युवकांनो, तुम्ही आपल्या जीवनाचे काय करणार?
“जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला . . . त्याच्याकरिता जगावे.”—२ करिंथकर ५:१५.
१. लोकांनी कृतज्ञतेचे कोणते उद्गार काढले आहेत व का?
‘धन्यवाद! मी तुमचा ऋणी आहे!’ असे उद्गार आगीतून किंवा पाण्यात बुडण्यामधून वाचविण्यात आलेल्या माणसाच्या तोंडून निघतात. असेच उद्गार कृतज्ञ वाटणाऱ्या युवकांनीही आपल्या पालकांना बोलून दाखविले. पालकांनी आपल्याला जन्मास घातले इतकेच नव्हे तर त्यांनी आपले प्रेमळ संगोपन केले व अशा स्वरुपाचे शिक्षण दिले की ज्यामुळे ते आता “जे अभिवचन त्याने [देवाने] आपल्याला दिले आहे तेच (म्हणजे) सार्वकालिक जीवन” याच्या मार्गावर आले म्हणून ते ऋणी आहेत.—१ योहान २:२५.
२. तुम्ही तुमच्या जीवनाचे काय करणार हा प्रश्न कोणत्या माहितीच्या अनुषंगाने विचारात घेण्यास हवा?
२ यहोवा देवाने प्रीतीने भारावून आम्हा प्रत्येकासाठी “खरे जीवन,” सार्वकालिक जीवन उपलब्ध केले आहे. “त्याने तुम्हाआम्हावर प्रीती केली व तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.” (१ तीमथ्यी ६:१९; १ योहान ४:१०) याशिवाय आमच्या सार्वकालिक जीवनाच्या प्राप्तीस्तव देवाचा पुत्र येशू यानेही यातनाकारक मृत्यु सहन करण्याद्वारे जी प्रीती आम्हाबद्दल दाखविली तीही विचारात घ्या! (योहान १५:१३) या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर तुम्ही आता तुमच्या जीवनाचे काय करणार?
३. लोक आपल्या जीवनाचे काय करतात हे बहुधा कशावर ठरवले जाते?
३ शाळेमध्ये सल्ला देणारे किंवा युवकांच्या भवितव्याविषयी रस बाळगणारे तो प्रश्न या किंवा त्या स्वरुपाने युवकांपुढे मांडतात. तुम्ही कोणत्या आधारावर उत्तर देणार? ते आपल्या व्यक्तीगत आवडीनिवडीवर आधारीत असेल का? जे तुम्हाला सल्ला देत आहेत व तुम्ही प्रापंचिक जगात सुरक्षित स्थान मिळवावे अशी इच्छा राखणाऱ्या त्या सल्लागारांच्या इच्छेला अनुसरुन ते उत्तर देणार का? किंवा तुम्ही तुमच्या जीवनाचे काय करणार हे श्रेष्ठ विचारपूर्वकतेवर ठरवणार? प्रेरित स्मरण आम्हाला सांगतेः “तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे.” (२ करिंथकर ५:१५) होय, जेव्हा आम्ही आपले जीवन, येशू ख्रिस्त व त्याचा स्वर्गीय पिता यांनी आपणासाठी जे केले त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या मार्गाने व्यतित करतो तेव्हा ते किती चांगले आहे बरे!
नमुनेदार प्रसिध्द व्यक्ती
४. आज नमुनेदार अशा प्रसिध्द व्यक्ती कोण आहेत?
४ युवक साधारणतः ज्यांचे अनुकरण करतात अशा आज अत्यंत प्रसिध्द व्यक्ती कोण आहेत? जगात धनवान व मशहूर, त्यांचा नैतिक दर्जा काहीही असला तरीही तेच नाहीत का? तुम्ही कोणा युवकाच्या खोलीत डोकावून पाहिले तर भिंतीवर कोणाची चित्रे तुम्हाला पहावयास मिळतील? ती कोणा संगीतकाराची, चित्रपट अभिनेते वा अभिनेत्रीची आणि क्रिडापटुची असतात. आपणही अशाचप्रकारचे जागतिक यश संपादीत करावे असे किंवा अशी शारीरिक गुणवत्ता असणाऱ्या कोणाबरोबर तरी विवाहबध्द व्हावे ही अनेक तरुणांची स्वप्ने आहेत. पण तुम्हाबद्दल काय? तुम्हाला जीवनामधून काय हवे आहे?
५, ६. (अ) जागतिक यशसंपदा खरे समाधान देण्यात अपयशी ठरते असे का म्हणता येते? (ब) खऱ्या समाधानाचा उगम काय आहे?
५ ज्यांचे कौतुक होते अशा जागतिक यशप्राती संपादन करणाऱ्यांचे यश तुम्ही संपादिले तर तुम्ही खरेच सुखी व समाधानी व्हाल का? हॉलीवुडमधील एक ख्यातनाम नटी म्हणालीः “मी माझ्या सर्व धनसंपत्तीचा व ऐश्वर्याचा उपभोग घेतला. पण त्याचा काही अर्थ नाही. मी पाहते आहे की इथे जितके पोहण्याचे तलाव आहेत तितकी मनोविकारतज्ञांची संख्या वाढती आहे. कारण घटस्फोटित व आपल्या पालकांचा द्वेष करणारी मुले प्रचुरतेने सापडतात.”—उपदेशक ५:१०; १ तीमथ्यी ६:१०.
६ न्यूयॉर्कमध्ये १० किलोमीटर स्त्रियांच्या शर्यतीत विजय मिळविणारी १९८१ ची विद्यार्थीनी इतकी उद्वीग्न झाली होती की तिने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. “गेल्या काही महिन्यात मला जीवनाबद्दलची बरीच सत्ये कळून आली,” असे ती लिहिते. “एक गोष्ट ही की लोक ज्या पध्दतीने पूर्णत्व व यश संपादण्याकरता धावतात त्यापासून त्यांना खरे समाधान मिळत नाही. मी हुशार विद्यार्थीनी आहे, मला राज्य पातळीवर धावण्यात यश मिळाले आणि मी दिसावयाला सुंदर आहे तरी मला समाधान प्राप्त होऊ शकले नाही.” होय, खरे समाधान हे केवळ देवाबरोबरील व्यक्तीनातेसंबंधामुळे मिळत असते ही गोष्ट लोकांना कळणे अत्यंत जरुरीचे आहे. कारण तोच खऱ्या अर्थाने अस्सल शांती व समाधान देऊ शकतो.—स्तोत्रसंहिता २३:१, ६; १६:११.
७. खऱ्या समाधानाची जाणीव प्राप्त होण्याच्या बाबतीत विद्यालयीन शिक्षण व जागतिक यश केवढ्या मोलाचे ठरतात?
७ तद्वत, हे स्पष्ट आहे की जे निव्वळ मशहूरपणा व संपत्ती प्राप्त करण्याच्या मागास लागतात त्यांचे अनुकरण तुम्ही करता कामा नये. जागतिक यशप्राप्ती खरे समाधान देण्यात केवढी असमर्थ आहे याची कबुली प्रापंचिक लेखक देखील देतात. स्तंभलेखक बील रील यांनी लिहिलेः “भविष्याची स्वप्ने रंगवून तुम्ही कॉलेजमधून प्रशिक्षित होऊन बाहेर पडता. पण बहुतेकदा आपल्या आशाआकांक्षा धुळीस मिळतात. तुमचे मानसिक बळ खचवावे हा माझा हेतु नाही. तरीपण हे सत्य तुम्ही ऐकावे असे मला वाटतेः तुम्ही संपत्तीविषयीची जी हाव धरली त्याप्रमाणे तुम्ही ती मिळवलीच, तसेच ज्या यशाच्या मागे तुम्ही धावला ते मिळवलेच तरी ते तुम्हास तृप्ती देऊ शकणार नाही. तुम्हाला विजय मिळविल्याची सुखाची भावना खेळू लागते त्याचवेळी अतृप्त वाटायला लागते. मानापेक्षा नैराश्य अधिक जाणवू लागते आणि शांतीऐवजी चिडचिडे झाल्यासारखे वाटायला लागते.”—न्यू यॉर्क डेली न्यूज, मे २६, १९८३.
८. जागतिक ध्येयाच्या मागे न लागण्याविषयी कोणते सबळ कारण आहे?
८ आम्हाला पवित्र शास्त्र भविष्यवादाच्या अनुषंगाने घडत असणाऱ्या जागतिक घटनांची अर्थसूचकता ठाऊक आहे त्यामुळे आम्ही आपल्या जीवनात जागतिक ध्येयांची पूर्ति प्रधान स्थानी का ठेऊ नये हे याचे सबळ कारण आहे. (मत्तय २४:३-१४) आम्ही स्वतःला अशा व्यक्तीसमान लेखू शकू जी एका इमारतीवरील हा मजकूर वाचीत आहे की, “ही कंपनी आता बंद होत आहे.” तर अशा या कंपनीत आपण नोकरी मिळविण्याची धडपड करु का? मुळीच नाही! जरी त्या कंपनीत काही काम मिळाले तरी आम्ही दुसऱ्या नोकरीच्या शोधात राहू. तर आता जागतिक संघटनांच्या बाबतीत हा इशारा स्पष्ट दिसत आहेः “आता बंद करण्याची वेळ झाली आहे—शेवट जवळ आहे!” होय, ‘जग . . . नाहीसे होत आहे,’ असे पवित्र शास्त्र खात्रीने म्हणते. (१ योहान २:१७) या कारणास्तव जे या जगात स्वतःला गुंतवून आहेत अशांचा नमुना आम्ही खचितच अनुसरणार नाही.
कोणता सल्ला अनुसरावा
९. तुमच्यासाठी सर्वोत्तम गोष्टींची इच्छा धरणारे कदाचित कोणता सल्ला तुम्हाला देतील?
९ तुमचे जीवन हे तुम्ही आपल्या उरी बाळगलेल्या आशाआकांक्षेमुळेच नव्हे तर तुमचे नातेवाईक आणि मित्र यांच्याकरवीही घडवले जाते, कारण, ‘तुम्हाबद्दल आम्हाला केवढी काळजी आहे’ असे ते नित्य बोलत असतात. ते म्हणतील, ‘तुम्ही आपली उपजिविका साधली पाहिजे.’ तेव्हा लठ्ठ पगाराकरता कॉलेज वा विश्वविद्यालयाचे शिक्षण घेतलेच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. ते असेहि म्हणतील की, ‘लूक हा पवित्र शास्त्राचा लेखक डॉक्टर नव्हता का आणि पौलाला गमलियेल या कायदेपंडिताकडून शिक्षण मिळाले नव्हते का?’ (कलस्सैकरांस ४:१४; प्रे. कृत्ये ५:३४; २२:३) तरीपण या सल्ल्याचे काळजीपूर्वक परिक्षण करुन बघा.
१०. लूक व पौलाने कोणता सल्ला दिला व त्याच्या ख्रिस्ती होण्याआधीच्या कार्यहालचालीबद्दल काय म्हणता येईल?
१० लूक या वैद्याने ख्रिश्चनांना आपल्यासारखे वैद्यकीय ध्येय जोपासावे असे कधीच उत्तेजन दिले नाही; उलटपक्षी, लूकने येशू व त्याच्या प्रेषितांचे जीवन अनुकरणीय या अर्थी सामोरे धरले. तर मग हे स्पष्ट आहे की लूक हा ख्रिस्ताविषयी शिकण्याआधी वैद्य बनला होता पण नंतर त्याने ख्रिस्ती उपाध्यपणाला आपल्या जीवनात प्रधान स्थान दिले. पौलाच्या जीवनात देखील असेच घडले. त्याने जसे गमालियेलचे अनुकरण केले तसेच अनुकरण करावे असे म्हणण्याऐवजी पौल म्हणाला: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.” पौलाने ख्रिस्ताविषयीचे ज्ञान इतके मोलाचे मानले की तो म्हणाला की यापुढे तो त्याने संपादिलेल्या सर्व गोष्टी “केरकचरा अशा लेखतो.”—१ करिंथकरास ११:१; फिलिप्पैकरास ३:८.
११. (अ) पेत्राने येशूला काय म्हटले व का? (ब) येशूने त्याला कसा प्रतिसाद दिला?
११ तुम्हावर प्रीती करणारे भावनाविवश होऊन चुकीचा सल्ला सुध्दा देतील हे आठवणीत ठेवा. जसे की, यरुशलेमातील आपल्या उपाध्यपणात आपणाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागणार हे येशूने सांगितले तेव्हा प्रेषित पेत्राने म्हटलेः “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” पेत्राची येशूवर प्रीती होती व येशूला त्रास होऊ नये असेच त्याला वाटत होते. तरीपण येशूने पेत्राची कानउघाडणी केली कारण त्याला हे ठाऊक होते की देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याने त्रास सहन करणे व शत्रूच्या हातून मरण सोसणे हे अगत्याचे होते.—मत्तय १६:२१-२३.
१२. सदिच्छा बाळगणाऱ्या व्यक्ती युवकांना कदाचित कोणता सल्ला देतील?
१२ याचप्रमाणे काही पालक वा मित्र तुम्हाला स्व-त्यागाचा मार्ग चोखाळण्यापासून निराश करतील. काही अवास्तव भावना राखल्यामुळे ते कदाचित तुम्हाला पूर्ण वेळेचे पायनियर उपाध्यपण पत्करण्यास, मिशनरी या अर्थाने सेवा करण्यास किंवा यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयात स्वयंसेवक या अर्थी काम करण्याविषयीचे उत्तेजन देण्याचे काकू करतील. ते म्हणतीलः ‘अरे लग्न करुन संसारात मग्न हो आणि इथेच कोठेतरी आमच्याजवळ राहा.’ किंवा कदाचित म्हणतीलः ‘बेथेलमध्ये मोठ्या मेहनतीचे काम असते, तुला ते जमायचे नाही. तर तू आमच्याकडेच राहिलास तर ते बरे ठरेल.’ वस्तुतः ही गोष्ट पेत्राने, “आपणावर दया असो,” असे जे म्हटले त्यासारखीच आहे.
१३. (अ) कोणता सुधारित दृष्टीकोन पेत्राने व्यक्त केला? (ब) खरे ख्रिस्ती होण्यामध्ये काय समाविष्ट असते?
१३ यहोवाच्या सेवकांनासुध्दा कधीकाळी आपल्या विचारात सुधारणा करुन घेण्याची जरुरी आहे. पेत्रालाही ती होती व आपला दृष्टीकोण सुधरवून त्याने असे लिहिलेः “ह्याचकरता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरुन तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) खरे ख्रिस्ती जीवन व्यतित करण्यामध्ये स्व-त्यागाची हाक आहे, होय, त्यात त्रासही आहेच. तो सोपा मार्ग नाही परंतु तो असा आहे ज्याकरताच आम्हास ख्रिस्ती या नात्याने पाचारण करण्यात आले आहे. त्याचा स्वीकार करण्यात ‘यापुढे आमच्यासाठी नव्हे तर जो आम्हासाठी मेला त्याकरता जीवन व्यतित करणे’ हे समाविष्ट आहे. (२ करिंथकर ५:१५) आम्ही चांगला नमुना आमच्या दृष्टीपथात ठेवल्यास आम्हाला स्व-त्यागाचे जीवन व्यतित करण्यामध्ये सहाय्य मिळेल.
दृष्टीपथात ठेवण्यासारखा नमुना
१४. येशून कोणते उदाहरण घालून दिले?
१४ जो नमुना तुम्ही खासपणे आपल्या दृष्टीपथात ठेवण्यास हवा तो स्वतः येशूने घालून दिला आहे. तो स्वतः पूर्ण मनुष्य असल्यामुळे, जगात आतापर्यंत कधी निपजला नाही इतका मोठा क्रिडापटु, संगीतकार, वैद्य किंवा वकील बनू शकला असता. परंतु त्याचे लक्ष आपल्या स्वर्गीय पित्याला संतुष्ट करण्याकडे लागून होते. हेच त्याने आपल्या युवकपणात देखील प्रदर्शित केले. (लूक २:४२-४९) त्याने नंतर म्हटलेः “मला . . . देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४३) गेल्या वर्षी मिनिस्ट्री या एका चर्च मासिकात असे स्पष्टीकरण आलेः “आमचा तारणारा प्रभु याने जनसमुहाचा मार्ग धरला नाही तर उलट तो घरोघरी गेला—त्याने जिवांना शोधिले. एकजिवाने ऐकणारा जनसमूह हा त्याचा आनंद होता. तो त्यांच्यात देवाविषयीचे प्रेम हे सत्य भरवीत राहिला.”—लूक १०:१-१६.
१५. (अ) घरोघरचे प्रचारकार्य हे एक आव्हान का आहे? (ब) युवक करीत असलेले घरोघरचे प्रचारकार्य परिणामी ठरत आहे हे कशावरुन दिसते?
१५ घरोघरचे कार्य सोपे नाही हे मान्य आहे. यासाठी राज्याची सुवार्ता हिची, परिश्रमी अभ्यासाद्वारे समज प्राप्त करुन घेतली पाहिजे व शिवाय अर्थभरीत सादरता करण्यासाठी आधीच खूप पूर्वतयारी केली पाहिजे. तसेच, या कार्यात धैर्य लागते कारण बहुतेक घरमालक आस्था दाखवीत नाहीत आणि काही तर अगदीच संतापतात. तरीपण तुम्हा युवकांकरवीचे घरोघरचे प्रचारकार्य हे मोठे यश मिळवीत आहे हे ला वोस या इटालियन धार्मिक मासिकात निरिक्षिले गेले आहे. त्यात लेखक म्हणतोः “मला तर घरी येऊन भेटी देणारे यहोवाचे साक्षीदार व्यक्तीशः आवडतात.” पुढे तो म्हणतोः “ज्यांना मी ओळखतो ते शिष्टाचारप्रिय, मृदु भाषण करणारे चांगले लोक आहेत व त्यात बहुतेक युवक आहेत. सुंदरता व यौवन ही याप्रकाराने सामोरी येतात तेव्हा ती अधिकच प्रिय वाटते.”
१६. (अ) कोणत्या कामास्तव युवकांचे अभिनंदन होण्यास हवे? (ब) पृथ्वीवरील या अत्यंत महत्वाच्या कामाचा उरक करण्याच्या बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांच्या संस्थेची तुलना चर्चसोबत कशी होते?
१६ होय, ख्रिस्ताला आपला आदर्श बनविणाऱ्या तुम्हा युवकांचे खरेच अभिनंदन करावेसे वाटते! केवळ अमेरिकेत २५ वर्षे वयाहूनही कमी वयाचे १२,००० पेक्षा अधिक युवक स्वतःला पायनियर कार्यात गुंतवून आहेत, तर जगात इतरत्र त्यांची संख्या लाखावर गेली आहे. (स्तोत्रसंहिता ११०:३) तुम्ही करीत असलेल्या या कामापेक्षा इतर कोणतेही काम महत्वपूर्ण नाही हे ध्यानात ठेवा. वर नमूद असणाऱ्या चर्च मासिकाचा लेखक पुढे म्हणतोः “देव म्हणतो की अत्यंत महत्वपूर्ण काम हे घरोघरी भेट देण्याचे, जिवांना शोधून काढण्याचे आहे.” पुढे तो म्हणतोः “याबद्दल तुम्ही काय म्हणता? तुम्ही व मी किती भेटी देण्याचे काम करीत आहोत? या प्रकारच्या कामाचा आमच्या उपाध्यपणात इतका उल्लेख झाल्याचे मी पाहिले नाही.” तर मग, येशूने प्रचारकार्याविषयी राखलेल्या उदाहरणावर जोर देऊ करणाऱ्या संस्थेसोबत आपण संलग्न आहोत याची आपल्या कृतज्ञता वाटत नाही का?
१७.यौवनात असताना तीमथ्याने कोणती कामगिरी केली व तो त्यावेळी युवक असावा हे कशामुळे दिसते?
१७ तुम्ही आपल्या जीवनाचे काय करणार ही गोष्ट तुम्हाला ज्याविषयीची आपुलकी वाटते त्यावर अवलंबून असल्यामुळे तीमथ्यी या युवकाने जो आदर्श ठेवला त्याविषयीचेही कौतुक आपणामध्ये उभारा. येशूच्या मृत्युच्या थोड्याच काळानंतर जन्मलेल्या तीमथ्याने आपल्या तारुण्यात आपले घर सोडले व तो प्रेषित पौलासोबत त्याच्या दुसऱ्या सुवार्तिक फेरीत निघाला. काही काळानंतर पौल व सीला यांना जमावाकडून झालेल्या दंग्यामुळे थेस्सलनीका येथून निघून जावे लागले पण त्याआधी त्यांनी तेथे काही शिष्य बनविले होते. (प्रे. कृत्ये १६:१-३; १७:१-१०, १३-१५) यानंतर लागलेच पौलाने तीमथ्याला त्या धोक्याच्या क्षेत्रात परीक्षेत सापडलेल्या शिष्यांना स्थिर करण्यासाठी पाठविले. (१ थेस्सलनीकाकर ३:१-३) तीमथ्यी या वेळेला बहुधा १७ ते १९ वयाचा असावा कारण याच्या १२ ते १४ वर्षांनी सुध्दा पौल त्याच्या “तारुण्या”बद्दल लिहितो. (१ तीमथ्यी ४:१२) तर अशा या स्व-त्यागी व धैर्यवान युवकाचे तुम्हाला कौतुक वाटत नाही का?
१८. पौल तीमथ्याला करिंथकरांकडे का पाठविणार होता?
१८ थेस्सलनीका येथील बांधवांना स्थिर करण्याची नेमणूक तीमथ्याला मिळाल्यावर पाच वर्षांनी पौलाने करिंथकरांना इफिसमधून लिहिलेः “माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुम्हाकडे पाठवीत आहे, . . . मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवितो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपध्दतीची आठवण तो तुम्हास देईल.” (१ करिंथकर ४:१६, १७) तरुण तीमथ्याने पाच वर्षांपासून पौलासोबत काम केल्यामुळे त्याला पौलाची शिक्षणपध्दत चांगली ज्ञात झाली होती. पौलाने इफिसकरांना कसा संदेश प्रचार केला होता व शिवाय त्याने “चार लोकात व घरोघरी” कसे शिक्षण दिले होते ते त्याला माहीत होते. (प्रे. कृत्ये २०:२०, २१) अशाप्रकारे प्रचाराच्या पध्दतीत पूर्ण तालीम मिळाल्यामुळे तीमथ्यी मंडळ्यांना केवढी सुंदर मदत देऊ शकत होता!
१९.पौलाने तीमथ्याबद्दल, त्या दोघांनी एकत्र सेवा आरंभिल्यानंतर दहापेक्षा अधिक वर्षांनी काय म्हटले?
१९ आता आणखी पाच सहा वर्षे जातात व आता पौल रोममध्ये कैदेत आहे. तीमथ्यी, जो नुकताच कैदेतून बाहेर आला आहे तो त्याच्यासोबत आहे. (इब्रीयांस १३:२३) आता ते दृश्य समोर उभे कराः तीमथ्याला सचिव या अर्थाने वापरुन पौल फिलिप्पैकरांस पत्र लिहित आहे. अगदी निश्चयाने पौल हे लिहावयास सांगतोः “तीमथ्याला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभु येशूमध्ये आशा आहे. तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. . . . त्याचे शील तुम्हाला माहीतच आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.”—फिलिप्पैकरांस १:१; २:१९-२२.
२०. तीमथ्यी कशामुळे युवकांसाठी एक कौतुकास्पद आदर्श ठरतो?
२० होय, तरुण तीमथ्यीचे उदाहरण कौतुकास्पद आहे. तो इतका भरवशाचा, विश्वासू असा पौलाचा सोबती होता, त्याच्याबरोबर तो चांगल्या व कठीण काळातही साथ देत राहिला, प्रचाराच्या कामात सोबत दिली आणि जेथे कोठे त्याला पाठविले गेले तेथे तो स्वेच्छेने गेला. घरच्या सर्वसाधारण जीवनाचा त्याने त्याग केला, पण देवाच्या सेवेत राहिल्यामुळे त्याचे जीवन किती समाधानाने व आनंदाने भरुन गेले! होय, तीमथ्यी खऱ्या अर्थाने ‘स्वतःसाठी नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला त्या ख्रिस्तासाठी तो जगला.’ (२ करिंथकर ५:१५) त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यासाठी तुम्हाला हवी असणारी चालना मिळाली का?
देवाच्या नव्या जगासाठी जगा
२१. तीमथ्यी हा आध्यात्मिक विचारांनी भारावलेला होता असे आपण का म्हणू शकतो?
२१ अशाप्रकारे तीमथ्यी हा खरेपणाने देवाच्या नव्या जगासाठी जगत होता. त्याचा या कार्यात थोडे काही करण्याचा विचार नव्हता तर दीर्घकालीन परिणाम प्राप्त करण्यासाठी तो आपले संपूर्ण जीवन वापरीत होता. (मत्तय ६:१९-२१) तीमथ्याचा बाप ग्रीक होता व तो विश्वास राखणारा नव्हता त्यामुळे त्याने तीमथ्याला उच्च शिक्षण घेण्याचे व जागतिक ध्येय जोपासण्याचे आर्जविले असेल. तरीपण त्याला आपल्या आई व आजीकडून इश्वरी शिक्षण मिळाले होते त्यामुळे तीमथ्याचे जीवन ख्रिस्ती मंडळीसोबत गुंफले गेले. त्याने आध्यात्मिक आस्था जोपासली, काही काळ एकटे असण्याचे पसंद केले असावे की ज्यामुळे प्रेषित पौलाची सेवा करण्यासाठी तो स्वतःला सिध्द करु शकला.—२ तीमथ्यी १:५.
२२. तीमथ्याने जे जीवनाक्रमण पत्करले होते त्याचप्रमाणे आजच्या युवकांनीही ते घ्यावे हे स्कूल माहितीपत्रक कसे ठळकपणे सांगते?
२२ आता तुम्हाविषयी काय? तुम्ही आपले तारुण्य तीमथ्याने जसे वापरले तसे घालवाल का? स्कूल ॲण्ड जेहोवास् विटनेसेस हे माहितीपत्रक अशाच प्रकारच्या जीवनाक्रमणाचा उल्लेख करीत होते जेव्हा त्यात युवक साक्षीदारांबद्दल असे म्हणण्यात आलेः “जीवनातील त्यांचे प्रमुख ध्येय देवाचे उपाध्याय याअर्थी सेवा करणे हे आहे. या ध्येयाची पूर्ति करण्यासाठी शाळेतील शिक्षण साहाय्यक आहे असे ते मानतात. याकरताच ते अशा शिक्षणक्रमाला निवडतात की ज्याकरवी त्याचा आजच्या जगात स्वतःच्या उपजिविकेसाठी काही आधार मिळू शकेल. यामुळेच पुष्कळजण व्यावसायिक शिक्षण घेतात वा अशा व्यावसायिक शाळांना जातात. शाळेचा शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर ते कामाचा शोध घेतात की जे त्यांना त्यांचा प्रमुख व महत्वपूर्ण व्यवसाय ख्रिस्ती उपाध्यपणावर लक्ष देण्यात मदत करु शकेल.”
२३. ख्रिस्ती युवकांना, मी माझ्या जीवनाचे काय करणार, या प्रश्नाचे उत्तर देणे का कठीण वाटू नये?
२३ यहोवा देव व त्याचा पुत्र यांनी तुम्हासाठी जे केले त्याविषयीची रसिकता असणाऱ्या तुम्हा युवकांसाठी, मी माझ्या जीवनाचे काय करणार, या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण वाटता कामा नये. स्वतःसाठी व आपल्या सुखोपभोगासाठी जीवन व्यतित करण्यापेक्षा तुम्ही ते देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी व्यतित कराल. तीमथ्याप्रमाणे तुम्हीही आध्यात्मिक व्यक्ती असे राहाल.
उजळणीसाठी प्रश्न
▫ खरे ख्रिस्ती आपल्या जीवनात जागतिक ध्येये का पुढे ठेवीत नाहीत?
▫ काहींनी कोणता दोषयुक्त सल्ला दिला तरीपण येशूने पेत्राला जे उत्तर दिले त्याकडून आम्ही काय शिकतो?
▫ येशू व तीमथ्य यांनी कशाप्रकारे युवकांसाठी उत्तम आदर्श ठेवला?
▫ आध्यात्मिक मनाचे असण्यात कशाकशाचा समावेश असतो?
[२४ पानांवरील चित्रं]
लूक हा प्रशिक्षित वैद्य होता तरी त्याने ख्रिस्ती ध्येयांना आपल्या जीवनात प्राधान्य दिले