:११ मध्ये उल्लेखित ‘मगिद्दोच्या खोऱ्यात’ आकांत झाला. योशीयाच्या पराभवानंतर थोडक्याच काळाने बाबेलने आपला लष्करी प्रभाव कमकुवत झालेल्या यहुदांवर पाडला.—२ राजे २४:१, २, १२-१४; २ इतिहास ३६:१-६.
या पाश्वभूमीच्या माहितीआधारे, आपणास हे उचित वाटेल की, प्रेषित योहान याला जे प्रकटीकरण देण्यात आले त्यात ‘सबंध पृथ्वीवरील राजांस’ ‘सर्वसत्ताधारी देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी’ जेथे एकत्रित केले जाईल त्या स्थळास मगिद्दोची उपमा का दिली. पृथ्वीवरील कोणतेच स्थळ व हेही निश्चित की, तैल मगिद्दो हे पठार देखील देवाच्या विरोधातील सर्व राष्ट्रांना आपणात सामावून घेऊ शकणार नाही. पण हर्मगिदोन किंवा आर्मगिदोन हे त्या निर्णायक युद्ध परिस्थितीचे यथायोग्य प्रतिनिधित्व करते.—प्रकटीकरण १६:१४, १६; १९:११-२१.
यास्तव, राजकीय मुत्सद्दी आणि वार्ताहर यांना चुकीने आर्मगिदोन हे या गोलार्धास उध्वस्त करेल असे अणूशक्तीचे युद्ध होणार असे समजू द्या. आम्ही मगिद्दोचा पूर्वइतिहास विचारात घेऊन ही गोष्ट काय आहे हे स्वतःच अचूक समजू शकतो. आपणास हे आवडेल की, आर्मगिदोन ही एक अशी परिस्थिती असेल की, जिच्यामध्ये लवकरच सर्व राष्ट्रे त्या महान युद्धाकरिता प्रवेश करतील ज्यात देव सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा समूळ नायनाट करील व एका नीतीमान नवीन जगासाठी मार्ग मोकळा करील.—२ पेत्र ३:११-१३.
[तळटीपा]
a अत्यंत आकर्षक अशा मगिद्दोच्या प्रवेशद्वाराबद्दल तुम्हाला द वॉचटावर मासिकाच्या ऑगस्ट १५, १९८८ च्या पान २४-६ वर अधिक वाचन करता येईल.
[१७ पानांवरील तक्ता]
[For fully formatted text, see publication]
मोठा समुद्र
सोरकडे
अक्को
दिमिष्काकडे
गालील समुद्र
कर्मेलच्या रांगा
मगिद्दो
बेथ-शेआन
दोथान
शोमरोन
यार्देन नदी
शेखेम
मारीस द्वारे
यरुशलेमकडे
योप्पा
मिसरकडे
मैल
०
१०कि.मी.
०
१०
२०
[चित्राचे श्रेय]
Based on a map copyrighted by Pictorial Archive (Near Eastern History) Est. and Survey of Israel
[१६ पानांवरील चित्रं]
आपणास मगिद्दोचा अधिक विस्तृत देखावा यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८९ च्या दिनदर्शिकेवर पाहण्यास मिळेल. त्यात असणाऱ्या सहा चित्रांचा या वर्षांतील टेहळणी बुरुज लेखात वादविवाद केला जाईल. यांचा तपशील कदाचित तुम्हाला दिनदर्शिकेसोबत भावी काळाच्या वापरासाठी जतन करता येईल.
[चित्राचे श्रेय]
Pictorial Archive (Near Eastern History) Est.
[१७ पानांवरील चित्रं]
हे मिसरातील खोदकाम आहे जे फारो नखो याने मगिद्दो ओलांडून योशीया राजाचा पराभव केला त्याचे चित्र आमच्या डोळ्यापुढे उभे करील
[चित्राचे श्रेय]
Pictorial Archive (Near Eastern History) Est.