वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ५/१ पृ. ८-९
  • उपासाविषयक प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उपासाविषयक प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • मिळती जुळती माहिती
  • उपवासाविषयी प्रश्‍न
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • उपवास धरल्याने आपण देवाच्या आणखी जवळ येतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • उपवास कालबाह्‍य झालेले आहेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • देव उपवासाची अपेक्षा करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ५/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

उपासाविषयक प्रश्‍न

इ.स. ३०च्या वल्हांडण सणाला येशूला हजर राहून आता जवळजवळ एक वर्ष लोटले आहे. काही महिन्यापासून बाप्तिस्मा करणारा योहान बंदिवासात आहे. त्याच्या शिष्यांनी येशूचे अनुयायी बनावे असे त्याला वाटते पण पुष्कळ तसे बनले नाहीत.

बंदिवान योहानाचे हे काही शिष्य येशूकडे येतात व म्हणतात: “आम्ही व परूशी पुष्कळ उपास करितो, पण आपले शिष्य उपास करीत नाहीत ह्‍याचे कारण काय?” परूशी त्यांच्या धार्मिक रूढीप्रमाणे आठवड्यातून दोनदा उपास करीत, आणि योहानाचे शिष्य ह्‍याच रूढीचे अनुकरण करीत असत. त्याबरोबरच योहानाला बंदिवान केल्यामुळे ते शोकाने उपास करीत पण येशूचे शिष्य त्याच्यात सहभाग का घेत नाहीत म्हणून ते चकित होतात.

उत्तरादाखल येशू स्पष्टता देतो: “वऱ्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा ते उपास करितील.”

योहानाच्या शिष्यांना आठवणे जरूरीचे होते की योहानाने स्वतः येशूचा एक वर म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळेच येशू जीवंत असताना उपास करणे जरूरीचे आहे असे योहानाने वाटू देऊ नये व शिवाय येशूच्या शिष्यांनीही वाटू देऊ नये. नंतर जेव्हा येशू मरण पावला तेव्हा त्याच्या शिष्यांनी शोक व उपास केला. पण जेव्हा त्याचे पुनरूत्थान झाले व त्याला स्वर्गात घेण्यात आले त्यानंतर शोक व उपास करण्याचे कारण राहिले नाही.

या नंतर येशू त्यांना हे दाखले सांगतो: “कोणी कोऱ्‍या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावीत नाहीत कारण धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडिते, आणि छिद्र मोठे करते. तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालीत नाहीत. घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुधले बिघडतात. तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालितात म्हणजे दोन्ही नीट राहतात.” या उदाहरणांचा उपासासोबत काय संबंध होता बरे?

येशू योहानाच्या शिष्यास हे समजण्यात मदत करीत होता की त्याच्या कोणाही शिष्याने यहुद्यांची जुनी चालीरूढी ज्यामध्ये उपासाची देखिल रूढी होती ती अनुसरू नये. फेकून देण्याच्या लागास आलेल्या जुन्या, फाटक्या उपासनेच्या व्यवस्थेला ठिगळ लावण्यासाठी तो आला नव्हता. तसेच त्या काळच्या यहुद्यांच्या मानवी संप्रदायाशी ख्रिस्ती धर्म सहमत होणार नव्हता. जुन्या कपड्याला नविन ठिगळ लावणे शक्य नव्हते आणि नविन द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालणे शक्य नाही. तसेच हे देखिल आहे. मत्तय ९:१४–१७, मार्क २:१८–२२, लूक ५:३३–३९, योहान ३:२७–२९.

◆ उपासाचे आचरण कोण करीत होते, आणि कोणत्या उद्देशास्तव?

◆ येशू त्यांच्याबरोबर होता तेव्हा त्याचे शिष्य उपास का करीत नव्हते, आणि नंतर उपासाची गरज लवकरच कशी संपुष्टात आली?

◆ येशूने कोणते दाखले सांगितले आणि त्यांचा काय अर्थ होता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा