“मिठाने रूचकर” असणारा सल्ला
“तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.”—कलस्सैकर ४:६.
१, २. ख्रिस्ती सल्ला “मिठाने रूचकर” असावा हे खासपणे का महत्वाचे आहे?
इतिहासात आजतागायत मिठाने जेवणाच्या तयारी विषयी खास स्थान राखले आहे. ते संरक्षक व रूचिकारक सुद्धा आहे त्यामुळे मिठाविना असणारे पदार्थ बेचव व आळणी वाटतात. या कारणास्तव, पौलाने ख्रिश्चनांचे बोलणे “मिठाने रूचकर” असावे असे जेव्हा म्हटले तेव्हा त्याचा अर्थ आमचे भाषण नेहमी उभारणीकारक, स्विकारण्याजोगे व अपीलकारक असले पाहिजे असा होता. (कलस्सैकर ४:६) हीच गोष्ट सल्ला देण्याच्या प्रकाराविषयी खासपणे खरी आहे. ते का?
२ सल्ल्यामागील उद्देश एखाद्या माहितीची इतरांमध्ये वाटणी करणे इतकाच नसतो. ज्याला सल्ला दिला जातो त्याला त्याच्या परिस्थितीसंबंधाने लागू होणाऱ्या काही पवित्रशास्त्रीय तत्वांची बहुधा आधीच जाणीव असते पण त्यांचा अवलंब करण्यात कदाचित त्याला कठीण गेले असते वा त्याविषयीचे महत्व त्याने कमी जाणलेले असते. यास्तव ख्रिस्ती सल्ला देणे हे त्याची विचारधारा बदलविणे इतके खरे आव्हान त्यात असते. (गलतीकर ६:१; इफिसकर ४:११, १२) यामुळेच ‘मिठाची’ खरी गरज आहे.
३. यहोवाने ख्रिस्ती सल्लागारांना कोणती मदत दिली आहे?
३ खरेच सल्ला देणे हे एक आव्हान आहे व ते पुरे करण्यासाठी सल्लागारापाशी ज्ञान व चाणाक्षता असावयास हवी. (नीतीसूत्रे २:१, २, ९; २ तिमथ्यी ४:२) यहोवाने पवित्र शास्त्राची तरतूद केली आहे ही आनंदाची गोष्ट आहे कारण त्यामध्ये आवश्यक असणारे ज्ञान समाविष्ट असण्यासोबत देवाच्या चाणाक्ष लोकांनी दिलेल्या सल्ल्याचे कित्येक नमुनेसुद्धा आहेत. यापैकीच्या काहीचे परिक्षण केल्यामुळे आम्हाला प्रभावी सल्लागार बनण्यात मदत मिळू शकेल.
“अद्र्भित मंत्री” याला विचारात घ्या
४. मंडळीला सल्ला देण्यामध्ये ख्रिस्ती वडीलाला येशू ख्रिस्ताचे कसे अनुकरण करता येईल?
४ “अद्र्भित मंत्री” येशू याला विचारात घ्या. (यशया ९:६) पहिल्या शतकाच्या समाप्तीला येशूने आशीया प्रांतातील सात मंडळ्यांना सल्ला देणारी पत्रे पाठविली. ही पत्रे वडिलांना आपल्या मंडळ्यांना सल्ला देण्यात अत्यंत उपयुक्त आहेत, व शिवाय विशिष्ठाला सल्ला देण्यामध्ये त्यातील तत्व तितक्याच प्रमाणात लागू करता येतात. येशूने चर्चा केलेल्या समस्या गंभीर स्वरूपाच्या होत्या: धर्मत्याग, ‘इजबेली’चा प्रभाव, कोमटपणा व भौतिकता या त्यापैकीच्या काही होत. (प्रकटीकरण २:४, १४, १५, २०–२३; ३:१, १४–१८) येशूने या समस्यांची उघड चर्चा केली. त्याला विशिष्ठ मंडळ्यास जे म्हणायचे होते त्यात काही संशय नव्हता. आज ख्रिस्ती वडिलांनी आपल्या मंडळ्यांना सल्ला देताना येशूचे अनुकरण करून विनयशीलता व दयाळूपणा यांच्या “मिठाने” युक्त असणारा सल्ला द्यावा. (फिलिप्पैकर २:३–८; मत्तय ११:२९) दुसऱ्या बाजूस त्यांनीही येशू प्रमाणेच स्पष्ट असावे. मंडळीला मुद्दा कळू शकणार नाही इतका अस्पष्ट व साधारण रूपाचा सल्ला नसावा.
५, ६. येशूने मंडळ्यांना पाठविलेल्या संदेशामधून ख्रिस्ती वडीलाला आणखी काय शिकता येण्याजोगे आहे?
५ जेथे कोठे शक्य होते तेथे आरंभालाच येशूने मंडळ्यांची जोरदार प्रशंसा केली आणि आपल्या सल्ल्याचा समारोप उभारणीकारक उत्तेजनाने केला. (प्रकटीकरण २:२, ३, ७; ३:४, ५) ख्रिस्ती सल्लागारांनी देखील आपला सल्ला प्रशंसा व प्रोत्साहन यांनी युक्त करून रूचकर बनवावा. एक अनुभवी वडिलांनी असा शेरा दिला: “तुम्ही बंधूची नुसती कानउघाडणी करीत राहिला तर काहीच साध्य करू शकणार नाही.” कडक सल्ला देतेवेळी बांधवांचे मनोधैर्य खचवू नका तर भवितव्यात ते चांगले करू शकतील अशी त्यांच्यामध्ये बळकटी व निश्चय उभारा.—पडताळा २ करिंथकर १:१–४.
६ येशूने स्मुर्णा व फिलदेल्फिया या मंडळ्यांना जो संदेश पाठवला त्याविषयी काय? त्यांच्याबद्दल टीका करण्याजोगे काही नव्हते. तरीपण ते गंभीर परीक्षांना तोंड देऊन होते म्हणून त्याने त्यांना टिकून राहण्याचे उत्तेजन दिले. (प्रकटीकरण २:८–११; ३:७–१३) ख्रिस्ती देखरेख्यांनी सुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे त्यावेळीच सल्ला देत राहू नये तर बांधवांची चांगल्या कामाबद्दल प्रशंसा करण्यात आणि त्यांनी टिकून रहावे म्हणून उत्तेजन देण्यास सर्वदा जागृत असावे.—रोमकर १२:१२.
उदाहरणे वापरा
७, ८. (अ) येशूने आपल्या शिष्यांना दिलेला सल्ला “मिठाने रूचकर” कसा होता? (ब) सल्ला सादर करताना उदाहरणे महत्वपूर्ण का ठरतात?
७ येशूच्या शिष्यांमध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण पहिला याबद्दल वाद निर्माण झाला त्यावेळी त्याने त्यांना सल्ला दिला. या वादाबद्दल त्याला त्यांची खडसावून कानउघाडणी करता आली असती. तथापि, त्याने ‘आपले बोल मिठासारखे रूचकर’ ठेवले. एका लहान मुलाला त्याने आपल्यापाशी बोलविले व त्याला दाखवून त्यांना म्हटले: “जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय.” (मत्तय १८:१–४; लूक ९:४६–४८) तो सल्ला स्पष्ट पण दयाळू व उभारणीकारक होता. स्वर्गाचे राज्य या जगाच्या राज्यापासून अगदीच भिन्न आहे असे दाखूवन येशूने आपल्या अनुयायांना नम्र राहण्याचे उत्तेजन दिले आणि त्यांच्यातील वाद काढून टाकला.
८ या प्रकरणात येशूने जे प्रभावशाली शैक्षणिक तंत्र वापरले त्याचीही जरा दखल घ्या. ते जिवंत उदाहरण—लहान मूल—होते! सूज्ञ सल्लागार आपल्या म्हणण्यात उदाहरणांना समाविष्ठ करून ते ‘मिठासारखे’ रूचकर करतात कारण त्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य जोरदारपणे स्पष्ट होते आणि सल्ला स्विकारणाऱ्याला आपल्या समस्येचा विचार नव्या दृष्टीकोणातून करण्याचे कारण मिळते. उदाहरणांमुळे तणाव कमी करण्याची मदत मिळते.
९. सल्ला देण्यामध्ये उदाहरणांचा वापर झाला अशी आणखी कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे आहेत?
९ काईनाकडून गंभीर पाप घडेल असा त्याला इशारा वदविताना यहोवाने पापाला जंगली श्वापदाची उपमा देऊन ते चितारले. त्याने म्हटले: “दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुजवर आहे.” (उत्पत्ती ४:७) पश्चातापी निनव्यांवर देवाने नाश आणला नाही म्हणून योना रागावला तेव्हा देवाने त्याला छाया देण्यासाठी तुंबीची वेल उगविली. ही वेल सुकली त्यावेळी योनाने तक्रार केली. तेव्हा यहोवाने म्हटले: “हिची तू इतकी पर्वा करतो, तर . . . एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे . . . ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये का?” (योना ४:५–११) खरेच, केवढा प्रबळ सल्ला!
१०. आधुनिक काळच्या एका सल्लागाराने उदाहरणाचा वापर करून एका युवतीला तिच्या पालकांचा हेतु समजावून देण्यास कशी मदत दिली?
१० याचप्रकारे, आईवडिलांनी आपल्या मित्र सहवासाला बांध घातला होता म्हणून एक तरूण मुलगी बरीच उद्विग्न झाली होती. एका फिरत्या देखरेख्याने उदाहरणाचा वापर करून तिची समजूत काढली: “तुला शिवणकाम आवडते का? तर मग असे समज की तू खूप परिश्रम घेऊन बराच वेळ खर्च करून सुंदर कपडे आपल्या मैत्रिणीसाठी शिवले. तिला ते दिल्यानंतर तुला हे कळाले की त्यांचा ती पाय पुसणी या अर्थी वापर करीत आहे. तर मग तुला कसे वाटेल?” मुलीने म्हटले की ते तिला मुळीच आवडणार नाही. तेव्हा उपाध्यांनी पुढे म्हटले: “अगदी असेच तुझ्या आईवडिलांनासुद्धा वाटते. हे बघ, त्यांनी तुला लहानाची मोठी करण्यात कितीतरी पैसा, परिश्रम व वेळ खर्च केला आहे. तुझ्याबद्दल त्यांना किती अभिमान वाटतो! त्यामुळेच त्यांना वाटत असते की तू केवळ अशा लोकांशीच आपला सहवास राखावा जे तुला योग्यपणे वागवतील. तुला इजा करतील अशांचा नव्हे.” या उदाहरणामुळे त्या मुलीला तिचे पालक तिच्यासाठी जे परिश्रम घेत होते त्याची जाणीव घडविण्यात मदत मिळाली.
प्रश्न विचारा
११. योनाला सल्ला देताना यहोवाने प्रश्नाचा केवढा समर्पक उपयोग केला?
११ योनाच्या नसत्या रागाविषयी यहोवा त्याच्याशी बोलला तेव्हा त्याने त्याला प्रश्नही विचारले होते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. निनवेचा संहार करण्यात आला नाही म्हणून योनाने राग धरला तेव्हा त्या रागात आपणास मरण यावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. तेव्हा यहोवाने म्हटले: “तुला क्रोध येणे हे बरे आहे काय?” योनाने उत्तर दिले नाही. तेव्हा यहोवाने तुंबीचा वेल उगवू दिला व वाळू दिला. तेव्हा योना आणखी क्रोधिष्ट झाला. यावेळी यहोवाने त्याला विचारले: “तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय?” तेव्हा योना म्हणाला: “रागामुळे माझा प्राण गेला तरी परवडले.” संदेष्ट्याने हे उत्तर दिल्यावर यहोवाने योनाला वेली बद्दल जे वाटले होते त्याच प्रवृत्ति आधारे स्वतःला निनवेविषयी वाटणारा मनोदय व्यक्त करण्यात हा उचित प्रश्न विचारला: “निनवे शहरात आहेत त्यांची मी पर्वा करू नये काय?” (योना ४:४, ९, ११) अशाप्रकारे यहोवाने पश्चातापी निनवेकरांविषयी जी वृत्ति बाळगली होती तिचेच अनुकरण योनाने करावे असा त्याला सल्ला मिळाला.
१२. सल्ला देताना प्रश्नांचे केवढे मोल असते? विवेचीत करा.
१२ होय, प्रश्नामुळे सल्लागाराला, सल्ला दिला जाणाऱ्या व्यक्तिचे विचार समजण्यात मदत मिळते. शिवाय त्यामुळे त्या विशिष्ठाला स्वतःची समस्या व हेतु याची स्पष्ट समजावणूक मिळण्यात मदत मिळते. उदाहरणार्थ, एखादा ही गळ घालतो की वाहनाने घरी जाण्याआधी त्याला मद्याचा एक घोट तरी प्यावयास द्यावा. तो म्हणेल की, ‘इतके मद्य घेतले तरी त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही.’ त्याच्याशी विवाद करणाऱ्या मित्राला हे सांगावेसे वाटेल: ‘समजा तू अशा अपघातात सापडलास की जो तुझ्या चुकीमुळे घडला नाही. तू मद्य घेतले आहेस हे पोलिसांच्या लक्षात आलेच तर काय होईल? शिवाय हे लक्षात घे की मद्य घेण्यामुळे तुझ्या प्रतिक्रियांच्या बाबतीत थोडा तरी परिणाम दिसला. तर मग तुझी छटा एकंदरीत ठीक ठाक वाटत नाही त्या दशेत वाहन चालविणे तुला खरेच बरे वाटेल का? एवढी सारी जोखीम मद्याच्या केवळ एका घोटासाठी पत्करणे साजेसे आहे का?
१३. सल्ला देताना एका सल्लागाराने पवित्र शास्त्राच्या वापरासोबत प्रश्नांचा कसा वापर केला? ते तेवढे प्रभावी का ठरले?
१३ ख्रिस्ती सल्ला नेहमी पवित्र शास्त्रावर आधारलेला असतो. जेथे शक्य आहे तेथे ख्रिस्ती सल्लागार सल्ला देताना प्रत्यक्षपणे पवित्र शास्त्राचा वापर करतात. ते फार प्रभावी साधन आहे. (इब्रीयांस ४:१२) उदाहरणार्थ, प्रचार कार्यात क्रियाशील नसणाऱ्या एका प्रचारकाला एक अनुभवी वडील सहाय्य करीत होते. वडिलांनी त्याचे लक्ष येशूच्या दाखल्याकडे वळविले. हा दाखला दोन मुले असणाऱ्या बापाचा होता. बापाने त्या दोघांनाही द्राक्षमळ्यात जाऊन काम करायला सांगितले होते. पहिला म्हणाला जातो, पण गेला नाही, आणि दुसऱ्याने म्हटले की तो जाणार नाही, पण सरतेशेवटी त्याने जायचे ठरविले. (मत्तय २१:२८–३१) सल्लागाराने विचारले: “या दोघा मुलांपैकी कोणाच्या दशेत सध्या तुम्ही आहात असे तुम्हाला दिसते?” प्रचारकाने त्याचे उत्तर ताडले. सल्लागाराने आणखी विचारले: “तर द्राक्षमळ्याचा धनी यहोवा याला तुमच्या स्थितीविषयी काय वाटत असावे असे तुम्हाला वाटते?” तेव्हा एकंदीरत मुद्दा त्या प्रचारकाला लगेच कळला.
१४. इतर कोणत्या परिस्थितीत प्रश्न हे सल्ला देण्याच्या बाबतीत उपयुक्त ठरू शकतात?
१४ हीच गोष्ट जेव्हा एखादा कोणा शंकेत असतो, वैवाहिक वा कौटुंबिक समस्येत असतो वा दुसऱ्या कोणाशी जमत नाही त्या परिस्थितीत असतो वा भारी दबावाखाली असतो त्यावेळी मदत देताना सुद्धा लागू करता येते.a कुशल प्रश्न सल्ला दिला जाणाऱ्या व्यक्तिला विचार करण्यात, स्वपरिक्षण करण्यात व अधिक बरोबरचा निर्णय घेण्यात साहाय्य देतात.
काळजीपूर्वक ऐका
१५. (अ) इयोबाचे तीन “सांत्वनकर्ते” काय करण्यात अपयशी ठरले? (ब) ऐकून घेणे हे ख्रिस्ती सल्लागाराचे कसे साहाय्य करते?
१५ तरीपण हे लक्षात घ्या की प्रश्न विचारणे या मागील अभिप्रेत हेतु हा असतो की तुम्ही उत्तर ऐकण्याच्या तयारीत असता. (नीतीसूत्रे १८:१३) इयोबच्या तीन “सांत्वनकर्त्यां”नी ज्याबाबतीत अपयश दाखविले तीच गोष्ट सल्लागारांनी करू नये. इयोब त्यांच्याशी बोलला तेव्हा त्यांनी त्याचे खरेपणाने ऐकून घेतले नाही. इयोबावर ओढावलेला त्रास हा त्याच्याच पापामुळे आहे अशी त्यांनी आधीच धारणा करून घेतली होती. (इयोब १६:२; २२:४–११) ख्रिस्ती सल्लागाराने, उलटपक्षी, काळजीपूर्वक ऐकून घेतले पाहिजे. बोलण्यामध्ये त्याला काही विशिष्ठ विराम, आवाजाचा चढउतार दिसेल ज्याकरवी हे सूचित होत असते की अजून सगळे काही संपलेले नाही. यामुळेच एखादा जोड प्रश्न त्या व्यक्तिच्या मनात दडून राहिलेला विचार बाहेर काढण्यास समर्थ ठरत असतो.—पडताळा नीतीसूत्रे २०:५.
१६. भावनिकरित्या उद्विग्न झालेल्या सहख्रिश्चनाचे उद्गार ऐकण्याचे कठीण वाटत असता सल्लागाराच्या बाबतीत कशाची अपेक्षा असते?
१६ हे खरे की ते बहुधा सोपे नसते. विचलीत झालेली व्यक्ति आवेगाने म्हणेल: “मला माझ्या पालकांचा राग वाटतो” किंवा “मला माझ्या पतीसोबत रहायचे नाही!” अशा गोष्ट ऐकणे खरेच मनस्ताप देणारे आहे. पण हे लक्षात घ्या की, आसाफाने सुद्धा, आपला विश्वासूपणा व्यर्थ आहे असा सूर काढला तेव्हा यहोवाने शांतपणे ऐकून घेतले. (स्तोत्रसंहिता ७३:१३, १४) यिर्मयाने म्हटले की त्याला मूर्खात काढण्यात आले तेही यहोवाने ऐकून घेतले. (यिर्मया २०:७) हबक्कुकने वरवर भासविले की, दुर्जन धार्मिकांना जाचत आहे व त्याकडे यहोवाचे लक्ष नाही. (हबक्कुक १:१३–१७) ख्रिस्ती सल्लागाराने देखील ऐकून घेण्याची तत्परता दाखवावी. लोकांठायी अशा भावना आहेत तर सल्लागाराने ते जाणून घेणे जरूरीचे आहे म्हणजे त्याला मदत देता येईल. सल्ला देत असलेल्या व्यक्तिठायी, त्याला खरेपणाने वाटते यापेक्षा अमुक एक विचार असलाच पाहिजे हा पूर्वग्रह धरून तो त्याच्या कडून युक्तिबाजपणे वदवून घेण्याची गळ घालायचे सल्लागाराने टाळावे. शिवाय त्याच्याविषयी कडकपणे वा प्रतिकूल मार्गी प्रतिक्रिया दाखविण्याचे टाळावे कारण तसे झाल्यास ती व्यक्ति निराश होईल व आपले अंतःकरण पुढे उघडणार नाही.—नीतीसूत्रे १४:२९; १७:२७.
१७. आमच्या बंधूंचे ऐकून घेणे हे त्यांच्याकरता कधी कधी कसे सांत्वनदायक ठरू शकते?
१७ कधी कधी सल्ला देण्यामधील आमचा महत्वाचा भाग ऐकणे हा असू शकतो, जेथे त्या व्यक्तिला त्याला झालेले दुःख अंत:करणातील पीडा वा भावनिक उद्विग्नता व्यक्त करण्याची मुभा द्यावी लागते. मवाबाच्या शेतातून नामी आली तेव्हा इस्राएली स्त्रियांनी तिला पाहून म्हटले: “ही नामीच का?” त्यावेळी नामीने दुःखाने म्हटले: “मला नामी म्हणू नका तर मारा म्हणा, कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेल्ये आणि यहोवाने मला रिकामी परत आणिले. यहोवा मला प्रतिकूल झाला, सर्वसमर्थाने मला पीडिले आहे, तर मला नामी का म्हणता?” (रूथ १:१९–२१) तेव्हा इस्राएली स्त्रियांना काही उत्तर देता आले नाही. तरी पण आपले भावनिक दुःख इतरांनी व्यक्त करताना त्यांचे नुसते श्रवण करण्यासाठी प्रेमळपणे उभे असणे ही गोष्ट त्यांच्या बरे होण्याला कारणीभूत ठरू शकते.b
व्यवहारी असा
१८. (अ) यहोवा व येशू यांनी दिलेल्या सल्ल्यास कोणते प्रतिसाद लाभले? (ब) ख्रिस्ती सल्लागाराने कोणत्या गुणाची वाढ करावी?
१८ सल्ल्याला विविध प्रतिसाद मिळतो हे खरे आहे. यहोवाकडिल सल्ल्यास योनाने उत्तम प्रतिसाद दर्शविला. संदेष्टा आपला कटुपणा व राग या पासून मागे वळाला व त्याने आपल्या अनुभवांची सहभागी इतरांचा फायदा व्हावा म्हणून केली असावी. येशूच्या अनुयायांना लीन हाण्याचे शिकण्यास थोडा काळ लागला. येशू मरण्याआधीच्या रात्री आपणामध्ये मोठा कोण याचा पुनः वाद त्यांच्या मध्ये सुरु झाला. (लूक २२:२४) या कारणास्तव सल्ला देणाऱ्यांनी सहनशील असण्यास हवे. (उपदेशक ७:८) वाईट प्रवृत्तीने ज्याच्या अंतःकरणी मूळ धरले आहे ती व्यक्ति कोणा वडिलाकडून थोडे फार शब्द ऐकल्यामुळे बहुधा लगेचच आपले मार्गाक्रमण बदलू शकणार नाही. नवरा–बायकोत सतत होणाऱ्या कुरबुरी प्रौढ ख्रिश्चनासोबतच्या एका बैठकीनंतर नाहीश्या होऊ शकणार नाहीत. जसा गंभीर आजार बरा होण्यास कित्येक महिने लागतात त्याचप्रमाणे गंभीर आध्यात्मिक समस्या निवळण्यास वेळ लागतो. शिवाय सबळ अशा सल्ल्यास तर काही मुळीच प्रतिसाद दाखवणार नाही. यहोवाने सल्ला दिला होता तरी काईनाने पुढे होऊन आपल्या भावाचा वध केलाच.—उत्पत्ती ४:६–८.
१९. भावनिक त्रास असणाऱ्यांना मंडळी कशी मदत देऊ शकते?
१९ गहन समस्या असणाऱ्यांनी, आपल्याला मंडळीपासून ज्याची अपेक्षा आहे त्याविषयी व्यवहारिक असले पाहिजे. अनर्थकारी किंवा भयंकर अनुभवामुळे उद्भवलेले नैराश्य वा मानसिक दुःख सहख्रिश्चन काढून टाकू शकतो. कोणी शारिरीक दृष्ट्या आजारी असतो तेव्हा डॉक्टर त्याचे सांत्वन करीत राहतात आणि वेळ आपल्या परिने त्याच्या शरीराला बरे करीत राहतो. त्याच प्रमाणे भावनिकरित्या दुःखी असणाऱ्या ख्रिश्चनाचे मंडळी ‘सांत्वन करू’ शकते, त्याच्यासाठी व त्याच्यासोबत मिळून प्रार्थना करू शकते व शक्य आहे त्याप्रमाणे उत्तेजनात्मक बोलणे करू शकते व व्यवहारी मदत देऊ शकते. त्यानंतर वेळ व यहोवाचा आत्मा बरे करण्याचे कार्य करतो. (नीतिसूत्रे १२:२५; याकोब ५:१४, १५) गोत्रगमनाचा बळी ठरलेल्या एकाने लिहिले: “गोत्रगमन भयंकर मानसिक ताण आणते तरीपण यहोवाची संस्था तुम्हाला खूप सांभाळून घेते. शास्त्रवचनांची मदत व बंधु–भगिनींचा आधार यामुळे तुम्हाला त्यावर नक्की मात करता येते.”c
२०. आम्ही सर्व यहोवाची सेवा करण्याच्या प्रयत्नात असताना सल्ला कोणता कार्यभाग पूरा करीत असतो?
२० होय, ख्रिश्चनांना एकमेकांना मदत देण्याची जबाबदारी आहे. मंडळीतील वडिलांनी खासपणे, पण इतरांनी सुद्धा एकमेकांच्या कल्याणावियषयीची काळजी बाळगून जरूर पडेल त्याप्रमाणे दयावंतपणे शास्त्रवचनीय सूचना द्याव्या. (फिलिप्पैकर २:४) अर्थातच, असा हा सल्ला हुकुमशाही वा कडक नसावा. तसेच त्याकरवी इतरांच्या जीवनावर प्रभुत्व गाजविले जात आहे अशी छाप पडता कामा नये. तर ती शास्त्रवचनावर आधारलेली असावी आणि “मिठाने रूचकर” असावी. (कलस्सैकर ४:६) आम्हा प्रत्येकाला कोणा ना कोणा प्रसंगी मदतीची गरज लागतेचे तेव्हा दयाळूपणा व उत्तेजनाने “रूचकर” असणारा समयोचित सल्ला आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवनाच्या मार्गात टिकून राहण्यात आमचे साहाय्य करील.
[तळटीपा]
a विवाहीत दांपत्यांना सल्ला देण्याविषयीच्या माहितीबाबत अवेक! च्या जुलै २२, १९८३च्या अंकात प्रसिद्ध झालेला“ हाऊ टू गीव कौन्सल दॅट रिअली हेल्प्स” हा लेख पहा.
b नैराश्य असणाऱ्या ख्रिश्चनांना कशी मदत द्यावी त्याच्या सूचनेकरता वॉचटावर एप्रिल १५, १९८२चा “स्पिक कन्सोलिंगली टू द डिप्रेस्ड सोल्स” आणि जून १, १९८२चा “ॲन एज्युकेटेड टंग—‘टू एन्करेज वेअरी’” हा लेख पहा.
c भावनिक इजा सहन करणाऱ्यांना साहाय्य देता येण्यासाठी वॉचटावर च्या ऑगस्ट १, १९८३ अंकातील “होप फॉर द डिस्पेरिंग वन्स” आणि “दे वॉन्ट टू हेल्प” हे लेख तसेच ऑक्टोबर १, १९८३ च्या अंकातील “हेल्प फॉर द विक्टीम ऑफ इन्सेस्ट” हा लेख पहा.
तुम्हाला आठवते का?
◻ येशूने सात मंडळ्यांना दिलेल्या सल्ल्यातील कोणत्या विशिष्ट गोष्टी आज वडिलांना मदत देऊ शकतील?
◻ सल्ला देताना उदाहरणांचा वापर करता येतो हे सांगणारी कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे आहेत?
◻ ख्रिस्ती सल्लागाराकरता प्रश्न केवढे खरे मोल राखून आहेत?
◻ कुशल सल्लागार पवित्र शास्त्राचा कसा वापर करू शकतो?
◻ सल्ला देणाऱ्या व्यक्तिने काळजीपूर्वक ऐकून घेण्याची का गरज आहे?
[१३ पानांवरील चित्रं]
आपला मुद्दा समजविण्यासाठी येशूने एका मुलाचा वापर केला आणि शिष्यांना स्पष्ट दयाळू व उभारणीकारक सल्ला दिला
[१४ पानांवरील चित्रं]
योना फारच कटु व क्रुद्ध झाला पण त्याने यहोवाच्या सल्ल्यास उत्तम प्रतिसाद दाखविला