तुम्ही यहोवाच्या संस्थेसोबत एकेकाळी सहवास राखून होता का?
त्या तरुणाला खूप लाजल्यासारखे व भयंकर अपमानित झाल्यासारखे वाटले. आता मळके झालेले व फाटलेले त्याचे कपडे तो एकेकाळी किती सुंदर व ऐटीची वस्त्रे घालीत होता याचा प्रत्यय देत होते. पण आता मात्र त्याची किती दयनीय अवस्था झाली आहे ते दिसत होते. त्याचे मन दुरवर असलेल्या त्याच्या घरी लागलेले होते त्यामुळे तो व्यतित करीत असलेल्या ओंगळ जीवनाचा तसेच त्याने स्वतःपाशी असलेली सर्व धनसंपत्ती ज्या पद्धतीने उधळली होती त्याचा त्याला वीट वाटू लागला होता. त्याचे रिते असणारे पोट त्याला अधिकच बेचैन करीत होते व त्याला आपल्या घरची सारखी ओढ वाटू लागली होतील. आपल्या बापाच्या घरचे चाकर देखील मोठ्या ऐषारामात राहात आहेत ही जाणीव एकाएकी त्याला चाटून गेली. निदान त्यांच्यासारखी स्थिती जरी मिळाली तर केवढे चांगले असेल असे त्याला राहून राहून वाटायला लागले.
पण आपण घरी परतलोच तर बापाकडून कोणती वागणूक आपल्याला मिळणार? आपले स्वागत कसे होईल? अशी ती साशंकता वाटत होती. खरे म्हणजे बापाने दाखविलेल्या ममतेला डावलून त्याने घरातून बाहेर पडून जी लज्जास्पद वर्तणूक दाखविली होती त्यामुळे त्याला घरात परत घेण्याचेच काय पण दारातहि उभे केले जाईल ही क्वचित अशी गोष्टी वाटत होती. तरीपण त्याच्या मनात व अंतःकरणात हे सारखे वाटायला लागले होते: मला घरी गेलेच पाहिजे.
बापाला आपल्याबद्दल काय वाटत असावे याची या तरुणाला मुळी कल्पनाच नव्हती. तो घरी परत येत असता केवढ्या अचंबित करणाऱ्या गोष्टी घडल्या! “तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.”—लूक १५:२०.
या उधळ्या पुत्राप्रमाणे तुम्हीही तुमचे घर सोडले आहे का? तुम्हीही तुमचा पिता यहोवा व त्याच्या संस्थेपासून दूर निघून गेला आहात का? तर आता तुमची परत येण्याची इच्छा आहे का?
जे यहोवाच्या संस्थेपासून दुरावले आहेत त्या बहुतेकांची स्थिती उधळ्या पुत्राप्रमाणे नव्हती. काहींच्या बाबतीत तर ते हळूवारपणे दूर जात राहाणे—जशी एखादी होडी किनाऱ्यापासून हळू हळू वाहवत जाते—तसे घडले. काही तर आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक समस्या व आजार यांच्या भाराखाली दबले गेले आणि काहीतर या जगात “जितके सरसावता येईल” त्याकडे झुकले गेल्यामुळे आध्यात्मिक गोष्टींना तर वावच मिळू शकला नाही. काहींनी आपल्याला ख्रिस्ती मंडळीसोबत सहवास राखणाऱ्या काही विशिष्ठांकरवी अडखळवू दिले तर काहींना यहोवाच्या संस्थेने एखाद्या शास्त्रवचनीय मुद्यासंबंधाने जे धोरण सांगितले होते ते न पटल्यामुळे ते निघून गेले. तेच काहींच्या बाबतीत त्यांनी अपेक्षिलेल्या वेळी सद्य व्यवस्थीकरण संपुष्टात आले नाही म्हणून निराश होऊन ते दूर झाले.
यहोवाच्या संस्थेसोबत सहवास न राखणाऱ्यांपैकी तुम्ही आहात तर वर नमूद असणाऱ्या कारणांपैकीचे एक तुमच्या परिस्थितीशी जुळणारे असू शकेल. तथापि कारण कोणतेही असले तरी आता परत येण्याचा विचार करण्याची ही वेळ नाही का?—मत्तय १८:१२-१४.
तुम्ही अडखळला होता का?
मानवजात पूर्णत्वापासून किती दूर गेली आहे हे लक्षात घेता अधूनमधून भिन्न व्यक्तिमत्व आपसात ठकरा घेत राहील याची अपेक्षा करता येईल. यामुळेच काहीजण अडखळले. काहीजणांना ज्या विशिष्ठाबद्दल मोठा आदर वाटत होता तोच काही निष्ठुर वा शिस्तेत्तर मार्गाने हालचाल करीत असल्याचे वा काही अपराधात सापडल्याचे त्यांनी बघितले तेव्हा ते अडखळले.
हे तुमच्याबाबतीत घडले आहे का? अडखळण्याचे कारण कोणतेही असो, पण यहोवा स्वतः ते अडखळण्याचे कारण नव्हता हे लक्षात आणा. (पडताळा गलतीकर ५:७, ८.) तर मग इतरांनी काही केले म्हणून आम्ही देवासोबत आपले नातेसंबंध तोडून टाकावेत हे वाजवी कारण आहे का? उलटपक्षी, आपण त्याची विश्वासूपणे सेवा करू नये का व जे काही चालले आहे त्याची यहोवाला माहिती आहे व तो आम्हासोबत प्रेमळपणे व्यवहार राखील असा आत्मविश्वास आपल्याला वाटू नये का?—कलस्सैकरांस ३:२३-२५.
काळ निघून गेल्यावर काहींना असे आढळून आले आहे की ते आधी ज्याकरवी अडखळले होते ते आता तितके महत्वाचे राहिले नाही किंवा ते आता अस्तित्वातच नाही. किंवा शांतपणे बसून स्वतःचे आत्मपरिक्षण करण्याद्वारे त्यांना हे कळून चुकले की चूक ही त्यांचीच होती. ही गोष्ट जेव्हा एखादा, त्याला दिलेली सूचना अवमानतो वा त्याजविषयी अडखळतो तेव्हा घडत असते. मागे झालेल्या गोष्टींचे अवलोकन केल्यावर त्याला आता जाणीव होते की ती शिस्त खऱ्या प्रेमाने व त्याच्या भल्यासाठी लावण्यात आली होती. (इब्रीयांस १२:५-११) तर मग प्रेषित पौलाच्या सूचनेनुरूप हालचाल करणे किती योग्य आहे! त्याने म्हटले: “तुमचे लोंबकळणारे हात व लटपणणारे गुडघे सरळ करा, आणि आपले पाय इतरत्र भटकू देऊ नका. अशामुळे सांधा उखळू शकणार नाही तर त्याला पुनरपी शक्ती मिळू शकेल.”—इब्रीयांस १२:१२, १३, द न्यू इंग्लीश बायबल.
एखादे तत्व तुम्हाला पटले नव्हते का?
तुमची एखाद्या शास्त्रवचनीय मुद्याबद्दल वेगळी समज होती व त्यामुळे कदाचित तुम्ही योहावाच्या संस्थेसोबतचा सहवास सोडला असावा. इस्राएलांची मिसरातून सुटका झाल्यावर ते जसे त्यांच्याखातर करण्यात आलेली “[देवाची] कृत्ये लवकरच विसरले” आणि “त्याच्या सूचनेविषयी त्यांनी धीर धरला नाही” त्याचप्रमाणे तुम्ही बरोबर आहे असा गृहीत धरलेला विचार संस्था ग्राह्य मानीत नाही असे अगदी उतावळीने स्वतःला वाटून देऊन आपण संबंध तोडणे बरे असे तुम्हाला वाटले असावे. (स्तोत्रसंहिता १०६:१३) तो मुद्दा त्यानंतर कदाचित एकतर बदलला असावा वा देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे केलेल्या अधिक मननशील शास्त्रवचनीय संशोधनाने अधिक स्पष्ट केला गेला असावा. तर मग यहोवाच्या संस्थेसोबत थोडा अधिक काळ टिकून राहणे व यहोवाची वाट पाहणे अधिक चांगले झाले नसते का?
यहोवाने केवळ एकाच संस्थेकरवी आपली कार्यसिद्धी केली आहे हे लक्षात ठेवणे बरे. आमच्या काळी, “विश्वासू व बुद्धीमान दास” आध्यात्मिक अन्नाचे वाटप “यथाकाळी” करीत आहे. हा दास ‘मसीहा परत येईल त्यावेळी आढळणार होता’ हे लक्षात घ्या. (मत्तय २४:४५-४७) तर मग, आता धनी परतलेला आहे हे खरेपणाने कोण ओळखून आहे बरे? तसेच जे कार्य होईल असे सांगितले गेले आहे ते कोण करीत आहे? जे ख्रिस्ती साक्षीदार असणाऱ्या यहोवाच्या संस्थेसोबत राखून आहेत तेच ते करीत आहेत.
इतर लोक येशूला सोडून गेले तेव्हा प्रेषित पेत्र म्हणाला: “प्रभुजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.” येशू हाच मसीहा होता हे पेत्राला खात्रीने माहीत होते. त्यामुळेच जेव्हा कित्येक शिष्यांना येशूने उद्गारिलेली काही वचने विचित्र वाटली, तेव्हा “सार्वकालिक जीवनाची वचने” ज्याच्यापाशी आहेत त्याला सोडून जाणे हे मूर्खपणाचे आहे असे पेत्राने ताडले होते. काही काळातच काही संशय वा गैरसमजूती काढून टाकण्यात येणार होत्या. (योहान ६:५१-५८; पडताळा लूक २४:२७, ३२.) हीच परिस्थिती, यहोवा सत्याच्या मार्गात आपल्या सेवकांचे प्रगतिशीलरित्या मार्गदर्शन करीत असता तशीच आहे.—नीतीसूत्रे ४:१८.
आता परत या
“चला आपण आपले मार्ग शोधू व तपासू, आणि यहोवाकडे परत जाऊ,” असे यिर्मया संदेष्ट्याने काकुळतीने म्हटले. (विलापगीत ३:४०) तरीपण काही जण, मंडळीतील लोकांकडून हवा तेवढा प्रतिसाद कदाचित मिळणार नाही या भीतीने काकू करतील. पण जेव्हा उधळ्या पुत्र घरी परतला तेव्हा कोणता प्रतिसाद दिसला? “[आपल्याला] उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे,” असे त्याचा बाप म्हणाला, “कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो आता सापडला आहे.” (लूक १५:३२) याचप्रमाणे जे यहोवाकडे त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा धरून प्रामाणिकपणे त्याच्याकडे ‘परततात’ अशांना असेच उबदार स्वागत होण्याची वाट पाहिली जात आहे.—पडताळा लूक १५:७.
पण ख्रिस्ती मंडळी ही नुसते बसून हे लोक ‘घरी परत कधी येतील’ व त्यांचे स्वागत कसे करता येतील याकरता वाट बघत बसलेली नाही. येशूने दिलेल्या दाखल्यात, पिता हा स्वतः “तो (पुत्र) दूर आहे तोच” धावत गेला व त्याला भेटला. याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदार देखील जे एकेकाळी सहवास ठेवून होते त्यांना शोधून अशांना यहोवाच्या संस्थेकडे परतण्यात मदत करण्याचे व्यक्तीगत कर्तव्य मानतात.
पण समजा एखादा यहोवाच्या संस्थेपासून अलिप्त असताना त्याच्या हातून गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक घडली आहे तर काय? किंवा कोणास गंभीर पातक केल्यामुळे देवाच्या लोकांच्या सहवासातून काढून टाकण्यात आले होते पण तेव्हापासून त्याने ती अख्रिस्ती वागणूक सोडून टाकली असेल तर काय? अशावेळी त्या विशिष्ठाने यहोवाबरोबर आपले संबंध ठीक करावे म्हणून काय करावे लागेल याची वडीलजण त्याला दयाळू व प्रेमळ मार्गाने मदत देतील. तद्वत, ज्याला परत येण्याची व देवाच्या इच्छेप्रमाणे आपले जीवन व्यतित करण्याची इच्छा आहे त्याने आपली इच्छा वडीलांना कळवावी. “चला या, आपण बुद्धीवाद करू,” असे यहोवा म्हणतो, “तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखी पांढरी होतील.”—यशया १:१८.
आमचा स्वर्गीय पिता केवढा दयावंत, उबदार व प्रेमळ आहे! शिवाय तो केवढा सहनशील व आम्हा प्रत्येकाच्या बाबतीत वैयक्तीकरित्या रस बाळगून आहे! आम्ही या दुष्ट व्यवस्थीकरणासोबत नष्ट होऊ नये असे त्याला मनोमन वाटते. (२ पेत्र ३:९) यहोवानेच आपल्या प्राचीन लोकांना हे म्हटले होते: “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.” हेच निमंत्रण तो आजही देत आहे.—मलाखी ३:७.
वेळ आता निघून जात आहे त्यामुळे उशीर करू नका. यहोवाच्या लोकांसोबत एकत्र मिळून, ‘देवाचे शास्त्र प्रिय मानणाऱ्यांना [जी] शांती असते’ तिचा आनंद परत घ्या. कारण, “त्यांना अडखळण्याचे कारण नाही,” असे स्तोत्रकर्त्याने म्हटले. (स्तोत्रसंहिता ११९:१६५) तुम्ही यहोवाच्या शास्त्राविषयी अंतःकरणात खोलवर प्रीती राखून आहात का? तुम्ही यहोवाचे समर्पित सेवक आहात तर याकरताच तुम्ही स्वतःचे समर्पण केले होते. यहोवासोबत परत नातेसंबंध प्रस्थापिणे यापेक्षा इतर काहीही—होय, इतर कोणतीही गोष्ट—महत्वपूर्ण नाही. त्याच्याकडे आपली पाठ फिरवू नका. ही गोष्ट काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वकतेने विचारात घ्या. तुम्हाला यहोवाच्या लोकांसोबतचे ऐक्य व उबदारपणा हा चुकल्यासारखा वाटत आहे तर यहोवाच्या संस्थेकडे परतण्यास अजून उशीर झालेला नाही. विलंब न लावता परत या.