वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 २/१ पृ. ७
  • गरुड पक्षी किंवा गिधाडे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गरुड पक्षी किंवा गिधाडे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चिन्ह
  • गरुडांप्रमाणे पंखांनी भरारी मारणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • गरुडाची नजर
    सावध राहा!—२००३
  • यहोवा थकलेल्यांना बळ देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 २/१ पृ. ७

गरुड पक्षी किंवा गिधाडे

चिन्ह

जेथे प्रेत असतील तेथे गरुड जमतील.” (मत्तय २४:२८, न्यू.व.) या दृष्टांतातून काही शिकण्याऐवजी काहींना त्यात चूक असल्याचे आढळते. त्यांचे म्हणणे आहे की, गरुड हे एकट्याने शिकार करणारे पक्षी आहेत व ते मृतांना नव्हे तर जिवंतांना आपले सावज बनवीत असतात. या कारणास्तव काही पवित्र शास्त्र प्रतींनी “गीध” हा शब्द उपयोगात आणला आहे. पण जो ग्रीक शब्द येथे प्रश्‍नार्थक वाटतो तो ए․ई․टोसʹ आहे व ज्याचे “गरुड” हे भाषांतर अचूक आहे.

इस्राएल देशात या गरुडाची एक जात आढळते व तिला नगरी गरुड असे म्हणतात. जॉन सिंक्लेअर व जॉन मेंडलसन यांच्या पाहणीनुसार “इतर अनेक शिकारी पक्ष्याप्रमाणे नगरी गरुड कुजक्या शवाबद्दल मागे राहात नाहीत, उलट शिकार होताच ताज्या सावजावर प्रथम तेच झडप घालतात.” दुसऱ्‍या एका निरिक्षकाने आफ्रिकेतील कलहारी येथे ६० पक्षांना एकत्र होताना पाहिले, ज्यांच्यामध्ये बेटलूअर आणि नगरी गरुड होते. हा निरिक्षक म्हणतोः “जेव्हा ते एखाद्या कुजक्या मांसासभोवताली जमतात तेव्हा नगरी गरुड हे पुढाकार घेणारे असतात. अनेक वेळा दोन पक्षी, बहुतेक जे जोडपेच असते, ते त्या शिकारीला वाटून घेताना दिसतात.”

भूमध्य समुद्राच्या प्रदेशात सागरी गरुड हे सर्वसाधारण आहेत. “गेल्या काही शतकात समुद्रावरील गरुड तसेच जमिनीवरील गरुड लढाईत ठार झालेल्या घोड्यांच्या प्रेतांवर पोसले गेल्याचे आढळून आले आहे. . . . यासाठीच, ते नेहमी लष्कराच्या मागोमाग जात असतात हे सुपरिचित आहे,” असे मॅक्लीनटॉक ॲण्ड स्ट्राँग यांचा सायक्लोपिडीआ म्हणतो.

अगदी चपळ व तीक्ष्ण दूरदृष्टीमुळे ताज्या शवाजवळ प्रथम येणारे पक्षी गरुडच असतात. येशू त्या वर्णनाशी परिचित होता ज्यात यहोवा देवाने ईयोबास हा नमविणारा प्रश्‍न विचारला होताः “गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय? तो खडकात . . . खडकाच्या सुळक्यावर दुर्गमस्थानी आपले कोटे करतो. तेथून तो आपले भक्ष्य निरखितो, त्याच्या नेत्रास ते दूरवर दिसते . . . जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो.”—ईयोब ३९:२७-३०.

अशा रितीने एका योग्य दाखल्याद्वारे येशूने हे दर्शविले की, ज्यांना लाक्षणिक रितीने ही गरुडाची तीक्ष्ण नजर लाभली आहे त्यांनाच फक्‍त या चिन्हापासून फायदा होणार आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा