ईश्वरी संरक्षणाचा पुरावा
देवाचे प्रेरित वचन केवढ्या अचूकतेत आम्हापर्यंत पोचविले गेले आहे; आणि अशा या आश्चर्यकारक संरक्षणाविषयी आम्ही मुख्यत्वेकरून पवित्र शास्त्राच्या संपादकाचे आभार मानले पाहिजे. आता साधारणतः इब्री शास्त्रवचनांच्या वा त्याच्या काही भागांच्या ६,००० व ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या ५,००० हस्तलिखित प्रती उपलब्ध असतील.
“यहोवाचे वचन सर्वकाळ टिकते.” (१ पेत्र १:२५) पण आधुनिक संशोधनाने त्याच्या पवित्र वचनाच्या संरक्षणाच्या बाबतीत काय प्रकाशात आणिले आहे?
एखादे वचन केवढे विश्वसनीय आहे?
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने केवढी विश्वसनीय आहेत? आम्ही जेव्हा इतर लिखाणांच्या अवशेषांविषयीचा विचार करतो तेव्हा याच्या विश्वसनीयतेची व अतुलनीयतेची खात्री पटते. या गोष्टीवर जेरहार्ड क्रोल यांनी अहूफ डेन स्पुरेन जेसू (येशूच्या पावलावर पाऊल) नामे आपल्या पुस्तकात प्रकाशझोत टाकिलेला आहे. उदाहरणार्थ, लेखकाने हे स्पष्ट केले की, ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल (इ.स. पूर्वीच्या चवथ्या शतकातील) यांच्या लिखाणाच्या केवळ सहा पपायरी जतन केलेल्या आहेत, ज्या दहाव्या शतकातील किंवा त्यानंतरच्याही असू शकतील. प्लॅटो (इ.स. पूर्वीच्या चवथ्या शतकातील) याची लिखाणे यापेक्षा बरी आहेत. त्याच्या लिखाणाच्या दहा हस्तलिखित प्रती अशा आहेत की ज्या १३ व्या शतकाआधीच्या आहेत. हेरोडेटस (इ.स. पूर्वीच्या पाचव्या शतकातील) याच्या पपायरसवर लिखित असणाऱ्या २० हस्तलिखित प्रति पहिले शतक व यानंतर काळातील आहेत. त्याचे पहिले संपूर्ण हस्तलिखित लिखाण दहाव्या शतकातील आहे. तसेच योसेफसचे अगदी आरंभीचे लिखाण ११ व्या शतकाच्या आरंभाचे आहे.
याच्या परस्पर विरोधात पाहता, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनाच्या मूळ भागाचे लिखाण (इ.स.तील पहिल्या शतकात पूर्ण झाले होते) याची साक्ष दुसऱ्या शतकातील हस्तलिखित प्रतीकरवी व चवथ्या शतकातील संपूर्ण प्रतीच्या द्वारे प्राप्त आहे. क्रोल यांच्या प्रमाणित लिखाणानुसार आज २ ते ७व्या शतकातील ८१ पपायरी प्रती, ४ ते १० व्या शतकापर्यंतच्या २६६ वाटोळ्या आकारातील शब्दांच्या हस्तलिखित प्रती व ९ ते १५ व्या शतकापर्यंतच्या जोडून अक्षर लिहिण्याच्या २,७५४ हस्तलिखित प्रती तसेच बायबल पाठाच्या २,१३५ प्रती उपलब्ध आहेत. या सर्व प्रती मिळून ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची सत्यता शाबीत करण्यात मदत मिळते. अशाप्रकारे हा खरा असा दस्ताऐवज खरोखरी आहे.
योहानाच्या शुभवर्तमानातील काही महत्त्वपूर्ण भाग
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बायबलच्या अमूल्य हस्तलिखित प्रतीचा काही भाग मिळू शकेल अशी कोणी अपेक्षा करू शकतो का? तरीही अशाच स्थळी योहानाच्या शुभवर्तमानातील १८ व्या अध्यायाचा बहुमोल भाग सापडला. आज तो जॉन रायलँडस् पपायरस ४५७ (P52) या नावाने ओळखला जातो. तो इंग्लंडमधील मँचेस्टर भागात सांभाळून ठेविलेला आहे. त्याचा शोध कसा लागला व तो एवढ्या महत्त्वाचा का आहे?
शतक संपण्याच्या सुमारास भूगर्भ शास्त्रज्ञांनी पपायरस लिखाणांच्या तुकड्याचा एक प्रचंड ढीग खोदून वर काढला. यात बरीचशी पत्रे, पावत्या, अर्ज आणि खानेसुमारी नोंदपत्रें व इतर साहित्याच्या टिपा वगैरे मिसरातील एल फयुम प्रांताजवळील ऑक्झीरायंक्स गावाच्या वेशीबाहेर सापडले. बहुतेक लिखाण ग्रीक भाषेतील होते व ते अनेक शतके वाळवंटात गाडलेले होते.
१९२० मध्ये या पपायरीचा जॉन रायलँडस यांनी मँचेस्टेर येथील ग्रंथालयात संग्रह केला. चवदा वर्षांनंतर प्रामाण्य सी. एच. रॉबर्टस् काही तुकडे वेगवेगळे करीत असता त्यांना काहीवर असे शब्द आढळले जे त्यांच्या परिचयाचे होते. जेव्हा त्यांना हे कळले की ते योहानाच्या १८व्या अध्यायामधील ३१ ते ३३ वचनांचा भाग एका भागावर तर ३७ व ३८ ही वचने मागच्या भागावर लिहिलेली आहेत तेव्हा त्यांना केवढा आनंद झाला असेल याचा विचार करा. हे पपायरसचे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे असे सुरवातीचे भाग होते ज्यांचा शोध लागणे बाकी होते. ज्या लिखाणास वाटोळ्या अक्षरांचे लिखाण संबोधित त्या ग्रीक शब्दात हे लिहिलेले असून ते आमच्या समान शकाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वाधातील आहे.
हे तुकडे केवळ ३.५ इंच लांब व २.५ इंच रुंद इतक्या आकाराचे आहेत. तर मग हे तुकडे किती पुरातन आहेत हे कशावरुन काढता येते? प्रामुख्याने लिखाण पद्धतीवरुन. या अभ्यासाला प्राचीन लेखांचा अभ्यास असे म्हणतात. सर्व प्रकारच्या हस्तलिखाणात, अक्षरात काळानुसार बदल होत असतो आणि हेच बदल लिखाणाची पुरातनता ठरविण्यात मदतगार ठरतात. यात क्वचितच काही वर्षांचा फरक होतो. अशाप्रकारे ज्या हस्तलिखिताचे ते अवशेष भाग मिळाले त्यावरुन मूळ शुभवर्तमान ज्या काळी योहानाने लिहिले त्याच्या जवळपासच्या काळातच या नकला केल्या गेल्या असाव्यात हे कळते. साधारण तो ३० ते ४० वर्षांच्या अंतराचा काळ असावा. आम्हास ही देखील खात्री बाळगता येईल की, योहानाच्या अहवालात पुढे कोणताही मोठा बदल नक्कलकारांनी केलेला नाही. कारण जी लिखिते सापडली ती बऱ्याच नंतरच्या हस्तलिखित प्रतीच्या अगदी समानतेतील आहेत.
या संशोधनाच्या आधी टिकाकारांचा असा वाद होता की योहानाचे शुभवर्तमान हे येशूच्या प्रेषिताकरवीचे अस्सल लिखाण नाही तर कालांतराने म्हणजे साधारण दुसऱ्या शतकाच्या शेवटाला ते लिहिले गेले. तथापि, आता या तुकड्यांकरवी हे स्पष्ट झाले की, योहानाचे शुभवर्तमान इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या अर्ध्यापर्यंतही मिसरात अस्तित्वात होते, आणि ते गुंडळी म्हणून नव्हे तर शास्त्रातील पुस्तक म्हणून होते. तद्वत, हे केवढ्या आश्चर्याचे आहे की, एवढे छोटे पपायरसचे अवशेष भाग एवढ्या परिणामकारकतेत टिकाकारांची तोंडे बंद करू शकतात!
[३१ पानावरील चौकट]
पपायरस
पपायरस ही एक अशी वनस्पति आहे जी नदी-समुद्रातील उथळ जागी, पाणी जेथे थांबलेले असेल अशा जागी उगवते; किंवा सखल दलदलीच्या प्रदेशात किंवा संथ वाहणाऱ्या नील नदीच्या काठीही चांगली उगवे. (ईयोब ८:११) पपायरसद्वारा बनविलेल्या कागदावर अब्राहामाच्या काळापासून लिखाण केले जाई. कालांतराने त्याचे उत्पादक प्राचीन मिसरातील घटक कारखानदार बनले. तो बनविण्यात, त्यांनी बहुतेक सर्वसाधारण पद्धत अनुसरली. आतील भेंड कापून बाहेर काढीत व त्याच्या पातळ पट्टया कापीत आणि एकमेकांना जोडून ठेवीत व तशाच आडव्या पट्टया त्याच्यावर ठेवीत. त्यावर गोलाकार असे काही फिरवून त्यांचा मोठा कागद ताव बनल्यावर तो उन्हात सुकण्यास ठेवीत व नंतर वजरीच्या दगडाने, शिंपल्याने किंवा हस्तीदंताने तकाकी आणीत. मग ते ताव एकमेकांस जुळवून गुंडाळी तयार करीत, ज्यांची लांबी १४ ते २० फूट लांब असे. एक जी गुंडाळी जतन करून ठेवली आहे तिची लांबी १३३ फूट आहे. हवे असल्यास पानांची घडी करून त्याला पुस्तक आकार देता येतो व अशाच हस्तलिखित प्रती सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांत प्रचलित होत्या.
[३१ पानावरील चौकट]
चर्मपट व मृदुचर्मपत्रे
पाचव्या शतकातील ॲलेक्झांद्रिय कोडेक्स, ज्यात मूळ संपूर्ण पवित्र शास्त्र होते, ते मृदुचर्मपत्रावर लिहिलेले होते. हे साहित्य काय आहे व ते चर्मपटापासून कसे वेगळे आहे?
फार पूर्वीपासून मेंढरांचे कातडे, बकरीचे कातडे किंवा गोऱ्ह्याचे कातडे कमावून चर्मपट तयार करीत. कातड्यांना प्रथम वाहत्या पाण्यात धुऊन व त्यावरील केस काढून त्यांना चौकटीत ताणून उन्हात सुकविले जाई. (पडताळा २ तीमथ्य ४:१३.) आमच्या समान शकाच्या तिसऱ्या व चवथ्या शतकापासून मालाचा दर्जा ठरविण्यात येऊ लागला. जे जाडेभरडे त्याला पार्चमेंट किंवा चर्मपट म्हणू लागले व जे तलम व तकतकीत त्याला व्हेलम किंवा चर्मपत्र म्हणू लागले. व्हेलम चर्मपत्र बनविण्यास केवळ गोऱ्ह्याचे किंवा वासराचे पातळ कातडे किंवा मेलेल्या अवस्थेत जन्मलेला गोऱ्हा वा कोकराचे कोवळे कातडे उपयोगात आणीत. त्याकडून अगदी पातळ तकतकीत व जवळजवळ पांढऱ्या रंगाचे चर्मपत्र तयार करीत, जे छपाईकला प्रचलित होईपर्यंत महत्त्वाचे ग्रंथ, पुस्तके लिहिण्यास वापरले जाई, पण पुढे कागदाचा वापर स्वस्त व सुलभ वाटू लागला.