वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 १/१ पृ. ७-९
  • खरे प्रेम विजयी ठरते!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरे प्रेम विजयी ठरते!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शलमोनाच्या छावणीत शुलेमकरीण
  • परस्परांची ओढ
  • युवती येरूशलेमेत
  • “यहोवाची ज्वाला”
  • गीतरत्न पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • गीतरत्न रूपरेषा
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 १/१ पृ. ७-९

पवित्र शास्त्र ठळक मुद्दे गीतरत्न १:१—८:१४

खरे प्रेम विजयी ठरते!

कधीही निष्प्रभ होणार नाही असे ही प्रेम आहे. ते अढळ, सहनशील, विजयी आहे. अशाप्रकारचे अढळ प्रेम येशू ख्रिस्त व त्याची “वधू” किंवा आत्म्याने जन्मलेली मंडळी यात अस्तित्वात आहे. (प्रकटीकरण २१:२, ९; इफिसकर ५:२१–३३) हेच प्रेम केवढ्या सुंदरपणे गीतरत्न मध्ये चित्रीत केले आहे बरे!

इस्राएलांचा सुज्ञ राजा शलमोन याने सुमारे ३००० वर्षापुर्वी रचलेले, हे “उत्कृष्ट गीत” (१:१) मेंढपाळ व शुनेम (शुलेम) गावाच्या युवतीमधील प्रेम कथीत करते. त्याच्या सर्व संपत्तीने व वैभवाने राजा शुनेमकरणीचे प्रेम जिंकण्यास हतबळ ठरतो, कारण ती तिच्या प्रियकर मेंढपाळासोबत निष्ठावान होती.

हे काव्यमय पुस्तक काळजीपूर्वक व रसिकतेने वाचले तर ते सड्या व विवाहीत यहोवाच्या सेवकांना शुद्धता, प्रेमळपणा, निष्ठा व ख्रिस्ती विवाहबंधनाची गुरुकिल्ली प्रेमबंधन याविषयी विचार करण्यास भरपूर मुद्दे देते. खरोखर, आम्ही सर्वजण खरे प्रेम विजयी असते याविषयीच्या या गीताकडून फायदा मिळूव शकतो.

शलमोनाच्या छावणीत शुलेमकरीण

कृपया गीतरत्न १:१–१४ वाचा. या राजेशाही छावणीत शुलेमकरीण जणु काय तिचा प्रियकर मेंढपाळ उपस्थीत होता यासारखी बोलते. शलमोन तिच्या सौंदर्याची वाखाणणी करतो व सोने, रूप्याच्या अलंकारानी सुशोभित करण्याचे अभिवचन देतो. परंतु ती त्याच्या मोहास विरोध करते व त्याला जाणीव करून देते की तिला केवळ मेंढपाळाविषयीच खरे प्रेम वाटते.

◆ १:२, ३—द्राक्षारस व अत्तरासोबतची तुलना का केली होती?

द्राक्षारस खिन्‍न जीवनास शक्‍ती व अंतःकरणास आनंद देतो. (स्तोत्रसंहिता १०४:१५; नीतिसूत्रे ३१:६) अत्तर हा कृपापसंतीच्या पाहुण्यावर सांत्वन करण्यास शिंपडला जात होता. (स्तोत्रसंहिता २३:५; लूक ७:३८) अशाप्रकारे दुखिःत शुलेमकरणीस मेंढपाळाचे “ममतेचे शब्द” व त्याचे “नांव” उल्लेखून सांत्वन व धीर दिला होता. त्याप्रमाणे ख्रिस्ताचे अभिषिक्‍त अनुयायातील शेषांना ते अद्यापि जगात असून त्याजपासून वेगळे असले तरी, येशू ख्रिस्त त्यांचा मेंढपाळ याचे प्रेम व हमी यावर मनन करून प्रोत्साहन दिले जाते.

आम्हासाठी धडा: शलमोनाने शुलेमकरणीला सोन्याच्या अलंकारांनी व रूप्याच्या टिकांनी शृंगारले असते, परंतु ती या भौतिक मोहास प्रतिकार करून व ती तिच्या मेंढपाळावरील अतूट प्रेमाविषयी निग्रहाने सांगते. (१:११–१४) तिच्या मनोवृत्तीवर विचार करण्याने “वधू” गटास जगिक फसव्या जडवादास तिरस्काराने झिडकारणे व त्यांच्या स्वर्गिय वरास विश्‍वासू राहण्याच्या निश्‍चयास दृढ़ केले जाऊ शकते. आमची आशा पृथ्वीवरील असली विवाहीत होण्याची इच्छा करीत असू तर या युवतीचे उदाहरण आम्हास भौतिक नव्हे तर आत्मिक आस्था प्रथमस्थानी ठेवण्यास चालना देणारे ठरो.

परस्परांची ओढ

१:१५—३:५ वाचा. मेंढपाळ राजेशाही छावणीत प्रवेश करतो व त्या विनयशिल शुलेमकरणीस जी त्याला अतिश्रेष्ठ गणते तिला त्याच्या प्रेमाने साद घालतो. ते विभक्‍त झाले होते त्या वेळीच्या सख्याबरोबरील हर्षित समयाची युवती स्मरण करते व म्हणते की त्याने तिच्या बाजूस येण्याची त्वरा करावी. रात्री ती त्याची वाट पहात होती.

◆ २:१–३—या शब्द प्रयोगांचा अर्थ काय आहे?

शुलेमकरीन स्वतःस “खोऱ्‍या मधील भूईकमळ” संबोधते कारण ती नम्र, विनयशाली युवती स्वतःस केवळ सर्वसाधारण पुष्कळ फुलातील एक गणते. तथापि मेंढपाळ तिला “कांटेरी झुडपामधील भुईकमळ” असे ओळखतो, कारण ती देखणी, लायक व यहोवास विश्‍वासू आहे. युवतीस मेंढपाळ हा “वनवृक्षातील सफरचंदाचे झाड” असे होता कारण तो आत्मिक कल असणारा युवक त्याचप्रमाणे देवास समर्पित व फारच मोहक गुणलक्षणे व योग्यता असणारा होता. एकादा अविवाहीत ख्रिस्ती जीवनात सोबती शोधीत असल्यास त्याने केवळ निष्ठावान समविश्‍वासू, शलेमकरिण किंवा तिच्या प्रिय मेंढपाळा सारखी गुणवत्ता पहावी.

◆ ३:५—ही शपथ या प्राण्यासोबत का संबंधीत हाती?

मृगी व हरिणी कोमल, आकर्षक व सुंदर प्राणी आहेत जे चपळ व अचल आहेत. सारांश युवती “यरूशलेमाच्या कन्यांना,” आकर्षक व सुंदर शपथ घालते. या प्राण्यांचा दृष्टांत देऊन ती या स्त्रियांना, त्यांनी तिच्या प्रियकर मेंढपाळाशिवाय इतर कोणाविषयीही प्रेम जागृत करू नका हे बंधन घालीत होती.

आमच्यासाठी धडा: युवती “यरूशलेमाच्या कन्यांना” किंवा राजा साठी थांबून आहेत त्या स्त्रियांना तिच्या ‘प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका’ ही शपथ घालून बोलावतो. (२:७; ३:५) ही गोष्ट हे दाखविते की एकाद्यासाठी शृंगारिक प्रेम होणे शक्य नाही या युवतीला शलमोनाविषयी कोणतेच आकर्षण वाटले नाही. अविवाहीत ख्रिस्ती जो विवाह बंधनात जखडू इच्छीतो त्याने केवळ एकादा योग्य व यहोवाचा विश्‍वासू भक्‍त जो खरोखर प्रेम करू शकेल अशाचाच विचार करणे केवढ्या सुज्ञपणाचे आहे बरे!—१ करिंथकर ७:३९.

युवती येरूशलेमेत

३:६—६:३ वाचा. शलमोन येरूशलेमास वैभवात परततो. मेंढपाळ युवती सोबत संपर्कात येतो व तिला गोड शब्दांनी दृढ करतो. स्वप्नात, ती अंधारात तिच्या सख्याच्या हाकेस प्रतिसाद देते व ती त्याचा शोध घेते तेव्हा रखवालदार गैरवर्तणूक देतो. कशाने तिचा सखा तिला इतका विशेष वाटतो हे विचारले असता ती “यरूशलेमेच्या कन्यांना” त्याच्याबद्दल आकर्षक शब्दांनी उत्तर देते.

◆ ५:१२—कशाप्रकारे मेंढपाळाचे डोळे ‘दुधात डुबकणाऱ्‍या कबुतरा प्रमाणे होते’?

या अगोदर शुलेमकरिणीचे डोळे कबुतरासोबत ते कोमल व शांत असल्यामुळे जोडले आहेत. (१:१५; ४:१) म्हणूनच मेंढपाळ युवतीला ती त्याचे “कपोत” म्हणून संबोधितो. (५:२) येथे प्रेमज्वराने पिडीत युवती मेंढपाळाचे डोळे दुधाच्या डबक्यात डुबकणाऱ्‍या कबुतराच्या निळसर, डोळ्यासोबत करते. (५:८, १२) त्याचप्रमाणे, ही तुलना मेंढपाळाच्या काळ्याकरंद बुबळा सभोवताली चमकणाऱ्‍या शुभ्रतेच्या त्याच्या डोळयासोबत केली आहे.

आम्हासाठी धडा: शुलेमकरीण ही “बंदीस्त बागे” प्रमाणे होती. (४:१२) पुर्वीच्या इस्राएलातील बाग बहुदा उद्यान म्हणजे चांगल्यापाण्याचे झरे व विविध भाजीपाला, फुले व झाडे याने नंदनवनाची खरी प्रचिती देत होती. बहुतेक करून झुडपांचे कुंपण किवा भिंत्तीने बंदीस्त असे केवळ बंध केलेल्या फाटकानेच एकादा प्रवेश करू शकत होता. (यशया ५:५) मेंढपाळासाठी शुलेमकरीणीची नैतिक शुद्धता व लावण्य हे, सुंदर, उत्तम फलदायी, रोमहर्षक, सुवासिक व सुखावह दुर्मिळ बागे समान होते. तिचे प्रेम कोणासाठीही उपलब्ध नव्हते, बंदीस्त बाग कोणासाठी ही खुली नसून केवळ कायदेबद्ध मालकास उघडी होती त्याप्रमाणे ती शुद्धाचरणी होती. शुलेम करणीचा नैतिक प्रामाणिकपणा व निष्ठा ही आजच्या अद्यापि अविवाहीत स्त्रियांना अशाप्रकारे उत्तम उदाहरण राखते.

“यहोवाची ज्वाला”

६:४—८:१४ वाचा. शलमोन युवतीच्या सौंदर्याची वाहवा करतो परंतु ती त्यास धिक्कारते व मेंढपाळास तिची निष्ठा व्यक्‍त करते. तिचे प्रेम काबीज करण्यास हतबल ठरलेला शलमोन तिला घरी जाऊ देतो. तिच्या “सख्या” सोबत ती शुनेमला जशी काय प्रौढ स्त्री जिने स्थैर्यता शाबीत केली अशी परतते. तिच्या मधील व मेंढपाळातील प्रेम जणु काय मृत्युप्रमाणे शक्‍तीमान व त्याच्या ज्वाला “यहोवाच्या ज्वाले” प्रमाणे होत्या.

◆ ६:४—“सुरेख शहर” काय होते?

हा वाक्य प्रयोग “तिरझाह” ज्याचा अर्थ “आनंददायक, हर्षदायक” यापासून घेतलेला असू शकतो. तिरसा हे प्रेक्षणिय प्रख्यात शहर होते जे उत्तरेकडील इस्राएल राज्याची पहिली राजधानी बनले होते.—१ राजे १४:१७; १६:५, ६, ८, १५.

◆ ७:४—युवतीचा कंठ “हस्तदंती मनोऱ्‍या सारखा” कसा?

स्पष्टपणे ते हस्तीदंताचा गुळगुळीतपणा व मनोऱ्‍याच्या अनकुचीदारपणाबद्दल आहे. या अगोदर तिचा कंठ “दाविदाच्या बुरुजा” सोबत तुल्य केला, कदाचित तो राजाच्या वाड्यासोबत येरूशलेमच्या पुर्वेकडील भिंतीचा बुरुज असावा. त्यावर “योद्धांच्या सहस्त्र ढाली व कवचे लटकत हात्या.” ते हे सुचविते की शुलेमकरणीच्या ताठ गळ्यात गुफिलेला हार किंवा रफ़्जडीत होता.—४:४; नेहम्या ३:२५–२७.

◆ ८:६, ७—प्रेम “मृत्युप्रमाणे प्रबळ” कसे?

पापी मनुष्याचा जीवन मृत्यु बिनशर्तपणे घेतो, व खरे प्रेम तसे प्रबळ आहे. निष्ठावान भक्‍तीवरील त्याचा आग्रह अशाप्रकारचे प्रेम हे केवळ जे पिडीतांच्या शरिरांची मागणी करते त्या शिओल [कबर] प्रमाणे निष्ठूर आहे. यहोवा देवाने मनुष्यामध्ये प्रेम करण्याची कुवत ठेवली हे पहाता, हे गुण त्याजपासून अक्षेपित होता म्हणून “यहोवाची ज्वाला” हा शब्द प्रयोग साजेसा आहे. अशाप्रकारचे प्रेम धनवान राजा शलमोन बळकावू शकला नाही.

आम्हासाठी धडा: शलमोनासोबतचा शुलेमकरीणचा अनुभव भेदक कसोटी होती जी तिने यशस्वीपणे पार केली. दरवाजा बिजागरीवर सहज फिरतो व अनाठायी उघडून एकाद्या घातक्यास प्रवेश देईल अशापासून परावृत करण्यास खिटीची गरज आहे त्याप्रमाणे ती तिच्या प्रेमात व शुद्धतेत डळमळीत नव्हती. नाही, युवतीने राजाने दिलेल्या मोहावर या जगाच्या सर्व भौतिक आकर्षणाविरूद्ध भिंती समान उभे राहून विजयश्री प्राप्त केली. देवावरील विसंबून राहाणे व शुलेमकरीणचे उत्तम उदाहरण आठवून, आजही ख्रिस्ती स्त्रिया, यहोवाच्या स्तुतीसाठीच्या विविध तत्वात अढळ अशी त्यांची प्रतिमा सिद्ध करू शकतात.—८:८–१०.

खात्रीने, हे “उत्कृष्ट गीत” त्याचा मुख्य विषय प्रेम हा येशू व त्याची निवडलेली स्वर्गिय “वधू” यांच्या प्रेमाबद्दल आमची रसिकता वाढवितो. परंतु यहोवास समर्पित सर्व युवक व युवती तसेच पती व पत्नी, शुलेमकरणीच्या व मेंढपाळाच्या कसोटी मोहाच्या पुढे असताना देखील दाखविलेल्या सचोटीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करून फायदा मिळवून शकतात. देववचनातील ह्‍या वैभवशाली भागाने आम्हासाठी विजयी प्रेमाचा स्रोत यहोवा देव यास चिरंतर निष्ठावान राहाण्यास चालना द्यावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा