येशूचे जीवन व उपाध्यपण
अधिक शिक्षणाने धन्यवादित
शिष्यांना नुकताच पेरणी करणाऱ्याच्या दाखल्याचा अर्थ समजावण्यात आला होता. पण त्यांना आता अधिक शिकण्याची इच्छा आहे, व त्यामुळेच ते म्हणतातः “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा.”
समुद्रकिनाऱ्यावर जमलेल्या लोकसमुदायापेक्षा शिष्यांची ही मनोवृत्ती केवढी निराळी दिसते! त्या लोकांना दाखल्यामागील अर्थ शिकण्याच्या उत्कट इच्छेची कमतरता आहे; केवळ बाह्यरुपावरच त्यांना समाधान वाटते. समुद्रकिनाऱ्यावरील या श्रोत्यांच्या विरुद्धतेत येशू आपल्या जिज्ञासू शिष्यांना असे म्हणतोः
“ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुमच्या पदरी घालतील, आणि तुम्हास अधिकही दिले जाईल.” शिष्य येशूला त्याच्याठायीची उत्कट इच्छा व अधिक लक्ष घालण्याचे आर्जवीत होते व यामुळेच त्यांना अधिक शिक्षण प्राप्त होण्याचा आशीर्वाद लाभला. शिष्यांनी केलेल्या चौकशीस येशू उत्तर देतोः
“चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत.”
आपल्या दाखल्यातील प्रत्येक अंगाची ओळख करून दिल्यावर येशू याचा परिणाम सांगतो. तो म्हणतो की, युगाच्या समाप्तीस “कापणारे” किंवा देवदूत निदणासमान बनावटी ख्रिश्चनांना खऱ्या “राज्याचे पुत्र” यांच्यापासून वेगळे करतील. मग, “दुष्टांचे पुत्र” यांजवर नाशपात्र असल्याचे चिन्ह करण्यात येईल. पण जे देवराज्याचे पुत्र, “धार्मिक जन” ठरलेले आहेत, ते त्यांच्या पित्याच्या राज्यात सूर्याप्रमाणे चकाकतील.
येशू त्याच्या जिज्ञासू शिष्यांना आणखी तीन दाखले देऊन अधिक धन्यता मिळवून देतो. प्रथम तो म्हणतोः “स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणाएका मनुष्याला सापडल्यावर त्याने ती लपवून ठेविली, आणि आनंदामुळे जाऊन त्याने आपले सर्वस्व विकले. मग ते शेत विकत घेतले.”
“आणखी,” तो पुढे म्हणतो, “स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या कोणाएका व्यापारासारखा आहे, त्याला एक अति मोलवान मोती आढळल्यावर त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.”
येशू हा स्वतः त्या मनुष्यासारखा आहे ज्याला शेतात लपविलेल्या ठेवीचा शोध लागला व त्या व्यापारासारखा आहे ज्याला मोलवान मोती आढळला. त्याने आपले सर्वस्व विकले म्हणजे एक लीन मनुष्य बनण्यासाठी स्वर्गातील आपले गौरवी पद सोडले. मग पृथ्वीवर मनुष्य प्रकृतीत असता, तो निंदा, द्वेष आणि छळही सहन करतो; ज्याद्वारे हे शाबीत होते की तो देवराज्याचा राजा बनण्यास पात्र आहे.
हेच आव्हान येशूच्या शिष्यांसमोरही आहे की, एकतर सर्वस्व विकून ख्रिस्तासोबतचे सहअधिपती बना, किंवा त्याच्या राज्याची भूतल प्रजा बना. मग, आम्ही हा विचार बाळगून आहोत का की देवराज्याचा सहवास हा, जणू मौल्यवान ठेवीसमान किंवा बहुमोल मोतीसमान असल्याने जीवनातील सर्व रक्षणीय वस्तुंपेक्षा अधिक बहुमोल आहे?
शेवटी येशू “स्वर्गाचे राज्य” याची उपमा त्या जाळ्यास देतो ज्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र सापडतात. मग, मासे निवडताना चांगले ठेवतात व जे वाईट त्यांना फेकून देतात. तसेच येशू म्हणतो की, हे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन धार्मिकांपासून दुष्ट लोकांना वेगळे करतील व दुष्टांना संपूर्ण नाशाकरता बाजूला काढतील.
येशू स्वतःच, त्याच्या आरंभीच्या शिष्यांना “मी तुम्हास मनुष्य धरणारे करीन” असे म्हणून या लाक्षणिक मासेमारीच्या उद्योगास सुरवात करतो. या सर्व शतकांमध्ये पवित्र दिव्यदूतांच्या देखरेखीखाली हा मासेमारीचा उद्योग सुरळीतपणे चालू आहे. सरतेशेवटी “जाळे”, जे पृथ्वीवर आपणास ख्रिश्चन म्हणवून घेतात त्यांनी मिळून बनलेल्या संस्थांचे द्योतक आहे, ते मागे खेचण्याची वेळ येते.
जे वाईट मासे त्यांना बाजूला काढून नाशात टाकिले तरी आम्ही, आम्हाला “चांगले मासे” म्हणून राखून ठेविलेल्यांमध्ये आमची गणना आहे याकरता केवढे कृतज्ञ आहोत. येशूच्या शिष्यांप्रमाणे ज्ञान व समज ही अधिकाधिक मिळविण्याची जिज्ञासा प्रदर्शित केल्यास, आम्हास केवळ अधिक शिक्षणाद्वारेच नव्हे तर देवाकडील सार्वकालिक जीवनाच्या आशीर्वादाने धन्यवादित केले जाईल. मत्तय १३:३६-५२; ४:१९; मार्क ४:२४, २५.
◆ समुद्रकिनाऱ्यावरील लोकसमुदायापेक्षा शिष्य वेगळेच आहेत ते कसे?
◆ पेरणारा, शेत, चांगले बी, वैरी, कापणी आणि कापणी करणारे कोणाचे किंवा कशाचे प्रतिनिधित्व करतात?
◆ आणखी कोणते तीन दृष्टांत येशूने दिले व त्यांच्यापासून आम्ही काय शिकतो?