वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ८/१ पृ. १८-२३
  • याह यहोवावर भाव ठेवा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • याह यहोवावर भाव ठेवा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा शांतता स्थापितो
  • मुक्‍ततेचे अभिवचन
  • “वधिलेल्यां”चा सूड घेईल
  • शांततामय नंदनवन
  • प्रकाशाचा मार्ग निवडणाऱ्‍यांचे तारण होईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवा—आमचे बल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यहोवाला आपला भावविषय बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यशया पुस्तकाच्या दुसऱ्‍या भागातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ८/१ पृ. १८-२३

याह यहोवावर भाव ठेवा!

“यहोवावर सर्वकाळ भाव ठेवा, कारण याह यहोवा हा सनातन आश्रयदुर्ग आहे.”—यशया २६:४.

१, २. कोणते गौरवाचे गीत, यशया २६:१-६ मध्ये जाहीर केले आहे व का?

जी मानहानी, ‘बलात्कारी (जुलमी) लोकांच्या शहरांची’ झाली तिने जयगीत गायनास हाक दिली! (यशया २५:३) मग अगदी उचीतपणे यशया, अध्याय २६ वा, १-६ वचनातील भविष्यवादात गौरवाचे गायन आहे ते सेनाधीश प्रभू यहोवा यांचे गौरवात गायिले गेले. ते आजहि “यहुदा देशात” गायिले जाते; यहुदा म्हणजे “स्तवन” करणे. यातहि, किंग जेम्स आवृत्ती परत “प्रभू यहोवा” हेच उद्‌गार उपयोगात आणते, जेथे देवाचे नाम दुहेरी आहे. पण, तेच याच गीताचे जे शब्द न्यु वर्ल्ड ट्रान्सलेशन आवृत्तीत आले आहेत ते केवढे शिरशिरी आणणारे आहेत! शिवाय येथे आणि इतर ठिकाणी जेथे जेथे देवाचे नाम उल्लेखित आहे तेथे ते बिनचूक दिलेले आहे.

२ ते मधुर गीत ऐका: “आमचे नगर तटबंदी केलेले आहे. तारण हेच त्याचे (यहोवाचे) कोटे व तट नेमिले आहेत. वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र आत येईल. ज्याचे मन तुझ्याठायी स्थिर झाले आहे त्यांस तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुजवर असतो. यहोवावर सर्वकाळ भाव ठेवा. कारण याह यहोवा हा सनातन आश्रयदुर्ग आहे. उच्चस्थली राहणाऱ्‍यास त्याने खाली आणिले आहे; त्याने उच्चनगर पाडून टाकिले आहे. जमीनदोस्त केले आहे, धुळीस मिळविले आहे. ते पायाखाली तुडवितील; गरीबांचे पाय, दीनांची पावले देखील ते तुडवितील.” जे भाव ठेविणारे त्यांच्या सोबतीत, जे आज हे गीत गातात—त्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संगतीत राहण्यात केवढा आनंद आहे!

३. (अ) “नीतिमान राष्ट्र” काय आहे आणि त्याच्या “वेशी”तून कोण आत गेले आहेत? (ब) जरी शत्रू हर प्रकारे तिला फोडण्याच्या प्रयत्नात आहेत तरी यहोवाची संघटना कशी संघटितपणे आगेकूच करीत आहे?

३ प्रभू यहोवा—याह यहोवा—जे घमेंडी, त्यांना खाली आणणार व जे सर्वकाळ त्याजवर भाव ठेऊन आहेत त्यांची सुटका करणार हे नक्की! जरी एके काळी “सर्वांत लहान” होते तरी आज हे आध्यात्मिक इस्राएल “बलाढ्य राष्ट्र,” एक “नीतिमान राष्ट्र” बनले आहे. यहोवाच्या नगरासमान संस्थेच्या उघड्या “वेशी”तून, ज्यांची संख्या आज तीस लाखापेक्षा अधिक आहे अशा सदेच्छु सहाकाऱ्‍यांच्या बलाढ्य झुंडीनेहि आत प्रवेश केलेला आहे. एकत्रित मिळून ते आज विश्‍वबंधुत्व स्थापन करून आहेत. त्यांची लोकसंख्या, जिला संयुक्‍त राष्ट्र सभा संबोधितात तिच्या सदस्यापैकी ५७ राष्ट्रांपेक्षा अधिक आहे. पण देवाचे “राष्ट्र” आणि त्याजशी जे संगत ठेऊन आहेत ते वास्तवतेत एकीत आहेत. सबंध पृथ्वीवर जेथे आहेत तेथे नीतिमान तत्वांचे अवलंबन करणे हा त्यांचा दृढ मानस आहे. देवाच्या “राष्ट्राची” संघटनात्मक “वेशी”, सत्याला अनुसरूनच्या नीतिमान वागणूकीस विटाळविण्याच्या सैतानी प्रयत्नाविरूद्ध तटबंदीसमान आहे. देवाच्या लोकांची जी विश्‍वासू आगेकूच चालू आहे तिला शत्रु रोखू शकत नाही. आमचा भाव सर्वकाळ ‘याह यहोवावर आहे, जो आमचा सनातन आश्रयदुर्ग आहे.’—यशया ५४:१७; ६०:२२.

४, ५. (अ) “उच्च नगर” हे काय आहे आणि यहोवाचे लोक तिला लाक्षणिकपणे कसे पायाखाली तुडवित आहेत? (ब) यशया २६:१० मधील भविष्यवादाची मोठी पूर्णता कधी आणि कशी होणार? (क) या भविष्यवादात आणखी कोणती गोष्ट समाविष्ट आहे?

४ आम्ही जर ही धोक्याची सूचना देत आहोत की यहोवा लवकरच “उच्च नगर,” “मोठी बाबेल” हिला खाली खेचणार आहे, त्यावेळी पृथ्वीवरील जे गरीब आणि दीन ते राज्याच्या सुवार्तेचा स्विकार करीत असल्याचे पाहाणे, अंतःकरणास केवढे आनंदविणारे असते. (प्रकटीकरण १८:२, ४, ५) लाक्षणिक मार्गी तेहि “उच्च नगर,” पायाखाली तुडवितात. पण हे ते प्रत्यक्षात नाश करण्याच्या कृत्यांत सहभागी होऊन नव्हे तर त्या भ्रष्ट व्यवस्थीकरणावर यहोवाच्या क्रोधदिनाचा संदेश बजावून, करीत आहेत. (यशया ६१:१, २) आज अनेक दशके यहोवाच्या साक्षीदारांनी, जीवन पुरविणाऱ्‍या राज्याचा सुसंदेश घरोघर पोहचवून जे दुष्ट त्यांच्याबद्दलहि केवढा संयम दाखविला आहे! पण याचा परिणाम, यशया २६:१० मध्ये दिल्याप्रमाणेच आहे: “दुर्जनावर कृपा केली तरी तो नीति शिकावयाचा नाही; धर्मराज्यात देखील तो अधर्म करील, यहोवाचे ऐश्‍वर्य त्याला दिसावयाचे नाही.”

५ पुनर्रचनेचा हा भविष्यवाद त्याच्या अधिक महत्वाने आज पुरा होत आहे. जरी संधी पुरविलेली आहे तरी फारच थोडके आपल्या जीवनात बदल करून घेत आहेत की ज्यायोगे त्यांना “धर्मराज्यात,” यहोवाच्या कृपाप्रसादाचा लाभ होईल. जे सर्व यहोवास व त्याच्या एकनिष्ठ साक्षीदारांना दूषण देतात त्यांना “यहोवाचे ऐश्‍वर्य . . . दिसावयाचे नाही,” कारण यहोवाच्या नामास पवित्रता प्राप्त झाल्यावर मानवजातीवर जे आश्‍चर्यकारक आशीर्वाद येतील ते अनुभविण्यास ते जीवंत राहणार नाहीत. (यशया ११:९) हाच भविष्यवाद कदाचित, पृथ्वीवर नंदनवन स्थापीत झाल्यावर ज्यांना कबरेतून उठविले जाईल अशांपैकी काहींना लागू पडेल. त्याकाळातील ईश्‍वरी “गुंडाळीत” स्पष्ट केलेल्या गोष्टींनुसार, जे देवाकडील गरजा पाळण्यास नकार देतील, त्यांची नावे “जीवनाच्या पुस्तकात” लिहिलेली सापडणार नाहीत.—प्रकटीकरण २०:१२, १५; यहेज्केल ३३:११ पडताळा.

यहोवा शांतता स्थापितो

६. यहोवाचे निष्ठावंत लोक कोणत्या शब्दांचा आनंदाने गजर करीत आहेत व का?

६ असे असूनहि, देवाचे निष्ठावंत लोक, याह यहोवाचे नाम उंचावण्यात, गौरविण्यात आस्था बाळगून आहेत. त्याच्या लोकात “शांतता स्थापित” करण्यास ते त्याला हाक देतात व आनंदाने म्हणतात: “तू राष्ट्रांची वाढ केली आहे, हे यहोवा, तू राष्ट्रांची वाढ केली आहे; तू आपला महिमा दाखविला आहे; तू देशाच्या चतुःसीमा वाढविल्या आहेत.” (यशया २६:१२, १५) पृथ्वीवरील चारहि दिशांच्या २१० राष्ट्रातून यहोवा सतत मेंढरासमान व्यर्क्‍तिना अलग करून त्याच्या आध्यात्मिक राष्ट्रास जोडत आहे. लाखो नवीन सहकारी बाप्तिस्मा घेत आहेत. बरेचसे महिने, पाच लाखापेक्षा अधीकजण खास, नियमित आणि सहाय्यक पायनियर सेवा करीत आहेत. नवनवी राज्यसभागृहे, सम्मेलन गृहे उभारली जात आहेत. वॉचटॉवर संस्थेच्या शाखा, त्यांच्या सोबतच्या बेथेलगृहांचा व कारखान्यांचा व्याप वाढत असून सोबतीत छापखानेहि वाढत आहेत. वाढच वाढ आहे!

७. यहोवाच्या शहरासमान संघटनेचा जो व्याप वाढतच आहे तो कशामुळे?

७ ही वाढ यामुळे होत आहे की “शांतीचा अधिपती,” पृथ्वीवरील देवाच्या लोकांचे सर्व गोष्टींत मार्गदर्शन करीत आहे. हे, जसे यशयाने आधीच्या भविष्यवादात म्हटले होते: “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश यहोवाचा आवेश हे सिद्धीस नेईल.” (यशया ९:६, ७) आज केवढ्या भव्यतेत या शब्दांची पूर्णता होत आहे. जे यहोवावर भाव ठेऊन आहेत ते त्या अधिपतिच्या अधिपत्याखालील शांतीचा, न्यायाचा व धार्मिकतेचा अनुभव घेत आहेत. त्या अधिपत्याने त्यांना अशा प्रेमळ एकतेत एकत्रित केले आहे जी, केवळ येशूचे खरे शिष्यच अनुभवू शकतात. (योहान १३:३४, ३५) शिवाय, ते त्या घटनेकडे आतुरतेने दृष्टी लावून आहेत जेव्हा येशूच्या राज्याचा अंमल सुरु होईल व “यहोवाच्या ज्ञानाने” सबंध पृथ्वी भरेल.—यशया ११:९; दानिएल २:३५, ४४, ४५.

८. यशया २६:२० मधील यहोवाचे शब्द काय सूचित करितात व “आपआपल्या खोल्या” ह्‍या कशाशी निकट संबंधित आहेत?

८ राज्य विस्तार होत राहणे त्याच्या कळसास पोहंचत असता यहोवा यशया २६:२० मध्ये हाक देतो: “चला माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” या भविष्यवादात “आपआपल्या खोल्या” हा जो शब्दसंग्रह उपयोगात आणला आहे तो, सबंध पृथ्वीवर यहोवाच्या साक्षीदारांच्या सेवेसाठी शहरासमान ज्या ५४,००० पेक्षा अधीक मंडळ्या आहेत, त्यांचेशी निकट संबधित आहे. यहोवाच्या विचारात अधिक काय आहे हे जाणणे अद्याप बाकी आहे. तरी पण आम्ही ही खात्री बाळगू शकतो की, जेव्हा तो दुजर्नांचा नाश करील, त्यावेळी त्याजवर भाव ठेविणाऱ्‍या त्याच्या लोकांचा बचाव करील. यशयाच्या दिवसात क्रूर अश्‍शूऱ्‍यांचा पाडाव करून, त्याने असेच केले होते.—यशया १०:२४-२६.

मुक्‍ततेचे अभिवचन

९. (अ) राजा हिज्कियाने, आपला भाव यहोवावर असल्याचे कसे स्पष्ट केले? (ब) यहोवाचा द्वेष करणारांकडून जेव्हा आमचा छळ किंवा निंदा होते त्यावेळी आमची उचित प्रतिक्रिया काय असावी?

९ जसा राजा हिज्कीया ठेवून होता तसे आज यहोवाचे सेवक त्याच कारणास्तव त्याजवर भाव ठेऊन आहेत. त्याचा सेनाधीश प्रभू म्हणून तो यहोवावर पूर्णपणे भिस्त ठेऊन होता. यास्तव, अश्‍शूरी लोकाकडील धमक्या शिगेस पोहंचताच त्याने पुढील शब्दात यहोवाकडे प्रार्थना केली: “सेनाधीश यहोवा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस. तूच आकाश व पृथ्वी निर्माण केली. हे यहोवा कान लावून ऐक. हे यहोवा तू डोळे उघडून पाहा. आणि तुझा, सदाजीवी देवाचा उपमर्द करण्यासाठी सन्हेरिबाने निरोप पाठविला आहे. त्याचे सर्व शब्द ऐक.” (यशया ३७:१६, १७) यहोवाचा द्वेष करणाऱ्‍यांकडून जेव्हा छळ, उपहास, निंदा होते त्यावेळी अशाच प्रकारची प्रार्थना तुमच्या अंतःकरणातून बाहेर पडत नाही का? यहोवावर पूर्णपणे भाव ठेऊन, त्याच्या नामावरील कलंक दूर करण्यास त्याजकडे तुम्ही कळकळीने प्रार्थना करीत नाही का? असेच येशूला वधस्तंभावरील मरणाअगोदर वाटले होते. त्याने तर त्याच्या पित्यावरील महान कलंकामुळे जो प्याला त्याला लवकरच पिणे होते तो “दूर” करावा म्हणून विनंती केली होती.—मत्तय २६:३९-४४.

१०. (अ) हिज्कीयाच्या प्रार्थनेने त्याजठायीच्या मुख्य उद्दिष्टास कसे प्रकट केले? (ब) हिज्कीया समान आम्ही, हर्मगिद्दोनाच्या आधीच्या काळात, परिक्षांना कसकसे तोंड देऊ शकतो?

१० हिज्कीयाच्या प्रार्थनेने हे स्पष्ट केले की अश्‍शूरांपासून सुटका प्राप्त व्हावी याच स्वार्थी हेतूने तो याचना करीत नव्हता. तो स्वतःचा बचाव करू पहात नव्हता. तर त्याला, यहोवाच्या नामास पवित्रता प्राप्त व्हावी आणि त्याच्या सार्वभौमत्वास गौरविले जावे, ही चिंता होती. यानुसार, त्याच्या प्रार्थनेचा शेवट या शब्दात झाला: “आता यहोवा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हास सोडीव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्यें जाणतील की तूच काय तो यहोवा आहेस.” (यशया ३७:२०) त्याचप्रमाणे, हर्मगिद्दोनाच्या अंतिम युद्धाआधी आम्ही ज्या सर्व परिक्षांना तोंड देत आहोत त्यात हे लक्षात बाळगून असणे बरे की आमचे वैयक्‍तिक तारण हे यहोवाच्या नामास पवित्रता लाभण्याच्या दुय्यम पदी आहे. जसे आमच्या सेनाधीश प्रभूने त्याचा संदेष्टा यहेज्केल मार्फत ६० वेळा घोषित केले: “तेव्हा त्यांस समजेल की मी यहोवा आहे.”—यहेज्केल ३८:२३.

११. (अ) सन्हेरीबाने कोणती चूक केली व त्याबद्दल यहोवाने काय म्हटले? (ब) सन्हेरीबास जे परिणाम भोगावे लागले त्यांना अनुलक्षून, आम्ही काय विश्‍वास ठेवू शकतो?

११ हिज्कीयाने प्रार्थना केल्यानंतर, यहोवाचे सन्हेरीबाविरूद्ध काय म्हणणे आहे ते यशयाने राजाला कळविले. सदाजीवी देवाविरूद्ध निंदक शब्द उच्चारून त्या अश्‍शूरी बढाईखोराने केवढी घोडचूक केली होती. यशयाद्वारे यहोवाने सन्हेरीबाबद्दल म्हटले: “तू कोणाची निंदा केली? कोणाच्या विरूद्ध दुर्भाषण केले? कोणाच्या विरूद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भोवया चढविल्या? इस्राएलाचा जो पवित्र प्रभू त्याजवर?” आणि त्याच रात्री इस्राएलांच्या पवित्र प्रभूने हालचाल केली. सन्हेरीबाच्या सैन्यातील आघाडीवरच्या १,८५,००० सैनिकांचा, यहोवाच्या केवळ एका दिव्यदूताने फडशा उडविला व चाहोंकडे “प्रेतेच प्रेते” पडली. तो गर्विष्ठ राजा माघार घेऊन लज्जेने निनवेस पळाला. आणि काही वर्षानी त्याच्या दैवतांची पूजा करीत असतां त्याच्या स्वतःच्या मुलांनी त्याचा वध केला. आम्ही यहोवावर संपूर्ण भाव ठेवू शकतो, व हा विश्‍वास बाळगू शकतो की जे सर्व यहोवाच्या साक्षीदारांची निंदा व छळ करतात अशांचा तो सैतानासह लवकरच याच सारखा नायनाट करील.—यशया ३७:२३, ३६–३८.

“वधिलेल्यां”चा सूड घेईल

१२. (अ) यशया २६:२१ हे हर्मगिद्दोनच्या काळात कोणकोणते हिशेब द्यावे लागतील याचे वर्णन देते? (ब) हर्मगिद्दोनाआधी कोणत्या “वधिलेल्यांचा” सूड घेतला जाईल आणि कसा?

१२ त्या काळातील तो एक भयानक युद्ध प्रसंग होता. पण “मोठ्या संकट” काळात, त्याहिपेक्षा कैक पटीने अधीक भयानक असेल असा हिशेब द्यावा लागेल. (मत्तय २४:२१) त्या कत्तलीचा अंदाज दृष्टीसमोर उभा करण्याचे आमंत्रण यहोवा आम्हास देतो: “कारण पाहा, यहोवा पृथ्वीवरील रहिवाश्‍यांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्‍त पृथ्वी प्रकट करील, वधिलेल्यांस ती यापुढे झाकून ठेवावयाची नाही.” (यशया २६:२१) प्रथम यहोवा, जे सर्व धार्मिक चुकांचा पुरस्कार करणारे अशांच्या विरूद्धतेत न्याय बजाविण्यात राजकीय सत्तांचा उपयोग करून घेईल. त्या दिवशी त्यांची खोटी दैवते त्यांना वाचवू शकणार नाहीत. “मोठी बाबेल” हिच्यातील सर्वधर्मीय थोरांना सर्वविश्‍वास समिश्रित प्रार्थना करावयास रोमच्या पोपला यापुढेहि बोलावू द्या. या संमिश्रित विश्‍वासूपैकी एकहि पुरस्कर्ता जो खरा व सदाजीवी देव, यहोवा, याला मानीत नाही. त्यांच्या शिकवणी चुकीच्या, अशास्त्रीय आहेत, व त्यांचे मार्गहि तसेच आहेत. त्यांनी एवढा काळ एकमेकांचाच घात केलेला आहे. वेळोवेळी त्यांनी अहिंसक ख्रिश्‍चनांचा रक्‍तपात केला. या २०व्या शतकात या गुन्हेगारांपैकी कित्येकांनी, यहोवाच्या साक्षीदारांना बंदिशाळेत किंवा राजकीय बंद्यांच्या छावण्यातून गोळी घालण्याद्वारा, किंवा मुंडके उडविण्याच्या कुऱ्‍हाडीने ठार करण्यास, क्रूर हुकुमशहांशी हातमिळवणी केली. जसे यहोवा त्याच्या संदेष्ट्यांकरवी स्पष्ट घोषित करतो तसे या “वधिलेल्यां”चा सूड घेतला जाईल.—अनुवाद ३२:४१,४३; यशया १:२४; ६३:४; प्रकटीकरण १७:१५-१८; १८:२१, २४.

१३. यशया “यहोवाचा दिवस” याबद्दल काय भाकीत करतो व ते शब्द कोणास लागू होतात?

१३ खोट्या धर्माचा विध्वंस केल्यावर, ख्रिस्ताच्या राज्यास विरोध करणाऱ्‍यांपैकी जे बचावून राहतील त्यांचे विरूद्ध यहोवा तत्काळ हालचाल करील. अशा सर्व विरोधकांना तसेच “मोठी बाबेल” हिला यशया १३:६, ९चे शब्द लागू होतात: “आक्रोश करा; यहोवाचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे. पहा, रोष व तीव्र क्रोध यांनी दुःखकर झालेला असा यहोवाचा दिवस येत आहे; तो देश उजाड करून सोडील, त्यांतील पातक्यांचा संहार करील.” हे सर्व स्तोत्रकर्ता दाविदाने आधीच भाकीत केल्याप्रमाणे असेल: “यहोवा, आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचे रक्षण करतो; पण सर्व दुर्जनांचा नाश करितो.”—स्तोत्रसंहिता १४५:२०; प्रकटीकरण १९:११-२१.

१४. यशयातील कोणत्या शब्दांकडे राष्ट्रांनी लक्ष दिलेले बरे आणि का?

१४ पृथ्वीवरील राष्ट्रांनी यशयाच्या, अध्याय ३४ वा १ ते ८ वचनातील पुढील मजकूराकडे लक्ष दिल्यास बरे होईल: “अहो राष्ट्रांनो, ऐकावयास जवळ या. लोकांनो कान द्या . . . कारण यहोवाचा कोप सर्व राष्ट्रांवर होत आहे, त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यावर होत आहे. त्याने त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे; त्याने त्यांचा वध करावयास लाविले आहे. त्यांच्यातले वधलेले बाहेर टाकून देतील, त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल व त्यांच्या रक्‍ताने पर्वत विरघळतील. . . . सूड घेण्याचा हा यहोवाचा दिवस” आहे. राजकीय वर्तुळात, मोठमोठ्या व्यापार गटात आणि खोट्या धर्मांत भ्रष्टाचार आणि अनैतिकता ही भरसमाट वाढलेली आहे. पण यहोवाने पृथ्वीस शुद्ध करण्याचा संकल्प केला आहे. ह्‍या कारणास्तव, तो सर्व राष्ट्रांतून—बचावून राहण्याकरिता अशा व्यर्क्‍तिना गोळा करीत आहे जे नीतिमत्वतेत त्याची सेवा करीत राहण्याकरिता स्वतःच्या जीवनात स्वेच्छेने बदल करतात. इतर सर्वांचा त्याच्या क्रोधदिनी नाश होणार.—यिर्मया २५:३१-३३.

शांततामय नंदनवन

१५. आणखी यशया, त्याच्या ३५ व्या अध्यायात (अ) आजच्याबद्दल (ब) भवितव्याबद्दल काय स्पष्टता पुरवितो?

१५ यशया, अध्याय ३५ मध्ये देवाचा संदेष्टा, यहोवाच्या पुनर्वसित लोकांच्या, जे आज सर्वकाळ त्याजवर भाव ठेऊन आहेत, त्यांचा भावी परिस्थितीचे सचित्र भाषा शैलीत, वर्णन करितो. आध्यात्मिक नंदनवनांत ते एकत्रित केले जात असता हे “यहोवाचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्‍वर्य, पहातील.” ते, खरोखरीचे नंदनवन आणि अभिवचनांची पूर्तता होण्याकडेहि दृष्टी लावून आहेत की: “तेव्हा अंधाचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील, कारण रानांत जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.” (यशया ३५:१,२, ५, ६) या भावी आशेत तुम्हास आनंद वाटतो का? तुमचा यहोवावर भाव आहे का व तो ही अभिवचने पुरी करील ही खात्री बाळगून आहात का?

१६, १७. (अ) नंदनवनाचे वर्णन करीत असता यशया कसले निकडीचे अपील करतो? (ब) यहोवाच्या लोकांनी या अपीलाकडे कसे लक्ष द्यावे?

१६ यहोवावर संपूर्ण भाव ठेऊन, नवोदितांचे तसेच ज्यांच्या विश्‍वासास आधार देऊन बळकट करण्याची गरज आहे अशांचेहि सहाय्य करण्यात तुम्ही सहभागी होऊ शकाल. नंदनवनाचे वर्णन करीत असता संदेष्टा यशयाने मधेच हे जरूरीचे अपील घुसविले: “गलित हस्त दृढ करा, लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबऱ्‍या मनाच्यांस म्हणा, हिय्या धरा. भिऊं नका; पाहा, तुमचा देव सूड घ्यावयास, अनुरूप असे प्रतिफल द्यावयास येईल. तो येईल व तुमचा उद्धार करील.” (यशया ३५:३, ४) होय, आम्ही हेच पाहू इच्छितो की ज्या सर्वांची अंतःकरणे नीतिमत्वतेकडे कललेली आहेत अशांनी, नंदनवनीय पृथ्वीवर प्रवेश मिळविण्याकरिता, यहोवावर भाव ठेविण्याचे शिकावे.

१७ यास्तव, या, आपण कोणाहि गलित हस्तांना असा आधार देऊ की ते ‘जीवनाच्या वचनावर घट्ट पकड ठेवितील.’ तसेच कोणाहि लटपटणाऱ्‍या गुडघ्यांना असे बळकट करीत राहू की ते “सर्व प्रकारे यहोवास संतोष विण्याकरिता त्याला शोभेल” अशीच वाटचाल करतील. (फिलिप्पैकर २:१६; कलस्सैकर १:१०) होय, जो कोणी आपल्या अंतःकरणात खिन्‍न असेल अशा कोणाचेहि सांत्वन करू, तसेच जेव्हा परिक्षा प्रसंग किंवा छळास तोंड द्यावे लागते त्याकाळात एकमेकांस उत्तेजन देऊ की ज्यायोगे ते “देवाचे वचन निर्भयपणे सांगायचे अधिक धाडस” करतील. (फिलिप्पैकर १:१४; १ थेस्सलनीकर ५:१४; इफिसकर ५:१५, १६) मग जेव्हा यहोवाच्या सूडाच्या दिनास सुरुवात होईल तेव्हा आम्हाठायी त्याजकडिल अनुरूपश्‍या प्रतिफलांच्या आशीर्वादांची खात्री असेल. तो ‘त्याच्या लोकांचा उद्धार करण्यास येणार’ त्या दिवशी, तारणाकरिता जे सर्व यहोवावर भाव ठेऊन असतील अशांच्या पैकी तुम्ही एक असाल का?

१८. जे यहोवावर भाव ठेऊन आहेत त्यांच्याकरिता कोणते अद्‌भुत भवितव्य राखलेले आहे, व त्यांचा निर्धार काय आहे?

१८ जे सर्वकाळ यहोवावर भाव ठेऊन असणार, अशांचे करिता त्या दिवसापलिकडे केवढे गौरवी भवितव्य राखलेले आहे! पापी जुलुमशहा नष्ट झालेले असणार! नवीन जगात, जे सर्व याह यहोवावर प्रेम करणारे असतील त्या सर्वांची त्याच्या पुत्राद्वारे पापविरहीत पूर्णत्वात पूर्ण वसाहत केली जाईल. तुम्ही त्या घटकेची उत्कंठा बाळगून आहात का? तुम्ही यहोवावर जो भाव ठेऊन आहात तो तुम्हास त्या आश्‍चर्यकारक दिवसाप्रत पोहंचवील. होय, लोकहो, सर्वकाळ यहोवावर भाव ठेवा, याचाच अर्थ, उद्धार, असा होईल!

उजळणी करिता प्रश्‍न

◻ यशया २६ मधील विजयाचे गीत आम्हास कसले उत्तेजन देते?

◻ यहोवा कोणते “उच्च नगर” खाली खेचणार व आम्ही त्यांस कसे पायाखाली तुडवू?

◻ सन्हेरीबाच्या धमकीमुळे हिज्कीयाने केलेल्या प्रार्थनेतून आम्ही काय शिकतो?

◻ यशया २६:२१ मधील “वधिलेल्यां”चा सूड कसा घेतला जाईल?

◻ आम्ही याह यहोवावर भाव ठेऊन राहिल्यास त्याचा काय फायदा होईल?

[२२ पानावरील चौकट]

पोपच्या धर्मसभेवर फिर्याद?

मिलानच्या अंबेर्टो सिनिसॅलची यांनी II गायमाले मध्ये लिहिलेल्या लेखाचे समीक्षण करताना वर्ल्ड प्रेस रिव्ह्यु म्हणते: “बँको अँब्रोसियानो भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित असणाऱ्‍या व्हॅटिकन बँकेच्या तीन अधिकाऱ्‍यांच्या जुलै [१९८७] मध्ये काढलेल्या धरपकडीच्या लेखी हुकुमास रद्द केल्यामुळे इटलीच्या सर्वोच्च अपीलांच्या न्यायालयावर टीकास्त्र सोडले जात आहे.” व्हॅटिकन व इटलीचे सरकार यामधील एका जुन्या तहाच्या आधारावर दिलेल्या निकालामुळे बँकेचे अध्यक्ष असणारे आर्चबिशप तसेच बँकेचे कार्यवाही अध्यक्ष आणि प्रमुख लेखपाल यांना माफी बहाल करण्यात आली. समीक्षण पुढे म्हणते: “टीकाकार निकाल जाहीर करणाऱ्‍या न्यायाधिशांना दोष देत नसले तरी त्यांचे म्हणणे आहे की हा दोष इटलीच्या घटनेचा आहे; ज्याने इटलीच्या भूमीवर नियमभंग करणाऱ्‍यांना माफी दिली. यामुळेच पोपच्या धर्मसभेवर, इटलीत घडलेल्या गुन्ह्यास्तव, फिर्याद करण्याची मुभा इटलीच्या न्याय व्यवस्थेला असावी या आशयाच्या करारासाठी अनेक कायदेपंडित आग्रह करत आहेत.” (w88 1/15)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा