वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १/१ पृ. ७
  • बातम्यांवरील दृष्टीक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बातम्यांवरील दृष्टीक्षेप
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चुकीचे चिन्ह
  • पाणी नाही—जीवन नाही
  • मंगळावरील यंत्रमानवाची शोधमोहीम
    सावध राहा!—१९९८
  • आपली एकमेव सौरमाला कशी अस्तित्वात आली?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • कुंडली—साहाय्यक की घातक?
    सावध राहा! माहितीपत्रक ६-३ (gbr6-3)
  • राशिचक्र त्याचा फलज्योतिष याबरोबर संबंध
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १/१ पृ. ७

बातम्यांवरील दृष्टीक्षेप

चुकीचे चिन्ह

“तुमचा ग्रह कोणता आहे?” हा प्रश्‍न ज्योतिषांनी तयार केलेल्या “ग्रहमान” नकाशाचा परामर्श घेणाऱ्‍या लाखो लोकांना महत्वाचा वाटतो. यांचा असा विश्‍वास आहे की स्वतःच्या जन्माच्या राशिचक्रास अनुलक्षून असणाऱ्‍या नक्षत्रगणाची म्हणजे तारे, ग्रह, सूर्य व चंद्र यांची स्थिती ही त्यांच्या जीवनावर फार मोठा प्रभाव पाडीत असते. परंतु, लंडनच्या इंडिपेन्डंट या दैनिकाच्या मते ज्योतिषकार लोकांना चुकीचे चिन्ह देत आहेत. कुंडलीसाठी वापरण्यात येणारा “ग्रहमान” नकाशा २,००० वर्षांआधी ठरविलेल्या ज्योतिषी “नियम” यावर आधारीत आहे.

इंडिपेन्डंट दैनिक असे म्हणतेः “कोणी ज्योतिष आज जन्मलेल्या नवजात अर्भकाच्या पालकाला सांगेल की या मुलाची वा मुलीची रास कर्क आहे.” तरीपण अहवाल पुढे म्हणतोः “पण तेच या ज्योतिषाने आकाशातील सूर्याच्या स्थितीद्वारे ही रास काढली तर हा सूर्य मिथुन राशीत आहे.” हे असे कसे दिसते? खगोलशास्त्रज्ञ म्हणतात की ते “विषुव किंवा रात्र व दिवस समान असणाऱ्‍या काळाचे पर्व आहे,” असे अद्‌भूत की ज्यात पृथ्वीचा आस भोवरा मंदगतिने फिरताना जसा होतो त्याप्रमाणेच होत असतो. हे “पर्व” किंवा भोवऱ्‍यासारखे गडगडणे हे ३६० अंश चक्राच्या गतिने दर २५,८०० वर्षाला पूर्ण होते, म्हणजे, ते विषुव दर वर्षी पृथ्वीचा परिघ ५० सेकंदाने कापते किंवा ७२ वर्षांत एक अंश कापते. यामुळे ग्रहमानानुसार सूर्याची आकाशातील स्थिती गेल्या २,००० वर्षांत राशिचक्राच्या एका पूर्ण चिन्हाने मागे सरकली आहे. याचकारणास्तव, “जन्माविषयी असणारे राशिचक्र जन्मप्रसंगी असणारे आकाशाचे अचूक चित्र देऊ शकत नाही.” असे रिचर्ड एफ. स्मिथ आपले पुस्तक प्रिल्युड टु सायन्स या पुस्तकात म्हणतात. “या जगात वृश्‍चिकराशित जन्मलेले बहुतेक जण,” ते म्हणतात की, “अशा वेळी जन्मले जेव्हा सूर्य तूळ राशीत होता; सिंहराशीतील सर्वजण खरे पाहता कर्कराशीतले, आणि कर्कराशीतले मिथुन राशीत वगैरे वगैरे आहेत.”

नक्षत्र नकाशाचा आणि कुंडलीचा बेभरवसा मार्गदर्शनाच्या बाबतीत निर्मात्याकडे आपले लक्ष लावण्याची सूज्ञता वदवितो. तो आम्हाला निर्माण झालेल्या वस्तुंकडे लक्ष लावावयास सांगत नाही. (रोमकर १:२४, २५) तथापि, आम्ही कुंडलीचा वापर का टाळावा याचे आणखी प्रबळ कारण हे आहे की, ते “सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्‍यांची सेवा व पूजा” करण्याकडे निरवू शकते आणि ही गोष्ट “[देवाच्या] आज्ञांचे उल्लंघन” करणारी आहे.—अनुवाद १७:२-५.

पाणी नाही—जीवन नाही

असा हा निर्वाळा प्राध्यापक नॉर्मन एच. होरोवीच यांनी दिला. ते मंगळाविषयी संशोधन करणाऱ्‍या १९६५-७६ मरीनर आणि व्हायकिंग प्रकल्पाशी निगडीत असणारे शास्त्रज्ञ आहेत.

टु ओटोपिआ ॲण्ड बॅकः द सर्च फॉर लाइफ इन द सोलर सिस्टम या पुस्तकात प्राध्यापक होरोवीच यांनी निरिक्षिले आहे की, या प्रकल्पामुळे जे संशोधन हाती लागले आहे ते हे सांगते की आमच्या सौर व्यवस्थेत असणाऱ्‍या मंगळावर किंवा इतर ग्रहावर जीवन अस्तित्वात आहे का. “मंगळाच्या बाबतीत पाहता,” ते म्हणतात, “आमचा ग्रह, सूर्याच्या पूर्ण दृष्टीपथात राहणाऱ्‍या पाण्याने भरलेले समुद्र यावर प्रभुत्व असणाऱ्‍या वातावरणाची उणीव आढळून येते.” संशोधनाने हे मान्य केले की मंगळावर पाणी नाही.

मंगळावर संभाव्य जीवनाची शक्यता असू शकते का याविषयीच्या काळजीपूर्वक परिक्षणानंतर होरोवीच म्हणतातः “मंगळावर जीवसृष्टी आढळते की काय ते पाहण्यात अपयश आले ही मोठी निराशेची गोष्ट आहे. आमच्या सौर व्यवस्थेत स्थलचर जीवनाच्या वसाहतीसाठी आवश्‍यक असणाऱ्‍या गोष्टींच्या मंगळ कमीत कमी शक्यता दाखवीत असल्यामुळे हे निदान काढता येते की आकाशगंगेतील आपल्या भागात केवळ पृथ्वीच असा ग्रह आहे ज्यात जीवन विकसित होत असलेले दिसते.”

तर मग, प्राचीन काळचा संदेष्टा यशया याने आपल्या पृथ्वीविषयी लिहिताना, तिच्या निर्मात्याने “तिजवर लोकवस्ती राहावी म्हणून ती घडली” हे बोल लिहिले त्याची किती खरी वास्तवता आज आपल्याला वाटते बरे! (यशया ४५:१८) पाण्याचा उल्लेख तर पवित्र शास्त्रातील निर्मिती कार्याच्या आरंभालाच आला आहे. होय, पृथ्वीवरील कोणाही जीवाची निर्मिती करण्याआधी पाण्याची तरतूद करणे योग्यच होते. मार्सच्या प्रकल्पाने याची साक्ष दिलीच आहे की, आत्मिक क्षेत्राबाहेर जेथे पाणी नाही तेथे जीवन असू शकत नाही.—उत्पत्ती १:१-१०.

[७ पानांवरील चित्रं]

“व्हायकिंग २” या यानातून दिसणारा मंगळावरील निर्जिव पृष्ठभाग

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा