वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ९/१ पृ. ३-४
  • मी माझा धर्म बदलावा का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी माझा धर्म बदलावा का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मिळती जुळती माहिती
  • ‘माझा धर्म माझ्या साठी चांगला आहे!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ९/१ पृ. ३-४

मी माझा धर्म बदलावा का?

ओकीनावाच्या नाहा विमानतळावरुन १०१ प्रवाशांना घेऊन वैमानिकाने नुकतेच उड्डाण केले होते. अचानकपणे त्याच्या लक्षात आले की समोरुन त्याच्या दिशेने तीन टेहळणी करणारी विमाने हल्ला करण्यासाठी येत आहेत. वैमानिकाने झटकन डाव्या बाजूस विमान वळवून समोरील संकट टाळले आणि आपले तसेच इतर प्रवाश्‍यांचे जीवन वाचविले. उत्तर जपानच्या वृत्तपत्राने हा थोडक्यात संकट टळल्याचा दिलेला अहवाल हे अगदी स्पष्टपणे दाखवितो की, जीवन वाचविणे आहे तर जीवनाक्रमणात एकदम बदल करण्याची मोठी गरज असते.

तथापि, पुष्कळ लोकांना वाटते की, स्वतःचा धर्म एखाद्याने बदलावा ही भिन्‍न गोष्ट आहे. येथे भयभीतपणा मध्ये येतो. शिवाय अपरिचित मार्गावर जाण्याचे भयही असते. यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास केलेल्या श्रीमती ताची यांनीही असेच म्हटलेः “धर्म आणि त्याचा पैशावर असणारा जोर याविषयी साशंक असणारे बरेच लोक मला माहीत आहेत. आम्हाला जे माहीत आहे व तरुणपणापासून आम्ही जे काही पाहिले आहे ते हे की, धार्मिक सण व प्रथा. आम्ही होजी [मेलेल्या व्यक्‍तींखातर असणारा बौद्ध धर्मीय वार्षिक स्मृती विधी] याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे ते जाणत नाही. पण होजी म्हणजे आमचे नातेवाईक आणि शेजारी यांच्यासमवेत आनंद करण्याचा समय एवढेच आम्हाला माहीत आहे. हे सगळे सोडून द्यायचे आणि सोबत घरच्यांचा राग पत्करुन घराबाहेर काढले जाणे याची मला खूप भीती वाटली.” धर्माविषयीची अशीच कल्पना कदाचित तुमच्या स्थानिक लोकात असेल.

पण आणखीन भीती आहे. धर्म बदलला की दैवी प्रकोप येईल अशी भीती पुष्कळ लोक बाळगतात. जपानमध्ये एका स्त्रीने पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला तेव्हा तिच्या नातेवाईकांनी तिला म्हटले की, तिने “आपल्या पूर्वजांकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे” तिला आरोग्य आणि कौटुंबिक समस्या ओढावल्या आहेत तसेच “परदेशीय धर्माचा” अभ्यास केल्यामुळे तिला आता तिच्या पूर्वजांच्या क्रोधाचा अनुभव येत आहे.

धर्म बदलण्यास मज्जाव करणारे आणखी एक भय म्हणजे सोबती किंवा पालकांची नाराजी. पौर्वात्य देशात जेथे पालक व कुटुंबाविषयीची निष्ठा महत्वाची मानली जाते तेथे नववधूने ज्या कुटुंबात तिचा विवाह झाला आहे त्यांच्या धार्मिक दृष्टीकोणास पाठिंबा देण्याची अपेक्षा धरली जाते. जोडपे जरी धार्मिक नसले तरी कुटुंबासोबत चांगले नातेसंबंध टिकविण्यास व धार्मिक दर्जा राखण्यास हे फारच महत्वाचे समजले जाते. एका तरुण जोडप्याने त्यांचा पवित्र शास्त्राभ्यास “कौटुंबिक बैठकीत” तीव्र दबाव आल्यामुळे बंद केला. पतीने तो नंतर पुन्हा सुरु केला, पण तो म्हणतो की, आधी बंद करण्याचे कारण “मनुष्याची भीती” हे होते. तो पुढे सांगतोः “आम्ही आमच्या पालकांच्या इच्छांना आज्ञाधारक रहावे असे आम्हास वाटत होते व यामुळेच आमचा धर्म बदलवून त्यांना दुःखित करु इच्छित नव्हतो.”

ह्‍या गोष्टीमुळे, पुष्कळजण आपला धर्म बदलण्यास का घाबरतात याचे आणखी एक कारण लक्षात येते व ते म्हणजेः वेगळे आहोत असे पाहिले गेल्यामुळे मिळणारी सार्वत्रिक मुरड. वर निदर्शित केलेल्या कुटुंबात, पालकांनी आपल्या तरुण जोडप्यास पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याचे थांबविण्याचे कारण हे होते की, आपल्या मुलांना कोणा विशिष्ट रितीने तसेच वाळीत टाकलेले आहे असे पाहण्यात येऊ नये, हे होते.

तद्वत, मी माझा धर्म बदलावा का या प्रश्‍नात खूप भय दडलेले आहे. यामुळेच, पुष्कळजण हा तत्वज्ञानी दृष्टीकोन धरतातः एखाद्याचा धर्म कोणताही असला तरी त्यात काही विशेष नाही, हो ना? सर्वच धर्म एकाच पर्वताच्या माथ्यावर निरविणारे वेगवेगळे रस्ते नाहीत का? धर्माचा विषय येतो तेव्हा हे लोक त्या तीन नमुनेदार माकडाचे धोरण घेतात जी म्हणतात की, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका.

तरीपण काहींनी आपला धर्म बदलला. तो का बरे? काहींच्या बाबतीत, दुसऱ्‍या धर्मात लगेच आरोग्यदायी आणि आर्थिक लाभ मिळतात हे कारण होते, पण त्याचवेळी ते आपल्या रुढीप्रज्ञ धार्मिक कल्पनांना अनुसरत होते. पण इतर काहींच्या बाबतीत ते खरे व पूर्ण परिवर्तन होते. आता तुम्हाला अचंबा वाटू लागेल की, ‘माझा धर्म बदलण्याची पुरेशी कारणे आहेत का? काहींनी तो का बदलला? हा बदल माझ्या जीवनावर खरा परिणाम करु शकेल का? यासाठी आम्ही तुम्हाला पुढील लेखाचे परिक्षण करण्याचे निमंत्रण देत आहोत.

[३ पानांवरील चित्रं]

लोकांना त्यांच्या रुढीप्रज्ञ धर्म-पद्धतींना कवटाळून राहण्यास कशामुळे चेतविले जाते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा