वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ८/१ पृ. १३-१८
  • यहोवा—आमचे बल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा—आमचे बल
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘बलात्कारी लोकांची शहरे’
  • “बाबेल” मध्ये आनंदोत्सवाचे गीत नाही
  • शांतीचा खरा उगम
  • प्रकाशात चालणारे आनंदी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • याह यहोवावर भाव ठेवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • प्रकाशाचा मार्ग निवडणाऱ्‍यांचे तारण होईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यशया पुस्तकाच्या दुसऱ्‍या भागातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ८/१ पृ. १३-१८

यहोवा—आमचे बल

“याह यहोवा माझे बल व माझी ताकद आहे.”—यशया १२:२.

१. (अ) यहावोचे साक्षीदार एवढे वेगळे का आहेत? (ब) यहोवाने त्याच्या लोकाकरिता जे काही केले त्याचा उल्लेख यशया १२:२ मध्ये कसा आढळतो?

आपण, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृही होणाऱ्‍या सभांना हजर राहत असता का? तेथे, आपणास इतरांपेक्षा अगदीच वेगळे लोक दिसतात. हे लोक कोण आहेत आणि ते वेगळे का आहेत? आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत व आम्ही वेगळे आहोत कारण आम्ही सर्व नावातील सर्वात थोर नाम बाळगणारे आहोत—ते, आम्हासभोवतालचे अलौकिक विश्‍व उत्पन्‍न करणाऱ्‍या सृष्टिकर्त्याचे गौरवी नाम आहे. ते नाम आम्ही धारण करून आहोत. तो, त्याच्या संस्थेद्वारा “यथाकाळी” जे निवडक आध्यात्मिक अन्‍न पुरवितो त्याची सहभागिता घेण्यास त्याच्या नामात आम्ही तेथे आनंदाने जमा होतो. (लूक १२:४२) यशया, अध्याय १२, वचन २ च्या शब्दात, यहोवाचे साक्षीदार म्हणून आम्ही कृतज्ञतापूर्वक त्याच्या अद्वितीय नामाची, अंतःकरणापासून स्तुती करतो. तेथे म्हटले आहे: “पहा, देव माझे तारण आहे. मी भाव धरितो, भीत नाही, कारण याह यहोवा माझे बल व ताकद आहे, तो मला तारण झाला आहे.” आमच्या देवाने आम्हाला अनेक परिक्षा प्रसंगातून पार पाडिलेले आहे. आता आमचे अंतिम तारण नजिक येत आहे—आणि तेहि याह यहोवाचेच हातून घडणार आहे!

२. (अ) पवित्र शास्त्रात “याह यहोवा” हे उद्‌गार किती वेळा आले आहेत? (ब) यशया १२:२तील “बल” या शब्दाकरिता पर्यायीशब्द कोणते दिले आहेत, व तेही उचित का आहेत?

२ हे “याह यहोवा” असा देवाच्या नामाचा दुहेरी उच्चार आहे, पवित्र शास्रात केवळ दोन वेळा आहे. एक येथे व दुसरा यशया २६:४ मध्ये आहे. किंग जेम्स आवृतिच्या अनुवादकांनाहि हे यथार्थ वाटले व त्यांनी “प्रभू यहोवा” हे मोठ्या अक्षरात भाषांतरित केले आहे. न्यु वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल मधील तळटीपेनुसार “ताकद” या शब्दाऐवजी “गीत” आणि “गौरव” हे पर्यायी शब्द यशया १२:२ मध्ये दिले आहेत. होय, सर्व समर्थ याह यहोवा, जो त्याच्या भक्‍तांस महासामर्थ्य पुरवितो तो गौरवाचे सुमधुर गीताने गौरविण्यालायक आहे.—यशया ४०:२८-३१.

३. (अ) कोणत्या कारणास्तव याह यहोवाने मार्ग मोकळा केला आहे आणि कशाचे मुळाधारावर? (ब) रोमकर ११:३३-३६ मधील पौलाच्या शब्दांचा यहोवाच्या साक्षीदारांवर काय परिणाम होतो?

३ चातुर्य, न्यायीपण आणि प्रेम यांनी यहोवाच्याठायीचे सामर्थ्य समतोल आहे. या ईश्‍वरी गुणांच्या उपयोगात याह यहोवाने येशूच्या खंडणीद्वारा मनुष्य जातीतील विश्‍वासू जनाकरिता तारणाचा मार्ग खुला केला आहे. याचे संदर्भात प्रेषित पौल उद्‌गारला: “अहाहा, देवाची संपत्ति, बुद्धी व ज्ञान किती अगाध आहे. त्याचे संकल्प किती दुर्ज्ञेय आणि त्याचे मार्ग किती अनुपलक्ष्य आहेत. यहोवाचे मन कोणी ओळखले, आणि त्याचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड मिळेल असा कोण आहे? त्याजपासून त्याच्या द्वारे व तदर्थ सर्व आहे. आमेन.” (रोमकर ११:३३-३६) यास्तव, आम्ही याह यहोवास दृढ धरून राहावे आणि तोच आमचा सर्वसमर्थ देव व सार्वभौम प्रभू असल्याचे संपूर्ण विश्‍वासून व निष्ठेने जाहीर करावे हे केवढे उचित ठरेल!—इब्रीकर ३:१४ पडताळा.

४. (अ) संदेष्टा यशयापाशी असे घोषीत करण्यास पुरेसे कारण का होते की, “मी भाव धरितो, भय बाळगत नाही”? (ब) या विसाव्या शतकात याह यहोवावर संपूर्ण भाव ठेविण्याजोगे कोणते कारण यहोवाच्या लोकांपाशी आहे?

४ ‘मी भाव धरितो, भय बाळगत नाही’ असे जाहीर करण्यास यशयापाशी पुरेसे कारण होते. कारण कालांतराने संदेष्ट्याला देवाकडील बचावाच्या कृत्यांची चांगली ओळख पटली. यहोवाने, आपल्या शब्दांच्या पूर्णतेत अश्‍शूरास आणि त्यांचा अभिमानी राजा सन्हेरीबला कसे नमविले हे प्रत्यक्ष पाहणाऱ्‍या साक्षीदारांपैकी तो होता. सर्वसमर्थ यहोवा देवाने पाठविलेल्या एकाच दिव्यदूताने रात्रभरात एक लक्ष पंचायशी हजार अश्‍शूरी सैनिकांची कत्तल केली. हे भव्य तारण, राजा हिज्कीया, आणि सर्व यहुद्यांनी याह यहोवा याजवर संपूर्ण भाव प्रदर्शित केल्यामुळे प्राप्त झाले. (यशया ३७:६, ७, २१, ३६–३८) या २०व्या शतकातहि यहोवाने त्याच्या लोकांची, निष्ठुर जुलूम, बंदी आणि छळ तसेच राजकीय बंद्यांच्या छावण्यांतून सुटका केली आहे. यशयाच्या काळातील बढाईखोर अश्‍शूरी लोकांप्रमाणे एके प्रसंगी यहोवाच्या साक्षीदारांविरूद्ध ॲडॉल्फ हिटलरहि गर्जला होता: “या टोळीला जर्मनीतून समूळ उपटून टाकीन.” पण प्रत्यक्षात, हिटलर आणि त्याच्या नाझींचेच समूळ उच्चाटन झाले. आज ज्यांनी यहोवावर संपूर्ण भाव ठेविला अशा जर्मन साक्षीदारांच्या छोट्याशा गटाची १,२१,२०० पर्यंत वाढ झाली आहे!—स्तोत्रसंहिता २७:१,२; रोमकर ८:३१, ३७.

५. कशाप्रकारे, यशया १२:३-५ मधील शब्द देवावर भाव ठेविणाऱ्‍या लोकांस आज लागू पडतात?

५ जेथे जेथे छळाचा उद्रेक उद्‌भवला, तेथे यहोवावर भाव ठेवीणाऱ्‍या लोकांस, जीवन पुरविणारे सत्याचे पाणी पिण्यास मिळाल्यामुळे त्यांचेठायी सतत हुशारी आणि बळ ही येतात. हे यशया १२:३-५ मध्ये देवाच्या संदेष्ट्याने म्हटल्याच्या समानतेत आहे: “तेव्हां तुम्ही तारणकूपातून उल्लासाने पाणी काढाल. त्या दिवशी तुम्ही म्हणाल: ‘यहोवाचा धन्यवाद करा. त्याच्या नामाचा जयघोष करा. राष्ट्रांमध्ये त्यांची कृत्ये विदित करा, त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. यहोवापुढे गायन करा कारण त्याची करणी प्रतापमय आहे; हे सर्व पृथ्वीवर विदित होवो.’” आम्ही राज्य सत्याचे जलपान मनापासून सतत करीत राहू या, व उपकार बुद्धीने आपला सार्वभौम प्रभू, यहोवा याचे नाम गौरवित राहू. यहोवावर संपूर्ण भाव ठेऊन, या, आपण सर्व: “वचनाची घोषणा . . . सुवेळी अवेळी,” करण्यास तयार राहू. (२ तिम. ४:२) विरोधक काहीहि करोत, याह यहोवा सतत प्रेमाने आमचे तारणाच्या वाटेवर मार्गदर्शन करील.

‘बलात्कारी लोकांची शहरे’

६, ७. (अ) यशया २५:१चे एकमतात यहोवाच्या भक्‍तांनी कशाकरिता त्याचे गौरव करावे? (ब) यशया २५:२, ३ हे एका विशिष्ट शहराचे कसे वर्णन करते? (क) संदेष्टा, बहुतेक कोणत्या शहरास उद्देशून बोलत असावा आणि का?

६ आपण आता यशया, अध्याय २५कडे वळू. पहिल्या वचनात आपण वाचतो: “हे यहोवा, तू माझा देव आहेस, मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन. कारण तू आश्‍चर्यकारक कृत्ये केली आहेत. तू आपले पुरातन संकल्प पूर्ण सत्वशीलतेने सिद्धीस नेले आहेत.” यहोवाचे विश्‍वस्त भक्‍त, त्याने त्यांच्यामध्ये जी आश्‍चर्यकारक कृत्ये केली त्याकरिता गौरव करितात. पण यानंतर यशया, याच्या तीव्र गुणवैधर्म्याकडे लक्ष आकर्षून यहोवाला म्हणतो: “तू शहराला मोडतोडीचा ढीग बनविले आहे; तटबंदीचा गांव धुळीस मिळविला आहे. विदेश्‍यांच्या वाड्यानी (बुरुजांनी) भरलेले शहर नष्ट केले आहे. त्याचा जीर्णोद्धार होणार नाही. . . . बलत्कारी लोकांची शहरे तुझे (यहोवाचे) भय धरतील.”—यशया २५:२, ३.

७ हे बलत्कारी कृत्यांचे अनामिक शहर कोणते होते? यशया कदाचित, देवाच्या लोकांचे जे सर्वदा शत्रू राहिले, त्या मवाब्याच्या राजधानीचा, आर शहराचा उल्लेख करीत असावा. पण यांतला संदर्भ सैतानी संस्थेच्या एका दुसऱ्‍याच शाखेला—आद्यशत्रू बाबेलोनला—अनुरूप असल्याचे दिसते. योग्य वेळी बाबेलोन, यहुदा आणि यरूशलेमाचा पाडाव करील, यहोवाच्या मंदिरास उध्वस्त करील आणि बचावून राहिलेल्यांस गुलामगिरीत लोटील. बाबेलोनचा राजा मोठ्या गर्वाने बोलल्याचे यशया अवतरण देतो: “मी आकाशात चढेन देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन. . . . मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन.” पण यहोवा या बाबेलचा अधःपात करण्यास व देवाच्या लोकांना परत त्यांच्या देशी वसविण्यास पारसाच्या कोरेशास सामोरे आणणार. भाकितानुसार, प्राचीन बाबेल भूमी “मोडतोडीचा ढीग” बनली आणि “धूळीस” मिळाली.—यशया १४:१२-१४; १३:१७-२२.

८, ९. (अ) कोणत्या दुसऱ्‍या बाबेलास यहोवाचे भक्‍त तोंड देऊन आहेत, व ती कशी वाढत गेली? (ब) यशया तिचे वर्णन कसे करतो व ती संज्ञा यथायोग्य कशी आहे?

८ तथापि, बाबेलाचा विध्वंस होऊन २,५०० वर्षें लोटली तरी यहोवाचे भक्‍त अद्यापहि दुसऱ्‍या एका बाबेलास—“थोर बाबेलास” तोंड देत आहेत जिला “मोठी बाबेल कळवंतिणींची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई” असे म्हटले आहे. (प्रकटीकरण १७:५) ती, खोट्या धर्मांचे जागतिक साम्राज्य आहे. नोहाच्या दिवसातील जलप्रलयाच्या थोडक्याच समयानंतर तिची सुरूवात झाली, त्यावेळी निम्रोदाने पुरातन बाबेलची उभारणी केली जे पुढे जाता खोट्या, सांप्रदायिक धर्मांचे जन्मस्थान बनले. येशू व त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती धर्माची स्थापना केल्यानंतर, मूर्तिपूजक बाबेल मधील “भुतांच्या शिक्षणा” आधारे स्वधर्मत्याग्यांनी पवित्र शास्त्रीय सत्यांना भ्रष्टाविले आणि ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक प्रणलीचा उगम झाला. (१ तिमथ्यी ४:१) हा तंतोतंत सारखा दिसणारा ख्रिस्ती धर्म व्यापक होऊन “मोठी बाबेल” हिचा मुख्य भाग बनला. आज हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत कानाकोपऱ्‍यांतून पसरलेला आहे. यशया तिचे वर्णन “बलात्कारी (जुलमी) लोकांची शहरे” असे करतो.

९ मुळ बाबेलची स्थापना होऊन चार हजारापेक्षा अधिक वर्षांचा काळ आतापर्यंत झाला. त्यात क्रुर हुकुमशहांनी जुलमी पाद्रीवर्गाचा, आपले हस्तक म्हणून सर्वसाधारण लोकांना दबावाखाली आणण्यास तसेच त्यांच्यावर हुकुमशाही बजाविण्याकरिता वेठीस धरले. या प्रकारे “मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.” (उपदेशक ८:९) येशूला लोकांचा कळवळा येई “कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते रंजीस झालेले व शिणलेले होते.” ही स्थिती या खोट्या धर्ममेंढपाळाकरवी झाली. आज, जो गट अतिशय दडपशाहीच्या वृत्तिने वागतो तो “पापपुरुष” म्हणून ओळखला जातो व तो, यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध व छळ करण्यांत अग्रगण्य आहे, त्या ख्रिस्ती धर्मराज्यांतील स्वाभिमानी पाद्रींचा मिळून बनलेला आहे.—मत्तय ९:३६; २ थेस्स. २:३, ४.

१०. (अ) यशया २५:३चे एकमतात, कशाप्रकारे “बलात्कारी लोकांच्या शहरांना” यहोवाला गौरविण्यास, तसेच त्याचे भय बाळगण्यास भाग पाडण्यात आले? (ब) यशया २५:४, ५ मध्ये यहोवा “दुर्बल” आणि “बलात्कारी” या दोहोंचा कसा समाचार घेतो याबद्दल यशया कसे बोलतो?

१० यहोवाने १९१९ मध्ये त्याच्या खऱ्‍या भक्‍तांची “थोर बाबेलच्या” तावडीतून सुटका केली. त्या ‘बलात्कारी (जुलमी) लोकांच्या शहरांना’ यहोवाचे गौरव करण्यास भाग पाडण्यास आले, ज्यात तिला कटुत्वात का होईना, पण त्याने त्याच्या भक्‍तांना महान कार्यसिद्धीकरिता पुनर्स्थापित करून जे “आश्‍चर्यकारक कृत्य” केले ते पाहावे लागले. खोट्या धर्मवाद्यांना, त्याच्यांकरिता जे काही भवितव्यात राखून ठेविले आहे त्याच्या अपेक्षेत यहोवाचे भय बाळगण्यास भाग पाडले. अनेक शतके जुलमी पाद्रीगटाने स्वतःस सामान्य लोकांवर उंचावले. पण आता यशया यहोवाबद्दल म्हणतो: “कारण उग्र लोकांचा झपाटा जसा वादळाप्रमाणे भिंतीवर आदळावा तसा तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा त्यास झालास. रुक्ष भूमीवर जसा सूर्याचा ताप शांत व्हावा तसा उग्र लोकांचा गोंगाट तू शांत करितोस; मेघाच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो तसे बलात्काऱ्‍यांचे जयगीत होते.”—यशया २५:४, ५.

“बाबेल” मध्ये आनंदोत्सवाचे गीत नाही

११. “मोठी बाबेल”च्या सबंध राज्यात आनंदोत्सवाचे गीत का ऐकू येत नाही, आणि याचे प्रदर्शन असिसी येथे आंतरधर्मीय सभेत कसे दिसून आले?

११ हीच आज, “मोठी बाबेल” हिच्या सबंध राज्याची खरी स्थिती आहे. तिजमध्ये आज आनंदोत्सवाचे गीत ऐकू येत नाही. कोणत्या देवांची भक्‍ति करावी या गोंधळात तिचे धर्मगुरु पडले आहेत. हेच, इटली मधील असिसी येथे ऑक्टोबर २७, १९८६ला जो अंतरधर्मी मेळा भरला होता त्यात दिसून आले. तेथे, संयुक्‍त राष्ट्र सभेच्या शांती वर्षाच्या घोषणेस अनुसरून पोप जॉन पॉल दुसरे यांनी “मोठी बाबेल” मधील सर्व धर्मीय प्रमुखांना एकत्रित केले होते. त्या सर्वांनी मिळून शांतीकरिता प्रार्थना केल्या, काही बौद्ध भिक्षूंनी तर दिवसभरात १२ तास लांबीच्या प्रार्थना केल्या. पण त्यांनी कोणाकडे प्रार्थना केल्या? मरियेकडे? का ख्रिस्ती धर्मराज्यगटाच्या पवित्र त्रेकत्वाकडे? किंवा हिंदूच्या त्रिमूर्तिकडे? किंवा बुद्ध धर्मीयांच्या हजारो देवांकडे? किंवा अल्लाकडे? किंवा कोणा पशूकडे, जसे शिंतोईच्या भक्‍तितील कोल्हा? किंवा अमेरिकन इंडियन मधील कावळा वंशाच्या प्रसिद्ध प्रार्थना म्हटल्या? त्यांच्याबद्दल अहवालात म्हटले होते ‘ते तर त्याच्या राजदरबारी पेहेरावाच्या शिरोभूषणासह’ अवतरले होते व ते शांतीच्या नळकांडयास पेटवून ‘थंड हवेत त्याचा धूर वर जात असतांना’ त्यामध्ये प्रार्थना म्हटल्या.

१२. मीखा आणि यशया यांच्या कोणत्या शब्दांकडे त्यांनी लक्ष दिले नाही?

१२ एक गोष्ट निश्‍चित की: या धर्मनिष्ठांपैकी बुद्धांचा दलाई लामा पासून ते “हिज एमिनन्स” ग्रीक ऑर्थडॉक्स चर्चच्या मेथोडियस पर्यंत, कोणीहि पवित्र शास्रातील मीखा ४:५ मधील शास्त्रीय शब्द उच्चारले नाहीत: “आम्ही, यहोवा, आमचा देव याच्या नांवाने सदासर्वकाळ चालू.” त्यांनी यशया, अध्याय ४२ वा वचने ५ आणि ८ मधील प्रेरित विधानांतील सत्यास आपली संमति दिली नाही: “आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकात प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्‍यांस जिवित देणारा देव यहोवा असे म्हणतो. ‘मी यहोवा आहे, हे माझे नाम आहे, मी आपले गौरव दुसऱ्‍यास देऊ देणार नाही. मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही.’”

१३. असिसी येथे प्रत्यक्षात काय घडले, व पृथ्वीवर असताना येशूने याच गोष्टीस कसे धिक्कारले होते?

१३ असिसी येथे, भव्य संमारंभ, भिन्‍नत्व दर्शक पेहराव आणि प्रार्थनांचे पठण यांचेद्वारा नेत्रदिपक जाहीर प्रदर्शन घडविले होते. हेच, पृथ्वीवर असताना यहोवाचा पुत्र येशूने धिक्कारले होते. त्या दिवसातील धर्म पुढाऱ्‍याबद्दल तो म्हणाला होता: की ते “आपली सर्व कामे लोकांनी पहावे म्हणून . . . करतात.” याकारणास्तव त्यांना तो थेटपणे म्हणला: “अहो शास्त्र्यांनो, व परूश्‍यांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हास धिक्कार असो! कारण लोकांनी आत जाऊ नये म्हणून तुम्ही स्वर्गाचे राज्य बंद करिता; तुम्ही स्वतः आत जात नाही व आत जाणाऱ्‍यांसहि जाऊ देत नाही.” (मत्तय २३:५, १३; मत्तय ६:१-८ पाहा) भव्य देखावा किंवा भव्य भक्‍तिस्थान ही देवाच्या हिशेबी नाहीत. तर येशूने म्हटले: “देव आत्मा आहे. आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”—योहान ४:२१, २४.

शांतीचा खरा उगम

१४. (अ) शांती प्राप्यर्थ जागतिक धर्मांनी केलेल्या प्रार्थना दांभिकतेतील का ठरतात? (ब) ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्माबद्दल ईश्‍वरी न्यायदंड काय आहे?

१४ जगीक धर्मांतील गोंधळाकडे पाहता, कोणी एवढा सालस असेल का की, जो ही समज बाळगेल की या धर्म नेत्यांच्या प्रार्थनांनी जागतिक शांती स्थापन होईल? आज शेकडो वर्षें ते दांभिकपणात प्रार्थना करीत आहेत; सोबत राष्ट्र राष्ट्राच्या युद्धात, धर्मयुद्धात आणि कुप्रसिद्ध धर्मछळणूकीत सक्रीय भाग घेत आहेत. यहोवाकडील संदेष्टा विचारतो: “कुशीला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील का? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हास चांगले आचरण करता येईल.” (यिर्मया १३:२३) “मोठी बाबेल”—खोट्या धर्मांचे जगव्याप्त साम्राज्य—याचा प्रमुख भाग असल्याच्या कारणाने ख्रिस्ती धर्मराज्याचा धर्म खासकरून ईश्‍वरी तागडीने तोललेला आहे व तो फारच उणा ठरला. तो नाशास जाणार!—यिर्मया २:३४, ३५, ३७; ५:२९-३१; दानिएल ५:२७.

१५. कशाप्रकारे यहोवा सार्वकालिक शांतता आणील, व जे त्याजवर भाव ठेऊन आहेत ते शांतीच्या समर्थनात कशी सेवा करितात?

१५ यहोवा, जो “शांतीचा देव,” या सर्व रक्‍तपात्यांचा कायमचा नाश करून, या पृथ्वीवर ज्यांना सत्य व धार्मिकतेची आवड आहे अशांची वसाहत करून चिरस्थायी शांती स्थापित करील. (फिलिपैकर ४:९) राजा दाविदाच्या विचारानुसार, जे लीनजन, जे “यहोवावर भाव ठेवितात व सदाचाराने वागतात,” तेच “पृथ्वीचे वतन” मिळवितील आणि “ते उदंड सुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्रसंहिता ३७:३, ११) जे सर्व नेहमी ‘यहोवावर भाव ठेवितात व चांगले तेच करितात,’ ते अशा मार्गी शांतीचा पाठपुरावा करतात की जे आज विरोधात्मक देवांना संमिश्रित प्रार्थना करतात त्यांना कधीच उमगणार नाही.—स्तोत्रसंहिता ११५:२-८; यशया ४४:१४-२०.

१६. ज्यांना “बलात्कारी लोकांच्या शहरातून” गोळा करण्यात आले अशा दीन जनांस यहोवा कोणती मेजवानी पुरवितो?

१६ जे देवाचे स्वतःचे लोक आहेत त्यांच्या प्रार्थना व आशा आणि जे “मोठी बाबेल”चे समर्थक यांच्यामध्ये केवढा मोठा फरक आहे. आम्हाठायी केवढी आवड आहे की: “बलात्काऱ्‍यांचे जयगीत” क्षीण होते. (यशया २५:५) पण तेच ज्या लीन जनास, “बलात्कारी लोकांची शहरे” यांतून गोळा केले जात आहे अशांचे बद्दल यशया पुढे म्हणतो: “सेनाधीश यहोवा ह्‍या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्ठान्‍नाची मेजवानी, राखून ठेविलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.” (यशया २५:६) जे यहोवाचे भक्‍त, ते आजहि ज्या आध्यात्मिक मेजवान्यांचा स्वाद घेतात त्या खरोखरी संतोषकारक, मिष्ठान्‍न मेजवान्या असतात. त्यामुळे आमच्या अंतःकरणांना सहन करण्याचे बळ प्राप्त होते. शिवाय, यहोवाने नवीन पृथ्वीत प्राप्त होणाऱ्‍या चांगल्या मिष्ठान्‍नाच्या मेजवानीचे अभिवचन वेळोवेळी दिले असल्यामुळे यहोवाची सेवा करण्यातील आमचा आनंद द्विगुणीत होतो.—स्तोत्रसंहिता १०४:१, १४, १५; मत्तय १९:२८, किंग जेम्स.

१७. कोणती, “आश्‍चर्यकारक कृत्ये” यहोवा करितो, व त्यामुळे कोणता आनंद मिळेल?

१७ लवकरच, याह यहोवा, “मोठी बाबेल”चा विध्वंस करण्यासोबतच सबंध मानवजातीस आदामाच्या पापामुळे झाकून टाकणारे नापसंतीचे “आच्छादन” काढून टाकण्याद्वारा “आश्‍चर्यकारक कृत्ये” करील. (यशया २५:७) होय, येशूच्या अर्पणाधारे, आमचा देव, यशया २५:८ मधील भविष्यवादाची पूर्णता करील: “तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो, प्रभू यहोवा सर्वांच्या मुखांवरील अश्रु पुसितो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करितो, कारण यहोवा हे बोलला आहे.” आदामाकरवीचे आलेले पाप आणि मरण काढून टाकण्यात आले आणि जे मरणाच्या मुठीत आहेत ते परत उठून येत असता त्यांचे स्वागत करण्यात केवढा आनंद वाटेल बरे! जो सर्वथोर निंरक, दियाबल सैतान, त्याला यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांनी समर्पक उत्तर दिले हे जाणणे केवढ्या आनंदाचे वाटेल. (नीतिसूत्रे २७:११) त्यापुढे कोणीहि त्यांच्यावर दोषारोप लावू शकणार नाही कारण त्यांनी त्यांच्या सत्वपरिक्षणात विजय मिळविलेला असेल. यहोवाने स्वतः “पूर्ण सत्वशीलतेने” आपल्या सर्व भविष्य वचनांची पूर्णता “आपले पुरातन संकल्प” पुरे केलेले असतील. सबंध पृथ्वी नीतिमान नंदनवन बनलेली असेल व तीत धार्मिकांची वस्ती असेल. केवढे उज्वल भविष्य!

१८. दबाव जरी असले, तरी आम्ही निश्‍चयपूर्वक, यशया २५:९ नुसार काय करीत राहू?

१८ या अंधकारमय समयांतहि आम्ही सर्वकाळ यहोवावर भाव ठेऊन चालत राहिल्यास निश्‍चित प्रतिफल प्राप्त होईल. आमच्या दैनंदिन जीवनात आम्ही ज्या सर्व दबावांना तोंड देत आहोत—मग ते आमच्या कुटुंबाचे पालन करणे असो की शाळेत पवित्र शास्त्रीय तत्वांना घट्ट चिटकून राहणे, किंवा अवघड क्षेत्रावर नेटाने साक्षीकार्य करीत राहणे असो—आम्ही सर्वकाळ यहोवावर विश्‍वस्त राहू या! आम्ही जर यहोवासोबत तो “प्रार्थना ऐक”णारा आहे म्हणून निकटवर्तीय नातेसंबंध राखला तर तो आम्हास तारणाची हमी देईल. (स्तोत्रसंहिता ६५:२) यास्तव, या आम्ही त्यांच्या संगतीत राहण्याचा निश्‍चय राखू जे, यशयाच्या २५:९ शब्दात, म्हणतात: “पाहा, हा आमचा देव! याची आम्ही आशा धरुन राहिलो, तो आमचे तारण करील. हाच यहोवा आहे; याची आम्ही आशा धरून राहिलो, त्याने केलेल्या तारणाने आपण उल्लास व हर्ष पावूं.”

उजळणीकरिता प्रश्‍न

◻ याह यहोवा आमचे बल व ताकद कसा आहे?

◻ “बलात्कारी (उग्र) लोकांची शहरे” काय आहेत?

◻ कशाप्रकारे ‘बलात्कारी (उग्र) लोकांच्या शहरांना’ यहोवाचे गौरव करण्यास व त्याचे भय बाळगण्यास भाग पाडण्यात आले?

◻ काय हे स्पष्ट करते की “मोठी बाबेल” मध्ये आनंदोत्सवाचे गीत ऐकू येत नाही?

◻ कोणती “आश्‍चर्यकारक कृत्ये” यहोवा अद्यापी आपल्या लोकांकरिता करणार आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा