वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ५/१ पृ. २४-२५
  • एका शताधिपतीचा विश्‍वास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एका शताधिपतीचा विश्‍वास
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मिळती जुळती माहिती
  • शताधिपतीचा मोठा विश्‍वास
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ५/१ पृ. २४-२५

येशूचे जीवन व उपाध्यपण

एका शताधिपतीचा विश्‍वास

येशू त्याचे डोंगरावरील प्रवचन देतो तेव्हापर्यंत तो त्याच्या जाहीर उपाध्यपणाच्या अर्ध्यापर्यंत येऊन पोहंचलेला असतो. याचा अर्थ हा की, त्याचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण होण्यास आता केवळ एक वर्ष व नऊ महिने बाकी आहेत.

येशू आता कफर्णहूम या शहरात प्रवेश करतो. हे त्याचे येथील उपाध्यपणाचे केंद्र आहे. येथे यहुद्यांची वडीलमंडळी त्याच्याकडे येतात व त्याला विनंति करतात. त्यांना रोमी साम्राज्याच्या शताधिपतीतर्फे पाठविण्यात आले आहे.

शताधिपतीचा एक आवडता दास एका गंभीर आजाराने मरणास टेकलेला आहे व येशूने त्याला बरे करावे असे त्या शताधिपतीला वाटते. यहुदी वडीलजन येशूकडे येऊन शताधिपती तर्फे आग्रहाने विनंति करतातः “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे.” ते पुढे म्हणतातः “कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्‍यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे.”

तेव्हा कोणत्याहि प्रकारचे आढेवेढे न घेता, येशू त्या माणसांबरोबर जातो. ते घराजवळ येत असतात तेव्हा तो शताधिपती आपल्या मित्रांना पाठवून सांगतोः “प्रभुजी, श्रम घेऊ नका; कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानिले नाही.”

इतरांना नेहमी आदेश देणाऱ्‍या या शताधिपतीकडून केवढे हे नम्रतेचे बोल! पण त्याला येशूचीही काळजी वाटत असावी हे दिसते, कारण त्यावेळेस यहुदी लोकांना यहुदी नसलेल्या लोकांशी संबंध राखण्यास मनाई होती. कालांतराने पेत्राने देखील तेच म्हटले होतेः “तुम्हाला ठाऊकच आहे की, यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या माणसांबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे करणे हे त्याच्या रितीरिवाजाविरुद्ध आहे.”

रितीरिवाजाविरुद्ध वागल्याने त्याचा परिणाम येशूला भोगावयास लागू नये यासाठीच तो शताधिपती त्याच्या मित्रांद्वारे येशूला विनंति करतोः “शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्‍याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमूक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.”

या गोष्टी ऐकून येशूला आश्‍चर्य वाटते. “मी तुम्हास खचित सांगतो,” तो म्हणतो, “एवढा विश्‍वास मला इस्राएलात आढळला नाही.” यानंतर तो शताधिपतीच्या चाकरास बरे करतो पण येथेच तो हे स्पष्ट करतो की यहुदी नसलेले पण विश्‍वास बाळगणारे हे लोक, विश्‍वासहीन यहुद्यांपेक्षा कसे आशिर्वादित होतील.

येशू सांगतोः “पुष्कळजण पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या पंक्‍तीस बसतील; परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दांतखाणे चालेल.”

“राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील” हे ख्रिस्तासोबत अधिपती होण्याचे आंमत्रण नाकारणारे स्वाभाविक यहुदी आहेत. अब्राहाम, इसहाक आणि याकोब हे देवाच्या राज्याच्या योजनेचे प्रतिनिधित्व करतात. यावरुन येशू हे दाखवून देतो की, जणू स्वर्गीय जेवणावळीच्या आसनावर “स्वर्गाच्या राज्यात” विदेशी लोकांचे कसे स्वागत करण्यात येईल. लूक ७:१-१०; मत्तय ८:५-१३; प्रे. कृत्ये १०:२८.

◆ शताधिपती तर्फे यहुद्यांनी येशूला आग्रहाची विनंति का केली?

◆ त्या शताधिपतीने येशूला त्याच्या घरात न येण्याची का विनंति केली?

◆ येशूने समाप्तीस काढलेल्या उद्‌गारांचा काय अर्थ होता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा