वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ११/१ पृ. ३०-३२
  • “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे दयावन्त व्यवहार
  • अडथळ्याची कारणे
  • तुम्ही यहोवाच्या निमंत्रणास प्रतिसाद द्याल का?
  • मागे वळण्यास मदत केली
  • तुम्ही यहोवाच्या संस्थेसोबत एकेकाळी सहवास राखून होता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • लवकरात लवकर परतण्यास त्यांना साहाय्य करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • “माझ्याकडे परत या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • आपल्या मेंढपाळाकडं व जिवाचं रक्षण करणाऱ्‍याकडं परत या
    यहोवाकडं परत या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ११/१ पृ. ३०-३२

“मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन”

तेकुटुंब वनातील सहलीचा आनंद घेत होते. मग, पीटर, त्यांच्यातील धाकटा, टेकडीवरून एका खारीचा पाठलाग करत हरवून गेला. अचानक आकाश ढगांनी भरून आले, आणि पाऊस पडू लागला. पहिल्यांदा भुरभुरसा होता, पण हळूहळू जोराने वर्षाव होऊ लागला. त्या कुटुंबाने घाईघाईने त्यांचे सामान गोळा केले व त्यांच्या वाहानात जाऊन बसले. सर्वजण पीटर कोठे गेला याचा विचार करू लागले.

इकडे, पीटर, पुन्हा कुटुंबाकडे जाण्याचा प्रयत्न करीत होता. पुढे काय आहे ते पाहण्यास फार कठीण झाले होते, टेकडीवरची पायवाट पावसामुळे घसरडी झाली होती. अनपेक्षितपणे, त्याच्या पाया खालची जमीन नाहीशी होऊन, तो एका खोल, न दिसणाऱ्‍या खड्ड्यात पडला. त्याने वर यायचा प्रयत्न केला पण त्या खड्ड्याच्या कडा फारच घसरट झाल्या होत्या.

टेकडीवरून खाली पावसाचे पाणी त्या खड्ड्यात मातीसकट भरत गेले. पीटर बुडण्याच्या खरोखर धोक्यात होता. पण मग त्याच्या वडीलांना तो सापडला व त्यांनी त्याला दोराच्या सहाय्याने बाहेर काढले. नंतर पीटरला त्याच्या अशा भटकण्यामुळे कडक दटावणी मिळाली. तरी, ब्लँकेट मध्ये गुंडाळून त्याच्या आईच्या काखेत बसल्यावर त्याला ती दटावणी फार सोपी वाटली.

हा अनुभव, जे देवाच्या लोकांमधले आधी होते अशा लोकांना खूप चांगल्या रीतीने चित्रित करतो. ते ह्‍या युगाच्या व्यवस्थेच्या खोल खड्ड्यात पडले आहेत व त्यातून बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न करीत यहोवाच्या संस्थेच्या आश्रयस्थानाखाली परतत आहेत. हे जाणणे किती सुखदायक आहे की यहोवा दयावन्त आहे व ‘दोर खाली सोडून’ त्यांना सुरक्षिततेकडे येऊ देण्यास तयारी दर्शवितो!

यहोवाचे दयावन्त व्यवहार

मागे इस्त्राएलाच्या दिवसांत, मंदिराच्या बांधकामाच्या समाप्तिला, शलमोनाने यहोवास सर्मपणाची प्रार्थना केली की मंदिराकडे तोंड करून केलेल्या सर्व विनंत्या त्याने ऐकाव्यात. त्याने पुढे असे म्हटले: “त्यांनी तुजविरुध्द पाप केले, (कारण पाप करीत नाही असा कोणीच नाही,) व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांस त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले, . . . तेथे ते विचार करतील आणि आपणाला पाडाव करून नेणाऱ्‍या लोकांच्या देशात तुजकडे वळून तुझी विनवणी करतील, . . . तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक, त्यास न्याय दे.”—१ राजे ८:४६-४९.

इस्त्राएलांच्या इतिहासात पुष्कळ वेळा शलमोनाची विनंती पूर्ण झाली. पुष्कळ वेळा देवाचे लोक त्याच्यापासून दूर गेले व त्याचा त्यागही केला. पण मग त्यांनी त्यांच्या केलेल्या चुका जाणल्या व पुन्हा देवाचा शोध करू लागले. आणि यहोवाने त्यांना क्षमा केली. (अनुवाद ४:३१; यशया ४४:२१, २२; २ करिंथ १:३; याकोब ५:११) मलाखीद्वारे, यहोवाने त्याच्या लोकांसोबतचे हजार वर्षांचे व्यवहार थोडक्यात सांगितले जेव्हा तो म्हणाला: “तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधि तुम्ही मोडिले, ते पाळले नाहीत. मजकडे वळा म्हणजे मी तुम्हांकडे वळेन.”—मलाखी ३:७.

अडथळ्याची कारणे

त्या इस्त्राएलांसारखे, पुष्कळ देवाचे लोक आज बाजूला सरले आहेत व यहोवाच्या संस्थेपासून स्वत:ला वेगळे केले आहे. का? जसे पीटर खारीच्या मागे लागला, तसेच काहीजण अशा गोष्टींच्या मागे लागतात ज्या पहिल्यांदा फार साध्या वाटतात. असेच अदा नावाच्या स्त्रीचे झाले. ती सांगते: “सर्व कार्मचाऱ्‍यांनी मिळून दुपारच्या जेवणाला जवळपासच्या उपहारगृहात जायची रीत होती. तर जेव्हा त्यांनी मला दिवसाच्या शेवटी कॉफीचा एक कप पिण्यास आमंत्रण दिले तेव्हा ते स्वीकारण्यास फार सोपे होते. मी विचार केला की सभांना व क्षेत्रकार्यासाठी जो वेळ खर्च करायचा आहे तो मी करत नाही. १ करिंथकर १५:३३ मधील तत्वाचे अवलंबन करण्यात मागे पडेन हे मी ओळखलेच नाही.

“लवकरच मी शनिवारच्या दिवशी त्यांच्यासोबत घोडदौड करायला जाऊ लागले. मग मी चित्रपटांना व नाटकांना त्यांच्यासोबत जाऊ लागले. ह्‍यामुळे माझ्या काही सभा चुकल्या. आणि शेवटी, मी एकाही सभेला गेले नाही, वा क्षेत्रकार्यात भाग घेतला. मला कळायच्या आत, माझा संस्थेशी काहीच संबंध राहिला नव्हता.”

काहींच्या बाबतीत, त्यांचे कारण असे असू शकेल, की त्यांनी कोणते तरी गंभीर गुप्त पाप केले असेल, व त्यामुळे त्यांना वाटत असेल आता ते देवाची सेवा करण्यास अपात्र आहेत. (स्तोत्रसंहिता ३२:३-५) किंवा एखाद्याला कदाचित ख्रिस्ती सोबत्याच्या काही बोलण्यामुळे व कामामुळे ठोकर बसली असेल, शलमोनाने जे म्हटले ते त्यांच्या लक्षात आले नसेल की “पाप करीत नाही असा कोणीच नाही.”—१ राजे ८:४६; याकोब ३:२.

इतर काहींना शिक्षा होते तेव्हा ते निराश होतात (इब्री १२:७, ११) पुष्कळांनी भौतिक-वादाच्या जीवन-शैलीच्या आकर्षणामुळे देवाची सेवा करण्याचे थांबविले आहे. नेहमी असे होते की, काही जगीक यश मिळण्याच्या शोधात, लौकिक कामात पूर्णपणे गढून गेल्याने, त्यांच्या जीवनात देवासाठी काहीच वेळ राहत नाही. (मत्तय १३:४-९; १ तीमथ्य ६:९, १०) अशा लोकांची अवस्था आशाहीन आहे का?

तुम्ही यहोवाच्या निमंत्रणास प्रतिसाद द्याल का?

एके प्रसंगी येशू काही तरी बोलला जे समजण्यास अवघड होते व त्यामुळे पुष्कळ जण अडखळले. अहवाल सांगतो: “यावरून त्याच्या शिष्यांतील पुष्कळ जण परत गेले, ते पुन: कधी त्याजबरोबर चालले नाहीत.” पण सर्वच अडखळले नाहीत. पवित्र शास्त्र अहवाल पुढे सांगतो: “यास्तव येशू बारा शिष्यांस म्हणाला, ‘तुम्हालाही निघून जाण्याची इच्छा आहे का?’ शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, ‘प्रभुजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत.’” (योहान ६:६६-६८) येशूच्या शिष्यांनी हे बुध्दिमानीने ओळखले होते की येशूला सोडून जाणे अर्नथकारी ठरेल.

काही जे बाहेर पडले, सरतेशेवटी ह्‍याच समाप्तिला आले. त्यांनी ओळखले की जीवनाकडे नेणारी वचने फक्‍त यहोवा व येशूकडेच मिळतील व देवाच्या संस्थेला सोडून जाण्याचे एक अनर्थकारी पाऊल त्यांनी उचलले होते. एकदा त्यांना याची जाणीव झाल्यावर हे स्पष्टपणे ओळखले पाहिजे की त्यांना फेरविचार करण्यास अजूनही उशीर झालेला नाही, ते यहोवाकडे पुन्हा वळू शकतात व क्षमा मागू शकतात. स्वत: यहोवा देवाने हे आमंत्रण दिले: “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.”—मलाखी ३:७.

खरच, यहोवा देवाच्या सेवेशिवाय एका प्रामाणिक ख्रिश्‍चनाला आणखी कोठे आनंद मिळू शकतो? जर एक व्यक्‍ति काही काळासाठी देवाच्या संस्थेचा एक भाग होता, पण तो तिच्यापासून दूरावलेला आहे, तर आता बाहेरील जगात त्याच्यासाठी काय राखून ठेविले आहे? त्याला आता जाणवेल की तो एका अतिहिंसक जगाचा भाग बनला आहे. तो स्वत:ला अशा युगाच्या व्यवस्थेत गुरफटून गेलेला पाहील की जिथे दांभिकपणा, खोटेपणा, अप्रामाणिकता व अनैतिकता भरली आहे, व जसे लहान पीटरच्या जीवाला तो मातीचा खड्डा फार घातक होता तसेच हे जगही घातक व कटु आहे. जेव्हा ही व्यक्‍ति शुध्दिवर येते व जाणते की त्याचे अनंतकालीक जीवन धोक्यात आहे, तर त्याने त्या परिस्थीतून स्वत:ला मुक्‍त करण्यात वेळ दवडता कामा नये तरी, असे परतणे ऐवढे सोपे नाही.

तुम्ही यहोवाकडे पुन्हा वळण्याचा प्रयत्न केलात, पण तसे करण्यास कठीण वाटले आहे का? मग हे जाणा की तुम्हाला मदतीची गरज आहे. आणि विश्‍वास करा की देवाच्या संस्थेतील तुमचे बंधू व भगिणी तुम्हाला मदत करण्यास तयार आहेत. पण तुम्हाला तुमची इच्छा यहोवाला दाखवण्याचे कष्ट घेतले पाहिजेत. ‘विचार करण्याची’ व ‘यहोवाकडे वळण्याची’ हीच वेळ आहे.—१ राजे ८:४७.

मागे वळण्यास मदत केली

अदा पुढे सांगते की कोणाच्या साहाय्याने ती यहोवाकडे वळू शकली: “अगदी योग्य वेळी, ज्या भगिणीने माझा शास्त्राभ्यास घेतला होता, तिने मला एका विभागीय संम्मेलनाला येण्याचे आमंत्रण दिले. ती किती प्रेमळ होती! तिने माझी मुळीच निंदा केली नाही! तिने मला खूप प्रेम दाखवले. माझी शेवटची सभा करुन आता मला एक वर्ष झाले आहे, पण मी जगाच्या निरर्थक गोष्टींचे मनन करीत होते, आणि हे सत्य आहे की ह्‍या बाहेरुन झगझगणाऱ्‍या गोष्टींच्या मागे फक्‍त दुख:, निष्फळता, आणि अनैतिकताच आहे. म्हणून मी त्या संमेलनाला उपस्थित राहण्याचे ठरविले. तिथे गेल्यावर मी एकदम शेवटल्या रांगेत गेले, व अंधारात स्वत:ला लपवले. माझी इच्छा नव्हती की कोणा बांधवाने मला पाहावे व प्रश्‍न विचारावेत.

“तथापि, त्या कार्यक्रमामध्ये मला अतिशय जरूरीचा सल्ला दिला गेला. कार्यक्रम समाप्त झाल्यावर मी निश्‍चय केला की मी फक्‍त यहोवाच्या लोकांकडेच परतणार नाही तर संपूर्ण हृदयाने त्याची सेवा करण्यास वाहून घेईन. बांधवांनी माझे प्रेमळपणे स्वागत केले आणि मी ‘उधळी’ परतले.” (लूक १५:११-२४) हे सर्व काही वर्षांपूवी घडले होते आणि आता अदा पंचवीस वर्षांपासून अधीक काळ पूर्ण वेळेच्या सेवेत आहे.

असेच एक उदाहरण दुसऱ्‍या एका व्यक्‍तिचे आहे जो सत्यापासून भटकला होता भटकला होता, पण नंतर त्याचा परिणाम आनंदात झाला. काही वडीलांनी जोस याला दिलेल्या सल्ल्‌यात पवित्र शास्त्रीय तत्वांपेक्षा त्यांची विचार सरणी प्रवर्तित झाल्याचे वाटले. ह्‍यामुळे जोस निरूत्साही झाला व चिडला देखील, आणि शेवटी अक्रियाक बनला. तो आठ वर्षे देवाच्या लोकांपासून वेगळा होता आणि त्या वेळेत त्याने एका विश्‍वासहीन व्यक्‍ति बरोबर लग्न केले, लेकरांचा पिताही झाला, शिवाय एकाला तर कॅथोलिक चर्च मध्ये बाप्तिस्मा घेण्यास परवानगीही दिली होती.

शेवटी, त्याला मदत दिली गेली. फिरत्या देखरेख्याने मेंढपाळकत्वाच्या भेटी त्याज सोबत घेतल्या व वडिलांनी सुध्दा असेच करावे म्हणून त्यांना उत्तेजन दिले. तो पुन: येऊ लागला व हे पाहून आनंदी झाला की त्याच्या बायकोने सत्याबद्दल आस्था दाखवली. जोस आता सध्या, एका मंडळीत वडील म्हणून काम करीत आहे. हे दोन अनुभव दाखवतात की, जे यहोवाच्या प्रेमळ आमंत्रणास प्रतिसाद देतात अशांना तो आशिर्वाद देण्यास माघार घेत नाही.

जर ह्‍या आशीर्वादांचा आनंद लुटायचा आहे, तर जी मदत त्या व्यक्‍तिला दिली गेली, त्याबद्दल त्याने गुणग्राहकता दाखवली पाहिजे व त्यानुसार वागलेही पाहिजे. बहुतेक मंडळ्यांमध्ये जे अक्रियाक झाले होते अशांना बांधवांनी भेटी दिल्या व मदत केली, हे ते विसरले नाहीत. अशा मदतीला प्रतिसाद देणे म्हणजे यहोवा देवाच्या दयेला गुणग्राहकता दाखवणे.—याकोब ५:१९, २०.

हे खरे आहे की, “माझ्याकडे वळा” या देवाच्या आमंत्रणास प्रतिसाद देण्याची हीच वेळ आहे. (मलाखी ३:७; यशया १:१८) आता जास्त वेळ घालवू नका. जागतिक घटना विलक्षण वेगाने घडत आहेत. आमच्यासमोर असलेल्या वादळाच्या वेळेस सर्वात उत्तम सुरक्षिततेची जागा म्हणजे यहोवाची संस्था, जिथे आपण त्याच्या संरक्षणाखाली राहू. जे फक्‍त यहोवाचा आश्रय घेतात, त्यांना त्याच्या क्रोधाच्या दिवसापासून वाचविले जाण्याची दृढ आशा आहे.—सफन्याह २:२, ३.

[३२ पानांवरील चित्रं]

‘माझ्याकडे वळा’ या यहोवाच्या आमंत्रणास तुम्ही प्रतिसाद द्याल का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा