युद्धांचा शेवट करणारे युद्ध
एक अवाढव्य लढाऊ जर्मन विमान रात्रीच्या काळोखी आकाशात घोंगावत होते. ते लंडनवर हल्ला करुन परत येत होते व इसेस्कमधील खेड्यावरून जाताना त्याने बॉम्बचा वर्षाव केला. यावेळी ठार झालेल्यांमध्ये एक परिचारिका होती जी, फ्रान्समधील युद्ध आघाडीवरुन येथे सुट्टीला आली होती.
पहिल्या जागतिक महायुद्धातील ही छोटीशी घटना होती. पण तिजमधून ध्वनित झालेला अर्थ महान होता. हे २० वे शतक, मानव जेथे ‘युद्धकला शिकणार नाहीत’ त्या काळाकडे झेपावण्याऐवजी युद्धाची शस्त्रे तसेच युद्धक्षेत्रात केवढ्या मोठ्या प्रमाणात शिरलेले आहे हे याकरवी सूचित झाले. (यशया २:२-४) हजारो वर्षांपासून युद्धे ही भूतलावर तसेच समुद्रावरही लढविण्यात आली होती. पण पहिल्या जागतिक महायुद्धापासून युद्धक्षेत्रे ही आसमंतात व समुद्राच्या तळापर्यंत गेली आहेत. यामुळेच, युद्धक्षेत्रापासून शेकडो मैल लांब असलेल्या नागरिकांनाही बॉम्बच्या वर्षावामुळे आपल्या प्राणास मुकावे लागले. तसेच न दिसणाऱ्या पाणबुड्यांनीही अनेक जहाजांना जलसमाधी दिली.
खरेच, त्या पहिल्या भयंकर जागतिक महायुद्धात ८० लक्ष सैनिक युद्धक्षेत्रावर मारले गेले आणि भूक व आश्रयहीनता या कारणांमुळे १ कोटी २० लक्ष नागरिकांनाही मृत्यु मिळाला. इतिहासकार एच. ए. एल. फिशर यांच्या म्हणण्यानुसार “महायुद्धाची शोकांतिका हीच होती की, ते युद्ध युरोपातील सुसंस्कृत राष्ट्रात लढले गेले व तेही क्षुल्लक विवादावर की, जो त्याचवेळी काही राष्ट्रप्र्मुख एकत्र जमून सहजपणे सोडवू शकले असते.” त्यात जी प्रचंड प्राणहानी झाली तिच्या समर्थनात त्याल “युद्धांचा शेवट करणारे युद्ध” असे संबोधण्यात आले. पण ही संज्ञा लवकरच फोल ठरली.
शांती संस्था
१९१८ मध्ये शांतीची घोषणा होताच कटुत्वाचा अनुभव घेतलेल्या पिढीने असे हे युद्ध परत कधीही उद्भवणार नाही याची हमी मागितली. यामुळे लिग ऑफ नेशन्स या संस्थेचा उदय झाला. पण ही लिग मोठी निराशा करणारी ठरली. १९३९ मध्ये जगाने परत एका जागतिक महायुद्धात स्वतःला लोटून दिले. हे असे युद्ध होते जे पहिल्यापेक्षा अधिक प्राणघातक होते.
या दुसऱ्या जागतिक महायुद्धात अनेक मोठमोठी शहरे धुळीस मिळाली. तेथील नागरिकांच्या जीवनासाठी ते भयानक स्वप्न ठरले. मग, १९४५ मध्ये हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून मनुष्याने अणुशक्ती युगात झेप घेतली. या दोन जपानी शहरांवर मंडरत असलेले भीषण धुक्यांचे ढग एका अशा धोक्याच्या सूचनेचे अग्रदूत बनले की जी तेव्हापासून सर्व मानवजातीवर पसरलेली आहे.
तथापि, ते बॉम्ब पडण्याआधीच, ऱ्हास पावलेल्या लिग ऑफ नेशन्स सारखीच एक संघटना स्थापण्याची तयारी सुरु झाली होती. याच्या परिणामात संयुक्त राष्ट्र सभा उदयास आली. हिचे उद्दिष्ट देखील लिग ऑफ नेशन्सप्रमाणेच जागतिक शांती टिकविणे हे आहे. या सभेने काय साध्य केले? तसे पाहता १९४५ पासून एकही जागतिक महायुद्ध झालेले नाही; तरीही असंख्य लहान-सहान युद्धे झालीच; ज्यात लक्षावधी लोकांची प्राणहानी झाली.
मग, याचा अर्थ हाच होईल का की, यशयाद्वारे देवाने जे अभिवचन दिले होते की, मनुष्य “इतःपर युद्धकला शिकणार नाही,” ते तो पूर्ण झाल्याचे कधीच पाहणार नाही? तसे नाही. तर याचा अर्थ एवढाच होतो की, हे सर्व मनुष्याकरवी घडवून आणले जाणार नाही. ज्या पुस्तकास “आमच्या मार्गावरील प्रकाश” असे म्हणतात ते पवित्र शास्त्र असे पुस्तक आहे ज्यात ते प्रेरित अभिवचन दिले आहे. शिवाय, पवित्र शास्त्र हेही स्पष्ट करते की, स्वतः देवाशिवाय इतर कोणीही युद्धांचा शेवट करूच शकणार नाही.—स्तोत्रसंहिता ११९:१०५.
सर्व युद्धांचा शेवट
या आधीच्या लेखात उल्लेखिल्यानुसार पहिल्या शतकात एक लहानसा गट होता ज्यांनी आपसात असे आंतरराष्ट्रीय बंधुत्व स्थापित केले होते, ज्यांच्याकरिता आपल्या बंधू किंवा भगिनीविरूद्ध युद्ध पुकारणे हा विचारच अशक्य कोटीतला होता. ती एक अशी ख्रिश्चन मंडळी होती जिच्या सदस्यांनी शब्दशः “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ” केले होते. आज, सबंध मानवजातीने प्रयत्न करून देखील युद्ध बंद करण्यात कोणतीही प्रगति गाठलेली नाही तर त्यांच्यामध्ये लोकांचा असा एक जमाव आहे ज्याने ते उल्लेखनीय ध्येय गाठलेले आहे. ते कोण आहेत?
१९१४ पूर्वी काही वर्षे आधी या लहानशा जमावाजवळ पवित्र शास्त्राबद्दल आत्मविश्वास होता. या कारणास्तव ते हे जाणून होते की युद्धे नाहीशी करण्यात मनुष्य जे सर्व प्रयत्न करणार ते यशस्वी होणार नाहीत. पवित्र शास्त्राच्या अभ्यासातून ते हे शिकले होते की, १९१४ हे वर्ष मानवी इतिहासात मोठा बदल आणविणारे ठरेल व याचा इशारा ते ४० वर्षे आधीपसून देत होते. पवित्र शास्त्राच्या भविष्यवादांच्या खरेपणास अनुसरुन १९१४ पासून दुष्काळ, मरी आणि भूकंपांचा तसेच युद्धांचा काळ सुरु झालेला आहे. (मत्तय २४:३, ७, ८; लूक २१:१०, ११) पहिल्या जागतिक महायुद्धाबाबत लिहिताना जेम्स कॅमेरॉन म्हणतातः “१९१४ मध्ये, त्यापूर्वीचे जे जग होते व जसा त्याचा स्वीकार केला जात होता, त्याचा अंत झाला.”
ते युद्ध संपण्याआधी सबंध गोलार्धाला एका भयानक तापाने पछाडले, त्यात २ कोटी लोक मारले गेले. हा आकडा, युद्धात जितके सैनिक ठार झाले त्यापेक्षा दुप्पट होता. तेव्हापासून कर्करोगसारख्या अनेक असाध्य रोगांनी व अलिकडे एडस्ने मानवजातीस घाबरवून सोडले आहे.
आता, पवित्र शास्त्रातील दुसरा एक भविष्यवाद लक्षात घ्याः “अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.” (मत्तय २४:१२) याची पूर्णता झाली आहे का? निश्चितपणे! दररोज अराजकता, खून, अपहरण आणि सर्वसाधारण अतिरेकीपणा या गोष्टी जगभर घडत आहेत हे विविध माध्यमाकरवी कळते. दुसऱ्या जागतिक महायुद्धाबाबत अशी राजकीय भविष्यवाणी होती की ते, “भयापासून मुक्तता देईल.” उलटपक्षी, पवित्र शास्त्र मात्र अगदी अचूकपणे आधीच म्हणत होतेः “भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्ये मूर्च्छिंत होतील.” (लूक २१:२६) पुन्हा एकदा मानवी अंदाज चुकीचा ठरला. पण देवाचे भविष्यवादित शब्द खरे ठरले.
प्रमुख युद्धपिपासू
युद्धपिपासू म्हणजे युद्धाला चिथावणी देणारा. राजकीय मुत्सद्दी, पाळकवर्ग आणि व्यापाऱ्यांनीही ही भूमिका पार पाडली आहे. पण सर्वात मोठा युद्धपिपासू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून दियाबल सैतान आहे, ज्याला शास्त्रवचने ‘या युगाचा देव’ असे संबोधितात.—२ करिंथकर ४:४.
सैतानाने हजारो वर्षांपूर्वी यहोवा देवाविरूद्ध बंड केले व कालांतराने त्याने देवदूतांच्या जमावालाही बहकवून आपल्याकडे वळविले. पण १९१४ मध्ये त्याचा काळा संपला. पवित्र शास्त्र आम्हास सांगतेः “तेव्हा स्वर्गात युद्ध झाले; मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यात निघाले; आणि त्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही; आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही आणखी सापडले नाही. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला, सर्व जगाला ठकविणारा, दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.”—प्रकटीकरण १२:७-९.
तद्वत, १९१४ पासून ही पृथ्वी एवढी धोकादायक स्थळ का बनली आहे याचे स्पष्टीकरण यावरुन होते. पवित्र शास्त्र, सैतानाच्या पतनाचा भावी परिणाम आधीच सांगतेः “पृथ्वी . . . वर अनर्थ ओढवला आहे, कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला (दियाबल) सैतान उतरुन तुम्हाकडे गेला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) हा काळ किती थोडा आहे? येशूने म्हटलेः “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी [जिची सुरवात १९१४ पासून होऊन हे सर्व पाहते ती] नाहीशी होणार नाही.” (मत्तय २४:३४) कोणत्या गोष्टी? ज्या येशूने आमच्या दिवसासाठी भाकित केल्या त्या सर्व गोष्टी.
तथापि, पवित्र शास्त्र हे दाखविते की, लिग ऑफ नेशन्स हिचा अचानक झालेला नाश आणि सध्याच्या संयुक्त राष्ट्र सभेचे दौर्बल्य जरी उघड आहे तरी रा आपल्या स्वप्रयत्नांनी शांती स्थापण्याचे प्रयत्न सोडणार नाहीत. असाही काळ येईल त्यात त्यांना वाटू लागेल की, ते यशस्वी झाले आहेत; आणि याकरताच ते “शांती व निर्भयता” आहे असा मोठा आवाज उठवतील. पण त्यानंतर लगेच या भ्रष्ट जगावर “अचानक नाश” येईल. सतत अंधःकारात राहिल्यामुळे ज्या सर्व घटना अगदी “चोरासारख्या” येणार त्या बघून मानव आश्चर्यचकित होईल.—१ थेस्सलनीकाकर ५:२, ३.
हे सर्व कोठपर्यंत घेऊन जाणार? त्या युद्धाप्रत, जे “युद्ध सर्व युद्धांचा शेवट करील.” याला पवित्र शास्त्र “हर्मगिद्दोन,” “सर्वसत्ताधारी देवाच्या त्या मोठ्या दिवसाची लढाई” असे म्हणते. याचा अर्थ, सर्व दुष्कर्म्यांचा आणि त्यांच्या मदतनीसांचा सर्वनाश होईल. “दुष्कर्म्यांचा उच्छेद होईल.” (प्रकटीकरण १६:१४-१६; स्तोत्रसंहिता ३७:९) सरतेशेवटी, सर्वात बलाढ्य युद्धपिपासू सैताना याला अशा स्थळी कैदेत टाकण्यात येईल जेथून तो मानवजातीवर कोणताही प्रभाव पाडू शकणार नाही. कालांतराने त्याचाही नाश केला जाईल.—प्रकटीकरण २०:१-३, ७-१०.
तथापि, हे युद्ध म्हणजे निष्पाप व अपराधी या दोहोंचीही निर्बुद्धपणे कत्तल करून केलेला अविचारी नाश नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. यात बचावून राहणारे असतील. ते, “अहोरात्र त्याच्या [देवाच्या] मंदिरात त्याची सेवा” करतात. होय, आजही ज्यांनी युद्धकला शिकण्याचे वर्ज्य केले आहे व खऱ्या ख्रिश्चनांच्या शांतीमार्गास अनुसरतात तेच या शेवटल्या महान युद्धातून बचावतील. ते बहुसंख्य असतील का? होय, पवित्र शास्त्र त्यांना “मोठा लोकसमुदाय” संबोधिते; जो “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यापैकी कोणाच्याने मोजवला नाही असा” असेल.—प्रकटीकरण ७:९, १४, १५.
वादळानंतर
यांना केवढी महान मुक्तता घडल्याचा दिलासा मिळेल. अनेक राष्ट्रवादी सरकारांच्या ऐवजी एकच सरकार असेल व ते म्हणजे देवाचे राज्य. (दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०) अभिमानी व महत्त्वाकांक्षी लोकांऐवजी लीनजन पृथ्वीचे वतन मिळवतील व ते “उदंड सुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्रसंहिता ३७:१०, ११) “देव स्वतः त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत.” (प्रकटीकर २१:३, ४) यहोवा “दिगंतापर्यंत लढाया बंद” करील. तरवारी मोडून त्यांचे फाळ होतील तर भाल्यांच्या कोयत्या करण्यात येतील. “ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—स्तोत्रसंहिता ४६:८, ९; यशया २:४.
अशा जगात तुम्हाला रहावेसे वाटणार नाही का? अर्थातच, आवडेल! होय, ती शक्यता आहे. यासाठी पहिले पाऊल म्हणजे देवाच्या वचनाचा, पवित्र शास्त्राचा मनःपूर्वक अभ्यास करावा व ही खात्री द्यावी की ही आशा खरी व भक्कम पायावर आधारीत आहे. मग, पवित्र शास्त्रातून हे शोधून पहा की, देव आज तुमच्याबद्दल काय इच्छितो व त्यानुसार कृती करा. हे खरे की अभ्यास म्हटला तर त्यासाठी परिश्रम, प्रयत्न करावे लागतात. पण ते योग्य आहे. येशूने म्हटले, जे ज्ञान तुम्ही मिळवता त्याचा यथायोग्य उपयोग करणे म्हणजे ‘सार्वकालिक जीवनाची’ प्राप्ती होईल. (योहान १७:३) मग, यापेक्षा अधिक मौल्यवान असे काही आहे का?