वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ११/१ पृ. ३-४
  • धर्म हा सदाचाराचे बळ आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धर्म हा सदाचाराचे बळ आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नकारार्थी बाजू
  • सदाचाराचे कुंपण तोडले
  • देवाविषयीचे प्रेम सदाचाराचे बळ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
    धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
  • धर्म लोकांना देवापासून दूर कसे नेतात?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ११/१ पृ. ३-४

धर्म हा सदाचाराचे बळ आहे का?

याप्रश्‍नाच्या उत्तरात लाखोजन जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यासोबत सहमत होतील. त्यांनी लिहिलेः “धर्म हा मोठे बळ आहे—जगात वास्तविक चालना देणारे एकमेव बळ आहे.” उलटपक्षी १९व्या शतकातील इंग्रजी संपादक जॉन रस्कीन यांनी प्रामाणिकतेच्या आधारावर याविषयी उपहासात्मकतेने लिहिलेः “फसव्यांचा धर्म हा नेहमी त्यांच्यासंबंधी अनिष्टकारक असतो.” तुम्ही, कोणता दृष्टीकोन सत्याच्या निकट आहे असा विचार करता?

धर्म हा सदाचाराचे बळ आहे हे दाखविण्याकरता कोणी, ज्याने आपले जीवन येशू ख्रिस्तास समर्पित केल्यावर तो ‘परिवर्तित मनुष्य’ बनला त्याच्याकडे निर्देश करील. अगदी हेच एका आंतरराष्ट्रीय मासिकाने वॉटरगेट प्रकरणातील चार्ल्स कोलसन यांच्या “परिवर्तना”च्या बाबतीत वर्णन करुन म्हटले. दुसरे लोक, आपल्या धर्मामुळे आपण वेश्‍यागमन किंवा दारुबाजी यापासून निभावलो गेलो असा दावा करतात त्या लोकांकडे निर्देश करतील. ख्रिस्तेत्तर राष्ट्रात लाखो पवित्रशास्त्र प्रती वितरीत केल्या गेल्या आहेत. यांनी निःसंशयीपणे पुष्कळ लोकांना त्यांचे जीवन नैतिकपणे सुधारण्यास मदत केली आहे. तद्वत, धर्माने अशा लोकांवर सदाचाराचा प्रभाव पाडला आहे हे स्पष्टच आहे.

नकारार्थी बाजू

उलटपक्षी, हिटलरचा धर्म त्याला प्रतिबंध घालू शकला नाही. हिटलरला बहिष्कार घालावा असे निवेदन बाराव्या पोप पायस यांना केले होते, त्याचे त्यांनी का उत्तर दिले नव्हते हे प्रांजळ व्यक्‍तींना विचार करावयास लावते. ओहायो येथील सिनसिनॅटीमधील कॅथोलिक टेलेग्राफ-रजिस्टर याने “पोपला करण्यात आलेली तारः कॅथोलिक याअर्थी संगोपन झाले पण विश्‍वास भंगविला” या शिर्षकाखाली कळविलेः “अडॉल्फ हिटलर यांना पदच्युत केले जावे असे पायस बारावे यांना अपील करण्यात आले आहे.” याची बजावणी झाली असती तर युध्दाच्या निष्पत्तीवर याचा परिणाम घडवला गेला नसता का, तसेच मानवजातीस बऱ्‍याच त्रासापासून वाचविले जाण्यास मदत मिळाली नसती का? परंतु, पोपनी कसलाही प्रतिसाद दिला नाही हे दुःखाचे आहे.

दक्षिण अमेरिकेतील काही कॅथोलिक राष्ट्रात रखेली ठेवणे हे फारच सर्वसामान्य आहे. उत्तर अमेरिकेतील एका फ्रेंच पदवीधारकाने संपादकीय लेखात लिहिलेः “वेश्‍याव्यवसाय कायदेशीर बनवा—तो सदाचाराचा पर्याय आहे.” (फिलडेलफिया डेली न्यूज) याचप्रमाणे, काही प्रॉटेस्टंट राष्ट्रांवर नजर टाका, जेथे पत्नीचे साटेलाटे करणे, विवाहाआधीचा लिंगाचार, विवाहाविना लैंगिक मौजमजा हे अगदीच सामान्य आहे. याविषयीचे कारण आपल्याला एका वर्तमानपत्रातील मथळ्यात दिसते, जे आहेः “विवाहाआधीच्या लिंगाचाराविषयी धर्मनेत्यांची स्तब्धता.” लेख म्हणतोः “अमेरिकेतील पाळक विवाहाआधीच्या लिंगाचाराबद्दल स्तब्ध प्रचार करण्यात दोषपूर्ण आहेत. . . . आपल्या सदस्यांना ते मुकतील याचे त्यांना भय वाटते.” (टेलिग्राफ, नॉर्थ प्लेटे, नेब्रास्का) तर मग, सगळेच धर्म सदाचाराचे बळ आहेत असे वाटते का?

ख्रिस्तीधर्म जगतात धर्मामध्ये, युद्धकाळादरम्यान सदाचाराच्या बळाची न्यूनता अगदीच स्पष्ट दिसून येते. या कानास गोड वाटणाऱ्‍या दाव्यांबद्दल तुम्हास कसे वाटते त्याचा जरा विचार करा. अमेरिकेतील फेडरल कौन्सिल ऑफ द चर्चेस ऑफ ख्राइस्ट याचे माजी सचिव वॉल्टर डब्ल्यु वॅन कर्क यांनी १९३४ मध्ये लिहिलेः “सुवार्तिक व इतर उपाध्यायांनी युद्धाविरुद्ध गंभीर भूमिका घेतली आहे. . . . या शांती पथकाचा उद्‌भव, युद्ध हे अक्षरशः, येशूने केलेला प्रचार व त्याचे कार्य यांच्या विरुद्ध आहे याची खात्री पटल्यामुळे झाला.” (रिलिजन रिनाऊन्सेस वार) विविध चर्चेस व धर्मपुढाऱ्‍यांचे अवतरण घेतल्यावर या पुस्तकाने शेवटी म्हटलेः “चर्चेसनी प्रामुख्याने स्पष्ट केले की ते मानवांना ठार व अपंग करणे या व्यवहारात येथून पुढे सहकारी म्हणून राहणार नाहीत. सुवार्तिक . . . यांनी आपल्या सहकाऱ्‍यांचा रक्‍तपात करण्यापासून आपले हात धुतले आहेत व ते आता कैसराच्या मैत्रीपासून दूर होत आहेत.”

तथापि, ही आशावादी भाकिते खरी ठरली नाहीत हे दुःखाचे आहे. दुसरे महायुद्ध भडकले तेव्हा ख्रिस्ती धर्मजगताच्या एकाही प्रमुख धर्माने ‘युद्धाचा धिक्कार’ करण्यासाठी खंबीर भूमिका घेतली नाही. तुमच्या विभागातील चर्चने असे केले होते का?

सदाचाराचे कुंपण तोडले

दोन्ही बाजूंचे काही पुरावे विचारात घेतल्यावर, पुष्कळ प्रकरणात जगाचे लोकप्रिय धर्म सदाचारासाठी शक्‍तीशाली बळ ठरु शकले नाहीत याविषयी तुम्ही सहमत होणार नाही का? लूक मासिकाने घोषित केलेः “चर्चेस . . . उत्तम सदाचारी नेतृत्व देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्या भव्य जबाबदारीच्या प्रमाणात त्यांचे अपयश देखील तितकेच चिंताजनक आहे.” ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील द करीयर मेल याने लैंगिक अनीतीवर प्रतिबंध घालण्यात ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांना अपयश आले आहे यावर आपला अभिप्राय व्यक्‍त केला. “बिशप व कॅनन्सविषयी पाहता . . . विवाहाबाहेरील लैंगिक समागम शुद्धतेचे आचरण असू शकते व ते ‘देवाचे गौरव प्रकटविते’, . . . तसेच जारकर्म हे मुळात तसे वाईट नाही आणि व्यभिचारही तसा पाहता चुकीचा नाही, अशी लिखाणशैली केली जाते तर मग सर्वसामान्य स्त्री-पुरुष व विशेषतः किशोरवयीन मुले-मुली बरोबर काय व चूक काय याविषयी गोंधळात पडणे साहजिकच आहे. ‘नवनीती’विषयीचा केलेला हा प्रचार सदाचाराचे कुंपण तोडण्यात प्रवर्तित होत आहे.”

अशाप्रकारे जगातील सर्व प्रमुख धर्म नैतिक बळाचा खरा आधार असल्याचे दिसत नाहीत. उलटपक्षी, त्यांनीच आजच्या दुःखद नैतिक स्थितीची जबाबदारी स्विकारली पाहिजे. तथापि, धर्म हा “देव किंवा सर्वसमर्थाची सेवा व भक्‍तीचा मार्ग आहे” हे पाहता तो ज्या राष्ट्रात प्रचलित आहे तेथे त्याने सदाचाराचे बळ असू नये का? तर मग, कशाची कमतरता आहे? तुमचा धर्म अशाप्रकारचे बळ कसे प्रदर्शित करु शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा