शेवटले दिवस—कापणीचा काळ
“नंतर मी पाहिले तो पहा, पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता.”—प्रकटीकरण १४:१४.
१. या शतकाला अद्वितीय करणाऱ्या काही गोष्टी कोणत्या आहेत?
या विसाव्या शतकाचा काळ केवढा गलबल्याचा ठरला! मानवजातीला दोन भयानक जागतिक युद्धातून जावे लागले. देशामागून देशात क्रांत्या घडल्या. मानवी इतिहासात पूर्वी नव्हता इतका अधिक त्रास दुष्काळाने ओढावून आणला. आर्थिक अनिश्चितता, गुन्हे, प्रदुषण आणि भीतादायक आजार यांनी सर्वांच्या कल्याणाला दहशत घातली आहे. याच वेळेला मानवाने प्रचंड विज्ञानशास्त्रीय प्रगति केली आहे. त्याने अणुची शक्ती कामाला लावली आणि चंद्रावरही आपले पाऊल ठेवले. आमची पिढी कित्येक बाबतीत खरीच अद्वितीय आहे. तरीपण एक गोष्ट मात्र आमच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण घटना अशी ठळकपणे उभी राहते व तिच्यासमोर इतर सर्व गोष्टी फिक्या वाटतात.
२. दानीएलाद्वारे भाकित असणारी कोणती घटना आमच्या काळात घडणार होती?
२ ही खरी सर्वात महत्वपूर्ण घटना मागे इ.स.पूर्वीच्या ६व्या शतकात दानीएल संदेष्ट्याकरवी भाकित करण्यात आली. त्याने दिलेला हा इश्वरप्रेरित अहवाल ऐका: “तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली.”—दानीएल ७:१३, १४.
३. (अ) “पुराण पुरुष” कोण आहे व त्याने “मानव पुत्रासारखा कोणी” याला काय दिले? (ब) हा “मानव पुत्रासारखा कोणी” कोण आहे व येशूने त्याची ओळख स्पष्ट केली तेव्हा यहुदी धर्मपुढाऱ्यांनी कशी प्रतिक्रिया दर्शविली?
३ तो “पुराण पुरुष” यहोवा देव आहे. दानीएल त्याला “आकाशातील मेघा”त म्हणजे अदृश्य आत्मिक क्षेत्रात बघतो व तो “मानव पुत्रासारखा कोणी” याला राज्यपद देताना पाहतो. हा “कोणी” कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर येशू ख्रिस्ताने मागे इ.स. ३३ मध्ये सन्हेद्रीनसमोर चौकशीसाठी उभे असताना दिले. यहुदी याजकाने तू ख्रिस्त आहेस की नाही हे सांगण्याची त्याला शपथ घातली. याच्या उत्तरात येशूने दानीएलाचा भविष्यवाद स्वतःला लावून म्हटले: “ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पहाल.” यहोवाने निवडलेल्या राजापुढे नमन करण्याऐवजी प्रमुख याजकाने त्याच्यावर दुर्भाषण करण्याचा आरोप केला. नंतर यहुदी धर्मपुढाऱ्यांनी पंतय पिलाताला येशूस मरणदंड देण्याची गळ घातली.—मत्तय २६:६३–६५; २७:१, २, ११–२६.
४. येशूला राज्यपदाचा मुकुट केव्हा मिळाला व कोणता विरोध असताना सुद्धा?
४ तथापि जेव्हा येशूचे मृतातुन पुनरूत्थान करण्यात आले व तो स्वर्गास गेला आणि आपल्या राज्यपदाची देवाकडून प्राप्ती होण्याची नियुक्त वेळ येईपर्यंत थांबून राहिला तेव्हा त्या यहुदी धर्मनेत्यांचा येशूचे ते शब्द खोडून काढण्याचा डाव पूर्णपणे फसला. (प्रे. कृत्ये २:२४, ३३, ३४; स्तोत्रसंहिता ११०:१, २) ती नियुक्त वेळ १९१४ मध्ये आली. त्या वर्षाच्या उत्तरार्धात घडलेल्या घटनांच्या द्वारे हे दिसले की येशूला “पुराणपुरुष” याजकडून राज्यपदाचा मुकुट प्राप्त झाला व तो राज्य करू लागला. (मत्तय २४:३–४२) त्या नवीनच जन्मलेल्या राज्यास कडवा विरोध सहन करावा लागला. तथापि, पहिल्या शतकातील यहुदी धर्मपुढारी, सर्व राष्ट्रांचे एकत्रित बळ आणि इतकेच काय पण सैतान व दुरात्मे यांना सुद्धा देवाची इच्छा पूर्ण होण्याला बांध घालता आला नाही. (स्तोत्रसंहिता २:२, ४–६; प्रकटीकरण १२:१–१२) १९१४ मध्ये योग्य वेळी स्वर्गात सांघिक गीत निनादले: “जगाचे राज्य आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.” (प्रकटीकरण ११:१५) त्या तारखेपासून आम्ही या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या दिवसा”त राहात आहोत.—२ तिमथ्यी ३:१.
कापणीचा काळ
५. (अ) दानीएलाच्या भविष्यवादानुरूप नव्यानेच मुकुटमंडित झालेल्या राजाची कोण सेवा करतील? (ब) योहानाने असा कोणता दृष्टांत पाहिला की ज्यामध्ये सुद्धा येशूला नव्याने मुकुट मंडित झालेला राजा असे दाखविण्यात आले?
५ दानीएलाच्या भविष्यवादानुरूप येशूला त्याचा मुकुट प्राप्त होतो त्यावेळी “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक . . . त्याची सेवा कर”तील. पण जर मानवजात एकत्रितपणे त्याचा राजा म्हणून धिक्कार करते तर हे कसे शक्य आहे? याचे उत्तर प्रेषित योहानास जो नाट्यमय दृष्टांत प्रकटविला गेला त्यात सापडते. योहानाने पाहिले ते तो असे सांगतो: “मी पाहिले तो पहा, पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता.” (प्रकटीकरण १४:१४) दानीएलाच्या दृष्टांताप्रमाणेच येथेही येशू मेघावर आरूढ असल्याचे व त्याची ओळख “मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक” अशी मिळते. त्याच्या डोक्यावर राज्यपदाचा मुकुट आहे पण हाती राजदंड नव्हे तर कापणीचा विळा आहे. ते का बरे?
६. नव्याने मुकुटमंडित असणाऱ्या येशूला यहोवा कोणते काम करण्याची आज्ञा देतो?
६ योहान पुढे म्हणतो: “तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून, जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला: ‘तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.” येशू, राजा असला तरीही, “मंदिरातून” यहोवाकडून कळविण्यात आलेला आदेश ऐकतो. तद्वत, शेवटल्या दिवसात कापणीच्या कामात समाविष्ट व्हावे असे यहोवा त्याला सांगतो तेव्हा येशू त्याचे पालन करतो. येशूने “आपला विळा चालविला, आणि पृथ्वीची कापणी झाली.”—प्रकटीकरण १४:१५, १६; इब्रीयांस ९:२४; १ करिंथकर ११:३.
७. (अ) “पृथ्वीची कापणी” ही काय आहे? (ब) त्या “कापणी”ची सुरुवात कशी झाली?
७ “पृथ्वीची कापणी” ही काय आहे? ती, या सैतानी व्यवस्थीकरणातून बाहेर येऊन यहोवा व त्याचा नियुक्त राजा याची सेवा करणारे लोक आहेत. ही कापणी, ज्यांना येशूसोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात राज्य करायचे आहे त्या १,४४,००० पैकीच्या शेषांना गोळा करण्याद्वारे सुरु हाते. (मत्तय १३:३७–४३) हे “देवाचे इस्राएल,” “देवाचे व कोकऱ्याचे प्रथमफळ” आहेत. यांना “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे” या मधून विकत घेतले आहे. (गलतीकर ६:१६; प्रकटीकरण १४:४; ५:९, १०) अशाप्रकारे, “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक” यातील काही निवडक जण सिंहासनाधिष्ठ येशूची सेवा करू लागतात.
८. (अ) अभिषिक्तातील शेवटल्या जणांचे गोळा करणे कोणत्या वर्षी संपुष्टात आले हे स्पष्ट आहे? (ब) योहानास दिलेल्या दुसऱ्या दृष्टांताप्रमाणे हे कापणी कार्य कसे पुढे चालू राहिले?
८ तथापि, हे एकटेच नाहीत. योहान आणखी एका दृष्टांतात १,४४,००० जणांच्या शेवटावर शिक्कामोर्तब झाल्याचे बघतो. (प्रकटीकरण ७:१–८) हे एकत्रीकरण १९३५ मध्ये संपुष्टात आले. पण यानंतर योहान कळवितो की, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळया भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला” त्याच्या दृष्टीस पडला. (प्रकटीकरण ७:९–१७) तद्वत, “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक” यातून अधिकाधिक लोक येशूची राजा या अर्थी सेवा करण्यासाठी येत असल्यामुळे कापणी चालू आहे हे कळते.
९. हे नवीन जण कोण आहेत आणि “शेवटल्या दिवसात” हे दृष्टीपथात येतील याविषयी आणखी कोणत्या भविष्यवादात उल्लेख आढळतो?
९ नव्यानेच आलेले हे लोक यहोवाचा नियुक्त राजा याच्या वर्चस्वाखालील नंदनवनमय पृथ्वीवर जीवनाचा आनंद उपभोगण्याकडे दृष्टी लावून आहेत. (स्तोत्रसंहिता ३७:११, २९; ७२:७–९) त्यांचे एकत्रीकरण आणखी काही भविष्यवादात भाकित करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, यशयाने भाकित केले की “शेवटल्या दिवसात” राष्ट्रे यहोवाच्या मंदिराकडे धाव घेतील. (यशया २:२, ३) हाग्गयाने राष्ट्रांचे हिंदळणे भाकित केले की ज्यातून “सर्व राष्ट्रातील इष्ट वस्तु” बाहेर पडतील. (हाग्गय २:७) जखर्याने “सर्व राष्ट्रापैकीचे दहा जण” देवाच्या लोकांना येऊन मिळतील असे भाष्य केले. (जखर्या ८:२३) याशिवाय येशूने स्वत: “मोठा लोकसमुदाय” याविषयीचे भाकित केले. त्याने म्हटले: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील, आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील. मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील.”—मत्तय २५:३१–३३.
१०. (अ) कशाकरवी “पृथ्वीची कापणी” होत आहे? (ब) या कामात कोण दिव्यदूतांसोबत सहकार्य देत आहेत?
१० होय, कोण “मेंढरे” व कोण “शेरडे” ते पाहण्यासाठी सबंध मानवजातीचे आज पृथ्थकरण होत आहे. हे परीक्षणाचे कार्य कशाने तडीस नेले जाते? योहानाच्या दृष्टांतानुसार “पृथ्वीची कापणी” दिव्यदूतांकरवी घोषित करण्यात आलेल्या प्रबळ संदेशाच्या अनुषंगाने करण्यात येत आहे. एक दूत “सार्वकालिक सुवार्ते”चा संदेश देत आहे. दुसरा “मोठी बाबेल” पडल्याचे सांगतो. तिसरा “श्वापद” म्हणजे सैतानाची राजकारणी व्यवस्था यास उपासना न देण्याची ताकीद देतो. (प्रकटीकरण १४:६–१०) हे खरे की या दिव्यदूतांची वाणी कोणीही प्रत्यक्षात ऐकली नाही. तरीपण त्यांच्या सारखाच विश्वासू मानवाद्वारे घोषित होत असणारा संदेश मात्र त्यांनी ऐकला आहे. (मत्तय २४:१४; यशया ४८:२०; जखर्या २:७; याकोब १:२७; १ योहान २:१५–१७) तद्वत हे स्पष्टच आहे की दिव्यदूतांच्या मार्गदर्शनाखाली मानवी मुखांकरवी हा संदेश घोषित होत आहे. कोणी माणूस या संदेशाला जी प्रतिक्रिया दाखवितो त्याद्वारे तो ‘मेंढरू’ आहे की ‘शेरडू’ ते ठरविण्यात येते. केवळ यहोवाच्या साक्षीदारांनीच या २०व्या शतकात या महत्वपूर्ण कार्यात देवदूतांना सहकार्य दिले आहे.
११. त्या दिव्यदूतीय संदेशाचा सर्वत्र प्रसार करणे किती महत्वपूर्ण आहे?
११ या संदेशाचा प्रसार हे इतर कोणाही कामापेक्षा अत्यंत खडतर काम आहे. या कामाच्या महत्पूर्णतेसोबत कोणतीही राजकीय उलाढाल वा विज्ञानशास्त्रीय संशोधन तुल्य होणार नाही. हे संदेश मानवजातीच्या सर्व समस्यांच्या उपायाकडे निर्देश करतात व विश्वासधारी मानवांच्या चिरकालिक तारणाबद्दल सांगतात. शिवाय सर्वांत महत्वाचे ते हे की याचा संबंध यहोवाच्या नामाच्या पवित्रीकरणाशी आहे.
वार्षिक अहवाल
१२, १३. वार्षिक अहवालाच्या काही तपशीलाद्वारे हे स्पष्ट करा की केवढी मोठी “कापणी” करण्यात आली आहे.
१२ या कारणास्तव, यहोवाचे साक्षीदार दरवर्षी यहोवाच्या संस्थेच्या कार्य हालचालीचा अहवाल जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यांच्या कार्यावर देवाचा सतत आशीर्वाद आहे हे पाहण्यात त्यांना मोठा आनंद वाटतो. १९८८च्या वार्षिक पुस्तकात तुम्ही हा अहवाल तपासून पाहिला तर दिव्यदूत आणि त्यांचे मानवी सहकर्मी गेल्या वर्षात किती क्रियाशील होते ते तुम्हाला पाहता येईल.
१३ सुवार्ता २१० देशात म्हणजे सध्या जेथे पोहंचणे शक्य आहे त्या ‘सर्व वंश, राष्ट्रीय गट व भाषा’ येथे गाजविली गेली. (मार्क १३:१०) हे कार्य करण्यासाठी ३३,९५,६१२च्या उच्चांकाने एकत्रितपणे काम केले—असे ख्रिस्ती इतिहासात पूर्वी कधीही घडले नव्हते. काही देशाची आकडेवारी मोठी छाप पाडते. अमेरिकेत ७,७३,२१९चे नवे शिखर गाठले गेले. आणखी सहा देशात म्हणजे ब्रिटन, जर्मनी, इटली, जपान, नायजेरिया व फिलिपाइन्स यांनी १,००,०००चे शिखर ओलांडल्याचे कळविले आहे. पण तेच दुसऱ्या बाजुस पाहता, मोठी लोकसंख्या असणारे व काही हजार व कमी प्रचारक असणारेही देश आहेत. या विश्वासू जिवांचे कार्य सुद्धा ते कठीण परिस्थितीत सत्याचा प्रकाश झळकविण्याचे सातत्याने प्रयत्न करतात तेव्हा खरेच मोलवान ठरते.—मत्तय ५:१४–१६.
१४. यहोवाच्या संस्थेत कोणत्या प्रकारचे लोक गोळा केले जात आहेत?
१४ हे खेर की देवाचे लोक नुसत्या संख्या वाढीची आवड धरणारे नाहीत. त्यांना ठाऊक आहे की जे यहोवाच्या संस्थेत झुंडीने येत आहेत ते सर्व यहोवाच्या दृष्टीने “इष्ट वस्तु” आहेत. ख्रिस्ती धर्मराज्यात बघितलेल्या “सर्व अमंगळ कृत्यामुळे” पुष्कळांनी “उसासे टाकून विलाप” केला. (यहेज्केल ९:४) आपणाला देवाच्या मार्गाकरवी शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी “यहोवाच्या पर्वता”कडे धाव घेतली. (यशया २:२, ३) सध्याच्या भ्रष्ट व भौतिक व्यवस्थेत दरवर्षी हजारो नवे लोक स्वतःबाबतीत यहोवाच्या “इष्ट वस्तु” असल्याचे दाखवीत आहेत. हा यहोवाच्या आशीर्वादाचा केवढा प्रबळ पुरावा आहे!
निकडीचा काळ
१५. (अ) प्रचार कार्याद्वारे करण्याजोगे क्षेत्र केवढे मोठे आहे? (ब) योहानाच्या दृष्टांतानुरूप “मोठा लोक समुदाय” केवढा क्रियाशील आहे?
१५ यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य निकडीचे आहे. ते का? एक कारण म्हणजे क्षेत्र अति भव्य आहे. “सुवार्ता” ही “प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक” ह्यांना घोषित केली गली पाहिजे. (प्रकटीकरण १४:६) येशूच्या दाखल्यात ‘सर्व राष्ट्रातील’ लोकांचे विभाजन “शेरडे” व मेंढरे” यात केले जात असल्याचे दाखविले आहे. पुष्कळ काम करायचे बाकी आहे. तर मग, योहानाने दृष्टांतात “मोठा लोकसमुदाय” देवाची “अहोरात्र त्याच्या मंदिरात” स्तुती करीत असल्याचे पाहिले ते किती सार्थ आहे बरे. (प्रकटीकरण ७:१५) या दृष्टांताच्या पूर्णतेस अनुलक्षून ‘मोठा लोकसमुदाय” याने आपल्या अभिषिक्त बंधूच्या कार्यात सहकार्य देऊन प्रचार कार्यात गतवर्षी ७३,९०,१९,२८६ तास खर्च केल्याचा अहवाल दिला—ही संख्या खूपच मोठी आहे. जागतिकपणे याची सरासरी दर प्रचारकामागे दरमहा १८ तास इतकी पडते. याची गेल्या दहा वर्षाआधी दरमहा जी १२ तासांची सरासरी होती तिजशी तुलना करून पहा म्हणजे त्याद्वारे प्रचार कार्याचा वेग वाढता आहे हे तुम्हाला दिसेल. तर मग, प्रचार कार्याविषयीची तुमची व्यक्तिगत सरासरी जागतिक सरासरी सोबत कशी जुळते?
१६. (अ) ‘वचनाची घोषणा करण्यासाठी तयार राहण्याचा’ सुंदर मार्ग कोणता आहे (ब) या कार्यात गेल्या वर्षी किती जण सहभागी झाले?
१६ याशिवाय सहाय्यक व नियमित पायनियरांचा नवा उच्चांक लक्षात घ्या: ६,५०,०९५. याचा अर्थ हा हातो की २५ वर्षाआधी जितके प्रचारक होते त्यापेक्षा गतवर्षी अधिक पायनियर्स क्षेत्रात होते. यापैकी तुम्ही एक होता का? असल्यास, प्रेषित पौलाची ही सूचना व्यक्तिगतपणे अनुसरण्याचा तुम्ही चांगला मार्ग धरला: “वचनाची घोषणा कर . . . तयार राहा.” (२ तिमथ्यी ४:२) तर मग, १९८८च्या कार्यवर्षात निदान एक महिना तरी पायनियर कार्य करण्याची योजना का करू नये?
अधिक वाढीची संभाव्यता
१७. भावी वाढीची संभाव्यता चांगली आहे हे कोणत्या आकडेवारीमुळे कळते?
१७ भावी वाढीची संभाव्यता खरीच उत्तम आहे. घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासाची संख्या ३०,०५,०४८ इतकी होती—यापैकीचा प्रत्येक पवित्रशास्त्र अभ्यासक संभाव्य असा “इष्ट वस्तु” पैकी आहे! याशिवाय गेल्या एप्रिल मध्ये ८९,६५,२२१ लोक प्रभुच्या सांज भोजनास उपस्थित राहिले होते. यापैकीचे बहुतेक यहोवाचे साक्षीदार नव्हते. काही नव्याने आस्थेवाईक बनले होते. त्यांचे अत्यंत चांगलेपणाने स्वागत झाले, अशांना उत्तम प्रगति करीत राहण्याचे प्रोत्साहन दिले जाते. इतर काही जण अशा प्रसंगाला या आधी अनेकदा उपस्थित राहिले असतील. यहोवाच्या साक्षीदारांसोबत त्यांना एकत्रित असण्याचा आनंद वाटला असावा पण यापेक्षा काही जास्त करण्याची गरज त्यांनी हेरली नसावी.
१८. यहोवाचे ‘मेंढरू’ यापैकीचे एक गणले जाण्यासाठी एखाद्या व्यक्तिने येशू व जखर्या यांच्या भविष्यवादानुसार काय केले पाहिजे?
१८ त्यांनी पवित्र शास्त्रीय सत्याबद्दल आस्था दाखविल्यामुळे त्यांचे अभिनंदन होण्यास हवे. पण हे लक्षात घ्या की येशूच्या दाखल्यातील “मेंढरे” ज्यांना सार्वकालिक जीवनाचा लाभ होणार आहे ते त्याच्या अभिषिक्त बांधवांना मदत देऊन त्यांच्याशी सहकार्य करतात. (मत्तय २५:३४–४०, ४६) जखर्याच्या भविष्यवादातील पूर्ण संख्येचे “दहा जण” बिनशर्तपणे घोषित करतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हासोबत आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जखर्या ८:२३) ते केवळ मित्रत्वाचा भाव दाखवीत नाही. ते देवाच्या लोकांचा ‘पदर धरतात’ व त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्या देवाची सेवा करण्यासाठी स्वतःचे समर्पण करतात. यहोवाच्या संस्थेत पूर्ण रूपाने समाविष्ट होण्यासाठी आमच्या काळासाठी हे करण्याचे आवश्यक आहे.
अधिक काळ नाही
१९, २०. (अ) “पृथ्वीची कापणी” गोळा झाल्यावर योहानाच्या दृष्टांतानुसार काय घडेल? (ब) जे लोक येशूला राजा या अर्थी शरण जाणार नाहीत त्यांच्यासाठी याचा काय अर्थ होईल?
१९ कापणीचे काम आणखी एका कारणामुळे तातडीचे बनते. ते लवकरच संपविण्यात येईल. (मत्तय २४:३२–३४) त्यानंतर काय? योहानाच्या दृष्टांतात पुढे काय घडले ते प्रत्यक्ष वाचा: “मग, आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्या जवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला. त्याने त्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले: ‘तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे. तिची द्राक्षे पिकली आहेत.’ तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.”—प्रकटीकरण १४:१७–१९.
२० “इष्ट वस्तु”ची कापणी गोळा केल्यावर या भ्रष्ट जुन्या जगतास आपले अस्तित्व पुढे चालू ठेवू देण्याची कोणतीही गरज नसणार. “पृथ्वीच्या द्राक्षीचे घड” म्हणजे सैतानी व्यवस्थेचे हे संपूर्ण जग कापून काढले जाईल व नष्ट करण्यात येईल. त्यावेळी विरोधकांनाही यहोवाच्या नियुक्त राजाचे पद मान्य करावेच लागेल. योहानाने लिहीले: “पाहा, तो [येशू] मेघासहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.” (प्रकटीकरण १:७; मत्तय २४:३०) त्यावेळी येशूने, ‘त्याला ज्यांनी भोसकण्यात’ पुढाकार घेतला होता त्या यहुदी धर्मपुढाऱ्यांना जे म्हटले होते ते पूर्ण होईल. (मत्तय २६:६४) अर्थातच त्या दांभिक धर्मपुढाऱ्यांना येशूला व्यक्तिगतपणे ‘पाहण्या’साठी पुनरूत्थित केले जाणार नाही. (मत्तय २३:३३) तरीपण आज त्यांच्या सारखाच आत्मा दाखविणारे व यहोवाच्या नियुक्त राजास स्विकारण्याचे नाकारणारे यांना तो येऊन हर्मगिद्दोनात राष्ट्रांचा नाश करील तेव्हा त्याला मानावेच लागेल.—प्रकटीकरण १९:११–१६, १९–२१.
२१. स्वर्गीय दिव्यदूतांना सहकार्य देऊन देवाच्या लोकांनी परिश्रमाने काय केले पाहिजे?
२१ प्रत्येकाचा बचाव खराच पणाला लागला आहे. दिव्यदूतांसोबत सहकर्मी असण्याची आम्हावर भारी जबाबदारी आहे. पण हा केवढा भव्य हक्क आहे! या कारणामुळे कापणीचे कार्य संपण्याआधी यहोवाच्या “इष्ट वस्तु” मेंढरासमान असणारे लोक यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आपण स्वर्गीय दूतांबरोबर अधिक परिश्रमाने कार्य करण्याचे चालू ठेवू या.
तुम्हाला विवेचीत करता येईल का?
◻ या विसाव्या शतकात आतापर्यंत घडलेली प्रमुख घटना कोणती आहे?
◻ “पृथ्वीची कापणी” ही काय आहे व ती कशी गोळा केली जात आहे?
◻ यहोवाच्या ‘मेंढरां’ची गुणलक्षणे कोणती आहेत?
◻ कापणी कार्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे हे वार्षिक अहवाल कसे दाखवितो?
◻ प्रचार कार्य निकडीचे का आहे?