वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ८/१ पृ. ३१-३२
  • तुम्ही आस्थेवाईक का असले पाहिजे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही आस्थेवाईक का असले पाहिजे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जेव्हा पुष्कळांनी आस्था दाखविली नाही
  • येशूच्या काळी आस्थेवाईक नसलेले
  • आस्था दाखवा—यातच तुमचे जीवन आहे!
  • “मला ऐकायचं नाही,” असं म्हणणाऱ्‍या लोकांच्या घरी यहोवाचे साक्षीदार पुन्हा का जातात?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • नव्या जगात जाण्यासाठी मुक्‍ततेची तयारी करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • गालीलातील आणखी एक प्रचार यात्रा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ८/१ पृ. ३१-३२

तुम्ही आस्थेवाईक का असले पाहिजे

आस्थेवाईक? कशामध्ये? मानवजातीच्या इतिहासात जो सर्वथोर बदल घडणार आहे त्यामध्ये! देवाने तयार केलेले संपूर्ण नवे सरकार पृथ्वीच्या दृश्‍यात आपला अधिकार गाजवणार आहे. (दानीएल २:४४) हा बदल पृथ्वीवरील प्रत्येक पुरुष, स्त्री आणि मुलावर चांगल्यासाठी वा वाईटासाठी परिणामित होईल. हा अप्रतिम बदल मत्तय २४:३४ मध्ये उल्लेखिलेल्या पिढीत घडून येईल. या कारणास्तव या बदलाच्या संदेशाकडे सर्व लोकांनी प्रांजळ व तळमळीची आस्था दाखविली पाहिजे. ‘मला यात आस्था नाही’ असे म्हणणे खरोखरीच चुकीचे ठरेल.

जेव्हा पुष्कळांनी आस्था दाखविली नाही

एखादा महत्वपूर्ण व तातडीचा संदेश घोषित केला जाण्यास हवा आणि त्यामुळे तो ऐकणाऱ्‍यांठायी आस्था निर्मित झाली पाहिजे असा आमचा आधुनिक काळ यात प्रथम नाही. नोहाचा काळ हा याप्रकारचा होता. त्या काळच्या मानवाच्या दुष्टाई, अनैतिक मार्ग आणि हिंसाचारी व्यक्‍तीमत्वामुळे यहोवा देवाने मानवजातीचा गोलार्धव्याप्त जलप्रलयाकरवी नाश करण्याचे ठरविले. (उत्पत्ती ६:५-७, १३) तथापि, अभक्‍तांचा नाश करण्याआधी येणारा जलप्रलय व त्यातून बचाव मिळावा यासाठी काय केले पाहिजे त्यासंबंधीचा इशारा देण्यासाठी देवाने नोहा या धार्मिकतेच्या उपदेशकाला सामोरे आणले. तो संदेश महत्वपूर्ण होता तरी लोकांनी सर्वसाधारणपणे “त्याकडे लक्ष दिले नाही.” (मत्तय २४:३९; लूक १७:२६, २७; २ पेत्र २:५) ते उदासीन, बेपर्वा होते. त्यांना आस्थाच नव्हती! यामुळे त्यांनी आपले सर्वस्व गमावले.

अशीच परिस्थिती कुप्रसिद्ध, अनैतिक शहरे सदोम व गमोरा यातील रहिवाश्‍यात होती. त्यांच्या अति वाईट करणीमुळे त्यांचा नाश होणार असे सांगण्यात आले होते तरी त्यांनी ऐकले नाही. आपल्या दैनंदिन जीवनात विचलीतपणा करु पाहणाऱ्‍या कशातही ते आस्थेवाईक नव्हते. यात लोट हा मनुष्य केवळ अपवाद होता.—उत्पत्ती १८:२०-३०; १९:१-२९; लूक १७:२८-३०.

अशाप्रकारे या शहरातील रहिवाश्‍यांमध्ये तो संदेश प्रिय बनला नाही. आपण आस्था दाखवली तर आपले शेजारी काय म्हणतील याची कदाचित त्यांना अधिक चिंता वाटली असावी. किंवा कदाचित आपल्याला नको वाटणारे बदल आपल्या जीवनात करावे लागतील अशी भीती त्यांनी धरली असावी. ते आपल्या स्वैराचारी जीवनाक्रमणात आनंदी होते हे उघड होते. (यहुदा ७) यास्तव नाशाचा दिवस उजाडेपर्यंत त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही आणि काय होणार हेही समजून घेतले नाही.

येशूच्या काळी आस्थेवाईक नसलेले

देवाचा पुत्र येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता त्यावेळी त्याने आपल्या अनुयायांना देवाच्या स्वर्गीय सरकारची घोषणा करण्यास पाठविले. (मत्तय १०:७) वस्तुतः त्याने आपल्या शिष्यांना हा असामान्य व महत्वाचा संदेश प्रत्येक घरी कसा सादर करावा व खरी आस्था दाखविण्यात अपयशी ठरणाऱ्‍या घरमालकांबाबत कोणता शिरस्ता घ्यावा याविषयीचेही शिक्षण दिले. शिष्यांना प्रशिक्षण देताना तो काय म्हणतो ते ऐकाः “तुम्ही घरात जात असता घरमालकास अभिवादन करा, ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो, ते योग्य नसेल तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. कोणी तुमचे स्वागत करणार नाही किंवा तुमची वचने ऐकणार नाही त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.”—मत्तय १०:१२-१४.

यहोवाच्या राज्याबाबत पूर्ण आस्था नाही असे घर किंवा शहर सोडून जाताना “[त्यांच्या] पायांची धूळ झटकून टाका” असे जे येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले ते लक्षात घ्या. हा सल्ला देण्यात त्याचा कोणता अर्थ होता? पायाची धूळ झटकून टाकणे याचा अर्थ देवाच्या संदेशात पुरेशी आस्था न दाखविल्याबद्दल घरमालकास भोगाव्या लागणाऱ्‍या परिणामाच्या जबाबदारीपासून किंवा हिशेबापासून तो मुक्‍त आहे असा याचा संकेत होता. येशूचे अनुयायी ते घर किंवा शहर देवापासून सरतेशेवटी येणाऱ्‍या परिणामासाठी शांतीने सोडून व निघून जात होते हे त्याकरवी सूचित होत होते.

आस्था दाखवा—यातच तुमचे जीवन आहे!

आमच्या काळातील लोकांच्या प्रतिसादाची तुलना येशू ख्रिस्ताने नोहा तसेच सदोम व गमोराच्या दिवसाशी केली होती हे लक्षात घेणे चित्तवेधक आहे. (मत्तय २४:३७-३९; लूक १७:२६-३०) नोहाच्या व लोटाच्या दिवसात देखील अनैतिकता व हिंसाचाराने थैमान माजविले होते. सदोम व गमोराच्या रहिवाशांचा स्वैराचार व अधार्मिकपणा पाहून धार्मिक लोटास खरोखरी यातना व दुःख होत होते.—२ पेत्र २:६-८.

तरीही, येशूने नोहा व लोटाच्या दिवसातील अनैतिकता व गुन्हेगारी यांच्याकडे नव्हे तर त्या काळात त्यांना दैनंदिन चिंतेच्या बाबी, जसे की, खाणे, पिणे, लग्न करुन घेणे व देणे तसेच खरेदी, विक्री, बांधणी व पेरणी करणे याकडे आमचे लक्ष वेधविले. त्याने दर्शविले की, पुष्कळ जण देवराज्याच्या सुवार्तेकडे प्रतिसाद देणार नाहीत तर दैनंदिन व्यवहारात इतके मग्न होऊन जातील की, यहोवाने जे काही करावयाचे उद्देशिले आहे त्याकडे आस्था दाखविणार नाहीत. हा संदेश जीवन-मृत्यु एवढा महत्वाचा आहे. ऐकण्यात अपयशी ठरणे फार हानीचे ठरेल. यास्तव कसलीही दखल न घेणे वा काहीही आस्था न दाखविणे हे गंभीर पातक आहे.—पडताळा मत्तय ६:३१, ३२.

पण किती गंभीर? येशूने पुढे म्हटले की, जे ऐकणार नाहीत किंवा आस्था दाखविणार नाहीत अशा लोकांपेक्षा “न्यायाच्या दिवशी सदोम व गमोरा ह्‍यावर अधिक दया दाखविण्यात येईल.” (मत्तय १०:१५, टुडेज इंग्लीश व्हर्शन) कोणी व्यक्‍ती, जरी तो अनैतिक वा हिंसक असला पण आस्था दाखवितो, ऐकतो व संदेशावर विश्‍वास ठेवतो तर तो आपल्या व्यक्‍तीमत्वात बदल करुन यहोवाच्या नजरेत त्याची मर्जी संपादू शकतो व याकरवी त्याच्या राज्यातील प्रजाजनांपैकी एक होण्यास पात्र ठरु शकतो. हेच करिंथमधील आरंभीच्या ख्रिस्तीजनांनी केले.—१ करिंथकर ६:९-११.

आपल्या शिष्यांसोबतच्या सर्व संभाषणात येशूने त्यांना ऐकण्यास, लक्ष देण्यास व देवाच्या राज्याच्या महत्वपूर्ण संदेशास आस्था दाखविण्यास आर्जविले. श्रोत्यांचे लक्ष खेचून घेण्यासाठी तो म्हणालाः “तुम्ही कसे ऐकता त्याकडे लक्ष द्या.” “ज्याला कान आहे तो ऐको.” “तुम्ही सर्वजण माझे ऐका व समजून घ्या.” “ऐका व समजून घ्या.”—लूक ८:१८; मार्क ४:९; ७:१४; मत्तय १५:१०.

यास्तव, पुढल्या वेळी जेव्हा यहोवाचे साक्षीदार तुमच्या घरी भेट देतील तेव्हा असे म्हणण्यात तुमचा फायदाच होईल की, ‘आत या. मला आस्था आहे.’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा