वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १२/१ पृ. ३-४
  • सैतान तो खराच आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सैतान तो खराच आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काही अद्याप मानतात
  • सावध राहा—सैतान तुमच्यावर टपून आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • सार्वकालिक जीवनाचा शत्रू
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • दियाबल कोण आहे?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • सैतानाच्या डावपेचापुढे टिकाव धरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १२/१ पृ. ३-४

सैतान तो खराच आहे का?

सैतान अस्तित्वात आहे हे आपण खरे मानता का? जर होय, तर आपण अल्पसंख्यांकापैकी एक आहात. “१९८० चा काळ येईपर्यंत सैतानावरील विश्‍वास सारखा उडत गेला व केवळ कॉन्झरव्हेटीव कॅथोलिक, कॅरेस्मॅटिक, कॉन्झरव्हेटीव प्रॉटेस्टंट, इस्टर्न ऑर्थोडॉक्स, मुस्लीम आणि काही ऑकल्टीस्ट यांच्यामध्येच थोडाबहुत उरला.” असे मेफिस्टोफेलस्‌—द डेव्हील इन द मॉडर्न वर्ल्ड या जेफ्रि बर्टन रसेल यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटले आहे.

तथापि, सैतान खरोखर अस्तित्वात आहे या गोष्टीवर सर्वांनीच विश्‍वास ठेवण्याचे सोडलेले नाही. “दियाबल अद्यापि जिवंत आहे व जगात हालचाल करीत आहे,” असे इटलीमधील आपल्या अलिकडील भाषणात दुसरे पोप जॉन पॉल यांनी म्हटले.

पोप यांचे म्हणणे बरोबर आहे का? जर होय, तर मनमानेल तसे जगात करण्यास सैतान मोकळा आहे. लोक जर त्याच्या अस्तित्वाला मानीत नाही तर ते त्याला विरोधही करणार नाहीत. मग कार्डिनल रेटझींगर हे व्हॅटिकनमधील शिक्षणप्रमुख म्हणतातः “दियाबल हा सहज त्याच्या मशहूर प्रगल्भात, गुप्ततेत आसरा घेऊ शकतो.”

मग, सैतान खराच अस्तित्वात आहे का? जर आमचा पवित्र शास्त्रावर विश्‍वास आहे तर आम्हास, होय, असेच उत्तर द्यावे लागेल. त्या प्रेरित अहवालात सैतानाचा अनेक वेळा नावाने उल्लेख केलेला आहे. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्र लेखकापैकी पौल, ख्रिस्ती मंडळीत असलेल्या व्यक्‍तींमधील जे “खोटे प्रेषित” व “कपटी कामगार” त्यांना इशारा देण्यात म्हणालाः “ह्‍यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. सैतानही स्वतः तेजोमय देवदूताचे रुप धारण करतो.” याप्रकारे सैतान हा एक चतुर, ठकविणारी व्यक्‍ती आहे असाच दृष्टीकोन पौल बाळगून होता.—२ करिंथकर ११:१३, १४.

तरीपण, सैतानाच्या अस्तित्वाबद्दल अधिक लोक गंभीर दखल बाळगून नाहीत असे का असावे? हा बहुतेक काळाच्या आत्म्याचा दुष्परिणाम असावा. जसे काहींचे म्हणणे आहे तसे आपण ख्रिस्ती युगाच्या नंतरच्या काळात जगत असता, अनेक समाजात धर्म विश्‍वासावरील जागा, नास्तिकवाद, सुख हेच अंतिम ध्येय हा वाद, जडवाद आणि कम्युनिस्ट मतप्रणालीने घेतली आहे. लाखो, असे भेटतात की जे देवावर विश्‍वास ठेवीत नाहीत, त्यांच्या मतप्रणालीनुसार असणाऱ्‍या तत्वज्ञानाआधारे देवाच्या अस्तित्वाची त्यांना गरज भासत नाही व त्यामुळेच यांनी देवाबरोबर सैतानालाही त्यागले आहे. ख्रिस्ती धर्मराज्यातील अनेक धार्मिक जरी हा दावा करीत असले की ते देवावर विश्‍वास ठेऊन आहेत तरी या २० व्या शतकात सैतान असल्याचा विश्‍वास बाळगणे हे त्यांना पुराणकथेसारखे वाटते.

तथापि, देवास असे नाकारणे हे काही नवीन नाही हे लक्षवेधक आहे. सुमारे ३,००० वर्षांआधी इब्री कवी दावीद याने लिहिले होतेः “मूढ आपल्या मनात म्हणतोः ‘यहोवा नाही.’ लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात.” (स्तोत्रसंहिता १४:१; ५३:१) आणखी एका ठिकाणी तो म्हणतोः “दुर्जन नाक वर करुन म्हणतोः ‘तो झडती घेणार नाही.’ देव नाही असेच त्याचे विचार असतात.” (स्तोत्रसंहिता १०:४) त्या काळीही लोक देव नाही याच भावनेने वावरत. यास्तव निर्णायक युक्‍तीवाद हाच असावा की जर देव नाही तर सैतानही नाही.

काही अद्याप मानतात

तथापि, जसे या आधीच लक्षात घेतले की काही लोक आजही दियाबल हा खराच आहे याची मान्यता देतात. असेही काही आहेत जे आपली मान्यता त्या प्राचीन झोरोस्ट्रीयनच्या द्विभाग शिकवणीस देतात, जीत म्हटले आहे की, चांगले आणि वाईट, देव आणि सैतान हे नेहमीच एकमेकांच्या बरोबरीत अस्तित्वात असतील. एवढेच काय पण काहींचे असे म्हणणे आहे की, चांगले आणि वाईट हे दोन्हीही देवाचेच गुण आहेत. ख्रिस्ती धर्मराज्यात आणि इस्लाममध्ये आजही असे अनेक आहेत जे सैतानाचे अस्तित्व मानतात. बहुतेकांच्या मते तो, पंख, शिंगे, शेपूट असलेला विक्राळ व्यक्‍ती असून “अग्निनरक” यात टाकलेल्या “अमर जीवां”च्या दैवावर देखरेख करतो असा आहे. हेच विचार सुप्रसिद्ध कलात्मक चित्रकार गुस्तावडोरे यांच्या चित्रात प्रतिछायित आहेत.

तरीपण, प्रत्यक्षात सैतानाबाबतची काहींच्या ठायी असलेली समज याच्याही पुढे गेली आहे. ते त्याची भक्‍ती, त्याचे नाव घेऊन किंवा सैतानी वा दुरात्मिक विधीद्वारे करतात. असे हजारो प्रकार आहेत, जे चेटूक व जादूटोणा यांना जोडलेले आहेत व ते सैतानी भक्‍तीत समाविष्ट असतात. आमच्या या आधुनिक नास्तिकवादी किंवा धर्माबद्दल संशय बाळगणाऱ्‍या या युगात, सैतानी धर्म, त्याचे विविध दुरात्मिक प्रकार अधिकाधिक बहरत आहेत. यास्तव, प्रत्यक्ष सैतानाबाबत पवित्र शास्त्र काय वाच्यता करते ह्‍याची आम्ही चर्चा करण्याआधी, आपण या आधुनिक काळातील सैतानी धर्माची वस्तुस्थिती काय आहे ती विचारात घेऊ या.

[३ पानांवरील चित्रं]

सैतानी “नरक” याविषयीचे बुद्धांचे कल्पनाचित्र

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा