वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ११/१ पृ. १०-१५
  • ऐका यहोवाचा पहारेकरी बोलत आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऐका यहोवाचा पहारेकरी बोलत आहे!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या पहारेकऱ्‍याची नियुक्‍ती
  • भविष्यवादांच्या नाट्यमय सादरता
  • समोर असलेला नाश!
  • अमंगळ गोष्टींविषयी विलाप करणे
  • बचावासाठी चिन्ह करण्यात आलेले
  • अग्निनाश सामोरा आहे!
  • यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • “त्यांस समजेल की मी यहोवा आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यहोवा आपली तरवार उपसतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • “तुमचा अंत जवळ आलाय”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ११/१ पृ. १०-१५

ऐका यहोवाचा पहारेकरी बोलत आहे!

“मी तुला इस्त्राएल घराण्याचा पहारेकरी नेमिले आहे, . . . तू . . . माझ्या वतीने त्यांस बजावून सांग.”—यहेज्केल ३:१७.

१. यहोवाचा “पहारेकरी” बोलतो तेव्हा का ऐकले पाहिजे?

यहोवाचा “पहारेकरी” सध्या देवाचा संदेश सांगत आहे. तो तुम्ही ऐकत आहात का? या संदेशाला रसिकपूर्णतेने प्रतिसाद देऊन त्यानुसारची कृति आचरणे यावर तुमचे जीवन अवलंबून आहे. लवकरच यहोवा या दुष्ट व्यवस्थेचा नाश करुन व आपल्या लोकांचा बचाव करुन आपले पवित्र नाम गौरवील व याद्वारे ‘सर्व राष्ट्रे जाणतील की तो यहोवा आहे.’ या बचाव मिळविणाऱ्‍या लोकांमध्ये असण्याची तुम्ही आशा धरता का? (यहेज्केल ३६:२३; ३९:७; २ पेत्र ३:८-१३) तुम्हाला ती धरता येईल, पण यासाठी तुम्ही यहोवाचा “पहारेकरी” बोलतो त्यावेळी त्याचे ऐकले पाहिजे.

२. देवाच्या संदेष्ट्यांचे न ऐकल्यामुळे यहुदाच्या राज्याला कोणता परिणाम मिळाला?

२ देवाच्या संदेष्ट्यांचे न ऐकल्यामुळे यहुदाच्या राज्याला इ. स. पूर्वी ६०७ मध्ये विनाश मिळाला. बाबेलोन्यांच्या हातून विध्वंस झाला त्यावेळी शत्रुराष्ट्रांनी मोठ्या मिष्किलपणे डोळे मिचकावले. पण तेच यहोवाने योग्य ती हालचाल करुन विश्‍वासू यहुद्यांना इ. स. पूर्वी ५३७ मध्ये आपल्या गृही परतविले तेव्हा यहोवाच्या नामाला केवढी थोरवी मिळाली बरे!

३. यहेज्केलाच्या पुस्तकात काय गोष्टी नमूदित आहेत?

३ हा विध्वंस व पुनर्वसन या दोन्ही गोष्टी यहेज्केल या यहोवाच्या पहारेकऱ्‍याने भाकित केल्या होत्या. त्याचे नाम असलेले पुस्तक, जे त्यानेच बाबेलोनियामध्ये इ. स. पूर्व ५९१ मध्ये लिहून पूर्ण केले ते या गोष्टी सामावून आहेः (१) यहेज्केलची नेमणूक; (२) भविष्यवादित ठराव; (३) इस्त्राएलाविरुध्द संदेश; (४) यरुशलेमावरील न्यायदंडांची भाकिते; (५) इतर राष्ट्रांविरुध्द केलेली भाकिते; (६) पुनर्वसनाची भाकिते; (७) गोग व मागोग याच्याविरुध्द केलेली भाकिते आणि (८) देवाच्या पवित्रस्थानाचे दृश्‍य. आम्ही यहेज्केलाच्या पुस्तकाचे परिक्षण करु तसतसे तुम्ही त्याचे वाचनही करावे असे आम्ही आपणाला सुचवितो. याद्वारे, हे पुस्तक आजही आम्हावर कसा परिणाम करते ते तुम्हाला दिसेल आणि यहोवाचा “पहारेकरी” बोलत असल्याचे ऐकायला मिळेल.a

देवाच्या पहारेकऱ्‍याची नियुक्‍ती

४. (अ) यहेज्केलने दृष्टांतात काय पाहिले? (ब) ते “प्राणी” कोण होते व त्यांच्याठायी कोणते गुण होते?

४ तामुझ ५, ६१३ इ. स. पूर्वी (यहुदाचा राजा यहोयाखीन याच्या बाबेलोनातील बंदिवासाच्या ५ व्या वर्षी) ३० वर्षे वयाचा यहेज्केल हा याजक फरात नदीचा प्रसिध्द कालवा, “खबार नदीच्या तीरी” यहुदी बंदिवानांमध्ये होता. त्याने दृष्टांतात यहोवाचा वैभवी रथ पाहिला व त्या रथासोबत असणारे “चार प्राणी” बघितले. (यहेज्केल १:४-१० वाचा.) प्रत्येक ‘प्राण्याला’ किंवा पंखांच्या करुबाला चार मुखे होती. (यहेज्केल १०:१-२०; ११:२२) याचा हा अर्थ होता की या करुबांठायी देव-प्रणीत प्रेम (मनुष्य), न्याय (सिंह), सामर्थ्य (बैल) आणि सूज्ञान (गरुड) हे गुण होते. प्रत्येक करुब हा ‘चाकात चाक’ असणाऱ्‍या एकेका चाकाच्या बाजूस उभा होता व देवाचा आत्मा वा त्याची क्रियाशील शक्‍ती त्यांना पाहिजे त्या दिशेकडे नेत होती.—यहेज्केल १:१-२१.

५. वैभवी रथ कशाचे प्रतिनिधित्व करीत होता व त्याच्या या दृश्‍याचा यहोवाच्या लोकांवर कसा परिणाम होण्यास हवा?

५ रथाचा स्वार यहोवाचे वैभवी प्रतिरुप होता. (यहेज्केल १:२२-२८ वाचा.) तो रथ देवाच्या दिव्यदूतीय आत्मिक संघटनेचे केवढे तंतोतंत चित्र देत होता! (स्तोत्रसंहिता १८:१०; १०३:२०, २१; दानीएल ७:९, १०) या रथास यहोवा चालवीत आहे ते या अर्थी की, तो त्या प्राण्यांवर आपले वर्चस्व राखून आहे व त्यांना आपल्या उद्देशानुरुप कामास लावीत आहे. रथाचा स्वार हा मेघधनुष्याप्रमाणे शांत होता. पण यहेज्केल मात्र अगदीच भारावून गेला होता. खरेच, यहोवाचे वैभव व सर्वोच्च संघटक या नात्याने आपल्या स्वर्गींय मंडळांवर प्रभुत्व राखण्याचे त्याचे अप्रतिम सामर्थ्य यांचा दिमाख यामुळे आपल्याला, त्याच्या पृथ्वीवरील संस्थेत सेवा करण्याची संधि लाभली आहे हे जाणून नम्रतेने कृतज्ञता वाटली पाहिजे.

६. (अ) यहेज्केलला कोणती नेमणूक मिळाली व त्याने देवाच्या सेवेला कोणत्या दृष्टीने पाहिले? (ब) यहेज्केलला कोणत्या प्रकारच्या लोकात भविष्य कथनाचे काम करायचे होते आणि देवाने त्याच्याशी कसा व्यवहार राखला हे जाणणे कोणत्या लाभाचे आहे?

६ यहेज्केलला “मानव पुत्र” असे संबोधिण्यात आल्यामुळे आम्हाला त्याचा मानवी मुळारंभ व त्याची कनिष्ठ पातळी कळते तरी त्याला यहोवाने आपला संदेष्टा म्हणून नेमिले. (यहेज्केल २:१-५ वाचा.) यहेज्केलला “फितुरी राष्ट्राकडे” इस्त्राएल व यहुदा या राज्याकडे जावयाचे होते. प्रथम त्याने इश्‍वरी आज्ञेप्रमाणे एक पट खाल्ला ज्यात विलाप, शोक व आकांत याविषयीचा लेख होता. तो खाताना त्याला मधाप्रमाणे गोड वाटला ही गोष्ट त्याने देवाचा संदेष्टा झाल्याची गोष्ट कृतज्ञतापूर्वक स्विकारली होती याला सूचित होती. याप्रमाणे अभिषिक्‍त ख्रिस्तीजन व त्यांचे सहसेवक यांनाही आपण यहोवाचे साक्षीदार आहोत ही गोष्ट मोठ्या गोडीची वाटते. यहेज्केलला कठीण कपाळाच्या व कठीण अंतःकरणाच्या लोकांकडे जाऊन संदेश कथनाचे कार्य करायचे होते पण देव त्याची मुद्रा त्यांच्यासारखीच वज्रप्राय व त्याचे कपाळ गारगोटीसारखे कठीण करणार होता. लोक ऐकोत वा न ऐकोत, तो मोठ्या निर्भिडपणे संदेश देणार होता. यामुळेच देवाने जसे यहेज्केलला कठीण परिस्थितीत उंचावून धरले त्याचप्रमाणे तो आम्हाला सुध्दा कोणत्याही क्षेत्रात धैर्याने साक्ष देण्यात मदत देईल हा विचार आमच्या अंतःकरणास मोठी बळकटी देतो.—यहेज्केल २:६—३:११.

७. यहेज्केलच्या नियुक्‍तिमध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्‍यांचा समावेश होता?

७ पटाच्या सेवनामुळे यहेज्केलमध्ये त्यातील संदेशानुरुप ‘संतापाचा आत्मा’ निर्मिला गेला. त्या संदेशावर मनन करीत तो तेल-अबीब येथे ‘सात दिवस भयचकित होऊन बसला.’ (यहेज्केल ३:१२-१५) आम्ही आध्यात्मिक गोष्टींचा खोलपणा जाणून घेण्यासाठी परिश्रमी व मननशील अभ्यास केला पाहिजे. आता देवाचा संदेश घोषित करण्याकरता सोबत असल्यामुळे यहेज्केलला देवाचा पहारेकरी अशी नियुक्‍ति मिळाली. (यहेज्केल ३:१६-२१ वाचा.) या नव्यानेच नियुक्‍त झालेल्या पहारेकऱ्‍याला कायदा अवमानणाऱ्‍या इस्त्राएलांना इश्‍वरी दंड समोर आहे याचा इशारा द्यावयाचा होता.

८. आज यहोवाचा “पहारेकरी” म्हणून कोण काम करीत आहे, व त्यांच्याबरोबर कोण सहवास राखत आहेत?

८ यहेज्केल आपल्या पहारा देण्याच्या कामात मागे पडला तर त्याच्या निष्काळजीपणामुळे जे बळी पडणार होते त्यांच्याबद्दल तो जबाबदार राहणार होता. यहेज्केलने आम्हास वाग्दंड द्यावा असे त्यांना मुळीच वाटत नव्हते व त्यामुळे ते लाक्षणिकपणे त्याला प्रतिबंध घालणार होते तरी तो निर्भिडपणे त्यांना देवाचा संदेश सांगणार होता. (यहेज्केल ३:२२-२७) आमच्या काळी, ख्रिस्ती धर्मराज्य ऐकण्याचे नाकारतो व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना प्रतिबंध घालतो. तथापि १९१९ पासून हे अभिषिक्‍त जन यहोवाचा “पहारेकरी” या नात्याने सेवा करीत आहे व या व्यवस्थेचा ‘शेवटला काळ’ याविषयी मोठ्या धैर्याने संदेश घोषित करीत आहे. (दानीएल १२:४) त्यांच्या या कामास येशूची “दुसरी मेंढरे” याच्या वाढत्या ‘मोठ्या लोकसमुदाया’ची सोबत मिळत आहे. (प्रकटीकरण ७:९, १०; योहान १०:१६) “पहारेकरी” वर्ग देवाचा संदेश सांगत असल्यामुळे अभिषिक्‍त वर्गाच्या व “मोठा लोकसमुदाय” वर्गाच्या प्रत्येक सदस्याने तो नियमित प्रचारकाच्या रुपात घोषित करण्याची इच्छा बाळगण्यास हवी.

भविष्यवादांच्या नाट्यमय सादरता

९. (अ) यहेज्केलने आम्हास कसे उदाहरण घालून दिले? (ब) यरुशलेमाभोवतीच्या बाबेलोनी वेढ्याचे चित्र सादर करण्यासाठी यहेज्केलने काय केले, आणि ३९० व ४० दिवसांनी काय सूचित केले?

९ यानंतर यहेज्केलने भविष्यवादित मूकनाट्य मोठ्या लीनतेने व निर्भिडपणे सादर केले व त्याकरवी आम्हीही देवाने आम्हाला नेमून दिलेले काम लीनतेने व निर्भिडपणे पूर्ण करावे यासाठी उदाहरण घालून दिले. बाबेलोनी वेढ्याचे दृश्‍य निर्माण करण्याकरता त्याला, यरुशलेमाचे चित्र काढलेल्या एका विटेसमोर पडायचे होते. इस्त्राएलाच्या दहा वंशीय राज्याच्या पातकाचा भार त्याने आपल्या डाव्या कुशीवर निजून ३९० दिवस वाहावयाचा होता आणि आपल्या उजव्या कुशीवर ४० दिवस निजून यहुदाच्या दोन वंशीय राज्याच्या पातकाचा भार वाहावयाचा होता. एक दिवस म्हणजे एक वर्ष होते. अशाप्रकारे इस्त्राएलाची स्थापना झालेल्या इ. स. पू. ९९७ ते इ. स. पू. ६०७ या दरम्यान ३९० वर्षे भरतात. यिर्मयाला देवाचा संदेष्टा या अर्थी इ. स. पू. ६४७ मध्ये नेमणूक मिळाली तेव्हापासून ते यहुदाचा इ. स. पू. ६०७ मध्ये झालेल्या नाशापर्यंत यहुदाची ४० वर्षे भरतात.—यहेज्केल ४:१-८; यिर्मया १:१-३.

१०. वेढ्याच्या परिणामाची नाट्यमय सादरता यहेज्केलने कशी सादर केली आणि देवाने त्याला टिकवून ठेवले या गोष्टीद्वारे आम्हाला कोणता धडा मिळतो?

१० यानंतर यहेज्केलने वेढ्याच्या परिणामाची सादरता दाखवली. दुष्काळाचे चित्र दाखविण्याकरता तो केवळ आठ औंस अन्‍न व एक अष्टमांश गॅलन पाणी यावर आपल्या दिवसाचा चरितार्थ करु लागला. त्याची भाकर (गहु, जव, पावटे, मसूर, बाजरी यांनी मिश्रित असणारी नियमबाह्‌य व शेणाच्या निखाऱ्‍यावर भाजलेली) अशुध्द प्रकारची होती. (लेवीय १९:१९) या कृतीने हे दाखविले की यरुशलेम निवासियांना खूपच त्रास सहन करावा लागेल. पण तेच यहोवाने यहेज्केलला जसे त्या कठीण काळात अशक्‍त होऊ दिले नाही त्याचप्रमाणे तो आम्हालाही सर्व प्रकारच्या त्रासात त्याला विश्‍वासू राहण्यात व आमची प्रचाराची नेमणूक पूर्ण करण्यात आवश्‍यक ती सर्व मदत देईल हे अंतःकरणास मोठी पुष्टी देते.—यहेज्केल ४:९-१७.

११. (अ) यहेज्केल ५:१-४ मध्ये कोणत्या हालचाली दाखविण्यात आल्या आहेत, व त्यांची अर्थसूचकता काय होती? (ब) देवाने यहेज्केलच्या नाट्यमय सादरतांची खरोखरी पूर्णता करुन दाखवली या गोष्टीचा आम्हावर कसा परिणाम झाला पाहिजे?

११ यानंतर एका तीक्ष्ण तरवारीने यहेज्केलने स्वतःचे केस व दाढी कापली. (यहेज्केल ५:१-४ वाचा.) जे लोक दुष्काळ व मरीने मरणार ते संदेष्ट्याने आपले एक तृतीयांश केस यरुशलेम नगरामध्ये जाळले त्याप्रमाणे असणार. जे लढाईत तरवारीने पडणार ते तरवारीने कापलेल्या एक तृतीयांश केसासारखे असतील. यहेज्केलने आपले एक तृतीयांश केस वाऱ्‍यावर उडविले व ते इतस्ततः गेले त्याप्रमाणे वाचलेले लोक राष्ट्रात सर्वत्र पांगणार होते. तरीपण काही बंदिवान हे त्या केसासारखे असतील जे यहेज्केलने वाऱ्‍यावर उडविलेल्या केसामधून गोळा केले व आपल्या वस्त्राच्या पदरात बांधून ठेवले. हे ते लोक होते जे ७० वर्षांच्या ओसाडीनंतर यहुदामध्ये खऱ्‍या भक्‍तीस पुन्हा कवटाळणार होते. (यहेज्केल ५:५-१७) यहोवाने ही व इतर नाट्यमय सादरता पूर्ण करुन दाखविल्या या गोष्टीमुळे तो भविष्यवाद पूर्ण करुन दाखवणारा देव आहे असा आमचा त्यावरील आत्मविश्‍वास वाढविण्यास आम्हाला चालना मिळाली पाहिजे.—यशया ४२:९; ५५:११.

समोर असलेला नाश!

१२. (अ) हल्लेखोर काय करतील असे यहेज्केल ६:१-७ सुचविते? (ब) यहेज्केलच्या भविष्यवादानुसार पाहिल्यास यरुशलेमाचा प्रतिनमुना कोण आहे व त्याचे काय होणार?

१२ यहुदातील मूर्तिपूजक रहिवाशांचे काय होणार याविषयी यहेज्केलने राष्ट्राला इ. स. पू. ६१३ मध्ये सांगितले. (यहेज्केल ६:१-७ वाचा.) वेढा घालणारे उच्च स्थाने मोडून टाकणार होते तसेच खोट्या भक्‍तीसाठी वापरण्यात येणाऱ्‍या वेद्या व धूपस्तंभ मोडून टाकणार होते. दुष्काळ, मरी व तरवार याकरवी जी उद्‌ध्वस्तता होणार होती त्यामुळे मोठा हाहाकार माजणार होता व याच्या तीव्रतेची कल्पना जे हातपाय आपटले जाणार होते त्याकरवी ध्वनित होणार होती. आध्यात्मिकरित्या व्यभिचार करणाऱ्‍याची मृत शरीरे या उच्च स्थानांवर दहन होणार होती. अशाच प्रकारचा नाश यरुशलेमाचा प्रतिनमुना असलेल्या ख्रिस्तीधर्मराज्यावर आल्यानंतर त्याला हे कळणार की ती विपत्ती यहोवाकडून आहे.—यहेज्केल ६:८-१४.

१३. यहोवाच्या हातातील “दंड” काय आहे व त्याच्या वापरामुळे काय होणार होते?

१३ यहुदाच्या विश्‍वासहीन धर्म व्यवस्थेवर ‘चोहो बाजूंनी अंत येणार होता.’ देवाच्या हातातील “दंड” म्हणजे नबुखद्‌नेस्सर राजा व त्याचे बाबेलोनी सैन्य, यहोवाचे लोक व त्याच्या मंदिराविरुध्द येतील तेव्हा शिक्षारुपी “रोपा” मूर्तिपूजकांच्या डोक्याभोवती फुलणार होता. यहुदातील विकत घेणारे व विक्री करणारे यांच्या “समूहावर” एकतर हत्या घडणार होती किंवा काहींना बंदिवासात नेले जाणार होते आणि कोणी जिवंत राहिलेच तर त्यांचे हात भोवळ येऊन गळून पडणार होते. त्यांची खोटी धर्मव्यवस्था उलटून टाकल्यामुळे सर्वांची डोकी दुःखामुळे जणू भादरली जाणार होती.—यहेज्केल ७:१-१८.

१४. लाच यरुशलेमासाठी काय करण्यास समर्थ झाली नाही, आणि हे ख्रिस्ती धर्मराज्याविषयी काय सूचित करते?

१४ यहोवा व त्याच्या दंड देणाऱ्‍या शक्‍तींना लाच देऊन मन वळविणे अशक्य होते. (यहेज्केल ७:१९ वाचा.) लाच ही “भांडारा”स म्हणजे परमपवित्र स्थानास लुटारुंद्वारे भ्रष्ट होऊ देण्यापासून रोखू शकणार नव्हती. हे खास्दी “लुटारु” मंदीरातील सर्व पवित्र पात्रे लुटून नेणार होते व मंदिरास भग्नावस्थेत सोडून जाणार होते. सिदकीया राजास धरले गेले व लेवीय याजकपदाच्या प्रमुखांना ठार मारण्यात आले त्यावेळी यहोवाने ‘जबरदस्तांचा ताठा मोडला.’ (२ राजे २५:४-७, १८-२१) वेढा घातलेल्या यरुशलेमावर विपत्ती ओढावली तेव्हा देवाने ते पापी त्याचा करार मोडणारे आहेत असा त्यांचा ‘न्याय केल्यामुळे’ त्यापैकीच्या कोणालाही लाच देऊन आपली सुटका मिळवता येणार नव्हती. याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मराज्य ज्या गोष्टींना पवित्र मानतो त्यांच्या भ्रष्ट होण्याची वेळ येईल तेव्हा त्याला इश्‍वरी दंडापासून निसटून जाण्यासाठी कसलीही लाच उपयोगी पडणार नाही. त्यावेळेला यहोवाच्या ‘पहारेकऱ्‍याचे’ म्हणणे ऐकून घेण्यास बराच उशीर झालेला असणार.—यहेज्केल ७:२०-२७.

अमंगळ गोष्टींविषयी विलाप करणे

१५. यहेज्केलने यरुशलेमात काय पाहिले, व याचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?

१५ इ. स. पू. ६१२ मध्ये एलूलच्या ५व्या तारखेस यहेज्केलने देवास वैभवी रुपात पाहिले तेव्हा ‘हाताच्या आकृतीसारखे काही पुढे होऊन तिने त्याच्या डोक्यावरील केसाची एक बट धरली’ व त्याला आत्मिक प्रेरणेने यरुशलेमात आणले गेले. वैभवी रथ देखील तेथे पोहचला होता. या वेळी यहेज्केलने जे पाहिले त्याने आम्हाला, आम्ही धर्मत्याग्यांचे ऐकून घ्यावे या नुसत्या विचारामुळेच सुन्‍न करण्यास हवे. (नीतीसूत्रे ११:९) मंदिरात धर्मत्यागी इस्त्राएल यहोवास क्रोधायमान करणाऱ्‍या एका मूर्तिपूजक चिन्हाची (बहुधा पवित्र स्तंभाची) पूजा करीत होते. (निर्गम २०:२-६) आतल्या अंगणात प्रवेश केल्यावर यहेज्केलला किती घाणेरडे दृश्‍य पहावयाला मिळाले! (यहेज्केल ८:१०, ११ वाचा.) भींतीवर कोरलेल्या तुच्छ प्रतिमांद्वारे चिन्हीत असणाऱ्‍या खोट्या देवांपुढे इस्त्राएलाचे ७० याजक धूप दाखवीत होते ही किती निंद्य गोष्ट होती!—यहेज्केल ८:१-१२.

१६. धर्मत्यागीपणाचा काय परिणाम होत असतो असे यहेज्केलचा दृष्टांत सुचवितो?

१६ धर्मत्याग हा आध्यात्मिकरित्या केवढा घातक असतो हे यहेज्केलचा दृष्टांत दाखवितो. स्त्रिया देखील इश्‍थर या देवीचा प्रियकर तामुज या बाबेलोनी दैवतासाठी शोक करीत होत्या हे दिसले! शिवाय २५ इस्त्राएली पुरुष मंदिराच्या आतल्या अंगणात सूर्याची भक्‍ती करीत होते ही सुध्दा केवढी लाजिरवाणी गोष्ट होती! (अनुवाद ४:१५-१९) या अशा घाणेरड्या गोष्टींकरवी ते जणू देवाच्या नाकास बीभत्स स्वरुपाची डहाळी, जी बहुधा मानवी पौरुषीय अवयवास सूचित करणारी होती ती लावीत होते. तर मग, यहोवा त्यांच्या प्रार्थना निश्‍चयाने ऐकणार नव्हता. जेव्हा ख्रिस्ती धर्मजगत “मोठ्या संकट” समयी मदतीसाठी देवाकडे याचना करीत राहील तेव्हा असेच घडेल!—यहेज्केल ८:१३-१८; मत्तय २४:२१.

बचावासाठी चिन्ह करण्यात आलेले

१७. कोणते सात पुरुष दृष्टीपथात आले व त्यांनी काय केले?

१७ आता आपण सात पुरुषांना पाहतो—यापैकीचा एक तागाचे वस्त्र ल्यालेला सचिव आहे तर इतर सहा जण आपणापाशी विध्वंसक हत्यारे घेऊन आहेत. (यहेज्केल ९:१-७ वाचा.) यहोवाला पृथ्वीवरील आपल्या प्रतिनिधींचा दंडाज्ञेसाठी वापर करता येत असला तरी ते “सहा पुरुष” त्याच्या स्वर्गीय दंडाज्ञा बजावणाऱ्‍यांचे प्रतिनिधित्व करतात. ज्यांच्या कपाळावर ‘तागाचे वस्त्र ल्यालेला पुरुष’ चिन्ह करणार होता अशांना, ते मंदिरात चालू असलेल्या घृणित गोष्टींना पसंती दाखवीत नव्हते म्हणून देवाच्या कळवळ्‌याचा अनुभव येणार होता. ‘सहा पुरुषां’नी ७० मूर्तिपूजक वडील, तामुजसाठी रडणाऱ्‍या स्त्रिया व सूर्याची भक्‍ती करणारे २५ जण यापासून आपल्या हत्येला आरंभ केला. यांचा व देवास बेईमान झालेल्या इतर सर्वांचा बाबेलोन्यांकरवी इ. स. पू. ६०७ मध्ये नाश करण्यात आला.

१८. (अ) ‘तागाचे वस्त्र घातलेला पुरुष’ आज कोण आहे? (ब) ते “चिन्ह” काय आहे व ते कोणाकडे आहे व ते असण्याचा काय परिणाम होईल?

१८ ‘तागाचे वस्त्र घातलेला पुरुष’ नमुनेदारपणे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा वर्ग आहे. ख्रिस्ताची “दुसरी मेंढरे” याच्या ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ भाग बनणाऱ्‍या लोकांवर लाक्षणिक चिन्ह करण्यासाठी ते घरोघरी जातात. ही “मेंढरे” स्वतःचे समर्पण करुन बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्तासारखे व्यक्‍तीमत्व धारण करतात तेव्हा ते “चिन्ह” दिसून येते. हे लोक ख्रिस्ती धर्मराज्यात होत असलेल्या ‘अमंगळ गोष्टींमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत.’ त्यामुळेच त्यांनी स्वतःला मोठी बाबेल या खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्यामधून बाहेर आणले आहे. (प्रकटीकरण १८:४, ५) त्यांचे हे “चिन्ह” देवाची दंडाज्ञा बजावणाऱ्‍या सैन्याला दिसेल व त्यांनी यांचा ‘मोठ्या संकटा’त बचाव करावा हे ते त्यांना सूचित करील. यांना आपले हे “चिन्ह” अभिषिक्‍तांबरोबर मिळून आणखी इतरांवर चिन्ह करण्यात सहभागी होऊन टिकविता येईल. तद्वत, तुम्हावर “चिन्ह” झालेले आहे तर ‘चिन्ह करण्याच्या कामात’ उत्साहाने सहभाग घ्या.—यहेज्केल ९:८-११.

अग्निनाश सामोरा आहे!

१९. ‘तागाचे वस्त्र घातलेला [आधुनिक] पुरुष’ सध्या सबंध ख्रिस्ती धर्मराज्यभरात काय पसरवीत आहे?

१९ तागाचे वस्त्र घातलेला पुरुष वैभवी रथाच्या चाकांच्या मध्ये इंगळ घेण्यासाठी गेला. या इंगळांना यरुशलेमावर विखरण्यात आले व याद्वारे त्याला त्याच्यावर येणारा नाश, यहोवाच्या क्रोधाग्नीचे प्रतीक असणार हे अगाऊरित्या सांगण्यात आले. (यहेज्केल १०:१-८; विलापगीत २:२-४; ४:११) यहेज्केलच्या काळी यहोवाचा क्रोध बाबेलोन्यांमार्फत व्यक्‍त करण्यात आला. (२ इतिहास ३६:१५-२१; यिर्मया २५:९-११) पण आमच्या काळाविषयी काय? आज प्रतिनमुनेदार असा ‘तागाचे वस्त्र घातलेला पुरुष’ देवाच्या क्रोधाग्नीचा संदेश सबंध ख्रिस्ती धर्मराज्यात अगाऊपणे कळवीत आहे की, याच्यावर व मोठ्या बाबेलीच्या इतर भागांवर इश्‍वरी क्रोध लवरकच गुदरेल. जे यहोवाच्या ‘पहारेकऱ्‍या’चे ऐकण्याचे नाकारतील अशांना बचावाची कोणतीच आशा नाही.—यशया ६१:१, २; प्रकटीकरण १८:८-१०, २०.

२०. (अ) वैभवी रथाची चाके आणि करुब यात असणारे ऐक्य याचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा? (ब) काही लोकनायक काय करीत होते आणि त्यांनी यरुशलेमाविषयी कोणता चुकीचा ग्रह धरला होता?

२० आता आमचे लक्ष परत देवाचा वैभवी रथ, त्याची स्वर्गीय संस्था याच्याकडे नेण्यात येते. रथाची चाके व करुब यांच्यातील ऐक्य बघून आम्ही देवाच्या पृथ्वीवरील संस्थेला आपले पूर्ण रुपाचे सहकार्य द्यावे अशी चालना आपल्याला मिळाली पाहिजे. निष्ठेमुळेच आम्ही या संस्थेला घातकी लोकांपासून वाचविले पाहिजे. (यहेज्केल १०:९-२२) अशी ही घातकी माणसे यहेज्केलाच्या काळीही होती कारण त्याने २५ लोकनायकांना मिसराकडून मदत घेऊन देवाच्या संहारक शक्‍तीचा सामना करण्याची योजना करीत असल्याचे पाहिले. त्यांनी यरुशलेमाला एका कढईसारखे व स्वतःला त्यात सुरक्षित असणाऱ्‍या मांसाप्रमाणे मानले. पण ती त्यांची केवढी भूलवणूक होती! कारण बाबेलोनीय “परदेशीयांच्या” हातातील ‘तरवारीने’ या षडयंत्र रचणाऱ्‍या काहींचा वध होणार होता व काहींना बंदिवान म्हणून नेण्यात येणार होते. यहुद्यांनी देवाबरोबरील आपला करार मोडल्यामुळे देव हे त्यांच्यावर आणणार होता. (यहेज्केल ११:१-१३; निर्गम १९:१-८; २४:१-७; यिर्मया ५२:२४-२७) ख्रिस्ती धर्मराज्य देवासोबत करारबध्द असल्याचा दावा करतो पण आपला आत्मविश्‍वास तो जागतिक मित्रांवर दर्शवून असल्यामुळे तो यहोवाच्या संहारक शक्‍तींच्या द्वारे होणाऱ्‍या हल्ल्यात नाश पावेल.

२१. यहुदाच्या ७० वर्षांच्या निर्जनावस्थेनंतर काय घडले, व याच्याच अनुषंगाने अभिषिक्‍त शेषांच्या बाबतीत कोणत्या घटना घडल्या?

२१ इ. स. पू. ६१७ पर्यंत काही इस्त्राएली ‘देशोदशी पांगविले’ल्या स्थितीत होते तरी देव पश्‍चातापी बंदिवानांसाठी “पवित्र स्थान” किंवा आश्रय होता. (यहेज्केल ११:१४-१६) पण यापेक्षा आणखी काय अपेक्षिले जावे? (यहेज्केल ११:१७-२१ वाचा.) यहुदाच्या ७० वर्षांच्या ओसाडीनंतर शेषांचा एक गट परत शुध्द अशा ‘इस्त्राएल देशात’ पुनर्स्थापित झाला. याच्या तुलनेत बघता अभिषिक्‍त शेष १९१९ मध्ये बाबेलोनी दास्यत्वातून देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाकरवी बाहेर आले व तेव्हा आध्यात्मिक इस्त्राएलाची एकेकाळी निर्जन असलेली जमीन वा “देश” आता शुध्द झाला होता. तद्वत, जे बचावासाठी ‘चिन्हीत’ झालेले आहेत त्यांना आता आध्यात्मिक इस्त्राएलांच्या पुनर्स्थापित शेषांसमवेत इश्‍वरी कृपापसंतीचा आनंद मिळत आहे. तेव्हा तुम्ही, जर देवाच्या “पहारेकऱ्‍या”चा शब्द ऐकत राहिला तर यहोवा आपली तरवार उपसेल त्यावेळी तुम्ही बचाव मिळविणाऱ्‍यांमध्ये असाल.

तुम्हाला आठवते का?

◻ यहोवाचा “पहारेकरी” बोलतो तेव्हा का ऐकले पाहिजे?

◻ देवाच्या वैभवी रथाकरवी कशाचे प्रतिनिधित्व केले गेले?

◻ यहोवाचा “पहारेकरी” या अर्थाने आज कोण सेवा करीत आहे?

◻ यहेज्केलने यरुशलेमात कोणती धर्मत्यागी कृत्ये पाहिली व या दृष्टांताचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?

◻ ‘तागाचे वस्त्र घातलेला पुरुष’ आजच्या काळी कोण आहे व तो कपाळावर जे “चिन्ह” करीत आहे ते काय आहे?

[तळटीपा]

a  या लेखातील तसेच या नंतरच्या दोन लेखात आढळणारी तिरप्या वळणाची कंसातील शास्त्रवचने चालकाने मंडळीचा अभ्यास घेताना वेळ मिळेल तशी वाचून घ्यावीत. इश्‍वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत सांगितले जाणारे पवित्र शास्त्र वाचनाचे ठळक मुद्दे, यहेज्केल पुस्तकाच्या आताच्या अभ्यासातून घेतले जाऊ शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा