वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 २/१ पृ. ४-६
  • चिन्ह आपण त्याकडे लक्ष देत आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चिन्ह आपण त्याकडे लक्ष देत आहात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आम्हास चिन्ह याची का गरज आहे
  • उतावीळपणाविरुद्ध इशारा
  • “थट्टेखोर माणसे”
  • “प्रीती थंडावेल”
  • “संसाराच्या चिंता”
  • ‘घेतला जाईल’ किंवा ‘सोडला जाईल’?
  • येशू पुढे घडणाऱ्‍या गोष्टींविषयी भविष्यवाणी करतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • येशूच्या उपस्थितीचे चिन्ह तुम्हाला ओळखता येते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • “जगाचा शेवट” अगदी जवळ आला आहे!
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 २/१ पृ. ४-६

चिन्ह आपण त्याकडे लक्ष देत आहात का?

“सर्व देशातील लोकांनी भरभराट, आरोग्य व सौख्यानंद अनुभवावा हेच आम्ही इच्छितो. याकडे नेणारा मार्ग, अणुशस्त्रमुक्‍त व अहिंसात्मक जगतातून आहे.”—पेरेस्ट्रोईका, रशियन नेते, मिखाईल गर्बाचेव्ह मार्फत.

मानवाला खरोखरच अशी जागतिक परिस्थिती आणता येईल का अशी पुष्कळांना शंका वाटणे साहजिकच आहे. पण तेच दुसरा नेता, येशू ख्रिस्त याने अधिक उद्दात, भव्य अभिवचन दिले—नंदनवनमय पृथ्वी, जिथे मृत्युलाही माघार घ्यावी लागेल. (मत्तय ५:५; लूक २३:४३; योहान ५:२८, २९) अर्थात, हे सर्व साध्य करण्यात ईश्‍वरी हस्तक्षेपाची गरज आहे. हा हस्तक्षेप “कधी” होईल त्याचे उत्तर देताना येशूने म्हटलेः “देवाचे राज्य दृश्‍यरुपाने येत नाही.” प्रथम, ज्यांना, लाक्षणिकपणे गरुडासारख्या तीक्ष्ण नजरेने बारकाईने न्याहाळण्याची कुवत आहे अशांनाच ते पाहता येईल. (लूक १७:२०, ३७, न्यू.व.) हे असे का?

आम्हास चिन्ह याची का गरज आहे

येशू ख्रिस्ताचे स्वर्गारोहण झाल्यापासून तो अशा “अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही, आणि कोणाच्याने पाहवत नाही.” (१ तीमथ्य ६:१६) या कारणास्तव मानवी डोळे त्याला परत कधीही पाहणार नाहीत. हे येशूनेच स्वतः आपल्या भूतलावरील जीवनाच्या शेवटल्या दिवशी म्हटले होतेः “आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही.” (योहान १४:१९) त्याला केवळ लाक्षणिक अर्थानेच पाहता येईल.—इफिसकर १:१८; प्रकटीकरण १:७.

होय, येशूने म्हटले होते की देवाच्या राज्याने आपल्या राज्याधिकारास सुरवात केली हे केवळ त्याचे शिष्य जाणू शकतील. ते कसे? एका चिन्हाच्या आधारे. “आपल्या उपस्थितीचे चिन्ह काय?” या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना येशूने आपल्या भावी अदृश्‍य राज्याधिकाराबद्दलचे काही दृश्‍य पुरावे वर्णिले.—मत्तय २४:३.

या चिन्हामध्ये तो दृष्टांतही सामील आहे ज्यात हे स्पष्ट केले आहे की कोणत्या प्रकारच्या लोकांचा याकडून फायदा होईल. “जेथे प्रेत असेल,” येशू म्हणाला, “तेथे गरुड जमतील.” (मत्तय २४:२८) ज्यांना या सद्य व्यवस्थीकरणाच्या अंतामधून बचावून देवाकडील नवीन जगात प्रवेश मिळविण्याची इच्छा आहे, त्यांनी ‘एकत्र जमले’ पाहिजे व ख्रिस्ताचे गरुडासमान “निवडलेले” त्यांच्यासोबत आध्यात्मिक अन्‍नाचा स्वाद घेतला पाहिजे.—मत्तय २४:३१, ४५-४७.

उतावीळपणाविरुद्ध इशारा

सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंताची तारीख कोणाही मनुष्याला काढता येणार नाही. “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी,” येशू म्हणाला, “कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतासही नाही, पुत्राला नाही. केवळ पित्याला ठाऊक आहे.”—मार्क १३:३२, ३३.

तर मग, असे तर नसेल ना की, चिन्ह याची मुदत पुरी होण्यास अनेक पिढ्यांचा कालावधी लागणार? नाही. हे चिन्ह, एका खास पिढीच्या हयातीत घडणार आहे. ज्या पिढीने हे चिन्ह सुरु होण्याचे पाहिले, तीच त्याची पूर्णताही पाहील. शिवाय, “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे जे मोठे संकट” त्यामध्ये या चिन्हाचा कळस देखील हीच पिढी पाहील. येशूने दिलेल्या या आश्‍वासनाची नोंद मत्तय, मार्क व लूक या तीन इतिहासकारांनी केली आहे.—मार्क १३:१९, ३०; मत्तय २४:१३, २१, २२, ३४; लूक २१:२८, ३२.

तथापि, यामध्ये उतावीळ होण्याचा धोका आहे. पहिले जागतिक युद्ध १९१४ मध्ये भडकल्यापासून आता पंच्याहत्तर वर्षे निघून गेली आहेत. मानवी दृष्टीकोणातून हा मोठ्या लांब मुदतीचा काळ वाटतो. पण गरुड नजरेचे काही ख्रिश्‍चन, ज्यांनी पहिले जागतिक महायुद्ध पाहिले ते अद्याप जिवंत आहेत. त्यांची पिढी अद्याप नाहीशी झालेली नाही.

येशूने चिन्ह दिले त्याचवेळी त्याने अधीर न होण्याविषयी इशारा दिला होता. त्याने अशा काही व्यक्‍तींचा उल्लेख केला ज्यांनी आपल्या मनात असे म्हटलेः “आपला धनी येण्यास विलंब लागेल.” येशूने स्पष्ट केले की, अशा वृत्तीला जर वेळीच आवर घातला नाही तर काही मूर्खपणाची कृत्ये घडण्याचा संभव असतो. (मत्तय २४:४८-५१) ख्रिस्ताच्या प्रेषितांनाही याबद्दल अधिक बोलणे रास्त वाटले.

“थट्टेखोर माणसे”

पवित्र शास्त्राचा लेखक, यहुदा याच्यानुसार ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पुढील इशारा दिला होताः “शेवटल्या काळी आपल्याच अभक्‍तीच्या वासनाप्रमाणे चालणारी अशी थट्टेखोर माणसे उत्पन्‍न होतील.”—यहुदा १७, १८.

शुद्ध अशा नवीन जगात जीवनप्राप्तीची जी इच्छा आहे तिची जागा “अभक्‍तीची वासना” सहज घेऊ शकते. जगाचे वक्‍तव्य तसेच दळणवळण करण्याची आज पद्धत बदललेली आहे म्हणून हे खासपणे धोक्याचे आहे. मानवी इतिहासात पूर्वी कधीही हिंसा, जादूटोणा व लैंगिक अनैतिकतेने एवढे थैमान माजविले नव्हते. आज हे वेळोवेळी रेडिओ व संगीत कार्यक्रमाचे विषय तसेच दूरदर्शनवर विविध प्रकारात, रंगात, व्हिडीओ फिल्म्स आणि जाहिरातबाजी, पुस्तके व मासिके यात दिसतात.

अशा अभक्‍तीच्या गोष्टींचा अंत होण्याकडे हे चिन्ह अंगुली दर्शविते. मग, हे स्वाभाविकच आहे की, ज्यांना केवळ अभक्‍तीच्या वासनांची भूक आहे त्या लोकांना हे चिन्ह म्हणजे थट्टा वाटते. भविष्यवाद म्हणतो त्याप्रमाणे हेही हाच वितंडवाद मांडतातः “उत्पत्तीच्या प्रारंभापासून जसे चालू आहे तसेच सर्व काही राहिले आहे.”—२ पेत्र ३:३, ४.

“प्रीती थंडावेल”

अलिकडेच ७६ वर्षांच्या पॉल बॉव्हेल या अमेरिकन लेखकाची न्यूजवीक मासिकाने मुलाखत घेतली. “जगाविषयी आपला दृष्टीकोण काय आहे?” या प्रश्‍नाच्या उत्तरात बॉव्हेल म्हणालेः “नैतिक विचारात म्हटल्यास हे जग विभक्‍तीत आहे. ते ६० वर्षांपूर्वी होते तसे आज कोणीच एकमेकासोबत असावे तसे प्रामाणिक नाहीत. सभ्य मनुष्य कसा ही त्या काळी चांगली ओळख होती व तो आमच्या पाश्‍चात्यांचा सुसंस्कृत बहुमोल ठेवा होता. आता त्याची कोणीही पर्वा करीत नाही. याशिवाय, संपत्तीवर वाजवीपेक्षा अधिक जोर दिलेला सर्वत्र आढळतो.”

ही परिस्थिती पवित्र शास्त्राने आधीच विदीत केलेली आहे. येशूने म्हटले होतेः “अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.” (मत्तय २४:१२; २ तीमथ्य ३:१-५) स्वार्थ व हाव यांची वाढ होते तेव्हा देवावरील प्रीती थंडावते. अधिकाधिक लोक गुन्हेगारी, दहशतवाद, व्यापारात अप्रामाणिकता, लैंगिक अनैतिकता आणि अंमली औषधांचा गैरवापर करून देवाच्या कायद्यांच्या ऐवजी आपल्या इच्छेस प्राधान्य देतात.

काही असे आहेत जे चिन्ह याच्या पूर्णतेस ओळखतात पण त्यानुसार हालचाल करण्यात मागे राहतात; कारण ते केवळ मनमौजीपणा करून स्वतःलाचा खूष करण्यात मशगूल झालेले असतात. याकारणास्तव चिन्ह याची दखल घेण्यासाठी देव तसेच शेजाऱ्‍यावरील प्रीती प्रदर्शित करीत राहण्यात धीराची गरज आहे.—मत्तय २४:१३, १४.

“संसाराच्या चिंता”

या स्वार्थी मनमौजेशिवाय, येशूने आणखी इशारा दिला होता की, काहीजण वास्तविक अशा शारीरिक गरजा मिळविण्यात एवढे गढून जातील की, त्यांचे चिन्ह याकडे दुर्लक्ष होईल. त्याने आर्जविलेः “तुम्ही आपणास संभाळा, नाही तर कदाचित गुंगी, दारुबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशापसमाणे अकस्मात तुम्हावर येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीतलावर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर तसाच येईल.’—लूक २१:३४, ३५.

अर्थात, पवित्र शास्त्र हे आनंदी कौटुंबिक जीवनास उत्तेजन देते. (इफिसकर ५:२४–६:४) हे साध्य करण्यासाठी कुटुंब प्रमुखाला आपली बायको व मुलांना जीवनावश्‍यक चीजवस्तु पुरविण्यासाठी नोकरी किंवा एखादा व्यवसाय करावा लागतो. (१ तीमथ्य ५:८) तरीपण, एखाद्याने आपले जीवन केवळ त्याच्या कुटुंबासभोवताली, व्यवसायामध्ये किंवा सुखवस्तु मिळविण्यात गुंतलेले ठेवावे हा संकोचित दृष्टीकोण ठरेल. या धोक्यामुळेच येशूने इशारा दिला होताः “नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा नौकेत गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेतदेत होते, इतक्यात जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला . . . मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी त्याप्रमाणे होईल.”—लूक १७:२६-३०; मत्तय २४:३६-३९.

‘घेतला जाईल’ किंवा ‘सोडला जाईल’?

बराच उशीर झालेला आहे. लवकरच देवाचे राज्य सर्व गोष्टींना सुरळीत करण्याकरता हस्तक्षेप करणार आहे. मग, प्रत्येक मानवावर या दोहोंपैकी एक परिणाम होईल. येशूने त्याविषयीचे वर्णन करताना म्हटलेः “त्या वेळेस शेतात असलेल्या दोघातून एक घेतला जाईल, व एक ठेविला [सोडला] जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघीतून एक घेतली जाईल व एक ठेवली [सोडली] जाईल.”—मत्तय २४:४०, ४१.

ज्यावेळी ती निर्णायक वेळ येईल त्यावेळी तुमचे स्थान कोणते असेल? तुम्हाला नाशासाठी सोडले जाईल की, बचावासाठी निवडून घेण्यात येईल? तुमचे यथार्थ मार्गदर्शन व्हावे म्हणून येशूने दिलेल्या दृष्टांताचे परत एकदा सिंहावलोकन कराः “जेथे प्रेत असेल तेथे गरुड जमतील.”—लूक १७:३४-३७; मत्तय २४:२८.

अशाप्रकारे येशू येथे दूरदर्शीपणा व संघटीत हालचालीवर जोर देत होता. ज्या सर्वांस बचावासाठी निवडून घेण्यात येईल त्यांनी, देव जो आध्यात्मिक पौष्टीक आहार देत आहे तो नियमितपणे गोळा करण्यास व त्याकडून फायदा मिळविण्यास एकत्र जमा झालेच पाहिजे. अशाप्रकारची आध्यात्मिक भरवणूक केवळ यहोवाच्या साक्षीदारांच्या ६०,००० पेक्षा अधिक मंडळ्यांशी निकट संबंध राखल्याने व आपण वाचत आहात असले हे शास्त्राधारित प्रकाशन अभ्यासून प्राप्त होते हे आज लक्षावधी लोकांच्या अनुभवास आले आहे.

पस्तीस लाखांपेक्षा अधिक यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्या शेजाऱ्‍यांना “राज्याची ही सुवार्ता” कळविण्यात सहभागी होऊन, चिन्ह यावर आपला विश्‍वास प्रकट केला आहे. (मत्तय २४:१४) आपण, सुवार्तस विधायक उत्तर देता का? जर होय, तर आपण आपल्या अंतःकरणात पृथ्वीवरील नंदनवनात बचावून जाण्याची आशा सामावून ठेवू शकाल.

[५ पानांवरील चित्रं]

आज पुष्कळ लोक सुखविलासात इतके गढले आहेत की ते चिन्ह याकडे दुर्लक्ष करतात

[६ पानांवरील चित्रं]

चिन्ह याकडे लक्ष देणे यात देवाच्या वचनावर भरवणूक करण्यासाठी एकत्र होण्याचे समाविष्ठ आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा