वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 १०/१ पृ. ३-४
  • खऱ्‍या मित्रांचा शोध

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खऱ्‍या मित्रांचा शोध
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सर्वच “मित्र” खरे मित्र नाहीत
  • निवडक असा
  • विचार करून मित्र निवडा!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • आपण चांगल्या मित्रांची निवड कशी करू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२२-२०२३ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलन कार्यक्रम
  • तुम्हाला मित्र बनवायचेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 १०/१ पृ. ३-४

खऱ्‍या मित्रांचा शोध

एक तरुण मनुष्य मोटारसायकलीच्या अपघातात जबर जखमी झाला होता. तो कित्येक आठवडे बेशुध्दावस्थेत होता व नंतर सावकाशरित्या शुध्दीवर येऊ लागला. “मला माझे जेवढे परिचित आहेत तितकेच चांगले मित्र असते तर मी नक्कीच लवकर बरा झालो असतो,” असे तो म्हणाला. ‘माझा अपघात होण्याआधी बरेच मित्र मला सोडून गेले. चांगले मित्र नेहमीच रोगनिवारक ठरतात.’

अशी ही परिस्थिती आजच्या मित्रत्व न दाखवणाऱ्‍या जगात लक्षणीय बनली आहे. सर्व काही चांगले चालले असते तेव्हा मित्रांचा महापूर असतो. पण एखादी आपत्ती ओढावते तेव्हा ते पळून जातात. खरे मित्र आढळणे हे बरेच कठीण असते.

तरीपण, एक किंवा दोन खरे, जिवापाड असणारे मित्र जीवनात मोठाच बदल करतात. या विषयावरील जाणकार म्हणतातः “अधिक व्यक्‍तिगत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावे ही आजच्या काळाची अत्यंत निकड आहे.” जशी एक जुनी इंग्रजी म्हण म्हणते त्याप्रमाणे, ‘गरजेच्या वेळी मिळणारा मित्र खराच मित्र असतो.’

एक काळ असा होता जेव्हा लोक इतरांबद्दल काळजी व्यक्‍त करीत होते आणि आपल्या मित्रांना व शेजाऱ्‍यांना मदत करण्याची इच्छा राखून होते. परंतु पहिल्या महायुध्दाच्या काळाने असा काटा टोचला की त्यामुळे मानवी नातेसंबंध दिवसेंदिवस खालावत गेले. आता निर्दयी, मगरुर, मी-पणाची प्रवृत्ती सर्वसाधारण बनली आहे.

अशी ही वाईट दशा साधारण १९ शतके आधी या शब्दात भाकित करण्यात आली होतीः “शेवटल्या काळी ख्रिस्ती म्हणून राहणे हे बरेच कठीण होणार. कारण लोक केवळ स्वतःवर व आपल्या पैशावर प्रेम करणारे होतील. ते गर्विष्ठ व अहंकारी आणि देवाची निंदा करणारे, आईवडीलांची आज्ञा मोडणारे, त्यांच्यासोबत कृतघ्नतेने वागणारे, व वाईट प्रवृत्तीचे असतील. ते नेहमी तापट वृत्ती प्रदर्शित करतील, नमते घेणार नाहीत; सतत लबाड बोलणारे व त्रास देणारे असतील. त्यांना अनैतिकतेविषयी काहीच वाटणार नाही. ते खूपच कठोर व क्रुर असतील, व जे लोक चांगले वागू इच्छितील अशांची ते थट्टा करतील. ते आपल्या मित्रांचा विश्‍वासघात करतील.”—२ तीमथ्यी ३:१-४, द लिविंग बायबल.

आजच्या जगाचे हे केवढे भकास पण अचूक चित्र! ते आम्हाला खरे मित्र सापडण्याविषयी खूपच कमी आशा देते. तरीसुध्दा सध्याही खरे मित्र संपादण्याची शक्यता आहे. अशांचे मोल आपल्याला किती वाटेल! यांच्यापासून आपल्याला नेहमी मदत, सल्ला, समाधान व उबदार असा सहवास लाभू शकतो. पण आधी खरे मित्र कोण व खोटे कोण याचा आपल्याला भेद कळला पाहिजे.

सर्वच “मित्र” खरे मित्र नाहीत

या लेखाच्या सुरुवातीला ज्या तरुण पुरुषाचा उल्लेख आला आहे तो एका फुटबॉल खेळणाऱ्‍या गटाचा सदस्य होता व त्याचे खूप “मित्र” होते. कोणा क्लबचे वा छोट्या वसाहतीतील लोक बहुधा सुखद नातेसंबंध निर्माण करतात. पण असे हे “मित्रत्व” बहुधा स्थिर नसते. शिवाय, खूप “मित्र” असणे व ते सर्वच्या सर्व पळून जाणे हे खूपच निराशा देते, जे त्या तरुणाला आढळले होते. परिचितांना गोळा करणे सोपे असते पण खरे मित्र संपादणे हे तितके सोपे नाही.

धनाढ्य लोक वा मोठ्या पदावर असणाऱ्‍यांना लगेच बहुत “मित्र” मिळवता येतात. पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणेः “श्रीमंताला चाहणारे बहुत असतात.” “मशहुर लोकांची बहुत लोक हांजीहांजी करतात; मर्जी व्यक्‍त करणाऱ्‍याचा प्रत्येक जण मित्र असतो.” (नीतीसूत्रे १४:२०; १९:६, टुडेज्‌ इंग्लीश व्हर्शन) पण किती जणांचा हेतू सरळ असतो? कारण जेव्हा ज्याला मित्र बनवले जाते तो निर्धन झाला वा त्याचा लौकिक गेला तर बहुधा हेच मित्र निर्दयी झाल्याचे दिसतात.

शारीरिक सुंदरता असणाऱ्‍यांनाही बरेच “मित्र” लाभतात—ज्यापैकीचे अनेक शारीरिक गोष्टींवर खूष असतात. पण असे हे “मित्रत्व” खूप धोक्याचे व उन्हामध्ये जसे धुके विरते त्याप्रमाणे नाहीसे होणारे असते याकरताच . . .

निवडक असा

होय, मित्रांच्या बाबतीत निवडक असणे सूज्ञतेचे आहे. खोटे मित्र बहुधा तोंडपूजेपणा करणारे असतात. काही अंतःस्थ हेतू राखून ते ही खुशामत करीत असतात. “जो आपल्या शेजाऱ्‍याची खुशामत करतो तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरितो.”—नीतीसूत्रे २९:५, द जरुसलेम बायबल.

यास्तव तुमच्या सध्याच्या मित्रवर्तुळाबद्दल काळजीपूर्वक विचार करा. ते तुम्हास चांगल्या की वाईट गोष्टीकरता प्रभावीत करतात? ते आत्मसंतुष्ट, स्वतःचे मत लादणारे, किंवा बढाईखोर आहेत का? ते फाजीलपणे वागतात का आणि नको ती जोखीम पत्करतात का? त्यांचा, विरुध्द लिंगी व्यक्‍तींविषयी कोणता दृष्टीकोण आहे? ते सौजन्य दाखविणारे व आदरयुक्‍त आहेत की फाजील व अनितीप्रिय आहेत? तुमचे नेहमीचे सोबती कधी अप्रामाणिक, भरवसा ठेवण्यास अपात्र असणारे असे दिसले का? ते मादक औषधांचे सेवन करणारे आहेत का? अति मद्यप्राशन करणारे आहेत का? तसे असल्यास तुम्हाला धोका आहे. तुम्ही कदाचित प्रामाणिक, शुध्दाचरणी व नम्र असाल पण लक्षात ठेवा की, “कुसंगतिने नीती बिघडते.”—१ करिंथकर १५:३३.

वाईट साथीदार असण्यात धोका हा असतो की तुम्ही त्यांचे अनुकरण करणारे बनता. सावकाश व अगदी चतुरपणे त्यांच्या पध्दती व वागणूक तुम्हावर आपला प्रभाव पाडू लागते. त्यामुळेच पवित्र शास्त्र म्हणतेः “सुज्ञांची सोबत धर म्हणजे तू सूज्ञ होशील, पण तू मूर्ख लोकांशी मैत्री संपादिली तर तुझा नाश होईल.”—नीतीसूत्रे १३:२०, टुडेज्‌ इंग्लीश व्हर्शन.

मित्र मिळविताना चुकीचे पाऊल अगदी सहज पडते, तरीपण निराश होऊ नका. जगात अद्यापही लाखो असे सुंदर मित्रत्व राखणारे लोक आहेत. तर मग अशा या खऱ्‍या मित्रांना तुम्ही कसे शोधून काढू शकाल?

[४ पानांवरील चित्रं]

तुमचे मित्र तुम्हावर फार मोठा प्रभाव पाडतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा