वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ६/१ पृ. २०-२५
  • यहोवाचे भावपूर्ण सहकारी या अर्थाने सेवा करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे भावपूर्ण सहकारी या अर्थाने सेवा करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “नीतीने वागणे”
  • “आवडीने दया करणे”
  • निष्ठेची परीक्षा
  • “आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे”
  • युवकांना साजेशी असणारी नम्रता
  • शांतिमय संबंधांना पोषक असणारा गुण—विनयशीलता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • ते एकनिष्ठ जन पहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ६/१ पृ. २०-२५

यहोवाचे भावपूर्ण सहकारी या अर्थाने सेवा करणे

“हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यावाचून यहोवा तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:८.

१. कोणत्या शास्त्रवचनीय आधारावर आजच्या यहोवाच्या सेवकांना त्याचे “सहकारी” असे म्हणता येऊ शकते?

योहान या ख्रिस्ती प्रेषिताने लिहिले: “आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्‍यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोच.” (१ योहान ३:१) प्रेषित पैलाने स्वतःविषयी आणि अप्पुलोस या सोबत्याबद्दल म्हटले: “आम्ही देवाचे सहकारी आहोत.” (१ करिंथकर ३:९) ही दोन्ही विधाने येशू ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांनी त्यांच्या सारख्या लोकांसाठी केली पण तत्वतः ती देवाच्या सर्व खऱ्‍या सेवकांना लागू होणारी आहेत. त्यामुळेच त्याचा सारांश असा सांगता येईल: ‘आम्हावर पित्याने केवढी प्रीती व्यक्‍त केली आहे ते बघा; त्याने आम्हाला यहोवाचे सहकारी बनविले आहे.’

२. यहोवाच्या सेवकांना त्याचे सहकारी होता येणे का शक्य आहे?

२ पण, दुबळ्या अपूर्ण मानवाला अमर्याद सामर्थ्य व सूज्ञान असणाऱ्‍या, न्यायात परिपूर्ण व प्रीतीचे सर्वांगपूर्ण असणाऱ्‍या थोर निर्मात्याचे सहकारी कसे होता येईल? ते शक्य आहे, कारण आमच्या पहिल्या पालकांना आमचा निर्माता तसेच त्याचा सहकारी शब्द किंवा लोगस यांच्या प्रतिरूपाप्रमाणे व सदृश्‍यतेनुसार घडविण्यात आले होते. (उत्पत्ती १:२६, २७; योहान १:१) त्यामुळेच आमच्या प्रथम पालकांना ज्ञान, न्याय, सामर्थ्य व प्रेम काही प्रमाणात बहाल करण्यात आली. आणि यामुळेच यहोवा आपल्या पृथ्वीवरील सेवकांना त्याच्या संदेष्ट्याद्वारे हे म्हणू शकला: ‘हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यावाचून यहोवा तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:८.

३. मीखी ६:८ वरून काय कळते आणि यहोवाचा सहकारी होण्याआधी त्या व्यक्‍तिबद्दल काय अपेक्षा असते?

३ “. . . यावाचून यहोवा तुजजवळ काय मागतो?” हे शब्द आम्ही वाचतो तेव्हा जी नियमावली आधी सांगण्यात आली आहे त्याकरवी देव व सहमानव याजसंबंधाने ‘मनुष्या’ची काही तरी जबाबदारी आहे असे दिसते. हे केवढ्या प्रमाणात खरे आहे ते आमच्या आत्ताच्या चर्चेद्वारे दिसेलच. अर्थातच, यहोवाच्या समागमे कोणीपण चालू शकत नाही. हा हक्क ज्यांना त्याचा जणू ‘पूर्वसंकेत’ मिळाला आहे त्यांना राखलेला आहे. (आमोस ३:३) ते कसे काय? हा संकेत, आपण मागील लेखात ज्या विषयीची चर्चा केली त्याप्रमाणे यहोवास बिनशर्त समर्पण करून पाण्याचा बाप्तिस्मा घेण्याद्वारे मिळतो. तर मग, मीखा ६:८ या वचनाचा त्या विशिष्ठांसाठी कोणता अर्थबोध होतो?

“नीतीने वागणे”

४. “नीतीने वागणे” याचा मुलभूतरित्या काय अर्थ होतो?

४ याकरता “नीतीने वागणे” ही पहिली गरज आहे. यहोवा देवाचा सहकारी असल्यामुळे आम्हाठायी चांगला विवेक भाव राहिला पाहीजे. “नीतीने वागणे” याचा मुलभूत अर्थ देवाने आम्हाकडून अपेक्षिलेल्या योग्य त्याच गोष्टी करणे असा आहे. त्यामुळे आमचे कर्तव्य आम्ही पाळलेच पाहिजे. यात यहोवाला सर्वस्वाची भक्‍ती देणे ही प्रमुख गोष्ट येते. (नहुम १:२) तो कोणताही प्रतिस्पर्धी सहन करीत नाही. आम्हाला दोन धन्यांची चाकरी करता येणार नाही.—१ करिंथकर १०:२२; मत्तय ६:२४.

५. येशू ख्रिस्ताने धार्मिकतेवर प्रीती व दुष्टाईचा द्वेष असल्याचे कसे प्रदर्शित केले?

५ “नीतीने वागणे” आहे तर येशू ख्रिस्ताने केले त्याप्रमाणे आम्हाला ‘धार्मिकतेविषयी प्रेम व दुष्टाईचा द्वेष’ दाखवावा लागेल. त्याचे धार्मिकतेवर प्रेम होते म्हणूनच त्याने स्वतःला “पवित्र, निर्दोष, निर्मळ . . . पापी जनांपासून वेगळा” असे ठेवले. (स्तोत्रसंहिता ४५:७, इब्रीयांस ७:२६) येशूने दुष्टाईचा द्वेष मानल्यामुळेच त्याने त्याच्या काळातील दांभिक व लोभिष्ठ धर्मपुढाऱ्‍यांची धार्मिक मनोदयाने कडक टीका केली.—मत्तय २३:१३-३६; योहान ८:४४.

६. वाईट करण्याची मनाई आहे म्हणून आम्ही ते टाळले पाहिजे याच्या वैचारिक क्षमतेपेक्षा अधिकाची का गरज आहे?

६ येशूच्या उदाहरणाद्वारे आम्हाला दिसून येईल की आम्ही केवळ धार्मिकतेविषयी प्रेम बाळगून चालणार नाही. आम्ही वाईटाचा द्वेष, होय वीट मानला पाहिजे, त्याला धिक्कारले, टाळले पाहिजे. लहानपणापासून आमची वृत्ति वाईट करण्याकडे झुकलेली असते व शिवाय आमचे अंतःकरण फसवे व घातकी असल्यामुळे जे वाईट त्याला मनाई करण्याच्या नुसत्या वैचारिक क्षमतेपेक्षा अधिकाची गरज आहे. (उत्पत्ती ८:२१; यिर्मया १७:९) पापीष्ठ प्रवृत्त्या व मोह यांचा आम्ही निकराने प्रतिकार केला नाही तर त्याच्या पाशात गुरफटण्याचा संभव आहे. यासाठीच आम्हाठायी फिनहास या प्राचीन काळच्या गृहस्थाप्रमाणे वाईटाविषयीचा दृढ तिटकारा असण्यास हवा. त्याने बालपौराच्या अनैतिक भक्‍तीत सहभागी झालेल्या एका जोडप्यास बरचीने भोसकून ती प्रतिक्रिया दाखवली.—गणना २५:५-८.

७. दुष्ट आहे त्यांना यहोवा आपले सहकारी या अर्थी उपयोग करून घेत नाही याविषयी कोणती साक्ष आपल्याला आहे?

७ दुष्ट असणाऱ्‍या कोणासही यहोवा आपला सहकारी या अर्थी वापरीत नाही व वापरणार सुद्धा नाही. हे आपल्याला स्तोत्रसंहिता ५०:१६-१८ द्वारे कळून येते, जेथे आम्ही वाचतो: “दुर्जनाला तर देव म्हणतो: ‘माझे नियम विदित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण? तू तर शिस्तीचा द्वेष करतो. माझी वचने मागे झुगारून देतो. तू चोर पाहिला की तुला त्याच्या संगतीत आनंद होतो, तू व्यभिचारी माणसांचा साथीदार आहेस.’”

८. वाईट गोष्टीत पडल्यामुळे निंदा ओढावते ही गोष्ट कोणत्या घटनेद्वारे अधोरेखित होते?

८ आम्ही यहोवाच्या कार्यात, देवाच्या राज्याची सुवार्ता प्रसारीत करण्यामध्ये गुंतलेलो असू. पण आम्ही संयम राखण्याविषयी दक्ष राहिलो नाही तर आमच्या दैहिक अशक्‍तपणामुळे यहोवाच्या नामाला निंदा लाभून आमच्या हातून पाप घडू शकेल. काही वर्षांआधी एका वडिलाने जिचा पती सत्यात नाही अशा आध्यात्मिक भगिनीसोबत व्यभिचार केला. ज्या दिवशी सायंकाळी त्या वडिलांच्या बहिष्कृतपणाबद्दलची घोषणा मंडळीत झाली तेव्हाच क्रुध झालेला पति लांब टांगा टाकीत राज्य सभागृहात आला व त्याने त्या दोघा अपराध्यांवर बंदुकीने गोळ्या झाडल्या. त्या दोघांपैकी कोणीही ठार झाले नाही तरी दुसऱ्‍याच दिवशी हे वृत्त अमेरिकेतील मोठ्या वर्तमानपत्रात अगदी पहिल्याच पानावर झळकले! होय, वाईट कृत्ये खऱ्‍या अर्थाने निंदा घडवून आणतात.—नीतीसूत्रे ६:२२.

९. नीतीसूत्रे ४:२३ नुसार आम्ही कशाचे रक्षण करण्यास हवे, व का?

९ यासाठीच, आम्हाला योग्यपणे हा सल्ला दिलेला आहे: “सर्व रक्षणीय वस्तुपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.” (नीतीसूत्रे ४:२३) होय, आमच्या लाक्षणिक अंतःकरणास आम्ही कशाविषयीचा विचार करण्यास देतो त्यासाठी स्वतःला शिस्त लावली पाहिजे. दूरचित्रवाणी, मासिके, व इतर साधने आता अधिकाधिक वाईट गोष्टी, अश्‍लीलता सुद्धा दाखवीत आहेत. तद्वत, आम्ही जे पाहतो, ऐकतो व वाचतो त्यावषयी निवडक असले पाहिजे. व्यक्‍तीगत विचारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे! उदाहरणार्थ, ज्या गोष्टी आमच्या जीवनात प्रत्यक्षात करण्याचे आम्हाला वाटणार नाही त्या लैंगिक कल्पनांचे चित्र आमच्या मनासमोर उभे करून त्याकरवी सुखविलास मिळविणे हे कदाचित सहजसोपे वाटेल. (मत्तय ५:२८) असे हे विचार वाईट कृतीत बहुधा परिणामित होत असतात. या मुळेच त्या गोष्टीवर मानसिकरित्या विचार करीत बसण्यापेक्षा आपण पवित्र आत्म्याचे फळ संयम प्रदर्शित करू या व फिलिप्पैकर ४:८ मध्ये दिलेल्या गोष्टीवर मनन करू या.—गलतीकर ५:२२, २३.

“आवडीने दया करणे”

१०, ११. (अ) विश्‍वासूपणा व निष्ठावंतपणा यात कोणता फरक करता येईल? (ब) देवाच्या पुत्राने विश्‍वासूपणा व निष्ठा कशी प्रदर्शित केली?

१० मीखा ६:८ मध्ये दाखविण्यात आलेली दुसरी गरज ही आहे की, आम्ही “आवडीने दया करावी.” द न्यू इंग्लीश बायबल हेच विधान “निष्ठेने प्रेम व्यक्‍त करणे” असे भाषांतरीत करते. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल मधील तळटीप दाखविते की, “दया” यासाठी असणाऱ्‍या चे’सेध या इब्री शब्दाचा “दयावंतपणा” किंवा “प्रेम निष्ठा” असाही अर्थ होऊ शकतो. कोशकारांच्या मते, “निष्ठा म्हणजे त्याग करण्याच्या कोणत्याही मोहास व विश्‍वासघातास निकराने प्रतिकार करणे” असा अर्थ आहे. “निष्ठा ही विश्‍वासू जनाला एखाद्या व्यक्‍ती किंवा गोष्टीच्या बाजूने उभे राहण्याची वा लढण्याची तसेच मोठ्या अडखळणांना तोंड देत राहण्याची कल्पना देते.” शास्त्रवचनात या शब्दांच्या वापरात थोडा फरक आहे हे लक्षात घेणे चित्तवेधक आहे. उदाहरणार्थ, “निष्ठा” हा शब्द निर्जिव गोष्टींबद्दल कधीही वापरण्यात आलेला नाही. पण तेच “विश्‍वासू” हा शब्दाचा वापर नित्याने झाला आहे. अशाप्रकारे चंद्राच्या बाबतीत म्हटले आहे की, तो “आकाशातील साक्षीदार विश्‍वसनीय आहे.” (स्तोत्रसंहिता ८९:३७) याशिवाय देवाच्या वचनाच्या बाबतीत ती विश्‍वसनीय व भरवशाची आहेत असे म्हणण्यात आले आहे.a (प्रकटीकरण २१:५; २२:६) निष्ठा ही मात्र यहोवा देव व त्याच्या संमतीप्राप्त सेवकांच्या अनुषंगाने लागू करण्यात आली आहे. त्यामुळेच यहोवाच्या बाबतीत आम्ही वाचतो: “निष्ठावानांसोबत तू निष्ठेने वागतोस.”—२ शमुवेल २२:२६.

११ देवाचा पुत्र स्वर्गात यहोवासोबत निष्ठावंत व विश्‍वासू होता. पृथ्वीवर येशू ख्रिस्त यानात्याने त्याने परीक्षांना तोंड दिले व आज्ञाधारकपणामुळे तो विश्‍वासू व निष्ठावंत ठरला. हेच इब्रीयांस पत्र ५:७-९ मध्ये आमच्या निदर्शनास आणण्यात आले, जेथे आम्ही वाचतो: “त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ मोठा आक्रोश करीत व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्‌भक्‍तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोशिले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला; त्याला परिपूर्ण करण्यात आल्यावर तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्‍या सर्वाचा युगानुयुगींच्या तारणाचा कर्ता झाला.”

निष्ठेची परीक्षा

१२. ?कधी कधी आमच्या निष्ठेची कशी परीक्षा होईल व अशा वेळी काहींनी कोणती प्रतिक्रिया दाखवली?

१२ यहोवा देवास दाखविण्यात येणाऱ्‍या निष्ठेत त्याच्या पृथ्वीवरील सेवकांना म्हणजे आमच्या सहख्रिश्‍चनांच्या विषयीही निष्ठा प्रदर्शित करण्याचे समाविष्ट आहे. प्रेषित योहान याविषयीचे स्मरण देताना म्हणतो: “आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.” (१ योहान ४:२०) या बाबतीत इतरांठायी असणाऱ्‍या अपूर्णता आमच्या निष्ठेच्या परीक्षा घेतात. उदाहरणार्थ, काही जण नाराज होतात त्यावेळी ते ख्रिस्ती सभांना येण्याचे टाळून यहोवास असणाऱ्‍या आपल्या निष्ठेतील कमतरता दाखवितात. आमच्या बांधवांस व्यक्‍त केल्या जाणाऱ्‍या निष्ठेच्या परिक्षेतील आणखी एक भाग असा की, नेतृत्व करण्यासाठी ज्यांचा यहोवा वापर करतो त्यांच्याकडून न्याय करण्यामध्ये चूक होते तेव्हा ती परीक्षा उभी राहते. काहीजन अशा चुकांचा वेळोवेळी आधार घेऊन चिडीस येतात व स्वतःला यहोवाच्या दृश्‍य संस्थेमधून अलिप्त करतात. पण त्यांची ही कृति समर्थनीय आहे का? मुळीच नाही!

१३. यहोवाच्या संस्थेमधून वेगळे होणे का न्याय्य ठरत नाही, आणि अशा बेईमानांसाठी शेवटी कोणते पर्याय राहतात?

१३ यहोवाची संस्था सोडून जाण्यात हे लोक न्याय्य का ठरत नाहीत? कारण त्याचे वचन ही हमी देऊन आहे: “तुझे [यहोवाचे] नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्‍यांस फार शांती असते; त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.” (स्तोत्रसंहिता ११९: १६५) यासोबतच, आम्ही “एकमेकांवर जिवापाड प्रेम करावे” अशी आपल्याला आज्ञा आहे, “कारण प्रीती पापांची रास झाकते.” (१ पेत्र ४:८; नीतीसूत्रे १०:१२) शिवाय, आणखी असे समजा की कोणी यहोवाच्या लोकांना सोडून वेगळा झालाच तर तो कोठे जाऊ शकेल? असाच प्रसंग येशूच्या प्रेषितांपुढेही आला होता. येशूने त्यांना विचारले होते की ते सुद्धा त्याला सोडून जातील का? त्यावेळी प्रेषित पेत्राने अगदी योग्यपणे म्हटले: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.” (योहान ६:६८) वेगळे व्हायचे आहे तर “मोठी बाबेल” खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य किंवा सैतानाचे राजकारणी “श्‍वापद” याच्या मिठीशिवाय दुसरा पर्यायच राहात नाही. (प्रकटीकरण १३:१; १८:१-५) त्यामुळेच, यहोवाच्या दृश्‍य संस्थेचा त्याग करणाऱ्‍या बहुतेक बेईमानांनी देवाचा अपमान करणाऱ्‍या ‘मोठ्या बाबेल’ सोबत आपले संधान बांधून घेतले.

“आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे”

१४, १५. (अ) “नम्र” या शब्दाचा काय अर्थ होतो? (ब) ‘नम्रते’ विषयीच्या कोणत्या अर्थाविषयी आम्ही येथे विचार करीत आहोत व कोणत्या कारणास्तव? (क) ख्रिश्‍चनांनी ‘आपली क्षमता व योग्यता यांचे सभ्य अनुमान’ का ठेवावे?

१४ नम्रभाव याचा विविध अर्थ होतो. तो “आकार, रक्कम किंवा व्याप याविषयीचा मर्यादितपणा,” अहंमन्यता न बाळगणे यास अनुलक्षून आहे. किंवा त्याचा अर्थ शुद्धतेसोबत, “वेशभूषा व वर्तणुक यातील भिडस्तपणा” याजशी संबंधित आहे. (१ तिमथ्यी २:९) याशिवाय “नम्रते” चा आणखी एक अर्थ आहे जो खासपणे आमच्या काळजीसंबंधाचा, म्हणजे, आमच्या मर्यादांची जाण राखणे किंवा “एखाद्याच्या क्षमता व योग्यता यांचे सभ्य अनुमान धरणे” याजशी संबंधित आहे. आम्ही स्वतःविषयी अगदीच उच्चतम दृष्टीकोण बाळगला, व इतरांचे यहोवा लक्ष न वेधविता स्वतःकडे आकर्षित करण्याचा यत्न राखला तर आम्हाला यहोवाचे सहकारी केव्हाही होता येणार नाही.

१५ ‘आपली क्षमता व योग्यता यांचे सभ्य अनुमान’ हा अर्थ आम्ही मीखा ६:८ मधील “नम्र” शब्दाविषयी घेतला पाहिजे. ही गोष्ट, हाच शब्द इब्री शास्त्रवचनात केवळ आणखी एका जागी ज्या पद्धतीने वापरण्यात आला आहे त्यावरून कळते. नीतीसूत्रे ११:२ मध्ये त्याची गुणवैधर्म्यता लैंगिक अशुद्धतेसोबत नव्हे तर एखाद्याने स्वतः विषयीचा अगदीच उच्च विचार राखल्यामुळे जो गर्व निर्माण होतो त्याच्या विरूद्ध दाखविली आहे. तेथे आम्ही वाचतो: “गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” नम्र असणे ही गोष्ट यहोवाच्या भयासोबत राहते व त्याचे भय ज्ञानाचा उगम आहे. (स्तोत्रसंहिता १११:१०) नम्र जनांठायी यहोवाचे भय राहते कारण त्याच्यामध्ये व देवामध्ये यहोवाची धार्मिकता व सामर्थ्य आणि त्याच्या स्वतःची अपूर्णता व दुबळेपण यात किती मोठा फरक याची जाण त्याला असते. या कारणास्तव हा नम्र माणूस भीत व कापत आपले तारण साधून घेतो.—फिलिप्पैकर २:१२.

१६. ख्रिश्‍चनांनी का नम्र असलेच पाहिजे हे कोणती शास्त्रवचने दाखवितात?

१६ यहोवाच्या सहकाऱ्‍यांनी नम्र का असावे याची कित्येक कारणे आहे! आम्हाठायी कितीही ज्ञान असले, शारीरिक बळ असले किंवा भौतिक संपदा आम्हापाशी कितीही असली तरी या गोष्टी अभिमानास आधार देणाऱ्‍या नाहीत. (यिर्मया ९:२३) का नाही? कारण १ करिंथकर ४:७ मध्ये हे तत्व दिलेले आहे: “तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?” आमच्या उपाध्यपणातील फलप्राप्तीबद्दल देखील आम्हाला अभिमान करण्याचे कारण नाही कारण आपण १ करिंथकर ३:६, ७ मध्ये काय वाचतो बरे? तेथे पौल म्हणतो: “मी लाविले, अप्पुलोसाने पाणी घातले, पण देवाने वाढविले. यास्तव लावणारा काही नाही व पाणी घालणारा ही काही नाही, तर वाढविणारा देव हाच काय तो आहे.” याकरताच येशूने लूक १७:१० मध्ये उद्‌गारिलेले शब्द आम्हाला नम्र राखण्यात साहाय्यक ठरले पाहिजे. कारण तो म्हणाला: “तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, ‘आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे’ असे म्हणा.”

१७. नम्रता राखणे हा खरोखरी सूज्ञतेचा मार्ग का आहे?

१७ अशाप्रकारे नम्र असणे सूज्ञतेचा खराच मार्ग आहे. नम्रता आम्हाला जेथे सेवा सादर करण्याच हक्क मिळाला त्यात तृप्त राहण्यात मदत देते. आम्ही नम्र आहोत तर महत्वाकांक्षा बाळगून चकाकण्याचा यत्न करणार नाही तर स्वतःला “कनिष्ठ” असल्याचे वागवू. (लूक ९:४८) त्याचप्रमाणे आम्हाठायी स्तोत्रकर्त्याची अशी मनोवृत्ति राहील: “तुझ्या अंगणातील एक दिवस सहस्र दिवसांपेक्षा खरोखर उत्तम आहे. दुष्टाईचा तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते.” (स्तोत्रसंहिता ८४:१०) आम्हाठायी नम्रता असली म्हणजे इतरांना सन्मान दाखविण्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी प्रेम आम्हाला चालना देत राहील.—रोमकर १२:१०.

युवकांना साजेशी असणारी नम्रता

१८. (अ) नम्रता युवकांसाठी का योग्य आहे? (ब) नम्रतेची किती गरज आहे ते आधुनिक काळातील युवकांच्या कोणत्या अहवालाने प्रकट होते?

१८ ख्रिस्ती युवकांनी नम्रतेच्या वस्त्राने स्वतःला भूषवावे हे अगदी उचित आहे. अलीहूने त्यांच्यासाठी केवढे उत्तम उदाहरण दिले! त्याच्यापाशी बरोबरचे उत्तर होते तरी वयस्करांचे बोलणे होईपर्यंत तो आदराने थांबून राहिला. (इयोब ३२:६, ७) युवकांना स्वतःचा साधरणपणे मोठा आत्मविश्‍वास वाटत असतो. त्याना आपल्या मर्यादेची कल्पना येत नाही. शारीरिक बळ आहे व थोडे फार ज्ञान संपादल्यामुळे त्यांना वयस्करांना हीन समजण्याची इच्छा होते. तरीपण थोडी फार प्राप्त करून घेण्यात आलेली माहिती सूज्ञानाच्या समानार्थी नाही. सूज्ञान याचा अर्थ मिळविलेल्या माहितीचा अवलंब करणे होय. अमेरिकेतील युवकांचा अहवाल खरोखरी दुःखास्पद आहे. मोठ्या गुन्हेगारीच्या संदर्भात झालेल्या धरपकडीत ६३ टक्के युवक २४ वर्षे वयाचे होते तर ३० टक्के १८ वर्षे वयाखालील होते. शिवाय असाही अहवाल कळविण्यात आला की, “मद्यप्राशन व मादक पदार्थ सेवनाने वाहन चालविणे ही गोष्ट १५-२४ वयोगटातील युवकांच्या मृत्युचे प्रमुख कारण आहे.” याच देशात “किशोरवयीन गटातील अधिकाधिक विवाह घटस्फोटात संपत आहेत” आणि असे कळविण्यात आले की ‘वेदी वर जाण्याआधी त्या वधू व वराने काही वर्षे थांबून अधिक सूज्ञान मिळविले तर त्यांचा विवाह टिकण्याजोगा राहू शकेल.’

१९. युवकांनी कोणता शास्त्रवचनीय सल्ला आपल्या अंतःकरणी लावावा?

१९ तर मग, देववचनातील सल्ला केवढा सूज्ञ आहे! तो, युवकांनी त्यांच्या आईवडिलांचा सन्मान करावा व सर्व गोष्टीत त्यांची आज्ञा मानावी ही योग्यच सूचना करतो. (इफिसकर ६:१-३; कलस्सैकर ३:२०) युवकांनी हा सल्ला खासपणे आपल्या अंतःकरणी लावावा: “तू आपल्या अगदी अंतःकरणापासून यहोवावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतीसूत्रे ३:५, ६.

२० आम्ही समर्पण व बाप्तिस्म्याद्वारे यहोवावरील आपला भाव प्रदर्शित करून ‘नीतीने वागणे, निष्ठावंत प्रेम व्यक्‍त करणे आणि नम्रभावे देवासमागमे चालत राहणे’ या गोष्टी करीत राहिलो तर याबद्दल आम्हाला कोणत्या प्रतिफळाची आशा धरता येईल? यात सर्व महत्वाचे ते हे की, यहोवा देवाच्या गरजांनुरूप राहिल्यामुळे आम्ही त्याची मर्जी मिळवू आणि त्याच्या थोर व भयप्रेरित नामाचे पवित्रीकरण करण्यात सहभागी झाल्यामुळे त्याचे अंतःकरण आनंदी करू. (नीतीसूत्रे २७:११) यासोबतच आम्हाला आमच्या जीवनात या तत्वाची सत्यता अनुभवण्यास मिळेल: “सुभक्‍ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे; तिला आताच्या वा पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.”—१ तिमथ्यी ४:८.

[तळटीपा]

a अमेरिकेच्या पश्‍चिम विभागात असे काही उष्णोदक आहेत जे कित्येक वर्षे सरासरीपणे प्रत्येकदा ६५ मिनिटांसाठी उफळत राहिले. त्यामुळे त्यांना “ओल्ड फेथफुल” असे नाव पडले.

तुमचे उत्तर काय आहे?

◻ मीखा ६:८ च्या अनुषंगाने “नीतीने वागणे” याविषयीच्या कोणत्या अपेक्षा आहेत?

◻ यहोवास दाखविण्यात येणारी निष्ठा आमच्या सहख्रिश्‍चनांच्या नातेसंबंधावर कोणता प्रभाव राखून आहे?

◻ आम्ही ‘देवासमागमे नम्रभावाने’ का चालले पाहिजे?

◻ नम्रता ख्रिस्ती, युवकांना खासपणे का साजेशी आहे?

२०. मीखा ६:८ मधील सूचनांचा अवलंब केल्यास सर्व समर्पित व बाप्तिस्मा घेतलेल्या लोकांना कोणते प्रतिफळ मिळेल?

[२४ पानांवरील चित्र]

तुम्ही जे बघता, ऐकता व वाचता त्याबद्दल निवडक राहून आपल्या अंतःकरणाचे रक्षण करता का?

[२५ पानांवरील चित्र]

येशूपाशीच “सार्वकालिक जीवनाची वचने” असल्यामुळे आपण दुसरीकडे कोठेही जाऊ शकत नाही हे पेत्राला ठाऊक होते. तर मग तुम्ही सुद्धा याचप्रमाणे यहोवाच्या संस्थेला निष्ठावंतपणा दाखविण्याचा निश्‍चय बाळगून आहात का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा