वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ६/१ पृ. १०-१५
  • “यहोवाचा हात त्यांच्याबरोबर होता”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “यहोवाचा हात त्यांच्याबरोबर होता”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “सर्व राष्ट्रांस”
  • राष्ट्रांसाठी सुवार्तिक
  • प्रभावी शिक्षण
  • पायनियर आत्मा मूळ धरतो
  • पूर्ण वेळेचे उपाध्याय प्रचार कार्यात पुढाकार घेतात
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
  • सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी सुवार्तिक असले पाहिजे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ६/१ पृ. १०-१५

“यहोवाचा हात त्यांच्याबरोबर होता”

“ह्‍याप्रमाणे यहोवाच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.”—प्रे. कृत्ये १९:२०.

१. (अ) इ. स. मधील पहिल्या शतकातील ख्रिस्ती धर्माच्या शत्रूंनी कोणता आरोप केला होता? (ब) सुवार्तिक पौलाने जेथे जेथे देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला तेथे त्यानंतर काय घडले, आणि सुरवातीच्या ख्रिश्‍चनांचे सोबत सतत काय असायचे?

सुमारे १,९०० वर्षे आधी, ख्रिस्ती संदेशाचे शत्रू व सुवार्तिक प्रेषित पौल याच्या विरोधकांनी अशी ओरड केलीः “ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत . . . हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून कोणीएक दुसरा राजा आहे असे ते म्हणतात.” (प्रे. कृत्ये १७:६, ७) जेथे जेथे ख्रिस्ती सुवार्तिक प्रेषित पौलाने यहोवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली तेथे कृती व प्रतिकृती घडल्या व वेळोवेळी छळहि झाला. सुरवातीच्या काळातील इतर ख्रिश्‍चनांनाही छळ सोसावा लागला. पण सर्वदा, “यहोवाचा हात त्यांच्याबरोबर होता.”—प्रे. कृत्ये ११:२१.

२. ख्रिस्ती सुवार्तिक हालचालीचे अनुकरण कोणी व कसे केले?

२ या महत्त्वपूर्ण ख्रिस्ती सुवार्तिक हालचालीस कोणी प्रोत्साहन दिले? तो येशू होता. तो असा अद्वितीय गृहस्थ होता, ज्याच्यापाशी शिरशिरी भरविणारा संदेश तर होताच पण त्याचा प्रचार करण्याची त्याची असमान्य पद्धत देखील होती. देवाचा पुत्र येशू याने प्रथमच यहुदी लोकांना देवराज्याची विस्मित करणारी घोषणा केली. पण हे लोक केवळ, नियमशास्त्राधारित कृत्ये आचरुन स्वतःचे तारण साध्य करण्याच्या खटपटीत होते.—मत्तय ४:१७; लूक ८:१; ११:४५, ४६.

“सर्व राष्ट्रांस”

३. येशूच्या कोणत्या भविष्यवादाबद्दल त्याच्या यहुदी शिष्यांना नक्की आश्‍चर्य वाटले असावे व का?

३ येशूने आपल्या मृत्युच्या तीन दिवस आधी आपल्या यहुदी शिष्यांना जे म्हटले ते ऐकून ते केवढे विस्मित झाले असतील याची आम्ही कल्पना करु शकतो. तो म्हणालाः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” त्याचे शिष्य या विस्मयात पडले असावेत की ते “सर्व राष्ट्रास” ही सुवार्ता कशी गाजवू शकतील. विश्‍वासूंचा हा छोटासा गट एवढी महान नेमणूक कशी पार पाडणार?—मत्तय २४:१४; मार्क १३:१०.

४. पुनरुत्थित येशूने त्याच्या शिष्यांना काय आज्ञा दिली होती?

४ कालांतराने पुनरुत्थित येशूने वरील गोष्टीला हा आदेश जोडला व म्हटलेः “स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्वकाही मी तुम्हास आज्ञापिले आहे ते पाळावयास त्यांस शिकवा.” याप्रकारे त्यांना त्यांच्या गुरुजींचा संदेश “सर्व राष्ट्रातील लोकांस” ऐकविण्याची कामगिरी नेमून देण्यात आली.—मत्तय २८:१८-२०.

५, ६. (अ) देवराज्य सुवार्ता प्रचाराचे काम विदेश्‍यांपर्यंत कसे पोहंचले आणि त्याचा काय परिणाम झाला? (ब) जेव्हा पेत्राने विदेशी कर्नेल्यचा त्याजबरोबरील अनुभव कथित केला तेव्हा यरुशलेममधील वडीलवर्गाने कशारितीने प्रतिक्रिया दर्शविली?

५ यात, जे विदेशी भेटतील त्यांनाही उपदेश करण्याचे समाविष्ट होते व ते एक आव्हान होते. तीन वर्षानंतर त्याबाबतीत पेत्राची चित्तवृत्ती काय होती हे याचे एक प्रमाण आहे. एका दृष्टांताद्वारे पेत्राला काही अशुद्ध प्राणी मारुन खाण्यास सांगितले. जेव्हा देवाने त्याला हे सूचित केले की पूर्वी ज्यांना अशुद्ध समजत त्यांना आता शुद्ध बनविल्याचे दृष्टीकोनातून पाहिले जाते, तेव्हा पेत्र बावरला. मग, पेत्रास देवाच्या आत्म्याने रोमी शतपती, विदेशी कर्नेल्य याच्या घरी भेट देण्यास सुचविले. तेथे त्याला ही समज मिळाली की, जरी पूर्वी त्याला वाटत होते की इतर वंशाच्या लोकांशी संबंध ठेवणे नियमशास्त्राचे विरुद्ध आहे तरी आता देवाची इच्छा ही होती की त्याने जाऊन कर्नेल्यला उपदेश करवा. पेत्र बोलणी करीत असता, पवित्र आत्मा त्या विदेशी कुटुंबियांवर आला व त्यावरुन हे सूचित झाले की, आता ख्रिस्ती सुवार्तिक कार्याची क्षेत्रवाढ झालेली असून त्यात यहुद्देत्तर जगाचाही समावेश झाला आहे.—प्रे. कृत्ये १०:९-१६, २८, ३४, ३५, ४४.

६ जेव्हा पेत्राने या घटनेची माहिती यरुशलेम येथील वडीलवर्गास दिली तेव्हा “हे ऐकून ते उगे राहिले, आणि देवाचे गौरव करीत बोललेः ‘तर मग, देवाने विदेशी लोकांसही जीवनाप्राप्त्यर्थ पश्‍चातापबुद्धी दिली आहे.’” (प्रे. कृत्ये ११:१८) आता विदेशी राष्ट्रे अगदी मोकळेपणात ख्रिस्ताची आणि त्याच्या राज्याची सुवार्ता स्विकारु शकत होते!

राष्ट्रांसाठी सुवार्तिक

७. भूमध्य समुद्राभोवतालच्या देशात ख्रिस्ती सुवार्तिक हालचालीस कशी सुरवात झाली, व याकडे यहोवाने कोणती दृष्टी धरली?

७ स्तेफनाच्या हुतात्मिक मरणानंतर प्रचारकार्याने जी गति धरली होती तिने आता वेगळाच आकार धरला होता. प्रेषितांखेरीज यरुशलेम मंडळीतील सर्व पांगले होते. सुरवातीस त्या छळग्रस्त यहुदी विश्‍वासूंनी फेनीके, कुप्र आणि अंत्युखिया येथील केवळ यहुद्यांनाच उपदेश केला. “तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होते . . . त्यांनी . . . येऊन प्रभु येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांस सांगितली.” मग विदेश्‍यांमध्ये ही जी सुवार्तिक कामगिरी केली, ती यहोवास कशी वाटली बरे? “तेव्हा यहोवाचा हात त्यांच्याबरोबर होता, आणि पुष्कळ लोक विश्‍वास धरुन प्रभूकडे वळाले.” सुरवातीच्या त्या ख्रिश्‍चनांठायीच्या निर्भिडपणाचे आभारी आहोत व जी प्रभावी सुवार्तिकेची हालचाल केली तीच भूमध्य सागरासभोवतालच्या देशात ही कामगिरी पसरण्याची सुरवात होती. पण अद्याप पुष्कळसे अधिक येणे होते.—प्रे. कृत्ये ४:३१; ८:१; ११:१९-२१.

८. देवाने कशाप्रकारे सुवार्तिक सेवेच्या वाढीच्या निर्णायक मोहीमेची प्रेरणा दिली?

८ इ. स. ४७-४८ च्या सुमारास देवाने, सुवार्तिक कामात वाढ व्हावी म्हणून पवित्र आत्म्याद्वारे एक निश्‍चित योजना सुचविली. याविषयी प्रे. कृत्ये १३:२-४ मधील अहवाल आम्हास सांगतोः “पवित्र आत्म्याने सांगितले की, बर्णबा व शौल यांस ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांस मजकरता निराळे करुन ठेवा. . . . याप्रमाणे पवित्र आत्म्याने त्यांची रवानगी झाल्यावर ते सलूकियात [अरामी अंत्युखियाचे बंदर] येऊन तारवातून कुप्रास गेले.” पौल आणि बर्णबासाठी, पहिल्यांदाच त्यांच्या विदेशी नेमणूकीवर जाणे हे केवढे शिरशिरी भरविणारे असेल. प्रेषित पौल ख्रिस्ती सुवार्तिक हालचालीचे नेतृत्व करत होता. तसेच त्याजसोबत तो अशा एका सेवेची मुहुर्तमेढ किंवा पाया घालत होता जिची पूर्णता आमच्या विसाव्या शतकात होणार होती.

९. प्रेषित पौलाने त्याच्या सुवार्तिक यात्रेकरवी काय साध्य केले?

९ पौलाने त्याच्या तीन प्रसिद्ध सुवार्तिक यात्रा केल्या व एकदा कैदी म्हणून रोमपर्यंतचा प्रवास केला. यांच्या दरम्यान त्याने युरोपातील अनेक शहरात कार्याची सुरवात केली. शिवाय इतरही देशात व बेटावर जाऊन राज्याचा संदेश प्रचार केला ज्यांना आज सिरिया, सायप्रस, क्रेत, तुर्क, ग्रीस, माल्टा व सिसीली या नावांनी ओळखतात. अनेक शहरात त्याने मंडळीची स्थापना केली. त्यांच्या या प्रभावी सुवार्तिक हालचालीमागील रहस्य काय होते?

प्रभावी शिक्षण

१०. पौल त्याच्या सुवार्तिक हालचालीत एवढा कार्यक्षम कसा होता?

१० पौलाने शिक्षण देण्यात खिस्ताचा मार्ग अनुसरला होता. यास्तव लोकास कसे समजावून सांगावे हे तो चांगले जाणत होता. लोकांस शिक्षण कसे द्यावे आणि इतरांना शिक्षक बनण्याची तालीम कशी द्यावी हे तो चांगले जाणत होता. तो त्याचे शिक्षण देववचनाआधारे देत असे. त्याने आपणाठायीच्या ज्ञानाचा दुसऱ्‍यावर प्रभाव पाडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, याऊलट त्याने शास्त्रातून संवाद केला. (प्रे. कृत्ये १७:२, ३) आपल्या श्रोत्यांना कसे जुळवून घेणे आणि स्थानिक परिस्थितीला त्याच्या संदेशाची प्रेरक शक्‍ती म्हणून कसे उपयोगात आणावे हे तो चांगले जाणून होता. जसे त्याने म्हटलेः “अधिक लोक प्राप्त करुन घेण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक प्राप्त करुन घेण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. . . . ज्यांना नियमशास्त्र नाही त्यांस प्राप्त करुन घेण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांस, मी नियमशास्त्र नाही असा झालो. . . . दुर्बळांस प्राप्त करुन घेण्यासाठी मी दुर्बळांस दुर्बळ झालो. मी सर्वांसाठी सर्व काही झालो. यासाठी की मी कसे तरी कित्येकांचे तारण साधावे.”—१ करिंथकर ९:१९-२३; प्रे. कृत्ये १७:२२, २३.

११. पौल आणि त्याचे सोबती कार्यक्षम सुवार्तिक होते हे कशावरुन सूचित होते आणि ख्रिस्ती सेवेचे क्षेत्र केवढे विस्तीर्ण होते?

११ पौल आणि त्याचे सहचर कार्यक्षम सुवार्तिक कार्यकर्ते होते. दिर्घ प्रयत्नी आणि सहनशील राहून त्यांनी, जेथे जेथे ते गेले तेथे त्यांनी ख्रिस्ती मंडळ्यांची स्थापना केली व मजबूती केली. (प्रे. कृत्ये १३:१४, ४३, ४८, ४९; १४:१९-२८) सुरवातीचे ख्रिस्ती सेवकपण एवढे व्याप्तरुपी होते की अखेरीस पौल असे लिहू शकलाः “तुम्ही सुवार्तेच्या सत्यवचनात पूर्वी ऐकले ही सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहंचली . . . त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ती फळ देत व वृद्धींगत होत चालली आहे. . . . आणि . . . आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली.” खरोखरी, सुरुवातीच्या ख्रिस्ती सुवार्तिक हालचालीचा सर्व लोकांवर परिणाम झाला होता.—कलस्सैकर १:५, ६, २३.

१२. खऱ्‍या ख्रिस्ती सुवार्तिक कामात कोणत्या कारणास्तव अल्पकाळ खंड पडला?

१२ तथापि, इ. स. मधील दुसऱ्‍या शतकाच्या सुरवातीलाच, येशूने आणि प्रेषितांनी आधीच इशारा दिल्याप्रमाणे धर्मत्याग चोरपावलांनी ख्रिस्ती मंडळीत घुसत होता. (मत्तय ७:१५, २१-२३; प्रे. कृत्ये २०:२९, ३०; १ योहान २:१८, १९) त्यानंतरच्या शतकात खोट्या धर्मशिकवणूकी आणि दैवतपूजक तत्वपद्धती यांनी राज्य संदेशास पार बुडविले. ख्रिस्ती धर्मराज्यांनीही मिशनरी सुवार्तिक पाठविले पण देवराज्याचा खरा संदेश सांगावयास नव्हे तर स्वसंरक्षणास असमर्थ अशा स्थानिकावर—वेळोवेळी त्यांच्या राजकीय सत्ताधिशांची जुलमी सत्ता लादण्यास—तलवार घेऊन पाठविले. खऱ्‍या ख्रिस्ती सुवार्तिक सेवेत खंड पडला, पण कायमचा नव्हे.

१३. आधुनिक काळात मिशनरी मोहीमेस कशी सुरवात झाली व १९१६ पर्यंत त्याद्वारे काय काय यशस्वीपणे सिद्धीस नेले?

१३ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, वॉचटावर संस्थेचे पहिले अध्यक्ष चार्ल्स टी. रसेल यांना सुवार्तिक कार्याची गरज दिसली. यास्तव त्यांनी साक्ष देण्याची एक विस्तारित मोहीम आखली व आयोजित केली व त्यांनी स्वतः अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरांना भेटी दिल्या व शिवाय जलमार्गे जगाचा प्रवास करुन जितक्या शहरांना भेटी देता येतील तितक्या व अधिक ठिकाणी गेले. पवित्र शास्त्रावर आधारीत त्यांचे ३५ भाषेत लिखाण प्रकाशित होई. असे म्हटले आहे की १९१६ मधील त्यांच्या मरणाआधी त्यांनी जाहीर वक्‍ते म्हणून लाखो मैलांचा प्रवास केला व ३०,००० पेक्षा अधिक प्रवचने दिली.

१४. मिशनरी कार्यक्रम अधिक पुढे नेण्यास जोसेफ एफ. रदरफोर्ड यांनी काय केले?

१४ त्यांचे वारस जोसेफ एफ. रदरफोर्ड यांनीही सुवार्तिक सेवेची महत्त्वपूर्ण गरज ओळखली. त्यांनी लायक पुरुषांना १९२० च्या सुरवातीस वेगवेगळ्या राष्ट्रात तेथे प्रचारकार्य स्थापन करण्यास पाठविले. मिशनरींनी स्पेन, दक्षिण अमेरिका आणि उत्तर आफ्रिकासारख्या देशात जाऊन तेथे राज्य प्रचाराचे काम सर्ववेळ केले. १९३१ मध्ये स्पेनमध्ये चाललेल्या कामात जोम आणण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढे यावे असे अपील केले होते. इंग्लंडमधील तिघा तरुणांनी उत्तर पाठविले, व तेथे जाऊन अत्यंत तीव्र अडचणीत व दुषित वातावरणात चार वर्षे म्हणजेच १९३६ मधील स्पॅनिश यादवी युद्धास सुरवात होईपर्यंत सेवा केली. मग त्यांना जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढणे भाग पडले.

१५. मिशनरी सेवेचा खऱ्‍या अर्थाने व्याप वाढावा म्हणून १९४० मध्ये काय घडले?

१५ मग १९४० च्या काळात मिशनरी हालचालीत काही चांगल्या गोष्टींची भर पडली. वॉचटावर संस्थेचे तिसरे अध्यक्ष नेथन एच. नॉर यांच्या संगतीत कळकळीने काम करणाऱ्‍या पुरुषांचा गट होता. मग जसे दिसून आले की पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे १९४२ मध्ये त्यांना, दुसऱ्‍या महायुद्ध काळानंतरचे कार्य आव्हानास तोंड देण्याचे पूर्वतयारीत एक मिशनरी अध्यापिका स्थापन्‍न करण्याची गरज दिसली. त्यांनी पुढाकार घेऊन १९४३ च्या फेब्रुवारीत न्यूयॉर्क संस्थानच्या उत्तर भागात वॉचटावर स्कूल ऑफ गिलियड नामे अध्यापिका स्थापित केली. चार प्राध्यापकासह, तिने शंभरपेक्षा अधिक कार्यक्षम पायनियर सेवकांना, ज्यांचेमध्ये पुरुष आणि स्त्रिया, दोघेहि समाविष्ट होते, पवित्र शास्त्र मुळाधारावर मिशनरी सेवेचे शिक्षण सहा महिने दिले. त्यांच्या सेवेचे काही प्रभावी परिणाम घडले का?

१६. (अ) १९४३ मध्ये किती साक्षीदार प्रचारकार्य करीत होते, आणि आज तेच तुलनात्मकतेत कसे आहे? (ब) या वाढीत मिशनरींचा हिस्सा केवढा होता? स्पष्ट करा.

१६ तसे पाहता, १९४३ मध्ये ५४ देशात केवळ १,२६,३२९ साक्षीदार प्रचारकार्यात गुंतले होते. मग, आज काय परिस्थिती आहे? आज ४५ वर्षांनंतर २८ पटीने वाढ आहे व ३५ लाखापेक्षा अधिक कार्यक्षम प्रचारसेवक २१२ देश व बेटावर कार्यमग्न आहेत. या लक्षणीय वाढीमागील उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, हे सर्व श्रेय गिलियड अध्यापिकेतून उत्तीर्ण होऊन कामास लागलेल्या ६,००० मिशनरींनी जो भक्कम पाया रोविला त्याला आहे. त्यांच्या सहाय्याने, ४५ वर्षापूर्वी जे केवळ हजारोच्या संख्येतच होते ते आज दहा राष्ट्रात लाखापेक्षा अधिक सेवक आहेत जे सुवार्ता प्रचाराचे तसेच शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. या सर्व राष्ट्रात गिलीयड मिशनरी, तेथील सुवार्ता प्रचार कार्यात आघाडीवर होते.

१७. सुरवातीची तसेच आधुनिक ख्रिस्ती मिशनरी सेवा एवढी कार्यक्षम असण्यामागील तीन मूलभूत कारणे कोणती आहेत?

१७ आम्ही आधीच्या काळातील किंवा आधुनिक काळातील कोणाही ख्रिस्ती मिशनरी सेवेचा उल्लेख केला तरी तिला कार्यक्षम बनविणाऱ्‍या मूलभूत गोष्टी आहेत. एक, लोकांशी थेट संपर्क, जो घरोघरचे सेवकपण, प्रासंगिक साक्षीकार्य तसेच घरी खाजगीतील पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याद्वारा साध्य होतो. (योहान ४:७-२६; प्रे. कृत्ये २०:२०) दुसरी गोष्ट, थेट आणि साध्या शब्दात दिला जाणारा पवित्र शास्त्र आधारीत संदेश जो मानवजातीतील सर्व समस्या कायमच्या सोडविण्यासाठी देवाचे राज्य हेच एकमेव साधन आहे यावर जोर देते. (प्रे. कृत्ये १९:८; २८:१६, २३, ३०, ३१) आमचे सुवार्तिक अशा काही अविकसनशील देशात कार्यरत आहेत, जेथे देवाच्या नीतीमान राज्याची गरज स्पष्ट दिसत आहे. तिसरी गोष्ट, ख्रिस्ताने शिकवलेले प्रेम करणे, जे आपले आधुनिक मिशनरी सर्व प्रकारच्या व वंशाच्या लोकांबरोबरील त्यांच्या नित्य व्यवहारात व्यक्‍त करतात. यात कोणताहि प्रश्‍न नाही की, गेल्या ४५ वर्षात वॉचटावरच्या मिशनरींचा यहोवाच्या संस्थेचा जगव्याप्त व्याप वाढविण्यात सिंहाचा वाटा आहे.—रोमकर १:१४-१७; १ करिंथकर ३:५, ६.

पायनियर आत्मा मूळ धरतो

१८. गिलियड पदवीधरासमानचा मिशनरी आत्म्याचा आवेश कोणी ग्रहण केलेला आहे?

१८ यात काय संशय की, गिलियड शिक्षण प्राप्त केलेल्यांनी आपल्या आवेशी सेवेचे जे उत्तम उदाहरण समोर ठेविले त्याने इतरांठायी पूर्णवेळेची सेवा करण्याची उत्कट इच्छा उत्पन्‍न केली. आज असे हजारो इतर यहोवाचे साक्षीदार आहेत, ज्यांनी त्याच प्रकारच्या मिशनरी आवेशास आपणाठायी ग्रहण केले. आज तेही खऱ्‍या अर्थाने पायनियर सेवा करतात व “त्यांच्या तारणाचा जो कर्ता [पायनियर]” त्या येशूच्या पावलांस अनुसरतात.—इब्रीकर २:१०; १२:२.

१९. पायनियर आत्म्याची प्रेरणा असणाऱ्‍या अनेक साक्षीदारांनी आपण होऊन काय करण्यास पुढे आले व त्यांना फलप्राप्ती झाल्याचे समाधान कसे वाटते?

१९ तसे १९६० च्या मध्यंतरात अनेक राष्ट्रात मिशनरी पाठविणे अगदीच मुष्कीलीचे बनले. द वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडने शक्य तितके आणि परदेशातील गरजेनुरुप मिशनरी पुरविण्याचे चालू ठेविले होते. तरीही, ज्यांच्याठायी खरोखरीचा पायनियर आत्मा होता अशांकरिता जगभरात भरपूर क्षेत्रभाग बाकी होता. अनेकांनी जेथे तीव्र गरज भासत होती तेथे जाऊन स्वतः सर्व सोयी करुन सेवा करण्यास स्वखुशीने पुढाकार घेतला. आपण असे आहात का की त्यांचा साथ देऊ शकाल? अशांचे तर म्हणणे आहे की अडचणी आणि स्वार्थत्याग ही वेळोवेळी जरी अनुभवावी लागली तरी प्रगतिशील देशात मेंढरासमान भेटणाऱ्‍या लोकांना राज्य सत्य भरविण्यात जो आनंद प्राप्त होतो त्यात सर्व भरपाई होते. त्यात नवीन नवीन असे “शंभरपट . . . भाऊ, बहिणी, आया, मुले” आणि अशांचे संगतीत “येणाऱ्‍या युगात सार्वकालिक जीवन” अनुभविण्यास मिळेल.—मार्क १०:२८-३०.

२०. (अ) अनेक देशात प्रचाराचे अधिक काम कोण करीत आहेत? (ब) जपान प्रतिवर्षी बहुतेक इतर सर्व देशांपेक्षा अधिक तास क्षेत्रसेवेत खर्च केल्याचा अहवाल देत आहे ते कसे? (क) कोणता प्रश्‍न विचारात घेणे बरे ठरेल?

२० याशिवाय आज यहोवाचे हजारो हजार असे सेवक आहेत जे दर महिन्यास नियमित किंवा सहाय्यक पायनियर म्हणून आपला पवित्र सेवेचा अहवाल देतात. यांचेपैकीचे बहुतेक आपआपल्या मंडळीच्या क्षेत्रावर सेवा करतात. अनेक राष्ट्रात हेच प्रचारकार्याचा प्रमुख भाग पार पाडीत असतात आणि एखाद्या आस्थेवाईकाच्या घरी दर आठवडी परत भेट देत असतात. त्यांचा स्वच्छ व व्यवस्थित पेहराव व आनंदी चित्तवृत्ती याद्वारे त्यांच्याठायीची राज्य आशा प्रतिध्वनित होत असते. त्याच्याच आधारे त्यांच्या क्षेत्रभागात ते नवे नवे मित्र व अधिक आस्थेवाईक मिळवीत असतात. अधिक पायनियर याचाच अर्थ, यहोवाच्या गौरवार्थ खर्च केलेले कैक अधिक तास. जपान, जेथे, यहोवाच्या साक्षीदारातील बहुतेक पूर्वी बुद्ध होते, त्यांनी जो क्षेत्र अहवाल दिला त्यात अमेरिकेबाहेर सर्वात अधिक कार्यतास टाकणारे राष्ट्र ठरते. ते याच कारणास्तव की, जवळजवळ निम्म्या प्रचारकांनी पायनियरिंग केली. या सर्वथोर हक्कात, पायनियर सेवेत सहभागी होण्यास आपणही आपल्या सर्व कामांची व्यवस्थित जुळवाजुळव करुन घ्यावी.

२१. (अ) ज्या साक्षीदारांची परिस्थिती त्यांना नियमित पायनियरिंग करण्याची मुभा पुरवीत नाहीत तेहि पायनियर आत्मा कसा प्रदर्शित करु शकतात? (ब) तरुणही पायनियर आत्मा कसा प्रकट करु शकतात?

२१ इतरही काही असे साक्षीदार आहेत जे “चांगल्या कामात तत्पर” असतात. (तीत २:१४) यांच्यामध्ये वृद्ध, आजारी तसेच ज्यांच्यावर बऱ्‍याच कौटुंबिक जबाबदाऱ्‍या आहेत अशांचा व शाळेत जाणाऱ्‍या युवकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या सभोवतालची परिस्थिती नियमित पायनियर सेवा करण्याची परवानगी देत नाही. असेही, पायनियरांना वेळोवेळी कार्यात सहकार देऊन व स्वतःच्या साक्षीकार्याच्या हक्काबद्दल व्यवहारिक दृष्टीकोन बाळगून वेळ मिळताच सेवेकरता त्याचा सदुपयोग करुन तेही पायनियर आत्मा प्रदर्शित करु शकतात. युवक, पूर्ण वेळेच्या राज्य सेवेस आपले ध्येय बनवू शकतात व बाप्तिस्मा झाल्यावर वेळोवेळी ते सहाय्यक पायनियरींग करु शकतात. तरुण तीमथ्याप्रमाणे तेही त्यांची आध्यात्मिक प्रगती देवाच्या लोकांच्या सोबतीत करण्यात या गोष्टींचा अभ्यास ठेवतील.—१ तीमथ्य ४:१५, १६.

२२. जीवनातील आमची परिस्थिती कसलीहि असो, आमचा निर्धार काय असावा, आणि कोणत्या उत्तम परिणामासह?

२२ जीवनात आमची परिस्थिती कशीही असली तरी आम्हा सर्वांस यहोवाचा आत्मा त्याच्या सेवेत कार्यक्षम राहण्याचे प्रोत्साहन देवो. “यहोवाचा हात” आम्हातील प्रत्येकासोबत असो की त्या आधारे आमच्या नम्र प्रयत्नांबद्दल म्हणता येईलः “याप्रमाणे यहोवाचे वचन सामर्थ्याने वाढत जाऊन प्रबल झाले.”—प्रे. कृत्ये ११:२१; १९:२०.

उजळणीसाठी प्रश्‍न

◻ ख्रिस्ती सुवार्तिक कार्याची सुरवात कशी झाली, व ते केवढे फैलावले?

◻ सुवार्तिक कार्याचा विस्तार करण्यात प्रेषित पौलाने कोणती भूमिका पार पाडली?

◻ या सुवार्तिक कार्याचे आधुनिक काळात कसे पुनरुज्जीवन झाले?

◻ सुवार्तिक व पायनियर कार्यास कशामुळे प्रभावी केले गेले?

◻ आज आम्हाला पायनियर कार्याचा आत्मा कसा शोषता येईल?

[१३ पानांवरील तक्‍ता]

दहा देशातील राज्याची कार्यहालचाल—१९८८

(या सर्व देशांनी १,००,००० पेक्षा अधिक प्रचारकांचा अहवाल दिला आहे)

देश प्रचारकांचा सरासरी प्रचाराचे स्मारकविधि

उच्चांक पायनियर्स तास उपस्थिती

अमेरिका ७,९७,१०४ ९६,९४७ १६,१४,७८,७३२ १८,२२,६०७

मेक्सिको २,४८,८२२ ३२,११७ ५,८०,६१,४५७ १०,०४,०६२

ब्राझिल २,४५,६१० २२,७२५ ४,४२,१८,०२२ ७,१८,४१४

इटली १,६०,५८४ २५,४७७ ४,३३,५४,६८७ ३,३०,४६१

नायजेरिया १,३४,५४३ १४,०२२ २,७८,००,६२३ ३,९८,५५५

जपान १,२८,८१७ ५२,१८३ ६,०६,२६,८४० २,९७,१७१

जर्मनी १,२५,०६८ ८,४१६ २,२०,२९,९४२ २,१५,३८५

ब्रिटन १,१३,४१२ ११,९२७ २,२१,०३,७१३ २,११,०६०

फिलिपाईन्स १,०७,६७९ २१,३२० २,६३,३७,६२१ ३,०५,०८७

फ्रान्स १,०३,७३४ ९,१८९ २,१५,९८,३०८ २,०५,२५६

[१० पानांवरील चित्रं]

पौल व बर्णबा सुवार्तिक कार्याची वाढ दुसरीकडे करता यावी यासाठी निरोप घेत आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा