मगिद्दो—भविष्यवादित अर्थ असलेली पुरातन रणभूमि
“हे यहोवा, तुझे सर्व शत्रू असेच नष्ट होवोत.” ३२ शतकापूर्वी विजयश्री प्राप्त झाल्यावर रचलेल्या गीताची सांगता अशी झाली. हा लष्करी विजयाचा जयजयकार पुरातन शहर मगिद्दोजवळ निनादला.
पवित्र शास्त्र अहवालानुसार शास्ता बाराकास देवाने हुकुम बजावला होता की ताबोर डोंगराजवळ १०,००० शस्त्रधारी योध्दे सज्ज करावेत. केवढी चित्तथरारक संख्या! परंतु, या १०,०००पाशी शस्त्रे ही नव्हतीच. “ढाल किंवा बरची दृष्टीस पडू शकत नव्हती.” (शास्ते ५:८) पण प्रतिस्पर्धी तसा नव्हता. सेनापती सीसराच्या नेतृत्वाखालील कनानी सैन्य नवनवीन लष्करी हत्यारांनी सुस्सजित होते: “लोखंडी पात्यांनी बध्द ९०० युध्दाचे रथ.” (शास्ते ४:३) याने कनानी लोकांच्या हालचालीस चालना वा मनोबलाची प्रचंड साथ दिली होती.
तथापि, विजयश्री ही काही लष्करी शौर्य व हत्यारे याकरवी निष्पण्ण होणार नव्हती. सीसराची प्रबल सेना किशोनच्या कोरड्या खोऱ्याकडे मोहित करण्यात आली. यहोवाने बाराकास उतरून जाण्याचा संकेत केला. १०,००० पुरूषांचा तांडा डोंगरावरून पठारी खोऱ्याकडे येत आहे असे चित्र उभे करा! परंतु, नंतर, अनपेक्षितपणे यहोवाने मेघगर्जनेस हाक दिली. वारा व पाऊस शत्रूच्या मुखावर कोसळू लागला. किशोन नदीचे खोरे किंकाळ्याच्या जल्लोषात परावर्तित झाले व सीसराचे लढाऊ रथ चिखलाच्या सागरात निश्चल झाले. गोंधळात टाकलेले सीसराचे सैन्य भयभीत होऊन सैरावरा पळू लागले, केवळ पाठलाग व नाश करणे बाकी होते. “त्यातील एकही नावापुरता उरला नाही.”—शास्ते, अध्याय ४ व ५.
यात काहीच आश्चर्य नाही की या उत्कृष्ठ विजयाने हे शब्द लिहिण्यास उद्युक्त केले: “हे यहोवा, तुझे सर्व शत्रू असेच नष्ट होवोत; पण त्याजवर प्रेम करणारे प्रतापमय उदयभानूसमान होवोत.” (शास्ते५:३१) तथापि, “असेच” या शब्दाची दखल घ्या. हे, ते युध्द भविष्यवादित नमुना होते यास सूचित करते, ज्यात देवाचे सर्व शत्रू नष्ट केले जातील त्या महान युध्दाकडे ते निर्देश करते.
तथापि, इस्त्राएलासभोवतालच्या विरोधी लोकास या नाशकारक प्रसंगाची विस्मृती झाली. नुसत्या ४७ वर्षांनी मिद्यानाच्या नेतृत्वाखालील संमिश्रीत राष्ट्रे “सर्व . . . एकत्र मिळून नदीपार गेले व त्यांनी इज्रेलाच्या सपाटीवर तळ दिला.” हे खोरे मगिद्दोपासून विस्तारले होते. (शास्ते ६:३३) तळ ठोकलेले हे शत्रू “टोळाप्रमाणे असंख्य” होते. तथापि, या वेळेस, इस्त्राएलाचे सैन्य थोडकेच परंतु धैर्यशाली ३०० योध्यांचे होते, जे गिदोनाच्या नेतृत्वाखालील “छावणी सभोवार” उभे राहिले होते. इशारा मिळताक्षणीच या ३०० लोकांनी रणशिंगे फुंकली, पाण्याचे घडे मोठ्याने फोडले, मशाली पेटवल्या व भयभीत करणारा युध्द पुकारा केला: “यहोवाची तरवार व गिदोनाची!” मिद्यानी एकदम गांगरले! “यहोवाने प्रत्येकाची तरवार त्याच्या सोबत्यावर चालविली,” व गिदोनाच्या लहान तुकडीने पूर्ण पराभव केला.—शास्ते ७ वा अध्याय.
आज आम्ही मिद्यानी लोकांनी केलेली चूक किंवा मगिद्दोचा अर्थ दुर्लक्षित करण्याचे धैर्य करू नये. पवित्र शास्त्र सुमारे १२ वेळेस या रणभूमीबाबत वाच्यता करते. यापुढे, पवित्र शास्त्र भविष्यवाद, मगिद्दोचे काय घडले होते त्याचा गंभीर अर्थ आमच्या दिवसासाठी आहे याचा निर्देश करतात. तर आता पवित्र शास्त्र व पुराण वस्तुशास्त्र दोन्हीही या ऐतिहासिक स्थळाबाबत काय म्हणतात ते पाहू या.
पुरातन जगाचे जोड रस्ते
मगिद्दोने, हासोर व गेजेर शहरासोबत शक्तीशाली लष्कराने प्रभुत्व गाजविले होते व ते आशिया आणि आफ्रिकेस जोडणाऱ्या व्यापारी हमरस्त्यापाशी होते. मगिद्दो इतर दोन शहराच्या मध्यावर वसले होते व म्हणून ते महत्वपूर्ण स्थान राखून होते. सर्व बाजूंनी निसर्गतः प्रवेशद्वारे होती, रस्ते तिच्या पर्वत व पठारी खोऱ्यातून खोदले होते. “मगिद्दो” विषयी द जिऑग्रॅफी ऑफ द बायबल स्पष्ट करते की, “दोन रस्ते मिळतात तेथे वस्तुतः ज्यातील एक पुरातन जगातील महान रस्ता होता तेथे वसले होते.”
मगिद्दो २० मैलांचे (३२ कि. मी.) भव्य पठारी खोरे, कार्मेल पर्वताच्या रांगाच्या इशान्य बाजूस वर्चस्व गाजवून होते. हिवाळी पावसादरम्यान पाण्याचे लोट सभोवारच्या पर्वतावरून येऊन किशोन नदीचे पात्र फुगवीत असे म्हणून या भागास “किशोनचे खोरे” सुध्दा म्हटले आहे. (शास्ते ४:१३) जिऑग्रॅफी ऑफ इज्राएल म्हणते: “हिवाळी पावसात” खोऱ्याची जमीन “खोल गाळाची बनण्यासारखी आहे. . . . किशोनचे चढ उतार व पात्र अतिशय लहान . . . चटकन तुंबून जाणारे व पात्र फुटून सभोवार पाणथळ होत असे.” सीसरा व त्याच्या सैन्यास हे खोरे केवढे चिखल बनू शकते याचा धडा मिळाला. तरीसुध्दा, कोरड्या उन्हाळ्यात, हे भव्य खोरे रथांना युध्दासाठी प्रशिक्षित करण्यास उपयुक्त होते. (गीतरत्न ६:११, १२ पडताळा.) लष्करी दल सोयीस्करपणे तेथे तळ ठोकू शकत होते.
मग यात आश्चर्य ते काय की शलमोन मगिद्दोस तटबंदी बांधून मजबूत करण्यास पुढे सरसावला: “शलमोन राजाने लोक वेठीस धरून . . . यरुशलेमाचा तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर यांचा तट उभारला त्याचा वृत्तांत असा.” (१ राजे ९:१५) ७० फूट (२१ मीटर) उंच लहान टेकडी, वरील बाजूस पसरट भव्य खोरे, आता मगिद्दो कोठे वसले होते हे सूचित करते. पुरातन काळात नवीन इमारती पहिल्या उध्वस्त झालेल्यावर उभारल्या जात. प्रत्येक बांधकामाची पातळी ही इतिहासातील विशिष्ट काळ निश्चित करते. पुराण वस्तु संशोधक वरून सुरुवात करतात व खोदकाम थरावर थर करून इतिहास काढतात. अशाप्रकारे किमान २० थर मगिद्दो येथे मिळाले ते हे निदर्शित करतात की हे शहर पुष्कळ वेळेस पुनर्बांधले गेले होते. पवित्र शास्त्राने या चिकाटीने खोदकाम करणाऱ्यांस कशी मदत केली?
शलमोनाच्या मगिद्दो, हासोर व गेजेर यांच्या पुर्नउभारणी उपक्रमात शहराच्या वेशी एक मुख्य भाग होत्या. काही काळाअगोदर अशा वेशी मगिद्दो येथे खोदून शोधून काढल्या गेल्या. यानंतर लागलेच त्यासारख्या पध्दतीची प्रवेशद्वारे हासोर येथे मिळाली. यास्तव, पवित्र शास्त्रातून मागोवा घेऊन पुराणवस्तु संशोधकांनी गेजेर येथेही शोधण्यास सुरुवात केली. आश्चर्य हे की तेथे सुध्दा त्याच पध्दतीच्या वेशी मिळाल्या. पवित्र शास्त्र अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी यात अभूतपूर्व ते काय? प्रख्यात पुराणवस्तु संशोधक, प्राध्यापक योहानान अहरोनी लिहितात:
“खोदकाम जे तीन ठिकाणी चालविले होते, त्या वेशींच्या योजनाचा काळ थरावरुन इ.स.पूर्व १० वे शतक होते हे शोधून काढले. रक्षकांची तीन गृहे व बाजूच्या येण्या–जाण्याच्या प्रत्येक बाजूवर चार बरचीचे संच असणाऱ्या वेशी मिळाल्या, अशा वेशी केवळ अजून दोन ठिकाणी मिळाल्या. . . . यास्तव, संशोधक हासोर, मगिद्दो व गेजेरच्या तिहेरी खोल्या असणाऱ्या वेशी शलमोनाच्या राजवटी दरम्यान आहेत याबद्दल पूर्ण सहमतात आहेत.”
डॉ. यीगाईल यादीननी याचप्रमाणे निष्कर्ष काढला: “ हासोर, मगिद्दो व गेजेरच्या शलमोनाच्या उभारणीचा शोध हे एक पवित्र शास्त्र पुराणवस्तु संशोधकांना व्यवहारी मार्गदर्शन कसे आहे याचे उद्बोधक उदाहरण आहे.”
एक निर्णायक रणभूमि
मगिद्दोच्या डावपेचीच्या उपयुक्तपणाच्या दृष्टीकोणातून पाहता, हे समजण्यासारखे आहे की त्याची तुलना इतिहासातील सुरुवातीची रणभूमि यासोबत जोडता येईल. मगिद्दोसाठी अक्षरशः पुरातन इब्री शब्दाचा अर्थ “युध्दास अचानक गाठ पडण्याचे ठिकाण, किंवा सैन्य दलाचे एकत्र मिळणे” असा आहे. प्राध्यापक अहरोनी लिहितात:
इ.स.च्या १५ व्या शतकापर्यंत ऐतिहासिक अहवालाच्या नोंदीत त्याचा लवलेश नसला तरी मगिद्दो अति महत्वपूर्ण स्थान राखून होते. त्या समयी ते तिसरा थूटमोस याच्या अहवालात दिसते. फारोच्या वार्षिक इतिवृतात मगिद्दोने कनानी शहरांना बंडाळी करण्याकडे निरविले. . . . मिसरी सैन्य व कनानी रथ दल यांनी या बंडाळीचे निर्णायक युध्द मगिद्दोजवळ लढविले. हाच सुरुवातीच्या लष्करी सामन्याचा अहवाल राखला आहे. रणभूमीवर कनानी सैन्यास पूर्णपणे पराभूत केल्यानंतर फारोला अवाढव्य लूट मिळाली ज्यात ९२४ रथ होते!”
द न्यू इज्राएल ॲटलासचे लेखक डॉ. झीव व्हिलनाय पुढे वर्णन, खोरे “प्राचीन इतिहासापासून ते १ ल्या जागतिक महायुध्दापर्यंत सुप्रसिध्द रणभूमी असे करतात.”
मगिद्दो–अंतिम युध्दाची जागा?
पवित्र शास्त्राचे शेवटले पुस्तक प्रकटीकरण “पृथ्वीवरील सर्व राजे सर्वसमर्थ देवाच्या महान दिवसाच्या लढाईसाठी” “हर्म–गिद्दोन” [मगिद्दोचा डोंगर] किंवा आर्मगिद्दोन येथे एकत्र केली जात आहेत असे करते. (प्रकटीकरण १६:१४, १६) नावातील साम्यामुळे, काहींनी निष्कर्श काढला आहे की हे युध्द मगिद्दो येथेच होईल. तथापि, मगिद्दोच्या टेकड्या “पर्वत” कदापि होऊ शकत नाहीत. शिवाय याचाहि विचार करा: पृथ्वीवरील सर्व अधिपतींना त्यांच्या भव्य सैन्य व लष्करी हत्यारांनी सामावणारे एवढे मगिद्दोचे खोरे आहे का? “ही लाक्षणिक भाषा आहे,” असे द इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया आम्हास सांगते, “आर्मगिद्दोन हे नाव एका विशिष्ट जागेला उद्देशून नव्हे तर अंतिम निर्णायक युध्दास उद्देशून म्हटले असण्याची शक्यता आहे.”
मग, हर्मगिदोन काय आहे? हे स्पष्ट की ते लाक्षणिक आहे. प्रकटीकरण त्याला निर्णायक रणभूमीची जागा असे रेखाटून, “सर्व राष्ट्रातील” देवाच्या लोकांचा द्वेष करण्याची परिस्थिती तिचा कळस गाठेल तेव्हा येणाऱ्या परिस्थितीस रेखाटण्यास त्याचा उपयोग करते. (मत्तय २४:९, १४) खरे ख्रिस्ती देवाच्या राज्यास निष्ठेने पाठिंबा देण्याचे चालू ठेवतील तेव्हा पृथ्वीवरील राजे एकवटतील व परिणामतः त्यांना नष्ट करण्यास “एकत्र होतील.” तथापि, यहोवाचे साक्षीदार सूड घेणार नाहीत. (यशया २:१–४) देवाने त्यांचा राजा प्रभु येशू ख्रिस्त याला त्यांच्यासाठी लढण्यास अभिषेक केला आहे. अति महत्वाच्या क्षणी हा स्वर्गीय राजा त्याच्या “स्वर्गीय . . . सैन्यासहित” हस्तक्षेप करील व “पृथ्वीवरील राजे व त्यांचे सैन्य” यावर हल्ला चढवील. हे जगव्याप्त युध्द मगिद्दो येथे लढविल्या गेलेल्या युध्दाप्रमाणे निर्णायक होईल. सर्व पृथ्वीवरील शत्रू “नष्ट” होतील, जसे की दबोरा व बाराक यांचे विजयश्री गीत भाकित करते!—प्रकटीकरण १९:११–२१; शास्ते ५:३१.
तुम्ही यहोवाचे प्रियजन की त्याच्या शत्रूमध्ये आढळाल? पवित्र शास्त्र स्पष्ट करते की जे यहोवाच्या व त्याच्या लोकांच्या बाजूस भूमिका घेणार नाहीत ते जीवन गमाविण्याच्या धोक्यात आहेत. (सफन्या २:३; २ थेस्सलनीकाकर १:७–९) परिणामत: विलंब करण्यास वेळ उरला नसेल! “पहा, मी चोरासारखा येतो,” असे गौरवी येशू ख्रिस्त “मोठ्या संकटा”ची पराकोटी आर्मगिदोन येथे पोहोचेल त्याच्या विशिष्ट संदर्भात इशारा देतो.—प्रकटीकरण १६:१५; मत्तय २४:२१.
“सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई” याचा परिणाम गौरवी असेल. तो देवाच्या राज्यास पृथ्वीला नंदनवनात रुपांतरित करण्याचा मार्ग खुला करून देईल. (मत्तय ६:९, १०; प्रकटीकरण २१:३–५) या सर्वांहून अधिक, विश्वातील सर्वथोर नामास ते पुरातन भविष्यवादीत प्रार्थनेच्या पूर्णतेत गौरवील:
“मिद्यानाला आणि सीसरा व याबीन याला किशोन नदीजवळ तू जसे केले तसे त्यांना कर. . . . तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर व आपल्या तुफानाने त्यांस घाबरवून सोड. हे यहोवा, त्यांनी तुझ्या नामाचा शोध करावा म्हणून त्यांची मुखे अगदी लज्जित कर. ते सदासर्वकाळ लज्जित व भयभीत होवोत; ते लज्जित होवोत, ते नष्ट होवोत; म्हणजे तू, केवळ तूच, यहोवा या नामाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.”—स्तोत्रसंहिता ८३:९, १५–१८.
[Map/Pictures on page 28]
[For fully formatted text, see publication]
आशिया व आफ्रिका या खंडांना जोडणाऱ्या प्रमुख लष्करी व व्यापारी मार्गापैकीच्या एकावर मगिद्दो ताबा ठेऊन होते
हासोर
आशिया
आफ्रिका
मगिद्दो
व्यापारी मार्ग
गेजेर
यरुशलेम
[पानांवरील चित्रं २९]
मगिद्दो येथे लढलेल्या युध्दांप्रमाणेच आर्मगिदोनाचे गोलार्धव्याप्त युध्द सुध्दा निर्णायक असेल. पृथ्वीवर असणारे देवाचे सर्व शत्रू यात नष्ट होतील