वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ९/१ पृ. ४-७
  • काही लोकांनी आपला धर्म का बदलला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काही लोकांनी आपला धर्म का बदलला
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मुक्‍ती व आशा देणारे नातेसंबंध
  • सत्याची व खऱ्‍या मित्रांची प्राप्ती करणे
  • देवाला मान्य असलेली उपासना
    बायबल नेमके काय शिकवते?
  • तुमच्या धर्माला अर्थ आहे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • योग्य प्रकारच्या धर्माला ओळखण्यासोबत जबाबदारी येते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ९/१ पृ. ४-७

काही लोकांनी आपला धर्म का बदलला

कोणा माणसाने आपला धर्म बदलण्याचे जोरदार पाऊल उचलले आहे तर त्याला सबळ कारणे निश्‍चितच असावीत. त्यात मिळणारे फायदे हे तोट्यापेक्षा अधिक असावयास हवेत.

आपल्या निर्मात्यास जाणणे व त्याच्यासोबत नातेसंबंध वाढविणे हे चांगल्या व सबळ कारणांपैकी एक आहे असे तुम्हाला वाटते का? तसे कित्येकांच्या बाबतीत ठरले आहे. कोणासोबत नातेसंबंध जोपासायचे आहे तर त्या व्यक्‍तीला आपण चांगले जाणून घेण्याची गरज आहे. जसे की, एक लहान मूल कोणा अनोळख्याला जोपर्यंत चांगले जाणू शकत नाही तोवर त्याचा हात धरण्यास घाबरेल. हेच आम्हाबाबतीत देखील आहे. आम्ही देवावर भाव ठेवण्याआधी त्याला ओळखलेच पाहिजे. हे खरे की, बहुतेक धर्मात कोणा ना कोणा देवास एक केंद्र बिंदू मानतात. पण तेच बहुतेक लोकांना देव हा असंदिग्ध आणि कसल्याही स्पष्ट व्यक्‍तीमत्वाचा आहे असे वाटत नाही, हे खरे नव्हे का? तर मग, आम्ही देवाला कसे जाणू शकतो?

आम्ही आम्हासभोवतालच्या गोष्टींचे निरिक्षण करतो तेव्हा आम्हाला जे दिसते त्यामुळे आम्ही भारावून जात असतो. आम्हाला सौंदर्य, बुद्धीमत्ता आणि शक्‍ती आढळते. या सर्व गोष्टींचा मूळारंभ काय याचे पुष्कळांना आश्‍चर्य वाटते. तथापि, याची स्पष्टता करणारे एक पुस्तक आहे. ते पवित्र शास्त्र होय. त्याच्या पृष्ठांमधून आम्हाला हे शिकायला मिळते की, या सर्व आश्‍चर्यकर्मांचा मूळारंभ एका निर्मात्याकडून आहे ज्याला नाव आणि व्यक्‍तीमत्व आहे. आम्ही पवित्र शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करु लागतो त्यावेळी आम्हाला देवाचे व्यक्‍तीमत्व सुस्पष्ट होऊ लागते. तो आम्हाला प्रीतीचा व काळजी वाहणारा देव असल्याचे दिसून येते. “देव प्रीती आहे,” असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. (१ योहान ४:८) प्रीती, सूज्ञान, न्याय व सामर्थ्य या गुणांमध्ये पूर्ण रुपाने समतोल असणाऱ्‍या या भव्य व्यक्‍तीमत्वाकडे आपल्याला आकर्षविले जाते.

मिसाई या स्त्रीने यहोवाकडे आकर्षविले जाण्याचा अनुभव घेतला. ती म्हणतेः ‘बालवयापासून मला पुष्कळ देव आहेत असे शिक्षण मिळाले. जलासाठी एक देव, वृक्षासाठी एक देव व घरासाठी एक देव असे म्हटले जाई. तरीपण मला याविषयी साशंकता वाटत असे. माझा विश्‍वास होता की देव आहे तर तो एकटाच व खरा असला पाहिजे. माझ्या कडक बौद्ध-शिंटो संगोपनामुळे मला देव भयानक, चुकीच्या कर्मासाठी भीतीदायक शिक्षा देणारा असे वाटायला लागे. मला चर्चला जाऊन ख्रिस्ती देवाविषयी शिकून घ्यावे अशी जिज्ञासा होती, पण माझ्या बौद्ध पार्श्‍वभूमीने मला प्रतिबंध घातला. मग, असे झाले की, एक स्त्री माझ्या घरी आली व तिने मला पवित्र शास्त्राचा अभ्यास सादर केला. या अभ्यासाद्वारे मला कळाले की, देवाला नाव आहे, व ते यहोवा आहे. तो भीतीदायक देव नाही पण प्रेमळ आहे आणि त्याची आम्हावर शिक्षा देण्यास नव्हे तर मदत देण्यासाठी नजर असते हे जाणून मला खरेच शहारल्यासारखे झाले. मला या देवाची सेवा करण्याची इच्छा जडली व यासाठीच मी माझा धर्म बदलला.’ ती आता सुमारे ३० वर्षांपासून देवासोबतच्या समाधानदायक नातेसंबंधाचा आनंद घेत आहे.

मुक्‍ती व आशा देणारे नातेसंबंध

देवासोबत नातेसंबंध जोपासण्याद्वारे पुष्कळांना फायदे मिळाले. यांच्या जीवनात इतर नातेसंबंध कमी महत्वाच्या स्थानावर जाताच यांनी माणसांची भीती आणि खरे मोल व खरा अर्थ न देणाऱ्‍या जाचक रुढींपासून स्वतंत्रता मिळवून घेतली. याचा फायदा हा झाला की, यांना रुढी तसेच भव्य दिखावा करण्यासाठी जो बोजड खर्च करावा लागे तो सर्व गेला. हा असा खर्च आहे की ज्यामुळे कुटुंब सतत कर्जाखाली दडपलेले राहते. “मनुष्याची भीती पाशरुप होते,” असा इशारा पवित्र शास्त्र देते. पण सोबत ते ही देखील खात्री पुरवितेः “जो यहोवावर भाव ठेवतो तो धन्य.”—नीतीसूत्रे २९:२५.

आणखी लाभणारे एक स्वातंत्र्य म्हणजे मरणाच्या भयापासून मुक्‍तता. वर उल्लेखिण्यात आलेली मिसाई म्हणतेः “मी २२ वर्षांची असताना मला हिवताप आला. मी अर्धवट ग्लानीत असताना माझे मित्र व कौटुंबिक सदस्य माझ्या मरणाविषयीची चर्चा करीत होते हे मला ऐकू आले. पण मला मरण नको होते. मला जगावे अशी एकच इच्छा होती, आणि सुदैवाने मला बरे वाटू लागले. माझ्या नंतरच्या पवित्र शास्त्र अभ्यासात जे शिकायला मिळाले त्याकरवी मला मरणाच्या भयापासून मुक्‍त केले गेले. मी शिकले की, मरण म्हणजे अस्तित्वविरहीतपणा.” पवित्र शास्त्र म्हणतेः “मृतांस तर काहींच कळत नाही.” (उपदेशक ९:५, १०) कोणी वारला तर त्याच्यासाठी पुनरुत्थानाची वैभवी आशा ठेवण्यात आली आहे कारण देव आपल्या स्मृतीत मृतांना ताज्या आठवणीत ठेवतो.—योहान ५:२८, २९.

आणखी ज्या पुष्कळांनी पवित्र शास्त्राचा अभ्यास केला त्यांना शिकलेल्या गोष्टींकरवी आपल्या जीवनाला खरा अर्थ व आशा मिळाल्याचे आढळले. या एका कारणासाठी पवित्र शास्त्र लिहिण्यात आले की, त्याकरवी “आम्हास आशा मिळावी.” (रोमकर १५:४) बुद्ध धर्म निर्माणकर्ता वा देव याबाबत काहीच शिकवीत नाही. दुःख व त्रास सदोदित अस्तित्वात आहेत व या गोष्टी पुनर्जन्माच्या फेऱ्‍यात अक्षय चालत राहतील असे म्हटले जाते. बहुतेक पाश्‍चात्य धर्म शिकवितात की, चांगले करणारे सर्व स्वर्गास जातात पण ते तेथे काय करतील याबाबत मात्र ते खात्रीने सांगू शकत नाहीत. अशी कमी आशा आणि जीवनास खरा अर्थ न देणाऱ्‍या धार्मिक तत्वज्ञानांचा तुलनेत पवित्र शास्त्र शिकवते की, मनुष्यास पृथ्वीवर तिची काळजी वाहणारा या नात्याने चिरकालपणे जगण्यासाठी निर्माण करण्यात आले होते. (उत्पत्ती २:१५-१७; यशया ४५:१८) यामुळे आम्हाला समजू लागते की, जीवन हे मालमत्ता एकत्र करण्यासाठी आणि स्वसंतुष्टता राखण्यासाठी नसून ते देवाची व इतरांची निःस्वार्थ सेवा करण्यासाठी खर्ची घालण्यास हवे.—उपदेशक १२:१३; मत्तय २२:३७-३९.

सत्याची व खऱ्‍या मित्रांची प्राप्ती करणे

काहींना इतर कारणास्तव आपला धर्म बदलण्याची इच्छा होते. ते आहे, धार्मिक सत्य शोधण्याची जिज्ञासा. अर्थात, पुष्कळांचा असा समज आहे की अक्षरशः सत्य असणारी गोष्ट मुळी नाहीच व यामुळेच पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे ते ‘शोध घेत नाहीत.’—स्तोत्रसंहिता १०:४.

पण काहींनी अशाप्रकारचा शोध घेतला. जपानमध्ये राहणाऱ्‍या साकाई या स्त्रीने आपला बुद्धधर्म सोडून सत्य शोधण्यासाठी दुसरीकडे वळाली. हा शोध तिने २५ वर्षे केला पण तिची तृप्ती झाली नाही. ज्या संस्थाशी तिचा संपर्क आला व जेथे तिला जबाबदार पद मिळत गेले तेथे तिने व्यापारबुद्धी, अनैतिकपणा आणि लुबाडणूक या गोष्टी घडत असल्याचे पाहिले. बौद्ध धर्माची मूळे शोधण्यासाठी तिने भारतात येऊन जेथे बुद्ध हयात होता व जेथे त्याने शिक्षण दिले होते त्या ऐतिहासिक स्थळांना देखील भेटी दिल्या. या हिंदू राष्ट्रात बुद्ध धर्माविषयी जी थोडी रुचि तिला दिसली ते पाहून ती अगदीच निराश झाली. नंतर यहोवाच्या साक्षीदारांसोबत तिचा संपर्क आला तेव्हा तिला हे शिकायला मिळाले की, सर्व धर्म देवापासून नाहीत तर त्याचा वैरी दियाबल सैतान यापासून आहेत.—१ करिंथकर १०:२०.

यामुळे साकाईला तर मोठाच धक्का बसला पण यामुळे तिला विचार व संशोधन करायला चालना मिळाली. तिने व्हाट हॅज रिलिजन डन फॉर मॅनकाइण्ड?a पुस्तक आणि इतर पवित्र शास्त्र प्रकाशने वाचली. तिला हे दिसून आले की, जपानमध्ये आचरण्यात येणाऱ्‍या बुद्धधर्मात कालपरत्वे बरेच बदल झाले, पण पवित्र शास्त्र मात्र हजारो वर्षांपासून आहे तसेच आहे. तिच्या या संशोधनाचा तिला लाभ घडला. ज्याचा ती शोध घेत होती ते सत्य तिला गवसले. तिचा हर्ष, येशूने दाखल्यात सांगितलेल्या, शेतातील लपवलेला ठेवा गवसणाऱ्‍या त्या माणसासारखा झाला, ज्याविषयी असे म्हणण्यात आलेः “मग, आनंदाच्या भरात तो जातो व आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.”—मत्तय १३:४४.

ज्यांना धार्मिक सत्य आढळले अशांना, जे त्याचा शोध घेतात त्यांच्याविषयी “समभाव” वाटतो. (१ पेत्र ३:८) वस्तुतः त्यांचा उबदारपणा व अस्सल प्रेम प्रथमतः पुष्कळांना पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आकर्षित करते. “तुमची आपसात प्रीती असली म्हणते सर्वजण ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा,” असे येशूने म्हटले. (योहान १३:३५) आज असे हे प्रेमळ वातावरण आपल्याला कोठे दिसेल? काझुहिको नागोया यांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभागृही भेट दिल्यावर त्यांना तेथे जी उबदार वागणूक मिळाली त्याविषयी त्यांनी टोकियोच्या डेली योमियुरी या वर्तमानपत्रात स्तंभलेखात लिहिले. “त्यांनी जे स्मित केले,” नागोया म्हणतात, “ते जणू मला ते गेल्या सभेपासून ओळखतात व मला पुन्हा बघून त्यांना खूपच आनंद झाला असे दाखवीत होते.” तरी इतकेच नव्हते. “मी त्यांना काळजीपूर्वक पाहिले तो ते मला अगदीच अपरिचित होते.” आणखी एका दोघांनी स्मितहास्य केले तेव्हा “मला खूप आनंद झाला,” असे नागोया आठवितात. “कोणी अपरिचित त्यांच्या सभेत आला तर ते असेच स्मित करतात.”

लोक स्थानिकरित्या नियमाने एकत्र येतात आणि एकमेकांस चांगले ओळखतात म्हणून त्यांच्यात उबदारपणा आणि प्रेम नांदते असे नाही. पण या गोष्टी पवित्र शास्त्राचा नियमित रुपाचा अभ्यास व त्याच्या तत्त्वांचा आपल्या जीवनात नित्याने अवलंब केल्यामुळे घडतात. १९८५-८६ मध्ये “सचोटी रक्षणकर्ते” या प्रांतिय अधिवेशनास परदेशात उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळालेल्या पाहुण्यांना यजमानांनी दाखविलेल्या प्रीती आणि पाहुणचाराचा जो सहयोग मिळाला त्यामुळे भारावल्यासारखे झाले. फिलिपाईन्स येथे आलेल्या एका जपानी दांपत्याने हे बोलून दाखविलेः “आम्ही सर्वजण शेवटच्या गीतामध्ये सामील झालो तेव्हा प्रत्येकजण आपापल्या भाषेत ते गात होता ते बघून आम्हाला शहारल्यासारखे झाले. खऱ्‍या आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचे असणे म्हणजे काय ते आम्हाला प्रथमच जाणवले.”

शेवटी, पवित्र शास्त्राचा अभ्यास व त्याच्या तत्त्वांचे अवलंबन यामुळे आपल्या जीवनात पुष्कळ बदल झाला आहे असे कित्येक जण सांगतील. पूर्वी लांडग्यांप्रमाणे व्यक्‍तीमत्व असणारे लोक आता मेंढरांप्रमाणे शांतीने ख्रिस्ती समागमात चालत आहेत. (यशया ११:६) काहीजण पूर्वी लहरी, तापट व एकलकोंडे होते. इतरांना खिन्‍नपणाचा त्रास वाटत होता. इतर काही स्वाभिमानी होते. पुष्कळांनी आपणाठायी असणाऱ्‍या वाईट सवयांवर मात केली. तथापि, परिश्रमी प्रयत्न आणि देवाला संतुष्ट करण्याची इच्छा यामुळे त्यांना हे भारी बदल घडवून आणण्याचे जमले.

आता तुम्हाबाबत काय? वर उल्लेखिण्यात आलेले बदल करण्याजोगे कोणतेही कारण तुम्हास आर्जविते का? तसे आहे तर मग आम्ही तुम्हाला पवित्र शास्त्राचा गांभिर्याने अभ्यास करण्याचे उत्तेजन देतो. पवित्र शास्त्र दाखविते की, सर्व खोटे धर्म पवित्र शास्त्राच्या देवाच्या विरोधात उभे आहेत. आधीच्या लेखात उल्लेखिलेल्या वैमानिकाप्रमाणे तुम्हाला तुमचे आणि आपल्या प्रियजनांचे जीवन वाचविण्यास झटकन हालचाल केली पाहिजे. “नाशाकडे नेणारा मार्ग रुंद व पसरट आहे,” असे येशूने म्हटले, “आणि त्यातून जाणारे पुष्कळजण आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे.” (मत्तय ७:१३, १४) होय, तुम्ही जर रुंद व पसरट मार्गावर चालत असाल तर आपला धर्म बदलण्याचे सबळ कारण तुम्हाजवळ असेल!

[तळटीपा]

a  वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी तर्फे प्रकाशित.

[५ पानांवरील चित्रं]

माझ्या कडक बौद्ध-शिंटो संगोपनामुळे मला देव भयानक वाटू लागे

[७ पानांवरील चित्रं]

‘जीवनाकडे निरविणारा मार्ग संकोचित आहे’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा